पैशाचे मानसशास्त्र-Psychology of Money Morgan Housel -जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - मॉर्गन हाऊसेल- मराठी पुस्‍तक परिचय

Psychology of Money
Morgan Housel

 जगप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 

पैशाचे मानसशास्त्र

मॉर्गन हाऊसेल
मराठी पुस्‍तक परिचय

 

The Psychology of Money
Paishache Manasshastra (Marathi)

पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते, यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. 

यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत.  ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात... 

जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.

पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोकं पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्वाच्या विषयांपैकी एक अशा 'पैसा' या विषयावर महत्वाचे धडे देत आहेत. 

 

Psychology of Money या Morgan Housel लिखित  प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - पैशाचे मानसशास्त्र

पुस्तकाचे नाव  पैशाचे मानसशास्त्र  /Psychology of Money
लेखक  मॉर्गन हाऊजेल  / Morgan Housel
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

978-81-938701-5-9

पुस्तकाची पाने 224
बाईंडिंग पेपरबॅक 

मूळ इंग्रजी पुस्‍तकाचा मराठी अनुवाद पैशांचे मानसशास्‍त्र या पुस्‍तकाचे सारांश येथून वाचू शकता. 

👉 पैशांचे मानसशास्‍त्र या पुस्‍तकाचे सारांश

  

अधिक वाचनासाठी संबंधितः

‘डज नॉट कम्प्यूट’ हे या निबंधाचं शीर्षक. मॉर्गन यांचा संख्‍या व आकडेवारी यावरील निबंधाबद्दल गिरीष कुबेर यांनी लिहिलेलं संपादकीय वाचनात आला   मॉर्गन या निबंधात अत्यंत सुरेलपणे मोजण्यामापण्याच्या मर्यादा दाखवून देतात.

हे सशक्त दिसणारे, टाळेबंदात ठसठशीतपणे समोर उठून दिसणारे आकडे हाच सर्वाच्या विश्लेषणाचा आणि मूल्यमापनाचा आधार. आकडे भले तुम्हाला पािठबा देत असतील, पण आकडय़ांना अर्थ देणाऱ्या शब्दांतली गोष्ट जर काही वेगळं सांगत असेल तर संख्येपेक्षा शब्द समर्थ ठरतात. 

पृष्ठभागाखालनं वाहणाऱ्या या गोष्टी, कथा या पृष्ठभागावरच्या आकडय़ांवर, त्यांच्या ताळेबंदांवर मात करतात.  

मॉर्गन म्हणतात त्याप्रमाणे संख्या कितीही मोठी, मजबूत वाटली तरी तिचा आकार पूर्णपणे विसंबून राहावा असा नसतो. अक्षरं, त्यातून तयार होणारे शब्द आणि या सर्वातनं आकाराला आलेली कथा भल्यादांडग्या संख्येला नामोहरम करू शकते. संख्या कितीही बलवान असो. पण कथा ही बघता बघता संख्येवर मात करते.

म्हणून आकडय़ांच्या सौष्ठवाला इतकं महत्त्व द्यायची गरज नाही..

वातावरणातल्या कथांकडे लक्ष द्यायला हवं.

 

👉वरील संपादकीय सविस्‍तर येथून वाचा

 

लेख साभारः 

गिरीष कुबेर, संपादक लोकसत्‍ता
girish.kuber@expressindia.com 

स्‍त्रोतः लोकसत्‍ता 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive