द वन थिंग - गॅरी केलर & जे पापासन मराठी पुस्‍तक सारांश (The One Thing Book Summary Marathi)

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते, जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. 

 

कोणतीही कला किंवा कौशल्‍यं शिकण्‍यासाठी आपल्‍याला एका वेळी एकच गोष्‍ट करता येते हे समजायला पाहिजे.  एक ना धड भाराभर चिंध्‍या या मराठी आणि Jack of All Trades but Master of none  या इंग्रजी म्‍हणी प्रमाणे आज दुस-यांच्‍या कला-कौशल्‍यांना पाहून त्‍यांच्‍यासारखेच आपणही करावे, आपल्‍यालालाही त्‍या गोष्‍टी जमायला पाहिजे असे वाटणे साहजिकच आहे. कोणतीही कला किंवा कौशल्‍यं शिकण्‍यासाठी आपल्‍याला एका वेळी एकच गोष्‍ट करता येते हे समजायला पाहिजे. 

करिअर, आरोग्य, वैयक्तिक नातेसंबंध, आध्यात्मिक विकास, मानसिक स्वास्थ्य अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी एक गोष्ट म्हणजेच द वन थिंग असते, जिच्यावर लक्ष केंद्रित करताच आपले ध्येय आपण अल्पावधीत साध्य करू शकतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे गॅरी केलर आणि जे पापासॅन याच कळीच्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधतात. शिवाय ती एक गोष्ट कशी शोधायची, याचा मार्ग दाखवतात. जगभरात गाजलेलं हे पुस्तक आता मराठी वाचकांनाही आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

द वन थिंग

लेखक- गॅरी केलर & जे पापासन

मराठी पुस्‍तक सारांश 
(The One Thing Book Summary Marathi)
The One Thing Book Summary in Marathi

एक ना धड भाराभर चिंध्‍या या मराठी आणि Jack of All Trades but Master of none  या इंग्रजी म्‍हणी प्रमाणे आज दुस-यांच्‍या कला-कौशल्‍यांना पाहून त्‍यांच्‍यासारखेच आपणही करावे, आपल्‍यालालाही त्‍या गोष्‍टी जमायला पाहिजे असे वाटणे साहजिकच आहे. 

 कारण आपल्‍यासारखीच कौशल्‍य करून पाहण्‍याची, त्‍याकडे आकर्षित होण्‍याची ओढ लोकांनाही असते, मग तसे करण्‍यासाठी, लोकप्रिय गोष्‍टी शिकण्‍यासाठी, आत्‍मसात करण्‍यासाठी आपणही तयारी लागतो. परंतू आपण काही काळ प्रयत्‍न करून आपल्‍याला नाही जमणार, अवघड आहे असं म्‍हणून दुसरी एखादी गोष्‍ट, एखादे कौशल्‍यं शिकायला लागतो. 

नृत्‍य पाहून नृत्‍यकला शिकण्‍याची आवड निर्माण होणे, काही दिवसानंतर मग चित्रकला शिकणे, परत कुठे गाणे शिकण्‍यासाठी चित्रकला सोडणे, कोणतीही कला किंवा कौशल्‍यं शिकण्‍यासाठी आपल्‍याला एका वेळी एकच गोष्‍ट करता येते हे समजायला पाहिजे. 

नृत्‍य, गायण, वादन, चित्रकला, जादू, असेच करून सर्व गोष्‍टी थोड्या थोड्या करून तुम्‍ही शिकलात परंतू आणि त्‍या तुम्‍हाला थोड्या-थोड्याच आत्‍मसात होतील.  त्‍याचा परिणाम असा होईल की तुम्‍ही सर्वच गोष्‍टी करण्‍याच्‍या नादात त्‍या सर्वांमध्‍ये सरासरी किंवा काही प्रमाणातच शिकाल, तुम्‍ही एकाही गोष्‍टीमध्‍ये, कौशल्‍यामध्‍ये निःपुन होणार नाही.  

द वन थिंग ही पुस्‍तक वाचल्‍यानंतर तुम्‍हाला असं कळून चुकेल की, तुम्‍ही कितीतरी गोष्‍टी चुकीच्‍या पद्धतीने करत आला आहात. आपल्‍यासारखेच बरेचजण हीच चूक करतात.  कोणत्‍याही एका गोष्‍टीवर आपलं लक्ष केंद्रित करत नाहीत, शिवाय खूपसा-या गोष्‍टी एकाचवेळी करण्‍याचा प्रयत्‍न करतात. आणि हेच एक मुख्‍य कारण आहे की ज्‍यामुळे आपण कोणत्‍याच गोष्‍टीमध्‍ये प्राविण्‍य मिळवत नाहीत. (एक्‍स्ट्रा ऑर्डिनरी

👉अधिक वाचा:  सोशल मीडीया टाळून कामावर लक्ष केंद्रित कसे करावे?
#Hyper Focus हायपर फोकस भाग-१  | भाग-२

जर तुम्‍ही थोडं लक्ष दिलात तर तुम्‍हाला समजेल की, ते सर्व लोक जे यशस्‍वी झाले ते एकाच गोष्‍टीमुळे की त्‍यांनी फक्‍त एकाच गोष्‍टीवर लक्ष केंद्रित केलं आणि त्‍यावरच ते मेहणत करत राहिले जोपर्यंत ती एक गोष्‍ट त्‍यांना यश देत नाही तोपर्यंत.

उदा. सचिन तेंडुलकरसाठी ती एक गोष्‍ट क्रिकेट होती तर वॉरेन बफेट्साठी ती एक गोष्‍ट गुंतवणूक किंवा शेअर मार्केट होती मुहम्‍मद अलीसाठी ती एक गोष्‍ट बॉक्‍सींग होती आणि रोनाल्‍डोसाठी ती एक गोष्‍ट फुटबॉल होती.

आज आपण वॉरेन बफेट्ला जगातील एक यशस्‍वी गुंतवणूकदार म्‍हणून ओळखतो कारण त्‍यांनी एकाचवेळी गुंतवणूक करणे याचबरोबर शिकणे, एक चांगला नट, रोनाल्‍डोसारखा एक फुटबॉलपटू किंवा मुहम्‍मद अली सारखा एक बॉक्‍सर बनण्‍याचा प्रयत्‍न केला नाही.  परंतू गुंतवणूक ह्या एकाच गोष्‍टीवर सर्व लक्ष दिलं आणि संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्‍यावर काम करत राहिले, शिकले आणि म्‍हणूनच ते जगातील एक श्रीमंत गुंतवणूकदार व्‍यक्‍ती बनले.

याचप्रमाणे जर तुम्‍हालाही असेच असामान्‍य- एक्‍स्ट्रा ऑर्डिनरी कतृत्‍व, कार्य करायचे असेल तर तुम्‍हालाही एकाच गोष्‍टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे.

आपल्‍यापैकी कित्‍येक लोकांचा लक्ष देखिल खूप व्‍यापक-Broad, मोठा असतो. बरेचजण एका गोष्‍टीवरून दुसर-या गोष्‍टीवर जात राहतात किंवा एकाचवेळी खूपसा-या गोष्‍टी करण्‍याचा प्रयत्‍न करत असतात. त्‍यामुळे त्‍यांचा लक्ष विभाजीत होतो आणि त्‍यांना परिणामदेखिल भेटत नाही.

तुम्‍हाला चांगले परिणाम मिळविण्‍यासाठी तुमचे लक्ष जेवढे शक्‍य असेल तेवढा Narrow-संकुचित ठेवायला पाहिजे.

उदाहरणार्थः  सुर्याची किरणे कागदावरती व्‍यापक प्रमाणात पडली तरी त्‍यावर काही फरक पडत नाही, काही परिणामदेखिल होत नाही. परंतू तुम्‍ही जर भिंगाच्‍या मदतीने त्‍याच सुर्यकिरणांना एकत्रित करून एकाच जागी केंद्रित कराल तेंव्‍हा तीच किरणे त्‍या कागदाला जाळतात.

संकुचित लक्ष केंद्रित ठेवायचा म्‍हणजे, ज्‍या गोष्‍टी कमी महत्‍वाच्‍या आहेत त्‍याकडे दुर्लक्ष करायचे आणि फक्‍त त्‍यावर लक्ष द्यायचं ज्‍या सर्वात जास्‍त महत्‍वाच्‍या आहेत.

लक्षात ठेवा, जर तुम्‍ही दोन सशांना एकाचवेळी पकडण्‍याचा प्रयत्‍न केला तर तुम्‍ही त्‍यांना पकडू शकणार नाही.

👉Multitasking is a LIE…!!
माणूस एकाचवेळी अनेक गोष्‍टी करू शकतो हे चूकीचे आहे.

माणूस एकाचवेळी अनेक गोष्‍टी करू शकतो हे चूकीचे आहे. एकाच वेळी अनेक कामे करण्‍याची संकल्‍पना संगणकामुळे आलेली आहे.  परंतू प्रत्‍यक्षात संगणकही एकाचवेळी सगळी कामे करत नाही तर एक काम पट्कन संपवून ते दूसरे काम करते आणि त्‍यामुळेच आपल्‍याला असे वाटते की, ते सगळी कामे एकाचवेळी करत आहे.

माणसाच्‍या बाबतीत मात्र असे होत नाही.  तुम्‍ही कोणतीही दोन कामे तेवढ्या परिणामकारकपणे करू शकत नाही.  आता जर तुम्‍ही म्‍हणाल, की मी गाडी चालवताना फोनवतरी बोलतो.  आणि दोन्‍ही कामे चांगल्‍याप्रकारे करतो. तर असे नाही.


 

कारण जेव्‍हा तुम्‍ही दोन कामे करत असता, तेव्‍हा तुमचा मेंदू दोनपैकी एका कामाला ‘’फोरग्राऊंड’’वरती ठेवतो ज्‍यावर तुमचं लक्ष केंद्रित असतं आणि दुस-या कामाला तो ‘’बॅकग्राऊंड’’ मध्‍ये ठेवतो.  ज्‍यावर तुमचं कमी लक्ष असतं.

उदाहरणार्थः समजा तुम्‍ही फोनवर बोलता-बोलता बागेमध्‍ये चालत आहात तेव्‍हा तुमचं जास्‍तीत जास्‍त लक्ष फोनवरील संभाषणावर असेल ते काम तुमच्‍या मेंदूच्‍या ‘’फोरग्राऊंड’’ वरती चालू असेल, बागेत नाही.

पण जर का तुम्‍हाला एखादा रस्‍ता ओलांडून जायचं आहे ज्‍यावरून जोर-जोराने वेगात गाड्यांची ये-जा चालू आहे तर तुम्‍ही लगेच तुमचं लक्ष फोनवरून बाजूला करुन नक्‍कीच रस्‍त्‍यावर लक्ष केंद्रित कराल. जर तुम्‍हाला तुमचा जीव प्रिय असेल तर ...!

प्रबळ इच्‍छाशक्‍तीः Willpower is Limited

  • प्रबळ इच्‍छाशक्‍ती ही मर्यादित असते.

प्रबळ इच्‍छाशक्‍तीवर गॅरी केलरचं एक महत्‍वाचं वाक्‍य आहेः

प्रबळ इच्‍छाशक्‍ती ही एका बॅटरीसारखी असते. जी सकाळी फुल-भरलेली असते आणि संध्‍याकाळ होईपर्यंत ती सगळी संपून जाते.

आपल्‍या सर्वांसोबत हे खूपदा होत असते.  जेव्‍हा आपण एखादे चांगले नियोजन करतो, की ही कामे मी उद्या दिवस संपेपर्यंत कशाही स्थितीमध्‍ये संपवणार.

उदाहरणार्थः

मी उद्या सकाळी उठून योगा व ध्‍यान करणार,नंतर महत्‍वाची कामे करणार, संध्‍याकाळी सतार वाजवायला शिकणार, आणि शेवटी रात्री माझ्या नव्‍या व्‍यावसायाच्‍या-उद्योगाच्‍या कल्‍पनेवर काम करणार. विचार करणार.  परंतू दुस-या दिवशी रात्र होईपर्यत ही सर्व कामं कधीच पुर्ण होत नाहीत.  

कारण जेव्‍हा आपण काम सुरू करतो तेव्‍हा सुरूवातीची काही कामे चांगली करतो, कारण तेव्‍हा आपली प्रबळ इच्‍छाशक्‍ती फुल-भरलेली असते. परंतू संध्‍याकाळी होईपर्यंत आपण चांगले काम करू शकत नाही कारण तोपर्यंत आपली प्रबळ इच्‍छाशक्‍ती संपत आलेली असते. आणि जर का आपण जबरदस्‍तीने ते काम करण्‍याचं प्रयत्‍न केलं तर ते काम चांगल्‍या प्रकारे होतही नाही.

तुम्‍हाला जर परिणामकारक परिणाम हवे असतील, तर तुम्‍हाला तुमचं सर्वांत महत्‍वाचं काम सर्वांत आधी करावे लागेल म्‍हणजेच सकाळीच केलं पाहिजे. रात्रीसाठी कधीच राखून ठेवून नये.

(अधिक वाचाः सर्वांत कठीण काम सर्वांत आधी- ईट  दॅट फ्रॉग- ब्रायन ट्रेसी) 

आता प्रश्‍न असा येतो की, सकाळी अगोदर सर्वांत आधी करायचं काम ते कोणतं असेल? ह्याप्रश्‍नाच्‍या उत्‍तरासाठी तुम्‍हाला स्‍वतःला दोन प्रश्‍न विचारावे लागतील. हे दोन प्रश्‍न तुमच्‍यासाठी खूप महत्‍वाची आहेत. जी तुम्‍ही स्‍वतःला नेहमी विचारत राहायला पाहिजेत.

  • तुमची ती एक गोष्‍ट काय आहे? ती एक गोष्‍ट नेहमी करत आला आहात आणि नेहमी करत राहणार आहात.
  • ती कोणती एक गोष्‍ट आहे जी तुम्‍ही आता केल्‍याने बाकीच्‍या गोष्‍टी सोप्‍या होतील किंवा कमी गरजेच्‍या होतील. 

ती एक गोष्‍ट जी तुम्‍हाला तुमचे ध्‍येय-उद्दिष्‍ट पुर्ण करण्‍यासाठी मदत करेल. या प्रश्‍नांना नीट लक्षात ठेवा.  कारण ह्याच प्रश्‍नांच्‍या आधारावर ‘’द वन थिंग’’ हे पुस्‍तक पूर्ण लिहिलं गेलं आहे.

लेखक गॅरी केलर आपल्‍या मोठ्या ध्‍येय-उद्दिष्‍टांना करण्‍यापासून रोखतात, ते असं म्‍हणत नाहीत की तुम्‍ही मोठे विचार करूच नका.  त्‍यापेक्षा तुम्‍ही छोट्या-छोट्या ध्‍येयांचा जास्‍त विचार करा आणि ते पूर्ण करा.

बरेच लोक आपले वार्षिक ध्‍येय, मासिक ध्‍येय, साप्‍ताहिक ध्‍येय किंवा दिवसाचं ध्‍येय असं लक्ष केंद्रित करतात.  परंतू त्‍यांच्‍यासाठी हेच चांगले आहे की त्‍यांनी आपल्‍या आत्‍ताच्‍या (NOW) ध्‍येयावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे.

नेमकं काय करायला पाहिजे की ज्‍यामुळे तुम्‍हाला तुमचं दिवसाचं ध्‍येयं पूर्ण करण्‍यासाठी मदत होईल.

आत्‍ता (Now) तुम्‍ही काय करू शकता, की ज्‍यामुळे तुमचं महिण्‍याचं किंवा आठवड्याचं ध्‍येय पूर्ण करण्‍यास तुम्‍हाला मदत होईल.  किंवा तुम्‍ही असं काय करू शकता की ज्‍यामुळे तुमचं वार्षिक ध्‍येये पूर्ण करण्‍यासाठी तुम्‍हाला मदत होईल. अशा गोष्‍टी करा.

The Domino Effect : कृती छोटी परिणाम मोठा


लेखक म्‍हणतात की, तुमची ध्‍येयं ही एका डॉमिनोसारखी आहेत. जर तुम्‍हाला हे माहित असेल की, एक डॉमिनो आपल्‍यापेक्षा ५० टक्‍क्‍यांनी मोठं असलेल्‍या डॉमिनोला पाडू शकतो. जर तुम्‍ही दोन इंचचा डॉमिनो घ्‍याल आणि त्‍याच्‍या शेजारी पन्‍नास टक्‍क्‍यांनी मोठा डॉमिनो लावाल आणि त्‍याच्‍यानंतर त्‍याच्‍याही पेक्षा ५०-टक्‍क्‍यांनी मोठ्या डॉमिनोला ठेवाल, आणि असेच पुढे करत जाल तर, तुमचा २३वा डॉमिनो असेल तो आयफेल टॉवर एवढा असेल. आणि जो ५७वा डॉमिनो असेल तो एवढा मोठा असेल की तो चंद्र आणि पृथ्‍वी यांच्‍यातील अंतर पूर्ण करू शकेल एवढा मोठा असेल.

याचप्रमाणं असं समजा जो ५७वा डॉमिनो आहे तो तुमच्‍या आयुष्‍यातल सर्वात मोठं ध्‍येयं आहे. आणि त्‍याला तुम्‍ही सरळ पाडण्‍याचा प्रयत्‍न करत आहात. तर तुम्‍ही तेथे नक्‍कीच अयशस्‍वी ठराल.

त्‍यामुळे तुम्‍हाला तुमचे सर्व वार्षिक, मासिक, साप्‍ताहिक, दैनंदिन या ऐवजी, या विरूद्ध दैनंदिन,साप्‍ताहिक, मासिक,वार्षिक, असे उलट दिशेने ठेवावे लागतील. की जेंव्‍हा तुम्‍ही तुमच्‍या आत्‍ताच्‍या ध्‍येयाला पूर्ण करता तेव्‍हा ते एक डॉमिनो परिणाम- डॉमिनो इफेक्‍ट तयार करेल. आणि तुमच्‍या सर्व ध्‍येयांना एकामागून एक पूर्ण करले.  आणि शेवटी तो तुमच्‍या सर्वात मोठ्या ध्‍येयालादेखिल पूर्ण करेल.

यश हे तुम्‍हाला पायरी दर पायरी एकामागून एकच मिळेल. सर्व एकदाच मिळणार नाही. जर तुम्‍हाला अब्‍जाधिश व्‍हायचे असेल, तर अगोदर कोट्याधिश बनन्‍याचा प्रयत्‍न करा, त्‍याही अगोदर लक्षाधिश बनन्‍याचा विचार करा आणि ते ध्‍येय पूर्ण करा.

 


अब्‍जाधिश - कोट्याधिश - लक्षाधिश

आणि हा सर्वांत चांगला मार्ग आहे दीर्घकाळासाठी यशस्‍वी होण्‍याचा. आपल्‍याला हे ध्‍येय पूर्ण करण्‍यासाठी दिवसातील कमीत कमी चार तास तरी एका गोष्‍टीला द्यायला पाहिजे.

समजा, तुमची ती एक गोष्‍ट बुध्‍दिबळ खेळणे आहे. तर तुम्‍ही दिवसातील चार तास त्‍यासाठी राखून ठेवले पाहिजेत.  याचा अर्थ असं नाही की, तुम्‍ही चारही तास फक्‍त सरावच करावी. तर त्‍यावेळेत तुम्‍ही त्‍या खेळाबद्दल माहिती गोळा करू शकतो, इतरांशी त्‍यासंदर्भात चर्चा करू शकता, नवीन डावपेच शिकू शकतो, हेही त्‍या चार तासांमध्‍येच येऊ शकतं.

मित्रांनो वरील सारांशमधील सर्व संकल्‍पना आपल्‍याला गॅरे केलर यांच्‍या ‘’द वन थिंग’’ या पुस्‍तकात वाचायला मिळतील. अधिक सविस्‍तरपणे अभ्‍यास करण्‍यासाठी पुस्‍तक खरेदी करून अवश्‍य वाचान करा.  आजच्‍या लक्ष विचलित करणा-या युगामध्‍ये आपल्‍याला आपली एक गोष्‍ट मिळविण्‍यासाठी नक्‍कीच मदत करेल. 

 

पुस्‍तकः द वन थिंग
लेखकः गॅरी केलर आणि जय पापासन
मराठी पुस्‍तक सारांश | Book Summary in Marathi

 

#स्‍वयंमदत #Self Help #द वन थिंग #मराठी #गॅरी केलर आणि जय पापासन #मराठी पुस्‍तक #सारांश#Book Summary in Marathi

 

📘📗📙📖



www.evachnalay.in

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive