गोल्‍स -लेखक- ब्रायन ट्रेसी -मराठी पुस्‍तक परिचय- अनुवाद- गीतांजली गीते

प्रत्‍येक हवीशी वाटणारी गोष्‍ट कशी मिळवाल- अपेक्षेपेक्षा लवकर मिळवाल..!

गोल्‍स

लेखक- ब्रायन ट्रेसी

मराठी अनुवाद- गीतांजली गीते

प्रकाशन- साकेत प्रकाशन

Marathi translation of international best seller book Goals by Brian Tracy
पुस्‍तक परिचय

गोल्‍स - ब्रायन ट्रेसी -मराठी पुस्‍तक परिचय

पुस्‍तक परिचय 📖

  • तुम्‍ही कल्पिले नसेल त्‍याहीपेक्षा वेगाने तुम्‍हाला हवे ते सर्व मिळवा..
  • तुम्‍ही जास्‍तीत-जास्‍त वेळा ज्‍या गोष्‍टीचा विचार करता, तेच तुम्‍ही बनता.
  • निसर्ग तुमच्‍या ध्‍येयाच्‍या आकाराची पर्वा करत नाही.
  • ध्‍येय ठरविल्‍यास निसर्गातील स्‍वयंचलित तंत्र तुम्‍हाला ते मिळविण्‍यास समर्थ बनवेल.
  • लोकं ध्‍येय का ठरवित नाहीत?
  • नकाराची, अपयशाची भिती, ध्‍येयं महत्‍वाची वाटत नाहीत, ज्‍वलंत इच्‍छा
  • ध्‍येयांच्‍या स्‍पष्‍टतेमुळे ध्‍येय गाठण्‍यात मदत होते, लक्षात ठेवा-
  • तुम्‍ही न दिसनारे लक्ष्‍य साध्‍य करूच शकत नाही. 

 

सर्वोच्‍च ३-टक्‍के लोकांमध्‍ये सामील व्‍हाः

१९७९ मध्‍ये हार्वड मधील पदवीधरांना विचारण्‍यात आले, तुम्‍ही तुमच्‍या भविष्‍यासाठी स्‍पष्‍ट, लिखित अशी ध्‍येयं निश्चित केली आहेत का आणि ती मिळविण्‍यासाठी काही योजना आखली आहे का? तेंव्‍हा कळाले की फक्‍त ०३% टक्‍के पदवीधरांनी त्‍यांची ध्‍येयं आणि योजना लिहिल्‍या आहेत, १३% टक्‍के पदवीधरांकडे ध्‍येयं होती, पण ती लिखित स्‍वरूपात नव्‍हती, तर ८४% टक्‍के पदवीधरांकडे परीक्षा संपताच सुट्टयांमध्‍ये उन्‍हाळ्याचा आनंद घेण्‍याशिवाय कुठलीही स्‍पष्‍ट ध्‍येयं नव्‍हती.

१०-वर्षानंतर १९८९ मध्‍ये संशोधकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या पुन्‍हा मुलाखती घेतल्‍या तेंव्‍हा त्‍यांना असे आढळले की, ज्‍या १३ टक्‍के लोकांकडे लिखित स्‍वरूपात ध्‍येयं नव्‍हती, ते कोणतीच ध्‍येयं नसणा-या ८४ टक्‍के विद्यार्थ्‍यांपेक्षा सरासरी दुप्‍पट कमवत होते, पण सर्वांत आश्‍चर्यकारक गोष्‍ट म्‍हणजे

ज्‍या ०३-टक्‍के विद्यार्थ्‍यांकडे हॉर्वर्ड सोडताना स्‍पष्‍ट, लिखित स्‍वरूपात ध्‍येयं होती ते बाकीच्‍या ९७-टक्‍के पदवीधरांपेक्षा सरासरी दहापट कमवत होते. 

यातील एकमेव फरक म्‍हणजे पदवीधर होतानाच त्‍यांनी आपली ध्‍येयं ठरविली होती.

जिथे काही लोक अधिक चांगल्‍या आयुष्‍याची केवळ स्‍वप्‍नं बघण्‍यात घालवतात, तिथे काहीजण आपले प्रत्‍येक ध्‍येय साध्‍य करण्‍यात कसे यश यशस्‍वी होतात? प्रसिद्ध लेखक ब्रायन ट्रेसी सांगतात की निराशेकडून स्‍वप्‍नपूर्तीकडे जाणारा मार्ग शोधण्‍यात आला आहे.  हजारो, लाखो नव्‍हे तर अब्‍जावधी लोकांनी शुन्‍यातून सुरूवात करून भरघोस यश मिळवले आहे.  आपले स्‍वप्‍न सत्‍यात उतरवण्‍यासाठी लागणा-या काही अत्‍यावश्‍यक तत्‍वांबद्दल ब्रायन ट्रेसी आपल्‍याला सांगतातः

ब्रायन ट्रेसी आपल्‍याला ध्‍येय ठरवण्‍यासाठी आणि साध्‍य करण्‍यासाठी एक साधी सशक्‍त आणि उपयुक्‍त पद्धत सांगतात.  अद्वितीय परिणामांसाठी ही पद्धत एक दशलक्षांहून जास्‍त लोकांनी अवलंबली आहे.

ट्रेसी म्‍हणतात,

या पुस्‍तकात दिलेल्‍या एकवीस पद्धतींचा वापर करून तुम्‍ही मोठ्यात मोठे ध्‍येय प्राप्‍त करू शकाल.  आपली वैयक्तिक क्षमता कशी ठरवावी, आयुष्‍यात काय खरोखरच महत्‍वाचे आहे, हे कसे ठरवावे आणि येत्‍या काही वर्षांत तुम्‍हाला जे साध्‍य करायचे आहे त्‍यावर लक्ष केंद्रित कसे करावे.

हे या पुस्‍तकामुळे तुम्‍हाला शिकायला मिळेल.

👉आत्‍मविश्वास कसा वाढवावा

👉आपल्‍या मार्गात येणारा प्रत्‍येक अडथळा वा अडचण कशी दूर करावी

👉संकटातून मार्ग कसा काढावा,  

👉आव्‍हानांना प्रतिसाद कसा द्यावा आणि 

👉काहीही झाले तरी आपले ध्‍येय कसे साध्‍य करावे.. हे ब्रायन ट्रेसी तुम्‍हाला शिकवतील.  

सगळ्यांत महत्‍वाचे म्‍हणजे तुमच्‍या उर्वरित आयुष्‍यात वापरता येण्‍याजोगी एक अनुभवसिद्ध कार्यप्रणाली तुम्‍ही आत्‍मसात कराल. 

 

🎯 गोल्‍स  

लेखक- ब्रायन ट्रेसी

मराठी अनुवाद- गीतांजली गीते 

 


Other Related:  

#गोल्‍स मराठी लेखक- #ब्रायन ट्रेसी मराठी अनुवाद- #गीतांजली गीते #Gitanjali GIte #Brian Tracy #Goals in Marathi #Eat that frog #Change your thinking change your life Marathi #सर्वांत कठिण काम सर्वांत आधी

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive