पोमोदोरो पद्धत (POMODORO Technique in Marathi)

कमीत कमी वेळेत किंवा आहे त्या वेळेतच जास्तीत जास्त कामं करण्यासाठी 

पोमोदोरो पद्धत


POMODORO Technique
POMODORO Technique in Marathi


मित्रांनो आपण आपली प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपण काही पुस्तकं-पद्धती-क्लृत्या-युक्त्या-तंत्र जसे कि, ईट दॅट फ्रॉग-सर्वांत कठीण काम सर्वात आधी करणे, फर्स्ट थिंग फर्स्ट, गेटिंग थिंग्स डन आणि करायच्या गोष्टींची व कामांची यादी बनवणे (टु डू लिस्ट), वेळापत्रक बनवणे (टाईम टेबल), इत्यादी. तुम्हाला माहित असतील.  

या सर्व पद्धती planned म्हणजेच आपल्या वेळेचे नियोजन कसं करायचं यांच्या पूर्व नियोजित योजना होत्या.  परंतु कामाचे नियोजन करणे वेगळे आणि प्रत्यक्षात कामं सुरू कशी करायची, त्यांना अंमलात कसं आणायचं, ती पूर्ण कशी करावीत? ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.  म्हणूनच आज आपण ह्याबद्दल समजून घेणार आहोत. 

आपण एखादे काम सुरु केल्यावर लक्ष केंद्रित करून, फोकस करून ते पूर्ण कसे करायचे? आपल्या सर्वांनाच एक प्रश्न भेडसावत असतो की लक्ष केंद्रित करून कामं कशी करावीत? कारण, कामं करताना अडथळे, अडचणी, समस्या येतात ज्यामुळे आपण ती कामं करू शकत नाहीत.  काहीच नसेल तर डिस्ट्रॅक्शन किंवा लक्ष विचलित करणारे आजची स्मार्टफोन, समाज माध्यमं ..! सोशल मिडिया जगत आणि इतर काही गोष्टी असतात.  यावर उपाय म्हणजे पोमोदोरो टेक्निक. जगामध्ये बरेचजण ह्या पद्धतीचा वापर आपली कामं पूर्ण करण्यासाठी करत असतात.  

पोमोदोरो हा एक इटालियन शब्द आहे आणि या पद्धतीचा शोध देखील एका इटालियन विद्यार्थ्याने लावला होता. त्याला अभ्यास करताना लक्ष केंद्रित करता येत नव्हतं म्हणून त्याने ही पद्धत तयार केली आणि वापरली.  

ही खूपच सोपी पद्धत आहे, पहिल्या पंचवीस मिनिटं हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं आणि पाच मिनिटे ब्रेक घ्यायचा.  म्हणजेच २५ मिनिटांचं काम आणि ५ मिनिटांचं विश्राम-ब्रेक असा ३० मिनिटांचा मिळून एक पोमोदोरो होतो.  त्या विद्यार्थ्याने एक साधं टाइमर वापरला होतो जो टोमॅटोच्या आकाराचा होता आणि त्यावरूनच याला पोमोदोरो असं नाव पडलं, इटालियन भाषेत पोमोदोरो म्हणजे "टोमॅटो" असा अर्थ होतो.   

पोमोदोरो: २५ मिनिटांचं काम आणि ५ मिनिटांचं विश्राम-ब्रेक असा ३० मिनिटांचा मिळून एक पोमोदोरो होतो.   

पोमोदोरो पद्धत वापरायला अतिशय सोपी आहे, यामध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे की, जे काम आपल्याला करायचं आहे ते अगोदर ठरवून घ्या. त्यानंतर त्याच कामावर आपण २५ मिनिटं लक्ष केंद्रित कारणार आहोत.  यासाठी २५ मिनिटांचा आपलयाला टाइमर लावायचं आहे.  एकदाका टाइमर लावला, कुठंही न थांबता, कोणतेही अडथळे मधे न आणता २५ मिनिटे आपल्याला त्या कामावर फोकस करायचं आहे. 

२५ मिनिटांनंतर ५ मिनिटांचा एक ब्रेक घ्यायचा आणि त्या ब्रेक मध्ये तुम्ही वैयक्तिक कामे करायची पुन्हा, रेस्ट-रिलॅक्स-आराम करू शकता.  त्यानंतर २५ मिनिटांचा नवीन पोमोदोरो आपण सुरु करू शकतो.  तर अशा प्रकारे दिवसभरात आपल्या वेळेत जास्तीत जास्त पोमोदोरो पूर्ण करायचे आहेत.  

उदाहरणात, समजा आपल्याकडे दिवसभरात ६ तासचं कामाचे आहेत, एकूण ८-९ तासांच्या कामाच्या वेळेत आपला काही वेळ बैठका-मीटिंग घेण्यात जाईल, काही वेळ प्रवासात, नाश्ता-लंच-जेवण करण्यात जाईल, तर काही वेळ इतर गोष्टीत जाईल.  म्हणूनच फक्त कामासाठी समर्पित वेळ आपण ६ तास गृहीत धरू.  सहा तास कामासाठी मिळणार आहे, तर या सहा तासांमध्ये आपण किती पोमोदोरो वापरू शकतो? तर जास्तीत जास्त १२ पोमोदोरो पूर्ण करू शकतो. आणि त्याचाच प्रयत्न केला पाहिजे.  

पोमोदोरो तंत्र इतके यशस्वी आहे कारण या पद्धतीमध्ये आपण आपल्या पूर्ण कामाला २५-२५ मिनिटांमध्ये विभागून घेत असतो.  एकदा कामावर बसलं की ते पूर्ण केल्यावरच उठायचं असं इथं नसतं, पूर्ण काम संपविण्याऐवजी पोमोदोरो टेक्निक मध्ये हातात घेतलेले काम २५ मिनिटांत पूर्ण करण्यावर फोकस-लक्ष केंद्रित करण्यात येत असतो.  

समजा, एखाद्या कामाला पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागणार असेल जसे, ५ तास लागणार असतील तर इतका वेळ लागेल ह्या विचारानेच आपण ते काम सुरू करायलाच घाबरतो, ते काम सुरू करायला भीती वाटते.  पोमोदोरो मध्ये २५ मिनिटांमध्ये जे, जेवढं काम होणार आहे ते बघितलं जातं, तेवढंच नोंदवलं जातं.  पूर्ण काम हातात घेऊनही आपण ते संपवलं नाही तरी २५ मिनिटांमध्ये त्याचा काही भाग, काही काम आपण लक्ष केंद्रित करून संपवलेला असतो.  तेवढीच प्रगती केलेली असते.  

पोमोदोरो साठी आपण कोणताही साधा टायमर वापरू शकतो, जसे गजराचे घड्याळ, हातातील डिजिटल घड्याळ, मोबाइल फोन किंवा त्यात काही पोमोदोरो ऍप्प असतात ती वापरू शकतो, किंवा कॉम्प्युटर साठी काही जसे "कीपफोकस" नावाचे सॉफ्टवेअर सुद्धा मिळतात त्यावरही ऑनलाईन काही संकेतस्थळं अशी सुविधा पुरवतात, युट्युबवर देखील अभ्यासासाठी, कामासाठी पोमोदोरो टाइमर असतात.  काही मोफत असतात काही पेड असतात.  काहींचे लिंक खाली दिले आहेत नक्की वापरा. 

पोमोदोरो वापरताना काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, म्हणजेच, जो टाइमर आपण वापरणार आहोत त्याचा विशिष्ट आवाज असला पाहिजे.  जसे- "टिक-टिक", किंवा काही पियानो चे आवाज, white noise किंवा संगणक अथवा मोबाईल स्क्रीन वर मोठ्या अंकात काउंटडाउन टायमर दिसला पाहिजे.  म्हणजेच २५ मिनिटांचा वेळ कमी कमी होताना आपल्यासमोर दिसला पाहिजे.

पोमोदोरो टेक्निक मध्ये २५ मिनिटांच्या नंतर उरलेल्या ५ मिनिटांचा विश्राम-ब्रेक म्हणजे आपल्या मेंदूसाठी बक्षीस-रिवॉर्ड आहे.  संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून काम केल्यावर बक्षीस मिळतं असे आपण मेंदूला प्रशिक्षण देत आहोत, शिकवत-सांगत आहोत. २५ मिनिटं काम केल्यांनतर आपल्याला ०५ मिनिटांचं बक्षीस मिळणार आहे.  

मग ०५ मिनिटांच्या बक्षिसाच्या वेळेत तुम्ही तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट करू शकता, एखादे चॉकलेट खाऊ शकता, चहा-कॉफी, शीतपेय पिऊ शकता, पाणी पिऊ शकता, काही पाऊल चालू शकता, अंग ताणू शकता, गॅलरीत, बाहेर हवेत फिरून येऊ शकता किंवा ई-मेल, मोबाईलवर व्हाट्सएप्प, फेसबुक चेक करू शकता (पण केवळ आणि केवळ ह्या ०५ मिनिटांच्या कालावधीतच ते करू शकता.) 

यावरही जर तुम्हाला खरंच प्रोडक्टिव्ह काम कारायचं असेल तर मोबाइलला सायलेंट करून ठेवा फक्त इमरजेंसी-आपत्कालीन-अत्यावश्यक गोष्टीसाठीच संदेश-सूचना याना उत्तर द्या इतर टाळा, पुढं पिटाळा.   त्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या पुढील पोमोदोरो साठी नियोजन, तयारी करू शकता.

उद्देश हाच कि, मेंदूला ट्रेनिंग मिळेल कि २५ मिनिटांचं फोकस करणं महत्वाचं आहे.  मेंदूला कळलं पाहिजे कि लक्ष केंद्रित करून २५ मिनिटांनंतर एक ब्रेक आहे, रिवॉर्ड आहे.  आणि ह्या २५ मिनिटामध्ये काही अडथळा आला, काम थांबवावं लागलं तर तेंव्हा टायमर थांबवून रीसेट करून पुढं जेंव्हा आपण काम सुरु करू तेंव्हा २५ मिनिटांचा टायमर सेट करा.  याचे कारणही तेच कि आपल्या मेंदूला २५ मिनिटं फोकस करण्याची ट्रेनिंग मिळायला पाहिजे.

अशी हि साधी-सोपी पोमोदोरो टेक्निक जर आपण वापरली तर सरावाने आपल्याला लक्ष केंद्रित-फोकस करण्याची सवय लागले, जास्तीत जास्त कामंदेखील पूर्ण होतील, त्यासोबतच खूप जास्त काम करण्याची भीतीही राहणार नाही.  ही पोमोदोरो पद्धत अवश्य वापर नक्कीच तुमचा फायदा होईल, चांगले परिणाम मिळतील, प्रोडक्टिव्हिटी वाढेल.


पोमोदोरो टायमर

  •  पोमोदोरो ऑनलाईन युट्युबवर:

  • पोमोदोरो ऑनलाईन संकेतस्थळं: 
    • www.pomofocus.io
    • www.toptal.com/project-managers/tomato-timer
    • www.studywithme.io/aesthetic-pomodoro-timer/
    • www.pomodoro-tracker.com
  • पोमोदोरो मोबाईल ऍप्प:
    • Pomodor
    • pomotodo 
    • Marinara Timer
    • Forest
    • Be Focused
    • Toggl Track 
  • पोमोदोरो कॉम्प्युटर सॉफ्टवेअर:
    • keepfocus 
    • focus booster
    • PowerPom
    • Super Productivity
    • Pomotroid
    • GNOME Pomodoro 
    • Pomolectron
  • पोमोदोरो गजराचे घड्याळ:

  • पोमोदोरो डिजिटल घड्याळ: 

  • SMART Watch:

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive