Eat That Frog Author Brian Tracy Book Summary in Marathi-Part-1| इट दॅट फ्रॉग-लेखक ब्रायन ट्रेसी मराठी अनुवाद पुस्तक सारांश भाग-१
Sarvat Kathin Kaam Sarvat Aadhi Kara
| Book Summary
(सर्वांत कठीण काम सर्वांत आधी करा- मराठी पुस्तक सारांश)
स्वागत आहे सर्वांचं www.evachnalay.in या संकेतस्थळावर म्हणजेच आपल्या ई-वाचनालयात...
जगामध्ये महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, उद्योजक, लेखक, कलाकार, कारागिर यांपासून ते भारतामध्ये मजूरी करणारे मजूरदार, शेतकरी, विद्यार्थी, गृहिणी म्हणजेच प्रत्येकाला दिवसाचे २४ तासच मिळतात.
परंतू प्रत्येकाला त्या २४ तासांचा उपयोग करून आपले जीवन समृद्ध बनविण्यासाठी कशाप्रकारे सदुपयोग करता येईल अथवा स्वतःला घडविण्यास सत्कारणी लावता येईल, ह्याविषयी महत्वाचे साधन वेळ ज्यावर कोणाचाही प्रभाव अथवा नियंत्रण नाही.
वेळ सर्वांसाठी सारखाच असतो मग त्या मिळणा-या वेळेत सगळ्याच गोष्टींचे महत्व वाटायला लागते, आहे त्या वेळेतच सर्व गोष्टी कशा प्राप्त कराव्या ह्यासाठी आपल्याला आपला दिरंगाईपणा अथवा कामचुकारपणा, चालढकलपणा थोडक्यात सवयींचा सापळा कसा नडतो परिणामस्वरूप आपण आहोत तसेच आणि तेवढेच राहतो, आपली वाढ होत नाही आणि जीवनात इतर आपल्या पुढे कसे काय जातात?
ह्याचे उत्तर आहे नियोजन.
वेळेचे उत्तम नियोजन कसे करावे?
त्यासाठी आपल्याला सकाळी उठल्याबरोब्बर त्या बेडकाला खावे लागेल... !
चला तर मग त्या बेडकाला खाण्यास सुरूवात करूया म्हणजेच पुस्तक सारांश सुरू करूया...
🐸
परत एकदा वाचकांसाठी घेऊन आलो आहोत एक उत्कृष्ट पुस्तक सारांश, आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर, १० लाखांपेक्षा अधिक प्रति विक्री झालेले पुस्तक ज्याचे नांव आहे इट दॅट फ्रॉग (EAT THAT FROG) आणि लेखक आहेत ब्रायन ट्रेसी-Brian Tracy.
इंग्रजी आवृत्ती खरेदीसाठी |
- या पुस्तकातून वेळेचं प्रभावी नियोजन कसं करायचं आणि त्याच्या आधारे दररोज
आपल्या पुढ्यातील महत्त्वाची कामं, आव्हान कार्यक्षमतेने कशी पार पाडायची
याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
मराठी आवृत्ती खरेदीसाठी
- आयुष्य जगताना सर्वांत कठीण, अवघड
कामांची योग्य ती विभागणी करणे आवश्यक असते.
- अधिक महत्त्वाचं काय आहे, हे तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जाणून घेऊन वाया जाणारा वेळ कसा वाचवायचा, तसेच
- लक्ष विचलित करणा-या, दिशाभूल करणा-या बाबींना टाळून चित्ताची एकाग्रता
कशी टिकवून ठेवायची, हेही यात सांगण्यात आले आहे.
वाचकमित्रांनो Don't judge a book by its cover ह्या उक्तीप्रमाणेच जर पुस्तकाचे नांव पाहायला गेलोत (EAT THAT FROG) तर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो त्या बेडकाला खा... म्हणजेच आपल्याला प्रत्यक्षात असेकाही करावयाचे नसून लेखकांनी आपल्या यशाच्या मार्गात येणा-या टाळाटाळ, कामचुकारपणा, चालढकलपणा, दिरंगाईपणा, बेजबाबदारपणा, अडथळे, दिनचर्या, सवयी इत्यादींसाठी सूचक शब्दप्रयोग येथे केलेला असून त्याद्वारे नियोजनाचा महत्वाचा भाग म्हणजेच अत्यंत कष्टदायी आणि मोठे वाटणारे काम आपल्याला प्रथम करायला पाहिजे त्यासाठी हा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजेच इट दॅट फ्रॉग.
महासागरांमध्ये ज्या लाटा असतात त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा कित्येकवेळा आपल्या कार्याला पुर्ण करण्यात आणि जबाबदा-या निभावण्यात एवढे गढूण आणि गुंतून जाता की तुम्ही सर्वकाही विसरून जाता. हेच ते कारण आहे की ज्यामुळे तुम्ही विचित्र होऊन जाता, तसे होण्याची काही गरजच नसते.
नेहमीच एखाद्या मोठ्या कामापासून सुरूवात करा, जो अत्यंत महत्वपूर्ण काम आहे त्याला पूर्ण करण्यास हातात घ्या व पूर्ण करा. लेखकांनी आपल्या दैनंदिन जीवनात एक समानता दाखविण्यासाठी एका जीवंत बेडकाचे उदाहरण घेतले आहे.
असे समजा की तुम्हाला एक जीवंत बेडुक गिळायचे अथवा खायचे आहे तेंव्हा एक महत्वाचे काम करा, त्या बेडकाला लगेच खाऊन टाका..! म्हणजेच जे करायचे आहे लवकर ते करून मोकळे व्हा, त्याकडे पाहात बसण्यात वेळ वाया घालवू नका.
तर यशस्वी होण्यासाठीचा हा एकमेव गुप्त राजमार्ग आहे की, ''जे करायचे आहे त्याला आज आणि आत्ता लगेच करा.''
''जे करायचे आहे त्याला आज आणि आत्ता लगेच करा.''
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
इट दॅट फ्रॉग ह्या पुस्तकात २१ रणनीतींबद्दल चर्चा केलेली आहे ज्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करून तुम्ही यशस्वी होऊ शकता असे लेखकांचे म्हणणे आहे.
असे कित्येक अभ्यास करण्यात आलेले आहेत ज्यांद्वारे असे समजले की, यशस्वी लोकांची लगेच कृती (Action) करण्याची सवयच त्यांना यश प्राप्त करून देत असते. कित्येक लोकं असे असतात जे बैठकांवर बैठका घेतात, खूप मोठ-मोठी आणि अतिउत्कृष्ट नियोजने करतात तरीही त्यांचे काम म्हणजेच टास्क पुर्ण होत नाही. यासाठी तुम्हाला कार्यक्षम (Productive) बनायचं आहे तर तुम्हाला कार्यक्षम (Productive) बनन्याची सवय सुद्धा बनवावी लागेल.
कामाला पुढे न ढकलण्याची सवय, प्राथमिकता ठरविणे आणि तुमच्या अत्यंत महत्वाच्या कामाला हाताळण्यासाठी तुमच्याजवळ कौशल्य असणे गरजेचे आहे. जेंव्हा तुम्ही एकापेक्षा अधिकवेळा ह्या गोष्टी कराल तर तेंव्हा ही आपोआपच तुमची सवय बनून जाईल. जेंव्हा तुम्ही एखादे महत्वाचे काम पूर्ण करत असता तेंव्हा तुमच्या शरिरामध्ये एन्डॉर्फिन नावाचे रसायन स्त्रवत असते. हे रसायन तुमच्या शरिरामध्ये कामासाठी एकप्रकारे नशा चढवितो.
आता यापेक्षा अधिक काय चांगले होईल की तुमच्यामध्ये एक व्यसनच जन्म घेईल जो तुम्हाला तुमच्या अपुर्ण कामाला पूर्ण करण्यासाठी मजबूर करेल. नंतर मग तुमच्यासाठी ही एक सहज सवय बनून जाईल आणि सर्वात मोठी गोष्ट यशासाठी जे थ्री-डी (3-D) आहेत त्यापैकी एक आहे Decision म्हणजेच कामाला करण्याचा निर्णय.
दुसरा आहे Discipline म्हणजेच अनुशासन ज्यामुळे एखादे कार्य पूर्णत्वास नेले जाईल आणि तिसरा आहे Determination-दृढनिष्चय म्हणजेच जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला सोडायचेच नाही. आणि शेवटी तुम्हाला खरोखरच एक यशस्वी व्यक्ती व्हायचे असल्यास तर स्वतःला अशाच प्रकारे Visualize करा, म्हणजेच स्वतःला एका यशस्वी व्यक्तीसारखे पाहा.
3 D's of Success
- Decision - निर्णय
- Discipline- अनुशासन
- Determination-दृढनिश्चिय
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
जेंव्हा तुम्ही चालढकलपणाच्या सवयीपासून सुटका करून घ्याल आणि आपल्या कार्याला लवकरात लवकर पूर्ण करण्याची सवय बनवून घ्याल तर असे समजा की तुम्ही यशाच्या मार्गावर पळायला लागलात.
तर चला मग पुढे जाऊया आणि पाहुया "सेट द टेबल" विषयी,
म्हणजेच एक सिंह शिकार करण्या अगोदर काय करतो? अगदी बरोब्बर..! तो सिंह सर्वांत अगोदर आपल्या भक्ष्याला निवडतो ह्याच प्रकारे तुमचेदेखिल मुख्य ध्येय अथवा लक्ष्य अगोदरपासूनच पुर्णपणे निवडलेले असायला पाहिजे आणि न थांबता आपल्या पुर्वनिश्चित कामाला सरू करून टाकायला पाहिजे.
"Goal म्हणजेच आपल्या लक्ष्याची स्पष्टताच नाही तर त्याला
कसे करायचे ह्या गोष्टीत देखिल स्पष्टता ठेवा"
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
- How to Set Goals | Complete Guide to Goal Setting
ध्येय ठरविण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन - ध्येय कसे ठरवावे?
- S.M.A.R.T. GOALS v/s S.M.A.R.T.E.R. GOAL स्मार्ट गोल्स
- ध्येय लिहून काढण्याची किमया
- वारेन बफेट यांची पद्धत 5/20 (Warren Buffett's 5/25 Rule for Goal setting)
- जीवनात ध्येयांचे महत्व: गोल्स- पुस्तक सारांश
- जाणून घ्या स्वताःचा कल, नैसर्गिक गुण, ओढ़, आवड, पॅशन- इकिगाई
जर तुम्हाला अल्पकाळातच आपली उत्पादकता वाढवायची आहे तर आम्ही तुम्हाला ७-निर्णायक पाय-या सांगत आहोतः
- पहिली पायरी अशी आहे की तुम्ही अगोदर हे ठरवा की तुम्हाला नेमकं काय पाहिजे? (Decide) जरा विचार करा की एका सिंहासाठी यापेक्षा काय वाईट असेल की तो एका चूकीच्या भक्ष्याच्या मागे पळेल.
- दुसरी पायरी जे करायचे ठरविलेले आहे त्याला लिहून काढा. (Write) आपल्या ध्येयाला कागदावर लिहिण्यामुळे तुम्ही प्रेरित होत असता, तुम्हाला स्पष्टपणे आणि अचूकपणे पूर्ण करण्याची शक्ती मिळते त्या कार्याला पूर्ण करण्यासाठी.
- तिसरी पायरी आहे एक अंतिम मुदत (Deadline) ठरवून घ्या. सिंह आपला शिकार करण्यामध्ये एवढा यशस्वी कसा काय होतो? कारण तो असे करण्यामध्ये उशिर करत नाही. तो आपल्या भक्ष्याला त्याचवेळी शिकार करेल.
- चौथी पायरी अशी आहे की एक यादी बनवून घ्या की तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कोण-कोणत्या पाय-यांची आवश्यकता लागणार आहे. आणि
- पाचवी पायरी ही आहे की ह्या यादीला व्यवस्थित करून घ्या कारण ती एक यादी न राहता एक योजना बनून जाईल. तर प्राथमिकता आणि क्रमवारिता यांच्याहिशोबाने व्यवस्थित करून घ्या. आणि असे करणे यासाठी आवश्यक आहे की तुमचे काम लहान-लहान वैयक्तिक नेमून दिलेल्या कामगिरीत रूपांतरीत करू शकू अथवा विभाजीत करू शकू जो सहजरित्या पूर्ण होऊ शकेल आणि तुम्ही त्याला पूर्ण करू शकाल.
- सहावी पायरी सांगते की जी काही कृती करावयाची आहे ती आत्ता, लगेच घेऊन टाका. उद्याची वाट पाहू नका. जे करायचे आहे ते आता ह्यावेळीच करा. आणि
- सातवी पयरी आहे की दररोज असं काहीतरी करा जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. मग ते एक छोटेसे पाऊलही का असेना. मग ते छोटे पाऊल एखाद्या नव्या भाषेचे शब्दच तुम्ही का शिकत नाही. अथवा काहीतरी वाचन करा.
- तर इथे महत्वाची गोष्ट ही आहे की, एकदाका तुम्ही सुरूवात केली तेंव्हा तुम्हाला थांबायचे नाही आहे, तुमची प्रगती छोटीशीच का असेना ती आहे तर खरी.
तुमची प्रगती छोटीशीच का असेना ती आहे तर खरी"
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
ह्या सप्तसूत्री पाय-यांनंतर पुढे पाहूया ''प्लॅन एव्हरी डे इन एडव्हान्स''विषयी..
☯ प्लॅन एव्हरी डे इन एडव्हान्सः
साहजिकच आहे त्याला लहान-लहान तुकडे करून..!
अगदी बरोब्बर... ! तर, ध्येयांच्या बाबतीतसुद्धा अगदी असाच सारखेपणा आहे.
PLAN EVERYDAY IN ADVANCE
एक दिवस अगोदरच आपल्या पुढील दिवसाचे नियोजन करणे
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
हा चालढकलपणापासून वाचण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कारण जेंव्हा तुमचे ध्येय लहान-लहान कृतींमध्ये विभागले जाते तेंव्हा त्यांना पूर्ण करणे जास्त सोपे व सहज होऊन जाते.
ह्यासोबतच तुम्हाला एक उत्कृष्ट नियोजन बनवून चालावे लागेल. कोणतेही सोधे-सुधे नियोजन नाही चालणार. येथे तुम्हाला इंग्रजीतील सहा ''पी'' (6-P's of Planning) बद्दल सांगणार आहोत जी तुमच्या नियोजनाच्याविषयीचे गोंधळ दूर करेल व नियोजनात आपल्याला मदत करतील. ते पुढील प्रमाणे आहेतः
☯ नियोजनाचे ६ पी (6-P's of Planning):
Proper-Prior-Planning-Prevents-Poor-Performance
योग्यरित्या पुर्वीच केलेले नियोजन खराब कामगिरीला प्रतिबंध करते
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
- Proper - योग्य
- Prior - पुर्व
- Planning - नियोजन
- Prevents - प्रतिबंध
- Poor - खराब
- Performance- कामगिरी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
एखाद्या इंग्रजी भाषेतील ''टंग ट्विस्टर'' सारखे वाटू शकते. परंतू ह्यामुळे तुमचे नियोजन अचूक होईल. म्हणजेच तुमच्या पुढील दिवसाचे करावयाचे काम आदल्या दिवशी एका कागदावर लिहून काढा, ह्यामुळे तुमची उत्पादकता २५% वाढते. तुमची यादी प्रत्येक स्तरावरील असायला पाहिजे. म्हणजेच मासिक-साप्ताहिक आणि दैनंदिन ह्या पद्धतीने.
- Monthly- मासिक
- Weekly- साप्ताहिक
- Daily- दैनंदिन
ह्या यादीमधून एखादी गोष्ट तुम्ही आयटम ट्रान्सफर करून तुम्ही तुमचा दिवस अधिक उत्पादक अथवा परिणामकारक बनवू शकता. म्हणजेच तुमच्या ध्येयाशी निगडीत आवश्यक वाटणारी एखादी गोष्ट मासिक ऐवजी साप्ताहिक अथवा दैनंदिन ध्येयांच्या यादीमधून काढू शकता अथवा एखादी गोष्ट टाकूही शकता. वाढवू शकता.
जर तुम्हाला एखादे प्रोजेक्ट अथवा प्रकल्प पूर्ण करायचे आहे समजा, तर पहिले पाऊल हे घ्या की अगोदर त्या सर्व पाय-या लिहून काढा ज्या तुमच्या ध्येयाला मिळविण्यासाठी लागतील, आणि जेंव्हा तुम्ही ह्या पाय-यांवर काम कराल तेंव्हा ज्या पाय-या पूर्ण झालेल्या आहेत त्यांना टिक ऑफ करून टाका. खोडा. जेणेकरून तुम्हाला असे जाणवेल की तुम्ही ते कृती-कार्य पूर्ण केले आहे आणि हे कार्य तुमच्या पूर्ण नियंत्रिणात आहे.
आता पुढे चालूया व पाहुया प्रत्येक गोष्टीसाठी ८०/२० चे सूत्र काय आहे आणि कसे वापरावे.
☯ ८०/२० चा सिद्धांत अथवा सूत्रः
अशी कल्पना करा की तुम्हाला काही महत्वाचे ई-मेल्स वाचायची आहेत आणि वाणसामान आणण्यासाठी सुपरमार्केटला देखिल जायचे आहे. तर तुम्ही सर्वांत आधी काय कराल? साहजिकच आहे ई-मेल्स वाचणे अधिक महत्वपूर्ण आहेत आणि हेच ८०/२० चे सूत्र आहे जे तुम्हीसुद्धा वापरत असता.
एखाद्या बाबीचे ८०% केलेले कार्य २०% मूल्य ठेवत असते. (80% Task = 20% Value) यासाठी नेहमी महत्वाच्या कामापासून सुरू करा ज्यांचे मूल्य इतर कार्यांच्या तुलनेत ब-याच अंशी अधिक असेल. अनेकदा लोकांची ही सवय असते की ते महत्वाच्या कामाला टाळत असतात आणि फालतूच्या कामांमध्ये पुर्ण दिवस व्यस्त असतात.
![]() |
८०/२० चा सिद्धांत अथवा परेटो प्रिन्सीपल 👉पुस्तक सारांश इथून वाचा
|
आणि ह्यामुळेच त्यांना कित्येकदा असे वाटते की ते खूपच जास्त व्यस्त आहेत. जगातील सगळे काम त्यांच्याचकडे आहे. म्हणजे, वेळच नाही. खरेतर, त्या कामाचं काहीही खरं मूल्य असतच नाही. यासाठी लक्षात ठेवा की नेहमी महत्वाचे कार्य अगोदर करा. स्वतःला प्रेरित करण्यासाठी अशी कल्पना करा की तुम्ही त्या कार्यांना पूर्ण करत आहात.
पुढे पाहुया कन्सिडर द कन्सिक्वेन्सेस विषयी....
☯परिणामांना गृहित धरणेः Consider the Consequences:
याचे अर्थ असे की, यशस्वी व्यक्ती आपल्या घेतल्या जाणा-या निर्णयांमधे ''वेळ'' ह्या घटकाला (Time Factor) अधिक महत्व देत असतात. शेवटी एक अशी कंपनी जी २० वर्षांपर्यंत आपल्या यशाला अभंग अथवा स्थीर ठेवू शकेल त्या कंपनीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने चांगली आहे जी आजच्या तारखेत नफा कमावत आहे. आज फायद्यात आहे. परंतू पुढील पाच वर्षांमध्ये ती नाहीशी होऊन जाईल.
जर काही लघु अवधीचे त्याग करू शकलात तर, एका निर्णायक कामाचे आपोआपच संभाव्य दीर्घावधीचे अथवा दीर्घ काळाचे परिणाम होऊ शकतात. काय तुम्ही हा सौदा करायला तयार आहात?
तुम्हाला नेहमीच एका अशा कामापासून सुरूवात करायला पाहिजे ज्याचे मोठे संभाव्य सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतील. स्वतःला प्रेरित करण्यासाठी स्वतःला नेहमी हे आठवण करून देत जा की, तुमच्या जीवनात ह्या कामाचा सकारात्मक प्रभाव काय होणार आहे? स्वतःला आपल्या मनाकडून मुर्ख बनू देवू नका की तुमच्या जवळ ''वेळ'' नाहीये. कारण, जसे की ''पोस्ट एफिसिएन्शी'' अथवा ''कार्यक्षमतेत्तर चा नियम..!'' आहे त्याच्या नुसार ''तुमच्याजवळ महत्वाची कामे करण्यासाठी नेहमीच वेळ आहे''.
- Pareto Principle or 80/20 Principle
- Law of Post Efficiency
अभ्यास आणि संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की, जर तुम्ही शेवटच्या क्षणी लवकर-लवकर काम आटोपत असाल तर निःसंशय तुम्ही त्या कामाला पूर्ण केलेलं आहे, करूनही घ्याल, परंतू हेसुद्धा खरं आहे की, त्यामध्ये चूकादेखिल खूपसा-या असतील ज्या तुम्ही ''रि डू'' नाही करू शकनार अथवा सुधारू नाही शकणार. मग ह्यापेक्षा हेच चांगले आहे की, अगोदरपासूनच आपली सगळी कामे एकत्रित केली जाईल जेणेकरून नंतर ''डिले'' साठी किंवा विलंबासाठी वेळ वाचवला जाईल. (चुकांना दूरूस्त करण्यासाठी)
ह्यानंतर आपण पाहुया ''क्रिएटिव्ह प्रोकास्टीनेशन'' च्या प्रॅक्टीस विषयी....
☯ सर्जनशील चालढकलपणा: (Creative Procrastination)
👉🐸जर तुम्हाला एकाच दिवशी खूपसारे बेडूक खावे लागले म्हणजेच अवघड कामे करावी लागली तर तुम्ही काय कराल?
येथे तुम्ही म्हणाल तुम्ही सर्वांत आधी तुम्ही ''पहिला बेडूक खाल'', बरोब्बर हाच फरक आहे यशस्वी लोकांत आणि अपयशी व्यक्तींमध्ये. प्रत्येकजण टाळ-म्-टाळ अथवा चालढकल करत असतो. कोणत्या गोष्टीवर चालढकल करायची आहे तुम्ही ती निवड करून घ्या. नाही म्हणणे हीसुद्धा एक कला आहे आणि तुम्हालाही शिकावी लागेल.
"Saying NO is an ART"
नाही म्हणणे हीसुद्धा एक कला आहे
आणि तुम्हाला ही शिकावी लागेल
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
अशी प्रत्येक गोष्ट अथवा वस्तू जी तुमच्या कामाची नाही जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात नाही त्यांना ''नाही'' म्हणा. आपल्या जीवनातून वेळखाऊ कामांना काढून टाका. जसे की, टी.व्ही पाहण्याऐवजी तुम्ही एखादी पुस्तक वाचन करू शकता.
(आणि हो तुम्ही पुस्तके ऐकू सुद्धा शकता जसे की तुम्ही एखादे पॉडकास्ट अथवा ऑडिओ बुक इत्यादी ऐकू शकता)
ह्या बरोबरच पुढे जाऊया आणि पाहुया एबीसीडीई पद्धतीविषयी ज्या पद्धतीला तुम्ही वारंवार वापरू शकता...
☯ एबीसीडीई पद्धत: (ABCDE Method):
एबीसीडीई पद्धतीविषयी बोलायला गेलोत तर जसे की नावावरूनच आपल्याला कळेल की,
👉''ए''-हा तुमचा सर्वांत महत्वाचा बेडूक आहे म्हणजेच सर्वांत महत्वाचं काम आहे, आणि '
👉'बी''- असे काम आहे जे तुम्हाला करायला पाहिजे परंतू तुम्ही ते नाही केलं तरीसुद्धा जीवनात त्याचा काही फार फरक नाही पडणार. दुस-या शब्दांत ते काम तुमच्यासाठी ''मस्ट'' म्हणजेच ''आवश्यक'' नाही म्हणजे ''करायलाच पाहिजे'' अशा गटातील नाही.
👉''सी''- असे काम आहे ज्याला करणे ''ठीक'' असेल परंतू ह्या कामाला ''नाही'' म्हणणे तुमच्या जीवनात काहीच परिणाम करणार नाही अशा गटातला आहे. आणि
👉''डी''- एक असे काम आहे ज्याला करण्यासाठी तुम्ही दुस-याला सोपवू शकता म्हणजेच ते काम तुम्हालाच करायची गरज नाही, आणि
👉''ई''-ते काम आहे जे तुम्ही रद्द करू शकता कारण ह्या कामाला न करणे तुमच्या जीवनात काहीही परिणाम करणार नाही. काही प्रभाव करणार नाही.
तर तुम्हाला बराच ''कडकपणा अथवा कठोरपणा'' दाखवावा लागेल जेणेकरून तुम्ही आपले कार्य लगेच सुरू करू शकाल आणि तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ते काम पूर्ण होणार नाही. तर सांगायचे तात्पर्य हे की, आतापासून सुरू करा एबीसीडीई....!
म्हणजे अशी कोणकोणती कामे आहेत जी तुम्हाला लगेच करायची आहेत आणि अशी कोणती कामे आहेत जी तुम्हाला नाही करायची आहेत आणि अशी कामे जी तुम्हाला मुळीच करायची नाही जी इतरांकडून करून घेता येतील यांची यादी बनवून घ्या, आणि कामाला सुरूवात करा.
वाचकांनो पुढे पाहुया ''की एरियाज'' वर फोकस करण्याविषयी .....
☯ परिणामकारक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे (Focus Key Areas)
जेंव्हा एखादे सिंह हरिणाची शिकार करतो तेंव्हा तो लगेच त्याच्यावर झडप घालत नाही अथवा ठार मारत नाही, तर तो आपल्या कामाला सोप्या आणि सहज करता येईल अशा कृतीमध्ये विभागून टाकतो. उदाहरणासाठी सांगायचेच तर सिंह प्रथम त्या हरिणाचा पाठलाग करून त्याला घायाळ अथवा जखमी करून जमिनीवर पाडतो, नंतर आपल्या सुळ्यांद्वारे त्याचा गळा आवळतो.
अशाच पद्धतीने तुम्हीदेखिल आपल्या कामाला ५ ते ७ परिणामकारक क्षेत्रामध्ये विभागून घ्या. (Result Areas). तुम्हाला आपल्या ''रिजल्ट एरिया'' निश्चित करावयाचे आहे. हेच तुमच्या कामाचे अत्यंत महत्वपूर्ण ''आऊटपुट'' म्हणजेच निष्कर्ष आहे. जसेकी कोणत्याही नव्या विक्रय प्रतिनिधीला नवीन ग्राहक शोधने अथवा संभाव्य ग्राहकाची यादी बनविने अत्यंत महत्वपूर्ण आऊटपुट असतो.
आपल्या ''की एरियाज'' मध्ये प्राविण्यता आणणे हीच यशस्वी निष्कर्षाची अथवा परिणामाची हमी आहे. गॅरंटी आहे
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
☯ तीन चा नियम (Apply the Rule of Three)
भलेही आपल्या कार्यात तुम्ही कितीही श्रम का नाही केले असेल, परंतू त्यापैकी ''तीनच'' असे अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहेत जे तुम्ही केलेल्या कार्यात अधिकाधिक योगदान देत असतात. तर जरा वेळ काढून विचार करा की असे कोणते कार्य आहे जे तुमच्या संपूर्ण कामामध्ये सर्वाधिक योगदान देतो आणि जेंव्हा तुम्ही त्या ''तीन'' अत्यंत महत्वाच्या कार्यांना शोधून काढाल तेंव्हा विचार करा तुम्ही तुमचा सगळा वेळ त्या कार्याला पूर्णपणे समर्पितपणाने कसे करू शकाल ज्यामुळे तुमचे लक्ष केंदित केले जाईल.
फक्त त्या आणि त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, अनावश्यक गोष्टींना अथवा कामांना टाळले जाईल, अधिकाधिक वेळ त्याच गोष्टींवर दिला अथवा खर्च केला जाईल ज्यासाठी आपण सुरूवात केलेली होती.
☯ पुर्व आणि पुर्ण नियोजन-तयारी (Prepare Thoroughly Before You Begin)
☯ एकावेळी एकच काम (Take It One Oil Barrel at a Time)
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
- पहिले- पहिले पाऊल उचलणे म्हणजेच सुरूवात करणे आणि
- दुसरे- एकावेळी एकच पाऊल उचलणे
- Taking the First Step
- Taking One Step at a Time
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
👉तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा, जीवन समृद्ध बनवत राहा.
धैर्यपूर्वक पुस्तक सारांश वाचन केल्याबद्दल
आपले मनःपुर्वक
🙏 धन्यवाद.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) संकेतस्थवरील इतर उत्कृष्ट पुस्तके वाचन कराः
जसे-
सॅपियन्स- मानव जातीचा संक्षिप्त इतिहास
१२-ब्रेन रुल्स-लेखक- जॉन मेडिना
अॅटिट्यूड-इज-एव्हरिथिंग म्हणजेच ''दृष्टीकोण-हेच-सर्वकाही''- लेखक जेफ केलर
हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले
Start wit WHY“का” ने सुरुवात- लेखकः सायमन सिनेक
सत्ता-अधिकार प्राप्तीचे ४८ सुत्रे-लेखक- रॉबर्ट ग्रीन
Other Related:
- WRITE it DOWN Make it Happen
- SMART GOALS- Complete Guide to Goal Setting
- HOW TO SET GOAL -Warren Buffet Way
- DO IT TODAY-
- POMODORO Technique
- MINDMAPING for Clarity
- EAT THAT FROG
- NO EXCUSES
- Get It Done Now -गेट इट डन नाऊ
- START WITH WHY by Simon Sinek
- Find Your WHY by Simon Sinek
- IKIGAI -Find Your Passion
- So Good they Cant Ignore You- Don't Find Your Passion.!
टिप्पण्या