WHO MOVED MY CHEESE? (Marathi) माझं चीज़ कोणी हलवलं? स्‍पेन्‍सर जॉनसन -पुस्‍तक परिचय मराठी

माझं चीज़ कोणी हलवलं?

स्‍पेन्‍सर जॉनसन

 

माझं लोणी कोणी चोरलं?

पुस्‍तक परिचय मराठी

 

www.evachnalay.in

 

नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात ? खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे ? याचा सोपा नकाशा म्हणजे ” हू मूव्हड माय चीज ?

Marathi translation  of world best seller book
Who Moved My Cheese (Marathi Edition)

Who Moved My Cheese Book In Marathi

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

आपल्‍याला बदल आणि परिवर्तनाची एवढी भीती का वाटत असते? आपण परिवर्तनाला एवढे का घारतो?

आपण हे का समजून घेत नाही की सगळेकाही बदलत आहे, आयुष्‍य कोणासाठीही थांबत नसतं. ‘’हू मूव्‍हड माय चीज़’’ ही पुस्‍तक वाचली आहे का तुम्‍ही?

या पुस्‍तकामध्‍ये चार लोकांची कथा आहे. 

चौघांपैकी काही काळासोबत स्‍वतःला बदलून घेतात आणि चीज़ म्‍हणजेच लोणी संपल्‍यावर घर सोडून लोणी शोधण्‍यासाठी पुढे निघून जातात, मार्गक्रमण करीत राहतात, तर काही जण स्‍वतःला बदलत नाहीत आणि तिथेच बसून राहतात,

आणि ओरडत राहतातः हू मूव्‍हड माय चीज़..? हू मूव्‍हड माय चीज़...? माझं लोणी कोणी चोरलं..? माझं लोणी कोणी चोरलं...?

जी लोकं पुढे निघून गेली होती त्‍यांना मेहनत-श्रम केल्‍याने अपेक्षेपेक्षा अधिक मोठे चीज़चे म्‍हणजेच लोण्‍याचे मोठे अंबार, कोठार मिळतात, ते पुर्वीपेक्षा जास्‍त श्रीमंत होतात आणि जे मागे राहिले होते अशा लोकांचे हाल खूपच वाईट होतात, त्‍यांच्‍याकडे खायचेही वांधे असतात. 

तुम्‍ही या चौघांपैकी काय आहात?

  • काय तुम्‍ही पुढे निघणा-यांपैकी आहात?
  • पुढाकार घेऊन बदल आणि परिवर्तनाला स्विकार करत असता? किंवा
  • तिथेच बसून ओरडणा-यांपैकी एक आहात की, ‘’हू मूव्‍हड माय चीज़...’’ ‘’हू मूव्‍हड माय चीज़...’’माझं लोणी कोणी चोरलं..., माझं लोणी कोणी चोरलं...

वाचक मित्रांनो हिंदी मध्‍ये एक म्‍हण आहे, ‘’समझदार को इशाराही काफी है’’, त्‍याचप्रमाणे तुम्‍हाला ह्या छोट्याशा गोष्‍टीने काय शिकायला मिळाले? अवश्‍य कळवा. 

📕📙📘📗

 

आत्‍मनिरीक्षण व आत्‍मपरिक्षण करायला, विचार करायला लावणारी गोष्‍ट आहे.  आपण आपल्‍या परिस्थितीला, शिक्षण व्‍यवस्‍थेला, पालकांना, समाज व्‍यवस्‍थेला दोष देत असतो, परिस्थितीचे भांडवल करून आपले रडगा-हाणे इतरांसमोर मांडत असतो.  कारणं देत असतो की,

  1. माझे पालक नेहमीच भांडत असतात,
  2. मला चांगले शिक्षण मिळाले नाही,
  3. माझ्या जवळ विशेष गुण नाहीत,
  4. मला कोणीही मार्गदर्शक मिळाले नाही आणि
  5. सर्वांत मोठे आणि महत्‍वाचे म्‍हणजेच माझ्याजवळ वेळच नाही,
  6. मला वेळच मिळत नाही इतर काही करायला, शिकायला.   

स्‍वतःमध्‍ये डोकावून पाहायला अशा छोट्या-छोट्या परंतू छान-छान गोष्‍टींनी आपल्‍याला शाळेत शिकवलेली कोंबडी आणि तिच्‍या पिल्‍लांची गोष्‍ट लक्षात असेलच....


सिली सिंफनी-मार्मिक परंतू सद्य परिस्थिती व सत्‍य कथन करणारी
पुस्‍तकाचे सांराश स्‍पष्‍ट करणारे कार्टून

जी लोकं पुढे निघून गेली होती त्‍यांना मेहनत-श्रम केल्‍याने अपेक्षेपेक्षा अधिक मोठे चीज़चे म्‍हणजेच लोण्‍याचे मोठे अंबार, कोठार मिळतात, ते पुर्वीपेक्षा जास्‍त श्रीमंत होतात आणि जे मागे राहिले होते अशा लोकांचे हाल खूपच वाईट होतात, त्‍यांच्‍याकडे खायचेही वांधे असतात.

 

(Procrastination) चालढकल, दिरंगाईपणा, कामचुकारपणा करून, आळशीपणा दाखवून आपल्‍या हाती काहीच पडत नाही, परंतू एक मात्र निश्चितच पदरी निराशा नक्‍कीच पडते.

हवे ते मिळविण्‍यासाठी पुढाकार घेऊन, बदल स्विकारावा लागतो, काहीही मिळवून न देणा-या स्‍वतःच्‍या आरामदायक (comfort zone) चीज़-लोण्‍याच्‍या कोठारामधून बाहेर पडावे लागते, प्रतिकुल परिस्थितीला आपल्‍या अनुकूल बनवून घ्‍यावे लागते, समस्‍या आणि संकटं यांना पार करून, मेहनत-श्रम करूनच आपल्‍याला नवीन भरपूर लोण्‍याची कोठारे मिळतात, नव्‍हे आपण ती मिळवतोच. यशस्‍वी होतोच. You can win..!

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive