आपले शरीर- मन-The Software-सॉफ्टवेअर

मन- The Mind
The Software-सॉफ्टवेअर

ज्‍याला स्‍पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही, पण जाणीव करू शकतो, समजू शकतो

1.   मन-Mind

a.   Consciousness? चेतना (कोह्म?)

b.   बाह्यमन-Conscious  Mind

c.   अंतर्मन-

d.   चेतन-अचेतन-मन-Subconscious Mind

e.   Super Subconscious Mind

f.    Unconscious Mind

g.   बुद्धी-7-10-9 Type of Intelligence

h.   स्‍मृती Memory

i.    मेधा- The Natural Gift (80 thousands creatures rule)

j.    विवेक-Wisdom

k.  Rational v/s Emotional(Right Brain v/s Left Brain)

2.   व्‍यक्तिविशेष गुण Natural Guts, Thing, Game, Specialty, Characteristic

a.   भावना, विचार, प्रेरणा, ईच्‍छा, अपेक्षा, आशा, आकांक्षा, महत्‍वाकांक्षा, स्‍वप्‍न-

''भावना विचाराहुन सूक्ष्म ह्या मनाशी जोडलेल्या असतात तर विचार बुद्धी शी जोडले ले असतात.  भावना ह्या आदिम आहेत तर विचार हे प्रगत आहेत.''

b.   अहंकार

c.   अहं–Ego

d.   Super Ego-ईड-ईडन

3.   गुणविशेष आचरण उपयोग- व्‍यक्तिमत्‍व-भावना-प्रेरणा-वर्तन-दृष्‍टीकोण-अपेक्षा-आचार-विचार-संस्‍कार-व्‍यवहार-व्‍यापार-

                         i.   मूल्‍ये-  

                         ii.   समजूती

                        iii.   अपेक्षा

                        iv.   दृष्‍टीकोण

                         v.   कृती

4.    नैसर्गिक भावना

a.   लोभ -दुःखीSadness

b.   भिती-घृणा-तिरस्‍कार- न्‍यूनगंड, भयगंड-अहंगड

c.   आनंद-सुख-द्वेष-राग-

d.   साम-दाम-दंड-भेद-

e.   स्‍वार्थ-परमार्थ-धर्मार्थ

5.   Difference between Emotions-Sentiments-Feelings

6.   Mentality-View-Prospective

7.   What is Mood

8.   Types of Personality- Intro-Ambi-Extro-vert

 
🔖📖📗📘📙📑📕
 
 
मन म्हणजे नक्की काय… मनाची वैद्यकीय,मानस शास्त्रीय,वर्तनात्मक आणि आध्यात्मिक व्याख्या नक्की काय आहे… या सगळ्याचा उहापोह अत्यंत सोप्या भाषेत करत आहेत डॉ.आनंद नाडकर्ण.
 
 
 
 

Emotions | Feelings | Moods | Emotional intelligence | Emotional Literacy | Positive Psychology | चेतना, भाव-भावना, जाणीव, वाटणे

आपण बर्‍याचदा आपल्याला जाणवणाऱ्या भावना, त्यावेळी नेमकं काय वाटतं आहे आणि त्यामुळे निर्माण होणारी मनःस्थिती याबाबत गोंधळ करतो. योग्य शब्दात ते मांडता येत नाही, त्यामुळे हाताळणे जमत नाही.त्‍याबद्दल अधिक जाणून घेऊया.

 

साभारः यूट्यूब/ Psychology Sundays | Dr. Anuradha Harkare

 
मनाचे रहस्‍य उजागर करणारी, समज वाढविणारी, माहितीत भर घालून ज्ञान वर्धन करणारी अशी मनाची पुस्‍तकं अवश्‍य वाचावी व त्‍यातील म्‍हणजेच पुस्‍तकातील सांगितलेले ज्ञान वास्‍तविक आयुष्‍यात आत्‍मसात करावे अशी पुस्‍तकं खाली दिलेली आहेत.  वाचा. 
 
मनात -अच्‍युत गोडबोले 
मानसशास्‍त्राची उत्‍कंठावर्धक रम्‍य सफर

मराठीमध्‍ये शास्‍त्रीय दृष्‍टीकोनाने मन यावरील सर्वसमावेशक, सहज-सोप्‍या भाषेत उपलब्‍ध असलेली पुस्‍तकं ज्‍याद्वारे आपल्‍याला मन या विषयाची सखोल माहिती मिळेल, ज्ञानात भर पडेल, संकल्‍पना स्‍पष्‍ट होतील, गुढता नष्‍ट होईल, संदिग्‍धता राहणार नाही, गैरसमज दूर होतील, 
तुम्‍ही स्‍वयंविकसित व्‍हाल, तुम्‍हाला स्‍व-जाणीव होईल, इतरांबद्दल व स्‍वतःबद्दल मनाच्‍या शंकांचे निरसन होईल, त्‍यामुळे तुमच्‍या समस्‍येचे समाधान मिळेल नव्‍हे तुम्‍ही स्‍वतः तसे करण्‍यास पुढाकार घ्‍याल. सर्वांनी अवश्‍य वाचावी अशी पुस्‍तक.
  • मनात -अच्‍युत गोडबोले 
 मनात या पुस्‍तकाचे पुस्‍तक परिचय-सारांश येथून वाचाः
मनात अच्‍युत गोडबोले

🔖📖📗📘📙📑📕
 
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी)  
आपल्या अचेतन मनाची शक्ती
The Power of Your Subconscious Mind (Marathi) (Marathi Edition)
 
द मन- सरश्री 
शतकानुशतके माणूस आपल्या मनाचे दमन करून त्यावर नियंत्रण ठेवत आला आहे. परंतु मनाच्या दमनामुळे मन निराश आणि निरस झाले आहे. या अनर्थापासून बचाव व्हावा या उद्दिष्टाने "द मन' या पुस्तकाची निर्मिती झाली.  
 

आपल्याला अडकवून ठेवणाऱ्या मनापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणती परिणामकारक पावले आपण उचलायला हवीत? या मनाला कसे जाणून घ्यावे? आपल्याला जे उद्दिष्ट गाठायचे आहे ते गाठता यावे यासाठी काय करायला हवे? हे सर्व या पुस्तकात जाणता येईल.

मनाच्या सामर्थ्याने सिद्धी प्राप्त होऊ शकतात; त्याचप्रमाणे सत्यही प्राप्त होऊ शकते. मनाचे ज्ञान झाल्यावर पैसाही मिळू शकतो आणि प्रज्ञाही मिळते. आपल्या मनाच्या शक्तीने, भक्तीने, युक्तीने आणि सेवेने आपणास काय निर्माण करायचे आहे? आपल्याला सर्वोच्च, उच्चतम लक्ष्य प्राप्त करायचे आहे का? कारण मनाचे सर्वश्रेष्ठ कार्य, मन. " 'महानिर्वाण निर्माण' हे आहे."  


🔖📖📗📘📙📑📕
 
 

 

 


Mindful v/s Mind Full

 



मनाची परिभाषा किंवा व्‍याख्‍याः (विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
  • जाणीव बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी या मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत.
    प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. मन हे राजासारखे असावे पण मनावर नियंत्रण हवे. मनातील सर्व काही बोलण्यासाठी समोर माणूस असून उपयोगाचे नाही तर त्या माणसाला हि जागृत मन असावे.
    मानवी मन हि या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे.

     
     
    मनाचे कार्य 
     
    मन हे आपल्‍या शरिरातील इतर अंगांप्रमाणेच परंतू न दिसणारे आभासी असे महत्‍वपूर्ण अंग आहे.  शरीरातील इतर अंतर्बाह्य अंगांना जसे एखाद्या गोष्‍टीमुळे, अपघातामुळे, आवश्‍यक घटकांच्‍या अभाव किंवा अनावश्‍यक गोष्‍टी-घटक-वस्‍तू यांच्‍या प्रभावामुळे जसे विविध 'शारिरीक' त्रास, दुःख, दुखापात, आजार, विकार उत्‍पन्‍न होतात.
     
    उदाहरणार्थ- 
    अपघात झाल्‍यास शरिराला इजा होते, एखादे हाड-एखादे अंग तुटते, मेंदूद्वारे आपल्‍याला शारिरीक दुःखाची जाणीव होते, किंवा शरिरात एखादे क्षार-जीवनसत्‍वे- यांच्‍या अभावामुळे डोळ्यांचे आजार, त्‍वचेचे विकार उत्‍पन्‍न होतात, जडतात.
     
    दिवसभर आपण कामं करतो, मुलं खेळतात, शेतकरी शेतीची कामं करतो, मजूर मजूरी करतो, व्‍यापारी-उद्योजक-व्‍यवस्‍थापक-लिपीक-वैज्ञानिक इत्‍यादी आपापल्‍या कुवतीप्रमाणे शारिरीक श्रम-मेहनत करतात, दिवसभराचा शारिरीक थकवा, झालेली झीज-शीन-तान-थकवा घालवण्‍यासाठी आपण आराम करतो, दमलेल्‍या शरिराला झोपेद्वारे स्‍वतः शरिराला दुरूस्‍त करून घेऊन, झीज भरून काढण्‍यासाठी ज्‍याप्रमाणे गरजेचे असते.
     
    अगदी तसेच आपल्‍या मनालादेखिल एक शारिरीक पण आभासी परंतू न दिसणारे अंग समजले तर मनालाही अति-तान, आपल्‍या मानसिक क्षमतेपेक्षा अधिक काम-कार्य-विचार करू-दिल्‍यास तान-तनाव, मानसिक थकवा, 'मानसिक आजार', आघात, होतात.  आपण तान-तनावाने, नैराश्‍य सारख्‍या व्‍याधींनी ग्रस्‍त-त्रस्‍त होतो.  
     
    आपल्‍या शारिरीक क्षमतेपेक्षा अधिक श्रम-मेहनत शरिराला थकवते त्‍यामुळे आपण दमतो तसेच मनाचेसुद्धा आहे.  आपल्‍या मानसिक क्षमतेपेक्षा अधिक काम-कार्य-विचार आपल्‍याला थकवा आणते.  परिणामी आपल्‍याला चिडचिड होते, ते काम-कार्य नकोसे वाटते.  असेच जर सतत होत राहिले तर शेवटी विविध मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. 
     
    किंवा आपला एखादा शारिरीक अपघात झाल्‍यास, दुखापात झाल्‍यास, त्‍यावर औषधोपचार-इलाज करून बरे होण्‍यासाठी जसा वेळ लागतो-त्‍या एखाद्या अंगाची-हाडाची काळजी घेऊन त्‍याला ठीक होण्‍यासाठी लागणारे (physical) औषधपाणी, पौष्‍टीक अन्‍न, व्‍यायाम, सभोवतालचे वातावरण, इत्‍यादी शरिराची ती झालेली हानी-झीज भरून काढण्‍यास मदत करते, अगदी तसेच मनाचेही आहे.  
     
    कारण आपण मनाला एक न दिसणारे-अदृश्‍य असे आभासी अंग मानलेले आहे तेव्‍हा इतर शारिरीक अंगांप्रमाणेच एखादा मानसिक आघात, अपघात, दुःखापात झाल्‍यास त्‍यापासून सावरायला, तंदुरूस्‍त व्‍हायला वेळ लागतो, योग्‍य वातावरण, योग्‍य औषधोपचार, पौष्‍टीक अन्‍न हेच लागते परंतू ते सुद्धा आभासीच (Virtual-मानसिकच) असावे लागते.  
     
    जसे योग्‍य मानसिक औषधोपचारासाठी तान-तनाव कमी करावयाचा झाल्‍यास आपण कामाला सुट्टी घेतो, विरंगूळा म्‍हणून, वातावरणात बदल म्‍हणून फिरायला जातो, निसर्गात भ्रमण करून, प्राणी-पशू-पक्षी-झाडे-झुडपे यांच्‍या सानिध्‍यात राहून मन प्रसन्‍न करतो परिणामी प्रफुल्‍लीत होते, शरिराप्रमाणेच मनालाही आराम करू द्यावे लागते.

    चित्रपट अभिनेता शाहरूख खान याचा एक चित्रपट आहे 'डियर जिंदगी' नावाचा, त्‍यातील एक डायलॉग म्‍हणा किंवा त्‍यातील सीन-दृश्‍य म्‍हणा ज्‍यामध्‍ये तो मेंदू/मनाला शारीरीक अंगाप्रमाणेच समजण्‍यास सांगत असतो.. पहा
     

     

    मणुष्‍य हा प्राथमिकतः भावनिक प्राणी आहे, त्‍यानंतर मणुष्‍य हा विचारशील प्राणी आहे, भावना ह्या आदिम आहेत तर विचार हे प्रगत आहेत. मणुष्‍य हा बुद्धिमान प्राणी आहे, त्‍यासोबतच मनुष्‍य हा सामाजिक प्राणीदेखिल आहे, एकटे राहणे त्‍याला जमत नाही असे नाही परंतू, आदिमानवाची उत्‍क्रांती होत असताना, संस्‍कृती, सभ्‍यता बनन्‍या अगोदरपासूनच मानवाला सूक्ष्‍म निरिक्षण-प्रयोग-परिक्षण यांमुळे समुहाचे महत्‍व व गरज कळून चुकले.

    मणुष्‍य प्राणीः भावनिक, विचारशील, बुद्धिमान, सामाजिक आणि नक्‍कलाकार
    समाजातील इतरांची नक्‍कल करण्‍याची प्रेरणा
    , भावना व ईच्‍छा असणारा

    त्‍यामुळेच मानवाच्‍या निसर्गदत्‍त भावना-बुद्धि-स्‍मृती यांच्‍या जोडीने व मदतीने स्‍वयंनिर्मित विचार, कल्‍पना, यांच्‍या जोरावर विविध व्‍यवस्‍थांची निर्मिती मानवाने केली, त्‍यातील प्रथम क्रमांकावर समूहाची कल्‍पना अर्थातच समाज नावाची व्‍यवस्‍था येते. साहजिकच इतर प्राण्‍यांप्रमाणे मानवालादेखिल प्रारंभिक गोष्‍टींचा प्रभाव मनात सुप्‍ताअवस्‍थेत का असेना अतिखोलवर असतोच असतो.  

    (त्‍यालाही मान-सन्‍मान हवा असतो, त्‍यांच्‍याप्रमाणे वागणे आवडते, परंतू शेवटी स्‍वतःचा शोध घ्‍यावा असे वाटते हेच मानवाला इतरांपेक्षा वेगळं बनवत असते.)

    उदाहरनार्थः

    -व्‍यक्‍ती

     ↓

    -कुटूंब

     ↓

    -परिवार

     ↓

    -समूह

     ↓

    -समाज

     

    आपण आपलेच उदाहरण पाहिल्‍यास आपल्‍याला कळून येईल की, जन्‍मतःच आपण आपल्‍या सभोवतालचे निरिक्षण करण्‍यास सुरू करतो, निरिक्षणाअंती असे आढळून येते की, आई, समाजातील प्राथमिक घटक असलेला व्‍यक्‍तीचा आपल्‍यावर प्रभाव खूप खोलवर असतो.           

    सामाजिक वातावरण (social environment) यात नातेवाईक-मित्र-मैत्रिण, शेजारी-पाजारी, संगत-सोबती –ज्‍यांच्‍यासोबत सहवास करतो, वागतो-राहतो, बागडतो, वाढतो, शिकतो याचा परिणामही आपल्‍या दृष्‍टीकोनावर होत असतो.  वातावरण जर सकारात्‍मक असेल तर आपण जीवनात पुढे चालतो नाही तर नकारात्‍मक वातावरणात आपणही नकारात्‍मक विचारांनी घेरले जातो.* 

     

     
    How do we define mind?  
    • The part of a person that thinks, reasons, feels, understands, and remembers.  
    • Memory sense 1 Keep my advice in mind.  
    • Intention sense 1 I changed my mind.  
    • A person's view or opinion about something Speak your mind.
     
     What is difference between brain and mind?
    • Mind is associated with the brain. The two terms are often used interchangeably. Brain is considered to be a physical thing, the mind is considered to be mental. The brain is composed of nerve cells and can be touched, whereas, the mind cannot be touched.   
     
    What are the three types of mind?
    • When discussing the mind, there are three basic areas to consider: the conscious mind, the subconscious mind, and the unconscious mind. The conscious mind is the part we're aware of and think with. 
     
    What is the mind in psychology?
    • Mind refers to the aspects of intellect and consciousness manifested as combinations of thought, perception, memory, emotion, will and imagination, including all of the brain's conscious and unconscious cognitive processes. "Mind" is often used to refer especially to the thought processes of reason.
       
    What is mind in Bible?
    • The word,”mind” is used in a variety of ways throughout the Bible. God tells believers and unbelievers alike what to do with their minds. These are some of the things God says to do with their minds
       
    How many minds do we have?
    • These are three different types of minds mentioned above. Let's recap; when discussing the mind, there are three basic areas to consider: the conscious mind, the subconscious mind, and the unconscious mind. The conscious mind is the part we're aware of and thinks with.
     
    (Source: Google) 
     
     

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive