रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट-गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम - रॉबर्ट कियोसाकी -पुस्‍तक सारांश- मराठी

रिच डॅड पुअर डॅड पुस्‍तकाचे नाव तर ऐकलेच असेल किंवा कित्‍येकांनी वाचलीसुद्धा असेल.  बरेचजण असे म्‍हणतात की हे एक जीवन बदलणारे पुस्‍तक आहे. परंतु रॉबर्ट यांनी ह्याच पुस्‍तकाचा भाग-०२ सुद्धा लिहिलेला आहे.

रिच डॅड्स
कॅशफ्लो क्‍वाड्रंट
गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

लेखक- रॉबर्ट टी. कियोसाकी 

पुस्‍तक सारांश- मराठी 

मित्रांनो आपल्‍यापैकी बहुतेकांनी रॉबर्ट कियोसाकी यांच्‍या रिच डॅड पुअर डॅड पुस्‍तकाचे नाव तर ऐकलेच असेल किंवा कित्‍येकांनी वाचलीसुद्धा असेल.  बरेचजण असे म्‍हणतात की ही एक जीवन बदलणारे पुस्‍तक आहे. परंतु रॉबर्ट यांनी ह्याच पुस्‍तकाचा भाग-०२ सुद्धा लिहिलेला आहे, ज्‍याचं नांव आहे ‘’रिच डॅड्स-कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शीयल फ्रीडम’’, किती जणांनी ही पुस्‍तक वाचली असेल माहित नाही. 

कारण बरेचजण रॉबर्ट कियोसाकी लिखित रिच डॅड पुअर डॅड ही पुस्‍तक तर वाचन करतात परंतू त्‍यांची ह्याच विषयावरील लिहिलेली दुसरी पुस्‍तक वाचण्‍याचे टाळतात किंवा वाचत नाहीत.   

आर्थिक शिक्षणावरील पहिली पुस्‍तक रिच डॅड पुअर डॅड ही ब-यापैकी आपल्‍याला अर्थसाक्षर करून आर्थिक मार्गावर नेऊन सोडते, संपत्‍ती व कर्जे-देणी यांत फरक करणे आणि पैशाबद्दलचा आपला दृष्‍टीकोन पार बदलून टाकण्‍यात ह्या पुस्‍तकाचा मोठा सिंहाचा वाटा आहे.  तसेच आपल्‍या आर्थिक शिक्षणाची पाया भरणीदेखिल होते.

खरेतर, रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट-गाईड टू फायनान्‍शीयल फ्रीडम ह्या पुस्‍तकात लेखक अधिक सखोलपणे, तपशिलवार माहिती देतात की कसे आपण आपले आर्थिक जीवन सुधारून आर्थिक स्‍वातंत्र्य गाठू शकतो.?

तर चला मग आज आपण ह्याच पुस्‍तकातील महत्‍वाचे आणि शाश्‍वत आर्थिक धडे पाहुया...

👉टीपः 

आर्थिक साक्षरता ह्या विषयावरील मूलभूत गोष्‍टी समजून घेण्‍यासाठी कृपया रॉबर्ट कियोसाकी यांच्‍या रिच डॅड पुअर डॅड पुस्‍तक किंवा पुस्‍तकाचे सारांश अवश्‍य वाचन करा.

👉रिच डॅड पुअर डॅड- रॉबर्ट कियोसाकी- पुस्‍तक सारांश भाग-१  

👉रिच डॅड पुअर डॅड- रॉबर्ट कियोसाकी- पुस्‍तक सारांश भाग-

👉रिच डॅड पुअर डॅड- रॉबर्ट कियोसाकी- पुस्‍तक सारांश भाग-

 

Quadrant-क्‍वाड्रंट- चर्तुळाचा चौथा भाग


 

वाचकांनो ही पुस्‍तक जवळपास ३०० पानांची असून तीन भागांमध्‍ये विभागलेली आहे.  सर्वांत पहिला भाग सर्वसाधारणपणे साध्‍या भाषेत सांगायचे तर ‘’कॅशफ्लो क्‍वाड्रंट’’ म्‍हणजेच वित्‍तीय चौकट- जे आपल्‍याला शिकवते  वित्‍त प्रवाहाबद्दल.

मित्रांनो आपल्‍या दैनंदिन जीवनात आवश्‍यकता, गरजा व ईच्‍छा यांवर बरेचसे खर्च असतात, आणि ते खर्च पूर्ण करण्‍यासाठी आपल्‍याला कोणते-ना-कोणते तरी मार्ग, पद्धती शोधून काढावेच लागते-कॅशफ्लोसाठी म्‍हणजेच उत्‍पन्‍नासाठी पैसे कमावण्‍यासाठी. त्‍यासाठी लेखक आपल्‍याला एका चौकटीद्वारे ज्‍याला त्‍यांनी कॅशफ्लो क्‍वाड्रंट असे म्‍हटले आहे.  ते असे समजावून सांगतात की ह्या चौकटीपैकी एकामध्‍ये आपण असतो.   

तर चला मग ह्या चौकटीला तपशिलात पाहुया... कारण तुम्‍हाला जर हे माहित नसेल की ह्या चार प्रकारातील व्‍यक्‍ती कसे विचार करत असतात आणि कसे आपले जीवन जगत असतात तर आपण स्‍वतःलादेखिल या चौकटीत ठेवू शकणार नाही.  आपण कोणत्‍या चौकटीत आहोत हे समजून घेण्‍यासाठी अगोदर चौकटीतील प्रत्‍येकजण कसे विचार करतात ते पाहू,

तर ते चार क्‍वाड्रंट आहेतः ई, एस, बी, आय (ESBI)

  • E- Employee (नोकरी-कर्मचारी)  
  • S- Self-Employment (स्‍वयंरोजगार)
  • B- Businessman (व्‍यवसायिक, उद्योगी)
  • I- Investor (गुंतवणूकदार)

 


ई-क्‍वाड्रंटः E- Employee (नोकरी-कर्मचारी):

ह्या प्रकारामध्‍य जगातील सर्वांत जास्‍त म्‍हणजे ९५ टक्‍के लोकं येतात परंतू जगातील केवळ ०५ टक्‍केच संपत्‍ती यांच्‍याकडे असते.  ही ती लोकं असतात ज्‍यांच्‍याकडे नोकरी आहे, आणि यांच्‍या जीवनाचा प्रा‍थमिक लक्ष्‍य नोकरीची हमी..  

मित्रांनो ह्या चौकटीत-वर्गात सर्वांत जास्‍त लोकं असतात कारण मुळातच आपल्‍याला लहानपणापासूनच ह्याच वर्गासाठी तयार केलं जात असतं. आपले पालकच आपल्‍याला असे सांगत असतात की चांगले शिक्षण घ्‍या, फक्‍त एखादी पदवी (डिग्री) पूर्ण करा, चांगल्‍या व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमाला जा-जसे अभियांत्रिकी जेणेकरून तुम्‍हाला एक सुरक्षित व चांगली नोकरी मिळेल, ज्‍यामध्‍ये भरपूर फायदे, सोयी-सुविधा असणारी.  मग तुम्‍ही आनंदाने आपले जीवन जगू शकाल.

आणि यामुळेच ह्या वर्गातील व्‍यक्‍ती फक्‍त एकाच प्रकारच्‍या उत्‍पन्‍नावर अवलंबून-विसंबून राहतात आणि ते असते त्‍यांची दर महिन्‍याला येणारी पगार..!

लेखकाच्‍या मते ह्या चौकटीत राहून श्रीमंत होणे खूपच जास्‍त कठीण आहे.  कारण सुरूवातीला तुमची पगार खूप कमी असते, ज्‍यामुळे तुमची बचत तेवढीशी होत नसते आणि लोकांच्‍या अमर्याद ईच्‍छा-अपेक्षा खूप जास्‍त असतात.  त्‍यामुळे अगदी सुरूवातीपासूनच लोकं स्‍वतःसाठी एका मोठ्या कर्जाच्‍या जाळ्यात स्‍वतःला अडकवून घेत असतात जसे २०-२५ वर्षासांठीचे गृहकर्ज किंवा १०-१५ वर्षांसाठीचा कार लोण इत्‍यादी.

मग जस-जसं लोकांची पगारवाढ होत असते तस-तसं त्‍यांच्‍या ईच्‍छांचा आकार-प्रकारही वाढत जात असतात.  गुंतवणूकीविषयी तर विचारदेखिल ते करत नसतात. कारण त्‍यांच्‍याजवळ एक सुरक्षित नोकरी आहे, आणि यामुळेच त्‍यांच्‍यासाठी नोकरीची सुरक्षा ही खूप महत्‍वाची असते, आर्थिक सुरक्षेपेक्षा…! कारण यांना दर महिन्‍याला सतत (पतपुरवठा) पैसा लागत असतो आपल्‍यावर असलेल्‍या कर्जाचे हफ्ते फेडण्‍यासाठी. 

जर एखाद्या महिण्‍यात त्‍यांना पगार मिळाली नाही तर त्‍यांना खूप जास्‍त त्रास होत असतो.

थोडक्‍यात....

👉ई-क्‍वाड्रंट-E-Employee- नोकरी-चाकरी-कर्मचारी-पगारदार-नोकरदार-वर्ग

  • एखादी सुरक्षित नोकरी असते
  • नोकरी संरक्षण हेच लक्ष्‍य असतं
  • कर्जे व देणी-हफ्ते इत्‍यादीसाठी नोकरीच्‍या सुरक्षेची काळजी असते
  • उत्‍पन्‍नाचा एकच स्‍त्रोत असतोः पगार
  • श्रीमंत होणे व आर्थिकदृष्‍ट्या स्‍वातंत्र्यः अशक्‍य
  • हातात पैसाच नसल्‍यामुळेः गुंतवणूकच नसते

 

👉एस-क्‍वाड्रंटः S-Self-Employee (स्‍वयंरोजगार)

ई-E क्‍वाड्रंट नंतर त्‍याखालील चौकट/वर्ग आहे एस-S ज्‍यामध्‍ये स्‍वयंरोजगार करणारे व्‍यक्‍ती येतात.  जसे डॉक्‍टर, वकील, छोटे-मोठे दुकानदार अथवा मालक इत्‍यादी.  हे असे व्‍यक्‍ती असतात जे स्‍वतः आपला वेळ विकून पैसा कमावत असतात.  फरक फक्‍त एवढाच आहे की अशा लोकांचा कोणीही मालक नसतो.  स्‍वतःचे मालक स्‍वतःच असतात.  कित्‍येकांना असेही वाटू शकते की ही नोकरी नाही. 

खरेतर स्‍वयंरोजगार ही सुद्धा एका प्रकारची नोकरीच आहे.  फक्‍त यांनी आपला रोजगार स्‍वतः निर्माण केला आहे आणि कर्मचारी वर्गापेक्षा यांच्‍याकडे थोडासा अधिक लवचिकपणा असतो. उदा.कामाचे व वेळेचे बंधन नसते.

परंतू अशा व्‍यक्‍ती जर आजारी पडले तर यांना कर्मचारी वर्गांना भेटणारे फायदे जसे-पगारी रजा मिळणार नाही. म्‍हणून जर स्‍वयंरोजगार करणारी व्‍यक्‍ती आजारीपणामुळे आपल्‍या कामावर उपस्थित राहू शकले नाही, तर त्‍यांना त्‍या दिवशीचे उत्‍पन्‍न मिळणार नाही.

तर वाचकांनो हे होते चौकटीतील डाव्‍या बाजूचे दोन वर्ग-क्‍वाड्रंट दोघांमध्‍ये एक गोष्‍ट सारखी असते आणि ती म्‍हणजे त्‍यांचा वेळ हाच पैसा म्‍हणजेच Time is Money ई व एस या वर्गातील व्‍यक्‍ती आपला वेळ विकून पैसा कमावत असतात. म्‍हणून या दोघांनाही वेळेची किंमत असते. यांना जास्‍त पैसा कमावण्‍यासाठी जास्‍त वेळ द्यावा लागेल.

जसे- अधिक वेळ काम करणे-ओव्‍हर टाईम किंवा सुट्टीच्‍या दिवशीदेखिल काम करणे इत्‍यादी

 

👉बी-क्‍वाड्रंटः B-Businessmen/Industrialist (व्‍यावसायिक/उद्योगी)

आता वळूया चौकटीच्‍या उजव्‍या बाजूला ज्‍यामध्‍ये वरच्‍या बाजूला येतात B-Businessmen व्‍यवसाय मालक यांचा मुख्‍य लक्ष्‍य असते की हुशार लोकांना आपल्‍या व्‍यवसाय, कंपनीमध्‍ये नोकरी देऊन त्‍यांच्‍याकडून काम करवून घेण्‍याचा.  आणि त्‍यांच्‍यावळ सुरूवातील पगार देण्‍यासाठी पैसा नसला तरीदेखिल ते पैसा इतरांकडून घेऊन व्‍यावसाय सुरू करत असतात.  म्‍हणजेच ह्या चौकटीतील व्‍यक्‍ती ओपीटी-OPT आणि ओपीएम-OPM चा वापर करत असतात.  ज्‍याचा अर्थ होतोः

  • O- Other
  • P- Peoples
  • T-Time आणि
  • O-Other
  • P-Peoples
  • M-Money

रॉबर्ट यांच्‍या मते श्रीमंत होण्‍याचा हा सर्वांत चांगला क्‍वाड्रंट आहे.  कारण असे लोक एक सिस्‍टम तयार करत असतात. एस-क्‍वाड्रंटच्‍या लोकांसारखे हे आपल्‍यासाठी एक नोकरी निर्माण करत नाहीत.  यामुळेच सुरूवातीला यांना खूप जास्‍त मेहणत-श्रम करावे लागतात आणि धोकेसुइद्धा पत्‍कारावे लागतात.  

परंतू हे त्‍याग-sacrifice- अल्‍प कालावधीचे असतात. फक्‍त जोपर्यंत यांनी पद्धत-सिस्‍टम, प्रोसेस-प्रक्रिया आणि पॉलीसी-नीती तयार केलेलं नसेल तोपर्यंत. ज्‍यामुळे ह्यांचे कर्मचारी स्‍वतःहून आपल्‍या कामावर येत असतात. त्‍यांच्‍या गैरहजेरीतसुद्धा येत राहतात. आपण उपस्थित राहो अथवा न राहो ते आपल्‍या कामावर येऊन त्‍यांना नेमून दिलेले काम ते करतीलच.

आता शेवटी चौथ्‍या चौकटीत येतात गुंतवणूकदार म्‍हणजेच इन्‍व्‍हेस्‍टरर्स-I-Investors

 

👉आय-क्‍वाड्रंट: I-Investor (गुंतवणूकदार)  

श्रीमंत होण्‍याबरोबरच आर्थिकदृष्‍ट्या स्‍वतंत्र होण्‍याचा हा एकमेव मार्ग आहे. म्‍हणजेच  अशा लोकांचा एकच लक्ष्‍य असतो आणि तो म्‍हणजे त्‍यांचा पैसा त्‍यांच्‍यासाठी कसा काम करेल ह्याचा...

To Make Money Work for Them.

आपल्‍या कमावलेल्‍या पैशाने आपल्‍यासाठी कशाप्रकारे कार्य करावे ह्याचा विचार हे करत असतात.  यांची विचार करण्‍याची पद्धतच अशी असते की ज्‍याप्रमाणे इतर चौकटीतील लोकं आपला वेळ विकून पैसा कमावतत त्‍याचप्रमाणे गुंतवणूकदार आपला पैसा देऊन अधिक पैसा कमावत असतात. आणि यालाच पॅसिव्‍ह इन्‍कम असेही म्‍हणतात.

आता ब-याच जणांना असा प्रश्‍न पडू शकतो की हे कसे शक्‍य आहे?

तर याचे उत्‍तर अगदी सोपे आहे, पैशांनी तुम्‍ही खूपसा-या गोष्‍टी-वस्‍तू खरेदी करू शकता ह्यात काही शंका नाही. जसे- कार-गाडी, घड्याळ, घर, किंमती-मौल्‍यवान-उंची वस्‍तू-सेवा इत्‍यादी

परंतू पैशांनी तुम्‍ही स्‍वतःचा वेळ खरेदी करू शकता आणि सर्वांत महत्‍वाचे पैशांनी तुम्‍ही दुस-यांचा वेळही खरेदी करू शकता…!

म्‍हणजेच तुम्‍ही लोकांना भाड्याने घेऊ शकता. ज्‍यामुळे आपल्‍याला आपला स्‍वतःचा वेळ स्‍वतःचा वेळ विकावा लागणार नाही आणि आपण ख-या अर्थाने स्‍वतंत्र राहू शकू.  ज्‍याला आपण खरे आर्थिक स्‍वातंत्र्य म्‍हणून शकतो.  तर मुख्‍यत्‍वे/मूळात चौकटीच्‍या डाव्‍या बाजूचे (E/S क्‍वाड्रंट) व्‍यक्‍ती अॅक्‍टीव्‍हली कार्य करत असतात आणि त्‍यांचे उत्‍पन्‍न अथवा पगार-पैसे त्‍यांना तेंव्‍हाच मिळतो जोपर्यंत ते अॅक्‍टीव्‍हली कार्य करत राहतात तोपर्यंत, यालाच आपण एक्‍टीव्‍ह इन्‍कम अथवा सक्रिय उत्‍पन्‍न असे म्‍हणतो. 

आणि जर ह्या चौकटीच्‍या डाव्‍या बाजूतील एक्‍टीव्‍ह-सक्रीय वर्गातील (E/S क्‍वाड्रंट) व्‍यक्‍ती उजव्‍या चौकटीच्‍या वर्गात येण्‍याचा प्रयत्‍न करणार नाही तर अशी शक्‍यता जास्‍त आहे की ते जीवनभर काम करतच राहतील.

जसे की जगातील सर्वांत श्रीमंत गुंतवणूकदार व्‍यक्‍तीपैकी एक असलेले वॉरेन बफेट् असे म्‍हणतात की,

If you don’t find a way to make money while you sleep,
you will have to work until you die..!

-Warren Buffet (BSH Corp.)

कारण आपल्‍याकडे दिवसभराचे किती तास असतात? चोवीस (२४-तास) बरोबर, आणि त्‍यापैकी आपण किती तास काम करू शकतो? आठ, नऊ, दहा किंवा बारा तास... तुम्‍ही जर चौकटीच्‍या डाव्‍या बाजूच्‍या (E/S क्‍वाड्रंट) दोनपैकी एखाद्या वर्गातील व्‍यक्‍ती आहात तर तुम्‍ही एका मर्यादेपर्यंतच पैसा कमावू शकता. जर तुम्‍हाला अधिक कमवायचं असेल तर तुम्‍हाला ओव्‍हर टाईम करावा लागेल आणि तेदेखिल तुम्‍ही एखाद्या मर्यादेतच करू शकता.

तर डाव्‍या बाजूच्‍या वर्गातील (E/S क्‍वाड्रंट) व्‍यक्‍तींचा जीवनभरातील उत्‍पन्‍नाचा ग्राफ खालील प्रमाणे असेलः

परंतू जर का तुम्‍ही डावी बाजू सोडून उजव्‍या बाजूच्‍या वर्गात आल्‍यास तुमच्‍या जीवनातील उत्‍पन्‍नाचा ग्राफ चढता अथवा वाढता असा असेलः

Earn with your Mind, Not your Time,
you will Run out of Time .

 
तर चला मग ह्या पुस्‍तकातील महत्‍वाचे धडे आपण शिकू...

 धडा पहिलाः चौकट बदलणे (Changing Quadrants)

जगातील सर्वांत जास्‍त लोकं (E/S क्‍वाड्रंट) ह्या दोनच वर्गात का येतात?

कारण आपल्‍याला लहानापासूनच शाळा-विद्यालय-विद्यापीठातूनच तयार केलं जात असते-असे नकळतच शिकविले जाते.  तुम्‍ही कोणत्‍याही शाळा-महाविद्यालयात जाऊन बघू शकता, तुम्‍हाला हेच बिंबवले जाते की, तुम्‍ही एखाद्-दोन पदव्‍या घ्‍याल, ज्‍याआधारे तुम्‍हाला कोणती तरी नोकरी मिळेलच.  परंतू चौकटीच्‍या उजव्‍या बाजूच्‍या वर्गासाठी तुम्‍हाला कोणत्‍याही प्रकारची पदवी मिळत नाही, शिकविले जात नाही.  

आणि म्‍हणूनच यामध्‍ये तज्ञ होण्‍यासाठी तुम्‍हाला स्‍वयं-शिक्षण घ्‍यावे लागेल, स्‍वतःला प्रशिक्षित करावे लागेल.  कारण शाळा-महाविद्यालयासारखे तुम्‍हाला कोणीही हात धरून, मार्गदर्शन करणार नाही, त्‍यासाठी तुम्‍हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरू करावे लागेल. तुमच्‍या मानसिकतेत, दृष्‍टीकोनात बदल करावा लागेल.

Complete Change in Mindset

त्‍यासाठी तुम्‍हाला एक रंजक गोष्‍ट सांगावीशी वाटते, तुम्‍हाला एक चांगला व्‍यावसायिक किंवा एक चांगला गुंतवणूकदार बनन्‍यासाठी कोणतीही पदवी लागणार नाही.  परंतू तुम्‍हाला त्‍या व्‍यवसायिकासाठी किंवा गुंतवणूकदारासाठी त्‍यांच्‍याकडे काम करण्‍यासाठी (नोकरी) पदवीची आवश्‍यकता असते.

"Zero or No Degrees needed to become a Business or Investor but
You Need a Degree to work for Them"

ही ओळ परत वाचा व थोडावेळ विचार करून बघा.. 

 

तर वाचकांनो रॉबर्ट कियोसाकी यांच्‍यामते लोकांचं एकमेव कारण ज्‍यामुळे ते आपली चौकट बदलू शकत नाहीत, ते कारण म्‍हणजे त्‍यांची भीती... (Fear Rules Their Lives)

कारण चौकटीच्‍या डाव्‍याबाजूतील वर्गात (E/S क्‍वाड्रंट) तुमच्‍या उत्‍पन्‍नाचा तोटा होण्‍याची शक्‍यता खूप कमी असते, परंतू चौकटीच्‍या उजव्‍या बाजूतील वर्गात असे नसते, जर तुमचा व्‍यवसाय-उद्याग चालला नाही तर तुमचा संपूर्ण वेळ वाया जाईल आणि तुम्‍ही केलेल्‍या गुंतवणूकीने जर योग्‍य परतावा नाही दिला तर तुमच्‍या मेहनतीचे-श्रमाने कमावलेले पैसे वाया जातील.  आणि ह्याच भयामुळे, बरेचसे लोक जीवनभर ह्याच डाव्‍या बाजूतील (E/S क्‍वाड्रंट) वर्गात राहून जातात.

आणि मित्रांनो याचे अजूनही एक कारण आहे की, आपल्‍याला आपल्‍या शाळा-महाविद्यालयांमध्‍ये नेहमीच असे शिकविले जाते की, चूका कराल तर शिक्षा-दंड मिळेल, सर्वांसमोर अपमान होईल आणि यामुळेच आपण सर्वजण चूका करण्‍यापासून घाबरत असतो. परंतू लेखकाचे श्रीमंत वडील त्‍यांना असे समजावत होते की, जेंव्‍हा तुमचे पैसे  हरण्‍याचे भय आणि गुंतवणूकीमध्‍ये अयशस्‍वी होण्‍याचे भय वाढत असते तेंव्‍हा तुम्‍ही मोकाटपणे नोकरीच्‍या  सुरक्षिततेची निवड करत असता, आर्थिक सुरक्षिततेच्‍या ऐवजी. आणि एक सर्वसाधारण जीवन जगण्‍याची निवड करता, आणि तेही त्‍या नोकरीच्‍या दीर्घकालीन धोक्‍यांना समजल्‍याविनाच...

समजूतदार व्‍यक्‍ती हे जाणून असतात की, आयुष्‍यात जर धोका नाही पत्‍कारला तर संपूर्ण जीवनच धोक्‍याचे होऊन जाईल.. Life is Risky, Without Risk. यामुळेच तुम्‍हाला जीवनात धोका आणि धोकादायक यांतील फरक माहित असणे गरजेचे आहे. you should know the difference between Risk and Risky

व्‍यवसाय आणि गुंतवणूकीमध्‍ये थोडा-फार धोका किंवा जोखिम तर आहेच, परंतू ते नेहमीच धोकादायक नाही. तुम्‍हाला त्‍याबद्दल माहिती नाही हेच खरेतर धोकादायक आहे.  तुमच्‍याकडे गुंतवणूक करण्‍याविषयीची चुकीची माहिती आहे हेतर त्‍याहीपेक्षा अधिक धोकादायक आहे.

तुम्‍ही एक कर्ज अथवा देणी (Liability) खरेदी करत असता, (Asset) संपत्‍ती समजून…! हे त्‍याहीपेक्षा धोकादायक आहे.  तुम्‍ही एक निश्चित, न बदलणारी मानसिकता ठेवता, काही शिकत नसता, जेंव्‍हा तुम्‍हाला कोणी एखादा सल्‍ला देतो तेंव्‍हा तुम्‍ही त्‍याच्‍यासोबत सरळ वाद-विवाद करत असता ते तर सर्वांत जास्‍त धोकादायक आहे.

 

धडा दुसराः तुमचा आज, तुमचा उद्या ठरवतो...
(Your Today, decides tomorrow)

तुमचे दैनंदिन क्रिया ह्या खूप महत्‍वाच्‍या असतात. जसे की, तुम्‍ही जर दररोज जंक-फास्‍ट-फुड खात असाल तर तुम्‍हाला आश्‍चर्य नाही व्‍हायला पाहिजे जेंव्‍हा भविष्‍यात तुमचे आरोग्‍य बिघडेल...

मित्रांनो तुम्‍ही आज जे काही निर्णय घ्‍याल, त्‍याचे परिणाम तुम्‍हाला आजच दिसून येतील असे नाही. आणि जर आपण शाळा-महाविद्यालया बद्दल बालायचं म्‍हणजे परीक्षा दिल्‍यानंतर जवळपास ३० ते ४० दिवसांत आपल्‍याला आपला निकाल मिळत असतो. आपल्‍याला इन्‍सटंट रिजल्‍ट म्‍हणजेच तात्‍काळ निकालाची सवय आहे. परंतू ख-या जीवनात तुम्‍हाला परिणाम जाणवायला ३० वर्षेदेखिल लागू शकतात...

यासाठीच तुम्‍ही जेंव्‍हा कामावरून परत येता किंवा आठवड्याच्‍या शेवटी थोडे-फार थकलेले असता, तेंव्‍हा स्‍वतःचे फाजील लाड करून असे म्‍हणू शकता की, आज मी खूप श्रम-मेहनत केलेली आहे, आता आठवड्याच्‍या शेवटी मलाव पार्टी करायला पाहिजे, किंवा टि.व्‍ही.-इंटरनेटवर नेटफ्लीक्‍सवर एखादी आवडती मालिका पाहायला पाहिजे.  मी हे सर्वकाही करण्‍यास लायक आहे. (आठवडाभर काम केल्‍यामुळे...!)  

निःसंशय तुम्‍ही आराम करण्‍याच्‍या, वरील गोष्‍टी करण्‍यास पात्र आहात. परंतू जर का तुम्‍ही तुमचा संपूर्ण पैसा महिन्‍याच्‍या शेवटपर्यंत खर्च करत असाल, आणि अशी नोकरी करत आहात जी तुम्‍हाला आवडतही नाही, तर तुम्‍ही नेहमीसाठीच ह्या उंदरांच्‍या शर्यतीत-Rat-Race अडकून राहून जाल.  आधि हळूहळू तुम्‍हाल जास्‍त अवघड होऊन जाईल. तुम्‍हाला तुमच्‍या अशा सवयींना सोडणे आणि ह्या शर्यतीतून बाहेर पडणे, आणि अचानकपणे लोकांचा एक विशिष्‍ट वय होऊन जातं आणि त्‍यांची आर्थिक स्थिती खराब होत असताना दिसत असते तेव्‍हा ते थेट एखादा आडमार्ग शोधत बसतात. 

त्‍यांना रात्रीतूनच श्रीमंत व्‍हायचं असते, त्‍यासाठीच मग ते इकडे तिकडे एखादी पैसा-दुप्‍पट करणा-या योजना शोधत असतात, शेअर बाजार-भांडवली बाजारात- नफा होण्‍यासाठीची एखादी क्‍लृप्‍ती-युक्‍ती (Tips & Tricks)  शोधत असतात ज्‍याद्वारे त्‍यांना कमी गुंतवणूकीत व कमी वेळेत अधिक परतावा व जास्‍त फायदा होईल.   

परंतू हे सगळं त्‍यांच्‍यासाठी काहीच कामाचं नाही, फायद्याचं नाही. कारण जर तुम्‍ही खरोखरच आर्थिक सुरक्षितता आणि आर्थिक स्‍वतंत्र होऊ ईच्‍छीता तेंव्‍हा तुम्‍हाला फक्‍त बाहेरील गोष्‍टीच नाही तर तुमच्‍या आतील मानसिकतेला देखील सुधारावे लागेल. आणि  मित्रांना यामध्‍ये कोणतेही आडमार्ग नाही. 

तुम्‍हाला तुमच्‍यामध्‍ये एक दीर्घकालीन विचारधारा विकसित करावी लागेल. लेखक आपल्‍याला येथे एका संशोधनाद्वारे एक महत्‍वाचा मुद्दा सिद्ध करून दाखवू ईच्छित आहेत आणि त्‍या गोष्‍टीला तुम्‍हीदेखिल शंभर टक्‍के सहमत असाल अशी अपेक्षा आहे.

जी लोकं अत्‍यंत गरिबीतून वर येतात, अत्‍यंत हलाखीच्‍या परिस्थितून आपल्‍या बळावर श्रीमंत बनतात आणि श्रीमंत राहतात अशांमध्‍ये पुढील तीन गुण असतातचः

  • Long term Thinking, Planning
    ते नेहमीच दीर्घकालीन विचार करतात आणि दीर्घकालीन योजनादेखिल बनवतात
     
  • Believe in Delayed Gratification, Sacrifice to Instant pleasures for long term happiness
    ते विलंबित आनंदावर विश्‍वास ठेवतात
    , दीघर्कालीन भविष्‍यकाळासाठी तात्‍काळ सुख-आनंदाचा त्‍याग करत असतात.
  •  Use Power of Compounding for them
    आपल्‍या फायद्यासाठी ते चक्रवाढीच्‍या शक्‍तीचा उपयोग करून घेतात

    (#Read more about-power of compounding चक्रवाढ नियम-अधिक वाचा... )

तर दुसरीकडे ज्‍या व्‍यक्‍ती अयशस्‍वी असतात किंवा अत्‍यंत श्रीमंत धनाढ्य कुटूंबातून असूनही गरीब बनतात, यांच्‍यामध्‍ये तीन गोष्‍टी समान असतातः 

  • Thinks short term
    कमी कालावधीसाठी विचार करत असतात
    , भविष्‍याबद्दल त्‍यांना काहीही देणं-घेणं नसतं
     
  • Instant Gratification
    ते नेहमीच आपल्‍या प्रत्‍येक ईच्‍छेला पूर्ण करत असतात
    जसे
    - त्‍यांना जर एखादी नवी कोरी गाडी घ्‍यायची ईच्‍छा असेल तर ते विकत घेतात
    , पैसा जर नसेल तर कर्जावर घेतात  
    तिसरी महत्‍वाची गोष्‍ट आणि ती म्‍हणजे 
  • Abuse power of compounding
    ते चक्रवाढीच्‍या शक्‍तीचा कर्ज घेऊन गैरवापर करतात त्‍या शक्‍तीच्‍या विरोधात जाऊन.

 

धडा तिसराः नोकरीला तुमचा वापर करू देऊ नका, नोकरीचा वापर करा..  

(USE THE JOB, DON’T LET THE JOB USE YOU)

लेखक असे म्‍हणतात की, तुम्‍हाला एखादी चांगला फायदा देणारी, सुरक्षित नोकरी शोधायची गरज नाही. कारण सुरक्षित नोकरी नावाची गोष्‍ट आजच्‍या तारखेत नसतेच.  आणि सर्वांत महत्‍वाची गोष्‍ट ही आहे की, नोकरीची सुरक्षितता आपल्‍या हातातच नसते. आपल्‍या हातात असते ती आर्थिक सुरक्षितता...

तर आपल्‍याला अशा गोष्‍टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे जी आपल्‍या थेट नियंत्रणात आहे.  जर तुम्‍ही एखादे नवयुवक असाल तेंव्‍हा साहजिकच तुमच्‍याजवळ तेवढा पैसा नसेल गुंतवणूक करण्‍यासाठी. तेंव्‍हा तुम्‍ही सरळ एखादे उद्योग-व्‍यवसाय सुरू करू शकता.  मग भलेही ते छोटे-मोठे का असेना.. अयशस्‍वी का होईना..  तुम्‍ही त्‍यामधून आवश्‍यच काहीतरी शिकाल हे नक्‍की... 

A journey of a 1000 miles, begins with a single step

A journey of a 1000 miles begins with a Baby steps 

आणि जरका तुम्‍ही तेही करू शकत नसाल तर, तुम्‍ही तुमच्‍या नोकरीचा वापर करू शकता आर्थिक स्‍वातंत्र्यासाठी.  कंपनीसाठी-नोकरीसाठी तुम्‍हाला स्‍वतःला वापर होऊ द्यायचं नाही. यासाठी तुम्‍ही नोकरीला एखाद्या भाड्याने घेतलेल्‍या घरासारखे समजा, ज्‍यामध्‍ये तुम्‍ही देखाव्‍यासाठी व शोभेसाठी तेवढाकाही खर्च करणार नाही. तुम्‍हाला नोकरीला सोडून जायचंच आहे. आणि तुम्‍हाला स्‍वतःचं एक घर बनवायचं आहे.  ज्‍यामध्‍ये तुम्‍ही एकेक वीट जोडून भिंती उभ्‍या कराल, छत बनवाल किंवा जेंव्‍हा मन करेल तेव्‍हा त्‍याला शोभिवंत बनवाल.  

म्‍हणजे एसआयपी (SIP) द्वारे म्‍यूच्‍यूअल फंड मध्‍ये गुंतवणूक कराल, तर ते तुमचं घर असेल आणि ती गोष्‍ट तुमच्‍या थेट नियंत्रणात आहे. आणि हे काम नेहमीच हळूहळू होत असते. Rome was not built in a day. एक चांगले घर, इमारत बनविण्‍यासाठी वेळ तर लागतच असतो.

तुम्‍ही ही म्‍हण तर ऐकलीच असेल... A journey of a 1000 miles, begins with a single step.. परंतू लेखक येथे म्‍हणतात... A journey of a 1000 miles begins with a Baby steps.

चालण्‍याच्‍या प्रयत्‍नासाठी अगदी एखाद्या लहान बालकासारखे गुंतवणूकीकडे किंवा उद्योग-व्‍यवसायाकडे पडणारे तुमचे पहिले पाऊल साहजिकच खूपजास्‍त अडखळणारे-थरथरणारे असेल, कदाचित तुम्‍ही खाली पडालसुद्धा म्‍हणजेच तोटा होऊ शकतो.  परंतू ज्‍याप्रकारे चालण्‍याच्‍या सरावासाठी एक लहान मूल प्रयत्‍न सोडत नाही, तर तुम्‍हालासुद्धा मध्‍येच सोडायचं नाहीये.

 

धडा चौथाः खरी संपत्‍ती (True Wealth)

मित्रांनो, श्रीमंत दिसण्‍यामध्‍ये आणि श्रीमंत असण्‍यामध्‍ये खूप जास्‍त फरक असतो.  ब-याच लोकांकडे दाखविण्‍यासाठी खूपसा-या गोष्‍टी असतात. जसे- उत्‍तम गाडी, मोठे घर इत्‍यादी. परंतू अशा लोकांच्‍या संपत्‍तीच्‍या रकान्‍यात काहीच नसते, शून्‍य असते. कारण ह्या सर्व गोष्‍टी त्‍यांनी कर्जावर घेतलेल्‍या असतात. ज्‍यासाठी त्‍यांना मुद्दलाबरोबरच व्‍याजदेखिल भरावा लागत असतो.  

यासाठीच जर तुम्‍हाला तुमच्‍या ख-या संपत्‍तीला मोजायचे असेल तर, तुम्‍हाला स्‍वतःशी असे प्रश्‍न विचारायला पाहिजे की, कोणालाही मदत मागण्‍याआधी तुम्‍ही तुमचे उत्‍पन्‍न बंद झाल्‍यानंतर, किती वर्षे जगाल?

आणि म्‍हणूनच लेखक पुस्‍तकात म्‍हणतात,

"True Wealth is the number of days you can survive without physically working and still maintain your standard of living. (maintaining your lifestyle)"

असेही असू शकते की लोकं दिसायला श्रीमंत असतील, मोठे घर आहे, मोठी गाडी आहे आणि उंची-महागडे कपडे आहेत, परंतू ह्या सर्व गोष्‍टी खरेदी करण्‍याच्‍या नादात त्‍यांना कोणतीही बचत केली नाही आणि त्‍यांच्‍या बॅंक खात्‍यात कोणत्‍याही प्रकारची बचत नाहीये, तर दिसायला ते श्रीमंत अवश्‍य दिसतील, परंतू त्‍यांना ही गोष्‍ट समजायला पाहिजे की, आपले खर्च हे नेहमीच राहणार आहेत, आयुष्‍यभर, परंतू आपले उत्‍पन्‍न हे तात्‍पुरती, हंगामी असते.  जोपर्यंत तुम्‍ही निरोगी, काम करण्‍या लायकीचे असता तोपपर्यंतच आपले उत्‍पन्‍न असते. 

तर ह्यासाठीच जर तुम्‍हाला खरोखरच श्रीमंत व्‍हायचे असेल, तर तुम्‍हाला लवकरात लवकर चौकटीच्‍या डाव्‍या बाजूने उजव्‍या बाजूकडे जावे लागेल, स्‍थलांतर करावे लागेल.  आणि तुम्‍ही चौकटीच्‍या डाव्‍या बाजूचा उपयोग करू शकता उजव्‍या बाजूच्‍या वर्गात स्थिरावण्‍यासाठी, जाण्‍यासाठी.

शेवटी येथे एकच गोष्‍ट म्‍हणावीशी वाटते, आणि ती म्‍हणजे,

तुम्‍ही किती पैसा कमावता ही गोष्‍ट तेवढी महत्‍वाची नाही, तुम्‍ही दिवसभरात किती श्रम-मेहनत कराल हेदखिल कदाचित तेवढं महत्‍वाचं नसते, परंतू तुम्‍ही तुमच्‍या वेळेला कसे खर्च करता, आणि किती उत्‍पन्‍न आपल्‍या स्‍वतःसाठी ठेवता (बचत) आणि तो साठवलेला पैसा तुमच्‍यासाठी किती श्रम-मेहनत करतो ते अधिक महत्‍वाचे आहे.  

  • Its not how much you earn, its not how hard you work,
  • Who you do with, how you do it,
  • How much you keep for yourself
  • And how hard it works for you.. that’s matters…!

 #रिच डॅड्स #कॅशफ्लो क्‍वाड्रंट-गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम #रॉबर्ट टी. कियोसाकी #पुस्‍तक सारांश- मराठी

 कॅशफ्लो क्‍वाड्रंट-गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम-
👉मराठी पुस्‍तक सारांश- भाग-२


👉रॉबर्ट टी. कियोसाकी लिखित रिच डॅड पुस्‍तक मालिका: 

 1.  रिच डॅड-पुअर डॅड- मराठी पुस्‍तक सारांश

२.  रिच किड स्‍मार्ट किड- मराठी पुस्‍तक सारांश 

३. रिच डॅड्स गाईड टू इन्‍वेस्‍टींग- पुस्‍तक सारांश 

४. रिच डॅड्स-कॅशफ्लो क्‍वाड्रंट-गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम- भाग-२
 
ई-वाचनालय | www.evachnalay.in 

 
👉☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) संकेतस्‍थवरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तके वाचन कराः

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive