ध्येय ठरवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन | Complete Guide to Goal Setting

ध्येय ठरवणे स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या मार्गावर निशाणी आणि टप्पे तयार करण्यात मदत करतात. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना आपण अनुभवलेल्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी ध्येय आपल्याला गती देते.

 ध्येयाचा ध्यास असला की कामाचं त्रास वाटत नाही

जेंव्हा आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयांच्या दिशेने वाटचाल करतो, प्रवास करतो तेव्हा आपली प्रगती किती झाली हे तपासण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठीं आपण milestones म्हणजेच यशासाठी ध्येयाचे टप्पे ठरवत असतो.

जसे एखाद्या प्रवासाला निघाल्यावर आपण कुठवर आलोय, आणि किती प्रवास करावा लागेल, किती वेळ लागेल इत्यादी रस्त्यावर प्रगतीदर्शक मैलाचा दगड पाहून आपण त्यासाठी आपली मानसिक व इतर तयारी करतो.

Milestones or Goals किंवा टप्पे ठरवल्यामुळे आपण काय साध्य केलेलं आहे आणि आपल्याला हेही दाखवतात की आपण यापुढे ते अधिक कसं साध्य करू शकतो.
  आपण काय साध्य करत आहोत आणि आणि त्याहीपेक्षा जास्त कसे मिळवू शकतो याची प्रेरनाही मिळते.

तुम्ही जर ध्येनिश्चिती करण्यावर आगोदर एखादे लेख किंवा आकडेवारी वाचन करण्यापासून स्वतःला थांबवले नसेल तर तुम्ही दोन गोष्टी वाचल्याच असतील:

👉People without Goals are not as successful as they hope to be.

  • एक - ज्या लोकांनी ध्येय ठरविलेच नव्हते अशी लोकं त्यांनी जितकं विचार केलं होतं तितके यशस्वी झाले नव्हते. विना ध्येयाची लोकं त्यांना जशी आशा होती तेवढं यशस्वी नव्हते तितकं यश मिळालं नाही जितकं विचार केला होता. 

👉People who don't write ✍️ down goals are less likely to accomplish them 

  • दोन - ज्यांनी आपली ध्येय लिहूनच काढली नव्हती अशा लोकांची ध्येये पूर्ण होण्याची शक्यता कमी होती. 


मागील दहा वर्षात माझ्या स्व्नपूर्तीसाठी च्या मार्गावर असताना जर काही शिकलं असेल तर ते असे की तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या सत्यात उतरवण्यासाठीच्या भव्य प्रतिमेत grand picture 🖼️ of ध्येय किती महत्वाची आहेत हे कळाले आहे. Adverse conditions विपरित परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद, अनुभवताना सुधारणा करण्यात प्रेरित करण्यासाठी आपल्याला पुढे ढकलण्याचे कार्य ध्येय करत असतात.
 
स्वप्नपर्तीसाठीच्या मार्गावर असताना प्रतिकूल किंवा विपरीत परिस्थितीत अडकलेले असताना, आपल्याला पुढे ढकलण्याचे कार्य आणि संवेग, गतिशीलता देण्याचं काम ध्येय करत असतात.

मग मला ध्येय ठरवण्याची गरज आहे का ना नाही?

Do I need to set 🥅 goals 🎯 or not?


दर वर्षी नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण पुढील वाटालीसाठी ध्येय ठरवतो परंतु नियोजना अभावी चक्क एक ते दोनच महिन्यात ते सोडून देतो.

मग यावर्षी ध्येय न ठरविण्याचे एक मोठं कारण आल्याकडे असते ते म्हणजे आपण अनुभवलेले नकारात्मक अनुभव गेल्या वर्षी ठरविलेले ध्येय पूर्ण न झाल्यामुळे बाळगलेली चुकीची समजूत-धारणा, ध्येय पूर्ण करण्यात आलेलं अपयश, मागील वर्ष त्यांच्यासाठी किती भयानक होते, त्यांना किती कष्टदायक वाटले होते असे म्हणतात.

किंवा ते असेही म्हणतात की, मी ती ध्येय मिळवण्यासाठीची तयारी व धडपड यामध्ये कमी पडलो, किंवा त्यांनी ध्येय प्राप्त करण्यासाठी खरोखरच कधीच पाठपुरावा केला नाही, तसे प्रयत्नच केले नाहीत अशी guilt स्वदोषी भावना बाळगतात,ठेवतात.

तर मग, तरीही, स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नसाठी आपण परत ध्येय ठरवायला पाहिजे ?
स्वप्न पूर्ण होताना, सत्यात-वास्तवात येताना पाहण्यासाठी ध्येय ठरवायला पाहिजे?

होय..!

अधिकतर लोकांची अशी समस्या असते की ते त्यांना यश मिळविण्यासाठी मदत करेल असे ध्येयच ठरवलेलं नसतं.
आणि त्या दिशेने वाटचाल करण्यास भीती किंवा कमी उत्तम ध्येय तयार न केल्याने त्यांची असमर्थता दाखवत असतात त्यामुळे ते मागे पडतात.

एक व्यक्ती आहे सुनील, 10 वर्षापूर्वी त्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक ध्येय ठरवलं होतं, परंतू पुढे परत वर्षभर कधीही त्याला पाहिलेलं नव्हतं. त्यांच्यासाठी ते खरोखरच अस्पष्ट, अनिश्चित होतं, त्यासाठी सर्वसामान्य कल्पना अशी होती की त्यांना ते ठरवलेलं ध्येय पूर्ण करायचे होते, परंतू ध्येय गाठण्यासाठी कोणतीही कृती न करता, किंवा नियोजनाची जोड न दिल्याने, कोणतेच पाऊल न उचलल्याने काहीही प्राप्त करू शकले नाही. आणि हेच कारण आहे की ध्येय यशस्वी होत नाहीत,

तुमच्या स्व्नपूर्तीसाठी "स्मार्टर" ध्येय ठरवणे

S.M.A.R.T.E.R. Goals for Your Dreams


S.M.A.R.T. 🥅 Goals 🎯 Settings System
तुम्ही बहुदा-नक्कीच ध्येय ठरविण्याच्या जगप्रसिध्द स्मार्ट पद्धतीबद्दल जाणून असाल, SMART Goal System, ही एक उत्कृष्ट-अद्वितीय पद्धत आहे.  

खरे तर, जेव्हा सुनील स्वतःचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत असल्याने खूपच वैतागून गेला होता, तेव्हाच या स्मार्टध्येय पद्धतीबद्दल शिकला होता आणि यामुळे त्यांना त्यांची काही ध्येय प्राप्त होण्यास प्रारंभ झाला होता.

आणि तेव्हाच, त्याने ध्येय ठरविण्यात स्मार्ट (SMART) पुढे "ER" ची सुधरणा शिकली होती, S.M.A.R.T. आता S.M.A.R.T.E.R. पद्धत झाली होती. चला तर मग याच ध्येय ठरविण्याच्या SMARTER पद्धतीला वापरून काही ध्येय एकत्रित ठेऊया.

Specific : विशिष्ट


ऐकायला काहीसे सोपे वाटते, हो ना..!
चला तर मग लिहून काढू काहीतरी विशिष्ट specific. प्रश्न असा पडतो की मला किती विशिष्ट होण्याची गरज आहे?
तर उत्तर असे : जितकं जास्त तुम्ही विशिष्ट असाल तितकं तुम्हाला तुमचे परिणाम मोजायला सोपं होईल.

जितकं जास्त तुम्ही विशिष्ट असाल तितकं तुम्हाला तुमचे परिणाम मोजायला सोपं होईल.
The more specific you are, the easier it will be to quantify your results.

उदाहरणार्थ:

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दुसऱ्या शब्दांत बोलायचं झाल्यास यात तुम्हाला अधिक विशिष्टता आणावी लागेल, नेमकेपणा आणावा लागेल.

जसे, नेमकं किती वजन कमी करायचे आहे?

याहीपेक्षा असे म्हणू शकता की, ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्हाला इतकं इतकं (नेमका आकडा) किती वजन आटोक्यात आलेले पाहायचे आहे.

Specific goal विशिष्ट ध्येय असे असेल: मला 56 किग्रा वजनाचा व्हायचं आहे.आपल्याला आपले ध्येय नेमक्या अंक -आकड्यामध्ये ठेवता आलं पाहिजे.

Measurable मोजमाप घेता येईल

आपल्या ध्येयाला मोजण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाचे मोजमाप करण्यासाठी आपल्याला वेळेनुसार त्यात प्रगती पाहण्याची गरज असते.
To make a goal measurable, we need to be able to see progress over time.

समजा तुमचं ध्येय आहे, एक कादंबरी लिहायची आहे.
तर या गोष्टीचे आपण कसे मोजमाप करू शकतो? तुम्ही मागोवा काढू शकाल असे तपशिलवार जाऊन तुम्हाला ते खूपच विशिष्ट आणि मोजण्या योग्य बनवावे लागेल.

एक कादंबरी लिहीण्यासाठी विशिष्ठ ध्येय असे असेल:
"मी एक 50,000शब्दांची कादंबरी लिहून, पूर्ण करीन."

Achievable & Actionable

काहीतरी मिळविण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी, कुठेतरी पोहोचण्यासाठी प्रत्येक ध्येय कृतीपूर्ण असले पाहिजे. आणि म्हणूनच, जेव्हा ध्येय लिहितो, आपण बोलताना ती कृती म्हणूनच लिहायला पाहिजे.

 जेव्हा तुम्ही ते ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी लगेच काय कृती करायची आहे हे जर स्पष्ट असेल तर ध्येय हे कृतियुक्त होते.  गोष्टीना कृतिपूर्ण बनविण्यासाठी असे करण्याचे एक सहज सोपे मार्ग आहे की, लिहिताना त्याची सुरुवात क्रियापद पासून करायला पाहिजे.

उदाहणादाखल असे वापरून बघा:  "मी 24पुस्तकं वाचन करीन"

Relevant or Relatable संबंधित असायला हवे.

काय तुमचे ध्येय तुमच्या आयुष्याशी निगडीत संबंधीत आहे?
जेंव्हा तुम्ही ध्येय ठरवता, तुम्हाला काय करायचं आहे यावर व्यावहारिक दृष्ट्या नजर ठवण्यासाठी हे आवश्यक ठरते.
जेंव्हा तुम्ही ध्येय ठरवता तेंव्हा तुम्हाला तुमच्या सद्य परिस्थिती ची जाणीव असायला हवी. तुम्हाला तुमच्या सद्य व सत्य परिस्थिती चा विचार करायला पाहिजे.

काही लो कं तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या आवाक्याच्या पेक्षा मोठं ध्येय ठरवायला पाहिजे (10X Goal)असंही सांगतील, असे ध्येय ठरवणे-बनवणे जे की जवळपास अशक्यच असते. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला पुढे आणण्यासाठी ताण आणि दबाव आनेल एवढं जवळ जवळ अशक्यच आहे.  

तर माझ्यामते हे तर चांगले उत्तम आहे, हे पहिल्यांदाच करणाऱ्या साठी मुळीच नाही. किंवा कोणी एखादंजन त्यांच्या ध्येयासाठी झगडत, धडपडत आहेत.

तुम्हाला तुमच्या सद्य व सत्य परिस्थिती नुसार, कुवतीप्रमाणे विचार करून तुम्हाला झेपेल, पूर्ण किंवा प्राप्त करू शकता इतकं, एवढंच ध्येय ठेवायला पाहिजे.

तुम्ही तीन लहान मुलं असलेल्या, दोन वेगवेगळे कामे करणारे पालक आहात काय? जर तुम्हाला 3% शरिराची चरबी कमी करायचे असेल तर तुम्हाला व्यायाम, कसरत करण्यासाठी दिसअखेरीस तीन तास देखील मिळणार नाहीत.

हे वापरून पाहा: "मी माझ्या शरीराच्या पटीतील 10% चरबी कमी करीन., तर माझा प्रारंभ होईल X."
            Now -Goal -10X
            आज - तुमचे ध्येय - तुमचे 10x दहा पट ध्येय

Time bounded वेळेचे बंधन असणारे

प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे असायला हवे. एक अंतिम तारीख, अंतिम मुदत असणारे कालबद्ध ध्येय असायला पाहिजे.
ज्यामुळे एका विशिष्ट काळ-वेळेतच तुम्ही ते दबावात कृती करू शकाल. फक्त असं काहीतरी सांगणं की, "मी हे करीन" एवढंच पुरेसे नाही. तुम्ही ते कधी करणार हे सांगणं गरजेचं आहे.

या मार्गानेच तुम्ही तुमच्या यशाकडे वाटचाल करणारा, पुढे नेणारा नकाशा बनवण्याची गरज आहे, नाहीतर तुमच्याकडे लक्ष्य तर नेहमीच असेल परंतु ते ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी लगेच करावयाची तत्परता, निकड तुमच्याकडे कधीच नसेल. मागील कादंबरी लिहिण्याचे च उदाहरण आपण घेऊ,

"मी 50 हजार शब्दांची कादंबरी डिसेंबर अखेरपर्यंत लिहीन.

Evaluate मूल्यमापन करणे:

आता याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या ध्येय- उद्दिष्टे यांच्याकडे नेणारा मार्ग, रस्ता यांना दुरुस्त करण्यासाठी खोड रबर सारखं काम करणारे मूल्यमापन करावे लागेल.

आपल्याला दररोज आपल्या प्रगतीचे मूल्यमापन करावे लागेल, नव्हे तर, तसे करणे गरजेचेच आहे. जेंव्हा आपण लोकांनां विचारतो की कितीवेळा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे नजर टाकली होती, तर, ते म्हणतात, वर्षातून काहीवेळा पहिले आहे, असे त्यांचे उत्तर असते.
आणि याच कारणाने लोकं त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरतात, होतात.

तर तुम्हाला तुमच्या ध्येय आणि उद्दिष्टे यांचे मूल्यमापन दर तीन महिन्याला, महिन्याला, आठवड्याला अश्याप्रकरे केले पाहजे. यामुळे तुम्हाला आपण नेमकं काय करण्याचं प्रयत्न करतोय, कुठं जातोय, कुठं जायचं आहे यावर लक्ष असते. आणि दर आठवड्याला त्या ध्छेयांकडे जाण्यासाठी काहीतरी कृती करतो की नाही याची खात्री करून घ्यावी.

तुम्हाला जर तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी काहीतरी नवीन वेगळं करायचं असल्यास तुम्हाला असे करने गरजेचे आहे.

Reward बक्षीस

प्रत्येक ध्येय- उद्दिष्ट आणि माईलस्टोन साठी बक्षिसाची गरज आहे. आपल्याला चांगलं केल्यावर काहीतरी मिळाल्यास आनंद होतो. आणि जेंव्हा आपण आपल्या स्वप्नांसाठी काम करतो तेंव्हा आपण कमावलेले हेच छोटे गोष्टी छोटे बक्षीस यशाचा एक टप्पा पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यास आणि पुढील टप्प्यासाठी तयार राहण्यास मदत करत असतात.

एका उदाहरणाने हे समजून घेऊ,    

🧧⌧आपल्याकडील कर्ज, देणी यांची परतफेड केल्यास मिळवलेले बक्षीस
31 डिसेंरअखेर कर्ज, देणी फेडून टाकल्यास स्वतःसाठी बक्षिस्वरुप एखादी भेटवस्तू खरेदी करायची जी तुम्ही कधीच खरेदी केली नव्हती, किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत करून एखादी सकारात्मक अशी गोष्ट करायची जी तुम्ही कधीच केली नव्हती..

प्रत्येक ध्येय- उद्दिष्ट आणि माईलस्टोन म्हणजेच यशाचा टप्पा पूर्ण केल्यावर बक्षीस असेल तर काहीतरी मिळविण्याचा आनंद आणि समाधान वाटते तसेच ध्येयाच्या दिशेने पुढं जात राहण्यासाठी प्रेरणा मिळते.  

तुमच्यासाठी यशाचा राजमार्ग

The Road 🛣️ in front of you.

यापूर्वी तुम्ही तुमच्या ध्येय उद्दिष्टूर्तीसाठी खूप संघर्ष केला असेल, आणि तुम्ही जर वरील उदाहणातील सुनील सारखे असाल तर कदाचित एका वर्षासाठी तुम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या सर्वच्या सर्व ध्येय आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यात अपयशी ठराल.

परंतू आता यानंतर मात्र तुमच्यासाठी असं राहणार नाही कारण तुम्हाला फक्त स्मार्ट नाही तर SMARTER ध्येय कसे ठरवायचे ते समजले आहे आणि ते पुर्ण करण्याचे आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.

तुम्ही मागे जाऊन सुरुवात बदलू शकत नाही परंतू तुम्ही आता या क्षणी जिथं आहात तिथूनच नवी सुरुवात करू शकता आणि शेवट बदलू शकता.

"You can't go back and Change the begging, but you can start where you are and change the ending.  -C.S. Lewis

ही ओळ वाचली तर नक्कीच तुम्हाला आवडेल, कारण हे वाक्य आपल्याला आठवण करून देते की आपण कोणत्याही वयाचे का असेना, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, स्थानकावर का असेना आपण आता ठरवलेलले ध्येय आणि उद्दिष्ट यांच्या मदतीने आपल्या कथेचे शेवट बदलू शकतो. आपण आपली दुसरी गोष्ट लिहू शकतो. यामुळे आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास आणि ती स्वप्न पूर्ण करण्यास, सत्यात, वास्तवात आणण्यासाठी मदत करतात.

Courtesy: Complete Guide to Goal Setting by the author Jack Heimbigner.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive