अग्‍नीपंख - WINGS OF FIRE | पुस्‍तक परिचय-सारांश-समीक्षा-मराठी

विद्यार्थीप्रिय वयक्तिमत्‍व, विज्ञाननिष्‍ठ शास्‍त्रज्ञ, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्‍न, मिसाईल मॅन आणि भारताचे लोकप्रिय राष्‍ट्रपती राहिलेल्‍या डॉ. ए.पी.जे.अब्‍दुल कलाम यांची गोष्‍ट WINGS OF FIRE अर्थात ‘’अग्निपंख’’..!  

अग्‍नीपंख
डॉ.ए.पी.जे.अब्‍दुल कलाम

मुळ इंग्रजी पुस्‍तकः विंग्‍स ऑफ फायर (Wings of Fire)

लेखक: डॉ.ए.पी.जे.अब्‍दुल कलाम

मराठी अनुवादः माधुरी शानभाग

पुस्‍तक परिचय-सारांश-समीक्षा-मराठी

लेख-साभारः निमेष आहेर, संपर्क-८८३०२९७१३७- पुण्‍यनगरी, रसयात्री

विंग्स ऑफ फायर: अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र-जीवनचरित्र
(Marathi Edition)
Wings Of Fire An Autobiography
by Arun Tiwari and A. P. J. Abdul Kalam
 (agnipankh book)

 स्‍वातंत्र्योत्‍तर काळात भारतीयांना अशक्‍य स्‍वप्‍न बघायला शिकवणारे, प्रयत्‍नपूर्वक त्‍याचा पाठपुरावा करून त्‍यांना प्रत्‍यक्षात आणणारे, तसेच अवकाश, क्षेपणास्‍त्र आणि अणुशक्‍ती यात भारताला स्‍वावलंबी बनवून जगात देशाची नवीन ओळख निर्माण करणारे डॉ. ए.पी.जी.अब्‍दुल कलाम.   

एका मध्‍यमवर्गीय कुटुंबात जन्‍मले.  ‘’भारतरत्‍न’’, ‘’मिसाईल मॅन’’ आणि भारताचे लोकप्रिय राष्‍ट्रपती राहिलेल्‍या डॉ. ए.पी.जे.अब्‍दुल कलाम यांची गोष्‍ट WINGS OF FIRE अर्थात ‘’अग्निपंख’’  

(जन्मतिथी : १५ ऑक्‍टोबर १९३१, रामेश्‍वरम्  |  पुण्‍यतिथी: २७ जुलै २०१५, शिलॉन्‍ग)

(१५ ऑक्‍टोबर जन्मतिथी विशेष)

WINGS OF FIRE
by Dr.A.P.J.Abdul Kalam
Marathi Translation 

wings of fire summary in marathi

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतारली आहे.

अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. 

प्रज्‍वलित

WINGS OF FIRE हे डॉ.अब्‍दुल कलाम यांचे आत्‍मचरित्र आहे.  या लोकप्रिय आत्‍मचरित्रात व्‍यक्तिगत आणि व्‍यावसायिक आयुष्‍यातील संघर्ष आणि मिळालेले यश त्‍यांनी प्रांजळपणे मांडले आहे.  प्रत्‍यक्षात त्‍यांना दोन पंख असणारे विमान उडवायचे होते. 

पण, नियतीने त्‍यांना अग्निपंख असणा-या क्षेपणास्‍त्र प्रणालीचे जनक बनवले.  ही पृथ्‍वी परमेश्‍वराची आहे, हे अफाट आकाश अन् अथांग समुद्रही त्‍याच्‍यात सामावलेले आहे आणि एका लहानशा तळयातही तोच आहे, डॉ.कलामांच्‍या आत्‍मचरित्राची सुरुवात अथर्ववेदातील या ऋचाने होते.

कलामांचे बालपण

डॉ. कलाम विज्ञाननिष्‍ठ शास्‍त्रज्ञ होते, तितकीच त्‍यांची ईश्‍वरावर नितांत श्रद्धा होती. धार्मिक संस्‍काराचे बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या जन्‍मगावी, रामेश्‍वरमलाच मिळालं.  त्‍यांच्‍यातील धार्मिकता अभ्‍यासातूनख्‍ संशोधनातून, चिंतनातून आलेली होती. बालपणीच्‍या अनेक प्रसंगांतून त्‍यांनी हिंदू-मुस्‍लीम समाजातील सलोख्‍याचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत. 

त्‍यांच्‍या वडिलांचा आणि रामेश्‍वरम् मंदिरातील प्रमुख पुजारी यांच्‍यातील धार्मिक विषयावरील चर्चांमधून कलामांच्‍या बालमनावर संस्‍कार होत गेले, तसेच जलालुद्दीन आणि शमशुद्दीनसारख्‍या नातलग आणि मित्रांच्‍या सहवासातून त्‍यांना बाहेरच्‍या जगाची ओळख होत गेली.

शिक्षण

प्राथमिक शिक्षणानंतर डॉ.कलाम पुढील शिक्षणासाठी रामनाथपूरम्मध्‍ये दाखल झाले.  तेथे त्‍यांना अय्यर दुराई या शिक्षकाने आयुष्‍याचा एक गुरुमंत्र दिला,

‘’आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी तीन गोष्‍टी नेहमी लक्षात असाव्‍यात, तीव्र इच्‍छाशक्‍ती, विश्‍वास आणि आशावादी होऊन प्रयत्‍नशील रहा.’’

तेथून पुढे उच्‍च शिक्षणासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत (एमआयटी) इंजिनीअरिंगला एडमिशन घेण्‍यासाठी त्‍यांची बहीण झोराने स्‍वतःचे दागिने गहाण ठेवले.  आपल्‍या भावाच्‍या कर्तृत्‍वावर असलेला विश्‍वास कलामानं पुढे सार्थ करून दाखवला. 

शाळकरी जीवनापासून ते उच्‍च शिक्षणापर्यंत त्‍यांच्‍या प्रत्‍येक शिक्षकांना त्‍यांच्‍यामध्‍ये एक जिज्ञासू –विद्यार्थी दिसला आणि कलामांना त्‍यांच्‍या प्रत्‍येक शिक्षकांमध्‍ये एक आदर्श मार्गदर्शक दिसला. त्‍यांनी नेहमीच त्‍यांच्‍यावरील संस्‍कारांचे श्रेय आई-वडिलांना आणि शिक्षकांना दिले.

संरक्षण विभाग ते इस्रो

एरोनॉटिकल इंजिनिअरिंग नंतर कलामांना पायलट व्‍हायचं होते.  आवश्‍यक शैक्षणिक पात्रता असूनही फक्‍त कमी उंचीमुळे त्‍यांची तिथे संधी हुकली.  निराश कलामांनी स्‍वामी शिवानंदांचं मार्गदर्शन घेतलं.  

स्‍वामी शिवानंदांनी सांगितलं की

‘’तुझा जन्‍म काही तरी वेगळं करण्‍यासाठी झाला आहे, त्‍यामुळे त्‍याचा स्‍वीकार कर आणि आयुष्‍यात पुढे जा.’’

 त्‍या क्षणापासून कलामांनी स्‍वामी शिवानंद यांना गुरूस्‍थानी मानले.

त्‍यांनी संरक्षण खात्‍यात अडीचशे रूपये महिन्‍याची नोकरी स्‍वीकारली. 

कालांतराने त्‍यांना इस्‍त्रोकडून बोलावणं आलं.  त्‍यांची मुलाखत डॉ.विक्रम साराभाईंनी घेतली आणि कलामांची निवड इस्‍त्रोसाठी केली.  १९६२ साली थुम्‍बामध्‍ये रॉकेट लॉन्चिंग स्‍टेशन बनवले.

त्‍याचे अद्ययावत प्रशिक्षण घेण्‍यासाठी अमेरिकेत नासामध्‍ये गेले.   कलामांच्‍या अथक प्रयत्‍नातून १९६३ मध्‍ये भारताचे पहिले रॉकेट अवकाशात झेपावले. डॉ. साराभाईंनी त्‍यांच्‍यावरील जबाबदारी वाढवली आणि १० वर्षांचा स्‍पेस रिसर्च प्रोग्राम बनवला गेला.  डॉ.कलामांच्‍या मार्गदर्शनाखाली शेकडो अभियंते-इंजिनिअर काम करत होते.

प्रयत्‍नाअंती मिसाईलमॅन

एसएसलव्‍ही साठी (Satellite Launch Vehicle)  काम करताना, भारतात हे तंत्रज्ञान नवीन असल्‍याने डॉ. कलाम आणि त्‍यांच्‍या टीमला अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले.   

वर्तमानपत्रातून त्‍यांच्‍यावर टीकाही झाली, त्‍यांच्‍या मोहिमेची खिल्‍ली उडवणारी कार्टून्‍सही प्रसिद्ध झाली. डॉ.कलाम दुःखी झाले, परंतु त्‍यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत.  

आपल्‍या टीममध्‍ये नवीन लोकांना घेऊन त्‍यांना जबाबदारीची कामे दिली आणि अनुभवी व्‍यक्‍तींना सल्‍लागारपदी नेमले.  स्‍वतःही त्‍यांच्‍या बरोबरीने काम केले. कालांतराने एसएलव्‍ही-०३ चे १९८० साली यशस्‍वी प्रक्षेपण झाले. 

पुढे त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली त्रिशूल, पृथ्‍वी, अग्‍नी, आकाश, नाग ही क्षेपणास्‍त्रांची मालिका भारतात बनवली. एवढंच नाही त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोखरणमध्‍ये यशस्‍वी अणु चाचणी केली. 

आज डॉ. कलामांच्‍या योगदानामुळे भारत अवकाश, विज्ञान, क्षेपणास्‍त्र आणि अणु ऊर्जा क्षेत्रांत महासत्‍तांच्‍या पंक्‍तीत आहे.   भारत १०५ उपग्रह एकावेळी अवकाशात सोडण्‍यात यशस्‍वी झाला ते कलामांमुळेच.

सन्‍मान

डॉ.कलामांना ‘’पद्मभूषण’’, ‘’पद्मविभूषण’’ आणि ‘’भारतरत्‍न’’ देऊन गौरविण्‍यात आलं आणि एका शास्‍त्रज्ञाला त्‍यांच्‍या सर्वांगीण गुणवत्‍तेमुळे, देशाचे आदर्श राष्‍ट्रपती बनवले.  आपल्‍या यशाचे श्रेय ते ईश्‍वराला देतात.  

अशा या ऋषितुल्‍य, ज्ञानयोगी, शास्‍त्रज्ञाने समाजाला अंतर्बाह्य निर्मळ बनवून ही पृथ्‍वी देवाची आहे हे आपले विधान सत्‍य करून दाखवले.

👉 जागतिक विद्यार्थी दिन २०२१:
World Student's Day 2021: How this day is linked with Dr APJ

World Student's Day 2021: Every year, October 15 is celebrated as World Student's Day. Here is everything you need to know about this day.

 

जागतिक विद्यार्थी दिन २०२१-दरवर्षी, १५-ऑक्‍टोबर जागतिक विद्यार्थी दिन म्‍हणून साजरा केला जातो.  ह्या दिवसाबद्दल विशेष असे सर्वकाही जे तुम्‍हाला पाहिजे ते येथे आहे. 
 

👉तुम्‍हाला माहित आहे? In-Fact (Interesting Fact)

  • डॉ.कलामांना 2015 साली पोस्‍टाचे तिकिट काढून त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला.
  • भारताचे सर्वोच्‍च राष्‍ट्रपतीपद भूषवून कार्यकाळ संपून बाहेर जाताना त्‍यांच्‍याजवळ केवळ दोन सूटकेस होते.

👉काय तुम्‍हाला माहिती आहे की,  

  • स्वित्झरलॅंडमध्‍ये २६-मे हा दिवस ‘’राष्‍ट्रीय विज्ञान दिन’’ म्‍हणून साजरा केला जातो. माजी राष्‍ट्रपती डॉ.कलामांच्‍या सन्‍मानार्थ. कारण त्‍या दिवशी डॉ.कलामांनी त्‍या देशाला भेट दिली होती.
  • 15 ऑक्‍टोबर रोजी जगामध्‍ये विश्‍व विद्यार्थी दिन (World Student Day) म्‍हणून साजरा केला जातो. ह्याचा सन्‍मान यूएन संयुक्‍त राष्‍ट्रांनी समर्पित केला हेाता. 
पूरी दुनिया में विश्व छात्र दिवस (World Students Day) भी मनाया जाता है, जो उनको यूएन ने समर्पित किया था। वो एक महान वैज्ञानिक ही नहीं बल्कि विचारक और टीचर भी रह चुके हैं। उन्होंने अपने जीवन काल में लाखों युवाओं को प्रेरणा दी। एपीजे अब्दुल कलाम को बैलेस्टिक मिसाइल और लॉन्चिंग टेक्नोलॉजी का अविष्कार करने की वजह से मिसाइल मैन भी कहा जाता है।

https://www.haribhoomi.com/news/india/apj-abdul-kalam-birth-anniversary-2019-invention-305561
पूरी दुनिया में विश्व छात्र दिवस (World Students Day) भी मनाया जाता है, जो उनको यूएन ने समर्पित किया था। वो एक महान वैज्ञानिक ही नहीं बल्कि विचारक और टीचर भी रह चुके हैं। उन्होंने अपने जीवन काल में लाखों युवाओं को प्रेरणा दी। एपीजे अब्दुल कलाम को बैलेस्टिक मिसाइल और लॉन्चिंग टेक्नोलॉजी का अविष्कार करने की वजह से मिसाइल मैन भी कहा जाता है।

https://www.haribhoomi.com/news/india/apj-abdul-kalam-birth-anniversary-2019-invention-305561
इस दिन पूरी दुनिया में विश्व छात्र दिवस (World Students Day) भी मनाया जाता है, जो उनको यूएन ने समर्पित किया था। वो एक महान वैज्ञानिक ही नहीं बल्कि विचारक और टीचर भी रह चुके हैं। उन्होंने अपने जीवन काल में लाखों युवाओं को प्रेरणा दी। एपीजे अब्दुल कलाम को बैलेस्टिक मिसाइल और लॉन्चिंग टेक्नोलॉजी का अविष्कार करने की वजह से मिसाइल मैन भी कहा जाता है। उनका सफर काफी लंबा है।

https://www.haribhoomi.com/news/india/apj-abdul-kalam-birth-anniversary-2019-invention-305561
  • ते एक महान वैज्ञानिकच नव्‍हे तर एक विचारक आणि एक शिक्षक देखिल होते.  त्‍यांनी आपल्‍या आयुष्‍यात लक्ष-कोटी युवकांना प्रेरणा दिली.
  • डॉ.ए.पी.जे. अब्‍दुल कलाम यांना बॅलेस्टिक मिसाईल आणि लॉन्चिंग  टेक्‍नॉलॉजीचा आविष्‍कार केल्‍यामुळे त्‍यांना मिसाईल मॅन म्‍हणूनही ओळखले जाते.


👉डॉ.कलामांची संपत्‍ती: (Property Left By Dr.APJ Abdul Kalam Sir)

  • · बॅगा- ०२
  • · पॅण्‍ट- ०६ (०२-डीआरडीओचे)
  • · शर्ट- ०४ (०२-डीआरडीओचे)
  • · सूट- ०३ (०१ पाश्‍चात्‍य पद्धतीचे, ०२ भारतीय)
  • · बॅंकेत पैसा- ०.०० शून्‍य रूपये 
  • · गाडी-टी.व्‍ही.- ०.००
  • · फ्लॅट- ०१ (तेही दान दिले)
  • · पेन्‍शन- ०८ वर्षाची पेंशनसुद्धा त्‍यांनी गावातील पंचायतीला दान दिली
  • · पद्मभूषण सन्‍मान- ०१ 
  • · पद्मविभूषण- ०१ 
  • · भारतरत्‍न सन्‍मान- ०१ 
  • · पुस्‍तकं- २५०० 
  • · डॉक्‍टरेट सन्‍मान- ५०  
  • · भारतीयांचे प्रेम- असंख्‍य
  • · लोकांचा स्‍नेह आणि प्रेम-अनेक आणि
  • · स्‍वतःची जीवनमूल्‍ये- आजीवन जपलेली 
डॉ.एपीजे अब्‍दुल कलाम याच्‍या जन्‍मतिथी निमित्‍त प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने वाचन करावी अशी पुस्‍तक 


डॉ.एपीजे अब्‍दुल कलाम याच्‍या जन्‍मतिथी निमित्‍त प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने वाचन करावी अशी पुस्‍तक.
APJ Abdul Kalam Books Every Student Should Read On His Birth Anniversary

 

पुस्‍तक: अग्‍नीपंख - WINGS OF FIRE

मुळ इंग्रजी पुस्‍तकः विंग्‍स ऑफ फायर (Wings of Fire)

लेखक- डॉ.ए.पी.जे.अब्‍दुल कलाम 

सहायक- अरूण तिवारी

आत्‍मकथा-आत्‍मचरित्र Autobiography

मराठी अनुवादः माधुरी शानभाग

पुस्‍तक सारांश-समीक्षा-मराठी

wings of fire summary in marathi

-वाचनालय | www.evachnalay.in

#Autobiography of Dr.A.P.J.Abdul Kalam,  #Abdul Kalam Autobiography #Abdul Kalam in Marathi, #अग्‍नीपंख #विंग्‍स ऑफ फायर #पुस्‍तक सारांश मराठी #पुस्‍तक समीक्षा #मराठी #WINGS OF FIRE in #Marathi #Book Summary #Book Review in Marathi#apj abdul kalam information in marathi #अग्नि के पंख (हिंदी) #Wings Of Fire An Autobiography by Arun Tiwari and A. P. J. Abdul Kalam 

-वाचनालय | www.evachnalay.in 

 

गौरव व सन्‍मान

  • अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
  • भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
पुरस्कार अथवा गौरवाचे वर्ष पुरस्कार अथवा गौरवाचे नाव प्रदत्त करणारी संस्था
१९८१ पद्मभूषण भारत सरकार 
१९९० पद्मविभूषण भारत सरकार 
१९९८ भारतरत्‍न भारत सरकार
१९९७ इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार भारत सरकार 
१९९८ वीर सावरकर पुरस्कार भारत सरकार
२००० रामानुजम पुरस्कार मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर
२००७ किंग चार्ल्स (दुसरा) पदक ब्रिटिश रॉयल सोसायटी
२००७ डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K
२००८ डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa) नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर
२००९ हूवर पदक ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
२००९ आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
२०१० डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग वॉटरलू विद्यापीठ
२०११ न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व.

 

डॉ. कलामांची कारकीर्द 

डॉ. कलामांची कारकीर्द

  • जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
  • शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
  • १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
  • १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
  • १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
  • १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
  • १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
  • १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
  • १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
  • १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
  • १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
  • १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
  • १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
  • २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
  • २००१ : सेवेतून निवृत्त.
  • २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

 

कलामांनी लिहिलेली पुस्तके

  • अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
  • इग्नायटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
  • 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
  • इंडिया - माय-ड्रीम
  • उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
  • एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
  • विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र): मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
  • सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
  • टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
  • टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
  • ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
  • दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
  • परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
  • बियॉंण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
  • महानतेच्या दिशेने : एकत्र येऊ या बदल घडवू या (मॅजेस्टिक प्रकाशन)
  • स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. भारताचे परिवर्तन सुरू असून ते कोणत्या दिशेने करणे श्रेयस्कर होईल याचे मार्मिक विश्लेषण यात आहे.

 

कलामांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

  • डाॅ. अब्दुल कलाम (डाॅ. वर्षा जोशी)
  • असे घडले डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (प्रणव कुलकर्णी)
  • इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲंड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, मराठी अनुवाद ??? )
  • ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य).
  • ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
  • प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)
  • कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे)
  • कलामांचे आदर्श (डॉ. सुधीर मोंडकर)
  • भारतरत्न कलाम (डॉ. सुधीर मोंडकर)
  • रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन)
  • विद्यार्थ्यांचे कलाम (डॉ. सुधीर मोंडकर)
  • स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम (डाॅ. वर्षा जोशी)
  • रामेश्वरम् ते राष्ट्रपती भवन डॉ. अब्दुल कलाम, लेखक : डॉ. शां. ग. महाजन
  • कलाम यांचे बालपण-सृजन पाल सिंग

 

अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार, गौरव व सन्मान

  • १९८१ : पद्मभूषण
  • १९९० : पद्मविभूषण
  • १९९७ : भारतरत्‍न
  • १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
  • १९९८ : वीर सावरकर पुरस्कार
  • २००० : रामानुजन पुरस्कार
  • २००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
  • २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
  • २००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
  • २००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
  • २०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
  • २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
  • २०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.
  • २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
 स्‍त्रोतः विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

 

इतर संबंधितः 

डॉ.कलाम यांच्‍यावर  लवकरच चित्रपट..!

डॉ.कलाम यांच्‍यावचर लवकरच चित्रपट येण्‍याची शक्‍यता आहे. केंव्‍हा प्रदर्शित होईल किंवा तसे अधिकृत तारिख किंवा वर्ष घोषित झालेली नाही, परंतू भारताचे माजी राष्‍ट्रपती राहिलेल्‍या डॉ.कलाम यांच्‍या जीवनावर आधारित चित्रपट-चरित्रपट (Biopic) लवकरच करोडो भारतीयांना पाहायला मिळेल.  

प्रतिमा स्‍त्रोतः गुगल/Idlebrain.com

 

 डॉ.एपीजे . अब्‍दुल कलाम यांचे सुविचार

स्‍वप्‍न ती नसतात जी तुम्‍हाला झोपेत येतात, स्‍वप्‍न तर असा विचार असतातात जी तुम्‍हाला झोपू देत नाही. -डॉ.एपीजे . अब्‍दुल कलाम

Dream is Not What you see in the sleep, Dream is a thing which dosent allow you to sleep."- Dr.A.P.J. Abdul Kalam
 
  • स्‍वप्‍न ती नसतात जी तुम्‍हाला झोपेत येतात, स्‍वप्‍न तर असा विचार असतातात जी तुम्‍हाला झोपू देत नाही.
  •  स्‍वप्‍न खरी होण्‍यासाठी स्‍वप्‍न पाहणे गरजेचे आहे, 
  • स्‍वप्‍ने पाहा, त्‍या दिशेने विचार व कृती करा, व स्‍वप्‍न सत्‍यात उतरवा, 
  • 'स्‍वप्‍न पाहा, त्‍यांना प्रत्‍यक्षात जगा' 
 
असे म्‍हणून कोटी-कोटी युवा-विद्यार्थी व व्‍यक्‍तींना प्रेरणा देऊन त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना प्रत्‍यक्षात वास्‍तविक जीवनात जगण्‍याचे आणि उंच-उंच आकाशात उडण्‍यासाठी त्‍यांच्‍या पंखांना भरारी घेण्‍यासाठी लागणारे प्रेरणेचे, आत्‍मविश्‍वासाचे बळ देणा-या या भारतरत्‍न 'डॉ.कलाम' यांना योग्‍य 'सलाम' आत्‍म-चरित्रपटाद्वारे देता येईल.  हा प्रयत्‍न त्‍यांच्‍यासाठी योग्‍य मानवंदना ठरेल. 

A well deserved biopic on the man who inspired million peoples by giving them the wings to fly higher with confidence. 

प्रत्‍येकजण चित्रपटाची उत्‍सुकतेने वाट पाहत आहेत,  आशा आहे त्‍यांच्‍या अग्निपंख या पुस्‍तकाप्रमाणेच त्‍यांच्‍या आयुष्‍यावर येणारा चरित्रपटदेखिल असंख्‍य भारतीयांना प्रेरित करेल, त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना जगण्‍याचे आत्‍मविश्‍वास जागवेल. 

"प्रत्येक वयोगटात एक नायक असतो 
प्रत्येक नायकाची एक कथा असते"

 EVERY AGE HAS A HERO EVERY HERO HAS A STORY

 


 चित्रपटाचे मोशन पोस्‍टर व ट्रेलर



 स्‍त्रोतः गुगल/युट्यूब

 डॉ.कलाम प्रेरित, बालपट-बाल चित्रपटः आय अॅम कलाम (I am Kalam)

 
👉किस्‍मत कोई नहीं होती, सब करम होता है...

स्‍वप्‍न ती नसतात जी तुम्‍हाला झोपेत येतात,
स्‍वप्‍न तर असा विचार असतातात जी तुम्‍हाला झोपू देत नाही.
-डॉ.एपीजे अब्‍दुल कलाम
 

वाचन-शिक्षण तुम्‍हाला सर्जनशील बनवते, सर्जनशीलता विचार करायला लावते, विचार तुम्‍हाला ज्ञान देतात, आणि ज्ञान तुम्‍हाला महान बनवतो. 
-डॉ.एपीजे अब्‍दुल कलाम

 
स्‍वप्‍न खरी होण्‍यासाठी स्‍वप्‍न पाहणे गरजेचे आहे.
-डॉ.एपीजे अब्‍दुल कलाम

Cmpfire Graphic Novel
Follow the life and times of India’s ‘Missile Man’ and ‘People’s President’ in this exciting graphic novel, and know more about the person that Kalam was, what motivated him, and how he inspired millions of others.

 

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 
 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive