मन की बात
मानवी मन ह्या विषयी अगदी पुरातन काळापासूनची संकल्पना आणि आजचे आधुनिक काळातील विविध निरिक्षण-परिक्षण-शोध, अभ्यास, प्रयोग, सिद्धांत इत्यादींमुळे आज सिद्ध झालेले आहे की मन हे आपल्या शरिरातील एक अदृश्य अंग आहे ज्याची जाणीव आपल्याला होत नाही, आपण त्यास पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ठिकाण शोधू शकत नाही परंतू एकमताने सर्वधर्म-पंथ-वर्ग-वर्णातील मानवांनी मनाचे अस्तित्व मान्य केले आहे.
त्या अनाकलनिय मनाचे द्वार मनोविज्ञानाच्या खिडकीतून पाहणार आहोत. मनाचा आकार-प्रकार त्यांचा आपल्या जीवनात व्यवहारावर, वर्तणूकीवर पर्यायाने समाजावर होणारा परिणाम का? कसा? किती? आणि केंव्हा होतो? विविध संशोधन प्रयोग व अभ्यासांती निघालेले निष्कर्ष दिवसेंदिवस मनाचे कोपरे धुंडाळू लागले आहेत, नेमका आपल्या जीवनावर होणारा मनाचा परिणाम समजून घेणार आहोत.
मनातील भावना, प्रेरणा, विचार, दुःख, प्रेम, आनंद, भिती यांचा दैनंदिन व्यवहारांवर कसा परिणाम होतो याविषयावरील विविध पुस्तकं, लेख, पॉडकास्ट, टेड टॉक, व्हिडिओ यांद्वारे जाणून, समजून आपल्या जीवनातील समस्यांवरील तोडगा, मार्ग, उपाय, तोडपाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
#स्वयंमदत, #वैयक्तिक, #व्यावसायिक, #व्यावहारिक #शैक्षणिक जीवनात
👉The Mind : Software of human body
मन ह्या विषयावरील पुस्तकांची यादी
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे.
तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
- आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
- प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
- हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
- आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
- तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
- भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
- 'चिरतरुण' राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
_________________________
अचेतन मनाची शक्ती जागृत करण्याचे शास्त्रीय मार्ग त्यांनी 'द पॉवर ऑफ युवर सबकॅन्शस माइंड' या पुस्तकातून सुचविले आहेत. प्रार्थनेतील शक्ती, तिचे महत्व विशद केले आहे.
📗📘📙📖📕🔖📑
अंतर्मनाची ताकद
![]() |
अंतर्मनाची ताकद-डॉ.जोसेफ मर्फी मराठी अनुवाद-सविता दामले |
टिप्पण्या