तुम्‍ही जिंकू शकता-शिव खेरा (You Can Win-Shiv Khera)- पुस्‍तक परिचय-दृष्‍टीकोन -Attitude

तुम्‍ही जिंकू शकता

शिव खेरा 

पुस्‍तक परिचय-सारांश


 

You Can Win

By the author

Shiv Khera

You Can Win (Marathi)

 

दृष्‍टीकोन

जगभरातील महत्‍वाचे निर्णय घेणा-या व यशस्‍वी असणा-या लोकांना एक प्रश्‍न विचारले गेले, की अशी कोणती एक गोष्‍ट आहे जी बदलल्‍याने तुमच्‍या संस्‍थेची कार्यक्षमता व उत्‍पादनक्षमता उंचावेल, किंवा उत्‍पादकता वाढेल?

मित्रांनो तुम्‍हीसुद्धा अंदाज लावा ती एक गोष्‍ट कोणती असेल, आणि तेसुद्धा एका गोष्‍टीवर ठाम राहिले, तो कोणता शब्‍द असेल?

तर तो शब्‍द आहे, दृष्‍टीकोन तुमचा अॅटिट्यूड (Attitude), कोणत्‍याही स्थिती-परिस्थिती-गोष्‍ट-घटना-प्रसंगाकडे पाहण्‍याचा आपला मानसिक कल, आपली मनोवृत्‍ती..दृष्‍टीकोन.

त्‍यांनी असं सांगितलं की, जर लोकांचा दृष्‍टीकोन चांगला असेल तर आपली सांघिक कामगिरी उत्‍कृष्‍ट होईल, गुणवत्‍ता व दर्जा यांचा स्‍तर उंचावेल.

आजच्‍या युगातील अतिमहत्‍वाचा असा इंग्रजी शब्‍द जर कोणता असेल तर तो आहे, दृष्‍टीकोन. एखाद्या गोष्‍टीकडे पाहण्‍याची मनोवृत्‍ती ज्‍यामुळे आपले विचार बनतात, वर्तन घडते, आपण कसे वागतो, कसे बोलतो, यावर परिणाम होतो.  आयुष्‍यात कोणत्‍याही क्षेत्रात तुम्‍ही गेलात तर तुम्‍हाला तुमच्‍या दृष्‍टीकोनाचा परिणाम दिसून येईल.

लोकांना त्‍यांची नोकरी किंवा बढती 85 टक्‍के वेळा त्‍यांचा दृष्‍टीकोन कसा आहे यामुळे मिळते, तर केवळ 15 टक्‍के वेळा ते किती हुशार आहेत आणि त्‍यांना त्‍या क्षेत्राबद्दल किती माहिती आहे, त्‍या-त्‍या क्षेत्रातील महत्‍वाची माहिती-तथ्‍य-आकडे यांच्‍यावर अवलंबून असते.  

नोकरीसाठीच्‍या उमेदवारांचा एकदा एक शोधाभ्‍यास करण्‍यात आला होता, ज्‍यामध्‍ये असा निष्‍कर्ष निघाला की, बहुतांशवेळा नोकरीसाठी आलेल्‍या उमेदवारांपैकी 85 टक्‍के वेळा नोकरी किंवा बढती मिळत होती त्‍याच्‍या दृष्‍टीकोनामुळे उर्वरित 15 टक्‍के तो किती हुशार आहे, त्‍याची शैक्षणिक बाजू किती भक्‍कम आहे इत्‍यादींमुळे आणि जवळपास 100टक्‍के शैक्षणिक पैसा-खर्च विद्यार्थ्‍यांना केवळ तथ्‍य आणि माहिती शिकविण्‍यातच खर्ची करण्‍यात येतो जो फक्‍त 15 टक्‍केच कामाला येतो. 

खरे तर, आयुष्‍यामध्‍ये पैसा-पुंजी-संपत्‍ती कमावण्‍यासाठी त्‍या शिक्षणाची गरज व अस्‍सल आयुष्‍यातील वाटा फक्‍त 15 टक्‍केच असतो. आणि आपण आता ज्‍या गोष्‍टीबद्दल बोलत आहोत तो आपला दृष्‍टीकोन (attitude) जो आयुष्‍यात 85 टक्‍के वाटा उचलतो.

परंतू आपण कसा विचार करतो, आपला एखाद्या गोष्‍टीकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन किती महत्‍वाचा आहे यावर खूपच कमी किंवा नगन्‍य शिक्षण असते. हे विचार करण्‍यासारखे आहे.  आणि तुम्‍हीसुद्धा दृष्‍टीकोन ह्या एका महत्‍वपूर्ण शब्‍दाबद्दल नक्‍कीच सहमत असाल. 

 

मग महत्‍वाचा आणि मोठा प्रश्‍न असा की, आपण आपला दृष्‍टीकोन कसा बनवावा, घडवावा? (how do we form attitude?)

तर मित्रांनो आपला दृष्‍टीकोन तीन गोष्‍टींनी तो बनतो, ज्‍याला इंग्रजीमध्‍ये Triple E’s of Attitude असे म्‍हणतात.  दृष्‍टीकोन बनण्‍यास कारणीभूत असलेले तीन घटक ज्‍याला आपण दृष्‍टीकोन बनण्‍याचे त्रयक असे म्‍हणू, पहिला ई आहे आपण राहात असलेला आपला सभोवताल (Environment) आणि दुसरे ई- म्‍हणजे आपल्‍याला जीवनात आलेले अनुभव (Experiences) तर तिसरे ई-म्‍हणजे आपल्‍याला मिळालेले शिक्षण (Education).

 

Triple E’s of Attitude

दृष्‍टीकोन बनण्‍याचे त्रयक

  • सभोवताल (Environment)
  • अनुभव (Experiences)
  • शिक्षण (Education)

 

सभोवताल (Environment), जीवनात आलेले अनुभव (Experiences) आणि शिक्षण (Education) ह्या तीनही गोष्‍टींचा प्रभाव प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या आपला दृष्‍टीकोन कसा असेल यावर होत असतो, पडत असतो.  

 

सभोवताल किंवा वातावरण कुठून सुरू होते?

सभोवताल-वातावरण सुरू होते आपल्‍या कौटुंबिक वातावरण, काम-कार्य करतो तेथील वातावरण, सामाजिक वातावरण, राजकिय वातावरण, धार्मिक वातावरण ह्या सर्वप्रकारच्‍या वातावरणांमुळे आपले दृष्‍टीकोन बनत असते. 

आपल्‍याला जन्‍मापासून किंवा लहानपणापासून, आपोआप, विविध वातावरण, सभोवताल (environment) साहजिकच मिळत असतात, परंतू प्रथम आपण जिथे राहतो ते प्राथमिक वातावरण-सभोवताल अर्थातच आपले परिवारीक वातावरण- सभोवताल असते. तर आपण जिथे राहतो, काम करतो, त्‍या वातावरणाचा परिणाम आपल्‍या विचारांवर पर्यायाने दृष्‍टीकोनावर कसा होतो हे पुढील प्रमाणे पाहणार आहोत.

वाचकांनो, काय तुम्‍ही कधी एक गोष्‍ट लक्षात घेतली की

अतिकाळजी घेणारे अतिदक्ष किंवा अतिदोषदर्षी  कुटूंबात (overcritical family) किंवा अति-टिका करणा-या, टीकाकुशल परिवारात किंवा याच्‍याही पुढचा   विचार करायचं झाल्‍यास, अति-टिका करणारे, दोषदर्षी-गंभीर (overcritical) पालक, शिक्षक आणि पर्यवेक्षक (देखरेख करणारे) तुम्‍ही कसे दिसता, तुमच्‍या दिसण्‍यावरून (appearance), तुमच्‍या हुशारीवर (बुद्धीमत्‍ता-intelligence) आणि तुमच्‍या कार्यक्षमतेवर-सामर्थ्‍यावर (ability) नेहमीच शंका घेत असतील, सतत प्रश्‍न करत असतील तर याच्‍या ‘’दुष्‍पपरिणामफलस्‍वरूप’’ स्‍वतःची प्रतिमा खालावते आणि ‘’भयंकर न्‍यूनगंड’’ (low self-esteem Inferiority complex) निर्माण होतो, जो पुढे चालून त्‍याचे पर्यावसान आपले नकारात्‍मक दृष्‍टीकोन बनविण्‍यात होते.
Overcritical parents, teachers & supervisors, who constantly questions your ability, intelligence and appearance leads to a low self-esteem Inferiority complex, intern leads to a negative attitude, over critical.

वाचकमित्रांनो तुम्‍ही कधी नोंद घेतली असेलच, प्रत्‍येक कुटूंब-परिवारात (family), प्रत्‍येक संस्‍थेमध्‍ये (company), प्रत्‍येक देशात (every country) काम-कार्य करण्‍याची एक प्रथा, एक चालिरिती, एक  संस्‍कृती चालत असते.  

  • तुम्‍ही एखाद्या दुकानात जा, तुम्‍हाला तिथे विक्री करणारा कर्मचारी नम्र (polite) दिसेल, पर्यवेक्षक नम्र दिसेल, व्‍यवस्‍थापक नम्र दिसेल, संचालक-मालक नम्र दिसेल.
  • दुस-या एखाद्या दुकानात जा, तुम्‍हाला तिथे वरीलपेक्षा वेगळाच अनुभव येईल. तुम्‍हाला तिथे विक्री करणारा कर्मचारी उद्धट (rude) दिसेल, पर्यवेक्षक उद्धट दिसेल, व्‍यवस्‍थापक उद्धट दिसेल, संचालक-मालक उद्धट दिसेल.  
  • इतर एखाद्या कुटूंबात जा, तुम्‍हाला तिथे मुलं जिज्ञासू-चौकस आढळतील, कारण त्‍यांचे पालकच जिज्ञासू व चौकस असतील, एवढंच नाही तर त्‍यांची मदतदेखिल नम्र असेल.   
  • जर तुम्‍ही एखाद्या दुस-या कुटूंबात गेलात तर तुम्‍हाला याविरूद्ध अनुभव येतील, कुटूंबातील मुलं कुत्रं-मांजरी भांडल्‍यासारखी भांडत असतील, साहजिकच त्‍यांचे पालकही तसेच असतील, कारण त्‍यांची मदतही उद्धटच असेल.

वरील सर्वच उदाहरणांमध्‍ये आपल्‍याला एक संस्‍कृती-रीत चालत आलेली आढळून येईल.  आणि सगळीकडे कुठेही संस्‍कृतीबद्दल एकच नियम आहे. संस्‍कती नेहमीच खालून वर जात असते की वरून खाली येत असते?  संस्‍कृतीची नेहमीच वरून खाली घसरण होत असते ह्या निसर्ग-नियमाला कोणताही अपवाद नाही.

  • 1.   एखादा व्‍यवस्‍थापक-पर्यवेक्षक स्‍वतःच जर धुम्रपान न करण्‍याच्‍या नियमांना धाब्‍यावर बसवून, केराची टोपली दाखवून स्‍वतःच धुम्रपान न करण्‍याच्‍या क्षेत्रात धुम्रपान करत असेल तर ते कसं शक्‍य आहे?
  • 2.   एखाद्या कुटूंबातील पालक त्‍यांच्‍या पाल्‍यांना प्रामाणिक होण्‍याचे कसे शिकवू शकतात जर ते स्‍वतःच स्‍वतःशी प्रामाणिक नाहीत?
  • 3.   एखादा उद्योगी-व्‍यावसायिक स्‍वतःच जर विविध प्रकारच्‍या नोंदवह्या, खातेवह्या, जमाखर्च वह्या प्रामाणिकपणे सांभाळत नसेल, लिहित नसेल तर त्‍याच्‍या कर्मचा-यांना, अधिका-यांना प्रामाणिकपणे तसे करण्‍याचे निर्देश कसे देऊ शकतो?   

नीती-नियमं-कायदे ह्या समाज-संस्‍कृतीच्‍या नाड्या आहेत, यांनाच जर नजरअंदाज करत असाल आणि जेव्‍हा कायदे-नियमं बनविनारेच जर त्‍याचे उल्‍लंघन करत असतील तर निश्‍च‍ितच संस्‍कृतीचा स्‍तर नक्कीच खालावत जातो.

 

1. Environment वातावरण-सभोवताल 

1. कौटुंबिक-परिवारीक वातावरण- सभोवतालFamily Environment

कौटुंबिक-परिवारीक वातावरण- सभोवताल  (family environment) यामध्‍ये आपण जिथे राहतो, जिथे आपले संगोपन झालेले असते, होत असते, ते वातावरण अर्थातच त्‍यात आपले कुटूंब, परिवार येतो.  लहानपणापासूनच जे संस्‍कार, शिक्षण, आपल्‍यावर त्‍याचा प्रभाव पडत असतो ज्‍यामुळे आपले दृष्‍टीकोन त्‍याप्रकारचे बनत असते.

2. सामाजिक वातावरण: Social Environment

पहिल्‍या व प्राथमिक ठिकाणी येतो आपला कौटुंबिक वातावरण तर दुस-या ठिकाणी येतो सामाजिक वातावरण (social environment). 

वाचकमित्रांनो तुम्‍ही आपल्‍या सभोवतालच्‍या वातावरणात नक्‍कीच नोंद घेतली असेल की, सभोवतालचे सामाजिक वातवरण जर प्रामाणिक असेल तर एखाद्या भ्रष्‍ट व्‍यक्‍तीला त्‍या समाजात राहणे अवघड जाते, तर या उलट, सामाजिक वातवरण जर भ्रष्‍ट असेल तर चांगल्‍या प्रामाणिक व्‍यक्‍तीला त्‍या समाजात राहणे अवघड जाते.

साहजिकच सामाजिक वातावरण कोणतेही असो भ्रष्‍ट-सभ्‍य-प्रामाणिक, आपले दृष्‍टीकोनही त्‍यानुसार तयार व्‍हायला लागते.   

3. कार्य-काम करण्‍याचे वातारवण: Work Environment

भारतीय उप-खंडातील तसेच पुर्वेकडील आशिया खंडातील देशांची बरीच लोकं सातासमुद्रापार पश्चिमी देश जसे अमेरिका, कॅनडा, युके, युरोप अशा विविध भागात कामं करण्‍यासाठी जात असतात, आणि ते तिथे जाऊन भौतिकदृष्‍ट्या भरपूर प्रगती करतात, पैसा-संपत्‍ती कमावतात, आपला विकास साधतात, आपली एक ओळख निर्माण करतात.

परंतू जसेही ते आपल्‍या मायभूमित परत येतात त्‍यांची स्‍वतःची प्रगती खुंटते, भौतिक वाढ थांबते, असे का होते?

अनुकूल-चांगल्‍या वातावरणात, एक सर्वसाधारण किंवा सर्वसामान्‍य सुमार दर्जाची कामगिरी करणारा व्‍यक्‍ती-कर्मचारी चांगले कार्य करू शकतो तर चांगले कार्य करणारा एखादा व्‍यक्‍ती-कर्मचारी उत्‍तम-उत्‍कृठ-श्रेष्‍ठ कामगिरी करतो.  तर, प्रतिकूल-वाईट वातावरणात, एका चांगली कामगिरी करणा-या व्‍यक्‍तीची कार्यक्षमता-उत्‍पादकता घटते, कामगिरीचा स्‍तर खाली खाली येतो.

सारखीच माणसं, वेगवेगळ्या वातावरणात त्‍यांची उत्‍पादकता खालावते. सामाजिक वातावरणाचा परिणाम.

In a good environment a Marginal Performer dose well & good performer excels, where as, in a bad environment, a good performers output starts coming down.

काम-कार्य-नोकरी-व्‍यवसाय करतो ते वातावरण (work environment)

आपण जिथे काम-कार्य-नोकरी-व्‍यवसाय करतो ते वातावरण (work environment) वरिष्‍ठ-कनिष्‍ठ, कामगार-कर्मचारी-सहकारी-अधिकारी, साहेब-संचालक-व्‍यवस्‍थापक-मालक अशा विविध स्‍तरावरच्‍या, पातळीच्‍या लोकांसोबत आपले काम चालत असते, विचारांची, कामाची, उद्योग-व्‍यवसाय यासंबंधी वैयक्तिक व व्‍यावसायिक व्‍यवहारांची देवाण-घेवाण होत असते. 

येथील वातावरण जर पुर्वग्रहदुषीत असेल किंवा नकारात्‍मक वातावरण असेल तर साहजिकच आपला दृष्‍टीकोन नकारात्‍मक बनतो.  त्‍याउलट जर सकारात्‍मक वातावरण असेल तर आपला दृष्‍टीकोनदेखिल सकारात्‍मक बनतो. 

आता पुढे बघु राजनितीक वातावरण, 

4. राजकिय वातावरण: Political environment

राजकिय वातावरण, ब-याचवेळा आपल्‍या सभोवतालच्‍या वातावरणात राजकिय अनिश्चितता असते तिथे लोकं अल्‍प मुदतीचं विचार करायला लागतात, ते, दीर्घमुदतीचे नियोजन करायला सुरूवात करत नाहीत. यामुळेदेखिल आपल्‍या दृष्‍टीकोनावर फरक पडायला सुरूवात होते.   

राजकिय वातावरण (political environment) सत्‍ताधारी, विरोध, पक्ष-विपक्ष, विचारधारा इत्‍यादी येतात,

5. सांस्‍कृतिक वातावरणः Cultural environment

सामाजिक वातावरणाप्रमाणेच सांस्‍कृतिक वातावरणात ब-याचवेळा लोकं अविश्‍वासूपणाने वागायला लागतात, त्‍यामुळेदेखिल आपले दृष्‍टीकोन प्रभावित व्‍हायला लागते.  

6. धार्मिक वातावरण: Religious environment

धार्मिक वातावरण (religious environment) असे भिन्‍न-भिन्‍न वातावरण यांमुळे कळत-नकळत, प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या आपले दृष्‍टीकोन तयार-निर्माण करण्‍यात सहभागी असतात. 

 

2. आयुष्‍यात येणारे अनुभव: Experiences

अनुभव कसे आपले दृटीकोन बनवते?

दैनंदिन जीवन जगत असताना विविध अनुभवांची देवान-घेवान होते, अनुभव येत असतात.  वाचकमित्रांनो, आपल्‍याला आलेले अनुभव आणि घटना-प्रसंग ही आपल्‍या जीवनात संदर्भसूचीसारखे काम करतात.  आपण अनुभवांद्वारे निष्‍कर्ष काढत असतो आणि ते आपल्‍याला मार्गदर्शक घटकासारखे जीवनात पुढे जाण्‍यासाठी मदत करतात.

जर मला एखाद्या व्‍यक्‍तीसोबत चांगले अनुभव आलेले असतील तर पुढील आयुष्‍यात नक्‍कीच मी त्‍या व्‍यक्‍तीबद्दल सकारात्‍मक असेल.  परंतू, जर मला एखाद्या व्‍यक्‍तीसोबत वाईट अनुभव आलेले असतील आयुष्‍यात पुढे जाण्‍यासाठी मी त्‍या व्‍यक्‍तीसोबतच्‍या मागील अनुभवाद्वारे सावध असेन, सावधपणे पुढील व्‍यवहार करायचा की नाही, किती व्‍यवहार करायचा याबद्दल जागरूक राहुनच, सावध राहुनच काम करणार. कारण त्‍याचे मागील अनुभव माझ्या जीवनातील संदर्भबिंदू बनलेलं असतं.

दृष्‍टीकोन बनविण्‍यात महत्‍वाचा वाटा असलेले जीवनात आलेले अनुभव-घटना-प्रसंग (experiences & events in life) यानंतर तिसरा महत्‍वाचा ई-आहे एज्‍युकेशन (Education) शिक्षण.

 

 3. शिक्षण: Education:

तिसरा महत्‍वाचा भाग जो आपला दृष्‍टीकोन घडविण्‍यास कारणीभूत असतो तो म्‍हणजे शिक्षण होय.   शिक्षण आपल्‍या विचारांच्‍या क्षितिजांना विस्‍तृत करतं.  हे आपल्‍यावर अवलंबून असते की आपण घेतलेल्‍या, शिकलेल्‍या शिक्षणाचं आपण काय करतो ते. आणि हेदखिल आपल्‍या मूल्‍यांवर अवलंबून असते.   

जेव्‍हा-केव्‍हा आपण मूल्‍यांबाबदच्‍या विषयाला स्‍पर्श करतो, जेव्‍हा आपण मूल्‍यांबद्दल बोलतो, तेव्‍हा एक मोठा प्रश्‍न येतो, कोणाच्‍या मूल्‍यांबद्दल आपण बोलत आहोत आणि ते ठरविणारे आपण कोण आहोत?

Education of Values & Ethics 

  • Universal Values,
  • Eternal Values, 
  • Cross country, 
  • Cross Culture, 
  • Cross Religious value

आपण ज्‍याबद्दल बोलतो ती मूल्‍ये, वैश्‍विक अथवा सार्वभौमत्‍वाची मूल्‍ये, अनंत-शाश्‍वत मूल्‍ये आहेत आणि ती सबंध धर्म, संस्‍कृती आणि राष्‍ट्रांन्‍वये भिन्‍न-भिन्‍न, बदलणारी असतात.

मग अशावेळी प्रश्‍न येतो की आपण आपला दृष्‍टीकोन सकारात्‍मक कसा बनवावा?

वाचक मित्रांनो, आपले मन हे एका बागेसारखे आहे, जर तुम्‍ही त्‍यामध्‍ये चांगले बीज रूजविले तर तुम्‍हाला एक चांगली बाग फुललेली मिळेल, परंतू, जर का तुम्‍ही चांगल्‍या प्रतिचे बीज रूजविले नाही तरी काहीतरी वाढेलच उगवेलच, आणि ते काय असेल? रानगवत.. कारण निसर्ग पोकळीला भरून काढत असतो. एक तर आपण सकारात्‍मक असू शकतो नाहीतर नकारात्‍मक, इथे तटस्‍थपणा नसतोच, मध्‍यम मार्ग नक्‍कीच नाही.  

जे पेराल तेच उगवेल
"Reap what you Sow"

if you plant seeds or do something good, you should expect to reap rewards later.
 

Read More: As a Man Thinketh माणूस जसा विचार करतो तसा बनतो 

📑🔖📕📗📖📘📙

 

पुढे पाहुया आपण आपली मूल्‍यं कसे निर्धारित करतो, मूल्‍यं कशी बनतात?

👉तुम्‍ही जिंकू शकता-भाग-2 -जीवन मूल्‍ये |

YOU CAN WIN- Part-2 - LIFE VALUES

📑🔖📕📗📖📘📙

 

इतर संबंधितः 

 
 



 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.


टिप्पण्या

  1. प्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्‍वागत, आणि वाचनासाठीच्‍या या संकेतस्‍थळावर भेट दिल्‍याबद्दल आपले खूप धन्‍यवाद.

    कृपया PDF पुस्‍तकांच्‍या ऐवजी प्रत्‍यक्ष पुस्‍तक वाचन करा. तरी तुम्‍हाला परवडणार नसेल तर डाऊनलोड भागामध्‍ये फ्री पुस्‍तके शोधा.

    फ्री PDF शोधणारे पूर्ण पुस्तक प्रामाणिकपणे क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते.

    पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा.
    पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या. आणि सविस्‍तर वाचा, पुस्‍तकातील गोष्‍टी आयुष्‍यात आत्‍मसात करा, बदल बघा, यशस्‍वी व्‍हा.

    उत्तर द्याहटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive