गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग- ब्रोनी वेअर -पुस्‍तक समीक्षा- मराठी

मृत्‍यू समोर दिसत असताना प्रामुख्‍याने पाच प्रकारच्‍या खंत मनाला बोचत असतात.  या निष्‍कर्षावर आधारित तिने ‘’द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग’’ हे विख्‍यात पुस्‍तक लिहिले आणि सा-या मानवजातीला एक प्रकारे जागे केले.  काय होत्‍या या पाच प्रकारच्‍या खंत?

माणूस रोजच्‍या रगाड्यात स्‍वतःला हरवून बसतो, पण कधीतरी काहीतरी खंत त्‍याच्‍या मनात स्‍पर्श करून जाते, जगण्‍याचा जीवनाशी संबंध असतो, पण खंत ही जगण्‍यासोबत पुढे सरकणारी अदृष्‍य संज्ञा आहे.   

या अतिशय महत्‍वाच्‍या गोष्‍टीवर एका कर्मयोगिनी स्‍त्रीने संशोधनात्‍मक काम केले आणि जगापुढे अद्भूत असे निष्‍कर्ष मांडले, जे सा-यांसाठी कमालीचे उपयुक्‍त आहेत. 

 

 गेले करायचे राहून...
‘’द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग’’

लेखिका- ब्रोनी वेअर
पुस्‍तक समीक्षा-सारांश-मराठी

साभार-समीक्षा-सारांश लेखक-डॉ. विनोद गोरवाडकर- ९४२३४७७२७३ (पुण्‍यनगरी, लेखमाला-शब्‍द जैसे कल्‍लोळ )

ब्रोनी वेअर, हे त्‍या विदुषीचे नाव.  ऑस्‍ट्रेलियाच्‍या एका हॉस्‍प‍िटलमध्‍ये ही महिला नर्सचं काम करायची. हे काम निरलसपणे करत असताना हॉस्पिटलमध्‍ये मरणासन्‍न अवस्‍थेत आलेल्‍या वा असणा-या रुगणांशी ती संवाद साधायची आणि त्‍यांच्‍या मनातील विविध खंत त्‍यांच्‍याकडून समजून घ्‍यायची.  खंत म्‍हणा, पश्‍चाताप म्‍हणा, परंतु हे रूग्‍ण या ब्रोनी वेअर सोबत आपल्‍या मनातील राहून गेलेले गुज व्‍यक्‍त करत.

काही हजार रुग्‍णांसोबत अशा प्रकारचा संवाद साधल्‍यावर ब्रोनीने जो निष्‍कर्ष काढला त्‍यानुसार माणसाला मृत्‍यू समोर दिसत असताना प्रामुख्‍याने पाच प्रकारच्‍या खंत मनाला बोचत असतात.  या निष्‍कर्षावर आधारित तिने ‘’द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग’’ हे विख्‍यात पुस्‍तक लिहिले आणि सा-या मानवजातीला एक प्रकारे जागे केले.  काय होत्‍या या पाच प्रकारच्‍या खंत? मृत्‍यूच्‍या दारात उभ्‍या असणा-या रुग्‍णांची पहिली खंत होती, माझं आयुष्‍य माझ्या मनासारखं मी जगलो असतो तर? खरंच, ब-याचदा लोक काय म्‍हणतील, समाज काय म्‍हणेल, याचा विचार आपण करतो आणि मग जे गवसावं वाटत असतं तेच हरवून जातं.

मला आमक्‍याशी लग्‍न करायचं होतं, पण लोक काय म्‍हणाले असते, मला आमक्‍या ठिकाणी नोकरी करायची होती, मला पर्यटन करायचं होतं, पण मी ते करू शकलो नाही, कारण मी दुस-यांना हवं तसं जीवन जगलो. 

यातील दुसरी खंत होती, आयुष्‍यात मी एवढे परिश्रम करायला नको होते. मी कष्‍ट करत राहिलो आणि त्‍यापायी माझ्या कुटुंबाला, प्र‍िय व्‍यक्‍तींना वेळ देऊ शकलो नाही. काही लोकांचं ध्‍येय त्‍यांचा व्‍यवसाय-त्‍यांची नोकरी हेच असतं.  त्‍यापायी ते भोवताल विसरून जातात.  कमालीच्‍या एकाग्रतेने ते त्‍यांच्‍या कामात अहोरात्र स्‍वतःला गुंतून घेतात.  त्‍याचवेळी त्‍यांनी वेळ द्यावा अशा अनेक निकटवर्ती व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या भोवती असतात, पण त्‍यांच्‍याकडे चुकूनही यांचं लक्ष जात नाही.  यांचा अर्थ कोणी परिश्रम करूनच नये, असा नाही पण ते किती करायचे हे मात्र ज्‍याने त्‍याने ठरवायला हवे.

यातली तिसरी खंत होती, अनेकवेळा आपल्‍याला आपल्‍या भावना व्‍यक्‍तच करता आल्‍या नाहीत.  त्‍या वेळच्‍यावेळी व्‍यक्‍त करायला हव्‍या होत्‍या.  नकार आणि होकार या दोन्‍ही गोष्‍टी बोलता येणं खरोखच गरजेचं आहे.  भावना व्‍यक्‍त केल्‍याने ब-याच वेळा मनाला हवं ते साध्‍य होऊ शकतं.  एखाद्या व्‍यक्‍तीला प्रेमाची कबुली देणं, एखाद्या व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या चुकीची जाणीव करून देणं, हे यायलाच हवं. 

प्रेमाची कबुली दरवेळी प्रियकर प्रेयसीच्‍या गटातीलच असेल असं काही नाही, काही वेळा आई-वडिलांवरील प्रेमही व्‍यक्‍त करता येऊ शकतं.  शिवाय यातून आपल्‍याला गृहित धरण्‍याचा भागही टळू शकतो. 

चौथी खंत, या रुग्‍णांनी अशी व्‍यक्‍त केली की, मी माझ्या मित्रांच्‍या संपर्कामध्‍ये राहिलो असतो तर... बालपणापासून आई-वडील वा कुटुंबिय सोडले तर शाळेपासून कॉलेजापर्यंत आपण असंख्‍य मित्रांसोबत मैत्री करतो.  त्‍यातील काही आगदी जिवलग मित्र होतात, परंतु नंतरच्‍या काळात उच्‍च शिक्षणासाठी, नोकरीसाठी वा अन्‍य कारणांनी मित्र वेगवेगळ्या गावी पांगतात आणि मित्रांशी संपर्क तुटतो-संपतो.  भविष्‍यात ज्‍यावेळी आपल्‍याला सुख-दुःखात कोणीतरी जवळचं हवं असतं तेव्‍हा मित्र नसतात आणि ती पोकळी कमालीची जाणवते.

शेवटची आणि पचवी खंत अशी की, मी मला आयुष्‍यभर खूश ठेवलं असतं तर…! खरं तर वरच्‍या चार खंत राहिल्‍याच नसत्‍या तर पाचवी खंतही वाटली नसती, पण आपण आपल्‍याकडे लक्ष देतोच कुठे? अनेक मानसोपचार तज्‍ज्ञ ‘’स्‍वतःवर लक्ष द्या, स्‍वतःला वेळ द्या’’, हे नेहमी सांगतात, पण आपण ते करतच नाही.  असंख्‍य छोट्या-छोट्या गोष्‍टीत आनंद सामावलेला असतो. 

त्‍यातून आपण स्‍वतःला खूश करू शकतो आणि आपली खुशी-आनंद कशात आहे, हे आपल्‍याला ठाऊक असते, पण त्‍याकडे आपण दुर्लक्ष करतो.  हे आपल्‍याला लक्षात यतं त्‍यावेळी आपली वेळ संपत आलेली असते.  अखेरच्‍या दिवसात माणसाला बंगला, गाडी, दागदागिने, प्रॉपर्टी, कशा कशाची आठवण होत नाही.  खंत वाटते ती वरील पाच गोष्‍टींची. 

म्‍हणून १५ वर्षे काम करून ब्रोनी वेअरने काढलेल्‍या या निष्‍कर्षांवर आधारित आपण आपली जीवनवाट चालण्‍यास प्रारंभ केला, तर कोणतीही खंत वा पश्‍चाताप आपल्‍याजवळ येईलच कसा?

साभार-समीक्षा-सारांश लेखक-डॉ. विनोद गोरवाडकर- ९४२३४७७२७३ (पुण्‍यनगरी, लेखमाला-शब्‍द जैसे कल्‍लोळ )

 

गेले करायचे राहून...
‘’
द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग’’
लेखिका- ब्रोनी वेअर

पुस्‍तक समीक्षा-सारांश-मराठी

The Top Five Regrets of Dying
Author –
Bronnie Ware
Book Summary/Review in Marathi

#The Top Five Regrets of Dying #Broni Wyre #Book Review in Marathi #द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग मराठी #पुस्‍तक समीक्षा #सारांश #ब्रोनी वेअर #इंग्रजी विभाग #मनसंपदा #मनात #जीवनात #प्रिंट मिडिया, #सोशल मिडिया, #ईलेक्‍ट्रॉनिक मिडिया, #मास मिडिया #सारांश #समिक्षा

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive