सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे -रॉबर्ट ग्रीन | The 48 Laws of Power by Robert Greene | Book Summary in Marathi -Part-1

  उच्च स्थानी कसे जावे व तिथे कसे टिकावे - सत्ता व अधिकारप्राप्तीची चिरस्थायी, सुस्पष्ट 48 सुत्रे. 

आधुनिक जगात कार्य सिध्दीस नेण्यासाठी कसे फसवावे, लुच्चेपणा कसा वापावा, बनावट, कल्पिताची काय धरून संघर्ष कसा करावा याची उत्तम शिकवण देते अखेरीस एक मौलिक ग्रंथ, तुम्हाला सत्तेच्या रचनेमध्ये उच्चतर श्रेणीवर जाण्याच्या योजना आखताना उपयुक्त असणारा.....

सत्‍ता

अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे

लेखक- रॉबर्ट ग्रीन 

मराठी भाषेत सारांश

 भाग-१

 48 LAWS OF POWER

 

 

 

 👉भाग-२ वाचन करण्‍यासाठी

"सत्‍ता आणि संपत्‍ती ह्या अशा गोष्‍टी आहेत ज्‍या प्राचीन काळापासून मानवाला हव्‍या-हव्‍याश्‍या होत्‍या, आहेत आणि राहणार आहेत.  कारण सत्‍ता ही शक्‍तीचं प्रतीक आहे आणि प्रस्‍थापित व्‍यवस्‍थेमध्‍ये/समाजामध्‍ये आपल्‍या मनासारखे परिवर्तन घडवून आणू शकते तर परिवर्तन आणि बदल आणण्‍यासाठी संपत्‍ती महत्‍वाचे साधन आहे."

सत्‍ता-साम्राज्‍य-शासन-अधिकार यांना प्राप्‍त करण्‍याची लालसा म्‍हणणे योग्‍य आहे का नाही माहित नाही परंतू परिवर्तनासाठी सत्‍तेचा उपयोग झाल्‍याचे इतिहास सांगतो. 

    आज आपण ज्‍या पुस्‍तकाचे सारांश पाहणार आहोत त्‍यालादेखिल प्राचीन आणि मध्‍ययुगीन इतिहासाची पार्श्‍वभुमीचा वापर केलेला आहे.  सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८-सुत्रे (48-Laws of Power) ह्या पुस्‍तकाचे लेखक आहेत रॉबर्ट ग्रीन ज्‍यांनी पाच जागतीक स्‍तरावर गाजलेली पुस्‍तकं लिहिली आहेत.  ही पुस्‍तक रॉबर्ट ग्रीन यांची पहिली पुस्‍तक होती ज्‍यामुळे लेखक म्‍हणून त्‍यांच्‍या जीवनात महत्‍वाची भुमिका निभावली.

रॉबर्ट ग्रीन यांच्‍या ह्याच पुस्‍तकामुळे ब-याचशा विवादांचा सामना करावा लागला. तरीदेखिल लेखक आपल्‍या कल्‍पनेसोबत नेहमीच ठाम राहिले.

सत्‍ता प्राप्‍तीचे ४८-सुत्रे

  • सत्‍ता प्राप्‍तीचे ४८-सुत्रे ही पुस्‍तक अशा ४८-मार्गांना समजण्‍यासाठी आहे ज्‍यांद्वारे आपण कसे आपण आपल्‍या शक्‍तीचा वापर करू शकतो आणि त्‍या शक्‍तीला वाढवू शकतो. 
  • हे ४८-सुत्र अशा कृती-कल्‍पना आणि डावपेच ह्यांपासून बनले आहेत जे सत्‍तेचे खेळ खेळण्‍यासाठी वापरले जातात. 
  • लेखक सजगपणे आणि चांगल्‍यारितीने समजतात आणि दाखवतात की कसे सत्‍ता तुमच्‍या व्‍यवसाय आणि कार्यक्षमतेला परिणामकारक बनवते. 
  • ही पुस्‍तक व्‍यावसायिक पुढारी आणि उद्योगजगतामध्‍ये अतिषय प्रसिद्ध व पसंत केली गेली आणि पुरस्‍कृत केली गेली आहे.  

ह्या सारांशामध्‍ये रॉबर्ट ग्रीन यांच्‍या सर्व ४८-सुत्रांना समजून घेणार आहोत. लेखक प्राचीन व मध्‍ययुगीन छोट्या-छोट्या कथा-दंतकथा यांचा वापर करून समजावले असून ज्‍याद्वारे आपण सत्‍तेचे गुढ जाणून घेणार आहोत. 

काही सुत्रे किंवा नियम खुपच बेधडक आहेत. असेही होऊ शकते की सर्वजन त्‍यांच्‍याशी सहमत असतीलच असे नाही.  परंतू सारांशाचा आमचा हेतू पुस्‍तकाला जसेच्‍या तसे सादर करण्‍याचा आहे.  याची सुजान वाचकांनी नोंद घ्‍यावी. 

चला तर मग सत्‍तेची सुत्रे हातात घेण्‍यासाठी नियम बघुया... ! 


 

Book Summary in Marathi of 48-Laws of POWER

#satta marathi book pdf free download #the power book in marathi pdf free download

सुत्र क्र.१ - आपल्‍या वरिष्‍ठांपेक्षा जास्‍त चमकू नका: (Never Outshine the Master)

पुस्‍तकातील नियम क्रमांक एक असे सांगतो की, कार्य, व्‍यवसाय, संस्‍था, संघटना येथील वरच्‍या पदावरचा व्‍यक्‍ती तुमच्‍यापेक्षा चांगला-सरस आहे.  हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, तुम्‍ही त्‍यांच्‍याखाली काम करत आहात.  आणि हिच गोष्‍ट त्‍यांनासुद्धा आठवन करून देत जा. 

आपल्‍या बुद्धीला आणि कौशल्‍यांना दाखविणे अगदी सोपे आहे.  परंतू एक गोष्‍ट नेहमी लक्षात घ्‍या की असे करून तुम्‍ही तुमच्‍या वरिष्‍ठांना कमी लेखत तर नाही.  असे वाटू देत असाल. 

लेखकांचं असं म्‍हणणं आहे की, जर तुम्‍ही तुमच्‍या वरिष्‍ठांना असं वाटू दिलात की, ''ते जसे आहेत त्‍यापेक्षा आणि तुमच्‍यापेक्षा अधिक चांगले आहेत.'' तेंव्‍हा असे करून तुम्‍हाला पुढे जाण्‍याची शक्‍ती मिळेल.  जर तुम्‍ही त्‍यांना असे वाटू दिलात की, त्‍यांच्‍या भुमिकेवर आणि त्‍यांच्‍या शक्‍तींवर तुम्‍हाला शंका आहे तर असे करून तुम्‍हालाच नुकसान होईल. आणि तुम्‍ही मागे राहुन जाल. 

 

सुत्र क्र.२- आपल्‍या मित्रांवर विसंबून राहू नका, शत्रूंचा वापर करायला शिका:
(Never put too much trust in friends, learn how to use enemies)

लेखक नियम क्रमांक-२ नुसार असे सुचवितात की, आपल्‍या मित्रांवर विशेषकरून जवळील मित्रांवर अत्‍याधिक विश्‍वास न ठेवण्‍याची चेतवानी देतात.  लेखक म्‍हणतात, तुमच्‍या मित्रांना तुमच्‍यासोबत खुप सोप्‍यापद्धतीने मत्‍सर निर्मान होऊ शकतो आणि ज्‍याचा परिणाम संधी मिळताच विश्‍वासघातामध्‍ये होतो.  तुमच्‍या मित्रांना तुमचा हेवा वाटू शकतो आणि ज्‍याचे रूपांतर धोका देण्‍यामध्‍ये होऊ शकतो. 

लेखक म्‍हणतात तुमचे जुने शत्रू तुमच्‍या नव्‍या मित्रांपेक्षा अधिक चांगले असू शकतात. असं यासाठी कारण, जो तुमचा शत्रू आहे त्‍याला खूपकाही सिद्ध करावे लागते.   

तुम्‍ही पाहिलं असेल की नेहमी असे लोकं तुमच्‍याजवळून आदर आणि विश्‍वास जिंकण्‍यासाठी/मिळविण्‍यासाठी खुप श्रम-मेहनत करतात आणि त्‍यामुळे ते चांगले सहयोगी आणि चांगले कर्मचारी बनतात. 

रॉबर्ट ग्रीन म्‍हणतात, 

"तुम्‍हाला तुमच्‍या मित्रांपासून घाबरायला पाहिजे,
आपल्‍या शत्रूंपासून नाही."

किंवा

"मुझे अपने दोस्‍तों से बचाव, दुश्‍मनोंसे मैं खुद निपट लूंगा |"


सुत्र क्र.३ - आपले प्रयोजन नेहमी झाकून ठेवा: (Conceal your intentions)

हा नियम असं सांगतो की, आपल्‍याला आपल्‍या मनातील मनसुबे किंवा हेतू लोकांना सांगायला नाही पाहिजे. 

खरं तर तुमचे कार्य हेच तुमच्‍या हेतूंची झलक दाखवत असतात. तरीसुद्धा त्‍यांना समजू देऊ नये. 

लोकांना अंधारात ठेवण्‍याचा अर्थ आहे की ते स्‍वतःला तयार करू शकनार नाहीत आणि उत्‍तर देण्‍याच्‍या वेळेस ते तयार राहणार नाहीत. 

ग्रीन असा सल्‍ला देतात की, लोकांना चुकीची माहिती देवून, आपण लोकांना असं दाखवू की आपण एखाद्या चुकीच्‍या दिशेने जात आहोत, आणि ते त्‍यामध्‍येच फसून राहतील.  आणि जोपर्यंत त्‍यांना तुमच्‍या हेतूबद्दल कळाले असेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि ते काहीच करू शकनार नाहीत. 


सुत्र क्र.४ - आवश्‍यकतेपक्षा कमी बोला: (Always say less than necessary)

हा नियम तिस-या नियमासोबत जोडलेला आहे. आवश्‍यकतेपेक्षा जास्‍त कधीच बोलू नका. जेवढं शक्‍य आहे तेवढं कमी बोला.  लेखक म्‍हणतात, तुम्‍ही अधिक बोलून आपली स्‍वतःची वाईट प्रतिमा निर्माण करता आणि जास्‍त चौकशी करण्‍याची संधी देता. आणि एखादी नकोशी गोष्‍टसुद्धा तोंडातून निघू शकते. 

शक्‍तीशाली व्‍यक्‍ती कमी बोलतात, आणि नेहमी आपलं बोलनं अस्‍पष्‍ट (Vogue) आणि एका खुल्‍या-बंदिस्‍ततेने (Open Ended) मुक्‍तपणे बोलतात.  त्‍यांचं असं करणं धोकादायक आणि प्रभावी/परिणामकारक असू शकतो. 

📕📙📘📗

👉अधिक वाचाः  नेमके काय बोलावे-भुरळ घालणारे जादुई शब्‍द

👉अधिक वाचाः देहबोलीः आधुनिक संवाद-संभाषण चातुर्य कला

 the power book in marathi pdf free download shakti book in hindi pdf free download shakti ke 48 niyam book in hindi pdf free download शक्ति के 48 नियम pdf free download robert greene books 48 laws of power audiobook zip free download the 50th law hindi pdf the 44 laws of peace pdf

 

सुत्र क्र.५ - किर्तीवर सर्वकाही अवलंबून असते, प्राणपणाने किर्तीची रक्षा कराः
(So much depends on reputation, guard it with your life)

आपणांसर्वांना हे माहितच आहे की, आपले नाव आणि पत-प्रतिष्‍ठा घडवू शकते आणि बि-घडवू सुद्धा शकते.  व्‍यक्‍तीची शक्‍ती त्‍याच्‍या नावावरून आणि त्‍याच्‍या प्रतिष्‍ठेवर टिकलेली असते.  

जर तुमचं खूप नाव असेल तर तुमच्‍यामध्‍ये एक प्रभावशाली शक्‍ती असते. तर जर तुमचं नांव मोठं आणि मजबूत नसेल तर तुम्‍ही सोप्‍या पद्धतीने लोकांच्‍या जाळ्यात ओढल्‍या जाऊ शकता.  सोबतच स्‍वतःवर हल्‍ला करण्‍याची संधीसुद्धा देत असता. 

ग्रीन येथे आपल्‍याला स्‍वतःचे नांव मजबूत बनविण्‍यावर जोर देतात. जर तुम्‍हाला एखादी समस्‍या समोर दिसली तर त्‍याचा स्‍वतःवर प्रभाव टाकण्‍याअगोदर त्‍या समस्‍येचा सामना करा. 

आपल्‍या शत्रूच्‍या कमजोरीला समजणे आणि त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या नावाला खराब करण्‍याची गोष्‍ट समजावली आहे.  जर तुमचं खूप नाव असेल तर तुमच्‍यामध्‍ये एक प्रभावशाली शक्‍ती असते.

 


सुत्र क्र.६ - कोणत्‍याही किंमतीवर लक्ष वेधून घ्‍या: (Court attention at all cost)

जेवढे आवश्‍यक तुमचे नांव आहे तेवढेच आवश्‍यक हे आहे की लोकं तुमच्‍याकडे कसे पाहतात. 

रॉबर्ट येथे समजावतात की तुम्‍हाला सर्वसामान्‍यांसोबत सहजच मिळून-मिसळून राहायला नाही पाहिजे. (हरवून जायला नाही पाहिजे).  हे तुमच्‍याच हातात आहे की तुम्‍ही स्‍वतःला 'वेगळे' कसे दाखवता, आणि कसे लोकांच्‍या नजरेत येत असता.  जर असं करण्‍यासाठी तुम्‍हाला काही मोठं करायला लागलं तर  तसं अवश्‍य करा. 

आपल्‍या मनासारखे लक्ष वेधून घेण्‍यासाठी  आपल्‍या बोलण्‍यामध्‍ये थोडेसे रहस्‍य बनवून ठेवा.

 

सुत्र क्र.७ - तुमच्‍यासाठी इतरांना कामे-श्रम करू द्या, परंतू श्रेय स्‍वतःकडे येऊ द्या:
(Get others to do the work for you, but always take credit)

हे नियम असे सांगते की, इतरांकडून कामे करवून घेतली जाऊ शकतात.  लोकांजवळ ज्ञान, बुद्धी, कौशल्‍य, प्रतिभा यांसारख्‍या अनेक गोष्‍टी आहेत दाखविण्‍यासाठी. 

ज्ञान, बुद्धी, कौशल्‍य, प्रतिभा -Knowledge, Wisdom, Skill, Talent

ग्रीन असे सांगतात की आपल्‍याला दुस-या लोकांचा पुरेपुर फायदा घ्‍यायला पाहिजे.  आपल्‍याला ती कामे करायला नाही पाहिजे जी इतर लोकंसुद्धा करू शकतात. दुस-याकंडून कामे करवून घेऊन तुम्‍ही आपला वेळ वाचवत असता आणि अधिक परिणामकारकसुद्धा बनता.   परंतू लक्षात ठेवा की तुम्‍ही त्‍या कामाचे श्रेय घेतले पाहिजे आणि असे समजू द्या की सा-या मेहणतीवर-श्रमावर तुमचेच हात आहेत. 

 

 

सुत्र क्र.८ - लोकांना तुमच्‍याकडे येऊ द्या, आवश्‍यक असल्‍यास आमिष दाखवा:
(Make other people come to you, use bait if necessary)

दुस-यांकडून कामे करवून घेऊन तुम्‍ही नियंत्रण तुमच्‍या हाती घेता.  तुम्‍हाला कळसुत्रीची बाहुली चालवणा-या निष्‍णात/प्रविण सारखे बनायला पाहिजे.  तुम्‍ही स्‍वतः लोकांपर्यंत जाऊ नये, लोकांना आपल्‍यापर्यंत येण्‍यासाठी प्रोत्‍साहित करायला पाहिजे.  गरज पडल्‍यास प्रलोभण आणि आमिष दाखवण्‍याचा सहारा घ्‍या.

एकदा का समोरील व्‍यक्‍ती स्‍वारस्‍य दाखविल्‍यास आपल्‍या प्रभाव आणि शक्‍ती-सत्‍तेचा-अधिकाराचा वापर  करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला पाहिजे.  परिस्थितीचे नियंत्रण आपल्‍या हातात घेऊ शकता. 

पत्‍ते नेहमी तुमच्‍या हातामध्‍ये असायला पाहिजे. 



सुत्र क्र.९ - वायफळ (युक्‍तीवाद) बडबडीपेक्षा आपल्‍या कृतीने जिंका:
(Win through your actions, never through argument)

तुम्‍हाला एका युक्‍तीवादाने मिळालेले एका क्षणाचेसुद्धा यश हे काही कामाचे नाही.  लेखक असे मानतात की तुम्‍हाला दुस-यांचा विश्‍वास जिंकायला आणि आपल्‍या सोबत करायला आपल्‍या शब्‍दांचा नाही तर आपल्‍या कार्याचा वापर करायला पाहिजे. 

वर सांगितल्‍याप्रमाणे,  ''तुम्‍हाला एका युक्‍तीवादाने मिळालेले एका क्षणाचे यश सुद्धा बेकार आहे.'' 

दुस-यांचा विश्‍वास संपादन करायला आणि त्‍यांना आपल्‍या सोबत येण्‍यासाठी आपल्‍या शब्‍दांचा नाही तर आपल्‍या कार्याचा वापर करायला पाहिजे.  युक्‍तीवाद करणे आपल्‍या शक्‍तीचा वापर करण्‍याची योग्‍य पद्धत नाही.  तुम्‍हाला केवळ आपल्‍या कार्यानेच इतरांना प्रभावित करायलाआले पाहिजे. 

 

सुत्र क्र.१० - संसर्ग: दुःखी आणि दुर्दैवी लोकांचा सहवास टाळा
(Infection: Avoid the unhappy and unlucky people)

लेखक रॉबर्ट ग्रीन येथे आपल्‍याला सुःख-आनंदी आणि भाग्‍यशाली-सुदैवी लोकांच्‍या गराड्यात राहण्‍याच्‍या गोष्‍टीवर भर/जोर देतात.   असे करून तुम्‍ही तुमच्‍या आनंद आणि यशाला वाढविता.  जर तुम्‍ही नेहमी स्‍वतःला दुःखी आणि दुर्दैवी लोकांत घेरुन राहिलात तर असेही होऊ शकते की तुम्‍ही त्‍यांचे दुःख स्‍वतःवर घ्‍याल. 

इतरांच्‍या चिंतेत/काळजीत स्‍वतःला चिंतीत करणे/काळजीत टाकणे खुप सोपे आहे. तर त्‍यांच्‍यापासून दूर राहणे कधीही चांगले. 


सुत्र क्र.११ - लोकांना आपल्‍यावर अवलंबून ठेवायला शिका:
(Learn to keep people dependent on you)

सत्‍तेचा ११ वा नियम त्‍या इतर लोकांशी संबंध प्रस्‍थपित करण्‍याविषयी आहे जे तुमच्‍यावर निर्भर आहेत.  नेहमी लोकांमध्‍ये आपली गरज बनवून ठेवल्‍यासच तुम्‍ही तुमच्‍या शक्‍ती-सत्‍तेला आणि स्‍वातंत्र्याला बनवून ठेवू शकता.  जर इतर लोकं खुपच जास्‍त स्‍वतंत्र आहेत आणि त्‍यांना तुमच्‍या सल्‍ल्‍याची आणि मदतीची गरज नाही तर ते स्‍वतः अधिक शक्‍तीशाली होतील. 

आपल्‍या सोबत काम करणा-या लोकांना सर्वकाही शिकवू नये आणि त्‍यांना सर्वकाही करण्‍याची संधीसुद्धा द्या.  त्‍यांना नेहमी कोणत्‍याही गोष्‍टीसाठी तुमची गरज असायला पाहिजे. 

  

सुत्र क्र.१२ - निवडक प्रामाणिकपणा आणि औदार्य यांचा वापर करा, तुमच्‍या सावजास निःशस्‍त्र करा:
(Use selective honesty and generosity to disarm your victim)

एक प्रांजळ आणि प्रामाणिक कृती डझनभर अप्रामाणिक खेळींना झाकून ठेवते.

खुल्‍या मनाने/हृदयाने/दिलाने  आणि खरेपणासोबत तुम्‍ही कित्‍येक लोकांना आपल्‍यासमोर नतमस्‍तक होऊ देऊ शकता. लेखकांचं असं म्‍हणण्‍याचा अर्थ आहे की, तुम्‍ही अनंतवेळा बेईमान-अप्रामाणिक होऊ शकता.  फक्‍त एकावेळेस प्रामाणिकपणा दाखवून तुम्‍ही त्‍यावेळेससुद्धा लोकांची मने जिंकू शकता जेंव्‍हा तुम्‍ही अप्रामाणिक राहता. 

जर तुम्‍ही आपल्‍या प्रामाणिकपणाचा चांगल्‍या पद्धतीने वापर केला तर लोकं तुम्‍हाला विश्‍वासास पात्र आहात असं समजतील. 

जोवर समोरच्‍याला तुमच्‍या त्‍याच्‍या स्‍वतःकरिता त्‍यातून काहीही फायदा दिसत नाही, तोवर तुमच्‍या निकडीचा ते तिरस्‍कार करतील.  काहीही घेण्‍यापुर्वी देण्‍यास शिकले पाहिजे.  त्‍यामुळे तुमच्‍या संपर्कातील लोकांमध्‍ये मऊपणा, लवचिकता येतो.  देण्‍याच्‍या अनेक पद्धती असू शकतात. जे जे लागेल ते ते द्यावयास पाहिजे. जसे- व्‍सतुरूप भेट, चांगुलपणाची कृती, औदार्य, एक विशेष प्राधाण्‍य, एक प्रांजळ कबुली.

निवडक प्रामाणिकपणा हा परिचयाच्‍या प्रथम  भेटीत वापरणे सर्वोत्‍तम ठरते असे लेखकाचे म्‍हणणे आहे. 



सुत्र क्र.१३ - मदत मागताना लोकांच्‍या स्‍वार्थाला याचना करा:
(When asking for help, appeal to people's self-interet)

हे तर निश्‍चति आहे की, कधी ना कधी तुम्‍हाला मदतीची गरज पडेलच.  जेंव्‍हा केंव्‍हा तुम्‍ही असे कराल तेंव्‍हा तुम्‍ही  मागे केलेल्‍या चांगल्‍या कामाचा सहारा किंवा मदत कधीही घ्‍यायला नाही पाहिजे.  खरंतर अशी गोष्‍ट त्‍यांच्‍या समोर ठेवा की इतरांनाही त्‍यांचा त्‍या गोष्‍टीमध्‍ये फायदा दिसेल.  कारण असे केल्‍यास लोकं मदत करण्‍यासाठी लवकर तयार होतात.  

जरी त्‍यांचा खरा फायदा त्‍यामध्‍ये होत नसेल, परंतू आपल्‍या विनंतीला असे फिरवायला पाहिजे की,  त्‍यांना त्‍यामध्‍ये त्‍यांचा फायदा दिसेल.

 


सुत्र क्र.१४ -     मित्रासारखे वागा, हेरासारखे कार्य करा:
(Pose like as a friend, work as a spy)

तुम्‍हाला तुमच्‍या शत्रूंना समजावणे किती आवश्‍यक आहे, तुम्‍हाला त्‍यांच्‍या शक्‍तींची आणि कमजोरींची माहिती असायला पाहिजे.    याची सर्वांत चांगली पद्धती ही आहे की, तुम्‍ही एका गुप्‍तचरासारखे बनले पाहिजे. लोकांकडून माहिती काढायला शिका.  त्‍यांना योग्‍य वेळी योग्‍य प्रश्‍न विचारायला पाहिजे.  जर तुम्‍ही काय करत आहात याचा थांगपत्‍ता त्‍यांना लागायला नको पाहिजे असेल तर गोल-फिरवून बोला. 

कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हेरगिरीसाठी मिळालेल्‍या संधीसारखे वापरले गेले पाहिजे.



सुत्र क्र.१५ - तुमच्‍या शत्रूला पूर्णपणे चिरडून टाका :
(Crush your enemy totally)

हा नियम खूपच साधारणसा आहे.   हे सुनिश्चित करा की तुमचा शत्रू पुर्णपणे समाप्‍त झाला आहे. 

तुम्‍हाला हे सुनिश्चित करायला पाहिजे की तुमचे शत्रू पूर्णपणे पिचले-दबले गेले आहेत, नाहीतर ते पुन्‍हा उठून उभे राहतील आणि सूड-बदला घेण्‍याचा प्रयत्‍न करतील.  तुम्‍हाला ह्या सूड घेण्‍याच्‍या धोक्‍यापासून वाचून राहिले पाहिजे.   एकदा जर का तुम्‍ही तुमच्‍या शत्रूला दाबायला सुरूवात केली तर थांबायला नाही पाहिजे.  त्‍यांना प्रतिहल्‍ला करण्‍याची कोणतीही संधी देऊ नका. 


सुत्र क्र.१६ - आदर आणि मानसन्‍मान मिळविण्‍यासाठी अनुपस्थितीचा वापर करा:
(Use absence to increase respect and honor)

गुढ असण्‍याबद्दल देखिल बरेच काही सांगता येते.  जसे की लेखकांनी आपल्‍या अगोदरच्‍या नियमांमध्‍ये सांगितलेलं आहे- तुम्‍ही स्‍वतः अधिक दिसणे आणि स्‍वतःविषयी अधिक ऐकवण्‍यापासून वाचवत असता कारण, ह्यामुळे तुम्‍ही स्‍वतःला सर्वसाधारण बनवत असता, सोबतच कोणीही तुमच्‍यापर्यंत सहजतेने पोहोचू शकतो.

समाजापासून थोडं दूर राहा. आणि तुम्‍हाला असं जाणवेल की लोकं तुमच्‍याबद्दल उत्‍सुक असतील, बोलतील आणि विचार करतील की तुम्‍ही पुढे काय करणार आहोत. 



सुत्र क्र.१७ -  इतरांना निलंबित दहशतीखाली ठेवा, अनिश्चिततेच्‍या हवेची मशागत करा:
(Keep others in suspended terror, cultivate an air of unpredictability)

मनुष्‍य आपल्‍या सवयींचा गुलाम आहे. तो सवयींपासून मजबूर आहे. आणि त्‍याला इतरांच्‍या कामामध्‍ये डोकावण्‍याची लालसासुद्धा असते.  तुमची निश्चितता त्‍यांना तुम्‍हाला नियंत्रित ठेवण्‍याची जाणिव करून देते.  बाजू बदला आणि जाणून-बुजून अजाणते बना.  काहीच माहित नसल्‍यासारखे वागा. 

रॉबर्ट येथे सांगतात की आपण मानव असल्‍यामुळे आपण अपेक्षा ठेवतो.  आणि हेच कारण आहे की आपल्‍याला होणा-या गोष्‍टी-घटनांविषयी अंदाज लावणे आपल्‍याला आवडते. 

जर तुम्‍ही तुमच्‍या हेतू/मनसुब्यांचा अंदाज त्‍यांना लागू न दिल्‍यास ते हैराण/आश्‍चर्यचकित होतील.   जर त्‍यांना तुमच्‍या योजनांविषयी माहिती नसेल तर ते तुमच्‍यापासून घाबरून राहतील.   

 

 

सुत्र क्र.१८ - : स्‍वतःला वाचवण्‍यासाठी स्‍वतःभोवती गढी उभारणे टाळा- पूर्ण वेगळेपण धोकादायक आहेः
(Do not build fortresses to protect yourself- Isolation is dangerous)

ग्रीन असे सांगतात की, आपल्‍याभोवती गढी किंवा किल्‍ला बनवून घेणे चांगले वाटते.  परंतू असे करण्‍यामध्‍ये तुम्‍ही स्‍वतःला वेगळे करून घेता आणि स्‍वतःला पूर्णपणे वेगळे करणे धोकादायक असते.  याचा अर्थ तुमच्‍याजवळ जी माहिती आहे ती सिमित आहे आणि तिचा वापर सोपं नाही. 

#500 marathi books pdf free download marathi #pdf books free download marathi books pdf #google drive# best marathi books pdf free download #the entrepreneur marathi book pdf #free download #best #motivational #books in #marathi pdf free download marathi novel pdf #free download #mahanayak #marathi book pdf download 
 

असं करणे तुम्‍ही स्‍वतःवर इतरांचे ध्‍यानआकर्षिक करता आणि तुमच्‍यावर हल्‍ला करण्‍याची संधीसुद्धा देत असता.  तुम्‍ही एक सहजसोपे लक्ष बनून जाता. 

तुम्‍ही स्‍वतःला आपल्‍या सोबती आणि लोकांसह वेढून ठेवायला पाहिजे, असे केल्‍याने तुम्‍ही आणि तुमच्‍या शत्रूदरम्‍यान अनेक लोकं असतील. 



सुत्र क्र.१९ - कोणाबरोबर वाटाघाटी करताय ते जाणून घ्‍या-चुकीच्‍या माणसाला दुखवू नकाः
(Know who you're dealing with- do not offend the wrong person)

जसं की यापुर्वीच सांगितलेलं आहे की, तुम्‍हाला आपल्‍याशी जोडलेल्‍या लोकांना, सोबत काम करणा-या लोकांना आणि आपल्‍या शत्रूंना समजणे खूप गरजेचे आहे. ही माहिती तुम्‍हाला शक्‍ती देईल.  सर्वजण विशिष्‍ट-वेगळे आहेत आणि तुम्‍ही सर्वांवर एकाच प्रकारच्‍या पद्धतींचा वापर करू शकत नाही. 

अशी कोणतीच पद्धत नाही जी सर्वांवर लागू होईल. 

लेखक आपल्‍याला अशा लोकांपासून सावधान राहण्‍याची चेतावनी देतात जे धोका खाल्‍ल्‍यानंतर आपला सूड-बदला घेण्‍याचा प्रयत्‍न करत असतात जोपर्यंत त्‍यांना शांती-समाधान मिळत नाही तोपर्यंत ते असेच करत राहतात.   ही ती माणसं नाहीत ज्‍यांच्‍याशी तुम्‍ही भांडलात.  

कोणतेही पाऊल उचलण्‍याअगोदर हे लक्षात ठेवा की तुम्‍ही कोणाचा सामना करणार आहोत. 


सुत्र क्र.२० - कोणालाही शब्‍द किंवा वचन देऊ नकाः (Do not commit to anyone)

तुम्‍हाला तुमच्‍या स्‍वातंत्र्याला एक सामर्थ्‍य समजायला पाहिजे, कमजोरी नाही.  कोण्‍या एका व्‍यक्‍तीसोबत किंवा कोण्‍या एका बाजूला असण्‍याच्‍या सापळ्यात फसायला नाही पाहिजे. नेहमी आपल्‍या आणि आपल्‍या उद्देशासोबत मजबुत बनून राहा. 

स्‍वतंत्र राहिल्‍याने तुमच्‍या हातात सत्‍ता राहिल, लोकं तुमच्‍या मागे येतील आणि तुमच्‍याशी युक्‍तीवाद करायला इच्छितील.  ही गोष्‍ट तुम्‍हला अशी व्‍यक्‍ती बनवेल ज्‍याच्‍याजवळ सर्व शक्‍ती आहेत. 


सुत्र क्र.२१ - दुधखुळे वागून दुधखुळ्याला आकर्षिककरा- इयत्‍तेपेक्षा बुद्धू दिसाः
(Play a sucker to catch a sucker- seem dumber than your mark)

हे तर सगळ्यांना माहिती आहे की, आपण सर्वजण बुद्धीमान जाणवू इच्छितो.  तुम्‍ही काही मुर्खासारखे बोलला असाल किंवा काही केलं असेल असे जाणून घेण्‍यापेक्षा अधिक वाईट काहीच होऊ शकत नाही.  रॉबर्ट ग्रीन तुम्‍हाला आपल्‍याच निर्णयासाठी समजूतदार बनन्‍याचा बढावा देतात. 

आपल्‍या शत्रूंबद्दल विचार करा आणि त्‍यांना हे विश्‍वास येऊ द्या की ते तुमच्‍यापेक्षा कितीतरी अधिक समजूतदार आहेत.  जर तुम्‍ही असं केल्‍यास त्‍यांच्‍या मनात तुम्‍ही खोटा विश्‍वास तयार करालआणि ते तुमच्‍यावर यानंतर कधीही शंका घेणार नाहीत.  


सुत्र क्र.२२ - शरणागतीची युक्‍ती वापरा- दैन्‍याचे बलामध्‍ये परिवर्तनकराः
(Use the surrender tactic: Transform weakness into power)

 जर तुम्‍ही कमजोर बाजूचे असाल तर नेहमी लढण्‍यासाठी उत्‍सुक असाल.   भलेही ते तुमच्‍या अहंकाराला पुर्ण करण्‍यासाठी का असेना.  लेखक अशा परिस्थिमध्‍ये आत्‍मसर्पण करण्‍याची किंवा शरणागती पत्‍कारण्‍याचा सल्‍ला देतात.  अशाने तुम्‍हाला पुर्ववत व्‍हायला वेळ मिळतो.  आणि अशी आशा असते की तुमच्‍या शत्रूची शक्‍ती  संपलेली असेल.  आणि ते वेळेसोबत चिड-चिडे-संतप्‍त होतील. 

त्‍यांना सावरूण उभे टाकण्‍यामध्‍ये आणि तुम्‍हाला हरविण्‍याअगोदर  तुम्‍ही मोठे व्‍हा आणि तिथून दूर व्‍हा.  ही एक अशी युक्‍ती आहे जे ब-याच लोकांना समजत नाही. आणि हे तुमच्‍या फायद्याचे होईल. 



सुत्र क्र.२३ - तुमच्‍या शक्‍तीवर चित्‍त एकाग्र कराः (Concentrate your forces)

 जर तुम्‍हाल पैशाने भरलेली एखादी खदान मिळाली आणि तुम्‍ही अधिकाधिक खोलवर खोदून काढली तर तुम्‍हाला जास्‍तीतजास्‍त पैसा मिळत जाईल.  आणि जर तुम्‍ही खुपच कमी पैशांच्‍या अधिक वेगवेगळ्या खदानीमध्‍ये जाल तर तुम्‍हाला कमी यश मिळेल. 

विस्‍तार तीव्रतेला हरवतो आणि हेच तुम्‍हाला तुमच्‍या मनामध्‍ये ठेवायला पाहिजे. 

जेंव्‍हा तुम्‍हाला शक्‍तीचे एखादे साधन मिळेल तर त्‍याला जाऊ द्यायला नाही पाहिजे, आणि त्‍याचा मागोवा घेत राहायला पाहिजे.   इतर कोणत्‍या‍ही साधनाच्‍या मागे जाऊ नये जर पहिल्‍यापेक्षा उत्‍तम साधन तुमच्‍या समोर आहे. 


सुत्र क्र.२४ -उत्‍कृष्‍ट प्रियाराधन कराः (Play the perfect courtier)

काही लोकं फक्‍त अशाच जगात यशस्‍वी आहेत जेथे सर्वकाही शक्‍ती-सत्‍ता आणि कौशल्‍याच्‍या आजूबाजूला फिरत असते.  त्‍यांनी चुकीच्‍या दिशेने फिरवण्‍याच्‍या कलेमध्‍ये प्राविण्‍य मिळविलेले आहे.  ते आपल्‍या सत्‍तेला सर्वांत योग्‍य-उत्‍कृष्‍ट पद्धतीने वापरतात. 

ह्या नियमाला वापरायला शिका आणि यानंतर तुम्‍हाला वर उठण्‍यासाठीची कोणतीच सिमा राहणार नाही.

 भाग-२ वाचन करण्‍यासाठी

खालील दिलेल्‍या लिंकवरून पुस्‍तकाची मराठी आवृत्‍ती खरेदीकरू शकता.  

 मराठी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी     #Shaktiche 48 Niyam (Marathi): The 48 Laws Of Power BUY


पुस्‍तक: सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे

लेखक:  रॉबर्ट ग्रीन

 #The 48 Laws of Power - SATTA - Shaktiche 48 Niyam (Marathi) book SUMMARY
 
ऑनलाईन पुस्‍तकः       अमेझाॅन    फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक

 

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

 
अर्थ विषयक व इतर संबंधितः

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तकांची यादी-क्‍लीक करून पाहा

📑🔖📕📗📖📘📙


इतर संबंधितः 

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तकांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. Hey Dear Reader.!,
      Thank you for visiting to our reading platform www.evachnalay.in.

      We hope you enjoy the book summary of 48 Laws of power and use these laws in your life to move ahead and make your life better than the best.
      please do share with your friends or family members to whom you think they need it.

      Don't know why but this book is not available on online platform. Please try to approach in your local book shops. If we found any link regarding this book we inform you if you drop your mail id here.

      We glad to inform you that, if you do not find "48 Laws of Power" in Marathi language there are other options too, like English or Hindi Physical book or Audio Book of same title.

      Keep Reading Keep Learning Keep Growing.
      Thank you again for visiting ई-वाचनालय.
      Happy Reading..:)

      हटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive