पैश्‍याने पैसा कमावण्‍याची आधुनिक पद्धत - फॅल्‍कन मेथड मराठी Falcon Method by David Solyomi

पैश्‍याने पैसा कमावण्‍याची आधुनिक पद्धत

साठीअगोदर निवृत्‍ती, विनाश्रम उत्‍पन्‍न आणि आर्थिक स्‍वातंत्र्य मिळवून आज वयाच्‍या तिशीतच निवृत्‍ती घेणे आणि मनासारखे आपले आयुष्‍य जगणे शक्‍य आहे. पैशाने पैसा कमावण्‍याची आधुनिक पद्धत.. 

 

फॅल्‍कन मेथड

पुस्‍तक परिचय-सारांश

 मराठी

The Falcon Method

David Solyomi 

Falcon Method book Review-summary in Marathi

The FALCON Method
A Proven System for Building Passive Income and Wealth Through Stock Investing

 

👉समभाग-स्‍टॉक्‍स-शेअर-Share-Stocks👈

आज वेळेसोबत नवीन पिढी अगोदरपेक्षा अधिक आर्थिकदृष्‍ट्या जाणकार आणि साक्षर व समजूतदार होत चालली आहे.  आणि त्‍यासोबतच त्‍यांना एक गोष्‍ट समजून चुकली आहे की, आयुष्‍यातील उतारवयापर्यंत म्‍हणजेच म्‍हातारपणापर्यंत तेवढ्याच पैशांत-उत्‍पन्‍नात आपण असेच सर्वसामान्‍य जीवन जगणे कठीण होत जाईल.

  • Early Retirement- साठीअगोदर निवृत्‍ती
  • Passive Income- विनाश्रम उत्‍पन्‍न आणि
  • Financial Freedom- आर्थिक स्‍वातंत्र्य

जीवनभर राबराबराबून, कबाडकष्‍ट, मेहनत करूनही सर्वसामान्‍य जीवन जगणे हे जीवन जगण्‍याची योग्‍य पद्धत नव्‍हे. यामळेच आजच्‍या पिढीचे लक्ष अर्ली रिटायरमेंट, पॅसिव्‍ह इन्‍कम आणि फायनान्शियल फ्रिडम यावर आहे. (साठीअगोदर निवृत्‍ती, विनाश्रम उत्‍पन्‍न आणि आर्थिक स्‍वातंत्र्य). 

हेच कारण आहे की आज बरेचजण स्‍टॉक्‍स, शेअर मार्केटमध्‍ये-भांडवली बाजार इत्‍यादी मध्‍ये गुंतवणूक करण्‍यासंदर्भात उत्‍सुकता व रूची दाखवत आहेत.

एक तर ०८-हजार पेक्षा जास्‍तीच्‍या कंपन्‍या त्‍यावर, भांडवली बाजार हे Volatile Market म्‍हणजेच अतिचंचल बाजार असल्‍याने आणि गुंतवणूकीवर परतावा केंव्‍हा व किती मिळेल ह्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. यामुळे अधिकतर लोकांना जी काळजी सतावते ती अशी की नेमके कोणते समभाग-शेअर खरेदी करावेत, केव्‍हा करावेत, किती परतावा मिळेल?

कारण हजारो कंपन्‍यांमधून, दर्जेदार कंपनीचे भाग स्‍वस्‍त किंमतीमध्‍ये खरेदी करणे हे गुंतवणूकीच्‍या दृष्‍टीने ख-या अर्थाने आव्‍हानात्‍मक गोष्‍ट आहे.

यासाठीच लेखक डेव्हिड सॉलयॉमी आपल्‍या त्‍यांच्‍या पुस्‍तकात आपल्‍याला एक अशी पद्धत शिकवतात.  ही पद्धत मूल्‍य गुंतवणूक, सामान्‍यज्ञान आणि मुलभूत शिस्‍तीच्‍या तत्‍वांवर आधारीत आहे. (Value Investing, Common Sense & Basic Discipline).

यांचा एकमेव ध्‍येय आहे की, सर्वांनी एक असा पोर्टफोलियो तयार ज्‍यामध्‍ये असे स्‍टॉक्‍स असतील जे तुम्‍हाला योग्‍य परतावा तर देतीलच त्‍यासोबतच ते तुमच्‍या पॅसिव्‍ह इन्‍कमचा देखिल स्‍त्रोत होईल. 

मित्रांनो, फॅल्‍कन हे एका पक्ष्‍याचे नांव आहे. मराठीत आपण त्‍याला बहिरी ससाणा ह्या नावाने ओळखतो.  हवेतच शिकार करणे, तीक्ष्‍ण नजर, आणि वेगवान झेप ही या पक्ष्‍याची वैशिष्‍ट्ये, जो शिकार करण्‍यात पटाईत असतो. आणि त्‍या पक्ष्‍यासारखीच ही पद्धत देखिल काम करते. द फॅल्‍कन मेथड.

फॅल्‍कन पद्धत पुढील तत्‍वांवर आधारित आहेः

  • मूल्‍य गुंतवणूक- Value Investing 
  • सामान्‍यज्ञान - Common Sense
  • मुलभूत शिस्‍त- Basic Discipline

कारण लेखक डेव्हिड सॉलयॉमी यांनी आपल्‍या सुरुवातीच्‍या जीवनात बरेच आर्थिक हेलकावे बघल्‍यानंतर लगेच असे ठरवले होते की ते ह्या पैशांच्‍या Rat Race of Money (उंदीरशर्यतीमधून..!) बाहेर पडतील.

यासाठीच त्‍यांनी कित्‍येक गुंतवणूकीविषयक पुस्‍तकं वाचून काढली आणि वयाच्‍या चोविसाव्‍या वर्षीच आपली पहिली कंपनी स्‍थापित करून विकूनही टाकली..! ज्‍यामुळे त्‍यांना ब-याचपैकी कंपनीविषयीच्‍या महत्‍वाच्‍या गोष्‍टी समजण्‍यास मदत झाली, माहिती मिळाली, अशी माहिती व गोष्‍टी ज्‍या सर्वसामान्‍य गुंतवणूकदाराला कधीच माहिती होत नाहीत.

आज वयाच्‍या तिशीतच निवृत्‍ती घेणे आणि मनासारखे आपले आयुष्‍य जगणे शक्‍य आहे


Financially Free @ age 33

 David Solyomi

Author-The FALCON Method

ह्याच माहिती व गुंतवणूकीच्‍या ज्ञानामुळे लेखकाला एक उत्‍तम गुंतवणूकदार बनन्‍यास मदत मिळाली. आणि वयाच्‍या तेहेतीसाव्‍या वर्षीच ते आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र झाले. (Financially Free @ age 33)

लेखकासारखेच जर तुम्‍हालाही अगदी कमी वयात आर्थिक स्‍वातंत्र्य हवे आहे किंवा लेखकांची पद्धत वापरून तसे करू वाटत असेल, किंवा शेअर मार्केटमधून दीर्घकाळापर्यंत पॅसिव्‍ह इन्‍कम निर्माण करायची इच्‍छा असेल तर ही पुस्‍तक तुमच्‍यासाठीच आहे.

पुर्ण पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा किंवा पुस्‍तक खरेदी करून अधिक ज्ञान मिळवा व आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र व्‍हा..!

तर सुरू करूया द फॅल्‍कन मेथड..!

 

द ब्‍लॅक बॉक्‍सः The Black Box

जेंव्‍हाही तुम्‍ही एखाद्या गोष्‍टीमध्‍ये गुंतवणूक कराल तेव्‍हा, लेखक असे म्‍हणतात की, तुम्‍हाला त्‍या कंपनीला एका ब्‍लॅक बॉक्‍स- Black Box सारखे समजण्‍यास सांगतात.  त्‍या काळ्या डब्‍ब्‍यामध्‍ये दोन प्रकारचे पाईप्‍स जोडलेले आहेत, त्‍यापैकी काही आहेत इनपुट पाईप्‍स (Input Pipes).

Black Box

  1. Input Pipes: कंपनीचे उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत जेथून कंपनीला पैसा येत असतो
  2. Output Pipes: कंपनीचे सर्वप्रकारचे खर्च-जेथून पैसा बाहेर जात असतो

Input Pipes: जेथून कपनीला पैसा येत असतो

या इनपुट पापाईप्‍समध्‍ये कंपनीचे सर्वप्रकारे महसूल-उत्‍पन्‍न-पैसा यांचे स्‍त्रोत जोडलेले असतात, जसे-रेव्‍हेन्‍यू स्‍कीम-Revenue Schemes-कर्ज, कंपनीच्‍या शेअरर्स ची विक्री इत्‍यादी.

जेथून कपनीला पैसा येत असतो. जसे की आपले एखादे उत्‍पादन अथवा सेवा विकून येणारे महसूल-उत्‍पन्‍न-पैसा. किंवा बॅंकेकडून एखादे लोण-कर्ज घेऊन, किंवा कंपनीचे शेअर्स-समभाग विक्री करून येणारा महसूल, इथे सामान्‍य जनता कंपनीचे शेअर्स खरेदी करून कंपनीला पैसा मिळवून देत असते.

Output Pipes: कंपनीचे सर्वप्रकारचे खर्च

ब्‍लॅक बॉक्‍सच्‍या आउटपूट म्‍हणजे बाहेरच्‍या दिशेने निघणारे पाईप्‍सच्‍या जोडणीतून कंपनीचे सर्वप्रकारचे खर्च वाहत असतात.  जसे-कंपनीला सांभाळण्‍याचा खर्च, कर्मचारी-अधिकारी यांचे पगार, उत्‍पादनाचा खर्च, मार्केटिंग खर्च इत्‍यादी.

परंतू, लेखक आपल्‍याला इथे एका महत्‍वाच्‍या आउटपुट पाईपवर लक्ष देण्‍यास सांगतात, आणि तो आहे प्रॉफीट म्‍हणजेच फायदा-नफा.. कारण कंपनीच्‍या संपूर्ण कार्यप्रणालीला समजल्‍यावरही तुम्‍हाला फक्‍त आणि फक्‍त तुमच्‍या नफ्याशीच देणं-घेणं असेल.

ह्यासाठी तुम्‍ही ही गोष्‍ट पुढील (3-Factors) तीन तथ्‍यांद्वारे हे समजू शकता की कसं एक कंपनी त्‍यांना मिळणा-या नफ्या-फायद्याला वापरत आहे. (Utilizing Profits)

1.   Payment to Shareholders: भागधारकांना लाभांशः

कंपनीचा आरओआय (ROI) अर्थात रिटर्न ऑन इन्‍व्‍हेस्‍टमेंट रेशो किती स्‍ट्रॉन्‍ग-मजबूत आहे, ज्‍याद्वारे तुम्‍ही हे समजू शकता की तुम्‍हाला त्‍या कंपनीमधून प्रत्‍येक शेअरवर किती नफा (ROI) अ‍थवा परतावा मिळेल.  

Share Buybacks: स्‍वतःकंपनीचे समभाग खरीदे करणे

शेअर-बायबॅक्स- याचा अर्थ असा की, कंपनी स्‍वतःचे समभाग विकत घेऊन जनतेकडे उपलब्‍ध असलेल्‍या समभागांना किती प्रमाणात लिमिट-मर्यादित करत असते. आणि असं केल्‍याने कंपनीला किती नफा-किंवा तोटा होत असतो.

Retained Earnings: कंपनीचा भविष्‍यनिर्वाह निधी..!

हे असे महसूल किंवा उत्‍पन्‍न असते जो कंपनी स्‍वतःच्‍या भविष्‍यकालीन खर्चाच्‍या तरतूदीसाठी भांडवलामध्‍ये ठेवत असते. (Future Capital Fund).

The Quality Criterion:  दर्जेदार कंपन्‍यांमध्‍ये गुंतवणूक

द फॅल्‍कन पद्धतीमध्‍ये लेखक असे म्‍हणतात की, तुम्‍हाला फक्‍त त्‍याच कंपन्‍यामध्‍ये गुंतवणूक करायला पाहिजे ज्‍या ब-याच कालावधीपासून बाजारात स्‍थापित आहेत आणि त्‍या कंपन्‍या त्‍यांच्‍या क्षेत्रातील पुढारी असायला पाहिजे. (Well Established Fundamentally Strong, Industry Leaders)


तुम्‍हाला सर्वच कंपन्‍यांमध्‍ये गुंतवणूक करायची नाही, तर प्रत्‍येक क्षेत्रातील कंपन्‍यांमधून काही टॉप कंपन्‍या निवडायच्‍या आहेत ज्‍या मागील २०-वर्षांपासून सतत (High ROI) चांगला उच्‍च परतावा देत आहेत.

कारण मध्‍यम-Mediocre कंपन्‍या तुम्‍हाला कमी कालावधीमध्‍ये उच्‍च परतावा मिळवून देऊ शकतात.  

परंतू, जर का तुम्‍ही पॅसिव्‍ह इन्‍कम निर्माण करू इच्छित असाल तर, तुम्‍हाला दुरदृष्‍टीने दीर्घपल्‍ल्‍याच्‍या नियोजनाद्वारे गुंतवणूक करायला पाहिजे, जे तुम्‍हाला सततपणे पॅसिव्‍ह इन्‍कम कमावून देऊ शकेल.

२० वर्षांच्‍या काळात कमीतकमी एक तरी (Recession)
आर्थिक मंदी येतच असते

ई-वाचनालय | www.evachnalay.in 

लेखक असे म्‍हणतात की, कंपनीच्‍या लांबपल्‍ल्‍याच्‍या इतिहासाचे परतावे बघितल्‍यास आपल्‍याला एकदम सुस्‍पष्‍ट कल्‍पना येईल.  कारण २० वर्षांच्‍या काळात कमीतकमी एक तरी (Recession) आर्थिक मंदी येतच असते. 

आणि जर का एखादी कंपनी त्‍या एका मंदीला सामोरे जाऊन, आपल्‍या परताव्‍याला वाढवत असेल तर ती कंपनी तुमच्‍यासाठी पॅसिव्‍ह इन्‍कम कमावून देण्‍याची क्षमता ठेवते.

भारतीय बाजारातील पुढारी कंपन्‍याः  

  • एशियन पेंट्स
  • टाटा
  • एमआरएफ आणि
  • रिलायन्‍स

भारतीय बाजाराच्‍या हिशोबाने अश्‍या दमदार कंपन्‍यांच्‍या यादीमध्‍ये एशियन पेंट्स, टाटा, एमआरएफ आणि रिलायन्‍स सारख्‍या कंपन्‍या आहेत. अर्थातच, आपल्‍याला त्‍या कंपनीच्‍या मागील ट्रॅक रेकॉर्डला पडताळून बघणे गरजेचे आहेच.  आणि सहसा अशा कंपन्‍या मोठ्या असतात ज्‍यांचा गाभा अथवा मूलभूत ढाचा मजबूत असतो.

तरीही नेहमीच कोणतीही गुंतवणूक करत असताना, चांगल्‍या प्रकारे संशोधन करून, विचारपूर्वकच गुंतवणूक करायला पाहिजे.

The Value Criterion: मूल्‍याचे तत्‍व

प्रत्‍येकाची हीच इच्‍छा असते की, त्‍यांना सर्वगोष्‍टी ज्‍या उच्‍चप्रतिची आहेत त्‍या कमीत-कमी किंमतीमध्‍ये मिळावी.  परंतू, लोकं कंपनीचे शेअर्स किंवा समभाग खरेदी करत असताना मोलभाव करत नाहीत. कारण त्‍यांना माहितच नसते की त्‍या समभागाची-शेअरची खरी किंमत काय आहे.

जगातील सर्वांत श्रीमंत व्‍यक्‍तीपैकी एक असलेले वॉरेन बफेट् असे म्‍हणतात की,

“Whether we’re talking about sock or stocks.  I like buying uality merchandise when it is market down.”

बाजार वर असो किंवा खाली असो मी नेहमीच उच्‍च दर्जाच्‍या गोष्‍टी स्‍वस्‍तात खरेदी करणे पसंत करतो. 

- Warren Buffet, BSH

स्‍टॉक्‍स, स्‍वस्‍त किंमतीमध्‍ये खरेदी केल्‍याने दीर्घावधीमध्‍ये तुमच्‍या परताव्‍याला बुस्‍टर-डोस मिळत असतो.  तुमचा परतावा वाढत असतो. परंतू, हे माहिती करून घेण्‍यासाठी की त्‍या स्‍टॉक्‍सची (Actual Price) खरी किंमत काय आहे? तुम्‍हाला कंपनीच्‍या व्‍हॅल्‍यूएशनची म्‍हणजेच मूल्‍यांकनाची माहिती असणे खूपच आवश्‍यक आहे.

तुम्‍हाला ती काही इंडिकेटर्सच्‍या साहाय्याने ती कळू शकते. 

जसे-  

  • प्राईस टू अर्निंग रेशो Price to –Earning Ratio आणि 
  • प्राईस टू- कॅशफ्लो Price-To-Cashflow

प्राईस टू अर्निंग रेशो आणि प्राईस-टू-कॅशफ्लो याद्वारे तुम्‍ही शोधू शकता की, ती कंपनी किती नफ्यात आहे की किती प्रमाणात तोट्यात आहे, कंपनीने आपल्‍या कॅशफ्लोला कसे सांभाळलेले आहे, आणि दर समभागाला व्‍हॅल्‍यू- पर-स्‍टॉक्‍स काय आहे आणि बाजार भावानुसार ते किती स्‍वस्‍त किंवा ओव्‍हर प्राईस आहे.

मुळात सांगायचा मुद्दा हाच की, जेव्‍हा बाजार खाली असेल तेव्‍हा तुम्‍हाला तुमच्‍या टॉपच्‍या निवडलेल्‍या कंपन्‍यांच्‍या समभागांना खरेदी करायला पाहिजे. कारण त्‍यावेळी तुम्‍ही असे समजा की, स्‍टॉक मार्केटमध्‍ये बाजार खाली असेल त्‍यावेळी समभाग-सेल मध्‍ये असल्‍यासारखे स्‍वस्‍त-डिस्‍काऊंटच्‍या किंमतीध्‍ये मिळत असतात. 

जिथे तुम्‍ही बाजारातील शेअर-समभागांना त्‍यांच्‍या बाजार मूल्‍यापेक्षा कमी दरामध्‍ये खरेदी करू शकता. जो तुमच्‍या भविष्‍यकालीन परताव्‍यामध्‍ये भरपूर मदत करत असतात.

स्‍टॉक्‍स, स्‍वस्‍त किंमतीमध्‍ये खरेदी केल्‍याने दीर्घावधीमध्‍ये तुमच्‍या परताव्‍याला बुस्‍टर-डोस मिळत असतो. 

The Threshold Criterion:

आपल्‍याला असे वाटत असते की आपण गुंतवणूक केलेल्‍या प्रत्‍येक पैशांचा आपल्‍याला जास्‍तीत जास्‍त परतावा मिळायला पाहिजे.  यासाठी स्‍टॉक प्राईस-समभाग खरेदी करत असताना (FCF-Free Cash Flow: the company produces per share) ची आकडेमोड करणे खूपच आवश्‍यक आहे.

म्‍हणजेच कपंनी आपल्‍या दरडोई समभागावर किती नफा कमावून देत असते.

ज्‍याला FCF Yield असेही म्‍हणतात.  यासोबतच तुम्‍हाला हेसुद्धा पाहायला पाहिजे की, डिव्हिडंड-लाभांश आणि बायबॅक द्वारे समभागधारकांना किती परतावा मिळाला आहे, ज्‍याला शेअरहोल्‍डर्स यिल्‍ड (Shareholders Yield) असे म्‍हणतात.

तसेच त्‍या कंपनीच्‍या डिव्हिडंड यिल्‍डचीसुद्धा तुम्‍हाला माहिती असणे गरजेचे आहे. म्‍हणजेच, कोणतेही स्‍टॉक्‍स तुम्‍हाला आजच्‍या तथ्‍यानुसार भविष्‍यात किती लाभांश मिळवून देऊ शकतील.

ह्या तीन गोष्‍टींद्वारे तुम्‍ही हे शोधू शकता की तुम्‍ही ज्‍या स्‍टॉक्‍समध्‍ये तुम्‍ही गुंतवणूक करत आहात ते तुमच्‍या पैशांचे किती मूल्‍य ठेवत आहे. (Value for Money)

फॅल्‍कन पद्धतीमध्‍ये लेखक म्‍हणतात की, वरील तीन गोष्‍टींना लक्षात ठेवून तुम्‍हाला निवडक कंपन्‍यांना रॅंक-गुणदान करायला पाहिजे. आणि हे बघायला पाहिजे की कोणती कंपनी तुम्‍हाला अधिकाधिक परतावा देण्‍याची क्षमता ठेवून आहे, आणि त्‍यामध्‍ये तुम्‍हाला गुंतवणूक करायला पाहिजे.

Quantum Investing Model vs the Falcon Investing Model

Quantum Investing Model
v/s
The Falcon Investing Model

सर्वसाधारणपणे अधिकतर लोकं शेअरमार्केटमध्‍ये गुंतवणूक करताना क्‍वांटम गुंतवणूक पद्धतीचा वापर करत असतात. ह्या पद्धतीमध्‍ये एक गुंतवणूकदार एका कंपनीला चांगल्‍याप्रकारे अभ्‍यासतो, त्‍या कंपनीचा व्‍यवसाय प्रकार, त्‍यांची बाजारातील पत, त्‍या कंपनीची वाढ, नफा-फायदा, लाभांश ह्या सर्व तथ्‍यांना आणि काडेवारीला लक्षात ठेवून कंपन्‍यांची यादी तयार करतात, ज्‍या कंपन्‍यांमध्‍ये ते आपला पैसा गुंतवणूक करू इच्छितील.

आणि असे लोकं, कमीतकमी एका वर्षासाठी पैशांना गुंतवून तसेच सोडून देतात. 

ज्‍यामुळे त्‍यांना चांगला परतावा मिळतो, आणि ते एका वर्षानंतर त्‍या समभागांना विकून इतर कंपन्‍यांचे शेअर खरेदी करून किंवा आपल्‍या गुंतवणूकीला डायव्‍हर्सिफाय करून- वैविध्‍य आणून ह्याच पद्धतीचा वापर करून पुनर्गुंतवणूक करतात.

आणि ह्याच प्रक्रियेला दरवर्षी रिपीट करतात. क्‍वांटम मॉडेलची पुनरावृत्‍ती दरवर्षी चालूच राहते. लेखक असे म्‍हणतात की,  

क्‍वांटम मॉडेलमध्‍ये काहीच वाईट नाहिये, कारण ही पद्धत मुळातच तथ्‍यांवर आणि आकड्यांवर आधारित आहे. तुमच्‍या भावना तुमच्‍या गुंतवणूकीला प्रभावित करत नाहीत.   

परंतू ह्या पद्धतीमध्‍ये तुम्‍ही निव्‍वळ शुद्ध परताव्‍यावर लक्ष केंद्रित करता. हेच कारण आहे की, बरेच लोकं अश्‍या कंपन्‍यांमध्‍येही गुंतवणूक करतात ज्‍यांच्‍याबद्दल त्‍यांना काही माहितीच नसते. ज्‍यामुळे गुंतवणूकदारांना ब-याचवेळेस मोठे नुकसान त्‍यांच्‍या गुंतवणूकीवर सहन करावे लागते.

अशाच चुकांपासून वाचवण्‍यासाठी लेखकांनी द फॅल्‍कन पद्धत बनविली, जी, अचूक, अत्‍यंच संरचित गुंतवणूक करण्‍याची पद्धत आहे ज्‍यामध्‍ये दीर्घ काळामध्‍ये पॅसिव्‍ह इन्‍कम निर्माण करण्‍याची क्षमता आहे.

1.   Use Buy & Hold Technique

अर्थातच लेखक द फॅल्‍कन पद्धतीमध्‍ये बाय एण्‍ड होल्‍ड तंत्राचा वापरकरण्‍याचा सल्‍ला देतात.  तुम्‍हाला असा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे ज्‍यामध्‍ये तुम्‍ही समभागांना-शेअर-स्‍टॉक्‍स दीघा्रवधीपर्यंत धरून ठेवू शकाल.

म्‍हणजे, लवकरात लवकर खरेदी-विक्री करायची नाही.

द फॅल्‍कन पद्धतीमध्‍ये तुम्‍ही कधीही कोणत्‍याही अनोळखी कंपनीमध्‍ये गुंतवणूक करत नाहीत, आणि दरवर्षी शेअरर्सची खरेदी-विक्री करून परतावा घेत नाहीत, तर त्‍यांना दीर्घ काळापर्यंत धरून ठेवून समभागांच्‍या लाभांश, चक्रवाढीचा फायदा करून घेऊन पॅसिव्‍ह इन्‍कम निर्माण करून घेता.

बाय एण्‍ड होल्‍ड ह्या तंत्राबद्दल लेखक पुढे अधिक सविस्‍तर सांगतात.

Use a Buy and Hold Stock Portfolio:

स्‍टॉक्‍समधून उत्‍पन्‍न निर्माण करण्‍यासाठी तुम्‍हाला खूप संयमी व्‍हावे लागेल. जोपर्यंत तुमचा पैसा चक्रवाढीच्‍या  (Compounding) आठव्‍या आश्‍चर्याला येऊन स्‍पर्श करत नाही तोपर्यंत तुम्‍हाला तुमचे समभाग-स्‍टॉक्‍स होल्‍डकरून ठेवायचे आहेत.

कारण, दीर्घावधीमध्‍ये तुमचा गुंतवलेला पैसा चक्रवाढीमुळे अधिक दराने, अतिशय द्रुतगतीने, जोमाने वाढायला लागतो. जिथे तुम्‍ही तुमच्‍या गुंतवणूकीमधून एखादा भाग काढूनही घेत असलात तरीही तुमची उर्वरित गंतवणूक चक्रवाढीमुळे तुम्‍हाला उच्‍च परतावा-High Returns देत राहिल.

आणि कंपाऊंडींग अर्थातच चक्रवाढीमुळे तुमचा एक पॅसिव्‍ह इन्‍कमचा झरादेखिल (Passive Income Stream) निर्माण होऊन जाईल.

COMPOUNDING- चक्रवाढ
Eighth Wonder – आठवे आश्‍चर्य

ह्यासाठीच तुम्‍हाला बाजारातील भावनांपासून दूर होऊन आपल्‍या स्‍टॉक्‍सना, गुंतवणूकीला नुकसानीच्‍या-तोट्याच्‍या भितीमुळे कधीही विकायला नाही पाहिजे. कारण दीर्घावधीमध्‍ये (long term) तुमचे नुकसान होण्‍याची शक्‍यता जवळजवळ अशक्‍य होऊन जाते. 

तुम्‍हाला आपल्‍या स्‍टॉक्‍सना नेहमीच होल्‍ड करून ठेवायला पाहिजे आणि (Compounding Magic) चक्रवाढीला आपला जादू दाखवून देण्‍याची वाट पाहायला पाहिजे.

When to Sell? विक्री कधी करायची?

द फॅल्‍कन पद्धतीचा उद्देश तर हेच आहे की, तुम्‍हाला स्‍टॉक्‍स-समभाग खेरीदी करून होल्‍डकरून ठेवायचे आहेत.  परंतू काही दुर्मिळ बाबी अशा असतात जेथे तुम्‍ही होल्‍ड केलेल्‍या स्‍टॉक्‍सना विक्री करण्‍याची आवश्‍यकता असते.  अशावेळी लेखक आपल्‍याला पुढील गोष्‍ट करण्‍याचा सल्‍ला देतात.

तुम्‍हाला दोन प्रसंगामध्‍ये आपल्‍या होल्‍डींग विक्री करायला पाहिजे:

खरेदी केलेले समभागांची किंमती वाढून जातील- (Over Value- Sell) ओव्‍हर व्‍हॅल्‍यूड

जेव्‍हा स्‍टॉक्‍स अतिमूल्‍याचे(Highly Over Valued) होतील तेंव्‍हा विक्री करायला पाहिजे, म्‍हणजे समभाग-शेअरची किंमत कंनीच्‍या ख-या किंमतीपेक्षा खूपच जास्‍त होईन जाईल तेव्‍हा.  कंपनीमध्‍ये एक आर्थिक बुडबुडा-Financial Bubble तयार होत असल्‍याचे ते द्योतक आहे, चिन्‍ह आहे.  अशावेळी तुम्‍हाला आपल्‍या होल्‍डींग्स विक्री करायला पाहिजे.

 

कंपनी आपले लाभांश कमी करेल तेव्‍हा: (Company Reduces Dividend)

जेव्‍हा कंपनी आपले लाभांश कमी करते तेव्‍हा तुम्‍हाला आपले शेअर-समभाग विकून टाकायला पाहिजे, कारण शेवटी ते तुमच्‍या (Negatively Effects your investments) गुंतवणूकीला ऋनात्‍मकदृष्‍ट्या प्रभावित करत असते.   

ऋणात्‍मक प्रभावामुळे फॅल्‍कन पद्धतीच्‍या उद्दिष्‍टावर गदा आल्‍या सारखे होते.  गुंतवणूकीचे ध्‍येय साध्‍य होणार नाही.  फॅल्‍कन मेथड काम करू शकनार नाही.   यामुळे तुम्‍हाला तुमचे शेअर विकून टाकायला पाहिजे.

कारण, आपण जेव्‍हा त्‍या कंपनीची निवड केली होती, तेव्‍हा कंपनीशी संबंधीत कित्‍येक तथ्‍यांना आकडेमोड करून आपण आपला निर्णय घेतलेला होता. जो Dividend Cut-लाभांश वगळूण्‍यात आल्‍यास ते साध्‍य होणारच नाही.

गुंतवणूकीवर योग्‍य धनात्‍मक परिणाम करू शकनार नाही. कारण आपली सगळी आकडेमोड खराब झालेली आहे. अशावेळीदेखिल आपल्‍याला आपले शेअर-समभाग विकायला पाहिजे.

आणि फॅल्‍कन पद्धतीला पुःन्‍हा लागू करायला पाहिजे. 

 

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील इतर आर्थिक विषयावरील लोकप्रिय, दर्जेदार पुस्‍तक सारांश-परिचय 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive