त्या प्रत्येक वाचकासाठी उपयुक्त ज्यांना काही तरी कमवायची इच्छा
आहे, पैसा मिळेल की नाही हे वेगळं पण पुस्तक वाचून पैशाविषयीची विचार
करण्याची विचारांची श्रीमंती नक्कीच वाढेल
विचार करा आणि श्रीमंत व्हा
नेपोलियन हिल
मराठी अनुवाद
थिंक
अॅण्ड ग्रो रिच' हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि
जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये
पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे 'पैसे कमावण्याचे गुपित' आजही तितकेच
सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते.
ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू
शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर
नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे
रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला
शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही.
तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे,
टप्प्यांचे सूत्र बनवले आहे.
- स्वतःची ध्येये ओळखा.
- खऱ्या आणि अविनाशी
यशाचे रहस्य आत्मसात करा.
- जीवनात जे हवे ते मिळवा.
- परमोच्च यशस्वी
लोकांच्या रांगेत जाऊन बसा.
या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा
स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या
सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त
करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही
समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली
गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे. स्वतःच्या
स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.
Subconscious mind marathi book pdf taka
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्वागत, आणि वाचनासाठीच्या या संकेतस्थळावर भेट दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद.
उत्तर द्याहटवाआयुष्यात बदल घडविण्यासाठी आपण स्वतःला समजून घेत आहात, स्वतःला जाणून घेण्याच्या प्रयत्नात वाचनाला निवडलात याबददल आपले अभिनंदन.
आपण स्वयंमदत, स्वयंविकास करण्यासाठीच्या मार्गावर आहात यावरून दिसून येते.
आपण जर अगदी मनापासून स्वतःची स्वच्छ प्रतिमा बनवण्याची इच्छा असेल, तर कृपया PDF पुस्तकांच्या ऐवजी प्रत्यक्ष पुस्तक वाचन करा. नक्कीच सकारात्मक फरक जाणवेल तुम्हाला. तरी तुम्हाला परवडणार नसेल तर महाजालावर इतरत्र शोध घ्या, अथवा या पुस्तकाचे सारांश लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ.
फ्री PDF शोधणारे पूर्ण पुस्तक प्रामाणिकपणे क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते.
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री पीडीएफ शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या. आणि सविस्तर वाचा, पुस्तकातील गोष्टी आयुष्यात आत्मसात करा, बदल बघा, यशस्वी व्हा.