हाऊ टू अट्रॅक्‍ट मनी-डॉ.जोसेफ मर्फी पुस्‍तक समीक्षा- मराठी

श्रीमंत होण्‍याची सर्वांची उपजत इच्‍छा असते.  गरीब कुटुंबात जन्‍म झाला म्‍हणून गरिबीतच राहायचं? गरिबी हा आपणच स्‍वतःला लावून घेतलेला एक मानसिक आजार आहे. सुखी आणि संपन्‍न आयुष्‍य जगण्‍याचा सर्वांना अधिकार आहे.

मन लावून धनाकडे

हाऊ टू अट्रॅक्‍ट मनी

लेखकः डॉ.जोसेफ मर्फी

पुस्‍तक समीक्षा- मराठी  | Book Review in Marathi

“If you Born POOR its not your mistake, but If you Die POOR definitely its your mistake” -Bill Gates, Microsoft

श्रीमंत होण्‍याची सर्वांची उपजत इच्‍छा असते.  गरीब कुटुंबात जन्‍म झाला म्‍हणून गरिबीतच राहायचं? गरिबी हा आपणच स्‍वतःला लावून घेतलेला एक मानसिक आजार आहे. सुखी आणि संपन्‍न आयुष्‍य जगण्‍याचा सर्वांना अधिकार आहे.  जगप्रसिद्ध लेखक डॉ.जोसेफ मर्फी यांनी अनेक वर्षे अंतर्मनाच्‍या शक्‍तीवर शास्‍त्रीयदृष्‍ट्या संशोधन करून अनेक पुस्‍तकं लिहिली आहेत. 

त्‍यांच्‍या ‘’हाऊ टू अट्रॅक्‍ट मनी’’ या पुस्‍तकातून सकारात्‍मक विचारांचा वापर आपण दैनंदिन व्‍यवहारात संपत्‍ती, आरोग्‍य आणि निरामय जीवन कसे मिळवू शकतो, हे उदाहरणासह सांगितलं आहे.  

लेख साभारः निमेष आहेर- संपर्कः ८८३०२९७१३७-पुण्‍यनगरी-रससयात्री

   ई-वाचनालय | www.evachnalay.in

आर्थिक अथवा अैहिक गरिबीपेक्षा मानसिक गरिबी ही अत्‍यंत अधिक वाईट असते...अशी एक इंग्रजी म्‍हण  एकदा वृत्‍तपत्रात वाचलेले आठवतंय... जगामध्‍ये गरिबी-श्रीमंती ह्या गोष्‍टी तितक्‍या वाईट नाहीत जितक्‍या मानसिकदृष्‍ट्या आपण त्‍यांना रूजवून घेतलेले आहे.  

 लेखकाच्‍या मते आणि कित्‍येक महान महापुरूषांच्‍या मते आपण स्‍वतःच आपल्‍या मर्यादा आखून घेतलेल्‍या आहेत. वस्‍तूतः परिस्थिती जेवढी वाईट दिसून येते किंवा असते तेवढी नसतेच. थोड्या प्रयत्‍नांनी आपण त्‍यातून पुढे जाऊ शकतो, परिस्थितीवर मात करू शकतो. 

परंतू लोक काय म्‍हणतील, माझ्याने नाही होणार, आपण अयशस्‍वी झालो तर, अशा नकारात्‍मक विचारांचा पगडा आपल्‍या डोक्‍यावर जोपर्यंत असतो तोपर्यंत शक्‍य असलेल्‍या गोष्‍टी देखिल अशक्‍य दिसू लागतात.

अनेकदा संपत्‍तीसाठी घरात कलह नित्‍याचीच बाब आहे.  संपत्‍तीसाठी लोकं दरोडेही टाकतात. त्‍यात पैशांचा काय दोष? पैशाचा जोरावर वाईट कृत्‍य करणारा वाईट की पैसा? मनुष्‍य वाईट नसतो, प्रसंगी त्‍याच्‍या मनात विचार येतात.  साहजिकच विचारांनुसर व्‍यती कृती करून वाईट परिस्थिती निर्माण करतो. क्षमता आणि शक्‍ती वाईट नसतात.  त्‍याचा उपयोग विधायक की विघातक करायचा, हे प्रत्‍येकाने ठरवायचं.

जसं सुरीचा वापर डॉक्‍टरही करतात आणि दरोडेखोरही....  एक जीव वाचवतो आणि दुसरा जीव घेतो.  दोष सुरीचा की त्‍याला वापरणा-या व्‍यक्‍तीचा? पैशालाच वाईट म्‍हणणारे हा नियम पैशांबाबत का लावत नाहीत? बालपणापासून पैश्‍याबाबत नकारात्‍मक विचारांपेक्षा सकारात्‍मक विचार बिंबवले, तर त्‍यांची फळं आयुष्‍यभर मिळतील.   

सुप्‍त मनातील विचारांचा परिणाम मनावर आणि आपल्‍या शरीरावर
तसेच कृतीवरदेखील होतो.

श्रीमंत वाममार्गानेच संपत्‍ती कमावतात अशी धारणा असणा-या विचारांमुळे संपत्‍तीबद्दल द्वेष आणि धिक्‍कार निर्माण करतो.  पैशाला ‘’वाईट’’ मानलं की तो तुमच्‍यापासून आपोआप दूर जाईलच, कारण आपण कळत नकळत आपल्‍या सुप्‍त मनात ज्‍या विचारांना स्‍थान देतो, तेच आपल्‍याकडे आकर्षित होतात.  दुस-याबद्दल आपण जो विचार करतो, तोच विचार आपलं अंतर्मन आपल्‍यामध्‍ये रूजवतो, त्‍यामुळे दुस-याचा मत्‍सर आणि द्वेष टाळावा. 

आपण दुस-याबद्दल जो विचार करतो ती व्‍यक्‍तीही आपल्‍याशी तशीच वागते.  हवं तर एकदा तरी अनुभव घ्‍याच!!  याउलट सदिच्‍छा देताना सकारात्‍मकता वाढते. 

सकारात्‍मक विचारांपेक्षा नकारात्‍मक विचार
सुप्‍त मनापर्यंत वेगाने पोहोचतात.

म्‍हणूनच स्‍वतःच्‍या विचारांचा आणि क्षमतांना सकारात्‍मक दिशा देऊन त्‍याचा उपयोग उन्‍नतीसाठी होऊ शकतो, परंतु फक्‍त पैशालाच महत्‍व देऊन, कुटुंब, नातेसंबंध आणि जबाबदा-यांकडे दुर्लक्ष केल्‍याने त्‍यातून दुःखच मिळते, हेसुद्धा तितकेच खरे.

आयुष्‍यात पैसा गरजेचा असला तरीही ते अंतिम लक्ष नाही.

लेखकाने सकारात्‍मक विचारांचे होणारे अद्भूत परिणाम अनेक उदाहरणांतून स्‍पष्‍ट केले आहे.  स्‍वतःच्‍या शास्‍त्रीय अभ्‍यासाला लेखकाने बायबलमधील आध्‍यात्मिक दाखले देऊन आत्‍मा आणि परमात्‍म्‍याचे सहसंबंध अत्‍यंत मोजक्‍या शब्‍दांत मांडले आहेत.  आपण रात्री झोपतानाही सकारात्‍मक विचार करावा आपल्‍याला अनेक प्रश्‍नांची उत्‍तरं मिळतील.

तुम्‍ही दुस-यासाठी काहीतरी चांगलं करता तेव्‍हा निसर्ग किंवा परमेश्‍वर तुम्‍हाला चांगल्‍या कामासाठी नक्‍कीच मदत करतो.  मानसिक शांती आणि उत्‍तम आरोग्‍य आपल्‍या अंतर्मनावर अवलंबून असतात, कारण प्रार्थनेमुळे ईश्‍वर बदलत नाही, तर प्रार्थना करणारा बदलतो.  प्रार्थना सकारात्‍मक उर्जा देते.  स्‍वतःच्‍या  इच्‍छांशी प्रामाणिक राहिल्‍यास त्‍याचे परिणामही दिसतात.

प्रतिकूल परिस्थिती असूनही स्‍वतःच्‍या स्‍वप्‍नांचा पाठपुरावा करणा-या अनेक व्‍यक्‍तींची उदाहराणे लेखकाने या पुस्‍तकात दिली आहेत.  दिवसात अनेकदा आणि रात्री झोपण्‍यापूर्वी आपल्‍या स्‍वप्‍नांची उजळणी केल्‍यास सुप्‍त मनात त्‍या रूजून कालांतराने फलद्रूपही होतात. दिवसात आपल्‍या मनात येणा-या हजारो विचारांपैकी किती तरी विचार नकारात्‍मक असतात, त्‍यात अनेक व्‍यक्‍ती प्रसारमाध्‍यमं, सोशल मीडिया त्‍यात भर घालतात.  

कधी कधी स्‍वतःच्‍या स्‍वप्‍नांपेक्षा अफवांमध्‍ये आपण जास्‍त गुरफटून स्‍वतःत नकारात्‍मक विचार वाढवतो, आपली निवड आपणच ठरवायची.

पैसा लुटला जातो, परंतु ज्ञान आणि क्षमता चोरता येत नाही, लुटता येत नही.

लेखक बायबलमधील काही उदाहरणे देऊन स्‍पष्‍ट करतात. स्‍वतःला आणि परिस्थितीला बदलण्‍याची अमर्याद क्षमता आपल्‍याकडे आहे. गरज आहे ती स्‍वतःला ओळखण्‍याची.

समस्‍या आणि अडचणीतून मार्ग काढण्‍याची क्षमता आपल्‍यात आहे.   समस्‍यांकडे पाहण्‍याचा सकारात्‍मक दृष्‍टीकोन आला की मार्ग सहज सापडतात. या पुस्‍तकातून लेखकाने श्रीमंत होण्‍याचीच नही, तर समस्‍यांवर मात करण्‍याचे सूत्रही दिले आहे.

परमेश्‍वराने शरीरापेक्षा आपल्‍या मनाला अफाट शक्‍ती दिली आहे. प्रयत्‍नांना आध्‍यात्मिक विचार बैठकीची साथ गरजेची आहे. रामदास स्‍वामी म्‍हएातात की, ‘’ईश्‍वराचे अतिष्‍ठान पाहिजे’’.  व्‍यवस्‍था आपल्‍याला भरभरून देण्‍यास नेहमी सज्‍ज असतेच, आपण विचारांना योग्‍य दिशा दिल्‍यास आरोग्‍य, शांती, यश आणि धन-संपत्‍ती अशा अनेक गोष्‍टी स्‍वतःकडे आकर्षित करून समृद्ध जीवन जगू, फक्‍त प्रयत्‍न मनापासून व्‍हायला हवे.

मन लावून धनाकडे लेख साभारः निमेष आहेर- संपर्कः ८८३०२९७१३७-पुण्‍यनगरी-रससयात्री

 

पुस्‍तकः हाऊ टू अट्रॅक्‍ट मनी

लेखकः डॉ.जोसेफ मर्फी

पुस्‍तक समीक्षा- मराठी

How to Attract Money
by Dr. Joseph Murphy
book review in Marathi

#हाऊ टू अट्रॅक्‍ट मनी- मराठी पुस्‍तक समीक्षा लेखक-डॉ.जोसेफ मर्फी #How to Attract Money by #Dr. Joseph Murphy book review in Marathi #अर्थात #धनसंपदा #संपत्‍ती #आकर्षणाचा नियम मराठी #आकर्षणाचा सिद्धांत मराठी #बाह्यमन #अंतर्मन, #सुप्‍तमन, #Law of Attraction #the power of subconscious mind #Attitude is everything

 ई-वाचनालय | www.evachnalay.in 

 👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive