ऍटॉमिक हॅबिट्स-जेम्‍स क्‍लीयर- मराठी पुस्‍तक परिचय (Atomic Habits -Marathi By James Clear)

एकपट, दुप्पट, तिप्पट नाही तर कशातही ३७.७८ पट उत्तम कसे व्हावे? वाईट सवयी सोडून उत्तम सवयी आत्मसात करण्याचा सोपा व सिद्ध मार्ग

सवयी लहान परिणाम महान
ॲटॉमिक हॅबिट्स

जेम्‍स क्‍लीयर

पुस्‍तक परिचय-सारांश मराठी

Atomic Habits 

An Easy & Proven Way to Build Good Habits & Break Bad Ones

Author
James Clear

Book Review-Summary in Marathi
How to become 37.78 times better at anything..!

  1. जशा सवयी तसे परिणाम, चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते. 
  2. जे तुम्ही पुनःपुन्हा, परत परत करत राहता त्याचेच दीर्घकालीन परिणाम तुमच्या पदरात पडतात, तीच तुमच्या स्थितीची खरी मोजपट्टी असते. 
  3. आयुष्यात तुम्ही कोठे पोहोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकीत जाणून घ्यायचे असेल, 
  4. तर तुमच्या सवयींमधील बऱ्या बदलांमुळे होणारे छोटे छोटे लाभ आणि वाईट बदलांमुळे होणाऱ्या लहान लहान हानी तुमच्या जीवनप्रवासाच्या आलेखावर पुढील दहा वीस वर्षांच्या कालावधीत घातांकांच्या पटीत जे परिणाम घडवू शकतील त्याचा वेध घ्या. 

 
  • मासिक मिळकतीपेक्षा खर्च जास्त होतो आहे का? 

  • ठरल्याप्रमाणे दर आठवड्याला व्यायामशाळेत जाऊन नेमून दिलेला व्यायाम केला जातो आहे का? 

  • रोजचे वाचन आणि त्यातून ज्ञानार्जन नियमितपणे सुरू आहे का? 

  • रोज काहीतरी नवीन शिकत आहात का? 

यांसारख्या अगदी रोजच्या जीवनातल्या बारीक बारीक लढायांमधील जय पराजय तुमचे व्यक्तिगत भविष्य ठरवणार आहेत हे लक्षात घ्या.
काळ यश व अपयश यातील दरी रुंदावत नेतो. जसे तुम्ही त्याच्या पदरात टाकाल तसेच तो तुम्हाला परत देतो. चांगल्या सवयी काळाला तुमचा मित्र बनवतात, वाईट सवयी शत्रू!

#📌सवय हे दुधारी शस्त्र आहे. चांगल्या सवयी तुम्हाला जितक्या सहजपणे घडवतात तितक्याच सहजपणे वाईट सवयी तुम्हाला बिघडवतात, तुम्हाला खच्ची करून टाकतात आणि त्यामुळेच त्यांचा अगदी खोलात शिरून, सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. 

सवयी कशा काम करतात, त्या आपल्याला हवा तो परिणाम साधून देतील, अशा पद्धतीने कशा राबवायच्या असतात हे नीट समजून घ्यावे लागते. तसे केले म्हणजे सवय या शस्त्राच्या धोकादायक धारेपासून स्वतःला सुरक्षित राखता येते.

#📌कोणत्याही बाबतीत 'चांगले पेरा, काळजीपूर्वक जोपासा, रोप आपोआप बहरास येईल' हेच खरे ठरते. 

लहान लहान गोष्टी ज्या आपण दुर्लक्ष करतोज्या की खूप मोठा बदल घडवून आणु शकतात जसे की हे पुस्तक आंतराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं आहे तसेच ह्या पुस्तकाची खासियत आहे. छोट्या छोट्या बाबींवर जर आपण काम केलं तर मोठे बदल आपल्यात नक्की दिसून येतील. हे पुस्तक खूप मदत करून जातं.


जेम्स क्लियर

जेम्स क्लियर हा एक लेखक आणि वक्ता आहे. सवयी, निर्णय घेणे, निवड करणे, सातत्याने सुधारणा करणे या विषयांवर त्याचे प्रभुत्व आहे. त्याचे लिखाण द न्यू यॉर्क टाइम्स, टाइम, ऑन्ट्रप्रुनर या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असते. तो ‘फॉर्च्युन फाइव्ह हंड्रेड’च्या यादीत समाविष्ट झालेल्या यशस्वी कंपन्यांमध्ये नेहमीच व्याख्याने देतो, शिक्षणवर्ग चालवतो. तो इंटरनेटद्वारा ‘हॅबिट्स Academy’ ही शिक्षणसंस्था चालवतो.

ॲटॉमिक हॅबिट्स
पुस्तक सारांश मराठी

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, लेखक जेम्स क्लिअर यांनी लिहिलेली मानवी सवयींवर आजपर्यंत लिहिल्या गेलेली जगातील सर्वांत उत्तम पुस्तकांपैकी एक पुस्तक ऍटॉमिक हॅबिट्स.  या पुस्तकाच्या मदतीने आपण जाणून घेणार आहोत की, 

  • वैज्ञानिकदृष्ट्या व्यावहारिक आणि शक्तिशाली पद्धतींच्या साहाय्याने कोणीही नव्या सवयी कशा निर्माण करू शकतो किंवा जुन्या वाईट सवयींना कसे सोडू शकतो.
  • आपण हे जाणून घेऊ की कसे छोटे पाऊल, छोटे प्रयत्न मोठे परिणाम तयार करत असतात.
  • हेही जाणून घेणार आहोत कि आपण इच्छा नसतानाही आपल्या सवयींना मधूनच का सोडून टाकत असतो आणि त्यावर काय उपाय आहेत?
  • आणि कशा रीतीने आपण त्यावर ठामपणे टिकून राहू शकतो.
  • कसं आपण कोणतीही सवय बनवू शकतो आणि सोडूही शकतो
  • आणि कसं आपण आपली स्वयं-ओळख (Self Identity) बदलून आपली वागणूक आणि सवयी बदलू शकतो

पुस्तक सारांश

ह्या सारांशामध्ये आपण पुस्तकाचे थोडक्यात, सहज, शक्य तितक्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी फक्त वाचायलाच सोप्या न वाटता दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणून आजपासूनच आपल्या आयुष्याला चांगले-उत्तम-उत्कृष्ट बनवण्यासाठी पाऊल उचलू शकाल.  

मित्रांनो खरंच, खूपच शक्तिशाली आणि व्यावहारिक अशी पुस्तक आहे.

या पुस्तकात सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर सांगतात की, छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशा प्रकारे घडवून आणतात. ते काही सोपी तंत्रं सांगतात, ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल. 

या तंत्रांमध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला, दोन मिनिटांच्या नियमाची ताकद आणि गोल्डीलॉक्स झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात. हे छोटे बदल तुमच्या करिअर, नातेसंबंधांच आणि जीवन यांत परिवर्तन घडवतील. 

तुम्ही तुमचे दिवस आणि जीवन कसे व्यतीत करता, याविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलणारं असं हे पुस्तक आहे.  ॲटॉमिक हॅबिट्स


1%  E  V  E  R  Y  E  A  D  Y
37% a Year..!

एक टक्का दररोज ची सुधारणा वर्षात ३७% टक्के वाढ
ॲटॉमिक हॅबिट्स


#१. The १% Rule (Small incremental changes can result in massive results)

बऱ्याच लोकांना असं वाटते की काही मोठं यश मिळविण्यासाठी दररोज मोठ्या गोष्टी करण्याची गरज असते. परंतु जर या गोष्टीला मोठ्या प्रतिमेमध्ये पाहिल्यास असं म्हणणं चुकीचं होईल. कारण, लेखक जेम्स क्लिअर यांच्या मते, कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजेच चक्रवृद्धी परिणाम केवळ आर्थिक गुंतवणुकीतच कामाला येत नाही, खरे तर आपल्या दैनंदिन आयुष्यात आणि सवयींवर देखील त्याचे परिणाम बघायला मिळतात. 

Compounding-चक्रवृद्धी दोन्हीकडे लागू होत असते, मग भलेही तुम्ही एखादी चांगली सवय असेल, किंवा एखादी वाईट सवय.  परंतु जर तुम्ही स्वसुधारणा करू इच्छित असाल आणि परिणामकारक सवय बनवायची आहे, तर जेम्स म्हणतात कि, तुम्ही फक्त दररोज १% टक्काच सुधारणा जरी केलात तर, तुम्ही वर्षाअखेर ३७% सुधारित असाल. तुमच्यामध्ये एका वर्षात ३७% सुधारणा झालेली दिसून येईल. तुम्ही ३७% ने वाढलेले असाल.

म्हणूनच, तुम्हाला एका रात्रीतच बदल व परिणाम मिळतील हे विसरून, दररोज छोटे छोटे, एकेक पाऊल पुढं न्यावे लागेल आणि यामध्ये सालगपणा कसा राहील यावर लक्ष दिलं पाहिजे.  सातत्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कारण सकारात्मक परिणाम हे तुम्ही घेतलेल्या छोट्या छोट्या सुधारणांचा byproduct आहे जे तुम्ही दररोज करत असता. आणि म्हणूनच चक्रवृद्धी वाढ म्हणजेच तुमच्या सवयी ह्या कंपाऊंड इंटरेस्ट आहेत तुम्ही करत असलेल्या दररोजच्या सुधारणांचा. 

आणि हो, जर दररोजचं बघितलं तर, आपल्या सवयीचा प्रभाव-इम्पॅक्ट आपल्याला नगण्य दिसून येईल. परंतु जर मोठ्या दृष्टीने बघितलं तर, ह्याच सवयी काही आठवड्यात, काही महिन्यात आणि काही वर्षातच आपला प्रभाव-इम्पॅक्ट दाखवत असतात. म्हणजेच परिणाम खूप मोठे आणि दृश्य स्वरूपाचे असतात. कधीकधी तर, आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त.

#२.  The Plateau of Latent Potential (Forget about the instant results)

आजच्या ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन च्या जगामध्ये आपल्याला आपल्या दीर्घकालावधीच्या सवयींसोबत राहणे यासाठी कठीण होऊन बसलं आहे कारण, सर्वकाही इन्स्टंट झालेलं आहे.

जसे, 

  • इन्स्टंट फूड, 
  • इन्स्टंट प्रॉडक्ट डिलिव्हरी, 
  • इन्स्टंट इन्फॉर्मशन, 
  • इन्स्टंट कॉन्टेन्ट 

आणि काही क्लीक मध्येच काही इन्स्टंट गोष्टी मिळत असल्यामुळे आपला मेंदू इन्स्टंट परिणामासाठी जोडल्या गेलेला आहे. (wired for instant results) आणि इथेच जर आपण delayed gratification सारखा विचार किंवा सवयीला आत्मसात केलं असेल तर आपण जेम्स क्लीअर यांच्या "The Plateau of Latent Potential" "अव्यक्त संभाव्यतेचे पठार" ते समजू शकू.  आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण विकासाच्या, यशाच्या मार्गाला थेट, सरळ आणि रेषीय (linear) आहे असं समजतो. खरे तर, वास्तवात तो मार्ग वेडावाकडा, लांब आणि अपेक्षेपेक्षा अगदी वेगळा असतो.  

लेखक असे म्हणतात की,  जोपर्यंत आपण एक उंबरठा ओलांडत नाही (थ्रेशोल्ड ब्रेक करत नाही) तोपर्यंत कोणतीही सवय दृश्य परिणाम दाखवत नाहीत (Visible Results) आणि यामध्ये खूप लांबचा कालावधी लागत असतो.  आणि ह्या लांब कालावधीमध्ये आपण अनेकदा निराश (demotivated) होत असतो आणि कोणतेही परिणाम दिसून न आल्यामुळे आपण आपल्या कामाला, लक्ष्याकडे जाणाऱ्या मार्गाला, ध्येय-उद्दिष्टाला मधेच सोडून देत असतो.  यालाच लेखकांनी "व्हॅली ऑफ डिसपॉईंट्मेंट म्हणजेच निराशेची दरी" असे म्हटले आहे.  

जोपर्यंत आपण ह्या निराशेच्या दरीला (valley of disappointment) पार करून पुढं जात नाही तोपर्यंत आपल्याला आपले सततचे प्रयत्न करतच राहावे लागतील आणि मग आणि मगच आपल्याला दृश्य परिणाम दिसायला लागतात.


जर तुम्हाला खरोखरच कणखर सवय बनवून टिकवायची असेल तर निराशेच्या मार्गातून, निराशेच्या खोल दरीतून जावेच लागेल.  म्हणजेच तुम्हाला खुपसाऱ्या निराशा आणि अपयशांना अगोदरच डोक्यात गृहीत धरूनच नव्हे तर तोंड देण्यासाठी तयार राहायला पाहिजे. आणि तोपर्यंत  थांबायचे नाही जोपर्यंत तुम्ही "Latent Potential Plateau" "अव्यक्त संभाव्यतेचे पठाराला पार करत नाही. 

What is an example of delay gratification?

 "delay of gratification, the act of resisting an impulse to take an immediately available reward in the hope of obtaining a more-valued reward in the future. The ability to delay gratification is essential to self-regulation, or self-control."
-Encyclopedia Britannica

#३. The Cycle of Habits  (How to build Habits)

सवयीचे चक्र & सवयी कशा बनवाव्या?

लेखक जेम्स क्लीअर ह्या सवयीच्या चक्राला चार पायऱ्यांमध्ये विभागून समजावतात, त्यात, क्यू, क्रेविंग, रेस्पॉन्स आणि रिवॉर्ड म्हणजेच अनुक्रमे संकेत, लालसा, प्रतिसाद, प्रतिफळ किंवा बक्षीस.  

 👉हॅबिट सायकल सवयीचे चक्र:

  • cue- संकेत, आपल्या मेंदूला कृती करण्यासाठी ट्रिगर करतो,
    जसे-सकाळची अंगात असलेली सुस्ती हा क्यू म्हणजेच संकेत आहे चहा पिण्याचा.   
  • craving- तल्लफ, लालसा-  त्या कृतीला-कामाला  करण्यासाठी किंवा सवयींसाठी प्रेरणा देण्याचे बळ पुरवत असते.  (provides motivational force)
    जसे, चहानंतर मिळणारी ऊर्जा किंवा तारतरीपणा आणि चहाचा सुगंध
  • response- प्रतिसाद- त्या सवयी किंवा त्या कृती ज्या आपण करत असतो.
    तुमचं चहा बनवणे किंवा मागविणे हे झालं प्रतिसाद
  • reward- बक्षीस- चहा पिल्यावरचा समाधान आणि तुम्हाला अंगात तरतरीपणा जाणवतो हे झाले तुमचे बक्षीस

आणि  सवयीचा हाच मुख्य उद्देश असतो. पहिले दोन भाग क्यू आणि craving म्हणजेच संकेत आणि लालसा समस्यांवर आधारित पहिला टप्पा असतात तर शेवटचे दोन response आणि reward हे समाधानावर आधारित टप्प्यात येतात.  हे सवयीचे चक्र तुमच्या दोन्ही चांगल्या आणि वाईट सवयींवर  लागू होतात.  आणि जेम्स क्लिअर म्हणतात, आपल्या वर्तन बदलण्याचे ४ नियम ह्याच चक्राच्या प्रभावातून निघत असतात, ते पुढील प्रमाणे समजून घेऊ.


#4.  Four Laws of Behaviour Change  

 वर्तन बदलणारे चार नियम

सवयी कश्या बनवाव्या?

  • नियम १.  Make it obvious (Cue)स्पष्टता-सहजता ठेवा  हा नियम लागू होतो संकेतावर (क्यू) 
  • नियम २.  आकर्षक बनवा Make it attractive (Craving) हा नियम लागू होतो तुमच्या लालसा-तल्लफ यावर (क्रेविंग) 
  • नियम ३.  सोपं बनवा Make it easy (Response) हा नियम लागू होतो प्रतिसाद काय देतो यावर (रेस्पॉन्स) आणि शेवटचा 
  • नियम ४.  समाधानकारक बनवा Make it satisfying (Reward) बक्षिसावर हा नियम लागू होतो (रिवॉर्ड)


उदाहरणासाठी, 

समजा तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे, तर, तुम्ही सकाळीच रात्री वाचता येईल यासाठी अंथरुणाजवळ एक पुस्तक ठेवू शकता. यामुळे स्पष्टता-सहजता होईल.  obvious म्हणजेच डोक्यात संकेत येईल (cue) ट्रिगर" होईल की, रात्री झोपायला जाताना पुस्तक वाचायचे आहे.   पुस्तक दिसत असल्याने तुमचं काम सोपं होईल.   निवांतपणे, आरामाने हातात पुस्तक घेऊन अंथरुणावर पडून पुस्तक वाचता येईल हे तुमच्यासाठी आकर्षक (Attractive-Craving) आनंददायक, सुखदायक होईल. 

असे करणे तुमच्यासाठी कपाटातून पुस्तक शोधून किंवा टेबलवर बसून वाचण्याच्या तुलनेत अधिक सोयीस्कर, सोपं होईल (Easy-Response).  आणि दररोज एक प्रकरण वाचून संपविल्याने तुम्हाला समाधान (Satisfying-Reward) मिळेल.

आणि असंच तुम्हाला जर एखादी सवय तोडायची-सोडायची असेल तर, तुम्हाला फक्त ह्या नियमांच्या अगदी उलट करायचं आहे.  

उदाहरणार्थ, 

समजा तुम्हाला एखादे व्यसन किंवा धूम्रपान करणे किंवा सिगारेट पिणे, सोडायचे असेल तर, सर्वांत आधी तुम्हाला त्याला invisible (no cue) अदृश्य म्हणजेच डोळ्यासमोरून काढून टाकायचे आहे. 

तुम्हाला सिगारेट खरेदीच करायचे नसून, घरात किंवा बॅगमध्ये, पॉकेट्मधेसुद्धा ठेवायचे नाही.  दुसरं, तुम्हाला त्याला अनाकर्षक बवायचं आहे, (Unattractive -no craving) म्हणजेच तुम्ही व्यायामशाळा-जिम लावू शकता ज्यामुळे तुम्ही आरोग्य दक्ष होण्याबरोबरच तुम्हाला स्वस्थ आहार आकर्षक वाटेल आणि सिगारेट अनाकर्षक.  तिसरं, तुम्हाला त्याला कठीण बनवायचं (difficult-no response) आहे, तुम्हाला तुमच्या सिगारेट पिणाऱ्या मित्रांसोबत जायचं नाहीये. 

तुम्हाला तो मार्गच बदलायचं आहे ज्या दुकानातून तुम्ही दररोज सिगारेट खरेदी करत असता. आणि तुम्हाला इतर सर्वांना हे सांगून ठेवायचं आहे कि, तुम्हाला जर कोणी सिगारेट पिताना बघितले तर तुम्हाला लुजर म्हणून चिडवायचं आहे. आणि चौथं, तुम्हाला त्याला असमाधानकारक (unsatisfying- no reward ) बनवायचं आहे.  जर तुम्ही जीम ला जाल, आणि एक आरोग्यपूर्ण जीवनशैली आत्मसात कराल तर तुम्हाला समाधान फक्त जिम ला जाऊन आणि स्वस्थ आहार घेऊनच यामध्येच मिळेल.  

कारण, तुम्हाला सुख-आनंद-मजा देणारा डोपामिन हॉर्मोन मेंदू शरीरात सोडेल आणि तुम्हाला सिगारेट असमाधानकारक (unsatisfying) वाटायला लागेल.  आता, तुम्हाला समजावण्यासाठी हे काही उदाहरण होते. ह्या चार नियमांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या हुशारीने, तुमच्या कोणत्याही सवयीला निर्माण करू शकता, बनवू शकता किंवा तोडू-सोडू शकता. 

#५.  Focus on Systems

लेखक जेम्स म्हणतात की, आपल्याला ध्येयांवर वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दैनंदिन प्रणाली वर (डेली सिस्टिमस) वर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच, आपली दैनंदिन प्रक्रिया-कामं उत्पादक आणि शिस्तीत (productive & disciplined) असतील तर आपण दीर्घकाळात जे पाहिजे ते मिळवू शकतो.

Goals < Systems

ध्येय तर विजेते आणि लूझर्स दोघेही ठरवतात परंतु ठरविलेले ध्येय तेच प्राप्र्त करत असतात ज्यांना ध्येय मिळविण्याची व्यवस्था-प्रणाली- सिस्टिम माहित असते.  काहीही मिळवायचं कसं? याची प्रक्रिया-पद्धत-प्रणाली-सिस्टिम ज्यांना माहित असते तेच ध्येय-यश मिळवितात. म्हणूनच, ध्येयांवर नाही तर, दैनंदिन प्रक्रिया,  दिनचर्या यावर लक्ष केंद्रित करा. 

focus on daily routine and system.

ध्येय त्या परिणामांसाठी असतात जे तुम्हाला मिळवायची असतात. तर सिस्टिम, त्या प्रक्रियेबद्दल, पद्धतीबद्दल असते जी तुम्हाला त्या परिणामांकडे आणि उद्दिष्टांकडे घेऊन जात असते. 


उदाहरणार्थ, 

आपल्या खेळांचे ध्येय नेहमीच चांगले गुणांक मिळवणे असते, परंतु,  तुमचे संपूर्ण लक्ष फक्त गुण दाखवणाऱ्या स्कोर बोर्डाकडे असेल तर तुम्ही खेळाऐवजी त्या स्कोर बॉर्डरवर लक्ष केंद्रित (फोकस) कराल आणि तुम्ही प्रक्रियेला-प्रोसेसला-सिस्टिम समजू शकणार नाही.  आणि जर तुम्ही खेळण्याच्या सिस्टमवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कराल आणि आनंद-मजा घेत खेळाल तर तुम्ही नक्कीच अपेक्षेपेक्षाही जास्त गुण  मिळवू शकता.  

परंतु तुम्ही जर, फक्त आणि फक्त ध्येयावरच लक्ष केंदीर्त (फोकस) करत असाल तर, तुम्ही  हेच विचार करत असाल कि, जेंव्हा मी माझे ध्येय प्राप्त करिन, तेंव्हाच मी आनंदी आणि चांगलं वाटून घेईन. याचा अर्थ तुम्ही भविष्यात आनंद आणि समाधानाला टाळत आहात. तर तुम्ही जर सिस्टिम म्हणजेच व्यवस्था-पद्धत आणि प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करत असाल तर तुम्ही दररोजच छोटे छोटे ध्येय, यश प्राप्त करू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगले, आनंदी, समाधान वाटेल. 

👉💡तुम्हाला जर गोल सेट करायचं असेल तर दररोज करत असलेल्या गोष्टींवर-कामावर लक्ष द्या, दिनचर्या शिस्तीत ठेवा, इट्स ऑल अबाऊट रूटीन...

#6. Shape your Identity

लेखक जेम्स क्लिअर, आपल्याला खालील आकृतीद्वारे समजावतात कि, उदाहरणार्थ: तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे आहे किंवा काहीतरी मिळवायचं असेल तर, त्याला त्यांनी आऊटकम (outcome) असे म्हटलेलं जो ध्येयांच्या स्तरावर ठरविल्या जाते (operate) केलं जात असते.  तर, दुसरे स्तर असते प्रक्रियेचे (process)  म्हणजेच तुम्हाला दररोज जीम  जावे लागेल, स्वस्थ आहार घेणे, आणि दररोज कृती (actions)करणे, आपल्या सवयींनवर टिकून (follow your habits).  

यातच तिसरे आणि सखोल स्तर असते आपुल्या स्वयं ओळखीची (सेल्फ आयडेंटिटीची) इथे तुम्हाला स्वतःची ओळख (self identity) बदलावं लागेल. म्हणजेच तुम्ही जर स्वतःला फिट, तंदुरुस्त समजू लागता. किंवा तुम्हाला खोल मनात असं असं वाटत असते किंवा तुम्हाला आतूनच आत्म विश्वास येतो किंवा जागा होतो कि तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही त्यासाठीच बनलेले आहोत. यामुळे तुमचे वर्तन-तुमची वागणूक, सवयी आणि परिणाम (behavior, habits and results) तुमच्या "बिलीफला फॉलो" करतील. 

👉💡"आपल्या "बिलीफ-विश्वास"ला बदलणे, आपली ओळख बदलत (Change Identity) असते."

 
उदाहरणार्थ, 

  • सिगारेट पिणारा व्यक्ती तुम्हाला सिगारेट पिण्यासाठी देत असेल किंवा विचारात असेल तर, पहिल्या व्यक्तीचे उत्तर असेल, "मी सिगारेट पिणे सोडण्याचा प्रयत्न करत आहे." 
  • तर, दुसरी एखादी व्यक्ती म्हणेल, "नाही,  नको. मी धूम्रपान करत नाही. "
     
हा खूपच छोटासा फरक आहे,  परंतु हीच भाषेची शक्ती (power of language) मोठं-मोठे परिणाम निर्माण करत असते. 
 
तर, तुमचे ध्येय फक्त एक पुस्तक वाचणे नाही, तर, एक वाचक बनणे हे असले पाहिजे. तुमचे ध्येय परीक्षेसाठी फक्त काही दिवस अभ्यास करणे न राहता, एक उत्तम विद्यार्थी बनणे हे असायला पाहिजे. तुमचे ध्येय फक्त कोट्यवधी रुपये कमावणे हे न राहता, खरेतर एक उत्कृष्ट व्यावसायिक-उद्योजक बनणे हे असायला पाहिजे. तुमचे ध्येय स्वतः निरोगी आणि तंदुरुस्त राहणे नाही तर, एक शिस्त असलेला व्यक्ती बनणे हे असायला पाहिजे.   
 सारांश समाप्त

ऍटोमिक हॅबिट्स पुस्तकातून या सारांशामध्ये अतिमहत्त्वाचे आणि मूलभूत गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्हाला जर विस्ताराने आणि पुनःपुन्हा समजून घ्यायचे असेल तर तुम्ही पुस्तक खरेदी करून सविस्तर वाचू शकता व स्वतः सुधार करू शकता.

#Atomic Habits Book Summary In Marathi By James Clear
#atomic habits summary in Marathi 

☯ ई-वाचनालय

 

अधिक वाचा: हॅबिट्स सिरीज (सवयींची शृंखला)

 

📖📗📘📙

💡🙏👉विशेष विनंती: 

मित्रांनो लक्षात ठेवा, आम्ही जगप्रसिद्ध, ज्ञानवर्धक पुस्तकाचा गाभा, महत्वाचा सार थोडक्यात परंतु साध्या-सरळ-सहज-सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सारांश वाचून सगळं काही समजलं असा गैरसमज कधीच करून घेऊ नका. 

लेखकांचे अनुभव, उदाहरणं, दृष्टिकोन समजावून सांगण्याची भाषा-कौशल्य-शैली हे वेगळं असू शकते, म्हणून शक्यतोवर पुस्तक खरेदीकरून संपूर्ण पुस्तक वाचा असा आमचा सल्ला राहील.  कमी वेळेत जगातील उत्कृष्ठ पुस्तकांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.


ई-वाचनालय या संकेतस्थळाला भेट देऊन, पुस्तकांच्या मंचावर येऊन आपला अमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि धैर्यवपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.  


www.evachnalay.in

👉Also Read: 

 

तर वाचक मित्रांनो ह्या पुस्‍तकाचे सारांश तुम्‍हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्‍याकडे अगोदरच होती व तुम्‍ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्‍हाला खालील टिप्‍पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्‍यक कळवा.

तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्‍थळवर तुम्‍हाला काही त्रुटी दिसून आल्‍यास, तुमच्‍या सूचना, तक्रारी, प्रश्‍न, अडचणी-समस्‍या असतील काही सुधारणा हव्‍या असतील, तर आम्‍हाला खालील टिप्‍पणी व ई-मेल द्वारे अवश्‍य कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेऊ. धन्‍यवाद.

#7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi  #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


इतर संबंधि‍तः 

 


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

नेहमीच लक्षात ठेवा
Always Remember



www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive