तन की बात

आपले शरीर
तन की बात-आरोग्‍यसंपदा-देहात 

आपले शरीर
आपले शरीर आयुर्वेदानुसार पृथ्‍वी, अग्‍नी, वायू, जल, आकाश या पंचतत्‍वांनी बनलेलं आहे.  ह्या पंचतत्‍वांचा समतोल राखला गेला तर उत्‍तम, नाहितर या पंचतत्‍वांपैकी कोणत्‍याही तत्‍वाचा अभाव झाल्‍यास अथवा प्रभाव वाढल्‍यास शरीर योग्‍यरितीने कार्य करत नाही.  

परिणामस्‍वरूप आजार उद्भवतात, विकार जडतात.  प्राचीन आयुर्वेदशास्‍त्र, आधुनिक वैद्यकशास्‍त्र, तसेच अन्‍य शरिरशास्‍त्रांच्‍या मदतीने आपण शरिराची काळजी कशी घ्‍यावी, आहार-विहार कसा असावा आपण घेत असलेल्‍या अन्‍नाचा-आहाराचा आपल्‍या विचारांवर व आपल्‍या विचारांचा आपण ग्रहण करत असलेल्‍या अन्‍नावर शरिरात कसा परिणाम होतो याविषयी विविध पुस्‍तकं, लेख, मार्गदर्शक, संशोधक, अभ्‍यासक, विशेषज्ञांच्‍या नजरेतून पाहणार आहोत. 

Sound Mind in a Sound Body 

या इंग्रजी म्‍हणीप्रमाणे, सदृढ, तंदुरूस्‍त शरिरातच चांगले, उत्‍तम मन राहु शकते. 

म्‍हणूनच आम्‍ही म्‍हणतो, 

जसे अन्‍न् तसे तन वैसे मन

 

☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

आपले शरीर 

हार्डवेअर-शरीर

इतर सजीवांप्रमाणेच आपले शरीर असंख्‍य पेशींपासून निर्मित एक गुंतागुंतीची, किचकट, तेवढीच अद्भुत अशी जैविक संरचना आहे.  शरीरातील असंख्‍य पेशींपैकी विविध प्रकारच्‍या, विशिष्‍ट पेशी मिळून आपले एक-एक अंग बनलेले आहे. 

आपल्‍या शरीराचे अस्तित्‍व सांभाळण्‍यासाठी शरीराची कार्यप्रणाली समजून घेऊन, शरीराच्‍या निसर्ग नियमांचे पालन केल्‍यास शरीर निरोगी, सदृढ, तंदरूस्‍त व कार्यक्षम राहतो नव्‍हे ते तसे ठेवायलाच पाहिजे.  

कारण आपले भौतिक अस्तित्‍व या शरीरामुळेच आहे.  आपण स्‍वतःला 'मी' आहे हे कसे सांगतो, तर हे सांगण्‍यासाठी, जगाला दिसण्‍यासाठी, दाखवण्‍यासाठी भौतिकदृष्‍ट्या जे आणि जसे दिसतो तो या शरीरानेच.  शरीराद्वारेच आपण जगात वावरत असतो.   

आपले शरीर-देह-काया-बॉडी याविषयी सविस्‍तर जाणून घ्‍या, समजून घ्‍या.  शरीराच्‍या महत्‍वाच्‍या अंगांना-(अंतर्बाह्य अवयव) आम्‍ही संगणकाच्‍या भागांना जी नावे आहेत ती नांवे योजिली आहेत.  आशा आहे याद्वारे शरीराचे कार्य आपल्‍याला समजून येईल. 

आपले शरीर 


हार्डवेअर

ज्‍याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने स्‍पर्श करून त्‍याची जाणीव आपल्‍याला होऊ शकते, आकार, रंग, वजन, पोकळ, भरीव इत्‍यादींचे आकलन होते, समजते. आपल्‍या शरीरातील विविध अंग-अवयव नेमके कशापासून बनलेले आहेत, त्‍यातील घटक कोणते, त्‍यांचे कार्य काय आहे, त्‍यांचे पोषण अभावी व इतर प्रभावाने त्‍यांपासून होणारे आजार-विकार, त्‍यांचे उपाय व समाधान या भागात समजून घेणार आहोत. 

सविस्‍तर अधिक जाणून घ्‍या इथून

 

फर्मवेअर-मेंदू 🧠

आपले शरीर 


हार्डवेअर-देह-शरीर-काया-भौतिक-कार्यकारी

 

फर्मवेअर-मेंदू-मस्तिष्‍क-व्‍यवस्‍थापक-मनोदैहिक दुवा

 

हार्डवेअर-शरीरातील एक अंतर्गत अवयव ज्‍याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने स्‍पर्श करून त्‍याची जाणीव आपल्‍याला होऊ शकते, आकार, रंग, वजन, पोकळ, भरीव इत्‍यादींचे आकलन होते, समजते. आपल्‍या शरीरातील विविध अंग-अवयव यांप्रमाणेच मेंदू-मस्तिष्‍क कशापासून बनलेले, त्‍यातील घटक कोणते, त्‍यांचे कार्य काय आहे, त्‍याचे पोषण अभावी व इतर प्रभावाने त्‍यांपासून होणारे आजार-विकार, त्‍यांचे उपाय व समाधान या भागात समजून घेणार आहोत. 

मेंदू किंवा मस्तिष्‍क सविस्‍तर अधिक जाणून घ्‍या इथून

 

सॉफ्टवेअर-मन-चेतना-कोह्म?-मानसिक

आपले शरीर 


हार्डवेअर-देह-शरीर-काया-भौतिक-कार्यकारी

 

फर्मवेअर-मेंदू-मस्तिष्‍क-व्‍यवस्‍थापक-मनोदैहिक दुवा


सॉफ्टवेअर-मन-चेतना-कोह्म?-मानसिक

 

आपल्‍या शरीरातील विविध अंग-अवयव नेमके कशापासून बनलेले आहेत, त्‍यांना आपण भौतिकदृष्‍ट्या समजून घेऊ शकतो, परंतू, मनाच्‍या बाबतीत असे नाही. मन हे अदृष्‍य, आभासी असे परंतू महत्‍वपुर्ण अंग-अवयव आहे.

ज्‍याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, हाताने स्‍पर्श करून त्‍याची जाणीव आपल्‍याला होऊ शकत नाही, आकार, रंग, वजन, पोकळ, भरीव इत्‍यादींचे आकलन होत नाही, प्रत्‍यक्ष शरिरातील ठिकाण माहित नाही. परंतू आपल्‍या अस्तित्‍वासाठी अत्‍यंत महत्‍वपूर्ण व मोठा वाटा या मनाचा असतो.  

को?ह्म म्‍हणजेच स्‍व-ची जाणीव, भाव-भावना-प्रेरणा, सुःख-दुःख, वेदना-संवेदना, अभिमान-स्‍वाभिमान, अहंकार, भय, लालसा, स्‍वभाव-सवयी, कल्‍पना-विचार, आठवणी-स्‍मृती,  मत-मुल्‍ये, समजूती, दृष्‍टीकोन, आशा-अपेक्षा, आकांक्षा-महत्‍वाकांक्षा, ईच्‍छा-स्‍वप्‍न, व्‍यक्‍ती-व्‍यक्‍तीमत्‍व इत्‍यादी गोष्‍टींना आपण साॅफ्टवेअर असे म्‍हणणार आहोत.  

ज्‍याप्रमाणे एखादा संगणक भौतिकदृष्‍ट्या बनतो-दिसतो-असतो, त्‍याचे नेमून दिलेले विशिष्‍ट कार्य करतो, ते विशिष्‍ट कार्य करण्‍यासाठी दिलेली-लिहिलेली आज्ञावली म्‍हणजेच प्रोग्राम असतो अगदी त्‍याप्रमाणे आपल्‍या मनाचीही एक प्रणाली ती चालण्‍यासाठी आपल्‍या मनात विविध प्रकारचे प्रोग्राम काही पुर्वप्रस्‍थापित किंवा 'प्री-इन्‍टॉल्‍ड' किंवा बायडिफॉल्‍ट असतात, जन्‍मजात असतात

जसे-नैसर्गिक भावना-भूक-तहान इत्‍यादी ह्या आदिम आहेत तर विचार हे प्रगत आहेत.  जस-जसे वय वाढते तस-तसे आपले विचार वाढतात, एखाद्या को-या पाटीवर किंवा पानावर आपण काही लिहितो, नोंदवतो अगदी तसेच प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या अनुभवाने, शिकण्‍याणे आपल्‍या मेंदूमध्‍ये-ज्‍यागोष्‍टी साठवल्‍या जातात, त्‍यासोबतच आपली मनाची एक स्‍वयंनिर्मित प्रणाली आकारास येते, एक 'सिस्‍टीम' तयार होत असते, त्‍यानुसारच मग आपण एखादे निर्णय घेत असतो.  

मन व आपल्‍या मनातील आपण-स्‍वतः तयार केलेली मानसिक प्रणाली त्‍याबद्दल सविस्‍तर या सदरात जाणून घेणार आहोत. येथे अ ह्युमन हिस्‍ट्री ऑफ इमोशन या पुस्‍तकाचा उल्‍लेख नक्‍कीच येईल, यामध्‍ये असे म्‍हटलेलं आहे की, ''How the way we feel... built the world we know'' आपल्‍याला जाणीव होते त्‍यावरच आधारित आपले जग बनत असते.

मनाबद्दल सविस्‍तर अधिक जाणून घ्‍या इथून

 

 सर्वांत आधी आपल्‍या शरीराला समजून घेण्‍यापुर्वी आपला इतिहास जर आपण समजून घेतला तर इतर गोष्‍टी समजून घ्‍यायला मदत नक्‍कीच होईल असे वाटते. यासाठीच इथे सॅपियन्‍स इण्डिका ह्या दोन पुस्‍तकांचा उल्‍लेख येईल.  वाचकांच्‍या सोईसाठी ह्या दोन्‍ही पुस्‍तकांचे सारांश ई-वाचनालयावर उपलब्‍ध आहेत.  नक्‍की वाचा. 

आपल्‍या स्‍वतःच्‍या मानसिक प्रणाली-सिस्‍टीम मध्‍ये कुठे गडबड झालेली, कुठे चूकीचा-गैरसमज -धारणा आहे, कुठे बदलायला पाहिजे, इत्‍यादी नक्‍कीच समजून-उमजून-कळून-येईल.  अवश्‍य वाचा. 

 

विनंती/टिप्‍पणः 

पुस्‍तकाचे सारांश वाचून सर्वच गोष्‍टी समजतील-उमजतील-उमगतील असा गैरसमज करून घेऊ नका, कृपया सविस्‍तर-सखोलपणे एखाद्या विषयास समजून घेण्‍यासाठी पुस्‍तक प्रत्‍यक्ष वाचा, सध्‍या ई-पुस्‍तकं, बोलकी पुस्‍तकं देखिल उपलब्‍ध आहेत.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive