Sapiens - A brief history of Mankind by Yuval Noah Harari-Part-1-मानव जातीचा संक्षिप्‍त इतिहासः सॅपियन्‍स- लेखक - युवाल नोह हरारी-भाग-१

आदिमानव ते आधुनिक मानवाची कथा

मानव जातिचा संक्षिप्‍त इतिहास
सॅपियन्‍स

युवाल नोह हरारी

पुस्‍तक सारांश

  भाग-१ 

 Book summary in Marathi of Sapiens - A brief history of Mankind by Yuval Noah Harari.
मानव जातीचा संक्षिप्‍त इतिहासः सॅपियन्‍स- लेखक -
युवाल नोह हरारी- पुस्‍तक सारांश

 

लाखो वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६-उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. 

 होमो सॅपियन्‍स.

आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली?

आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली?

देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल?

मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक...सेपिअन्स.

 



पुस्‍तक:
मानव जातिचा इतिहास-''द सॅपियन्‍स'

लेखक:   युवाल नोह हरारी 

अनुवादः  वासंती फडके

प्रकाशक :   डायमंड पब्लिकेशन
ऑनलाईन पुस्‍तकः        अमेझाॅन           फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक


भाग-१

 

असे म्‍हणतात की इतिहास आपल्‍याला आपल्‍या येणा-या भविष्‍याबद्दल बरिच माहिती सांगत असतो.   

मित्रांनाे शाळेमध्‍ये असताना आपण आदिमानवाचा इतिहास म्‍हणजेच आपल्‍याच इतिहासात डोकावलेलं आपल्‍याला आठवत असेल, इतिहासामध्‍ये विविध टप्‍प्‍यांद्वारे माहिती आपल्‍याला मिळालेली होती.  ती आपण उत्‍सुकतेने शिकली असेल.  परंतू जागे अभावी व वेळेअभावी बरेचशे प्रश्‍न असे असतात ज्‍यांना तीन-चार धडे किंवा पांनामध्‍ये समजावून सांगणे शक्‍य होत नाही आणि आपल्‍या जिज्ञासा व उत्‍सुकतेला तेथेच मुरड घालावी लागते आणि ते प्रश्‍न तसेच राहतात.  

शाळेतील त्‍या इतिहास विषयातील तीन-चार पाने किंवा ३-४ धडे वाचूनही तेही आपल्‍या वयाच्‍या ८-१२ वर्षात शिकलेली आज कितीजनांनी त्‍या उत्‍सुकतेपोटी आलेल्‍या प्रश्‍नांचा शोध घेतलेला असेल.  कदाचित खुप कमी लोकांनी, परंतू आजही तीच जिज्ञासा व उत्‍सुकता आपल्‍याला स्‍वतःच्‍या भूतकाळात डोकावून पाहायला लावते. 


"आदिमानव ते आधुनिक मानवाची कथा पुन्‍हा एकदा नविन पण अधिक खोलपणे समजावून सांगणारी ही पुस्‍तक. आपल्‍याला आपलाच म्‍हणजेच मानव जातीचा इतिहास सांगणारी, आपण आज जे आहोत, जसे आहोत, तसे का आहोत याबद्दल प्रत्‍येकाच्‍या मनामध्‍ये जाणण्‍याची जिज्ञासा व उत्‍सुकता असतेच त्‍या उत्‍सुकतेला व जिज्ञासेला पुर्ण करणारी ही पुस्‍तक आहे. "

 

आज आपण जे सारांश पाहणार आहोत त्‍या पुस्‍तकाचे लेखक आहेतः Yuval Noah Harari  आणि पुस्‍तकाचे नांव आहे Sapiens मानव जातिचा इतिहास ''द सॅपियन्‍स''- लेखक- युवाल नोह हरारी.

 पुस्‍तकात आपण जाणून घेणार आहोत कसं माकड/वानरापासून विकसित होऊन मानव (म्‍हणजेच आपण) बनून संपूर्ण ग्रहावर अधिराज्‍य गाजवत आहे.   आजपासून २.८ लाख वर्षापुर्वी पुर्व-आफ्रिकेमध्‍ये होमो सॅपियनची प्रजाती ऑस्‍ट्रालोपिथेकस (Australopithecus) म्‍हणजेच APES पासून विकसित झाले. होमो सॅपियन्‍स एकटे नव्‍हते.  मानवाच्‍या ब-याच प्रजाती पृथ्‍वीवर वेगवेगळ्या ठिकाणी विकसति झाल्‍या, जसे- होमो निअंडरथल जे युरोप खंडाच्‍या थंड प्रदेशात राहात होते.  होमो इरेक्‍टस प्रजाती जी आशिया खंडात उष्‍णकटिबंधीय प्रदेशात विकसित झाली.  आणि होमो सोलोनेसीस प्रजाती जी इंडोनेशिया आणि जावा या द्वीपसमुहात विकसित झाली. 

तसेच मानवाच्‍या विविध प्रजाती एकाच कालखंडामध्‍ये जगामध्‍ये विविध ठिकाणी विकसित झाल्‍या. 

 

परंतू आज पृथ्‍वीवर इतर प्रजातींपेक्षा फक्‍त होमो सॅपियन (आपण मानव) ही एकमात्र प्रजाती सर्वांमध्‍ये टिकून आहे आणि वर्चस्‍व गाजवत आहे. 

 

आपल्‍या वर्चस्‍वाची सुरुवात झाली ती म्‍हणजे अर्थातच Cognitive Evolution संज्ञानात्मक क्रांती/आकलन क्षेमतेच्‍या उत्‍कांतीने.  कॉग्‍नेटीव्‍ह इव्‍होलूशन म्‍हणजेच आपल्‍या मेंदूच्‍या विकासामुळे.  होमो सॅपियन जे पुर्व-आफ्रिकेमध्‍ये राहत होते, अन्‍न आणि निवा-याच्‍या शोधासाठी त्‍यांना निरंतर  शिकार व प्रवास करावा लागत होता.  

 

सुरुवातीच्‍या काळात होमो सॅपियन अन्‍न साखळीचा फक्‍त एक भाग होते.   ते आपल्‍यापेक्षा कमजोर/कमकुवत प्राण्‍यांची शिकार करत होते.  सिंह, वाघ आणि शार्क हे या अन्‍नसाखळीचे राजे होते. म्‍हणजेच अन्‍नसाखळीमध्‍ये उच्‍च स्‍थानावर होते.  

परंतू 🔥 Discovery of Fire-अग्‍नीचा शोध जेंव्‍हा लागला तेंव्‍हा ह्या अन्‍नसाखळीमध्‍ये बदल झाला.  अग्निच्‍या शोधापुर्वी  होमो सॅपियन्‍स शिकार करून त्‍याला कच्‍चेच खात होते.  कच्‍चे मांस खायला (चघळायला) आणि पचायला वेळ लागत होता. म्‍हणून त्‍यांच्‍या दातांची रचनाच तशी (मोठे व तीक्ष्‍ण) होती.  तसेच त्‍यांच्‍या पाचनक्रियेतील आतडे यांचा आकारही मोठा होता.  परंतू त्‍यांच्‍या मेंदूचा आकार छोटा होता.  

 अग्निच्‍या शोधानंतर सॅपियन्‍स अन्‍नाला शिजवून खाऊ लागले.  अन्‍नाला शिजवल्‍यामुळे खाण्‍यासाठी व पचण्‍यासाठी वेळही कमी लागत होता.  यामुळे अशी उत्‍क्रांती झाली की त्‍यांचे दात व आतडे यांचा आकारही छोटा होत गेला आणि त्‍यांच्‍या मेंदूचा आकार मोठा होत गेला.  त्यांच्या मेंदूच्या वापराने त्यांची विचार करण्याची क्षमता देखील सुधारू लागली.   

 

 

सांकेतिक भाषेचा उपयोग करून अधिक चांगले सहकार्य करणे तसेच त्यांची सामाजिक क्षमता वापरुन मजबूत-मोठे प्राणी मारण्यासाठी वापरली जाणारी साधने विकसित केली गेली, सुधारित मेंदूमुळे सहकार्य (cooperation) आणि सांकेतिक भाषेच्या (sign language ) मदतीने सॅपियन्सने  सहकार्याने आणि एकमेकांची मदत करुन मजबूत-मोठ्या प्राण्यांची हत्या/शिकार करण्यास सुरवात केली.  

जेव्हा होमो सेपियन्सचा पृथ्वीवरील इतर प्रजातींसह संपर्कात आला तेव्हा (Cognitive Revolution) संज्ञानात्मक क्रांतीने त्‍यांना (होमो सेपियन्सला) (Food Chain) खाद्य साखळीच्या वर आणून ठेवले.

 

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तेथे फक्त दोन संभाव्यता आहेत, प्रथम (Interbreeding theory ) आंतरजातीय प्रजनन सिद्धांत, होमो सेपियन्स इतर प्रजातींसह प्रजनन करतात आणि त्यांच्याशी संबंध बनवतात किंवा दुसरा (extinction theory) विलुप्त किंवा नामशेष सिद्धांत, सॅपियन्सनी किंवा त्‍यांच्‍या सारख्‍याच इतर प्राण्यांनी त्यांना ठार मारले असेल.   

सत्य जे काही असेल, पृथ्वीवर मानवांची फक्त एकमेव प्रजाती अस्तित्वात आहे, आणि ती म्‍हणजेच होमो सॅपियन्‍स. 

मनुष्यांची वाढती लोकसंख्येचा दाब आणि अन्नाचा शोध यामुळे आगीच्या सहाय्याने होमो सॅपियन्सने थंड प्रदेशात स्थलांतर करण्यास सुरवात केली. त्यांनी युरोप आणि रशियाच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरवात केली. 

"होमो सॅपियन्‍सच्‍या आगमनानंतर थंड प्रदेशात राहणारे मॅमथ हे महाकाय  जंगली हत्ती काही वर्षांनी नामशेष झाले."  

एवढ्या आवाढव्‍य, मोठ्या प्राण्यांचा विलुप्‍त होण्याचे कारण त्‍यांच्‍या जन्म आणि वाढण्यास लागणारा बराच अधिक काळ होय.

 

समजा, जर सॅपियन्सने आठवड्यातून एका प्राण्याला ठार मारत असतील तर काही वर्षातच हे प्राणी नामशेष होण्‍याचे एक अग्रक्रमी कारण असू शकेल. 

सॅपियन्‍सनी रशियाच्‍या सायबेरिया प्रदेशातून ते अमेरिकेच्‍या अलास्का या प्रदेशात स्थलांतरित करून पाहोचले. 

उन्हाळ्याच्या हंगामात ग्‍लेशियरर्स म्‍हणजेच हिमनद्यांच्‍या वितळल्‍यामुळे त्‍यांनी अलास्‍कामधून अमेरिकेच्‍या उत्‍तर मैदानी प्रदेशात स्‍थलांतर केलं. तेथून मग उत्‍तर अमेरिकेतून दक्षिण अमेरिकेत स्‍थलांतरीत झाले. 

जिथं कुठं सॅपियन्‍स स्‍थलांतर करित असत तेथील बरेचशे प्राणी नष्‍ट-नामशेष होण्‍यास प्रारंभ होत होता.  मोठमोठे पशू विलुप्‍त होत गेले.

(Cognitive Revolution) संज्ञानात्मक क्रांतीनंतर पुढील सर्वांत मोठा परिवर्तनात्‍मक बदल होमो सॅपियन्‍सच्‍या आयुष्यात आला तो म्‍हणजे 🌽🌾 कृषी क्रांती (Agricultural Revolution).

 


जवळजवळ एकाच वेळी जगातील वेगवेगळ्या भागात शेतीची सुरूवात झाली. हिवाळ्यानंतर गहू, तांदूळ आणि बाजरी उगवण्‍यात येऊ लागला तर मका
तुर्कीच्या जवळ आणि उत्तर अमेरिकेत सोयाबीनच्या पिकांची लागवड करण्‍यात येऊ लागली. दक्षिण आफ्रिकेतील बटाटे, तांदूळ आणि बाजरी चीनमध्ये अशा पिकांची लागवड करण्‍यात येऊ लागली. 

फक्त ह्याच प्रदेशात शेती का बरं सुरू झाली? कारण शेतीसाठी आवश्यक असणारी पाळीव प्राणी 🐏🐐🐑🐓शेळ्या, 🐗🐖डुकरं, गाईसारखे🐂 प्राणी जसे- गाई 🐄 व म्‍हशी 🐃तेथे उपलब्ध असायचे.

कृषीक्रांतीच्‍या 2000 वर्षानंतर होमो सॅपियन्सने सर्वत्र शेती करण्यास सुरवात केली आणि शिकार करणे बंद केले.   शेतीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप श्रम-मेहनत करावी लागते, बियांची पेरणी करावी लागते आणि पिकांना वेळेवर पाणी द्यावे लागत असे, त्‍यांची मशागत करावी लागते.  

पिकांची कापणी झाल्‍यानंतर त्‍यांना योग्‍यरितीने/व्यवस्थित साठवण्यास सुरवात झाली. इत्‍यादी कारणांमुळे सॅपियन्स एकाजागी स्थिर होऊ लागले.  आणि त्‍यांची लोकसंख्‍यादेखिल वाढू लागली होती. 

पुर्वी जेंव्‍हा सॅपियन्‍सना अन्‍नाच्‍या शोधामध्‍ये स्‍थलांतर करावे लागत होते, तेंव्‍हा छोट्या मुलांना वाढविणे सोपे नव्‍हते, खुप अवघड होते. 

 परंतू कृषीक्रांतीमुळे शेतीची सुरुवात झाल्‍यानंतर एकाजागी स्‍थीर असल्‍यामुळे महिलांना-स्‍त्रीयांना अधिक बाळं-मुलं वाढविण्‍यास सायीस्‍कर झाले.  

लोकसंख्‍या वाढू लागली आणि शेतीमुळे अधिक लोकसंख्‍येला खायला घालण्‍यासाठी अन्‍नसुद्धा उपलब्‍ध होऊ लागले होते. 

 

"कृषीक्रांतीमुळे होमो सॅपियन्‍सचे जीवन सुधारण्‍याऐवजी त्‍यांना खुप जास्‍त प्रमाणात असुरक्षित आणि परावलंबित बनवून टाकलं."

कृषिक्रांती अगोदर सॅपियन्‍स आपल्‍या शरिरासाठी लागणारे सर्व प्रकारचे (Vitamins) जीवनसत्‍व, (Nutrients) पोषणतत्‍वे (Meat, Fruits, Nuts) मांस, फळे, सुकीफळे, बियाणे जसे शेंगदाने यांना खाऊन यांपासून मिळवत होते.  परंतू कृषिक्रांतीनंतर सॅपियन्‍स फक्‍त काही पीकांवरच अवलंबून राहू लागले होते. ह्याच कारणामुळे त्‍यांना शरिरासाठी सर्वप्रकारची पोषकतत्‍वे मिळत नव्‍हते.  पुर्वी ते शिकार करण्‍यासाठी आठवड्यातून फक्‍त ३०-तासच काम करत होते. 

पण कृषिक्रांती नंतर ते आठवड्यात ६०-तास काम करू लागले.  अगोदर त्‍यांना हवामानाचा काही फरक पडत नव्‍हता.  परंतू कृषिक्रांती नंतर ते हवामानावर अवलंबित झाले.  आणि त्‍यासोबतच त्‍यांचा आहार कमजोर असल्‍यामुळे व इतर प्राण्‍यांच्‍या संपर्कात आल्‍यामुळे होमो सॅपियन्‍समध्‍ये आजार पसरू लागले होते. 

एवढ्या गैरसोयी व एवढे तोटे असूनही सॅपियन्‍स शेती सोडून परत शिकार व कळपांत जाऊ शकले नाही.  कारण, शिकारी ते शेतकरी पर्यंतचा प्रवास हा एवढा हळू-हळू होता की असं व्‍हायला खूप वर्षे लागली.  आणि सॅपियन्‍सना शेतीची सवय लागली होती.  आता सॅपियन्‍स पीकं उगविण्‍यासाठी नियोजन करू लागले आणि पीकं चांगली न आल्‍यास त्‍यांना निराशादेखिल येऊ लागली. 

लोकसंख्‍या वाढल्‍याने सॅपियन्‍सना उत्‍क्रांतीचे यश (Evolutionary Success) तर मिळाले परंतू वैयक्तिक पातळीवर त्‍यांना खूप त्रास सहन करावा लागला. (at Individual level they Suffer).

कृषिक्रांतीअगोदर सॅपियन्‍सचे गट छोटे असत आणि आपापसांत एकमेकांना सहकार्य करणे त्‍यांना सोपे जात होते.  परंतू कृषिक्रांतीनंतर लोकसंख्‍या खूप जास्‍त वाढली. मोठ्या लाेकसंख्‍येमध्‍ये आपापसांत सहकार्य करण्‍यासाठी त्‍यांनी 

  1. काल्‍पनिक सत्‍य किंवा काल्‍पनिक मिथक (Imagined Reality or Myths- कल्पित वास्‍तव किंवा दंतकथा) आविष्‍कृत/विकसित केल्‍या.  
  2.  म्‍हणजेच अशा गोष्‍टींवर विश्‍वास ठेवणे आणि मानणे, अशा गोष्टी पाळणे व त्यांचे अनुसरण करणे ज्‍या अस्तित्‍वातच नाहित, जसे- धर्मदेवता, मिथक, कायदे आणि पैसा, इत्यादी. 

धर्म आणि देव यांच्‍या ब-याच कथा आहेत. आणि त्‍यांच्‍यावर विश्वास ठेवणे हे सॅपियन्‍ससाठी नैसर्गिक आणि स्‍पष्‍ट होतं.  आणि यामुळे सॅपियन्‍सना आपापसांमध्‍ये सहकार्य करणे सोपे झाले. 

सॅपियन्‍स आता दुहेरी वास्‍तविकतेमध्‍ये (dual reality) जगू लागले होते.  

  • वस्‍तूनिष्‍ठ वास्‍तविकता (objective reality) जसे-निसर्ग,नद्या,झाडे किंवा पशू-पक्षी-प्राणी
  • कल्‍पित वास्‍तविकता (imagined reality) जसे- देवता, राष्‍ट्र आणि कायदे इत्‍यादी 

होमो सॅपियन्‍सनी कल्पित वास्‍तविकतेला अधिक महत्‍व द्यायला सुरुवात केली.  
वाढती लोकसंख्या आणि मानवांच्या स्‍थायीकतेला-वस्तीला अधिक महत्त्व दिल्याने समाजात अनेक बदल घडून आले.  

  • लोकं-माणसं एकमेकांशी मालमत्‍ता जसे भूमी-जमीनीसाठी लढायला लागली.   
  • अशा लढाया, भांडणे-तंटे सोडविण्‍यासाठी-मिटविण्‍यासाठी आणि रोखण्‍यसाठी सैन्‍य-लष्‍कर विकसित करण्‍यात आले आणि 
  • एखाद्याला त्‍या सैन्‍याचा प्रमुख म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आले जो पुढे जाऊन सेनापती किंवा राजा झाला.   
  • आणि  तेंव्‍हापासून सैन्‍य म्‍हणजेच  फक्‍त लढण्‍यासाठीच..   
  • मग हे सैन्य पोसण्यासाठी कर संग्रह (tax collection) करणे  सुरू झाले.  आणि  
  • लोकसंख्या इतकी मोठी असल्याने त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कायदे बनविण्यात आले.
  • कायदे वाढू लागले आणि प्रशासन गुंतागुंतीचे झाले ज्यामुळे समाजात पदानुक्रम विकसित झाला
 

जस-जसे समाज प्रगत होत गेला त्‍यांची मान्‍यता मिळालेली कल्‍पित वास्‍तविकता (imagined reality) अधिक क्लिष्‍ट-जटील होऊ लागली.   लहान संस्‍कृती महान संस्‍कृती बनल्‍या.. मोठ्या बनल्‍या.  ह्या मोठ्या-महान संस्‍कृत्‍यांना टिकवून ठेवण्‍यासाठी साम्राज्‍य  विकसित करण्‍यात आले.  साम्राज्‍य बनविण्‍यासाठी साम्राज्‍यासाठी माध्‍यमांची गजर भासली जी वेगवेगळ्या संस्‍कृतीचे अनुसरन करणा-या मानवाला एकत्र करेल असे माध्‍यम... अशी तीन माध्यमं अजूनही वेगवेगळ्या संस्कृतींच्या मानवांना एकत्रित करतात.

जगामध्‍ये असे तीन (३) माध्‍यम आहेत जेथे वेगवेगळ्या संस्‍कृतीचे अनुसरन करणारे मानव एकत्र येतात. 

ती ३-माध्‍यमे कोणती आहेत ज्‍यांद्वारे जगामध्‍ये मानवाला एकत्रित केले.  पाहूया मानव जातिचा इतिहास ''द सॅपियन्‍स' या पुस्‍तकाच्‍या दुस-या सारांश भागात. 

भाग-२ Part-2


 मराठी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी

 

पुस्‍तक: मानव जातिचा इतिहास-''द सॅपियन्‍स'

लेखक:   युवाल नोह हरारी 

अनुवादः  वासंती फडके

प्रकाशक :   डायमंड पब्लिकेशन
ऑनलाईन पुस्‍तकः        अमेझाॅन           फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक

 

 

 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive