Attitude is Everything-By Jeff Keller-Part -1

 Attitude is Everything-By Jeff Keller-Book Summary in Marathi- Part -1

अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग- लेखक जेफ केलर- भाग-१ 


 Attitude is Everything-By Jeff Keller 

अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग

लेखक-जेफ केलर

''दृष्‍टीकोण-हेच-सर्वकाही''

भाग-१ 

 

 

 

  • काय तुम्‍हाला आपलं काम नेहमी टाळायची सवय आहे?
  • काय तुम्‍हाला नेहमी मरगळल्‍यासारखे किंवा थकून गेल्‍यासारखे वाटते?
  • काय तुम्‍हाला आळशीपणा जाणवतो? कोणतीही कामे करावीशी वाटत नाहीत.?
  • काय तुम्‍ही नेमही डिप्रेस्‍स म्‍हणजेच निराशा वाटते?
  • आणि काय तुम्‍हाला नेहमी दुःखी असल्‍यासाखे वाटते?
  • तर ही पुस्‍तक तुमच्‍यासाठीच आहे.

 

अ‍ॅटिट्यूड-इज-एव्‍हरिथिंग म्‍हणजेच ''दृष्‍टीकोण-हेच-सर्वकाही''- ह्या पुस्‍तकाचे लेखक जेफ केलर जे अमेरिकेचे प्रेरणा देणारे, प्रोत्‍साहन देणारे वक्‍ते आणि सुप्रसिद्ध लेखक आहेत.  

अ‍ॅटिट्यूड 👉 अभिवृत्‍ती 👉 मनोवृत्‍ती 👉 दृष्टिकोन 

जेफ केलर म्‍हणतात, एका यशस्‍वी व अर्थपूर्ण जीवनाचा रस्‍ता तुमच्‍या अ‍ॅटिट्यूड-दृष्‍टीकोणातून होऊन जात  असतो. आणि तुमचं अ‍ॅटिट्यूड तुमच्‍या नियंत्रणामध्‍ये आहे. 

 

" If You change your Attitude,
You can change your Life."
 


 याचा अर्थ, आपण आपला दृष्‍टीकोन थोडासा बदलून  आपल्‍या जीवनामध्‍ये परिवर्तन आणू शकतो. 

चला या वाक्‍याला एका उत्‍तम उदाहरणाने समजूयाः 

 अ‍ॅटिट्यूड-म्‍हणजे जगाकडे आपला पाहण्‍याचा दृष्‍टीकोन.

जिथे काही जण आपल्‍या जीवनात जगाकडे Positive Attitude सकारात्‍मक नजरेने/दृष्‍टीकोणाने बघतात मग परिस्थिती कितीही खराब का असेना. असे लोक परिस्थितीत काही ना काही सकारात्‍मक गोष्‍ट पाहतात. 

तर सकारात्‍मक दृष्‍टीकोणवाल्‍या लोकांपेक्षा अगदी उलट काही लोक जीवनाला एका Negative Attitude नकारात्‍मक दृष्‍टीकोणातून बघतात.  अगदी तुम्‍ही अशा नकारात्‍मक लोकांना जगभराच्‍या सख-सुविधा द्या, असे लोक त्‍यामध्‍येसुद्धा काही-ना-काही नकारात्‍मक शोधून काढतातच. 

 

समजा, 🙌सुरेश आणि 🙎 सुनिल दोघे मित्र आहेत. 

सुरेश जीवनाला एका सकारात्‍मक दृष्‍टीने बघतो तर सुनिल नकारात्‍मकतेने भरलेला होता. 

 

👉कोणतेही काम करण्‍यासाठी नेहमी स्‍वतःला म्‍हणत असे-       

🙋 सुरेश    -     मी ते करू शकतो     -    I    CAN

🙍 सुनिल    -    मी ते करू शकत नाही    -    I CAN'T

 🙌 सुरेश समस्‍येचे समाधान शोधत असे - Solution focused

🙍 तर सुनिल समस्‍येमध्‍ये गुरफटून जात असे- Problem focused

 🙆 एकीकडे सुरेश सगळीकडे चांगलं पाहत असे तर- Good + Positive

🙇 सुनिल सर्वांध्‍ये वाईटपणा पाहत असे- Bad - Negative

 🙏 सुरेश आपल्‍याला जेकाही मिळालं आहे त्‍याबद्दल कृतज्ञता ठेवत असे 

🙅 तर सुनिल जे काही आपल्‍याला मिळालं आहे त्‍याबद्दल तक्रारी करत असे

 

मित्रांनो लेखक  म्‍हणतात, येथे आपल्‍याला वरीलप्रमाणे खुप उदाहरणे देता येऊ शकतात.
परंतू आशा आहे आपल्‍याला सकारात्‍मक आणि नकारात्‍मक यांच्‍यामधला फरक व अर्थ समजला असेल. 

 

पुस्‍तकाचे सारांश सुरू करण्‍याअगोदर लेखकांची एक प्रेरणादायी गोष्‍ट सांगत आहे:

  The night that changed my life.

 ती रात्र जेंव्‍हा माझे जीवन बदलले.

जेफला (लेखक) लहानपणापासूनच वकील बनन्‍याची इच्‍छा होती.  आणि १९८० मध्‍ये त्‍यांनी विधी महाविद्यालयातून पदवी सुद्धा प्राप्‍त केली. सर्वकाही त्‍यांच्‍या योजनेनुसार होत होतं.  विधी महाविद्यालयात त्‍यांना त्‍यांच्‍या वर्गमैत्रीन 'डलोरस' सोबत प्रेम झालं.  आणि लेखकांनी त्‍यांच्‍यासोबत लग्‍न केलं. 

जेफ यांना वाटत होतं की ते एका अर्थपूर्ण आणि यशस्‍वी जीवनाच्‍या मार्गावर आहेत.  परंतू काही वर्षे वकीली व्‍यवसाय केल्‍यानंतर त्‍यांना उमजलं की ही कारकीर्द (वकीलीचा व्‍यवसाय) जेवढं त्‍यांनी विचार केलं होतं तेवढंही चांगलं नाहीये. 

म्‍हणून ते आपल्‍या व्‍यवसायिक कार्यामुळे असमाधानी राहू लागले.   त्‍यांना स्‍वतःचं जीवन निरर्थक वाटू लागले होते.   आणि ते खूपच नैराश्‍यात राहत असत. 

खरंतर ते फक्‍त २५ वर्षाचेच होते, परंतू नैराश्‍यामुळे त्‍यांचे वय ४० वर्षाचे वाटत हाेते.  ते चाळीशीचे दिसू लागले होते.  आणि जेव्‍हा त्‍यांचं वय ३० वर्षे झाले, तेंव्‍हा त्‍यांना वाटलंः 

झालं आता... माझ्या जीवनात आता कधीही न संपणारी दुर्दशा-संकटे-समस्‍या आणि दुःखे यांच्‍याव्‍यतिरिक्‍त काहीतरी असेल.....

एका रात्री जेफ असेच विचार करत बसले होते, तेंव्‍हा त्‍यांनी टी.व्‍ही.वर चालू असलेली एक जाहिरात बघितली ''मेंटल बॅंक'' (MENTAL BANK)...

मूळतः ''मेंटल बॅंक'' हे एक दूरस्‍थ शिक्षण पद्धती प्रमाणे ''घरी बसून करावयाचा अभ्‍यासक्रम ' होता.  ज्‍यामध्‍ये असे म्‍हटले होते की, 

  "आपल्‍या जीवनामध्‍ये जे काही होत आहे, आपण जे काही प्राप्‍त केलेलं आहे, ते अजून दुसरे काही नसून आपल्‍या (Subconscious Mind) अंतर्मन-अवचेतन-सुप्‍त मनामधील आपल्‍या श्रद्धा किंवा विश्‍वास असतात. " 

 

 

HOW EVERYTHING WE ACHIEVE IN OUR LIFE, IS BASED UPON OUR SUBCONSCIOUS BELIEFS. 

 

 जसेही जेफ यांनी टी.व्‍ही.वरील ती जाहिरात बघितली तेंव्‍हा त्‍यांना वाटले फक्‍त हेच आता माझी मदत करू शकते. 

त्‍यांनी लगेच आपला क्रेडिट कार्ड खिशातून काढला आणि जाहिरातीमधील मेंटल बॅंक हा अभ्‍यासक्रम खरेदीकरण्‍यासाठी ऑर्डर केला..!

आणि ही रात्र जेफ यांच्‍या जीवनातील महत्‍वाचे वळण ठरले. 

काही दिवसांनी मेंटल बॅंकेचं अभ्‍यासक्रम त्‍यांच्‍या घरी वितरीत झाले, तेंव्‍हा जेफ ते अभ्‍यासक्रम शिकण्‍यासाठी खूप उत्‍सुक होते की,

 "कसं आपल्‍या मनातील विचार आपले गुणवत्‍तापूर्ण जीवन ठरवतात."

"How our Thoughts determined the quality of our Life." 


कारण त्‍यांनी याअगोदर असं काही कधीही ऐकलं नव्‍हतं.  दुर्दैवाने आपल्‍या शिक्षणव्‍यवस्‍थेमध्‍ये हे सर्व शिकविले जात नाही. 

यानंतर जेफ यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.  त्‍यांनी खूपसा-या प्रेरणादायी आणि स्‍वयंमदतीच्‍या पुस्‍तकांचे वाचन केले.  

आता त्‍यांना असं वाटायला लागलं होतं की, जसं ते एखाद्या उजाड-वाळवंटामध्‍ये हरवून गेले होते, आणि एकदम त्‍यांना गोड पाण्‍याची नदी मिळून गेली आहे. 

आणि जसं-जसं जेफ आपला Negative Attitude नकारात्‍मक दृष्‍टीकोण सोडून Positive Attitude सकारात्‍मक दृष्‍टीकोणाचं अवलंबन केलं.  त्‍यांना स्‍वतःच्‍या जीवनामध्‍ये आवाक् करणारे परिणाम दिसू लागले. आणि आता त्‍यांनी ती उद्दिष्‍टये साध्‍य करायला सुरूवात केली जी त्‍यांनी कधी विचारही केली नव्‍हती. 

आता वकीली व्‍यवसायासाेबत जेफ प्रेरणादायी वक्‍ते झाले होते, ते फावल्‍या वेळेत प्रेदणादायी भाषणे करायला लागले होते.  आणि शेवटी १९९२ मध्‍ये त्‍यांनी आपल्‍या वकीलीच्‍या व्‍यवसायाची नोकरी सोडून पुर्णवेळ प्रेरणादायी वक्‍ते म्‍हणून कार्य करायला सुरुवात केली. ज्‍यामधून त्‍यांना खूप यश आलं. आणि यानंतर जेफ यांना त्‍यांचं काम कधीही काम म्‍हणून वाटलं नाही. 

जेफ जेंव्‍हा-केंव्‍हा आपल्‍या भाषणाची तयार करत  किंवा एखादे प्रेरणादायी लेख लिहित तेंव्‍हा त्‍यांना असं वाटत की ते हेच करण्‍यासाठी बनलेले आहेत. 

जेफ यांच्‍या जीवनात एवढे मोठे परिवर्तन कधीच आले नसते  जर त्‍यांनी (Power of Attitude) दृष्‍टीकोणाच्‍या शक्‍तीला समजून घेतले नसते. 

 

अ‍ॅटिट्यूड इज एव्‍हरिथिंग- हे पुस्‍तक लिहिण्‍या अगोदर लेखकांनी यश आणि मानवी वर्तन-व्‍यवहार यावर २० वर्षे संशोधन केलं.  आणि ह्या दरम्‍यान त्‍यांनी शेकडो पुस्‍तकं आणि लेख वाचून काढले. की, का काही लोकं यश संपादन करतात, आणि काही लोकांना निराशेशिवाय काही हाती लागत नाही. 

ह्या पुस्‍तकाच्‍या सारांशामध्‍ये आपल्‍याला शक्‍यतोवर सर्व महत्‍वाचे मुद्दे सविस्‍तर मांडण्‍याचा प्रयत्‍न झाला आहे आणि आम्‍हाला आशा आहे वाचकांनी ह्या सारांशाचे वाचून करून ह्या पुस्‍तकात सांगितलेल्या गोष्‍टींना अनुसरण केल्‍यास व आपल्‍या जीवनात प्रामाणिकपणे उतरविल्‍यास आपल्‍या जीवनातही आवाक् करणारे परिवर्तन घडून येतील. 

 

 मुद्दा क्र.१- Your Attitude is Your Window to the World:

 Your Attitude is Your Window to the World:

आपण सर्वजण आपल्‍या जीवनाची सुरुवात एका स्‍वच्‍छ मानसिक खिडकीने करतो.   

उदा.- एक छोटेसे मूल जेंव्‍हा चालायला शिकते आणि ते पडते, तेंव्‍हा ते काय करत असते?

मी तुम्‍हाला सांगतो तो काय नाही करत?

  • ते मूल गालिचा म्‍हणजेच कार्पेटला दोष देत नाही. 
  • ते मूल आपल्‍या आई-वडिलांना बोट दाखवत नाही की त्‍यांनी त्‍याला चुकीच्‍या सुचना केल्‍या. 
  • ते (चालणे शिकणे) सोडून देत नाही. 
  • ते हसते आणि पुन्‍हाः उभे राहते. 

आणि ते तोपर्यंत असे करत असते जोपर्यंत ते चालणे शिकत नाही तोपर्यंत. 

 

त्‍याची मानसिक खिडकी (Mental Window) बिल्‍कुल/अगदी स्‍पष्‍ट असते.  त्‍याला असे वाटते कोणतीही गोष्‍ट अशक्‍य नाही. परंतू जसे की आपण जाणतो, एक अशी वेळ येते जेंव्‍हा जीवनात आपल्‍या मानसिक खिडकीवर धूळ म्‍हणजेच घाण पडणे सुरू होते.  

आपली मानसिक खिडकी खराब व्‍हायला लागते जेंव्‍हा आपल्‍याला कमी गुण मिळाले म्‍हणून (Criticize) टीका केली जाते. 

आपली मानसिक खिडकी खराब व्‍हायला लागते जेंव्‍हा आपली एक-दुस-यासोबत (Comparison) तुलना केली जाते.  

आपली मानसिक खिडकी खराब व्‍हायला लागते जेंव्‍हा  जेंव्‍हा आपल्‍याला जीवनामध्‍ये (Disappointment) निराशा आणि (Rejections) नकार मिळायला लागतात.

ह्या सर्व कारणामुंळे आपण आपला (Belief) विश्‍वास आणि (Positive Attitude) सकारात्‍मक दृष्‍टीकोण हरवून टाकतो.  


जर तुम्‍ही स्‍वतःची मानसिक खिडकी स्‍वच्‍छ करणार नाही तेंव्‍हा असं व्‍हायची अधिक शक्‍यता आहे की तुम्‍ही तुमचे जीवन नकारात्‍मकतेमध्‍ये आणि नैराश्‍यामध्‍ये संपवाल. आणि ह्याच कारणामुळे तुम्‍ही तुमचे जीवन कधीही खुलून जगणार नाही. परंतू एक मार्ग आहे.  

जेफ म्‍हणतात, 

You always have a choice.
तुमच्‍याजवळ नेहमीच एक निवड असते. 

 

तुमच्‍याजवळ जीवन जगण्‍याचे दोन मार्ग असतात. सकारात्‍मक दृष्‍टीकोन आणि नकारात्‍मक दृष्‍टीकोन 

सकारात्‍मक दृष्‍टीकोन आणि नकारात्‍मक दृष्‍टीकोन 

१.  एकतर तुम्‍ही तुमचे जीवन तुमच्‍याजवळ जे नाही त्‍याचे रडगाने गात संपवून टाका किंवा

२.  आज तुमच्‍याजवळ जे नाही त्‍याला सकारात्‍मक दृष्‍टीकोनाने मिळविण्‍यासाठी त्‍यावर काम करा. 

३.  आणि अशाने तुम्‍हाला ते सर्वकाही मिळेल जे तुम्‍ही इच्‍छा कराल. 

मला माहित आहे तुम्‍ही विचार करत असाल की हे सर्व सांगणं/बोलणं खूप सोपं आहे.  परंतू करणं खूप कठीण आहे. 

तर चला मग मी तुम्‍हाला एक छोटीशी गोष्‍ट सांगतोः 

ही गोष्‍ट आहे डॉ. व्हिक्‍टर फ्रॅंकल यांची.  ज्‍यांनी या जगामध्‍ये हिटलला पाहिलं.  हिटलरच्‍या सरकारने यहुद्यांवर अतिषय छळ केला.  आणि छळही असे की ज्‍यांचा आपण विचारही करू शकत नाही. 

डॉ. फ्रॅंकल हे एक अमेरिकन मनोचिकित्‍सक होते.  म्‍हणून नाझींनी त्‍यांनाही बंदीस्‍त करण्‍यात केले.  परिवारातील फक्‍त त्‍यांची बहिण वगळता त्‍यांचे आई-वडिल, भाऊ आणि त्‍यांच्‍या पत्‍नी (छळ-छावणीत किंवा विषारी वायूच्‍या खोलीत) या काळात मारले गेले.   

काय अशा अवस्‍थेमध्‍ये कोणी आपल्‍या दृष्‍टीकोणावर नियंत्रण ठेवू शकेल?

जर हा प्रश्‍न आपण डॉ.फ्रॅंकिल यांना विचारला असता तर ते म्‍हणतील- होय...!

डॉ.फ्रॅंकिल यांनी नाझी छळ-छावणीमध्‍ये जगलेच नाही तर आपली पुस्‍तक (Man's Search for Meaning) मॅन्‍स सर्च फॉर मिनिंग- मानवाचा जीवनाच्‍या अर्थासाठी शोध ह्या पुस्‍तकाद्वारे लाखो लोकांना प्रेर‍ित केले. 

आता डॉ. फ्रॅंकिलसारखी माणसं जीवनाच्‍या अशा अवस्‍थेतसुद्धा सकारात्‍मक दृष्‍टीकोण ठेवून लाखो लोकांना प्रेरित करू शकतात.  तर यांच्‍यासमोर तुमच्‍या आणि माझ्या सारख्‍यांच्‍या समस्‍या काय आहेत? 

म्‍हणूनच लेखक म्‍हणतातः  

Attitude is Everything
दृष्‍टीकोण हेच सर्वकाही आहे. 

म्‍हणजेच तुमचा जगाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोणच सर्वकाही आहे.


 मुद्दा क्र.२- You are a Human Magnet:

 

Whether you think you can or you think you can't.

You are right. - Henry Ford

याचा अर्थ, तुम्‍ही विचार करता की मी हे करू शकतो, किंवा तुम्‍ही विचार करता की तुम्‍ही नाही करू शकत तर तुम्‍ही बरोबर आहात.  

 

 

कारण जसा तुमचा विश्‍वास असेल तसे परिणामही तसेच मिळतात. म्‍हणजेच तुम्‍ही दोन्‍ही ठिकाणी बरोबर असाल.  जसं तुम्‍ही विचार कराल तसे ते शक्‍य होईल. 

 

तर मग शेवटी यशाचे रहस्‍य काय आहे ? 

का काही लोकं खूप यशस्‍वी होतात, आणि काही आपल्‍या अपयशातूनच बाहेर येत नाहीत. 

लेखकांनी मुद्दा क्र.२ ला सहा (६) शब्‍दांमध्‍ये परिभाषित केलं आहे. 

तुम्‍ही कदाचित अचंबित हे जाणून व्‍हाल की, जे ६-शब्‍द तुम्‍हाला यशस्‍वी बनवतात तेच ६-शब्‍द तुम्‍हाला अपयशाच्‍या दलदलीत लोटू शकतात. 

 

यशाचे ६-शब्‍द-सुत्रेः

१.  आपण तेच बनतो ज्‍याविषयी आपण विचार करतो (We became what we think about)

म्‍हणजेच आपण स्‍वतःबद्दल जसे विचार करतो आपण तेच बनतो. जर तुम्‍ही तुमच्‍या एखाद्या (Goal) उद्दिष्‍टाबद्दल सतत विचार करत असाल तर अधिक शक्‍यता  आहे की, तुम्‍ही ते उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यासाठी एक पाऊल पुढे टाकाल. 

समजा एक व्‍यक्‍ती आहे ज्‍याचे नांव फ्रेड आहे. फ्रेड विचार करतो की तो दरवर्षी ३०-हजार डॉलर कमवेल.  तर तो एका (Human Magnet) मानवी लोहचुंबकाप्रमाणे त्‍या सर्व संधी आणि मार्गांना शोधून काढेल ज्‍यांद्वारे तो तीस हजार डॉलर कमवेल. 

आता काय होईल जर फ्रेड विचार करेल की, त्‍याच्‍या कुटुंबाच्‍या वाढत्‍या गरजा पूर्ण करण्‍यासाठी त्‍याला ५०-हजार डॉलर कमवायला पाहिजे. काय तो पन्‍नास हजार डॉलर कमावू शकेल? 

हे फ्रेडला स्‍वतःवर किती विश्‍वास आहे यावर अवलंबून असेल.  असं होण्‍याचे अधिक शक्‍यता आहेत की फ्रेड पन्‍नास हजार डॉलर कमावू शकतो. 

परंतू त्‍याला स्‍वतःवर एवढा विश्‍वास नसेल की तो कमावू शकतो तर तो कधीही कमावू शकनार नाही. याचे कारण हे आहे की, जर फ्रेडने स्‍वतःवर विश्‍वास ठेवाला की त्‍याच्‍यासाठी काहीही अशक्‍य नाही. तर तो एकेदिवशी ५०-हजार डॉलर जरूर कमवेल. 

"एका संशोधनादरम्‍यान, अर्ल नाईटिंगेल जे महान यशस्‍वी लेखक होते. त्‍यांना असं आढळून आलं की जगभरातील महान लेखक, तत्‍वज्ञानी आणि धार्मिक नेते ह्या गोष्‍टीवर सहमत होतात की, आपले  विचारच आपली कार्ये ठरवत असतात."

म्‍हणजे तुम्‍ही स्‍वतःवर विश्‍वास आणि एक अशी मानसिकता ठेवाल की तुमच्‍यासाठी काहीही अशक्‍य नाही. तर खरेच तुमच्‍यासाठी काहीही अशक्‍य नाही. 

 

२.  दृष्‍टीकोन विरूद्ध कृती/कार्य (Attitude v/s Action): 

आपणाला ह्या सारांशामध्‍ये दृष्‍टीकोन, विचार आणि विश्‍वास यावर बरेच वेळा उल्‍लेख झालेलं दिसून येईल. आणि तुम्‍ही कुठेतरी असं अवश्‍यच विचार करत असाल की,  कृती/कार्य (Action) कुठे आहे? कारण आपण जोपर्यंत कृती/कार्य (Action) करणार नाही तोपर्यंत आपण कोणताही उद्देश साध्‍य करू शकनार नाही. 

परंतू तुम्‍हाला ही गोष्‍ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपले विचारच आपल्‍या कृती ठरवत असतात.  म्‍हणजेच तुम्‍ही तुमच्‍या प्रवासाची सुरुवातच एका नकारात्‍मक दृष्‍टीकोन, नकारात्‍मक विचाराने कराल तर तुम्‍ही फक्‍त तिथपर्यंतच समोर जाल जिथपर्यंत तुम्‍हाला मार्गामध्‍ये कोणताही अपयश येत नाही. 

याउलट, जर तुम्‍ही तुमच्‍या प्रवासाची सुरुवात एका सकारात्‍मक दृष्‍टीकोणाने, एका सकारात्‍मक विचाराने कराल, तेंव्‍हा तुमच्‍या मार्गामध्‍ये कितीही अपयश आले तरी ते तुमचं काहीही बिघडवणार नाही. 

कारण, अपयश हे फक्‍त एका गतीरोधाकासारखे/स्‍पीड ब्रेकरसारखे असते.  जे आपल्‍या स्‍वप्‍नांच्‍या मार्गामध्‍ये येऊन आपली चाचणी घेत असतो. 

जर आपला एक सकारात्‍मक दृष्‍टीकोन नसेल, तर हेच गतीरोधक आपणांस पर्वतासमान मोठं वाटायला लागले. आणि आपण त्‍याला ओलांडून जाण्‍याऐवजी तेथेच थांबणार. 

"Adversity brings out our hidden potential."
 -Jeff Keller

यासाठी जीवनामध्‍ये तुम्‍ही काही नवीन सुरुवात कराल, तेंव्‍हा ही गोष्‍ट लक्षात ठेवा की, अपयश हे फक्‍त आपली चाचणी घेण्‍यासाठी आणि हे बघण्‍यासाठी येते की आपल्‍याला आपल्‍या स्‍वप्‍नांना मिळविण्‍याची किती इच्‍छा आहे. 


तर शेवटी आपण आपले विचार कसे बदलू शकतो? 

ज्‍याद्वारे आपले जीवन मानसिकदृष्‍ट्या, शारिरिकदृष्‍ट्या आणि आर्थिकदृष्‍ट्या शांतीपूर्ण होईल. 

लेखकांनी आपल्‍याला पुढील दोन सोप्‍या मार्गांनी सूचवलय की, आपण आपले जीवन अधिक सकारात्‍मक करून ते सर्व मिळवू शकू जे आपण इच्छिले आहे.

 

मार्ग क्र.१-

दररोज सकाळी १५ ते ३० मिनिटे सकारात्‍मक लेख किंवा पुस्‍तकं वाचायला सुरूवात करा.   मग ते यशस्‍वी लोकांचे आत्‍मचरित्र असो की, स्‍वयंमदतीपर पुस्‍तक असो किंवा एखादे धार्मिक/आध्‍यात्मिक पुस्‍तक असेल.  हे तुमच्‍यावर अवलंबून असेल की तुम्‍ही काय वाचू इच्छिता.  आणि याचा असा फायदा होईल की, जेंव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या दिवसाची सुरुवात एका चांगल्‍या मानसिकतेने कराल तेंव्‍हा तुमचं संपूर्ण दिवस सकारात्‍मकतेने जाईल. 

 

मार्ग क्र.२-  

दररोज कोणतेतरी प्रेरणादायी चलचित्र/व्हिडिओ किंवा ध्‍वनीमुद्रण/ऑडिओ अभ्‍यासक्रम/कार्यक्रम बघणे आणि ऐकणे सुरू करा. 

आता येथे प्रेरणादायीचा अर्थ असा नाही की दिवसभर तुम्‍ही कोणतेही चलचित्र/व्हिडिओ बघायला लागायचं.  

उदा.  तुम्‍ही दररोज एखादे चलचित्र/व्हिडिओ किंवा ध्‍वनीमुद्रन ज्‍याला आज आधुनिक डिजीटल भाषेत पॉडकास्‍ट असे म्‍हणतात ते एकू शकता ज्‍याद्वारे तुमची समज (understanding)  वाढेल.  आणि लेखक सुद्धा असेच सुचवतात. 

 आपण जेंव्‍हाकेंव्‍हा आपल्‍या मनाला एखादे संदेश सतत पोहोचवत असतो  तेंव्‍हा आपली विचारसरणी आणि मानसिकतासुद्धा तशीच होऊन जाते. 

तर हे होते दोन मार्ग जे आपल्‍या मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी खुपच गरजेचे होते. 

पुढे जाण्‍याअगोदर येथे खुलासा करणे गरजेचे आहे की, सकारात्‍मक विचार करणे म्‍हणजे असे नाही की, तुमची सर्व स्‍वप्‍ने एका रात्रीतून पूर्ण होतील. तर यशस्‍वी होण्‍यासाठी तुम्‍हाला मेहणत/श्रम तर करावीच लागेल. सोबतच धैर्यदेखिल ठेवावा लागेल. 

आणि दुसरी गोष्‍ट अशी की, सकारात्‍मक विचार म्‍हणजे असेही नाही की तुमच्‍या यशाच्‍या मार्गामध्‍ये कोणतीही समस्‍या येणार नाही.  विश्‍वास ठेवा, हे प्रवास सोपे नक्‍कीच राहणार नाही.  परंतू तुम्‍हाला स्‍वतःवर विश्‍वास आणि स्‍वतःच्‍या स्‍वप्‍नांना मिळविण्‍याची प्रखर ईच्‍छा असेल  तर तुम्‍हाला कोणतीही शक्‍ती थांबवू शकनार नाही. 


३.  समस्‍येला संधीत रुपांतरीत करणे (Turn your problems into opportunity): 

आपल्‍या जीवनात जेंव्‍हाकेंव्‍हा समस्‍या किंवा अडथळे येतात तेंव्‍हा आपली प्रतिक्रिया कशी असते?

  • आपण सर्वांसारखेच तक्रार करतो. की, 
  • हे माझ्यासोबतच असे का झाले 
  • आता मी काय करू 
  • माझे सर्व नियोजन विस्‍कटले गेले 

आणि ही एक सर्वसामान्‍य बाब आहे जी तुम्‍ही स्‍वतःसोबत कधीनाकधी बोलली असेल.  परंतू लेखक म्‍हणतात, तुमच्‍याजवळ नेहमीच एक पर्याय असतो.  You always have a choice.

एकतर तुम्‍ही समस्‍येमध्‍येच अडकून राहा. आणि त्‍याची फक्‍त नकारात्‍मक बाजूच बघत राहा. किंवा या गोष्‍टीचा फायदा उचला आणि असे बघा की ही समस्‍या तुम्‍हाला काय शिकवू पाहत आहे. 

उदा.

लेखक केंव्‍हाही प्रेरणादायी वक्‍ते किंवा व्‍यक्‍तीमत्‍व विकासक बनण्‍यामध्‍ये रूची ठेवत नव्‍हते.  जोपर्यंत त्‍यांना  आपल्‍या वकीली व्‍यवसायामध्‍ये असमाधान नाही मिळाले तोपर्यंत. 

जेफ म्‍हणतात की मला आता समजतय की, मी वकील नसतो तर ते मी कधीच केले नसते ज्‍यासाठी मी बनलेलो आहे. 

काय तुमच्‍या जीवनामध्‍येसुद्धा अशी समस्‍या आली आहे. ज्‍यामुळे तुम्‍ही खूप अस्‍वस्‍थ झाले असणार. आणि काही वेळानंतर तुम्‍हाला हे समजले असेल की, ती समस्‍या नव्‍हती तर  एक भेट होती. 

उदा. वाल्‍ट डिस्‍ने जे मिकी माऊस चे रचनाकर्ते आणि डिस्‍ने कंपनीचे संस्‍थापक होते. ते अगोदर एका वृत्‍तपत्रामध्‍ये कार्टूनिस्‍ट- व्‍यंगचित्रकार म्‍हणून कार्य करत होते.  आणि त्‍यांना तेथून असे म्‍हणून काढण्‍यात आले की, अस्‍सल कल्‍पनेचा आणि विचारांचा अभाव होता. 

जरा विचार करा, जर त्‍यांना तेथून काढण्‍यात आले नसते तर ते २२-ऑस्‍कर विजेते व्‍यंगचित्र कार्यक्रम कधीच बनवू शकले नसते. 

तर मित्रांनो आता तुमच्‍या जीवनामध्‍ये कधीही  कोणती समस्‍या येईल तेंव्‍हा नकारात्‍मकतेच्‍या जाळ्यामध्‍ये फसण्‍यापेक्षा तुम्‍ही हे पाहा कि तुम्‍ही त्‍यामधून बाहेर कसे येऊ शकता.  तुम्‍ही त्‍यामधून काही शिकू शकता का. 

जर तुम्‍ही तुमचा असा एक सकारात्‍मक दृष्‍टीकोण बनवून घेतला तर तुम्‍हाला यशस्‍वी होण्‍यापासून कोणीही थांबवू शकत नाही. 

 भाग-२ वाचण्‍यासाठी

 

तर मित्रांनो हा होता दृष्‍टीकोन हेच सर्वकाही ह्या पुस्‍तकाचं भाग-१. आणि लवकरच आपल्‍यासाठी भाग-२ घेऊन येणार आहोत.  त्‍यासाठी ह्या व अशाच पुस्‍तक सारांशसाठी ई-मेलद्वारे आमची सदस्‍यता घ्‍या आणि आपले जीवन समृद्ध बनवा.  सदस्‍यत्‍व घेणे अगदी मोफत आहे.

 

खालील दिलेल्‍या लिंकवरून पुस्‍तकाची मराठी आवृत्‍ती खरेदीकरू शकता.  

 मराठी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी                       इंग्रजी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी    

      

पुस्‍तक: अ‍ॅटिट्यूड-इज-एव्‍हरिथिंग

लेखक:   जेफ केलर

ऑनलाईन पुस्‍तकः        अमेझाॅन           फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. प्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्‍वागत, आणि वाचनासाठीच्‍या या संकेतस्‍थळावर भेट दिल्‍याबद्दल आपले खूप धन्‍यवाद. आयुष्‍यात बदल घडविण्‍यासाठी आपण स्‍वतःला समजून घेत आहात, स्‍वतःला जाणून घेण्‍याच्‍या प्रयत्‍नात वाचनाला निवडलात याबददल आपले अभिनंदन. आपण स्‍वयंमदत, स्‍वयंविकास करण्‍यासाठीच्‍या मार्गावर आहात यावरून दिसून येते.

      आपण जर अगदी मनापासून स्‍वतःची स्‍वच्‍छ प्रतिमा बनवण्‍याची इच्‍छा असेल, तर कृपया PDF पुस्‍तकांच्‍या ऐवजी प्रत्‍यक्ष पुस्‍तक वाचन करा. नक्‍कीच सकारात्‍मक फरक जाणवेल तुम्‍हाला. तरी तुम्‍हाला परवडणार नसेल तर महाजालावर इतरत्र शोध घ्‍या, अथवा या पुस्‍तकाचे सारांश लवकरच तुमच्‍यासाठी घेऊन येऊ.

      फ्री PDF शोधणारे पूर्ण पुस्तक प्रामाणिकपणे क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते. पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या. आणि सविस्‍तर वाचा, पुस्‍तकातील गोष्‍टी आयुष्‍यात आत्‍मसात करा, बदल बघा, यशस्‍वी व्‍हा.

      हटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive