छोट्या (सूक्ष्‍म) सवयी- छोटीशी सुरूवात कायमचे बदल का करते- बी.जे. फॉग- मराठी अनुवाद-पुस्‍तक परिचय-सारांश (Tiney Habits BJ Fogg Marathi) भाग-२ | Part-2

 तुम्‍हाला बदलतील अशा ७ व्‍यावहारिक आणि अस्सल जीवनातील सूक्ष्‍म सवयी

7 Practical and Real Life Micro-Habits That will Change you.

 

छोट्या (सूक्ष्‍म) सवयी
छोटीशी सुरूवात कायमचे बदल का करते

लेखक
बी.जे. फॉग

मराठी अनुवाद
मीना शेटे-संभू  

(सूक्ष्‍म.! :) पुस्‍तक परिचय-सारांश 

भाग-२ | Part-2


Micro Habits

(Tiny Habits)

Why starting small makes lasting change easy

Author: BJ FOGG

(Micro.! :) Book Review-Summary in Marathi

Tiny Habits by the Author BJ Fogg book Summary Marathi

#Chhotya Savai
(Tiny Habits)
(Marathi)
By B.J.Fogg
Marathi Anuvaad
Meena Shete-Sambhu)

 

भाग-२ | Part-2

 भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा..

वाचक मित्रांनो आपण छोट्या सवयींचा मोठा परिणाम कसा होतो हे टायनी हॅबिटस् या पुस्‍तकातील ७-सात छोट्या परंतू अत्‍यंत मूलभूत अशा सवयी पाहात आहोत त्‍यातील तीन सवयी या पुस्‍तकातील सारांश भाग-१ मध्‍ये पाहिलेले आहेत. 

वाचकांना विनंती आहे की पुस्‍तकाचा गाभा समजून घेण्‍यासाठी कृपया, ज्‍यांनी भाग-१ वाचन केला नसेल त्‍यांनी अगोदर छोट्या सवयी या पुस्‍तकाचे मराठी अनुवाद सारांश प्रथम भाग-१ वाचन करावे.  धन्‍यवाद. 

उर्वरित पुस्‍त‍क सारांश पुढील प्रमाणे आहेः 


सवय क्र.४. बाहेर जाण्‍यापुर्वी खा..!

Eat before you go out.  5 minute

पुढची छोटी सवय आहे बाहेर निघण्‍यापुर्वीच घरीच खाणे.  बाजारातील मजेदार दोन-चार चमचमीत-कुरकुरीत खाद्यपदार्थ पाहिल्‍यावर मन ललचावते, लगेच तोंडात पाणी येते.  संशोधनात हेच निदर्शनास आले आहे की, जी लोकं वस्‍तूभांडार- सुपर बाजार-मॉलमध्‍ये उपाशीपोटी बाजार करत असतात ते खाद्यगृहामध्‍ये (canteen-food court) खूप खातातच, खमंग, चटपटीत-चममीत पदार्थांवर ताव व आडवा हात मारतातच.

जर तुम्‍हाला तुमचे आहार सांभाळायचे असेल तर, विशेषकरून बाजारात किंवा बाहेर जाण्‍यापुर्वी घरातून काही फळं किंवा कोशिंबीर (सलाद-salad), उसळ-मोडआलेली कडधान्‍ये इत्‍यादी पैकी काहीही पोटात ढकलून, खाउनच बाहेर पडा.

भरल्‍यापोटी तुम्‍हाला (बाजारात बाहेर खाण्‍यावर) नियंत्रण करण्‍यामध्‍ये मदत होईल. आणि जर बाहेर खावेच लागले तर अतिसेवन होणार नाही (overeating).  तुम्‍हाला भूकेपेक्षा जास्‍त खाणे टाळण्‍यास सोपं जाईल.

 

सवय क्र.५. प्रातःविधी नंतरच्‍या उठाबशा-जोरबैठका

Do squats after bathroom break.  40 sec.

यानंतरची छोटी सवय आहे सकाळी उठल्‍यावर शरिराची अंतर्स्‍वच्‍छता केल्‍यानंतर करायच्‍या  जोरबैठका (squats).  शरिराची कार्यक्षमता व शक्‍ती-सबलता, मजबूती जाणून घेण्‍यासाठी डॉक्‍टर लोकं खुर्चीवरील चाचणीचा उपयोग करत असतात. (chair test: for functional fitness and strength of body)

ह्या चाचणीमध्‍ये आपल्‍या शरीरातील सर्वांत मोठी मांसपेशी (biggest muscle in body) जी कंबरेखालून ते नितंबावरून मांडीपर्यंत आहे, वैद्यकीय भाषेत ग्‍लुटस मॅक्‍सीमस आणि क्‍वाड्सतर जिम अथवा व्‍यायाम शाळेत ह्याला आपण मांडी’ (thighs) म्‍हणूनही ओळखतो.

ग्‍लुटस मॅक्‍सीमसआपल्‍या शरीरातील सर्वांत मोठी मांसपेशीदेखिल आहे. ही मांसपेशी आपल्‍या खालून मागच्‍या शरीराला आधार देत असते (supports lower back), आपल्‍या शरीराची ढब सांभाळते. (maintain body posture)

युवा अवस्‍थेत लोकं ह्या मांसपेशींना पूर्णपणे विकसित करत नाहीत, ज्‍यामुळे वय वाढताच पायांचे सामर्थ्‍य-शक्‍ती वेगाने कमी व्‍हायला लागते. मग यासाठी तुम्‍हाला जोरबैठका काढण्‍यासाठी व्‍यायामशाळेत किंवा आखाड्यात जायची काही गरज नाही. जेव्‍हाही तुम्‍ही प्राप्‍तःविधी आटोपून बाहेर येता तेव्‍हा किमान १० जोरबैठका (squats) लावा.  

प्रतिमाः स्‍क्वॅट्स-जोरबैठका किंवा उठाबशा

 

Image Source: www.focusfitness.net

आठावण राहण्‍यासाठी जिथं शक्‍य आहे तिथं अशी टिपन चिकटून ठेवा

दिवसभरात ३-४ वेळा जरी असे केलं तरतुम्‍हाला फरक जाणवायला लागेल.  आठवणीसाठी स्‍वच्‍छतागृहात कागदावर लिहून भिंतीवर टीपन अवश्‍य-जरूर चिकटवून घ्‍या.  

वाचणे व लिहिणे ही एक चांगली सवय आहे. कागदावर मनातील भावना प्रगट झाल्‍यावर तसे होण्‍याची शक्‍यता अधिक बळावते.  आपल्‍या मेंदूला वारंवार सूचना देत गेल्‍यास  अंतर्मन व मेंदू त्‍या सूचनेला महत्‍वाचे समजून त्‍यावर अधिक क्षमतेने काम करू लागतो. 

 

सवय क्र.६. स्‍मार्टफोनवर पेलाभर पाणी भरून ठेवा

Leave a glass of water on your phone. 10 sec

वाचकमित्रांनो आम्‍ही असे गृहित धरून असे सांगत आहोत की तुम्‍ही तुमच्‍या स्‍मार्टफोन ला फोन-कवर वापरत असालच. रात्री झोपण्‍या अगोदर फोन उलटं ठेवून त्‍यावर एक पेलाभर, तांब्‍याभर पाणी किंवा छोटी बाटली भरून ठेवा. (keep big glass of water or worm water bottle on phone) सकाळी जेव्‍हा तुम्‍ही झोपेतून उठताच फोनला उचलायला जाल तेव्‍हा अंशापोटी-उपाशीपोटी पाणी पिऊन घ्‍या.

 


#अधिक वाचाः
#स्‍फार्ट फोनच्‍या व्‍यसनातून सूटका कशी मिळवावी- हायपर फोकस

# PROCRASTINATION टालने का कीड़ा

 

 

👉🚰अंशापोटी-उपाशीपोटी- पाणी पिण्‍याचे फायदेः

  • पोट खाली असताना पाणी पिल्‍याने पोट चांगल्‍या पद्धतीने साफ-स्‍वच्‍छ होत असतं. आपल्‍याला शक्‍ती-स्‍फर्तीदायक वाटायला लागतं.
  • शरिरातील चयापचयाच्‍या क्रियादेखिल वाढतात.
  • आपली त्‍वचा तजेलदार होते, त्‍वचा चमकदार दिसायला लागते.
  • असे पाणी पिण्‍याचे खूप फायदे आहेत, म्‍हणूनच पाणी पिण्‍याच्‍या ह्या छोट्या-सूक्ष्‍म पण असरदार सवयीला अवश्‍य आत्‍मसात करा.

 

सवय क्र.७. स्‍वयं-संवाद-आरश्‍यात पाहून स्‍वतःशी बोलणे

Affirmation in the mirror. 30 sec  

सातवी आणि शेवटची छोटी-सूक्ष्‍म सवय ती म्‍हणजे स्‍वयं-संवाद किंवा आत्‍मसंवाद.

मकायला शिफरिन (Mikaela Shiffrin) हिने स्किईंग (skiing) या खेळप्रकारात ऑलम्‍पीकमध्‍ये दोनवेळा सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ह्या उपलब्‍धी अगोदर मकायला अस्‍वस्‍थ (nervous) होऊन अगदी महत्‍वाच्‍या सामना व स्‍पर्धेच्‍यावेळी उलट्या करून घेत होती.

मकायलाचे प्रशिक्षक यांना असे वाटत होते की खेळादरम्‍यान येणारा अस्‍वस्‍थपणा हा (self doubt) स्‍वतःवर असलेल्‍या शंकेमुळे होत असेल. स्‍वतःवर आत्‍मविश्‍वासाची कमी ह्यामुळे कदाचित असे होत असावे.

प्रशिक्षकांना असे वाटत होते की अस्‍वस्‍थपणाचे मूळकारण स्‍वतःवर संशय (self doubt) हे आहे. जो ऐन खेळापुर्वी शेवटच्‍या क्षणी तिच्‍या मनामध्‍ये स्‍वार होत असे.  ह्यामुळे प्रशिक्षकांनी तिला काही स्‍वयंसंवाद शिकविले.  म्‍हणजे स्‍वतःशी असे काही शब्‍द पुटपुटणे ज्‍यामुळे स्‍वतःचा आत्‍मविश्‍वास कुठेही ठळणार नाही.

मराठी भाषेत ‘’मी –––––––– आहे’’ आणि इंग्रजीमध्‍ये ‘’I am ___’’ खूपच शक्‍तीशाली शब्‍द आहे. यांना आपल्‍या ‘’सच्‍च्‍या इच्‍छेपुर्वी’’ ठेवा आणि पाहा. तुम्‍हाला जीवनात जे काही व्‍हायचे आहे, बनायचे आहे, जी इच्‍छा आहे तत्‍पुर्वी स्‍वतःला-मला ठेवून नंतरचे शब्‍द जोडा.

उदाहरणार्थः

(positive affirmations)

  • मी समर्थ आहे
  • मी सामर्थ्‍यवान आहे
  • मी अजय आहे
  • मी शांत आहे
  • मी आनंदित आहे

Self talk-द नाऊ हॅबिट स्‍वयंसंवाद

#अधिक वाचाः स्‍वयंसंवाद एक जादू- सरश्री

असे करण्‍यासाठी अत्‍यंत सहज-सोपी सूक्ष्‍म सवय आहे आणि ती म्‍हणजे, तुमच्‍या घरातील आरश्‍यावर कागदावर टीपन लिहून चिकटवून ध्‍या.  दिवसभरातून जेवढ्या वेळेस तुम्‍ही स्‍वतःला आरशामध्‍ये पाहाल, वरील शक्‍तीशाली शब्‍दांची पुनरावृत्‍ती करून स्‍वतःमध्‍ये त्‍या शब्‍दांची ताकद जाणवू द्या.

शब्‍दांची ताकद
Power of Words



सुरूवातीला
काही-बाहीकिंवा काहीही बनावट, फसवे असे वाटत असेल तर तसे वाटू द्या. हळू-हळू हे शब्‍दच तुमच्‍या अस्तित्‍वाचा हिस्‍सा बनून जातील.  तुमच्‍या मधील-आतील-व्‍यक्‍तीमत्‍वाचा एक भाग बनतील. 

 

👉प्रॉम्‍प्‍ट (prompt) तत्‍परता-सकेत या विषयी महत्‍वाचेः

लेखक बीजे फॉग असे म्‍हण्‍तात की, जर तुम्‍ही संकेताला किंवा तत्‍परतेला अथवा प्रॉम्‍प्‍ट (prompt) पूर्णपणे हटवून द्याल तर कोणतेही वर्तन (behaviovr) होत नाही. यासाठीच छोट्या-सूक्ष्‍म सवयींमध्‍ये भले ही प्रेरणा (motivation) आणि सामर्थ्‍य-शक्‍ती (ability or skills) नगन्‍य लागत असले तरी तुम्‍हाला प्रॉम्‍प्‍ट (prompt) तत्‍परतेची-संकेताची अत्‍यंत आवश्‍यकता आहे.

वाचक मित्रांनो छोट्या किंवा सूक्ष्‍म सवयींची तयारी आतापासूनच करून घ्‍या.  कागदावर नोंद-टीपन लिहून घ्‍या, पाण्‍याचा पेला-ग्‍लास भरून ठेवा किंवा मोबाईलमध्‍ये गजर-अलार्म लावून घ्‍या.

संकेत (तत्‍परता) + कमी प्रयत्‍न + पुनरावृत्‍ती =  छोट्या-सूक्ष्‍म सवयी

prompt + minimum effort + repetition = micro habits

पुनरावृत्‍ती + जागरूकता = स्‍वयं ओळख किंवा स्‍वयं प्रतिमेमध्‍ये बदल  

repetition  + awareness = change in self identity

आणि जर का पुनरावृत्‍तीसोबत (repetition) जागरूकता (awareness) जोडून घेतल्‍यास स्‍वयं-ओळख यामध्‍ये बदल होत असतो. (Change in Self Identity)

यामुळेच छोट्या सवयी आयुष्‍यातील नकारात्‍मक गतीशीलता तोडण्‍यास तुमची मदत करत असतात.  कारण तुमची स्‍वतःची ओळख(self identity) बदललेली असते.

यासोबतच एक शेवटची गोष्‍ट अशी की, जेव्‍हा केव्‍हा तुम्‍ही ह्या छोट्या सवयी पूर्ण कराल तेव्‍हा स्‍वतःला शाब्‍बाशी अवश्‍य द्या. एक महत्‍वपूर्ण कार्य केल्‍याबद्दल स्‍वतःची प्रशंसा करण्‍यासाठी हवेत हात उचलून छोटेसे यश साजरे करा. 

कारण ज्‍या वर्तनानंतर तुम्‍हाला चांगलं वाटतं तुम्‍हाला चांगलेपणाची जाणीव होते, त्‍या गोष्‍टीला तुम्‍ही आपोआप पुनःपुन्‍हा करत असता.  

 

👉इथे लेखकांनी सांगितलेल्‍या शब्‍दांची पुनरावृत्‍ती हाते.

जर माझ्या पुस्‍तकातून काही लक्षात ठेवायचं असेल तर हे लक्षात ठेवा की, लोकं वाईटपणा  किंवा दुर्बलपणा वाटून घेऊन नाही तर, चांगलं वाटून घेण्‍याने बदलत असतात.

people change best by feeling good not by feeling bad
-BJ Fogg

 

वाचकमित्रांनो उशिर नका करू, ह्या सात सवयींपैकी कोणत्‍याही दोन-तीन सवयी निवडा आणि आपल्‍या आयुष्‍यात त्‍यांचा उपयोग करायला, त्‍यांना आपल्‍या जीवनात लागू करायला सुरू करा. तुम्‍हाला बदल दिसायला लागतील, काही दिवसांमध्‍येच अंतर समजायला लागेल, तुमच्‍या सवयींमध्‍ये-कामामध्‍ये फरक जाणवायला लागेल.

मित्रांनो तुम्‍हाला ह्या सवयींवर अधिक सखोलपणे काम करायचे असेल तर प्रत्‍यक्षात येणा-या अडचणी व समस्‍यांवर मात करण्‍यासाठी पुढे आपण सवयींवरच आधारित सवयी या श्रृंखलेत (habit series) ०२ मिनिटांचा नियम (2 two minutes rule) ह्यावर पाहणार आहोत.  ज्‍यामध्‍ये कठीण आणि चालढकल (procrastination) करण्‍याच्‍या सवयींला कसे तोडता येईल ह्याविषयी बघणार आहोत.

येथून अवश्‍य वाचा व जीवनात आत्‍मसात करून सावकाश परंतू सातत्‍याने यशाकडे एक-एक पाऊल पुढे जा. 

कंटाळवाणे आणि कठीण-अवघड असे कार्य आपण सहज कसे सुरू करू शकता
अधिक वाचाः
०२ मिनिटांचा नियम (2 two minutes rule)

-समाप्‍त- 

📗📘📙📖 

 भाग-१ वाचन करण्‍यासाठी येथून जा..

 

 

#Micro Habits in Marathi #Micro Habits Marathi # Atomic Habits Marathi #Tiny Habits Marathi by Author B.J. Fogg  #The Now Habit Marathi #The Now Habit Book Review #The Now Habit By the Author #The Now Habit Neil Fiore #Book Review-Summary in Marathi #Atomic Habits #Micro Habits #Mini Habits #Now Habit #Tiny Habits #Million Dollar Habits by Brian Tracy #Achievement Habit #Psychology of Laziness #आलस का मनोविज्ञान #Reading Habit #5 Five Habits of Emotionally/Mentally Strong People- Daniel Goleman #6 Six Healthy Habits that make you Mentally Strong- Psych2Go #11 Habits for Respect #10 Habits to Maximise Brain Power- #9 Nine Habits That Damage your Brain- Psych2Go #3 Three Habits that Boost Mental Clarity- Better Ideas #Daily Habits of Successful People- Brian Tracy #7 Seven Practical and Real Life MicroHabits #Good Habits, Bad Habits- Windy Wood #Morning Habits #Miracle Morning Habits #7 Seven Habits of Highly Effective People #Habits Mentally Strong People #7 Seven Habits of Highly Effective Readers
#सवयी श्रृंखला - Habit Series:

 📗📘📙📖 

 


 📗📘📙📙📖

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive