मनुष्य स्वभाव कसा ओळखावा- द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन -मराठी पुस्तक सारांश भाग-1 | The Laws of Human Nature by Robert Greene | Book Summary in Marathi -Part-1

दुर्लक्षित असलेल्या किंवा ज्यावर जास्त बोलले जात नाही अशा मानवी स्वभावाच्या पैलूंवर प्रकाश टाकणं, आणि ते किती प्रभावी आहे हे समजून घेणं हे या पुस्तकाचं एक उद्दिष्ट आहे.

मानवी स्वभावाचे नियम
द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर
रॉबर्ट ग्रीन 

मराठी अनुवाद
पुस्तक सारांश 

भाग-1


The Laws of Human Nature
by Robert Greene

Book Summary in Marathi
 
द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन -मराठी पुस्तक सारांश
मानवी स्वभावाचे नियम  

www.evachnalay.in


👉💡हे पुस्तक वाचल्यावर मला नक्की काय कळणार आहे? 

  • या पुस्तकामुळे मला नेमकं काय मिळणार आहे? 
  • तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या मानवी स्वभावाचे पैलू जाणून घेऊ शकता. 
  • कोणाला अधिक चांगले निर्णय घ्यावेसे वाटणार नाही? 
  • तुम्ही घेत असलेल्या निर्णयांवर प्रभाव टाकणारे घटक आणि त्यामागच्या आपल्या प्रेरणा अधिक चांगलं समजून घेणं हे यासाठी महत्वाचं आहे. 
  • दुर्लक्षित असलेल्या किंवा ज्यावर जास्त बोलले जात नाही अशा मानवी स्वभावाच्या पैलूंवर प्रकाश टाकणं, आणि ते किती प्रभावी आहे हे समजून घेणं हे या पुस्तकाचं एक उद्दिष्ट आहे.


आपल्याला असूया वाटते, हेवा वाटतो, आत्मकेंद्री आहोत आणि समूह वृत्तीनुसार वागतो हे आपण बहुतेकवेळा मान्य करत नाही. परंतु आपल्या सर्वांचीच अशी प्रवृत्ती असते. आपण एकदाका हे मानवी स्वभावाचे पैलू मान्य केले कि आपण ह्या भावनावेगावर ताबा मिळवून त्यापासून फायदा करून घेऊ शकत्तो.  आणि त्यांचा आपल्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं असतं. 

पण काही मानवी अनुभव सर्वांनाच येतात. मानवी स्वभाव अधिक जाणून घेतल्याने आपल्याला भावनावेगावर अधीक नियंत्रण मिळवून, अधिक चांगले निर्णय घेता येतात पर्यायाने अधिक चांगले जीवन जगता येते.  ह्या पुस्तकाच्या सारांशामधून आपण पुढील मुद्दे जाणून घेणार आहोत: 


१.  दीर्घकालीन दृष्टिकोन असणं का अधिक चांगलं असतं ?
२.  आपल्याबरोबर नेहमी वास्तव गट का असावा? आणि
३.  मृत्यूचा विचार मनात असणं फायदेशीर का आहे?

जगात कुठेही गेलोत तर थोड्याफार फरकाने मानवी स्वभाव सारखाच असतो म्हणून पुस्तकातील हे नियम सर्व प्रकारच्या, धर्म-वर्ण-वर्ग-वयाच्या लोकांसाठी लागू होतात. रॉबर्ट ग्रीन ५ बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांची ४८ लॉज् ऑफ पॉवर हि पहिलीच पुस्तक प्रसिद्ध, लोकप्रिय आणि विवादास्पद ठरलेली होती. 

याच पुस्तकामुळे त्यांच्या लेखनाच्या कारकिर्दीला एक वेगळेच वळण मिळाले होते.  (48 Laws of Power) मराठी अनुवादित सत्ता: अधिकार प्राप्तीचे ४८ नियम या पुस्तकाचे सारंश आपण याअगोदरच पाहिलेले आहे. जिज्ञासू वाचक याच संकेतस्थळावरून सारांश वाचू शकता.

भाग-1

मानवी स्वभाव समजून घेण्याचे १८ नियम सविस्तर पाहूया:

१. The Law of Irrationality अविवेकीपणाचे नियम

अविवेकीपणे वागण्याकडे आपल्या सर्वांची प्रवत्ती असते. आधुनिक मानव हुशार आहे, आणि खूप विवेकी आहे असं आपण समजतो. पण, त्यावेळच्या भावनेच्या आधारे  बरेच निर्णय घेण्याकडे आपली प्रवृत्ती असते हे सत्य आहे. म्हणजेच आपण खूप अविवेकी असतो. आपल्या भावनिक आणि विवेकी बाजूचा संघर्ष दीर्घकाळ चालू आहे. 

इसवीसन पाचव्या शतकातील अथेन्स मधील आदरणीय "पेरिग्लस"  हा विवेकी वागणुकीचा सुरुवातीच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जातो. जेंव्हा अथेन्स वर स्पार्टाच्या आक्रमणाचा धोका होता, तेंव्हा संयम दाखवावा आणि व्यापक युद्ध करू नये हे पटवून द्यायला त्यावेळच्या नेत्यांना तो यशस्वी ठरला होता.  


परंतु जेंव्हा अथेन्समध्ये प्लेग ची साथ आली, आणि तो मृत्यू पावला. तेंव्हा दुर्दैवाने त्याच्या सुद्न्यपानाचा प्रभाव पडला नाही. त्याऐवजी भावनांचा प्रभाव पडला  आणि अथेन्सला नमवणारे, हानिकारक आणि दीर्घकाळ चाललेलं युद्ध झालं. संयम हे "पेरिग्लस"च्या सूज्ञपणाचं रहस्य होतं . आणि आपल्या अविवेकी निर्णयांवर ताबा मिळवण्यासाठी आपण तो अजूनही पाळला पाहिजे. जर काही समस्या असेल तर किंवा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घरी जाऊन शांतपणे विचार करीत असे.  

सर्व शक्य परिणाम लक्षात घेत असे आणि केवळ नेते, पुढारी, श्रीमंत लोकंच नव्हे तर सर्व लोकांच्या हिताचा असेल असा निर्णय तो घेत असे. म्हणून जेव्हाही शक्य असेल तेंव्हा एखादी प्रतिक्रिया देण्यास अधिक वेळ घ्या. कारण तेंव्हा तुम्ही भावनावेगात निर्णय घेणार नाही. आणि त्या वेळात निर्णयावर प्रभाव पाडणारे सर्व पूर्वग्रह विचारात घ्या. अनेक पूर्वग्रह असतात.  

हा पहिलाच नियम पैसा घेण्याच्या आपल्या भावनिक संबंधाला दर्शिवितो.  जगाला तर्काच्या चष्म्यातून बघण्याऐवजी आपण आपले लक्ष वेधून घेणाऱ्या, चिंतेच्या अस्वस्थपणा बघत आपण भावनांकडे अधिक झुकत असतो. दुर्दैवाने ह्या अशा गोष्टी आहेत ज्या वारसा हक्काने आपल्याला मिळत नसतात. परंतु आपल्या मानसिकतेला (Mindset) असं बनवता येतं ज्यामुळे अधिकाधिक परिणाम, फायदे घेतला जाऊ शकतो.

आपल्याला हे माहिती नसते आणि आपण आश्चर्यचकित होत असतो कि आपल्या भावना किती सखोल असतात आणि त्यांचा आपल्यावर किती खोलवर प्रभाव-परिणाम असतो, तर्क करण्यामध्ये ही क्षमता असते कि आपण भावनांच्या ह्या न दिसणाऱ्या भावनिक प्रभावाला कमी करू शकतो. जे होत आहे, जे घडत आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी अशा वेळी आपल्या मेंदूला खुलं करून विचार करण्यास वेळ दिला पाहिजे. त्यावेळी जसा आपण विचार करत असतो त्याच्या उलट बाजूने विचार करण्याची खरी गरज असते.  


या गोष्टी नैसर्गिकरित्या येत नसतात. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला विकसित करावी लागते, वाढवावी लागते. "तर्क"च्या मार्गावर चालण्यासाठी तीन पाऊल घ्यावे लागतील:

१. Recognize the Biases

काही अशा गोष्टी असतात जी तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
Recognize the Biases:

  • -Confirmation Bias,
  • -Conviction Bias,
  • -Appearance Bias,
  • -Group Bias,
  • -Blame Bias


२.  Beware the inflaming factors

  • लहानपणातील खुणावणाऱ्या गोष्टी: बालिशपणा आणि अति जलदपनाच्या पलीकडे  बघा.

  • अचानकपणे येणारे-होणारे फायदे व तोटे: निराशावाद आणि आशावादासोबत या गोष्टींचा सामना करा. आपण भाग्य या घटकावर कमीच जरा  कमीच विश्वास ठेवत असतो.

  • वाढणारे दबाव: लोकं दबावात येऊन वेगळ्याच प्रकारची कामं करत असतात.

  • उत्तेजित करणारे लोकं: अशी लोकं जी तुमच्यामध्ये अतिजास्त प्रमाणात भावनांना जागवतात यांपासून दूर राहा.

  • गटाचा प्रभाव: मोठ्या गटांपासून नेहमी सावधान-सतर्क राहा आणि आपल्या स्वतःबद्दल विचार करण्याच्या क्षमतेला दाबून ठेवा.


3. Strategies toward bringing out the rational self

स्वतःला चांगल्यारितीने समजून घ्या. आपल्या भावनांच्या मुळापर्यंत पोहोचा, जिथून त्या भावना सुरु झालेल्या आहेत तिथपर्यंत डोकावून बघा. आपला प्रितिक्रिया देण्याचा वेळ वाढवा. स्वतःला मागे हटण्यासाठी तयार करा.

Accept People as facts:

लोकांना तसे समजणे जसे ते आहेत:  लोकं जसे आहेत तसेच लोकांना समजून प्रतिक्रिया, कृती करा. भावनिक गोष्टींपासून बचाव करा.

Find the optimal balance of Thinking and Emotion:

विचार आणि भावनांचे संतुलन बनवणे: शंका आणि जिज्ञासा यादरम्यान संतुलन बनवा.

Love the Rational:

तर्कनिष्ठ राहा: शांती आणि स्पष्टता मिळविण्यासाठी नेहमीच तर्काला आपलेसे करा. 


हे तर आपल्याला मान्य करावेच लागेल की आपण सर्वचजण आत्मवेडे किंवा स्वार्थी असतो.  प्रशंसा केलेली कोणाला आवडत नाही? सर्वांनाच स्वतःबद्दल बोललेले दोन शब्द अंगावर मूठभर मांस चढवतात. मग भलेही ते खोटे-नाटे, नुकसान करणारे  का असेना.  आपल्याला स्वतःबद्दलचे प्रेम/खूळ/वेड असते.  काही प्रमाणात का असेना पण हे वेड/खूळ प्रत्येकात असते त्याला सेल्फ ओब्सेसड (Self Obsessed) असे म्हणतात. 

आपली योजना सांगताना, लोकांच्या अडथळ्यांना कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःची प्रशंसा कारविण्याचा प्रयत्न करत असता.  अशा लोकांपासूनही सावधान/सतर्क राहायला पाहिजे जे सुरुवातीलाच हल्ला चढवत असतात आणि तुम्हाला त्यांच्या नाटकात ओढून घेत असतात. अशा प्रकारच्या चतुर लोकांच्या छुप्या/लपलेल्या हेतूंपासून नेहमी सावधान राहायला पाहिजे. 

आपल्याला स्वतःच्या प्रवृत्तीबद्दल, स्वभावाबद्दल नेहमी खरे-स्पष्ट असायला पाहिजे आणि त्याला नाकारायला नको पाहिजे. आपण सर्वचजण आत्मपूजक म्हणजेच नार्सिस्ट आहोत.  आपल्याला आपली सहानुभूती स्वतः बनवावी लागेल. त्यासाठी आपल्याला चार कौशल्य विकसित करावे लागतील:

१.  The empathetic attitude
आपल्याला काहीच माहिती नाही असे गृहीत धरून तुम्ही सुरुवात करू शकता. दुसऱ्या लोकांच्या दृष्टिकोनाला जाणून घ्यायला नेहमी उत्सुक/जिज्ञासू राहायला शिका. 

 
२. Visceral Empathy
आपल्या मूड्स वर लक्ष द्या, जो आपली देहबोली आणि आवाजाच्या "आरोहावरोह"  म्हणजेच चढ-उतारावर (टोन) दिसून येतो. लोकांच्या सारखेच वागले तरीही आपल्याला सहानुभूती मिळते

 सहानुभूतीची अनुभूती
 सिम्पथी एम्पथी


३. Analytic Empathy:
ज्या लोकांना तुम्ही समजून घेऊ इच्छिता, त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल माहिती घ्या, आणि त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांना जसे आई-वडील, भाऊ-बहीण, इतर नातेवाईक, मित्रपरिवार यांबद्दल चौकशी करा, जाणून घ्या.

४.  The Empathetic Skill
या कौशल्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जितक्या वेगाने, जलद तुम्ही लोकांशी भेटाल तेवढेच तुम्ही अधिक चांगले व्हाल,आणि जितक्या वेगेगळ्या प्रकारच्या लोकांशी तुम्ही भेटाल तुमचे कौशल्यदेखील तेवढेच व्यापक, विविधांगी, बहुआयामी, बहुढंगी-बहुरंगी बनेल, व्यक्तिमत्व अष्टपैलू (All rounder) बनेल. 


3. The Law Of Role-Playing

तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही की, लोकं प्रत्येक ठिकाणी, संधी व त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळा मुखवटा चेहऱ्यावर चढवत असतात. खरेतर, ते त्यांच्या हेतूंना, उद्देशाला त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भाव-छटा आणून, शरीराची विशिष्ट हालचाल-संकेत करून, facial expressions, body posture, nervous gesture या अचेतन मनाद्वारे, अनियंत्रित मनोदैहिक हालचाली करून, शरीराची विशिष्ट लकब, ढब, शैली याद्वारे अप्रत्यक्षपणे मनाच्या अवस्थेला उजागर करत असतात.  

या असुरक्षिततांना माहित करून घेण्यासाठी, तुम्हाला त्यांच्यापेक्षा एक पाऊल नेहमीच पुढे राहावे लागेल. आपल्याला निरीक्षण करून, बारकाईने लक्ष देऊन, अभ्यासाद्वारे कळेल यालाच इंग्रजीमध्ये "The Art of impression Management" म्हणजेच "छाप व्यवस्थापनाची कला" असे म्हणतात.

Master the nonverbal cues:

आत्मविश्वास बनवा व स्वतःमध्ये ते बाणवा.  तसेच, अशाब्दिक संकेत हेरण्यामध्ये पटाईत व्हा, अस्सल, खरे स्मितहास्य करा, आणि ज्या लोकांसोबत तुम्ही भेट घेता त्यांच्यासारखे असणे-दिसणे-बोलणे असे  वागण्याचा (मिररिंग) प्रयत्न करा.

Be a method actor:  

स्वतःला सचेतपणे नेमक्या व योग्य भावनिक मूड असलेल्या व्यक्तिरेखेमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करा, तसे करणे शिका 

Adapt to your audience:  

स्वतःला श्रोत्यांना-लोकांना हवे तसे त्यांच्या निवडीप्रमाने त्यांना आवडेल त्या आकार-स्वाद-शैली नुसार, स्वतःला बनवाण्याचा प्रयत्न करा. 

Create the proper first impression: 

फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हि म्हण तुम्ही नक्कीच ऐकून असाल. त्यानुसार स्वतःची पहिली छाप प्रभावी व परिणामकारक ठेवा.  गटात, समूहात किंवा वयक्तिक पहिल्या भेटीवर अधिक लक्ष द्या. ती पहिली भेट प्रभावी, साकारात्मक, समाधानकारक, ठेवण्यासाठी पेहरावावर, संवादावर, शब्दांवर स्पष्टपणा आणि नेमकेपणा असायला पाहिजे.

Use Dramatic Effect:  

तुम्ही देखावा करत आहेत हे त्यांना जाणवू देऊ नका. त्यांना तुमच्या हेतूंचा देखावा आणि वर्तनाद्वारे अंदाज येऊ देवू नका. 

Project saintly qualities:

 स्वतःला प्रगतिशील, सहनशील, संयमीत आणि खुल्या मनाचे व्यक्ती म्हणून दाखवा.         


💡याव्यतिरिक्त्त अजूनही काही गोष्टी असतात ज्यांच्यामुळे तुम्ही पुढील व्यक्तीला खोलवर जाणून घेऊ शकता.

👉 अधिक वाचा: देहबोली -शरीराची अनौपचारिक-अशाब्दिक भाषा -बॉडी लँगवेज

👉 हेही वाचा:  संवाद साधताना नेमके काय बोलावे? व्हॉट टू से एक्साक्टली?  


4. The Law Of Compulsive Behavior 

खरं सांगायचं झाल्यास लोकांच्या चारित्र्याला, त्यांच्या वर्तनाला समजणे खरोखरच कठीण असतं.  याला जर योग्यरितीने समजून घ्याल तर लोकं आपलं अख्खे आयुष्य एकच राग आवळत बसतील, तुम्हाला या गोष्टीला तुमच्या मेंदूमध्ये सहन करावे लागेल आणि अशा लोकांशी जवळीक साधावी लागेल जी शक्ती आणि साहस दाखवतात.  

 आपल्या नकारात्मक मानसिकतेपासून सतर्क व सावधान राहिल्याने तुम्ही वाईट लोकांपासून वाचून राहाल. जर तुम्ही या गोष्टींचे पालन कराल तर हे नियम तुम्हाला अधिक चांगले, उत्कृष्ट बनवेल.

लोकांशी जुळताना. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी त्यांना निवडताना ते त्यांची प्रतिष्ठा किंवा त्यांची जी प्रतिमा दाखवत असतात ती पाहून संमोहित होऊ नका, तर, त्यांना खोलवर जाणून घेण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा. शिका आणि त्यांचं खरं चरित्र बघा.   अडचणी, समस्या, यांच्याशी दोन हात करण्याची, लोकांसोबत काम कारण्याची पद्धत, त्यांचा संयमपणा, धैर्यपणा-धीरपणा-धीटपणा, त्यांची शिकण्याची क्षमता या गोष्टीवर लक्ष द्या, समजून घ्या.


बळकट-बलवान चारित्र्य असणारा एखादा व्यक्ती सोन्यासारखा असतो, दुर्मिळ आणि मौल्यवान.  ते स्वतःला अनुकूल बनवतात, शिकतात आणि स्वतःला अजून उत्कृष्ठ, तज्ज्ञ बनवतात. 

 

5. The Law Of Covetousness लोभाचा नियम

हे विचित्र आहे परंतु सत्य आहे, हे नियम असे सांगते कि, मनुष्य आपल्या हातातून निसटणाऱ्या गोष्टीला मिळविण्यासाठी का निवडतो?  तुम्ही या गोष्टीला स्वतःभोवती एक रहस्यमयी आभा बनविण्यासाठी उपयोग करू शकता आणि त्या स्थितीचा फायदा घेऊ शकता. हा एक आदर्श व्यक्ती बनण्याचा आणि आदर मिळविण्याची सर्वोत्तम पद्धत आहे.

लोकं अज्ञात गोष्टीला जाणून घेणं खूपच पसंत करतात. आणि या नियमांसोबत खेळल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो. असणं-नसणं, उपस्थिती-अनुपस्थितीचा आपल्यावर खूपच खोल परिणाम होत असतो, खूपच जास्त हजेरी, अति-उपस्थिती गुदमरवते, तर, थोडीशी गैरहजेरी, अनुपस्थिती आपल्या मध्ये रुची वाढवते, जिज्ञासा-उत्सुकता वाढवत असते. आपण त्या गोष्टीला मिळविण्याचा प्रयत्न करत असतो जी आपल्याजवळ नाही.  

आपल्या अवती-भवती थोडेसे रहस्य बनवा. जाणीवपूर्वक-नीतीपुर्वक अनुपस्थितीचा, गैहजेरीचा उपयोग-वापर करा जेणेकरून लोकांना तुम्हाला परत भेटण्याची इच्छा राहील आणि तुमच्यासारखे बनण्याची त्यांची मनोभावना राहील.

लोकांना असं दाखवून द्या की ते आयुष्यात काय चुकवत आहेत, आणि त्यांना काय करणे निषिद्ध आहे आणि ते या इच्छेने-गोष्टीने वेडे होतील..!

 

काही लोकांना त्यांच्यासाठी दीर्घकाळापर्यंतचे उद्दिष्ट, लांबपल्याचे ध्येय खूपच जास्त होऊन जातं. वर्तमानात, अलीकडील ज्या बाबी-गोष्टी चालत आहेत, आजची जी मतं आहेत या गोष्टींना चिकटून बसतात, सध्याच्या गोष्टींकडे आकर्षित होत असतात. अशा व्यक्ती आपल्या नाकाच्या पुढं बघू शकत नाहीत, आणि अनेकदा अदूरदर्शीपणाच्या श्रेणीमध्ये जाऊन पडतात. अशा लोकांपासून दूर राहा आणि ज्यांची ध्येय-उद्दिष्टं दीर्घकालीन आहेत अशा लोकांसोबत राहा.

हे तुमच्या स्वभावातच आसते कि तुम्ही वर्तमानातील ऐकीव-देखीव गोष्टींनी प्रभावित होत असता.  ताज्या बातम्या, सध्याचा फॅशन-कल-शैली, आसपासच्या लोकांची मते, आणि त्यांच्या कृती जी सर्वात जास्त नाट्यमय असतात. लोकांना त्यांच्या दृष्टिकोनाने पारखायला शिका. अशा लोकांपासून सावध राहा जी ते करत असलेल्या कृतीमुळे त्यांना होणारे परिणाम बघू शकत नाहीत. ते तुम्हाला त्या शक्तीने संक्रमित करतील.  

आपल्या दीर्घकालीन ध्येयावरून कधीही नजर हटवू नका. एका उंच ठिकाणावरून जसे दूरच्या गोष्टीहि नजरेस दिसतात तसेच एका उन्नत दृष्टिकोनाने (elevated perspective) तुम्हाला तुमच्या प्रत्येक उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा स्पष्टपणा आणि संयम मिळतो.

अदूरदर्शीपणाची चार लक्षणं आणि त्यावर मात करण्याची नीती:

१. Unintended consequences

२. Tactical Hell

प्रत्येक समूहात किंवा गटात कमीत कमी एका व्यक्तीला होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिणामांना सांभाळण्याची जबाबदारी घेण्याचा प्रमुख बनवा.  शक्यतोवर संशयवादी आणि विवेकी (SKEPTICAL & PRUDENT) व्यक्तीला प्राथमिकता द्यायला पाहिजे. 

तुम्ही लढाया आणि संघर्षामध्ये स्वतःला बऱ्याचवेळा गुंतलेले पाहाल, तुम्ही तुमच्या दीर्घकालीन ध्येयापासून दूर गेलेले आहोत, उद्दिष्ट कुठंतरी हरवलेली असतात ज्याच्यासाठी तुम्ही लढत-संघर्ष करत आहोत.  त्याजागी तुमच्या अहंकाराला वाढविणारा आणि स्वाभिमानाचा, स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रश्न बनलेला आहे, अशावेळी एकाच समाधान आहे, या संघर्ष व लढायांमधून बाहेर निघणे, विशेषतः जर हे वारंवार, नेहमीच होत असतील तर.  आपल्या कृतीने जिंका, शब्दांनी नाही. Win through your actions, not your words. 


आपल्या दीर्घकालीन ध्येयांबाबद पुन्हा विचार करायला सुरु करा. स्वतःला हे आठवण करून देताना कि तुमच्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे, काय मौल्यवान आहे, आपल्या जीवनात मूल्य आणि प्राथमिकता यांची शिडी बनवा.

३.  Ticker Tape  fever

जेंव्हा आपण एखाद्या समस्या, अडचणी किंवा अडथळ्यांचा सामना करत असतो, तर तेंव्हा, सर्व गोष्टींना सावकाश-हळू-हळू करण्याचा प्रयत्न करायला लागा आणि एक पाऊल मागे घ्या. कोणतेही पाऊल पुढे घेण्याअगोदर थोडा अवकाश घ्या, काही वेळ-एकदोन दिवस थांबा, विचार करा, मग कृती करा. आणि या समस्यांचं सामना करत असताना आपल्याला हे स्पष्टपणे माहित असायला पाहिजे कि, आपले दीर्घकालीन ध्येय काय आहे आणि त्यांना आपण कसे गाठू शकतो. 


४. Lost in Trivia

तुम्ही तुमची कामं गुंतागुंतीची झाल्याने चिंतीत होत असता. तुम्हाला सर्व गोष्टींना आपल्या हिशोबाने नियंत्रित करण्यासाठी सर्वोच्च ठिकाणी पोहोचायचं आहे, वर जायचं आहे आणि तुम्ही अधिकाधिक माहितीमध्ये बुडत आहात. अशावेळी तुम्हाला एका मानसिक गाळणी किंवा मेंटल'फिल्टरची गरज आहे.  हे फिल्टर तुमच्या दीर्घकालीन ध्येय आणि उद्दिष्टावर आधारीत आहे. 


  • Information: more
    complexity, take more time , confusions & slow decision 
  • Information: less
    clarity, quick decision and remember one thing, Over analysis makes you paralysis" 


सरतेशेवटी, तुम्हाला माहित असायला पाहिजे कि नेमकं काय पाहिजे? नेमकं काय हवं आहे हे जर कळलं तर अनावश्यक गोष्टींमधून कामाच्या आवश्यक गोष्टी काढण्यास मदत होते. 

 

7. The Law Of Defensiveness

 हे सांगायची गरज नाही कि, लोकं काळानुसार बचावात्मक झालेले आहेत. आणि जेव्हाही कोणी बदल-परिवर्तन याबद्दल बोलतो, तेंव्हा ते भडकून उठतात. जर तुम्ही त्यांच्या अडथळ्याला कमी करू पाहत असाल तर, तुम्हाला त्यांच्या दृष्टिकोनाला बदलविण्यासाठी त्यांना डिवचवावे (provoke) लागेल, आणि तेही त्यांना नाराज न करता.   

 जर तुम्हाला तुमची ध्येय-उद्दिष्टं वेगाने, लवकरात लवकर मिळवायची असतील, तर, तुम्हाला रचनात्मक, सर्जनशील बनावे लागेल. आपल्या चांगल्या हेतूंना त्यांना समजावून सांगा आणि त्यांना असं जाणवू द्या कि ते त्यांच्याच मतांच्या आणि विचारांच्या नियंत्रणात आहेत.  

जीवन संघर्षपूर्ण आणि स्पर्धेने भरलेले आहे, लोकं नेहमीच स्पर्धा करायला तयार आहेत. आपल्याला स्वतःच्या रुची-आवडी-निवडीची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्याला हे जाणवू द्यायचं असतं कि, आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतःची कामं स्वतः करतो. यामुळेच जेंव्हाहि लोकं आपल्याला बदलायला येतात तेंव्हा आपण बचावात्मक पवित्रा आत्मसात करत असतो आणि विरोध करतो. Defensive & Resistance. 

यासाठीच लोकांना त्यांच्या बचावात्मक आणि विरोधी मानसिकतेपासून दूर करायला तुम्हाला असं दाखवायला लागेल कि, ते जेकाही करत आहेत, त्यांच्या राजीखुशीने, मर्जीने, स्वइच्छेने करत आहेत.   लोकांना त्यांच्या समजूती व मान्यतेसाठी त्यांच्यावर कधीही हल्ला चढवू नका. आणि त्यांच्या समजूतपणा व शहाणपणासाठी त्यांना कधीही असुरक्षितता वाटू देऊ नका. 

आपल्या जिद्दी स्वभावाला नियंत्रित करायला शिका आणि मेंदूला बचावात्मक आणि बंद मानसिकतेच्या अवस्थेतून स्वतःला मुक्त करायला पाहिजे, जेणेकरून तुमची रचनात्मक-सर्जनशील शक्ती जागृत होतील.


👉अधिक जाणून घ्या: सर्जनशील आणि सृजनशील यातील फरक



8. The Law Of Self-Sabotage

 तुम्ही स्वतः आतमधून जसे वाटून घेत असता, स्वतःला जसे पाहता तसेच वरूनही दिसत असता. "माणूस जसा विचार करतो तसाच बनतो" हि ओळ As a Man Thinketh या जगप्रसिद्ध पुस्तकच सर्वकाही सांगून जाते. स्वतःला पूर्णपणे बंदिस्त करून घेऊन, नाकारात्मकतेने, निराशेने, भीतीने सीमित करून घेऊन, ज्यांच्याशी समोर तुम्ही त्या गोष्टी प्रकट करत असता, सांगता, ते तुमच्या या सवयीला समजून (Sense) जातात.  They will sense your habit.  

अशा प्रकारचा दृष्टिकोन तुमच्या यशाची शक्यता कमी करत असतो. ऐकायला हे काहीसे "ज्ञान" देत असल्याचे वाटेल, परंतु, सकारात्मक दृष्टिकोनच तुमच्या आणि तुमच्या यशाच्या दरम्यान उभं टाकलेलं आहे. असा आशावादी मानसिकता, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, वाढविणेच तुम्हाला सर्वच गोष्टींमधून सर्वोत्कृष्ट गोष्ट मिळवायला मदत करू शकतो आणि तिथेसुद्धा तुम्हाला संधी दिसतील जिथं लोकांना समस्या, जाळं-काळं  दिसत असतं.   

आपण सर्वांचा जगाला बघण्याचा, गोष्टींना समजून जाणून घेण्याचा, आसपासच्या लोकांनां व त्यांच्या कृतींना-कमला समजण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. आणि हाच आपला दृष्टिकोन (Attitude) आहे. आणि यामुळेच आपल्या जीवनांत आपल्यासोबत सर्वकाही होत असतं. जर आपला दृष्टिकोन घाबरणारा असेल तर आपण प्रत्येक गोष्टीत नकारात्मकच बघणार.   आपण स्वतःला संधी घेण्यापासून थांबवत असतो. आपण चुकांसाठी दुसऱ्यांना जबाबदार ठरवितो, आणि त्यांपासून शिकतही नसतो.  

अजाणतेपणी, आपण आपली कारकीर्द आणि नातेसंबंध खराब करून घेत असतो, अशी परिस्थिती बनवतो ज्यापासून आपण सर्वात जास्त घाबरत असतो. खरेतर, माणसाचा स्वभाव लवचिक आहे. स्वतःच्या दृष्टिकोनाला थोडं अधिक सकारात्मक, थोडं अधिक लोकांना सहन करणारे बनवून आपण एका वेगळ्याच जगात पोहोचू शकतो.  आपण नव्या संधी शोधू शकतो, नव्या शक्यता, संभावना तयार करू शकतो आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो. 

 

9. The Law Of Repression

लोकं तसे नाहीत जसे ते दाखवत असतात, आपल्या मनातील अंधार-काळोख लपविण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या स्वभावातच आहे.  एकूणच अज्ञानाला समजून घेण्याअगोदर कोणालाही स्वतःच्या काळ्या बाजूला बघून घ्यायला पाहिजे. 

आपल्या या गूढ बाजूला समजल्याने तुम्ही एका बिंदूवर पोहोचता जिथं तुम्ही एक निरीक्षक बनू शकता. लोकांना तुमच्याकडे आणण्यात ह्या कृतीचा खूप मोठा वाटा आहे. हि काळी  बाजू तुमच्या वागणुकीत, वर्तनात झळकत असते आणि तुम्हाला नुकसान -अपाय पोहोचवत असते.  

विषक्त बनून जाण्यापूर्वीच, सावलीच्या संकेतांना समजणे शिका. आपल्या काळ्या बाजूला पूर्णपणे समजून घेतल्यावर तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती -एक भला माणूस बनाल. 

Part -2 Continue

 👉उर्वरित पुस्तकाचा पुढील सारांश भाग-२ मध्ये पाहू
भाग-२ वाचण्यासाठी

 

सारांश समाप्त
📖📗📘📙


www.evachnalay.in

वाचकमित्रांनो, आशा आहे तुम्ही ह्या मानवी स्वभावाच्या नियमांना शिकून-समजून-उमजून,आपल्या जीवनात उपयोगात आणून, दैनंदिन जीवनात आत्मसात करून, त्यांचा स्वतःला व इतरांना आयुष्यात पुढं जाण्यासाठी, स्वतःची व दुसऱ्या गरजूंची मदत करण्यासाठी, ध्येय व दिशा ठरवण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी, या नियमांचा वापर करून एक सुखी, आनंदी, आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी कराल. 



💡🙏👉विशेष विनंती: 

मित्रांनोलक्षात ठेवा, आम्ही जगप्रसिद्ध, ज्ञानवर्धक पुस्तकाचा गाभा, महत्वाचा सार थोडक्यात परंतु साध्या-सरळ-सहज-सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सारांश वाचून सगळं काही समजलं असा गैरसमज कधीच करून घेऊ नका. 

लेखकांचे अनुभव, उदाहरणं, दृष्टिकोन समजावून सांगण्याची भाषा-कौशल्य-शैली हे वेगळं असू शकते, म्हणून शक्यतोवर पुस्तक खरेदीकरून संपूर्ण पुस्तक वाचा असा आमचा सल्ला राहील.  कमी वेळेत जगातील उत्कृष्ठ पुस्तकांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.


ई-वाचनालय या संकेतस्थळाला भेट देऊन, पुस्तकांच्या मंचावर येऊन आपला अमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि धैर्यवपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.  


www.evachnalay.in

18 Laws Of Human Nature 

1. The Law Of Irrationality 

2. The Law Of Narcissism 

3. The Law Of Role-Playing 

4. The Law Of Compulsive Behavior 

5. The Law Of Covetousness 

6. The Law Of Shortsightedness 

7. The Law Of Defensiveness 

8. The Law Of Self-Sabotage

9. The Law Of Repression 

10. The Law Of Envy 

11. The Law Of Grandiosity

12. The Law Of Gender Rigidity 

13. The Law Of Aimlessness 

14. The Law Of Conformity 

15. The Law Of Fickleness

16. The Law Of Aggression 

17. The Law Of Generational Myopia 

18. The Law Of Death Denial 

 

👉Also Read: 

 

 

धैर्यपुर्वक ह्या द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन  या पुस्‍तकाचे सारांश वाचन केल्‍याबद्दल आपले मनःपुर्वक धन्‍यवाद. 

 

तर वाचक मित्रांनो द लॉज् ऑफ ह्यूमन नेचर - रॉबर्ट ग्रीन  ह्या पुस्‍तकाचे सारांश तुम्‍हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्‍याकडे अगोदरच होती व तुम्‍ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्‍हाला खालील टिप्‍पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्‍यक कळवा.

तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्‍थळवर तुम्‍हाला काही त्रुटी दिसून आल्‍यास, तुमच्‍या सूचना, तक्रारी, प्रश्‍न, अडचणी-समस्‍या असतील काही सुधारणा हव्‍या असतील, तर आम्‍हाला खालील टिप्‍पणी व ई-मेल द्वारे अवश्‍य कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेऊ. धन्‍यवाद.

#7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi  #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


इतर संबंधि‍तः 

 


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

नेहमीच लक्षात ठेवा
Always Remember



www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive