आर्थिक स्‍वातंत्र्य-ग्रॅन्‍ट सबेटिअर-Financial Freedom


पैशाने पैसा कमावण्‍याचे शक्‍तीशाली धडे
३०-व्‍या वर्षी आर्थिक स्‍वातंत्र्य मिळवा


फायनान्शियल फ्रिडम
आर्थिक स्‍वातंत्र्य


फायनान्शियल फ्रिडम
आर्थिक स्‍वातंत्र्य

लेखक: ग्रॅन्‍ट सबेटिअर

पुस्‍तक सारांश मराठी

Financial Freedom

by the author Grant Sabatier
Book Summary in Marathi


☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

Money doesn’t buy Happiness

पैशाने आनंद खरेदी करता येत नाही

पैशाने आनंद खरेदी करता येत नाही, मित्रांनो बहुदा आपण सर्वांनी ही ओळ एकदातरी ऐकलं असेलच. 

आजच्‍या महागाईच्‍या जमान्‍यात आता कोणी अधिक पैशांनी आंनंदित होईल अथवा नाही माहित नाही, परंतू, कमी पैशांनी नक्‍कीच तो आनंदित होणार नाही.  कमी पैशांनी आपण अधिकतर दुःखीच असतो.  कित्‍येत अडचणींचा सामना करावा लागतो.

आणि आपण त्‍या अडचणी कमी व्‍हाव्‍या म्‍हणून आर्थिकदृष्‍ट्या आयुष्‍यभर झगडतच राहतो. त्‍यासाठी येथे ही ओळ अगदी बरोब्‍बर बसते की,

पैशाने आनंद खरेदी करू शकत नाही, पण
गरिबीने काहीच खरेदी करता येत नाही

“Yes Money can’t buy happiness But poverty can’t buy anything”

-Grant Sabatier
(An American Author, Podcaster, Blogger and Entrepreneur)

लेखक ग्रॅन्‍ट सबेटिअर यांनादेखिल अगदी असंच वाटत होतं., जेव्‍हा त्‍यांनी महाविद्यालयीन शिक्षण संपवून कित्‍येत ठिकाणी नोकरी केली. परंतू, ते काहीच पैसा वाचवू शकले नाही. आणि जेव्‍हा लेखक वयाच्‍या २४ वर्षाचे होते त्‍यांना परत एकदा नोकरीवरून काढून टाकण्‍यात आले. आणि खूप शोध घेऊनही त्‍यांना कुठेही नोकरी मिळाली नाही.  

एवढी वर्षे नोकरी करून, काम करूनही त्‍यांच्‍याकडे बचतीच्‍या नावावर त्‍यांच्‍या बॅंक खात्‍यावर केवळ $०२ दोनच डॉलर होते, ज्‍यावर त्‍यांना पोटापाण्‍यासाठी आणि आपल्‍या दैनंदिन गरजा भागवायच्‍या होत्‍या. जे व्‍यावहारिकदृष्‍ट्या अशक्‍यच होतं. 

एवढं मोठं आर्थिक अपयश पाहून लेखकांनी असं ठरवलं की, आता ह्यापुढे ते कधीही आर्थिकदृष्‍टया मागासलेले राहणार नाहीत. पैशांची चण-चण आपल्‍याला जीवनात कधीच भासू देणार नाही. ज्‍यासाठी त्‍यांनी स्‍वतःसाठी एक ध्‍येय ठरवलं की, ते स्‍वतःसाठी ०१-मिलियन डॉलर बचत करतील. आणि लवकरात लवकर निवृत्‍ती-रिटायर होतील.

यासाठी त्‍यांनी खूप श्रम-मेहनत केली. आर्थिक विषयावरील कित्‍येक पुस्‍तकं वाचून काढली, बरीचशी बचत केली, त्‍या पैशांची गुंतवणूक केली आणि दोन व्‍यवसायांची स्‍थापना केली, सुरूवात केली.

आणि तिसाव्‍या वर्षाच्‍या पाच वर्षे अगोदरच ते आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र सुद्धा झाले. (Financial Independent @ age 25).

लेखक ग्रॅन्‍ट सबेटिअर आपल्‍या आर्थिक स्‍वातंत्र्याच्‍या प्रवासाबद्दल सांगताना असे म्‍हणतात की, कोणालाही आर्थिक स्‍वातंत्र्य मिळवायचे असल्‍यास आपल्‍याला सात-टप्‍प्‍यांतून (7-Phasese) जावे लागते, जी आपण ०७-पाय-यांद्वारे मिळवू शकतो.

7-PHASES of Financial Freedom
by following 7-STEPS

फायनान्शियल फ्रीडम पुस्‍तकाचे लेखक ग्रॅन्‍ट सबेटिअर यांच्‍याच पुस्‍तकाद्वारे आपण वरील ०७-आर्थिक स्‍वातंत्र्याचे टप्‍पे आणि त्‍या आर्थिक स्‍वातंत्र्य मिळविण्‍याच्‍या ०७-पद्धती अथवा ०७-पाय-या पाहणार आहोत. ज्‍यांमध्‍ये आपण शिकणार आहोत की, कसं, आपण ह्या सात टप्‍पयांना पार करून आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र होऊ शकू.

तर चला सुरू करूया आर्थिक स्‍वातंत्र्याकडे नेणा-या सात-टप्‍पयांचा प्रवास...

 

टप्‍पा क्र.०१. स्‍पष्‍टता (Phase-1-CLARITY)

CLARITY
IS

REALITY

कित्‍येक लोकं कोणतेही नियोजन न करता आपली दैनंदिन नोकरी, काम करत राहतात.  आपल्‍या पगारीमधून येणा-या पैशांतून महागडी-चैनीच्‍या वस्‍तू खरेदी (Waste) करत असतात, आणि खूपच कमी पैसा बचत (Save) करत असतात.

कारण ती लोकं ह्या विषयावर कधीही गंभीरपणाने विचारच करत नाहीत की, जेव्‍हा ते काम करायच्‍या योग्‍यतेचे राहणार नाहीत, आणि आपला वेळ विकून पैसा कमावू शकनार नाहीत तेव्‍हा ते कसे तग धरू शकतील? पुढील आयुष्‍य जगतील कसं?  (वेळेच्‍या बदल्‍यात पैसा)

यासाठीच ह्या पायरीवर तुम्‍हाला सर्वात आधी हे पाहायला पाहिजे की, आत्‍ता तुम्‍ही तुमच्‍या स्‍वप्‍नांच्‍या आयुष्‍यापासून किती दूर आहात आणि भविष्‍यात निवृत्‍ती-रिटायमेंट नंतर पुढील आयुष्‍यासाठी तुम्‍हाल किती पैशांची गरज राहणार आहे.

इथे तुम्‍हाला एक नेमका आकडा निवडायचा आहे, एक नक्‍की आकडा, तंतोतंत रक्‍कम जी तुम्‍हाला आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र होण्‍यासाठी योग्‍य व आवश्‍यक वाटते अशी रक्‍कम. 

अशी रक्‍कम ज्‍यामुळे तुमच्‍या संपूर्ण आयुष्‍यात कधीही तुम्‍हाला पैशांसाठी काम करावं लागणार नाही.  आता हा नेमका आकडा तुमच्‍या सध्‍याच्‍या परिस्थितीवर अवलंबून असेल, की तुम्‍ही कोणत्‍या वयात निवृत्‍ती घेणार आहात.

आणि निवृत्‍तीनंतर तुम्‍हाला कसे जीवन जगायची इच्‍छा आहे. हा आकडा सोप्‍यापद्धतीने शोधण्‍यासाठी लेखक आपल्‍याला आपल्‍या वार्षिक उत्‍पन्‍नाच्‍या-कमाईतून खर्चाच्‍या २५-पट गुणण्‍यास सांगताता.

उदाहरणार्थ,  समजा तुमचे वार्षिक उत्‍पन्‍नातून खर्च ०४-लाख रूपये आहे, तर त्‍याला २५ ने गुणल्‍यास आर्थिक स्‍वातंत्र्य मिळविण्‍यासाठी तुम्‍हाला लागतील ०१-कोटी रूपये.

वार्षिक खर्च  | आर्थिक स्‍वातंत्र्य

4,00,000 X 25 = 1,00,000,00

हे एक साधं-सोपं उदाहरण आहे, तुम्‍हाला तुमच्‍या वार्षिक खर्चाच्‍या हिशोबाने आकडेमोड करून आपला स्‍वतःचा एक नेमका आकडा शोधून काढायचा आहे.


टप्‍पा क्र.०२- स्‍वयंपुर्णता: (Self Sufficiency)

जेव्‍हा तुम्‍ही एवढा पैसा कमाऊ लागता की तुम्‍हाला तुमच्‍या दैनंदिन गरजांसाठी विचार करावा लागणार नाही, चिंता करावी लागणार नाही. तुम्‍ही तुमच्‍या पुर्ण महिण्‍याचा खर्च एक रूपयादेखिल कुणाकडून उधार-उसणे न घेता स्‍वतःच स्‍वतःची व्‍यवस्‍था चांगल्‍यारितीने करू शकता. आणि तुम्‍ही तुमच्‍या आर्थिक स्‍वातंत्र्याकडे नेणा-या ध्‍येयाकडे एक पाऊल पुढे जाता.

आर्थिक स्‍वातंत्र्य मिळविण्‍याच्‍या दुस-या टप्‍पयात तुम्‍हाला हे शोधून काढावे लागेल की,

  • तुमची सध्‍याची आर्थिक स्थिती कशी आहे?
  • तुमची एकूण मालमत्‍ता किती आहे?
  • आता तुम्‍ही किती पैसा कमावत आहात? आणि
  • किती पैसा खर्च करत आहात? जर तुम्‍ही उधारी-कर्ज घेऊन आपले खर्च भागवत असाल तरी
  • तुमची बचत किती आहे?
  • किती पैसा गुंतवणूक करता?
  • तुम्‍हाला तुमच्‍या गुंतवणूकीतून किती परतावा मिळत आहे?

अशा प्रश्‍नांची उत्‍तरे तुम्‍हाला आपल्‍या सर्वप्रकारच्‍या कॅशफ्लोचा-पैशांच्‍या प्रवाहाचा हिशोब ठेवल्‍यास मिळेल. आणि हे सुद्धा बघा की, तुमच्‍याजवळ किती संपत्‍ती-असेट आणि देणी-लायाबिलिटी आहेत?

असेट-संपत्‍ती अशा गोष्‍टी असतात ज्‍यांद्वारे तुमच्‍याकडे पैसा येत असतो. जे तुम्‍हाला अधिक पैसा कमावून देत असतात. तर देणी-लायाबिलिटी अशा गोष्‍टी असतात ज्‍या तुमच्‍याकडून पैसा घेऊन जातात, तुमच्‍या खिशातून पैसा काढून नेतात.

लेखक असे म्‍हणतात की, तुम्‍हाला वेळोवेळी तुमची नेटवर्थ-एकूण संपत्‍ती किती आहे? हे तपासून पाहिले पाहिजे. जे तुम्‍हाला हे आठवण करून देत राहिल की,

  • तुम्‍ही सध्‍या कुठे उभे आहात?  
  • तुम्‍ही तुमच्‍या आर्थिक स्‍वातंत्र्य मिळविण्‍याच्‍या ध्‍येयाच्‍या किती जवळ पोहोचला आहात?
  • आणि तुम्‍हाला अजून किती दूर जायचे आहे?

तर लेखकांचा उद्देश येथे एकच आहे की, तुम्‍हाला एका गोष्‍टीवर सर्वाअधिक लक्ष देण्‍यास, लक्ष केंद्रित करण्‍यास सांगण्‍याचा आहे आणि तो आहे तुमची एकूण संपत्‍ती- नेटवर्थ.



टप्‍पा क्र.०३- तग धरणे: (Breathing Room)

ह्या टप्‍प्‍यात आल्‍यावर तुम्‍हाला जगण्‍यासाठी तुम्‍हाला तुमच्‍या मासिक येणा-या पगारीवर अवलंबून राहण्‍याची गरज नाही. खरेतर तुम्‍ही तुमच्‍या संपत्‍ती आणि गुंतवणूकीतूनच एवढे उत्‍पन्‍न निर्माण करत असता की, जरी तुमची महिण्‍याची पगार आली नाही तरी तुम्‍हाला जगण्‍यावर काहीही फरक पडणार नाही, आणि तुम्‍ही तुमच्‍या दैनंदिन खर्चांना सांभाळून घ्‍याल.

जेव्‍हा तुम्‍हाला हे समजून येईल की, तुमची सध्‍याची स्थिती काय आहे? आणि तुम्‍हाला कुठपर्यंत जायचं आहे? तेव्‍हा बॅग पॅक करून कामाला लागा. तुम्‍हाला तुमच्‍या ध्‍येयापर्यंत नेण्‍यासाठी कृती करायला सुरू करा. (Get ready to take Actions). 

यामध्‍ये सर्वांत आधी तुम्‍हाला तुमच्‍या अनावश्‍यक खर्चांवर नियंत्रणात आणणे अत्‍यंत गरजेचे आहे.

कारण जेव्‍हा तुम्‍ही पैसा कमावत असता, तेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या वेळेचा काही हिस्‍सा-भाग सेल करत असता, म्‍हणजेच विकत असता.

जेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या पैशांना कुठेही खर्च करत असता, तेव्‍हा अप्रत्‍यक्षरित्‍या तुम्‍ही तुमच्‍या वेळेच्‍या बदल्‍यात त्‍या वस्‍तू-सेवा-गोष्‍ट खरेदी करत असता.

ह्यासाठीच जेव्‍हाही तुम्‍ही तुमचे पैसे खर्च कराल, तेव्‍हा खर्च करण्‍याअगोदर तुम्‍हाला स्‍वतःशीच काही प्रश्‍न विचारायला पाहिजे-

  • काय तुमच्‍याजवळ त्‍या वस्‍तू-सेवा-गोष्‍ट खरेदी करण्‍यासाठी तेवढे पैसे आहेत?
  • त्‍या वस्‍तू-सेवा-गोष्‍ट खरेदी करणे तुमच्‍यासाठी किती गरजेचं आहे?
  • त्‍या वस्‍तू-सेवा-गोष्‍ट खरेदी केल्‍यावर तुमच्‍या जीवनात काय मूल्‍यं वाढणार आहे?
  • त्‍या वस्‍तू-सेवा-गोष्‍ट खरेदी करण्‍यासाठी तुम्‍ही तुमच्‍या जीवनाच्‍या वेळेतील किती मिनिट-वेळ खर्च करत आहात?
  • त्‍या वस्‍तू-सेवा-गोष्‍ट खरेदी केल्‍यास तुम्‍हाला किती आनंद मिळेल?

जेव्‍हा तुम्‍ही काहीही खरेदी करण्‍या अगोदर वरील प्रश्‍न स्‍वतःशीच विचाराल तेव्‍हा तुम्‍ही चांगल्‍यारितीने निर्णय घेऊ शकता की, तुम्‍हाला तुमच्‍या मेहनतीचा पैसा, तुमचा वेळ ह्या वस्‍तू-सेवा-गोष्‍टवर खर्च करायला पाहिजे अथवा नाही?

 


टप्‍पा क्र.०४- स्थिरता: (Stability)

जेव्‍हा तुम्‍ही ह्या टप्‍पयात प्रवेश करता तेव्‍हा तुमच्‍यावर कोणत्‍याही प्रकारचा कर्ज-लोण नसतो.  कोणत्‍याही प्रकारची देणी-उधारी नसते. तुम्‍ही आर्थिकदृष्‍ट्या एवढे स्थिर असता की, तुम्‍हाला कोणाचीही आर्थिक मदत घ्‍यावी लागत नाही.

कारण तुम्‍ही तुमच्‍या उत्‍पन्‍नापेक्षा कमीच खर्च करत असता. यासोबतच तुमच्‍याजवळ एवढे पैसे असतात की, तुमचे सर्व उत्‍पन्‍न-कमाई बंद जरी झाली तरी, तुम्‍ही कोणत्‍याही अडचणीविना येणारे सहा-महिणे तुमचे सर्वप्रकारचे खर्च सांभाळू शकता. तेव्‍हा तुम्‍ही स्थिरतेच्‍या टप्‍पयात आलेले असता.

ह्या टप्‍प्‍यात आल्‍यावर तुम्‍ही असे म्‍हणू शकता की, तुम्‍ही आर्थिकदृष्‍ट्या स्थिर आहात.  आपल्‍या खर्चांवर नियंत्रण मिळविल्‍यानंतर तुम्‍हाला पुढच्‍या पायरीत तुमच्‍या बचतीवर लक्ष केंद्रित करयाला पाहिजे.

सर्वसाधारणपणे आपल्‍याला असे सांगण्‍यात येत असते की, जेवढं झालं तेवढं, छोट्या-मोठ्या गोष्‍टींमध्‍ये बचत करायला पाहिजे. एक सुनियोजीत बजेटनुसार चालायला पाहिजे.

परंतू लेखक असे म्‍हणतात की, आपल्‍याला बजेट बनवायची काही गरजच नाही.

कारण आपली छोटे-मोठे खर्च आपण केलेल्‍या बचतीवर तेवढा प्रभावित करत नाहीत जेवढे पुढील तीन खर्च प्रभावित करत असतात- जे आहेत, राहण्‍याचा खर्च, वाहतूक खर्च आणि खाणेपिणे यांवरचा खर्च.

आपल्‍या राहण्‍यासाठी खर्च, एका जागेवरून दुस-या ठिकाणी जाण्‍यासाठी वाहतूक आणि जीवंत राहण्‍यासाठी आपण जे अन्‍न खातो ह्या तीनच खर्चांवर आपण आपल्‍या उत्‍पन्‍नाच्‍या २० टक्‍के खर्च बचत करू शकता जर आपली इच्‍छा असेल तर.

  1. चैनिच्‍या, भरमसाठी खर्चिक घराऐवजी तुम्‍ही तुम्‍हाला परवडणा-या, साध्‍या घरात राहू शकता.
  2. अन्‍न फक्‍त तेच खरेदी करा जे आवश्‍यक आणि गरजेचं आहे. आणि
  3. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचण्‍यासाठी तुम्‍ही एक परवडणारे पर्यायदेखिल निवडू शकता.

 

टप्‍पा क्र.०५- लवचिकता: (Flexibility)

आर्थिकदृष्‍ट्या स्थिर झाल्‍यानंतर पुढचा टप्‍पा येतो तो फ्लेक्‍सीबिलिटी.  जिथे आपण आपल्‍या सहा महिण्‍यांच्‍या खर्चाला वाढवून पुढील ०२-वर्षापर्यंत खर्चांसाठी पुरेल एवढी बचत करून घेतो, तेव्‍हा आपण आर्थिकदृष्‍ट्या फ्लेक्‍सीबल होऊन जातो.

*लेखकांच्‍या मते, आर्थिक स्‍वातंत्र्याचे टप्‍पे पुढील प्रमाणे आहेत,

Financially Stable-Financially Flexible-Financially Free

परंतू येथे आपल्‍या सोयीसाठी आपण प्रथम (*Financial Secure) व्‍हायला पाहिजे मग पुढील टप्‍पे ओलांडायला पाहिजे. म्‍हणूनच प्रथम सुरक्षा महत्‍वाची आहे.  त्‍यानुसार टप्‍पे पुढीलप्रमाणे असायला पाहिजे.

(*Financial Secure)-Financially Stable-Financially Flexible-Financially Free

म्‍हणजेच आपल्‍याजवळ आता एवढा पैसा आहे की, आपण दोन वर्षांपर्यत पैशाची पर्वा न करता आरामाने आपले जीवन जगू शकतो.

आपल्‍या सर्व खर्चांना नियंत्रित केल्‍या नंतर आर्थिक स्‍वातंत्र्य मिळविण्‍याच्‍या पुढच्‍या पायरीवर आल्‍यानंतर लेखक म्‍हणतात, तुम्‍हाला ०९ ते ०५ ह्या वेळेतील दिनचर्येला हॅक- करायचं आहे.

तुम्‍हाला तुमच्‍या पूर्णवेळ कामाला जेथून तुमचे सर्वाधिक उत्‍पन्‍न येते, मग भलेही ते तुमची नोकरी असो अथवा तुमचा व्‍यवसाय, आपल्‍या ०९ ते ०५ रूटीनला आपल्‍या आर्थिक स्‍वातंत्र्याच्‍या प्रक्षेणस्‍थळासारखे वापराचं आहे.

लेखक म्‍हणतात की, तुम्‍हाला तुमच्‍या पूर्णवेळ कामाला-नोकरी-व्‍यवसायाला तोपर्यंत सोडायला नाही पाहिजे जोपर्यंत, तुम्‍हाला तुमच्‍या साईड इन्‍कमच्‍या प्रवाहामधून त्‍या नोकरी-व्‍यवसायापेक्षा चांगले परिणाम मिळत नाहीत तोपर्यंत.

कारण बहुतांश लोकांसाठी त्‍यांची पूर्णवेळ नोकरी-व्‍यवसाय हेच पुर्ण उत्‍पन्‍नासाठीची महत्‍वाची भूमिका निभावत असते. अधिकतर लोकांची पूर्णवेळ नोकरी-व्‍यवसाय हेच त्‍यांचे उत्‍पन्‍नाचे महत्‍वाचे व एकमेव साधन असते.

DON’T MINIMISE YOUR WORK MAXIMISE IT.

आणि लेखक म्‍हणतात, तुम्‍हाला तुमच्‍या पूर्णवेळ कामाला-नोकरी–व्‍यवसायाला किमान-Minimize करण्‍याऐवजी अधिकाधिक-कमाल-Maximize करायला पाहिजे.  तुम्‍ही जर नोकरी करत असाल तर आपल्‍या पगारीला वाढविण्‍यावर भर द्यायला पाहिजे.  स्‍वयंरोजगार-व्‍यवसायीक असाल तर उत्‍पन्‍नात वाढ होईल असे प्रयत्‍न करायला पाहिजे.

परंतू तुमची पगार-वेतनही तेव्‍हाच वाढेल जेव्‍हा तुम्‍ही तेवढ्या लायकीचे काम कराल. किंवा तुमच्‍या व्‍यवसायासाठी नवीन ग्राहक आणण्‍याचा विचार करता तेव्‍हाच तुमच्‍या उत्‍पन्‍नात वाढ होईल.

तुम्‍हाला नेहमीच नव-नवीन संधींचा शोध घ्‍यायला पाहिजे ज्‍याद्वारे तुमचे उत्‍पन्‍न वाढेल.

यासाठी लेखक आपल्‍याला पुढीलप्रमाणे एक सूत्र-फॉर्मुला सूचवतात.

SKILLS + NETWORK = MORE MONEY

कौशल्‍य + संपर्कजाळे = अधिक पैसा-उत्‍पन्‍न

आपल्‍याला आपल्‍याकडे असलेल्‍या कौशल्‍यांमध्‍ये सुधारणा करून, नव-नवीन लोकांशी संपर्क करून आपले संपर्कजाळे वाढवायला पाहिजे. ज्‍यामुळे अप्रत्‍यक्षरित्‍या ते आपल्‍याला अधिकाधिक पैसा कमविण्‍यासाठी आकर्षित करेल.

 

टप्‍पा क्र.०६- आर्थिक स्‍वतंत्र्य: (Financial Freedom)

आर्थिक स्‍वातंत्र्याच्‍या टप्‍प्‍यात पोहोचल्‍यानंतर काणतेही काम न करता तुम्‍ही तुमचे जीवन आरामाने जगू शकता. इथे तुम्‍हाला तुमचे उत्‍पन्‍न- तुमच्‍या वेळेच्‍या बदल्‍यात मिळत नाही तर, मेहनतीने वर्षानुवर्षे तुम्‍ही केलेल्‍या गुंतवणूक आता तुम्‍हाला LIFE TIME-आजीवन-आयुष्‍यभर-जीवनभर उत्‍पन्‍न-पैसा निर्माण करून-पैसा कमावून देत असते.


ह्या टप्‍प्‍यापर्यंत पोहोचण्‍यासाठी तुम्‍हाला पुढची पायरी चढावी लागेल
, ज्‍याला लेखक एन्‍टरप्रायईज माईंडसेट- (Enterprise Mind-set) उद्योगी-उपक्रमशील मानसिकता.

तुम्‍हाला एक अशी मानसिकता विकसित करायला पाहिजे, जिथे तुम्‍ही पैसा कमावण्‍याचे, बचतीचे आणि वाढविण्‍याचे नव-नवीन क्‍लृप्‍त्‍या, पद्धती शोधू शकाल.

ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे उत्‍पन्‍न वाढवू शकाल, आणि ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमच्‍या बचतीच्‍या दराला (Saving Rate) पुर्वीपेक्षा अधिक वाढवू शकाल.  

आणि तुमच्‍या बचतीच्‍या दराला वाढविण्‍यासाठी लेखक एक क्‍लृप्‍ती सांगतात की, आता आपल्‍याला आपल्‍या खर्चांना कमी करून फक्‍त बचत करण्‍याऐवजी, आपल्‍या उत्‍पन्‍नाला-पैसा वाढविण्‍यासाठी लक्ष केंद्रित करायला पाहिजे.

वाचकांनो आम्‍हीसुद्धा ह्या गोष्‍टीशी पुर्णतः सहमत आहोत की, आपल्‍याला बचत तर करायलाच पाहिजे, परंतू तेवढेच किंवा त्‍यापेक्षाही जास्‍त आपल्‍या उत्‍पन्‍नाला वाढविण्‍यावर अधिक लक्ष द्यायला पाहिजे.

कारण जो कोणी आज आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र बनलेले आहेत, ते फक्‍त आपल्‍या बचतीमुळे नाही तर, त्‍यांच्‍या उच्‍च-उत्‍पन्‍न आणि त्‍यांनी निर्माण केलेल्‍या एकापेक्षा अधिक उत्‍पन्‍नाच्‍या स्‍त्रोत व प्रवाहांमुळे ते आर्थिक स्‍वतंत्र झालेले आहेत.


टप्‍पा क्र.०७- मुबलक-विपुल- संपत्‍ती : (Abundant Wealth)

“Money is unlimited, but our time is limited.
Don’t waste time.”

आर्थिक स्‍वतंत्र होण्‍याचा अर्थ लेखक असा सांगतात की, जेव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या पैशांऐवजी तुमच्‍या वेळेला अधिक महत्‍व द्यायला लागता, ते तुमचे आर्थिक स्‍वातंत्र्य असेल.

आणि जेव्‍हा तुम्‍ही ह्या गोष्‍टीला समजून जाता की, “Money is unlimited, but our time is limited.
Don’t waste time.” तेव्‍हा तुम्‍ही ख-या अर्थाने स्‍वतंत्र मिळवता.

हा टप्‍पा तुम्‍हाला आर्थिक स्‍वातंत्र्याच्‍याही एक स्‍तर पुढे घेऊन जातो, जिथे तुमच्‍याजवळ तुमच्‍या गरजेपेक्षा कित्‍येक पट अधिक पैसा तुमच्‍याजवळ असतो. इथे तुम्‍ही कोणतेही काम केल्‍याविना आपल्‍या दैनंदिन गरजा, पूर्णच करू शकत नाही, तर कोणतीही चिंता न करता वाढवूही शकता, ज्‍या गोष्‍टी खरेदी करायची आहे ती खरेदी करू शकता.

  शक्‍य तेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू करा

जिथे तुम्‍ही तुमच्‍या आर्थिक मर्यादेला पुढे ढकलू शकता, एक चैनीचे आयुष्‍य जगू शकता.  आणि ह्या सर्व सातही टप्‍प्‍यांत पोहोचण्‍यासाठी सात पाय-यांद्वारे मिळविण्‍यासाठी एकमेव पायरी आहे ती म्‍हणजे जेवढं शक्‍य असेल तेवढं गुंतवणूक करायला लागा.  

शक्‍य तेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू करा
Invest as early as you can.

लेखक म्‍हणतात, आर्थिक धनवान बनन्‍याचा जर कोणता गुप्‍त मार्ग असेल तर तो म्‍हणजे जेवढं लवकर तुम्‍ही गुंतवणूक करू शकाल तेवढं लवकर गुंतवणूक सुरू करा.

गुंतवणूकीची खरी शक्‍ती लेखक अशी सांगतात की, कोणत्‍याही प्रकारची मेहनत-श्रम न करता तुमचा पैसा गुणात्‍मकरित्‍या वाढत राहतो. याचे एक महत्‍वाचे कारण आहे कम्‍पाउंडींग-चक्रवाढ.

जसे की, अल्‍बर्ट आइनस्‍टाईन यांनी म्‍हटलेलं आहे,

चक्रवाढः हे जगातील आठवे आश्‍चर्य आहे
“Compounding is 8th wonder of the world
-Albert Einstein


जे शंभर टक्‍के खरे आहे.  म्‍हणूनच आर्थिकशिक्षण घ्‍या, आर्थिक साक्षर बना, गुंतवणूक करायला शिका, गुंतववणूक करा, वाढवा आणि आर्थिक स्‍वातंत्र्य मिळवून आपल्‍याला पाहिजे तसे आयुष्‍य जगा.

  • होय हे शक्‍य आहे.
  • कसे?
  • जर तुमचे का? स्‍पष्‍ट असेल तर कसे आणि केव्‍हा हे तुम्‍हाला आपोआप सापडेल. 
  • म्‍हणून आपले का? अगोदर शोधा. 
मदतीसाठी लेखक सायमन सिनेक (Simon Sinek) यांचे पुस्‍तक का सोबत सुरूवात (Starting with WHY) आणि काचा शोध (Finding WHY) ही उत्‍कृष्‍ट पुस्‍तकं वाचून सरूवात करू शकता. स्‍टार्ट विथ व्‍हाय, का सोबत सुरूवात ह्या पुस्‍तकाचे सारांश ई-वाचनालय येथे उपलब्‍ध आहे.

👉येथून वाचू शकता. का पासून सुरूवात STAR WITH WHY BY SIMON SINEK 

अधिक स्‍वयंमदत (Self Help), वैयक्तिक (Personal), व्‍यवसायिक (Professional) स्‍तरावर आपल्‍याला इतरांच्‍या ज्ञानाची, माहितीची, अनुभवांची साथ पुस्‍तकरूपाने मिळू शकते.  मदत आणि मार्गदर्शनासाठी ई-वाचनालय तुमच्‍या सोबत आहेच.

आर्थिक साक्षरता, आर्थिक स्‍वातंत्र्य, गुंतवणूक, संपत्‍ती, इत्‍यादींसाठी ई-वाचनालय या संकेतस्‍थळावर आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादीः 



टिप्पण्या

  1. Dear Reader, Thank you for visiting reading platform. we hope you get some insight financial freedom and it add some value to your financial journey. we look forward to your suggestion. till then please consider our other financial book summaries. thank you again. keep reading and keep growing.

    उत्तर द्याहटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive