सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे -रॉबर्ट ग्रीन | The 48 Laws of Power by Robert Greene | Book Summary in Marathi -Part-2

  उच्च स्थानी कसे जावे व तिथे कसे टिकावे - सत्ता व अधिकारप्राप्तीची चिरस्थायी, सुस्पष्ट 48 सुत्रे. 

आधुनिक जगात कार्य सिध्दीस नेण्यासाठी कसे फसवावे, लुच्चेपणा कसा वापावा, बनावट, कल्पिताची काय धरून संघर्ष कसा करावा याची उत्तम शिकवण देते अखेरीस एक मौलिक ग्रंथ, तुम्हाला सत्तेच्या रचनेमध्ये उच्चतर श्रेणीवर जाण्याच्या योजना आखताना उपयुक्त असणारा.....

                                            Book Summary in Marathi of

48 LAWS OF POWER

 सत्‍ता

अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे

 

लेखक- रॉबर्ट ग्रीन 

 मराठी भाषेत सारांश

 भाग-२

👉भाग-१ वाचण्‍यासाठी

मित्रांनो सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८-सूत्र-नियम ह्या पुस्‍तकाच्‍या सारांशातील २४-सूत्र-नियम आपण भाग-१ मध्‍ये पाहिलेली आहेत.  उर्वरित सूत्रे पुढील प्रमाणे आहेतः


सुत्र क्र.२५ - स्‍वतःची पुनर्निर्मिती करा (Re-create yourself)

समाज तुमच्‍यावर काही अपेक्षांना थोपविण्‍याचा प्रयत्‍न करेल परंतू तुम्‍हाला ते मान्‍य करण्‍याची गरज नाही.  तुमच्‍याजवळ स्‍वतःला घडविण्‍याचे सामर्थ्‍य आहे.  तुम्हाला जे व्‍हायचं आहे ते तुम्‍ही होऊ शकता.  कोणालाही असे बोलण्‍याचा हक्‍क देऊ नका की, तुम्‍ही कोण आहात आणि तुम्‍हाला कसे काम करायला पाहिजे. 
 
तुम्‍हाला असा व्‍यक्‍ती बनायला पाहिजे जो ध्‍यान देतो आणि ज्‍याचे चरित्र मजबुत आणि शक्‍तीशाली आहे.


सुत्र क्र.२६ - तुमचे हात निष्‍कलंक असू द्यात: (Keep your hands clean)

तुम्‍हाला एखादे चांगले सन्‍मानीय आणि उत्‍तम वर्तणुक असणा-या नागरिकासारखे  दिसायला पाहिजे.  त्‍यांना कधीही याची जाणीव होऊ देऊ नये की तुम्‍ही तुमचे हात भ्रष्‍टाचार आणि चतुराई करुन आपले हात खराब केलेले आहेत.  तुमचा देखावा तुमच्‍या सत्‍तेसाठी आवश्‍यक आहे आणि तुम्‍हाला आपल्‍या नावाला आणि इज्‍जतीला पकडून ठेवायला पाहिजे. 
 
लेखकांनी सल्‍ला दिला आहे की, दुस-यांना त्‍यांच्‍या वाईट कृत्‍यांचा दोष घेऊ द्या आणि सार्वजनिकरित्‍या/सर्वांसमक्ष आपले हात कधीही खराब करू नये. 
 
 
सुत्र क्र.२७- विश्‍वास ठेवण्‍याच्‍या लोकांच्‍या गरजेवर खेळी खेळा, व्‍यक्‍तीपूजक अनुयायांचा संप्रदाय निर्माण कराः (Play on people's need to believe to create a cult-like following)

प्रत्‍येकजण स्‍वतःला कोणाशी तरी जुळलेले राहावे असे त्‍यांना वाटत असते.   आणि सर्वजण असे मानतात की ते ज्‍या गोष्‍टींशी जुळलेले आहेत ती गोष्‍ट त्‍यांच्‍यापेक्षाही मोठी आहे.   लोकं नेहमी एखाद्या वस्‍तू किंवा माणसाचा शोध घेत असतात जेणेकरुन त्‍यांच्‍या गरजा किंवा ईच्‍छांचा फायदा उचलू शकतील. 
 
अशा लोकांना मिळविण्‍यासाठी त्‍यांना खूपसा-या अपेक्षांची वचने द्या.   उत्‍सुक बना आणि लोकांना अनुसरण करण्‍यासाठी नवनवीन गोष्‍टी देत जा.   लोकांना चालव‍िण्‍यासाठी बलिदान देण्‍यासाठी त्‍यांना तयार करा.   

अशाप्रकारे तुम्‍ही विश्‍वास आणि तुम्‍हाला प्रेम करणारे भक्‍त बनवू शकता. 


सुत्र क्र.२८- कृतीच्‍या रिंगनात बेधडक उतराः (Enter actions with boldness

ह्या नियमामध्‍ये नेहमी आपल्‍या हेतू/उद्देश आणि आत्‍मविश्‍वास यांच्‍यासोबत राहण्‍याच्‍या आवश्‍यकतेवर भर दिलेला आहे.  जर तुम्‍ही निश्चित नाही तर काहीही सुरू करू नका.  कोणतीही शंका तुम्‍हाला निष्‍कर्ष मिळवून देणार नाही.  
 
साहस तुम्‍हाला खूप शक्‍ती देईल.    
 
 
सुत्र क्र.२९- अंतिम परिण‍तीच्‍या क्षणापर्यंत नियोजन कराः   (Plan all the way to the end)
 
कोणत्‍याही कार्याला सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत नियोजन करा.  हे आवश्‍यक आहे की तुम्‍ही शेवटच्‍या उद्देशाचा पहिल्‍यापासूनच अनुमान लावा, जेणेकरून पुढे येणा-या समस्‍यांना समजण्‍यास/ओळखण्‍यास मदत होईल.  नियोजनामुळे तुम्‍ही उत्‍कृष्‍ट कार्य करण्‍यासाठी नेहमी तयार राहाल. 

कोणत्‍याही गोष्‍टीत विना तयारीचे जाऊ नका. नेहमी शेवटच्‍या लक्ष्‍याचा विचार करा आणि काही पाऊल पुढे चाला. 



सुत्र क्र.३०- तुमचे संपादित सामर्थ्‍य हे विनासायास आहे, असे वाटू द्याः
(Make your accomplishments seem effortless)
 
भलेही तुम्‍ही एखाद्या कार्याला करण्‍यासाठी कितीही वेळ, शक्‍ती आणि श्रम लावलेले असेल तुम्‍ही इच्‍छा कराल की तुमचे ते निष्‍कर्ष असे दिसायला पाहिजे की जसे ते नैसर्गिकरित्‍या आणि सहजतेणे पूर्ण झालेले आहे.   असे दाखविणे की कमी श्रम करूनही तुम्‍ही कितीतरी अधिक मिळवू शकता तुमच्‍या शक्‍तीला वाढवत असते. 

आणि जेंव्‍हा तुम्‍हाला असं विचारले जाईल तेंव्‍हा सांगू नका की तुम्‍ही तिथंपर्यंत कसे पाहोचलात किंवा तुमची काम करण्‍याची पद्धत काय इत्‍यादी स्‍पष्‍टपणे काहीही सांगू नये. आणि लोकांना तुमच्‍या यशाने/निष्‍कर्षाने अचंबित होऊ द्या.  
 
आपली माहिती उघड करू नये, रहस्‍ये उजागर होऊ देऊ नये. 


सुत्र क्र.३१- पर्यायांवर तुमचे नियंत्रण राहू द्या, तुमच्‍या कामाचे पत्‍ते इतरांनी पीसू द्याः
(Control the options: Get others to play with the cards you deal)

लोकांसोबत बोलत असताना तुम्‍हाला असे वाटू द्यायचे आहे की, त्‍यांना असं वाटायला हवं की त्‍यांच्‍याजवळ आनखिनही पर्याय आहेत, त्‍यांना असं वाटू द्या की नियंत्रण त्‍यांच्‍या हातात आहे खरं तर नियमं तुम्‍ही बनवत आहात.  जर तुम्‍ही एखादे पर्याय दोन निष्‍कर्षांसहित देऊ शकता तरीही फायदा तुम्‍हालाच होईल, कारण तुमच्‍या शत्रूला असे वाटेल की त्‍याने निर्णय घेतलेला आहे आणि हेच तुमच्‍या शासन करण्‍याचे कारण ठरेल. 
 
असं समजा की तुम्‍ही त्‍यांना दोन वाईट गोष्‍टींमधून कमी वाईट असलेल्‍या गोष्‍टीला निवडण्‍याची संधी दिली. 
#500 marathi books pdf free download marathi #pdf books free download marathi books pdf #google drive# best marathi books pdf free download #the entrepreneur marathi book pdf #free download #best #motivational #books in #marathi pdf free download marathi novel pdf #free download #mahanayak #marathi book pdf download  
 

 
 सुत्र क्र.३२- लोकांच्‍या कल्‍पनांसोबत खेळाः (Play to people's fantasies)
 
सत्‍य नेहमीच वाईट, निराशाजनक आणि अत्‍याधिक आकर्षक नसतो. यासाठी कित्‍येक बाबींमध्‍ये सत्‍यापासून बचाव करणे हाच एक चांगला पर्याय असतो.  लोकांना सत्‍य सांगणे त्‍यांना नेहमी संताप आणि त्रास देणारा ठरत असतो.  यापेक्षा बरं होईल की एखादे खोटे सत्‍य  (A False-Truth) उपस्थित करायला पाहिजे. खोटे-सत्‍य, जे की अधिक चांगले आहे खरं सांगण्‍यापेक्षा. 

अशावेळी तुम्‍हाला लोकांच्‍या कल्‍पनांसोबत खेळायला आले पाहिजे.  विचार करा की त्‍यांना काय ऐकायला आवडते, त्‍यांना स्‍वतःविषयी काय ऐकायची ईच्‍छा आहे आणि त्‍यांना तेच ऐकवा. 

 
सुत्र क्र.३३-  प्रत्‍येक व्‍यक्‍तीची एक कमजोरी शोधाः (Discover each man's thumbscrew)
 
जगामध्‍ये प्रत्‍येक व्‍यक्‍तीची एखादी कमजोरी असतेच.  कोणतीही कमजोरी नसने अशक्‍य आहे. 

हे माहित करणे की त्‍याची कमजोरी काय आहे, एका शत्रूला समाप्‍त करण्‍याची किल्‍ली आहे.  कमजोरी कोठेही शोधली जाऊ शकते. एकदा का तुम्‍ही कोणाची कमजोरी शोधली, तर त्‍याला आपल्‍या फायद्यासाठी उपयोग करा. 


सूत्र क्र.३४- आपल्‍या स्‍वतःची ओळख, चाल एका राजपरिवारातील व्‍यक्‍तीसारखी बनवाः  
 
राजासारखे वागा म्‍हणजे राजासारखे वागवले जाईल  (Be Royal in your own fashion: Act like a king to be treated  like one)
 
आपल्‍या सर्वांनीच ही म्‍हण ऐकली असेल की,  दुस-यांसोबत तसेच वागा किंवा वर्तन करा जसे तुम्‍ही त्‍यांच्‍याकडून अपेक्षा ठेवली असेल. Treat others how you want to be treated before". 
 
रॉबर्ट ग्रीन ह्या म्‍हणीच्‍या पुढे आपल्‍याला घेऊन जातात आणि म्‍हणतात की, तुम्‍हाला अशापद्धतीने कार्य/कृती केली पाहिजे जशी तुम्‍हाला इतरांकडून करून घेण्‍याची ईच्‍छा आहे.  जर तुम्‍ही शक्‍ती-स्‍फुर्तीने कार्य/कृती आणि आत्‍मविश्‍वासाने करत असाल तर लोकंसुद्धा तुमचा सन्‍मान असं करतील जसे तुम्‍ही एखादे राजे आहात. 
 
जर तुम्‍ही चिंतित असाल आणि गुमान-थंड साध्‍या पद्धतीने कार्य-कृती करत असाल तर, लोकं तुमची जास्‍त इज्‍जत-सन्‍मान करणार नाहीत. 
 
आपल्‍या कार्य/कृतींबद्दल सन्‍मान मिळवा. (Demand respect & portray this through your actions
 
 
#the power book in marathi pdf #free download shakti book in hindi #pdf free download #shakti ke 48 niyam book in hindi pdf free download #शक्ति के 48 नियम pdf free download #robert greene books #48 laws of power audiobook zip free download #the 50th law hindi pdf #the 44 laws of peace pdf

सुत्र क्र.३५- वेळ साधण्‍यात नैपुण्‍य मिळवा/वेळेचे नियोजन करण्‍यात पटाईत व्‍हाः
(Master the art of timing) 
 
स्‍वतःला एका आजारी व्‍यक्‍तीसारखे दर्शवा, आणि कधीही घाई-गडबडीत राहू नये.   घाई-गडबडीमध्‍ये राहणे असं दर्शविते की तुम्‍ही नियंत्रण हरवलेलं आहे आणि तुम्‍ही स्‍वतःला आणि वेळेला नियोजित करू शकत नाही.  योग्‍य वेळेचे गप्‍तहेर व्‍हा, योग्‍य वेळेला हेरायला शिका ज्‍यामुळे तुम्‍हाला शक्‍ती मिळेल. 
 
जोपर्यंत योग्‍य वेळ येत नाही तोपर्यंत गप्‍प राहायला शिका.  आणि जसही योग्‍य वेळ येईल जोराचा आघात/वार करा. 
 
 
सुत्र क्र.३६-  तुम्‍ही प्राप्‍त करू शकत नाही त्‍या गोष्‍टींची तुच्‍छता बाळगा, दुर्लक्ष हीच बदल्‍याची उत्‍तम रीत आहेः (Disdain things you cannot have: ignoring is the best revenge)
 
समोर येणा-या कोणत्‍याही समस्‍येला नजरअंदाज करा, दुर्लक्षीत करा.  असे केल्‍याने समस्‍येकडे तुमचे लक्ष कमी लागेल आणि हळूहळू ती समस्‍या नाहीशी होईल, समाप्‍त होईल.   आणि जर तुम्‍ही समोर येणा-या समस्‍येकडे लक्ष द्याल तर ती अजून मोठे रूप धारण करेल. 

अशाच पद्धतीने आपल्‍या शत्रूंसोबतही विचार करा.  त्‍यांच्‍यावर लक्ष केंद्रित करून त्‍यांची शक्‍ती वाढू देण्‍यापेक्षा चांगले होईल की तुम्‍ही त्‍यांना दुर्लक्षित करा.  असे केल्‍याने तुमच्‍या शत्रूंना तुमचा त्‍यांना नजरअंदाज करण्‍याचा स्‍वभाव खलेल, ते तडफडतील. अशा पद्धतीने त्‍याच गोष्‍टींसोबत करा जे तुम्‍हाला मिळविण्‍याची ईच्‍छा आहे परंतू, मिळवू शकत नाही. 
 
कधीही लोकांना हे कळू देऊ नका की, तुम्‍ही असे काहीतरी मिळवू ईच्छिता जे तुमच्‍याजवळ नाहीए.  त्‍यामध्‍ये कोणतेही रूची दाखवू नका.  आणि अशाप्रकार तुम्‍हीसुद्धा एका शक्‍तीशाली आणि मोठ्या व्‍यक्तिला बघू शकाल. 
 
 
सुत्र क्र.३७- नजरेला कैद करणारा भव्‍य देखावा निर्माण कराः (Create compelling spectacles) 
 
जसं की आपण मागील नियमांमध्‍ये बघितलेलं आहे, तुम्‍ही कसं बघता यावरच सर्वकाही आहे.  (your appearance is everything).  तुम्‍हाला स्‍वतःच्‍या रूपाला आणि तुमच्‍या जवळपासच्‍या/सभोवतालच्‍या वातावरणाला सुंदर कल्‍पनांनी आणि मोठ्या बातांनी/गोष्‍टींनी आणि मोठ्या हावभावांनी उत्‍कृष्‍ट बनविले पाहिजे. 

लोकांना मोठ-मोठे दृश्‍य दाखवून  आकर्षित करा.   हा डोळे दिपवून टाकणारा दृश्‍यरूपी ''चष्‍मा'' तुमच्‍या ख-या हेतूं/उद्देशांपासून इतरांचे लक्ष विचलीत करण्‍याच्‍या कामी येईल. 
 

सूत्र क्र. ३८- रुचेल तसा विचार करा, पण आचरण मात्र इतरांसारखेच कराः
(Think as you like but behave like others)

 
जर तुम्‍ही वेळेच्‍या विरुद्धा जाऊन देखावा करााल,आपल्‍या जुन्‍या विचारांना आणि पद्धतींना दाखवाल तर लोकं विचार करतील की तुम्‍ही हे सर्व फक्‍त ध्‍यान आकर्षित करण्‍यासाठी करत आहात.  लोकांचा लक्ष तुमच्‍याकडे वेधण्‍यासाठी आणि तुम्‍ही त्‍यांचा अपमान करण्‍यासाठी असे करत आहात असे त्‍यांना वाटेल.   

गर्दीमध्‍ये मिळून-मिसळून जाणे सोपे आहे. जेंव्‍हा तुम्‍ही लोकांच्‍या गराड्यात असाल तेंव्‍हा त्‍यांच्‍या आचार-विचारांना समजून घ्‍या.  
 
जोपर्यंत तुमचे खास मित्र आणि सोबती तुमच्‍या बोलण्‍याला समजून घेत नाही तोपर्यंत आपले सत्‍य समोर ठेवू नये. 


सूत्र क्र.३९- मासे पकडण्‍यासाठी पाणी ढवळून काढाः (Stir up waters to catch fish) 

नेहमी शांत बनून राहण्‍याचा प्रयत्‍न करा.  
 
लेखक सांगतात की राग, द्वेष यांसारख्‍या भावनांना दाखविल्‍याने कधीही मनासारखे निष्‍कर्ष किंवा यश मिळत नाही.  जर तुमचा शत्रू राग करत असेल तरीही तुम्‍ही शांत राहून पुढे चालत राहाल तर तुमच्‍याजवळ सर्व सत्‍ता राहील आणि सर्व फायदा तुम्‍हाल मिळेल. 

 
सूत्र क्र.४०-  मोफतच्‍या जेवणाचा तिरस्‍कार कराः (Despise the free lunch)
 
कोणतीही ठेवण्‍यालायक वस्‍तूची किंमत चुकवावीच लागते.  आणि जी वस्‍तू मोफत आहे ती ठेवण्‍यासारखी नाही. मोफत किंवा फुकटात मिळणा-या कोणत्‍याही गोष्‍टीमध्‍ये लपव‍िलेले काम किंवा भटकविणारी चाल लपवून ठेवलेली असते.
 
जर तुम्‍ही ह्या गोष्‍टीला लक्षात ठेवलात की, तुम्‍ही प्रत्‍येक वस्‍तू किंवा गोष्‍टीची किंमत चुकवत असता, तेंव्‍हा तुम्‍ही आत्‍मविश्‍वासी बनता आणि सोबतच तुम्‍ही कोणत्‍याही धोक्‍यापासून स्‍वतःचा बचाव करता.  मोफतमध्‍ये मिळणा-या कोणत्‍याही वस्‍तू-गोष्‍टीची पूर्ण किंमत तुम्‍हाला चूकवायला पाहिजे. 
 
विना-मोलभाव करता आपल्‍या संपत्‍तीने उदार आणि आत्‍मविश्‍वासी बनने तुम्‍हाला अधिक शक्‍तीशाली दर्शविते.  


सूत्र क्र.४१-  महान व्‍यक्‍तीची भूमिूका गिरविणे टाळाः (Avoid stepping into a great man's shoes)
 
लेखक स्‍वीकार करतात की, अतिश्रीमंत आई-वडिलांचे होणे अवघड गोष्‍ट असू शकते आणि असा व्‍यक्‍ती बनने जो महान आणि प्रभावशाली आहे आवश्‍यक आहे की तुम्‍हाला त्‍यांच्‍या यशाने घाबरायला नाही पाहिजे आणि त्‍यांच्‍या 
सावलीतच अडकून पडू नये. 
 
तुम्‍ही स्‍वतःच्‍या यशासाठी आणि नाव कमविण्‍याचे हक्‍कदार आहात.  त्‍यांना मागे टाकण्‍यासाठी तुम्‍हाला त्‍यांच्‍यापेक्षा अधिक सफल/यशस्‍वी व्‍हावे लागेल.  तुम्‍ही असे करण्‍याच्‍या लायकीचे आहात आणि असे केल्‍याने तुमची शक्‍ती/सत्‍ता (१०) दहा पट वाढेल.
 
 
सूत्र क्र. ४२-  मेंढ्या विखुरण्‍यासाठी मेंढपाळाला दणका हाणाः
(Strike the shepherd & the sheep will scatter)
 
सत्‍ताधारी आणि शक्‍तीशाली व्‍यक्‍ती अभिमानी असेल आणि सर्वसाधारणपणे समस्‍यांना सामोरे जाईल.   असे व्‍यक्‍ती ब-याचशा चिंतेचे स्‍त्रोत असतात.  अशा लोकांना स्‍वतः तुम्‍हाला प्रभावित करण्‍याची संधी देणे हानीकारक आहे.  आणि त्‍यामुळे तुम्‍हाला अनेक समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो. 

खरं तर अशा लोकांशी तुम्‍ही बोलचाल करत नसता, अशा लोकाना स्‍वतःपासून दूर करायची गरज आहे.  इतरांनाही त्‍यांच्‍याजवळ जाऊ देवू नये. 


सूत्र क्र.४३- इतरांच्‍या हृदयाचा ठाव घ्‍या, त्‍यांच्‍या मनावर प्रभुत्‍व मिळवाः
(Work on the hearts & minds of others) 

बळजबरी किंवा जबरदस्‍ती (coercion) आणि प्रलोभन (Seduction) यामध्‍ये एक मुलभूत फरक आहे,  बळजबरी किंवा जबरदस्‍ती तुमच्‍या मनाविरूद्ध कार्य करते तर प्रलोभन लोकांना जाणिव न होऊ देता, न सांगता त्‍यांची दिशाभूल करतो.  त्‍यांना प्रोत्‍साहित करतो. 
 
जर तुम्‍ही कोणाला यशस्‍वीपूर्वक प्रलोभन देऊ शकलात तर ते तुमच्‍यासाठी एकनिष्‍ठ राहतील.  प्रलोभन देण्‍याचा सर्वात परिणामकारक पद्धत आहे की, हे माहित करणे की त्‍यांची कमजोरी काय आहे, त्‍यांच्‍यात कमकुवतपणा कोठे आहे.  लक्षात राहू द्या की, प्रत्‍येकजण वेगळा-एकमेव आहे, आणि तुम्‍ही एकाच पद्धतीने दोन्‍ही व्‍यक्‍तींना प्रलोभन देऊ शकत नाही. लक्षात ठेवा की त्‍यांच्‍यासाठी काय आवश्‍यक आहे आणि ते कशाने घाबरतात. 

प्रलोभन ही एक किल्‍ली आहे तर बळजबरी फक्‍त शत्रू बनवित असते. 


सूत्र क्र. ४४- ''प्रतिबिंब-प्रभावाचा'' परिणाम साधा, शत्रूला क्रोध आणून निःशस्‍त्र कराः
(Disarm and infuriate with the mirror effect)
 

मिरर इफेक्‍ट म्‍हणजेच प्रतिबिंब-प्रभावाचा एका अवजारासारखे वापर करा.  

आरसा दाखविणे म्‍हणजे तुमच्‍या शत्रूंना त्‍यांचीच खरी प्रतिमा दाखविणे, त्‍यांचाच खरा रूप त्‍यांना दाखविणे.   जर तुम्‍ही तसेच कृती करता जसे तुमचे शत्रू करत असतात तर ते गोंधळतील आणि तुमच्‍या हेतूंना समजू शकनार नाहीत.  

दुसरीकडे, प्रतिबिंब-प्रभाव हे एक असे अवजार आहे जे तुमच्‍या शत्रूंची थट्टा करणे आणि अपमान करण्‍यासाठी मदत करू शकतो.  अशारितीने ते स्‍वतःला आणि आपल्‍या कृतीला/कार्याला पाहू शकतात ज्‍यांच्‍यावर ते अधिकतरवेळा लक्ष देत नाहीत.  ही एक प्रलोभन देण्‍याची पद्धतसुद्धा आहे.  

तुम्‍ही त्‍यांना पटवून सांगू शकता की, तुम्‍ही त्‍यांच्‍यासारखेच आहात, आणि असे केल्‍याने ते तुमच्‍यावर सहजतेने प्रभावित होतील.

 

सूत्र क्र.४५-  बदलाच्‍या आवश्‍यकतेचा उपदेश करा, पण एकाएकी खूप सुधारणा आणू नकाः
(Preach the need for change, but never reform too much at once) 

कोणत्‍याही विकास आणि सुधारणेसाठी किंवा उत्‍कृष्‍टतेसाठी बदल अतिशय गरजेचे आहे.  त्‍यासोबतच हेदेखिल लक्षात ठेवणे गरजेचे आहे की एक मानव असण्‍याच्‍या नात्‍याने आपण आपल्‍या सवयी आणि दिनचर्येच्‍या बळावर यशस्‍वी होत असतो. 

खूप जास्‍त प्रमाणात बदल लोकांना चिंतीत करू शकते. 

जर तुम्‍ही आता एखाद्या नव्‍या अवतारात पाऊल ठेवले असेल तर अतिजलद होणा-या बदलांपासून बचाव करा.  पुर्वी झालेल्‍या बदलांचा आदर करा आणि नविन बदलांना हळू-हळू आत्‍मसात करा. असे केल्‍याने लोकं तुम्‍हाला अधिक सन्‍मान देतील.

 

सूत्र क्र. ४६- कधीही अतिप्रवीण व पारंगत दिसू नकाः ( Never appear too perfect) 

अधितर लोकं असं विचार करतात की ते पारंगत होण्‍यासाठी कार्य करत आहेत आणि खरंतर ते तिथपर्यंत कधीही पाहेाचतच नाहीत.  ग्रीन असे म्‍हणतात की, जर तुम्‍ही खुपच कमकुवत दिसून येत असाल किंवा अति-चांगले दिसून येत असाल तर तुम्‍ही स्‍वतःला धोक्‍यामते टाकत आहात. 

मत्‍सर किंवा हेवा ही एक सर्वसाधारण गोष्‍ट आहे आणि लोकांकडून अतिषय धोकादायकपणे कार्य-कृती करू घालते.  जर तुम्‍ही परिपुर्ण दिसाल तर तुम्‍हाला लोकांच्‍या मत्‍सराचा सामना करावा लागेल.  लोकं तुमच्‍या परिपूर्णतेला पाहून जळफळाट करू शकतात.   आणि जर तुम्‍ही आपल्‍या कमकुवतपणा लोकांना दाखवता तेंव्‍हा लोकं तुमच्‍याजवळ सहजतेने वावरतात आणि तुमच्‍यावर विश्‍वास करतात. 

परिपूर्णता ही एक अशी गोष्‍ट आहे जी फक्‍त परमेश्‍वराचे आणि मृत व्‍यक्‍तींचे गुणधर्म असतात.

 

 

सूत्र क्र.४७- हेतूच्‍या नक्‍की केलेल्‍या निशाणापलीकडे जाऊ नका, विजयाच्‍या क्षणी कुठे थांबायचे ते शिकाः
(Do not go past the mark you aimed for, in victory, learn when to stop) 

हा नियम नेहमी एखाद्याला समस्‍यांतून उभारणारा असू शकतो.  प्रत्‍येकजन यश आणि काही जिंकण्‍याच्‍या जाणीवतेने प्रेम करत असतो.  अशा वेळी नेहमी एक पाऊल पुढे राहणे खूप आवश्‍यक आहे.  लेखकांनी अगोदरच उल्‍लेख केलेले आहे की, पूर्ण योजना आणि शेवटच्‍या उद्देशाला जाणणे अतिशय गरजेचे आहे.  जेंव्‍हा तुम्‍ही तया उद्देशापर्यंत किंवा लक्ष्‍यापर्यंत पाहेाचाल तेंव्‍हा थांबून जा. 

कोणत्‍याही गोष्‍टीला अधिक दूर घेऊन जाण्‍याने तुमचे शत्रू वाढू शकतात. जे तुमच्‍या यशाला थांबवू शकतात.   धोरणे आणि नियोजनाला दुसरा कोणताही पर्याय नाही. 

एक लक्ष निर्धारित करा आणि जेंव्‍हा तेथे पाहोचाल तेंव्‍हा तिथे थांबून जा. 


सूत्र क्र. ४८- निराकरत्‍वाचा बहाणा कराः (Assume formlessness) 

 ह्यामध्‍ये रॉबर्ट ग्रीननी आपल्‍याला लक्षात ठेवायला सांगितले आहे की, काहीही नेहमीसाठी एकसारखे नसते आणि सर्वकाही बदलू शकते.  ह्याच कारणामुळे तुम्‍ही तुमच्‍या नियोजनाला दाखवू शकत नाही.  आपले नियोजन उघड केल्‍याने तुम्‍ही कमकुवत होता आणि तुमच्‍या शत्रूंना हे समजेल की तुमच्‍यावर कसा हल्‍ला करावा. 

ग्रीन सांगतात की तुम्‍हाला अनुकूल बनून राहायला पाहिजे जो कोणत्‍याही निष्‍कर्षावर प्रतिक्रिया देऊ शकेल.  ते पुढे म्‍हणतात की तुम्‍ही स्थिरतेवर निर्धारित राहू शकत नाही कारण काहीही स्थिर नाही.

तुम्‍ही जास्‍त आरामदायक बनाल आणि तुम्‍ही अधिक आरामदायक बनल्‍यामुळे तुम्‍ही स्‍वतःला कमकुवत करत असता.

 तर लक्षात ठेवा वाचकांनो तुमचे नांव आणि अब्रु हाच तुमचा सन्‍मान आहे.  त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त आपल्‍या नावाला आणि इज्‍जतीला जपण्‍याचा प्रयत्‍न करा.  

 📘📗📙📖📕🔖📑

 

धैर्यपूर्वक सत्‍ता- अधिकार प्राप्‍तीचे ४८-सूत्रे ह्या पुस्‍तकोच सारांश वाचन केल्‍याबद्दल मनःपुर्वक धन्‍यवाद.

या पुस्‍तकाचा सारांश आपल्‍याला कसा वाटला आम्‍हाला आवश्‍य कळवा.  तसेच तुमचे काही प्रश्‍न, तक्रारी किंवा सल्‍ला असेल तर खाली टिप्‍पणीद्वारे किंवा ई-मेलद्वारे आम्‍हाला निःसंकोच कळवा.  

आपल्‍या समस्‍या, प्रश्‍न किंवा तक्रारींच्‍या उत्‍तरांसाठी व समाधानासाठी तसेच जिवनमान उंचावण्‍यासाठी पुस्‍तकांसारखा गरु नाही म्‍हणून पुढील अशाच पुस्‍तकांचे सारांश किंवा समिक्षा वाचण्‍यासाठी आमच्‍या संकेतस्‍थळाचे निःशुल्‍क सदस्‍यत्‍व घ्‍या.  

सदस्‍यत्‍व घेणे अगदी मोफत आहे.

  📘📗📘📙📖📕🔖📑

भाग-१ वाचण्‍यासाठी


खालील दिलेल्‍या लिंकवरून पुस्‍तकाची भाषेनुसार आवृत्‍ती खरेदी करू शकता.  

मराठी                           हिंदी                     इंग्रजी 

 


 

पुस्‍तक: सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे

लेखक:  रॉबर्ट ग्रीन

 
ऑनलाईन पुस्‍तकः       अमेझाॅन    फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक
 

 मराठी भाषेत ह्या पुस्‍तकाची मराठी-आवृत्‍ती सध्‍यातरी ऑनलाईन उपलब्‍ध नाही.  उपलब्‍ध झाल्‍यास अपडेट करण्‍यात येईल.  कृपया याची वाचकांनी नोंद घ्‍यावी. 

📘📗📘📙📖📕🔖📑


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive