द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी) आपल्या अचेतन मनाची शक्ती -पुस्तक परिचय
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
आपल्या अचेतन मनाची शक्ती
डॉ. जोसेफ मर्फी
मराठी अनुवाद
संकेत कोरडे
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे.
तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
- आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
- प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
- हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
- आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
- तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
- भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
- 'चिरतरुण' राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
_________________________
📗📘📙📖📕🔖📑
👉इतर लेखकांनी केलेले मराठी अनुवादित संस्करण
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
आपल्या अचेतन मनाची शक्ती
डॉ. जोसेफ मर्फी
मराठी अनुवाद
प्रा. पुष्पा ठक्कर
सुखी, परिपूर्ण व समृद्ध जीवन जगण्याची आस सर्वांनाच असते,
पण त्यासाठी काय करावे, हे अनेकांना माहित नसते. जे समोर येते ते आयुष्य
जगणे हे हिताचे असे समजले जाते. मात्र मनातील अचेतन शक्तीचा वापर केल्यास
अनेक गोष्टी सहजसाध्य होऊ शकतात, असे समजावून दिले आहे डॉ. जोसेफ मर्फी
यांनी.
अचेतन मनाची शक्ती जागृत करण्याचे शास्त्रीय मार्ग त्यांनी 'द पॉवर ऑफ युवर सबकॅन्शस माइंड' या पुस्तकातून सुचविले आहेत. प्रार्थनेतील शक्ती, तिचे महत्व विशद केले आहे.
आपल्या आतील शक्तीचा खजिना, त्यामुळे घडू शकणारे
चमत्कार, मनाचे कार्य, प्राचीन व आधुनिक काळातील उपचार, अचेतन मन आणि
निद्रा, वैवाहिक समस्या, सुसंवादी मानवी संबंध, मानसिक अडथळे दूर
करण्यासाठी होणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले आहे. याचा मराठी अनुवाद
प्रा. पुष्पा ठक्कर यांनी केला आहे.
📗📘📙📖📕🔖📑
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी)
अंतर्मनाची ताकद
अंतर्मनाची ताकद
डॉ.जोसेफ मर्फी
मराठी अनुवाद
सविता दामले
टिप्पण्या