छोट्या (सूक्ष्‍म) सवयी- छोटीशी सुरूवात कायमचे बदल का करते- बी.जे. फॉग- मराठी अनुवाद-पुस्‍तक परिचय-सारांश (Tiney Habits BJ Fogg Marathi)-भाग-१ | Part-१



तुम्‍हाला बदलतील अशा ७ व्‍यावहारिक आणि अस्सल जीवनातील सूक्ष्‍म सवयी

7 Practical and Real Life Micro-Habits That will Change you.

 

छोट्या (सूक्ष्‍म) सवयी
छोटीशी सुरूवात कायमचे बदल का करते

लेखक
बी.जे. फॉग

मराठी अनुवाद
मीना शेटे-संभू  

(सूक्ष्‍म.! :) पुस्‍तक परिचय-सारांश
भाग-१ | Part-१


Micro Habits

(Tiny Habits)

Why starting small makes lasting change easy

Author: BJ FOGG

(Micro.! :) Book Review-Summary in Marathi

Tiny Habits by the Author BJ Fogg book Summary Marathi

#Chhotya Savai
(Tiny Habits)
(Marathi)
By B.J.Fogg
Marathi Anuvaad
Meena Shete-Sambhu)

 

 📗📘📙📖

भाग-१ | Part-१ 

जेव्‍हा लोकं म्‍हणतात की, सकाळी लवकर ५ वाजता उठणं किंवा सकाळी व्‍यायाम करणं सूक्ष्‍म सवयी आहेत तेव्‍हा जरा वाईट वाटतं..!

Micro Habits सूक्ष्‍म-छोट्या सवयी एवढ्या लहान व सहज-सोप्‍या असायला हव्‍यात की तुम्‍हाला ते करण्‍यासाठी कोणत्‍याही प्रेरणेची आणि क्षमतेची, कौशल्‍याची फार-अत्‍यंत कमी गरज भासली पाहिजे.

जेव्‍हा केव्‍हा तुम्‍हाला आठवण येईल तेव्‍हा तुम्‍हाला त्‍या छोट्याशा गोष्‍टींना, त्‍या नित्‍यक्रमाला, दैनंदिन कामाला पूर्ण करता येईल. 

मागील चार वर्षांपासून क्‍लाउडीया सिगारेट पिणे सोडायचा प्रयत्‍न करत होती, सिगारेट पिण्‍याची सवय त्‍यांना नोकरी लागताच लागली होती.  आणि आता क्‍लाउडीया पाच वर्षाच्‍या मुलाची आई झालेली आहे आणि आता कसेही करून ह्या वाईट सवयीला त्‍यांना सोडायचे होते.

पुस्‍तकाचे लेखक आणि क्‍लाउडीया यांच्‍यावर उपचार करणारे बी.जे.फॉग त्‍यांच्‍या टाईनी हॅबिट्स या पुस्‍तकात असे म्‍हणतात की, जेव्‍हा क्‍लाउडीया सिगारेट पिण्‍याच्‍या वाईट सवयीची समस्‍या आमच्‍या जवळ घेऊन आल्‍या, तेव्‍हा आम्‍ही सर्वांत आधी त्‍यांच्‍या स्‍वयं-ओळख (self identity) आणि त्‍यांच्‍या ईच्‍छा (will) यांना समजून घेतलं आणि मग एक छोटेसे नित्‍यक्रम (routine) बनवलं.

क्‍लाउडीया यांच्‍या ५ वर्षाच्‍या मुलीचा फोटो सिगारेटच्‍या डब्‍बीवर-पॅकेटवर चिकटवला आणि ते एका पारदर्शक काचेच्‍या बरणीमध्‍ये ठेवून दिलं.  आणि क्‍लाउडीया यांच्‍यासाठी एक सूक्ष्‍म नित्‍यक्रम (micro routine) बनवलं.

जेव्‍हाही क्‍लाउडीयाला सिगारेट पिण्‍याची तल्‍लफ येई तेव्‍हा त्‍या आपल्‍या पाच वर्षाच्‍या मुलीच्‍या फोटोला पाहून म्‍हणत,

‘’सॉरी बेटा, मी तुझे लग्‍न नाही पाहू शकणार नाही, तुझ्या मुलां-मुलींसोबत खेळू-बागडू शकणार नाही, कारण मी तुझ्या अगोदर ह्या सिगारेटची निवड करत आहे.’’

आपल्‍या निरागस मुलीचा चेहरा पाहत ते शब्‍द बोलण्‍याची सूक्ष्‍म-छोटी सवय  क्‍लाउडीयासाठी पुरेशी होती.

यानंतर क्‍लाउडीयाने आयुष्‍यात कधीही सिगारेटला हात लावला नाही.

क्‍लाउडीया यांच्‍या उदाहरणाने आपण पुढे पाहणार आहोत सूक्ष्‍म सवयींची (micro habits) काही बारीक गुणवैशिष्‍ट्ये-सूक्ष्‍म वैशिष्‍ट्ये जी तुम्‍हाला त्‍यांना (सूक्ष्‍म सवयींना) आत्‍मसात करायला मदत करतील. आणि तुमच्‍यासाठी अतिविशेष, अस्‍सल असे ७-सात व्‍यावहारिक छोट्या-सूक्ष्‍म (7 practical realistic micro habits) सवयी ज्‍या तुमची कार्यक्षमता किंवा उत्‍पादकता (productivity) वाढवतील आणि तुमच्‍या आयुष्‍याची गुणवत्‍ता व दर्जा सुधारतील. (improve life quality).

 

स्‍वतःला सामर्थ्‍यवान वाटून घेणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे

it is very important to Feel Empowered

क्‍लाउडीयाला (Claudia) वरील नित्‍यक्रम-रूटीन पूर्ण करायला केवळ दहा सेकंद लागत होते, ज्‍यामध्‍ये त्‍या तिच्‍या अंतर्मनातील वर्तनाला (unconscious behavior) आपल्‍या तोंडाने बोलून आव्‍हान देत होती.  जेव्‍हा क्‍लाउडीया सिगारेटच्‍या तीव्र इच्‍छेला (तल्‍लफ) पार करून जात होती तेव्‍हा स्‍वतःला खूपच सामर्थ्‍यवान (शक्‍तीशाली-ताकदवान-बलवान-बलशाली) वाटून घेत असे, जी एक खूपच चित्‍तवेधक गोष्‍ट आहे. बी.जे.फॉग याला पुढील प्रमाणे समजावतात,

जर माझ्या पुस्‍तकातून काही लक्षात ठेवायचं असेल तर हे लक्षात ठेवा की, लोकं वाईटपणा  किंवा दुर्बलपणा वाटून घेऊन नाही तर, चांगलं वाटून घेण्‍याने बदलत असतात.

people change best by feeling good not by feeling bad
-BJ Fogg

 

निर्णय काढून टाका Remove Judgment

दुसरी गोष्‍ट अशी की, कित्‍येत लोकं एक दोन वेळेस प्रयत्‍न करतात मग सोडून देतात आणि म्‍हणतात, अरे भाऊ... ह्या सूक्ष्‍म-छोट्या सवयी इत्‍यादी काही काम करत नाहीत..

जर तुम्‍ही तुमच्‍या वर्तनामधून (behavior) निर्णय (judgment) काढून टाकाल तर तो एक विज्ञाचा प्रयोग बनून जाईल.

वर्तन –– निर्णय = प्रयोग

behavior –- judgment = Experiment

तुम्‍ही स्‍वतःच विचार करा की तुम्‍ही कित्‍येक प्रयोग केल्‍यानंतर, कित्‍येक गोष्‍टी वापरल्‍यानंतर, एक वाईट सवय (bad habit) लावून घेतली आहे. म्‍हणून आता तुम्‍हाला अजून काही प्रयोग (experiments) करावे लागतील, काही गोष्‍टी जुळवून घ्‍याव्‍या लागतील (adjustments) तेव्‍हा कुठं तुम्‍ही त्‍या वाईट सवयीच्‍या ठिकाणी नवीन सवय लावू शकाल, बदलू शकाल. (replace).

निर्णय काढून टाका, छोट्या सवयी आणि तुमच्‍या वर्तनाला विज्ञानाच्‍या एखाद्या प्रयोगासारखे घ्‍या. ह्या वैज्ञानिक प्रयोगामध्‍ये तीन गोष्‍टी-घटक आहेत. प्रेरणा (motivation), सामर्थ्‍य (ability) आणि तत्‍परता (prompt);  जेव्‍हा हे तीनही घटक कृतीरेषेच्‍या (action line) वर येतात तेव्‍हा ते आपले वर्तन बनते.

आकृतीः

प्रेरणा, सामर्थ्‍य आणि तत्‍परता

motivation, ability and prompt

अधिक वाचाः मोटिवेशन आणि इन्‍सपिरेशन मध्‍ये फरक

आपल्‍या कामाच्‍या ठिकाणाबाहेर किंवा कार्यालयाबाहेर कोणीही रोक-टोक करणारे नव्‍हते. म्‍हणजेच सामर्थ्‍यामध्‍ये (ability) कोणतीही कमतरता नव्‍हती. क्‍लाउडीयाला इच्‍छा होत होती आणि कार्यालयातील मध्‍यंतराची वेळ (office break) म्‍हणजे तिच्‍यासाठी तत्‍परतेचे (prompt) काम करत होती.

तत्‍परता (prompt) = संकेत

Read More: Que –– Routine ––– Reward (fromPower of Habit)

यामुळेच हे (सिगारेट पिण्‍याचे) वर्तन वारंवार होत होते.  कार्यालयातील सुट्टीचे संकेत म्‍हणजे प्रॉम्‍प्‍ट क्‍लाउडीयासाठी सिगारेट पिण्‍याच्‍या वर्तनाची पुनरावृत्‍ती होत होती.

सिगारेटच्‍या कपट्यावर-पॅकेटवर मुलीचा फोटो चिकटवताच (सिगारेट पिण्‍याची) प्रेरणा (motivation) कमी झाली आणि काचेच्‍या बरणीमध्‍ये ठेवल्‍याने क्‍लाउडीयासाठी (सिगारेट घेण्‍यासाठी) एक पाऊल अजून वाढले. त्‍यामुळे थोडीसे सामर्थ्‍य (ability) कमी झाले, ज्‍यामुळे त्‍यांना अंतर्मनातील नित्‍यक्रम-रूटीन तोडण्‍याची संधी मिळाली. (to break the unconscious routine)

जेव्‍हा लोकं असं म्‍हणतात की, सकाळी-पहाटे ५ वाजता लवकर उठणे, व्‍यायाम, ध्‍यान-धारणा आणि प्राणायाम करणे ही एक छोटी सवय (micro habit) आहे. तेव्‍हा थोडंसं वाईट वाटतं.

 

छोट्या सवयी सगळीकडेच असायला पाहिजे Micro habits fits Anywhere

छोट्या सवयी (micro habit) इतक्‍या लहान आणि सहज-सोपी असायला पाहिजे की, तुम्‍हाला प्रेरणा (motivation) आणि सामर्थ्‍याची (ability) अत्‍यंत कमी आवश्‍यकता असायला पाहिजे.

छोट्या सवयी इतक्‍या छोट्या आणि सहज असायला पाहिजे की त्‍यासाठी प्रेरणेची आणि ते करण्‍यासाठी क्षमतेची-तुमच्‍या सामर्थ्‍याची गरजच नसायला पाहिजे.

जेव्‍हा तुम्‍हाला प्रॉम्‍प्‍ट-संकेत मिळेल म्‍हणजेच, जेव्‍हाही तुम्‍हाला आठवण येईल, लक्षात येईल तेव्‍हा तुम्‍हाला त्‍या छोट्याश्‍या नित्‍यक्रमाला तत्‍परतेने पूर्ण करता आलं पाहिजे. इतके छोटे व सहज असायला पाहिजे.

 

व्‍यावहारिक पण सहज करता येतील अशा सात सवयीः

 

सवय क्र.१. दिवसअखेर कामाच्‍या ठिकाणाची साफसफाई-स्‍वच्‍छता

Clear Work Desk–– End of the day. 60 secs

पहिली छोटी सवय आहे, Clear Work Desk–– End of the day 60 secs म्‍हणजेच दिवसाच्‍या शेवटी आपले कामाचे ठिकाण साफ-स्‍वच्‍छ करा.

आपले मेंदू म्‍हणजे पॅटर्न ओळखा यंत्र आहे. 

एक मेंदू-वैज्ञानिक असे म्‍हणतात की,

आपला मेंदू, आपण आजपर्यंत जेवढं विचार करत होतो त्‍यापेक्षा कित्‍येक पटीने जास्‍त मागील माहितीच्‍या नोंदी ठेवत असतो. कारण,

  1. आपला मेंदू ह्या आकृतीबंधामुळे (पॅटर्न-pattern) आपले सभोवताल (environment) समजून घेत असतो. आणि
  2. भविष्‍याचे अंदाज बांधण्‍यासाठी नियमं आखत असतो.

 

मेंदू भविष्‍यातील निर्णय घेण्‍यासाठी मागील माहितीआधारेच नियमं बनवत असतो. मेंदू सतत-वारंवार माहितीवर प्रक्रिया करत असतो. कारण, मेंदूला केवळ भविष्‍यवाणीच करायची इच्‍छा नाही तर लवकर आणि बेहतर भविष्‍यवाणी करायची असते.

its just not about predicting, Brain wants to predict Better and Faster.

जे काही आणि जेवढंही सामान अस्‍ताव्‍यस्‍त तुमच्‍या खोलीमध्‍ये पसरलेले असेल ते सर्व तुमच्‍या मेंदूसाठी एक आकृतीबंध-पॅटर्न आहे. ह्या सततच्‍या वारंवार मिळणार-या माहितीच्‍या (information) पुरवठ्यामुळे (input) आपले मेंदू थकत असते.  या अवस्‍थेला संज्ञात्‍मक किंवा आकलनविषयक‍ पद्धत-कॉग्‍नीटीव्‍ह मोड’ (cognitive mode) असे म्‍हणतात.

थकलेल्‍या मेंदूला लक्ष केंद्रित (focus) करायला अडथळे येतात, कठीण जाते, समस्‍या येतात. यासाठीच, ज्‍या ठिकाणी तुम्‍ही जास्‍त वेळ उठता-बसता ते ठिकाण सावरलेले आणि स्‍वच्‍छ असायला पाहिजे.

Environment should be Neat, Clean-Clear and organised for Better Focus

जेव्‍हाही तुम्‍ही दिवसभराचे काम संपवून निघत असता तेव्‍हा उठत असताना, निघताना-जाताना आपले ठिकाण, कामाची जागा, वापरायचे टेबल इत्‍यादी चांगल्‍यारितीने जमवून घ्‍या, चांगल्‍यापद्धतीने अस्‍ताव्‍यस्‍त असलेले सामान आवरून, पसरलेल्‍या गोष्‍टी एकत्रित करून, सावरून ठेवा आणि गरज पडल्‍यास व वेळ असल्‍यास, जमल्‍यास स्‍वच्‍छ करून घ्‍या. कपाटातून, ड्रावरमधून काढलेल्‍या कामाच्‍या गोष्‍टी, वस्‍तू बाहेर काढलेल्‍या होत्‍या त्‍यासुद्धा व्‍यवस्थित करा.

  • आपल्‍या मेंदूला सममितीपणा आणि स्‍वच्‍छता असलेलं आवडतं.
  • Our Brain likes Symmetry and Cleanliness

 

#Symmetry प्रमाणबद्धता, बांधेसूदपणा, सममिती––

*मेंदूचे दोन भाग डावा व  उजवा दोन्‍ही बाजूंमधील एकवाक्‍यता असणे

 

मग जेव्‍हा तुम्‍ही दुस-या दिवशी तुम्‍ही तुमच्‍या कामाच्‍या ठिकाणी, काम करण्‍यासाठी बसाल तेव्‍हा तुम्‍हाला लक्ष केंद्रित (concentrate) करायला सोपं होईल. वाचकमित्रांनो ही कार्यक्षमता किंवा उत्‍पादकता युक्‍ती-क्‍लृप्‍ती (productivity tip) खूपच कामाची आहे. जी तुम्‍हाला आयुष्‍यभर कामाला येणारी आहे.

 

सवय क्र.2. घड्याळाचे गजर बंदच असूद्या

Disable Snooze Button

दुसरी छोटी सवय म्‍हणजे गजराच्‍या घड्याळाशी पर्यायाने वेळेशी संबंधीत आहे, परंतू सध्‍याच्‍या काळात तर सर्वसमावेशक स्‍मार्ट मोबाईल फोनवर स्‍नूझ बटन येतो.  सकाळी झोपेतून उठताना जेवढ्या वेळेस आपण स्‍नूझ बटन दाबत असतो, दिवसभरातील तेवढा वेळ वाया जात असतो. कारण ते १५ मिनिटं तुम्‍ही गाढ झोप म्‍हणजेच रेम-REM झोपतच नसता तर काही करतही नसता.

 


#topटीपः

एंड्रॉईड फोनमधील घड्याळाच्‍या गजराला-स्‍नूझ बटणाला आपण अकार्यक्षम (disable) करू शकत नाही. परंतू, यापासून सुटका मिळवण्‍याचे दोन उपाय आहेत,

पहिला म्‍हणजे स्‍नूझ चा वेळ १५ मिनिटांऐवजी ०१ मिनिट करता येऊ शकतो आणि दुसरा उपाय, तो म्‍हणजे, “आय कान्‍ट वेक अप अलार्म क्‍लॉक ऍप्‍प–– I cant wake up! Alarm Clock App” या सारखे गजराचे-अलार्म ऍप्‍प यांचा वापर करू शकता. यामध्‍ये स्‍नूझ बटणाला संपूर्णपणे हटविता येते.  

जेव्‍हा स्‍मार्ट मोबाईमधील घड्याळीचा अलार्म वाजेल तेव्‍हा तुम्‍हाला एकाच वेळेस उठावं लागतं.

👉#topटीपः

स्‍नूझ चा वेळ १५ मिनिटांऐवजी ०१ मिनिट करणे

आय कान्‍ट वेक अप अलार्म क्‍लॉक सारखे ऍप्‍प वापरणे

 

सवय क्र.३. उर्जेसाठी १०० सेकंदांचे अंथरूनावरचे व्‍यायाम..!

Bed Stretches for Energy 100 sec

हिवाळ्यात किंवा थंडीमध्‍ये पहाटे उठायला कंटाळा येत असतो आणि शरीरसुद्धा आकडलेले असते.  डोळे उघडताच अंथरूनावरच तीन अंग-ताणाचे व्‍यायाम (stretches) करा आणि तीन उभे राहून करा.  अंथरूनावरील करायच्‍या व्‍यायामाचे खाली दिलेल्‍या प्रतिमेचा आत्‍ताच्‍या आत्‍ता, लगेच स्‍क्रीनशॉट काढा, जपून ठेवा.

 


हिवाळ्यामध्‍ये लगेच तरतरीतपणो, उर्जा येण्‍यासाठी थंडीत आकडलेल्‍या शरीराला अंग-ताणण्‍याचे अंथरून-व्‍यायाम करून शरीर मोकळे करण्‍यासाठी दररोज डोळे उघडताच, झोपेतून न-उठताचहे व्‍यायाम-प्रकार करायला लागा..!

 



Image Source: www.darebee.com

वरील अंगताणण्‍याचे व्‍यायाम करायला १०० सेकंदापेक्षा जास्‍त वेळ लागत नाही.  अंथरूनावर अंग ताणल्‍याने तुमची झोप अगदी सहजतेने जाते. हे एक नैसर्गिक गजर सारखं आहे. (natural alarm) आणि हे केल्‍यावर तुम्‍हाला खूपच उर्जावान, स्‍फुर्तीदायक वाटते. 

 

उर्वरित छो्ट्या सवयी या पुस्‍तकाच्‍या सारांश भाग-२ मध्‍ये पाहू -

भाग-2 Part-2

📑📘📙📔📗

 (भाग-2 वाचन करण्‍यासाठी येथून जा )

📘📗📙📖📘📗📙



 📗📘📙📙📖

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive