बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र || राजा शिवछत्रपती || पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी

इतिहासावर जेवढा हक्‍क इतिहासकारांचा आहे तेवढाच कवी आणि कादंबरीकारांचाही आहे.  या गटात शिवशाहीर येतात.  श्रद्धा आणि अभ्‍यास यांचे आपापसातले युद्ध शिवशाहिरांच्‍या योगदानानंतरही चालूच रा‍हील 


 बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र

|| राजा शिवछत्रपती ||

(पुर्वार्ध)

बाबासाहेब पुरंदरे

पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी

 


गेल्‍या पन्‍नास वर्षात त्‍याच्‍या मुखपृष्‍ठावरचे महाराजांचे चित्र बदललेले नाही.  त्‍यात एका ठिकाणी संपूर्ण पानभर फिकट गुलाबी रंगात पावनखिंडीत शिवाजी महाराज बाजीप्रभूंशी बोलताहेत असे चित्र होते.  त्‍यावेळी पुस्‍तकातल्‍या त्‍या पानातला संवाद ऐकू येईल, असे वाटायचे.  शिवशाहिरांच्‍या पुस्‍तकाने आणि त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांनी इतिहास नामक विषयाचे दार केवळ किलकिले नाही केले, तर धाड्कन लाथ मारून उघडून दिले. 

लेख साभारः रवींद्र कुलकर्णी, पुण्‍यनगरी, बुक शेल्‍फ
संपर्कः ९८१९२४७०९३
| kravindrar@gmail.com

 

||राजमुद्रा||

 

शिवाजी महाराज राजमुद्रा फोटो शिवरायांची मुद्रा प्रथम किती सालच्या पत्रावर आढळते rajmudra caption प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते राजमुद्रा अंगठी rajmudra in sanskrit

|| प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावंतस्, सिंहासनाधिश्र्वर, महाराजाधिराज, महाराज,
श्रीमंत श्री, श्री श्री छत्रपती, शिवाजी महाराज...की जय..
! ||

 

(महत्‍वाची टीपः बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन दि.15 नोव्‍हेंबर २०२१ रोजी झाले त्‍यानंतर हा लेख हाती लागला म्‍हणून लेखात काहीही बदल केलेला नाही याची सूजान वाचकांनी नोंद घ्‍यावी)

बाबासाहेब पुरंदरे शंभरीत शिरले हे खरे न वाटण्‍याचे काहीच कारण नाही. (बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन दि.१५ नोव्‍हेंबर २०२१ रोजी येथे झाले) माझीच पन्‍नाशी उलटून गेली.  अनेक गोष्‍टी विसरल्‍या गेल्‍या. 

ते अंगण गेले, तुळशी वृंदावन गेले, असले काही म्‍हणत टिपे गाळण्‍याचा माझा स्‍वभाव नाही.  जुने गेले व नवीन बरेच मिळालेही आहे. 

जुने गेले तरी विसरले गेले नाही अशा फार थोड्या गोष्‍टी आहेत त्‍यात बाबासाहेबांचे राजा शिवछत्रपती आहे.  दोन खंडातल्‍या हार्डबाऊंड स्‍वरूपात मी ते पहिल्‍यांदा पाहिले.  त्‍याच वेळेला चौथीच्‍या पाठ्यपुस्‍तकात इतिहासात शिवाजी महाराज होते.

गेल्‍या पन्‍नास वर्षात त्‍याच्‍या मुखपृष्‍ठावरचे महाराजांचे चित्र बदललेले नाही.  त्‍यात एका ठिकाणी संपूर्ण पानभर फिकट गुलाबी रंगात पावनखिंडीत शिवाजी महाराज बाजीप्रभूंशी बोलताहेत असे चित्र होते.  त्‍यावेळी पुस्‍तकातल्‍या त्‍या पानातला संवाद ऐकू येईल, असे वाटायचे.

शिवशाहिरांच्‍या पुस्‍तकाने आणि त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांनी इतिहास नामक विषयाचे दार केवळ किलकिले नाही केले, तर धाड्कन लाथ मारून उघडून दिले.  मी ते वाचले नसते, तर इतिहास नामक विषयाचे मूर्त स्‍वरूप मी सहज कल्पिणे अवघड होते.

कुठल्‍याही धर्मातल्‍या निराकार ईश्‍वराला चित्रकलेच्‍या सहाय्याने वा, मूर्तीकलेल्‍या मदतीने मूर्तस्‍वरूप देऊन कलाकारांनी त्‍या परमेश्‍वराला सामान्‍यांच्‍या आवाक्‍यात आणण्‍याचे जे काम केले तेच काम या पुस्‍तकातल्‍या भाषेने आणि त्‍यातल्‍या दिनानाथ दलालांच्‍या चित्रांनी इतिहासाबाबत माझ्या पिढीसाठी केले आहे.

त्‍या पुस्‍तकाचा प्रभाव माझ्यावर फार काळ राहिला नाही; पण त्‍याने माझा पुढचा प्रवास सोपा केला.

नंतर काही वर्षांनी अ.रा.कुलकर्ण्‍यांचे शिवकालीन महाराष्‍ट्र वाचले तर ते कोरडे वाटले नाही.  आजही इतरांना कितीही कोरडे वाटणारे मजकूर असलेले वा त्‍यावेळच्‍या अर्थकारणाचे आकाडे छापलेले इतिहासाचे पुस्‍तक मी आपले म्‍हणू शकतो. 

 

आज शिवशाहिरांचे शिवचरित्र मला आवडते का? या प्रश्‍नाचे स्‍पष्‍ट उत्‍तर नाही, असे आहे.  माझ्या स्‍वभावानुसार मी शिवशाहिरांच्‍या दारात फार रेंगाळलो नाही.  आता ते पुस्‍तक वाचले तर हसू येते.  वाढलेल्‍या वयातही जी माणसे त्‍यात रमतात त्‍यांच्‍याशी माझे जमत नाही.

या पुस्‍तकानंतर अनेक ऐतिहासिक खरे तर अनऐतिहासिक कादंब-या व कथा आल्‍या.   पुराणात रमणा-या आपल्‍या समाजमनाने इतिहास हा केवळ रमण्‍याचा, अभिमानाचा विषय केला. 

अजूनही महाराष्‍ट्राबाहेरही इतिहास आहे हे आपल्‍या ध्‍यानात येत नाही.  गनिमी काव्‍यातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही.  आजही किती सहज आपण दुखावले जातो!

शिवाजी महाराज समजून घ्‍यायचे असतील तर औरंगजेब समजला पाहिजे हे कुरुंदकरांचे म्‍हणणे डावलून त्‍यापुढच्‍या श्रीमान योगीकडे आपली धाव असते; पण त्‍याबरोबर अभिमान, समाजाच्‍या श्रद्धा खुंटीवर टांगून निर्लेप मनाने इतिहास लिहिला जाऊ शकतो काय? वर्तमान राजकारणाच्‍या चष्‍म्‍यातून इतिहास पहाणे टाळणे शक्‍य आहे काय?

केवळ सत्‍तर वर्षांपूर्वी झालेल्‍या दुस-या महायुद्धाचा (WW2) इतिहास लिहिताना तो किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिला गेला आहे, याचा आढावा द बॅटल फॉर हिस्‍ट्री’, रि फायटिंग वर्ल्‍ड वॉर टू या छोट्याश्‍या पुस्‍तकात लष्‍करी इतिहासकार जॉन किगन याने घेतला आहे. 

तो लिहितो, ‘इंग्रजी भाषेतल्‍या दुस-या महायुद्धाच्‍या विद्यार्थ्‍यांना द नेकेड एन्‍ड डेड ही कादंबरी लिहिणारा नॉर्मन मिलर वा मेन एट आर्म्‍स लिहिणारा इव्हिलियन वॉ सारखा कादंबरीकार टाळता येणार नाही.

इतिहासावर जेवढा हक्‍क इतिहासकारांचा आहे तेवढाच कवी आणि कादंबरीकारांचाही आहे.  या गटात शिवशाहीर येतात.  श्रद्धा आणि अभ्‍यास यांचे आपापसातले युद्ध शिवशाहिरांच्‍या योगदानानंतरही चालूच रा‍हील; पण इतिहासाचा कितीही अभ्‍यास केला तरी आणि अगदी कोणी अखंड भारताची जरी लालूच दाखवली तरीही मी महाराजांना वाट चुकलेला देशभक्‍त असे म्‍हणू शकत नाही.

राजांना ३०० वर्षे होऊन गेली आहेत.  महाराष्‍ट्राने महाराजांची बाजू सतत लावून धरली आहे.  यात या पुस्‍तकाचा मोठा वाटा आहे.

आज शिवशाहिरांच्‍या शिवचरित्रातले जे आवडते त्‍याचा शिवचरित्राशी संबंध नाही. वर लिहिल्‍याप्रमाणे त्‍यातली चित्रे मी विसरलो नाही.  त्‍यातले विशेष करून अफजलखान, मिर्झाराजे, एक भले मोठे कुलूप त्‍यात वर बसलेला औरंगजेब त्‍याच्‍या पढे खालच्‍या बाजूला भाला घेउन पहारा देणारा भला थोरला सैनिक व त्‍याच्‍या दोन पायांमधून मिठाईचे पेटारे घेऊन बाहेर पडणारे महाराजांचे मावळे, उंबरखिंडीत घोड्यावर बसलेल्‍या देखण्‍या शिवाजी महाराजांच्‍या पुढे दया मागणारा करतलबखान, महमद कुलीखान बनलेले आणि तंबूच्‍या मागून अलगद निसटू पाहणारे नेताजी पालकर!   

हे सारे मला जर त्‍यांच्‍या आधार कार्डासकट भेटले व ते दलालांच्‍या चित्रातल्‍या सारखे दिसत नसतील तर त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवणे मला अवघड आहे.  बाजीप्रभूंना डोक्‍यावर केस नव्‍हते हे दिनानाथ दलालांनी कसे ठरवले, याचे मला फार कुतुहल आहे.

पन्‍हाळगडावरून चोर वाटेने निघाल्‍यावर, रात्री क्षणभर वीज लकाकते आणि आपल्‍याला दिसते की, शिवाजी महाराज पालखीत आहेत व बाजीप्रभू बाजूने चालत आहेत.  त्‍यांचा एक हात तलवारीवर आहे.  लकाकलेल्‍या विजेचा प्रकाश बरोबरच्‍या सैनिकांच्‍या भाल्‍यांच्‍या फाळांवरही पडलेला आहे.


प्रतिमा स्‍त्रोतः www.chhatrapati-shivaji-maharaj-india.blogspot.com

 

हे चित्र घरातले लाईट गेलेले असताना, पागोळ्यांच्‍या बावाजाच्‍या पार्श्‍वभूमीवर पहाणे विलक्षण परिणाम करणारे असते.

ते खोटे असूच शकत नाही.  राजा शिवछत्रपतीची संक्षिप्‍त चित्रमय आवृत्‍ती जी महाराजम्‍हणून काढली आहे त्‍याच्‍या प्रस्‍तावनेत पुरंद-यांनी ही चित्रे कशी काढली गेली, यावर प्रकाश टाकला आहे.

मी दलालांना प्रसंग सांगत असे व ते लगेच पेन्सिलने आकृती काढत.  मी ते तपासायचो व फेरबदल सुचवायचो.  हे काम वर्षभर चालले.  संपूर्ण शिवचरित्र मी त्‍यांना कथन केले व त्‍यांनीद ते चित्रित केले.दिनानाथ दलालांनाच त्‍यंनी ते पुस्‍तक अर्पण केले आहे.

पुरंद-यांच्‍या राजा शिवछत्रपतीया गोड पुस्‍तकावर आणि त्‍याच्‍या लेखकावर नंतर अपेक्षित नसलेले, इतिहासाशी संबंधित नसलेले आरोप झाले.  मनातल्‍या मनात का होईना त्‍याची कारणे शोधणे तसेच त्‍यातले खरे खोटे ठरवणे असभ्‍यपणाचे वाटले.  तोपर्यंत वाढत्‍या वयानुसार पुस्‍तक मनातून हळूहळू उतरून गेले होते.

खूप जगल्‍याने जीवनातील अनेक चांगल्‍या गोष्‍टी मी गमावून बसलो आहे’, हे जी.ए. कुलकर्ण्‍यांचे  वाक्‍य आठवून गेले; पण आपण ते कधीकाळी वाचले होते आणि आपल्‍याला ते आवडले होते याचा आज पश्‍चाताप होत नाही.  या पुस्‍तकाच्‍या ऋणात राहणे मला आवडते.

संपर्कः kravindrar@gmail.com | ९८१९२४७०९३ 

 

 छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1630–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
 
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.
#Is there a real photo of Shivaji Maharaj? Where is Shivaji Maharaj Talwar now? What was Shivaji's height? Is Shivaji a true story?#शिवाजी महाराज राजमुद्रा फोटो #राजमुद्रा अंगठी #rajmudra in sanskrit rajmudra png

 

 

|| राजा शिवछत्रपती  ||

शिवाजी महाराजांची पहिली राजमुद्रा व तिचा अर्थ

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।  
'प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी,
जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे',
 
शिवाजी महाराज यांची दूसरी राजमुद्रा व अर्थ
शिवाजी महाराज यांची दूसरी पण एक राजमुद्रा होती ती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी तयार करून घेतलेली होती. ‘शिव‌छत्रपतींची मुद्रा अष्टभूजा असलेली आहे. यात            

 ‘श्री महादेव श्री तुळजाभवानी II
शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II
एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII’ 
 
असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे. 
या श्लोकाचा मराठी अनुवाद ‘श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: श्री विष्णूच होत. त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे. तिचा जयजयकार असो,’ असा होतो.   
 

 
बाबासाहेब पुरंदरे  

 

प्रतिमा स्‍त्रोतः साभार-www.artstation.com/artwork


👉बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले ऐतिहासिक व अन्य साहित्य  📖📗📘📙

  • आग्रा
  • कलावंतिणीचा सज्जा
  • जाणता राजा
  • पन्हाळगड
  • पुरंदर
  • पुरंदरच्या बुरुजावरून
  • पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
  • पुरंदऱ्यांची नौबत
  • प्रतापगड
  • फुलवंती
  • महाराज
  • मुजऱ्याचे मानकरी
  • राजगड
  • राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार - हेमा हेर्लेकर)
  • लालमहाल
  • शिलंगणाचं सोनं
  • शेलारखिंड. (ही शिवाजी महाराजांच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी. या कादंबरीवर अजिंक्‍य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला "सर्जा‘ हा मराठी चित्रपटही निघाला होता.
  • सावित्री
  • सिंहगड
shivaji maharaj original photo hdshivaji maharaj original photo quorashivaji maharaj original talwar real photo of shivaji maharaj familyshivaji maharaj real faceshivaji maharaj original painting wikipedia

 

इतर संबंधितः ऐतिहासिक

 

📘📗📙📖



www.evachnalay.in

पुस्‍तकातील परिचय-समीक्षा-सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

  


 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive