लिहून काढा -Write it down make it happen by Henriette Klauser

लिहिण्याची अशी शक्ती ज्यमुळे तुम्ही काहीही मिळवू शकता. कामाशी संबंधित, नात्याशी संबंधीत, ध्येयांना लिहून त्यांना प्राप्त करू शकता.  ह्या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवून आपल्या स्वप्नांना वास्तवात आणणे शिकू शकता. 

Write  it down
Make it happen

Knowing
: What you want and Getting it..!

by the author
Henriette Klauser

#Bookshort
 
जर तुमचं आयुष्य एक कादंबरी असेल आणि तुम्ही कादंबरीकार तर तुमची कथा कशी सुरू झाली असती? किंवा तुम्ही तुमच्या कथेची सुरुवात कशी कराल? शेवटी, तुम्हीच तुमच्या कथेचे लेखक आहात, अस्सल वास्तविक आयुष्यातही. 

कल्पना करा तुम्ही ते अतिशोक्तीला शब्दशः घेतली आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला कधी आयुष्याकडून पाहिजे होत्या त्यांची यादी बनवायला आणि त्या ध्येयाना कागदावर लिहायला सुरुवात केली. 

ही पुस्तक तुम्हाला समजावेल की, का? असे करणे हे काही एखादी अतिशोक्तीपूर्ण वेडगळ कल्पना नाही..! खरे तर, अशाप्रकारे तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना लिहून काढणे तुम्हाला तुमच्या ध्येयांना वास्तवात, सत्यात, तुमच्या निकट-जवळ आणण्यास मदतच करतात.  Write  it down make it happen: Knowing: What you want and Getting it..! by Henriette Klauser आपल्याला शिकवेल की,
  • कसं? स्वतःला लिहिलेलं धनादेश-चेक ने जिम कॅरी यांना त्यांचे पहिले ₹10लाख कमवून दिले..! आणि 
  • होंडा सिटी सिल्व्हर चारचाकी गाडी सर्वात सामान्य गाडी का आहे? आणि 
  • कसं? एकचाकी सायकल चालवायला शिकणे तुम्हाला संस्कृत भाषा शिकायला मदत करते?

डोक्यातील कल्पना, विचार आणि मनातील भावना यांना योग्यवेळी लिहून काढल्यास स्पष्टता येते, एक दिशा मिळते, एक मार्ग सापडतो.  कल्पना, विचार, भावना यांची क्लिष्टता डोक्यातून कागदावर उतरविल्यास स्पष्टता येते.  विचार स्पष्ट होण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, मनातील भावनांना वाट करून देण्यासाठी, नियोजन-व्यवस्थापन करण्यासाठी.

आपण जी माहिती ग्रहण करतो ती एकरेषीय पद्धतीने आपले शिक्षण लिनियर पद्धतीनेच झालेलं असल्याने आणि आपल्या मेंदूमध्ये माहिती तशीच साठवायचं प्रयत्न करत असतो, परंतु मेंदूमध्ये माहितीची साठवणूक सरळ -थेट लिनियर एकरेषीय पद्धतीने नाही तर झाडाच्या फांदी किंवा मुळांसारखी जपली जाते, एकमेकांशी संबंधित असते, जोडलेली असते. पंचेंद्रियांद्वारे आलेली माहिती एकमेकांशी मेंदूमध्ये चेतापेशींनी जोडलेली असते.

फक्त जेंव्हा आपण त्या एखाद्या माहितीचा वापर करतो तेंव्हाच ते सक्रिय (activate) होत असतात. म्हणून तुम्हाला डोक्यातील माहिती जी, कल्पना, भावना, विचार, अनुभव, ज्ञान स्मृती, आठवणी, यांची सरमिसळ असते ती कागदावर रेखाटल्यास किंवा मानचित्र (माईंड मॅप) बनवून-काढून एकरेषीयपणा आणून समजून घेता येते. 

नेमकं डोक्यात-मनात काय चालू आहे हे जाणुन घेता येते, मग त्यासाठी उपाय-समाधान, काय करायला पाहिजे, काय नको इत्यादी निर्णय घेण्यास मदत मिळते.   

यासाठीच जमेल तसे, जमेल तिथे कागदा वर-वहीवर-लॅपटॉपवर-मोबाईलवर भराभर लिहायला सुरुवात करा.  

पुस्तकाचे सारांश लवकरच संकेतस्थळावर वाचू शकाल.

📕📖📗📘📙📚


संबंधित वाचा -Read Related: 

  • Write it down, watch it happen: Journal your way to happiness!: Journal your way to happiness (journal your way to clarity, health, wealth, love and happiness)

अवांतर वाचा-Read Random:

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive