एक होता कार्व्हर | Ek hota Carve Marathi 📚 #Bookshorts
वर्णद्वेषी गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कर्तबगार कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञ. प्रचंड कष्टदायी, खडतर परंतु अखंड प्रवास मनाला आणि अंतरात्म्याला पोषण करणारे प्रेरणादायी कथन एक होता कार्व्हर. . . जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, श्रमलेल्या, कबाड-कष्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञाचं अखंड अविरत जीवनप्रवास सांगणारं हे पुस्तक.
पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर- #Ek hota Carver | एक होता कार्व्हर
#एक होता कार्व्हर-एक रसग्रहण लेखिका – वीणा गवाणकर
‘एक होता कार्व्हर’ हे जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र आहे. कार्व्हर हे एक थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास लेखिकेने अतिशय मार्मिकपणे रेखाटलेला आहे. व्यक्तिचे मोठेपण त्याच्या बह्यसौन्दर्यापेक्षा त्याच्या गुणांवर व प्रतिभेवर त्याच्या आत्मिक सौंदर्यावर जास्त सिद्ध होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर होय.
#एकहोताकार्व्हर #EkHotaCarver
एक होता कार्व्हर. . .
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, श्रमलेल्या, काबाड कष्ट केलेल्या या थोर संशोधकाचं, चित्रकाराचं, कृषितज्ञाचं अखंड अविरत जीवनप्रवास सांगणारं हे पुस्तक.
समाजातील कोणत्याही स्तरातील कोणत्याही वयोगटातील वाचकाला हे पुस्तक वाचताना एक वेगळीच ऊर्जा आणि जगण्याची कला शिकवणारं हे पुस्तक. जितकं वाचायला ऊर्जा देते तितकेच आयुष्यात जगताना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा आणि ध्येयाप्रती असलेली आवड-आसक्ती-एकनिष्ठपणा, सचोटी-जिद्द तसेच श्रम-सातत्य-संयम यांचे महत्व अधोरेखित करते.
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.
एक होता कार्वर" विणा गवाणकर लिखित हे अप्रतिम पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, या पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञ त्यांचे हे आत्मचरित्र. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले.
जन्मत:च प्रगल्भ व निसर्ग तसेच शेतीकडे ओढा आणि आवड दोन्ही असल्याने त्यांनी शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला अथवा इतर कलेत प्रावीण्य असूनही पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर गरीब कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले.
निरनिराळे प्रयोग जसे कि शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाचा, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.'
आयुष्यात साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे, वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ, अमेरिकेत कृषी क्षेत्रात कृषीक्रांती घडवून आणणारा अतुल्य-अमुल्य आणि मौलिक कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे. पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.
1860 च्या दशकाच्या उत्तरार्धात क्रिस्टल प्लेस जवळील न्यूटन काउंटी येथील डायमंड ग्रोव्ह येथे गुलामीच्या काळात कार्व्हरचा जन्म झाला होता, ज्याला आता मिसुरी म्हणून ओळखले जाते. त्याचा मालक, मोजेस कार्व्हर हा जर्मन अमेरिकन परदेशीे होता ज्याने जॉर्जचे पालक मेरी आणि गिल्स यांचेकडुन कार्व्हरला ऑक्टोबर, १८५५ मध्ये ७०० डॉलर्समध्ये खरेदी केले होते.
अशा या अवलीयाची कथा वाचतांना अंगावर अक्षरशः शहारे आणी डोळ्यात अश्रु एकसाथ येतात. प्रचंड प्रेरणा देणारं हे पुस्तक शेतकरी व ग्रामिण पार्श्वभुमी असलेल्या प्रत्येकानं वाचलंच पाहीजे यात तुमत नसावे.
कार्व्हर यांनी या क्षेत्रांमध्ये ठरवलं असतं तर स्वतःच्या नावावर कमीत कमी 500 पेटंट्स
घेऊन, घरी बसून चैन करु शकले असते पण पुन्हा तेच. ध्येय महत्वाचं. म्हणून
तर एडिसन आणि हेनरी फोर्ड सारख्या लोकांकडून चालत येणारी लक्ष्मी नाकारली.
आज लहानसहान गोष्टींच्या पेटंट्सवरुन वरुन होणारे क्षुल्लक विवाद पाहिले कि
न चुकता आठवतात कार्व्हर.
कार्व्हरांचं चरित्र बरंच काही शिकवून जातं. आजच्या आमच्या गोंधळलेल्या पिढीसाठी ते फक्त प्रेरणादायी नव्हे तर एक उत्तम मार्गदर्शक पण ठरु शकतात. ध्येय म्हणजे काय याचं उत्तर कार्व्हरांची जीवनगाथा वाचली कि उमगतं.
वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसंच्या तसं उभं राहत. कार्व्हर यांचा बालपणातील संघर्ष आणि हलाखीचे जीवन
याबद्दल वाचत असताना आपण भावना दाटून येतात, आपण भावनिक होतो आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी तरळतं हे उत्तम लिखाणाचे द्योतक होय. लेखिकेने शब्दबद्ध केलेल्या कार्व्हर यांच्या आयुष्यातील घटना नक्कीच भावनिक मानवी मनाला स्पर्श करतात.
चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन. एकदा वाचून मन न भरणारी ही कादंबरी नक्की वाचा.
👉📖🕮📚 online PDF वाचा या दुव्यावरून क्लिक करा इथे
ALSO READ:
Rozlind Frankleen | रोझलिंड फ्रँकलीन
ॲलेक्स हॅले- "द रूटस्"
टिप्पण्या