विचार बदला, आयुष्‍य बदला- लेखक- ब्रायन ट्रेसी -मराठी अनुवाद- सायली गोडसे -पुस्‍तक परिचय

विचार बदला, आयुष्‍य बदला

यशस्वितेसाठी तुमच्‍या संपूर्ण क्षमतांची दारं सताड कशी उघडाल 

 लेखक- ब्रायन ट्रेसी

मराठी अनुवाद- सायली गोडसे 

हे पुस्तक लक्ष्य निर्धारित करण्याच्या, आपल्या विचारांचा विस्तार आणि आपल्या स्वत: च्या अमर्यादित संभाव्य कल्पनांचा महत्त्व यावर लक्ष केंद्रित करते. हे बारा सामर्थ्यवान तत्त्वे प्रस्तुत करते जे कोणत्याही चांगल्या, अधिक समाधानी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनासाठी मदत करतील. 

हे सिद्धांत आपल्याला दर्शवितात की मोठ्या स्वप्नांचे स्वप्न कसे मिळवायचे, आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी, श्रीमंत व्हा आणि आपण स्वत: साठी सेट करू शकणार्या प्रत्येक उद्दीष्टे मिळवा.

📖 पुस्‍तक परिचय

  •  तुम्‍ही तेच बनता, ज्‍याबद्दल तुम्‍ही बहुतांश वेळेला सातत्‍याने विचार करत असता.
  • तुमचं बाह्य जग हे तुमच्‍या आतल्‍या जगाची हुबेहुब प्रतिमा असतं
  •  विचार- एक दुधारी शस्‍त्र आहे.
विचार बदला, आयुष्‍य बदला 
Marathi edition of CHANGE YOUR THINKING CHANGE YOUR LIFE
by Brian Tracy
 

तुमच्‍या शक्‍तीशाली मनातून निघना-या विचारांचा तुमच्‍या जवळपास प्रत्‍येक गोष्‍टींवर ताबा आणि प्रभाव असतो. विचार तुमच्‍या हृदयाचे ठोके वाढवू अथवा कमी करू शकतात, तुमच्‍या पचनसंस्‍थेची कामगिरी सुधारू अथवा खराब करू शकतात, तुमच्‍या रक्‍ताभिसरणारवर परिणाम घडवून आणतात आणि तुम्‍हाला रात्री शांत झोप लागण्‍यासाठी उपयोगी पडतात अथवा तुम्‍हाला तळमळत जागंदेखिल ठेवू शकतात.

तुमचे विचार तुम्‍हाला आनंदी वा दुःखी बनवतात, कित्‍येकदा काही क्षणांतच...!

विचार तुम्‍हाला सावध, सजग बनवतात किंवा सैरभैर, हताश करून टाकतात.  ते तुम्‍हाला लोकप्रिय बनवतात किंवा टीकेचे धन बनवतात. आत्‍मविश्‍वासाने परिपूर्ण बनवू शकतात किंवा असुरक्षित, सकारात्‍मक किंवा नकारात्‍मक काहीही बनवतात. तुमचे विचार तुम्‍हाला शक्तिमान असल्‍याची भावना मिळवून देतात किंवा असहाय बनवितात.  विजेता बनवतात किंवा परिस्थितीची शिकार बनवतात. एकतर हिरो बनवतात किंवा अगदी पळपुटादेखील...!

तुमच्‍या वैवाहिक, वैयक्तिक, व्‍यावसायिक अथवा सामाजिक आयुष्‍यात तुमचे विचारच तुम्‍हाला यशस्‍वी अथवा अशस्‍वी बनवतात.  वैभवसंपन्‍न किंवा हलाखीचं जीवन बहाल करतात, आदरास पात्र बनवतात, किंवा सर्वांत दुर्लक्षित-उपेक्षित बनवून टाकतात.  तुमचे विचार आणि त्‍यामधून होणारी कृती, यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्‍य कसं असेल हे ठरतं.   

आता आनंदाची बातमी अशी, की हे विचार संपूर्णपणे तुमच्‍याच नियंत्रणाखाली असतात, पूर्णतः तुमच्‍या ताब्‍यात... !


  • विचार, भावना आणि इच्‍छाशक्‍ती

तुम्‍ही म्‍हणजेच विचार, भावना, इच्‍छाशक्‍ती, दृष्टिकोण, आत्‍मप्रतिमा अथवा स्‍वप्रतिमा,  भीती, आशा, शंका, मतं आणि महत्‍वाकांक्षा या सगळ्यांचं एक अत्‍यंत जटिल आणि गुंतागुंतीचं मिश्रण आहात.  यापैकी प्रत्‍येक गोष्‍ट सतत बदलत असते, कधीकधी तर प्रत्‍येक क्षणाला.   तुमच्‍या व्‍यक्तिमत्‍वाचा एक अविभाज्‍य भाग असलेली यातली प्रत्‍येक गोष्‍ट दुस-यांवर प्रभाव टाकत असते, कधीकधी तर अत्‍यंत अशक्‍यप्राय वाटणा-या पद्धतीने हा परिणाम घडून येत असतो.

या सा-या घटकांच्‍या परस्‍पर संबंधांवर आणि परस्‍पर सामंजस्‍यावर तुमचं संपूर्ण आयुष्‍य अवलंबून असतं.

तुमचे विचार तुमच्‍यासमोर प्रतिमा, चित्र तयार करत असतात आणि त्‍यांच्‍या समवेत तुम्‍ही आयुष्‍यात पुढे जाणार आहात त्‍या भावनांवर हल्‍ला करत असतात.  या प्रतिमा आणि भावना तुमचा दृष्टिकोन आणि कृती यांच्‍यावर प्रभाव टाकतात आणि मग आयुष्‍यात तुमच्‍या वाट्याला काय प्रसंग येतील, हे तुमच्‍या कृतीवरून ठरतं.

तुमच्‍या कल्‍पनेतून आकाराल आलेली अथवा तुमच्‍या बाह्य जगातल्‍या अनुभूतींमधून साकारलेली प्रतिमा आणि चित्र, त्‍यांना सुसंगत अशा संकल्‍पना, भावना, दृष्‍टीकोन जन्‍माला घालतात.

 

  • दृष्‍टीकोन, कृती आणि भावना

तुमचे दृ‍ष्टिकोन सकारात्‍मक अथवा नकारात्‍मक, सृजनशील किंवा विध्‍वंसक कसेही असोत, ते तुमची एक सुसंगत प्रतिमा तयार करत असतात, भावनांना जन्‍म देत असतात आणि तुमच्‍या आयुष्‍यावर, संबंधावर परिणाम करणा-या कृतींमध्‍ये रूपांतरित होत असतात.

भूतकाळात तुमच्‍या वाट्याला आलेले कटू-गोड अनुभव, तसंच परिस्थिती कशी असावी याबाबतच्‍या तुमच्‍या मूलभूत धारणा, यानुसार तुमचा दृष्‍टीकोन ठरत असतो.

दृष्‍टीकोनामुळे समजूती बनतात, स्‍वतःच्‍या समजूतींना आव्‍हान देऊन, आपल्‍या विचारांची निवड करून आपण स्‍वतःबद्दलचे आणि आपल्‍या क्षमतांबद्दलचे विचार कशा प्रकारे बदलून टाकू शकतो हे या पुस्‍तकातून तुम्‍हाला अगदी क्रमवार तसेच सुसंगत पद्धतीने समजून येतं ज्‍यामुळे आयुष्‍यातील प्रत्‍येक क्षेत्रात यश मिळविणं तुम्‍हाला शक्‍य होतं, म्‍हणून प्रत्‍येकाने वाचलेच पाहिजे असे हे पुस्‍तक आहे. 

 

👉विचार बदला, आयुष्‍य बदला....! 👍

 

👉विचार बदला, आयुष्‍य बदला....! 👍

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

#विचार बदला, आयुष्‍य बदला मराठी लेखक- ब्रायन ट्रेसी #Change Your Thinking Change Your Life By Brian Tracy #habits, #Think and grow rich, #Attitude is everything, #Self-help, #emotions, #sentiments, #mentality, #mind, #subconscious mind, #power of subconscious mind #अंतर्मन, #मानसिकता, #सकारात्‍मक, #नकारात्‍मक #विचार, #भावना, #दृष्‍टीकोन, #दृष्‍टीकोन हेच सर्वकाही, #स्‍वभाव, #सवयी, #स्‍वयंमदत

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive