The Power of Habit by Charles Duhigg- Book Summary in Marathi- Part- 1 | हॅबिट-सवयीः मराठी अनुवाद सारांश

 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) 



The Power of
HABIT
Why We Do What We Do in Life and Business
"
by
Charles  Duhigg

Book Summary in Marathi- Part-1

द पावर ऑफ
हॅबिट
आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे

लेखक
चार्ल्‍स डुहिग

मराठी अनुवाद
पुस्‍तक सारांश

भाग-१

 

 ___________________________________________________________________________________

The Power of Habit by Charles Duhigg
Book Summary in Marathi- Part- 1

द पॉवर ऑफ हॅबिट- लेखक चार्ल्‍स डुहिग
मराठी अनुवाद पुस्‍तक सारांश भाग-१

 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
 ___________________________________________________________________________________

 

चार्ल्स डुहीग
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

 


 
 
  • द पॉवर ऑफ हॅबिटः आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे न्युयॉर्क टाईम्सचे अर्थविषयक पारितोषिकप्राप्त पत्रकार चार्ल्स डुहीग, हे त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकातून आपल्याला सवयींसंबधीच्या आश्चर्यकारक आणि चित्तथरारक वैज्ञानिक जगताची सफर घडवून आणतात.
  •  काही व्यक्तींना आणि कंपन्यांना स्वतःला बदलण्यासाठी अनेक वर्षे का प्रयत्न करावे लागतात, का झगडावे लागते, तर त्याच वेळी काही मात्र, स्वतःमध्ये एका रात्रीत बदल घडवून आणतात हे कसे याचा ते शोध या पुस्तकामध्ये घेतात. 

 

 

 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) 



👉आपल्या सवयी कसे कार्य करतात आणि त्यांचा आपल्या मेंदूमध्ये नेमका कोठे उगम होतो याचा शोध घेण्यासाठी, मेंदू वैज्ञनिकांचे चाललेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी ते विविध प्रयोगशाळांना भेटी देतात आणि ऑलिंम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्फ, स्टार बक्सचे मुख्याधिकारी हॉवर्ड शुल्झ आणि नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या यशामध्ये सवयीचा वाटा किती महत्त्वाचा होता याचा ते रहस्यभेद करतात. 

 👉त्या सर्वांचा परिपाक म्हणजे हे लक्षवेधी कथन आणि सशक्त शोधः व्यायामामध्ये नियमितपणा आणण्यासाठी, वजन घटवण्यासाठी हुशार मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी, कार्यक्षमतेमध्ये वृद्धी करण्यासाठी, अद्वितीय आस्थापनांची उभारणी इत्यादी करण्यासाठी, सवयी काय व कशा उपयोगी पडू शकतात. याचे मर्म जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

  

 

 "या नव्याने विकसित झालेल्या शास्त्राचा उपयोग करून आपण आपल्या व्यवसायात, आपल्या समाजात आणि आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो.

लालित्यपूर्ण सुबोधता असलेले, प्रभावी विचार प्रवर्तक, चौकस आणि उपयुक्त."

-जिम कॉलिन्स

 

"बौद्धिक गांभिर्य आणि आपल्या वाईट सवयी सोडण्याचे मार्ग, याबद्दलचा व्यवहार्य सल्ला याचा संतुलित मेळ राखणारे, पहिल्या दर्जाचे पुस्तक.  अक्षरशः संमोहित करणारे".

- द इकॉनॉमिस्ट

 

👉आज सकाळी जेंव्‍हा तुम्‍ही जागे झालात तेंव्‍हा तुम्‍ही सर्वांत आधी काय केलं? 

👉पटकन अंघोळीला निघालात? ई-मेल तपासलीत? 

👉तुमचा स्‍मार्ट फोन उचलून विविध सामाजिक माध्‍यमांचे ''नोटिफिकेशन्‍स चेक'' केलात? किंवा 

👉स्‍वयंपाकघरातील वट्ट्यावरील "फास्‍ट-फुड" उचलून तोंडात घातला? 

👉तुम्‍ही अंघोळीच्‍या अगोदर ब्रश केलात की नंतर?  

👉कामावर जाताना कोणत्‍या मार्गाने गाडी चालवित गेलात? 

👉जेंव्‍हा तुम्‍ही घरी परत आलाता तेंव्‍हा तुम्‍ही काय घातलं? 

👉स्‍वेटर, बनियान किंवा ट्रॅकसूट घालून धावायला निघालात? 

👉नाहीतर प्‍यायला ग्‍लास घेऊन आपल्‍या अर्धांगिनीसमोर सरळ जेवायलाच बसलात...!? 

विल्‍यम जेम्‍स यांनी १८९२ साली लिहिलं होतं आपले संपूर्ण जिवन जोपर्यंत हे एका निश्चित आकारामध्‍ये आहे  तोपर्यंत ते सवयींचा गुच्‍छा आहे.  दर दिवशी केलेली निवड आपल्‍याला विचारपुर्वक घेतलेले निर्णयांचे परिणाम वाटू शकतात, परंतू ते असे नाहीत.  त्‍या सवयी आहेत.  आणि खरंतर प्रत्‍येक सवयीचा स्‍वतःमध्‍येच काही अर्थही नसतो.

काळानुसार आपण कोणत्‍या जेवणासाठी आज्ञा देतो, बचत करत असतो किंवा खर्च करत असतो, कित्‍येकजण नेहमीच व्‍यायाम करतात आणि ज्‍याप्रकारे आपण आपल्‍या विचारांना आणि कामाच्‍या नित्‍यक्रमाला सजवतो यांचा आपल्‍या स्‍वास्‍थ्‍य, उत्‍पादकता किंवा कार्यक्षमतेवर, आर्थिक संरक्षण आणि प्रसन्‍नतेवर अत्‍याधिक प्रभाव पडत असतो

 

२००६ साली प्रकाशित केले गेलेल्‍या ड्यूक विद्यापीठातील एका शोधपत्रकामध्‍ये असे आढळले की, लोकांद्वारे केले गेलेले ४०% चाळीस टक्‍के कार्य वास्‍तवात "निर्णय" नव्‍हते तर त्‍या "सवयी" होत्‍या.   

  ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

अरिस्‍टॉटल पासून ते ओपेरा पर्यंत असंख्‍य इतरांसारखे जेम्‍स यांनी आपले अधिकांश जिवन हे समजण्‍यात व्‍यतित केलं की, शेवटी सवयी का होतात?  परंतू  केवळ दोनच दशकांमध्‍ये वैज्ञानिक आणि विक्रेते यांनी वास्‍तविक हे समजणे सुरू केले की सवयी कशा कार्य करतात?  आणि यापेक्षाही अधिक महत्‍वपूर्ण  त्‍या बदलतात कशा?  

वेळेच्‍या कोण्‍या एका क्षणी आपण सर्वांनी विचारपूर्वक निश्‍चय केलं होतं की किती जेवण करणार आहोत? किंवा जेंव्‍हा आपण कार्यालयात पाहोचू तेंव्‍हा लक्ष केंद्रित कसे करणार?  दारू किंवा इतर पेय किती वेळा प्‍यायचं?  आणि सकाळी किंवा सायंकाळी पळायला केंव्‍हा जायचं?  तेंव्‍हा आपण निवड करणे बंद करुन टाकलं आणि व्‍यवहार सहज-सोपं झालं.   हा आपल्‍या मज्‍जासंस्‍थेचा स्‍वाभाविक परिणाम आहे आणि याला समजून की हे कसे होत असते तुम्‍हाला जे काही आवडते त्या आकृतीबंधाला किंवा त्‍या गोष्‍टीला तुम्‍ही पुन्‍हा बनवू शकता. 


सवयींचा सापळाः सवयी कशा कार्य करतात?

ज्‍या इमारतीमध्‍ये एमआयटी म्‍हणजेच मॅसाच्‍युसेट्स इन्‍स्‍टीट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्‍या मेंदू आणि आकलनात्‍मक/संज्ञात्‍मक शास्‍त्राचे विभाग आहेत त्‍यात प्रयोगशाळाही आहेत ज्‍या असेच, सहजच डोकावून पाहणा-यांना सर्जिकल थिएटर म्‍हणजेच शस्‍त्रविद्येसंबंधीच्‍या अथवा शल्‍यचिकित्‍सा सभागृहाचे बालरुप वाटू शकते.

त्‍यातील यांत्रिक बाजूंमध्‍ये (Robotic Arms-यांत्रिक हात) लागलेली एक चतुर्थांश पेक्षाही लहान लहान स्‍कॅल्‍पल्‍स किंवा शस्त्रक्रियाविशारद वापरतात तो चाकू/सुरा, छिद्र पाडण्‍याची यंत्रे, छोट्या करवती आहेत आणि शस्‍त्रक्रियेसाठी वापरात येणार टेबलसुद्धा छोटीच आहेत जसे लहान मुलांच्‍या आकाराचे शल्‍यविशारदांसाठी किंवा खेळण्‍यांच्‍या आकारात बनविले गेले आहेत.  ह्या प्रयोगशाळांमध्‍ये बेशुद्ध करण्‍यात आलेल्‍या उंदरांच्‍या कवट्या कापल्‍या जातात आणि त्‍यांच्‍याआत अत्‍यंत सुक्ष्‍म संवेदके-मायक्रो सेंसरर्स लावली जात असतात जी त्‍यांच्‍या मेंदूमधील होणा-या लहानातल्‍या लहान बदलांची नोंद घेतात.  

ह्या प्रयोगशाळा सवयी बनविण्‍याच्‍या शास्‍त्रामध्‍ये चेताविज्ञानाचे केंद्र बनलेली आहेत आणि त्‍यामध्‍ये केले जाणारे प्रयोग यांची अशी व्‍याख्‍या करतात,कीः आम्‍ही दैनंदिन जीवनात आवश्‍यक आचरणांचा विकास कसे करतो..!  प्रयोगशाळेतील उंदीर आपल्‍या मेंदूमध्‍ये चालणा-या अशा जटिल बाबींवर प्रकाश टाकतात जेंव्‍हा आपण आपले दात घासत असतो किंवा एखादे वाहन चालविणे यासारखे साधारण कार्य करत असतो. 

 

 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)


कवटीच्‍या केंद्राकडे गोल्‍फ चेंडूच्‍या आकाराचा मज्‍जापेशींच्‍या कोशिका किंवा उतींचा गोळा-पुंजका असतो ज्‍यांच्‍या सारखाच पुंजका-पिंड किंवा गोळा तुम्‍ही मासे, सरिसृप जीव किंवा स्‍तनधारी जीवांच्‍या डोक्‍यामध्‍ये-मेंदूमध्‍ये पाहू शकता.  ह्या अंडाकृती कोशिकापुंज किंवा उतींचा गोळा दुसरे काही नसून बेसल गॅंग्‍लीया आहे. (Basal Ganglion)  ज्‍याला वैज्ञानिक कित्‍येक वर्षांपासून चांगल्‍यारितीने समजू शकले नव्‍हते, केवळ त्‍या संदेहाखेरीज की पार्किन्‍सन्‍स सारख्‍या आजरांमध्‍ये याची काहीतरी भुमिका असते.

१९९० च्‍या दशकाच्‍या प्रारंभीला एमआयटीच्‍या शोधकर्त्यांनी विचार करायला सुरूवात केली की, बेसल गॅंग्‍लीया  सवयींसाठीसुद्धा महत्‍वपूर्ण असू शकतो. 

त्‍यांनी बेसल गॅंग्‍लीया जखमी झालेल्‍या प्राण्‍यांवर लक्ष केंद्रित केलं, त्‍यांना चक्रव्‍यवहातून पळायला लावून तसेच अन्‍नाचे डबे उघडणे इत्‍यादी सारख्‍या गोष्‍टींना लक्षात ठेवण्‍यात अडचणी येत आहेत.  त्‍यांनी नवीन सूक्ष्‍मतंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोग करण्‍याचा निर्णय घेतला.  ज्‍यांद्वारे ते त्‍या सुक्ष्‍म विवरणांचा निरिक्षण करू शकत होते जे डझनभर दैनंदिन कार्ये करत असताना उंदरांच्‍या मेंदुमध्‍ये चालत होती आणि अंतिमतः प्रत्‍येक प्राण्‍याला एका T-आकाराच्‍या चक्रव्‍यूहामध्‍ये ठेवण्‍यात आले, ज्‍याच्‍या एका टोकावर चॉकलेट ठेवण्‍यात आली. चक्रव्‍युहाचा सांगाडा अशापद्धतीने बनविण्‍यात आला होता ज्‍याद्वारे उंदराचे स्‍थान एका विभाजकाच्‍या मागे होते जे एका जोरदार क्‍लीक-असा आवाज केल्‍यानंतर उघडल्‍या जात होते.

सुरुवातील जेव्‍हा ते उंदीर ^क्‍लीक^-ची आवाज ऐकत असे तेंव्‍हा विभाजकाला अदृष्‍य होत असताना पाहत असे, तेंव्‍हा साधारणतः केंद्रातील बोळींमधील कोप-यांना हुंगत होता आणि भिंतींना घुटमळत-ठेचकाळत पुढे-मागे फिरत बसत असे.  असे वाटत होते की त्‍याला चॉकलेटचा सुगंध मिळाला होता परंतू त्‍याला हे समजत नव्‍हते की त्‍याला शोधावे कसे?

जेंव्‍हा तो टी-(T) च्‍या शिर्षस्‍थळी पाहोत असे तेंव्‍हा तो चॉकलेटपासून दूर उजवीकळी वळत असे आणि तेंव्‍हा कधीकधी कोणत्‍याही प्रत्‍यक्ष कारणाव‍िना  थांबून डावीकडे निघून जात असे.  शेवटी अधिकांश प्राण्‍यांना बक्षिण मिळत असे.  परंतू त्‍यांच्‍या भटकण्‍यामध्‍ये कोणतेही प्रत्‍यक्ष कारण नव्‍हते.

असे वाटत होते की प्रत्‍येक उंदीर फावल्‍या वेळेत, काहीही विचार न करता बागडत होता. तरीही उंदरांच्‍या डोक्‍यांची पडताळणी एक वेगळीच कथा सांगत आहे.  जेंव्‍हा प्रत्‍येक प्राणी चक्रव्‍युहामध्‍ये भरकटत होते तेंव्‍हा त्‍यांचे मेंदू आणि विशेषतः त्‍यांचा बेसल गॅंग्‍लीया उतावीळपणाने कार्य करत होते.  

 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

प्रत्‍येकवेळी जेंव्‍हा एखादे उंदीर हवा हुंगत असे किंवा भींतीवर ठेचकाळत असे तेंव्‍हा त्‍यांचा मेंदू ह्या कार्यांना साठवत असे जसेकी तो प्रत्‍येक रंग, गंध, दृष्‍य आणि आवाजाचे पृथ्‍थकरण करत आहे. आपल्‍या पुर्ण वर्तणुकीदरम्‍यान उंदीर सूचना-माहितीवर प्रक्रिया करत होता. शेकडोवेळा एकाच मार्गावर चालत असताना त्‍याच्‍या मेंदूतील क्रिया कशा बदलत असतात याचे निरिक्षण करत असताना वैज्ञानिकांनी ह्या प्रयोगाची पुन्‍हःपुन्‍हा पुनरावृत्‍ती केली.  उंदरांनी हुंगने आणि चुकीचे वळण घेणे बंद केले.
 
हळू-हळू बदलांची एक श्रृंखला उदयास आली.  याच्‍या मोबदल्‍यात ते चक्रव्‍यूहातून होऊन वेगाने, अधिक वेगाने निघून जावू लागले आणि त्‍यांच्‍या मेंदूमध्‍ये काही अनपेक्षित असे घडले.   जस-जसे प्रत्‍येक उंदीर चक्रव्‍यूहातून मार्ग काढून निघणे शिकत गेले तस-तसे त्‍यांची मानसिक क्रिया कमी झाली.   जस-जसे मार्ग सहज होत गेले तस-तसे प्रत्‍येक उंदराने कमी, आणि अधिक कमी विचार करणे सुरू केले.  असे वाटत होते जसे की अगोदर उंदराने कित्‍येकवेळा चक्रव्‍यूहातून मार्गांचा शोध घेतला.
 
तेंव्‍हा त्‍याच्‍या मेंदूला नवीन सूचना-माहितीला समजण्‍यासाठी आपली संपुर्ण शक्‍ती खर्चून कार्य करावे लागले असते.  परंतू काही दिवसांनंतर त्‍याच एका मार्गावर चालत जात असताना उंदराला भिंताला घासणे-ठेचकाळणे किंवा हवा हुंगण्‍याची आता अधिक आवश्‍यकता राहिली नाही.   आणि ह्यामुळेच घासणे किंवा ठेचकाळणे आणि हुंगण्‍यासंबंधीत मेंदूतील क्रिया समाप्‍त झाली.

त्‍याला वळण्‍यासाठी दिशा निवडण्‍याच्‍या कराराची आवश्‍यकता राहिली नाही त्‍यामुळे मेंदूतील निर्णय घेणारे केंद्र शांत झाले.  उंदराने चक्रव्‍यूहातून होऊन पळत निघून जाणे अशा रितीने आत्‍मसात केले होते की त्‍याला विचार करण्‍याची काही आवश्‍यकताच राहिली नव्‍हती.  परंतू मेंदूच्‍या निरिक्षणांनी सूचित केले की आत्‍मसात करणे बेसल गॅंग्‍लीया वर आधारित होते.  जसे-जसे उंदराने आपल्‍या पळण्‍याची गती वाढवत नेली तेंव्‍हा असे वाटत होते की हे लहान मज्‍जासंस्‍थेचे सांगाडे आपणच झालेलो आहोत आणि मेंदू कमीत-कमी कार्य करत आहे.

    पॅटर्न्स म्‍हणजेच आकृतीबंध लक्षात ठेवणे त्‍यांच्‍या कार्य करण्‍याचा कें‍द्रस्‍थानी बेसल गॅंग्‍लीया होता.  दुस-या शब्‍दांत सांगायचे तर जेंव्‍हा उर्वरित मेंदू झोपायला जात असे तेंव्‍हा ''बेसल गॅंग्‍लीया सवयींना संग्रह करत असे.'' 

 

सहज नित्‍यक्रमः  

अशी प्रक्रिया ज्‍यामध्‍ये मेंदू आपण केलेल्‍या क्रियांच्‍या एखाद्या शृंखलेला सहज नित्‍यक्रमामध्‍ये बदलतो, तो चमकीनच्‍या रूपात ओळखला जातो आणि सवयी कशा बनतात? याची पाळेमुळे ह्यामध्‍ये असतात. 

आचरण तुकडेः शेकडोच नाही तर डझनभरआहेत, ज्‍यांच्‍यावर आपण दररोज निर्भर करत असतो. यांमध्‍ये काही सरल आहेत-

तोंडात ब्रश टाकण्‍याअगोदर तुम्‍ही ब्रशवर टुथपेस्‍ट सहजरित्‍या लावत असता.   असेच काही जसे- कपडे घालणे झाले, किंवा मुलांसाठी न्‍याहरी बनवने झाले अधिक जटिल आहे.  वैज्ञानिक असे म्‍हणतात की सवयी उभारून येत असतात.  कारण आपला मेंदू प्रयास करण्‍यापासून स्‍वतःचा बचाव करण्‍याचे उपाय सतत शोधत असतो.  जर मेंदूला त्‍याच्‍या स्‍वतःवर सोडून दिले तर आपला मेंदू जवळजवळ कोणत्‍याही नित्‍यक्रमाला सवयीमध्‍ये ढाळण्‍याचा प्रयत्‍न करेल.  कारण सवयी आपल्‍या मेंदूला अधिकतरवेळा भरकटण्‍याची परवानगी देत नाहीत.  प्रयास करण्‍यापासून बचाव करण्‍याची प्रवृत्‍ती खूपच फायद्याची आहे.   लाभदायक आहे.  

एक कार्यक्षम मेंदू आपल्‍याला फेरफटका मारणे किंवा काय खाऊ? यांचे चयन करणे यांसारख्‍या मूलभूत आचरणांच्‍याविषयी सततपणे विचार करणे बंद करण्‍याची परवानगी देत असतो.  ज्‍यामुळे आपण भाले, जलसिंचन व्‍यवस्‍था आणि शेवटी विमाने किंवा व्हिडिओ गेम्‍स् यांचे आविष्‍कार करण्‍यामध्‍ये मानसिक उर्जा समर्पित करू शकू.  

आपल्‍या मेंदूमध्‍ये होत असलेली ही प्रक्रिया एखाद्या तीन थांब्‍यांचा सापळा आहे. यांमध्‍ये पहिला आहे CUE हा एक ट्रिगर म्‍हणजेच संकेत आहे.  जो तुमच्‍या मेंदूला सहज मोडमध्‍ये जाण्‍यासाठी सांगतो आणि तेंव्‍हा कोणत्‍या सवयीचा वापर करायला पाहिजे.  तेंव्‍हा हे एक नित्‍यक्रम आहे जे एक शारिरीक आणि मानसिक किंवा भावनात्‍मक असू शकतो.   शेवटी एक रिर्वार्ड म्‍हणजेच बक्षिस आहे, जो तुमच्‍या मेंदूला हे समजण्‍यास सहाय्यता करत असतो की भविष्‍यामध्‍ये कोणता सापळा लक्षात ठेवण्‍यालायकीचा आहे.

वेळेसोबत हा सापळा क्‍यू-रूटीन-रिवॉर्ड (CUE-Routine-Reward)  संकेत-नित्‍यक्रम-बक्षिस अधिक सहज होऊन जातो. क्‍यू आणि रिवॉर्ड म्‍हणजेच संकेत आणि बक्षिस आपापसांत गुंतून जातात, जोपर्यंत अपेक्षा आणि तळमळ अथवा  तल्‍लफ यांचा एक शक्‍तीशाली भाव उभारून येत नाही.  अंतिमतः एक सवय जन्‍म घेत असते.  

सवयी ह्या काही विधात्‍याची विधाने नाहीत किंवा सवयी विधीलिखित नसतात, सवयींना कानाडोळापण करता येऊ शकतो.  त्‍यांना आपण नजरअंदारजदेखिल करू शकतो.  त्‍यांना बदलू शकतो किंवा उलटसुद्धा करू शकतो.  परंतू हे कारण की ज्‍यासाठी सवयीच्‍या सापळ्याचा आविष्‍कार एवढा महत्‍वपूर्ण आहे, ते हे आहे की मूलभूत सत्‍यावरून पडदा हटवत असते.  जेंव्‍हा एखादी सवय उभारून येते तेंव्‍हा मेंदू निर्णय घेण्‍यामध्‍ये भाग घेणे पुर्णपणे बंद करत असतो.  तो तेवढे परिश्रम घेणे बंद करतो किंवा तुमच्‍या एकाग्रतेला दुस-या कार्यावर वळवतो, यासाठी तुम्‍ही एखाद्या सवयीसोबत जाणून-बुजुन, हेतूपूर्वक लढाई करत नाही जोपर्यंत तुम्‍ही नवीन दैनंदिन कार्य किंवा नित्‍यक्रम शोधत नाही तापर्यंत हे पॅटर्न अथवा आकृतीबंध असाच सहजतेने खुलेल.  

एमआयटी च्‍या एक वैज्ञानिक (Ann Martin Graybiel) एनन् ग्रेबीएल यांच्‍या नुसार ज्‍या बेसल गॅंग्‍लीयाच्‍या प्रयोगांचे निरिक्षण करत होत्‍या त्‍या म्‍हणतात-

 

 

 

''सवयी ह्या वास्‍तविकरित्‍या कधीही गायब-अदृश्‍य होत नाहीत,  त्‍या आपल्‍या मेंदूच्‍या आराखड्यात संकेतबद्ध (encoded) होऊन जातात. " -एनन् ग्रेबीएल


☯ ई-वाचनालय  |  www.evachnalay.in

खरी समस्‍या तर ही आहे की तुमचा मेंदू चांगल्‍या आणि वाईट सवयींमध्‍ये अंतर किंवा फरक सांगू शकत नाही, यामुळे जर तुमची सवय वाईट आहे तर तो तेथे योग्‍यत्‍या क्‍यू आणि रिवॉर्डस् ची प्रतिक्षा करत नेहमी घात लावून बसलेला राहतो. 

सवयींच्‍या सापळ्याविना दैनंदिन जीवनातील अल्‍पशा गोष्‍टींना घाबरून आपले मेंदू बंद होऊन जातील. 


तीव्र उत्‍कंठा अथवा अतिउत्‍सुकता (तल्‍लफ/लालसा) असलेला मेंदू नवीन सवयी कशा बनवतो?

१९-व्‍या शतकाच्‍या प्रारंभी एकेदिवशी क्‍लाऊडसीन हॉपकीन्‍स नावाचे एक प्रख्‍यात अमेरिकेतील एका कार्यकारी अधिका-याजवळ त्‍यांचा एक जुना मित्र व्‍यवसायाची एक कल्‍पना घेऊन आला.  त्‍या मित्रांने त्‍यांना सांगितले की त्‍याने एका अद्भुत उत्‍पादनाचं आविष्‍कार केलं होतं आणि तो पुर्णपणे आश्‍वस्‍त होता की तो (Product) उत्‍पाद खूप चालेल.  ते दुसरे काही नसून एक पुदीन्‍याची चव आणि फेसाळ मिश्रण असलेला एक ''टूथपेस्‍ट'' होतं ज्‍याचं नाव त्‍याने ''पेप्‍सोडेंट'' (Pepsodent) ठेवलं होतं.

त्‍याने असे म्‍हटले होते की हे उद्योग खूप मोठे होणारे होते, केवळ (जर) हॉपकीन्‍स एक राष्‍ट्रीय प्रचार-प्रसार करणा-या मोहिमेचा आराखडा बनविण्‍यात सहाय्यता करण्‍यास राजी होईल.  तेंव्‍हा हॉपकीन्‍स एका वेगाने विकसित होणा-या उद्योगाचा कर्णधार होता, ज्‍या क्षेत्राचा काही दशकं अगोदर कोणतंही अस्तित्‍वच नव्‍हतं-जाहिरात क्षेत्र किंवा विज्ञापन (Advertise).

यामध्‍ये पुर्वी अज्ञात असलेली उत्‍पादने क्‍वेकर ओट्स, गुडईयर टायर्स, व्‍हॅन कॅम्‍पस पोर्क & बीन्‍स, इत्‍यादींना घरोघरी नेहमीच दैनंदिन वापराच्‍या किंवा लागणा-या गरजू वस्‍तू/गोष्‍टींमध्‍ये बदलले होते आणि ह्या प्रक्रियेमध्‍ये त्‍याने स्‍वतःला एवढे धनवान बनवले होते की त्‍याची आत्‍मकथा- "माय लाईफ & एडव्‍हर्टायझींग"  ज्‍यामध्‍ये अधिक पैसा खर्च करण्‍यात येणा-या समस्‍यांचा वर्णन करण्‍यातच कित्‍येक प्रकरणे समर्पित केले गेले होते. 

हॉपकिन्‍सचे नियम-ही सर्वाधिक विक्री झालेली पुस्‍तक झाली होती. हॉपकिन्‍स चे नियम- हॉपकिन्‍सद्वारा स्‍वतः काढलेल्‍या त्‍या नियमांच्‍या श्रृंखलेसाठी प्रसिद्ध आहे, जे हे समजतात की ग्राहकांमध्‍ये नव्‍या सवयी कशा टाकता येईल.   हे नियम उद्योगांना रुपांतरित करित होते आणि अंततः मार्केटिंग म्‍हणजेच विपणन अथवा विक्री करणा-यांना, शिक्षण सुधारकांना, सार्वजनिक आरोग्‍य व्‍यावसायिकांना, राजनितीज्ञांना तथा मुख्‍य कार्यकारी अधिका-यांना यांच्‍यामध्‍ये परस्‍पर ज्ञान बनून गेले होते. जेंव्‍हा त्‍याचा मित्र हॉपकिन्‍सजवळ ''पेप्‍सोडेंट'' घेऊन आला तेंव्‍हा ह्या जाहिततज्ञाने केवळ हलकीशी रूची दाखविली होती.  

ह्यामध्‍ये काही कोणतेही रहस्‍य नव्‍हते की अमेरिकेन लोकांच्‍या दातांचे स्‍वास्‍थ्‍य अतिषय खालावलेल्‍या स्थितीत होते. जस-जसे हा देश धनवान होत गेला लोकांनी गोड-धोड आणि प्रक्रिया केलेल्‍या पदार्थांना मोठ्या प्रमाणात खरेदी करणे सुरू केले होते.  जेंव्‍हा अमेरिकेच्‍या सरकारने प्रथम विश्‍व युद्धासाठी सामान्‍य लोकांची सैन्‍यात-लष्‍करात भरती सुरू केली तेंव्‍हा एवढे रंग-बेरंगी दात सडलेले होते की अधिका-यांनी सांगितले की दातांची खराब अस्‍वच्‍छता सुरक्षेवर धोका होऊ शकते.

तरीही जसे की हॉपकिन्‍सला माहित होते की टुथपेस्‍ट विकणे पैशाच्‍या बाबतीत आत्‍महत्‍याच होती.  समस्‍या ही होती की, कोणी टुथपेस्‍ट खरेदी करत असेल यात शंकाच होती.  कारण ह्या देशाच्‍या दातांची समस्‍या असूनही विराळाच कोणीतरी दात घासत होता..!

 

हॉपकिन्‍सनं लिहिलं होतं- 

''मी शेवटी त्‍या जाहिरात मोहिमेचे उत्‍तरदायित्‍व घेण्‍यास तयार झालो, सहमत झालो.  जर तो साठ्याच्‍या एका गठ्ठ्यावर मला ६-महिन्‍यांचा पर्याय-अवसर देईल. ''

 

तो मित्र राजी झाला.  पैश्‍यांच्‍या बाबतीत हॉपकिन्‍सच्‍या जिवनातील हा सर्वांत समजदारीचा निर्णय ठरणार होता.  कराराच्‍या पाच वर्षांच्‍या आतच हॉपकिन्‍सने ''पेप्‍सोडेंट'' ला पृथ्‍वीवर सर्वाधिक मानले-विकले जाणा-या उत्‍पादनांपैकी एक बनवले होते.  आणि ह्या प्रक्रियेणे टुथ-ब्रश करण्‍याच्‍या सवयीला मदतच झाली, जो संपूर्ण अमेरिकेमध्‍ये आश्‍चर्यकारक वेगाने  फैलावले.  पेप्‍सोडेंटच्‍या पहिल्‍या मोहिमेच्‍या एका दशकानंतर मतदान सर्वेक्षण करणा-यांना असं आढळून आलं की दातांना ब्रश करणे अर्ध्‍याहून अधिक जनसंख्‍येचा रिवाज झाला होता. 

हॉपकिन्‍सने दात ब्रश करण्‍याच्‍या क्रियेला एका दैनंदिन कार्यासोबत जोडायला अथवा जमवायला सहाय्यता केली.  नंतर हॉपकिन्‍सने गर्वाने सांगितले की, त्‍याच्‍या यशाचे रहस्‍य हे आहे की, त्‍याने एका विशेष प्रकारच्‍या ''क्‍यू'' आणि ''रिवॉर्डचा'' शोध लावला होता.  जो एखाद्या विशेष सवयीसाठी इंधनपुरवठा करत होता.  ही इतकी शक्‍तीशाली (Alchemy) किमया होती की आजही व्हिडिओ गेम्‍स बनविणारे, अन्‍नप्रक्रिया कंपन्‍या, रूग्‍णालये आणि करोडो विक्रय कर्मचा-यांद्वारा जगभरात ह्याच्‍या मुलभूत सिद्धांचा उपयोग केला जातो.  

तेंव्‍हा सरतेशेवटी हॉपकिन्‍सने असं नेमकं केलंतरी काय होतं? 

तर त्‍याने एका तीव्रउत्‍कंठेची रचना केली होती आणि जसे की प्रकट होते ही तीव्र उत्‍कंठा अथवा लालसाच  सवयीच्‍या सापळ्याला शक्‍ती-उर्जा पुरवित असते. 


सवयीला शक्‍ती देण्‍यासाठी तीव्र उत्‍कंठेची (तल्‍लफ) रचनाः 

पेप्‍सोडेंटला विकण्‍यासाठी हॉपकिन्‍सला एका ट्रिगरची म्‍हणजेच संकेताची आवश्‍यकता होती जी टुथपेस्‍टच्‍या दैनिक उपयोगाला समर्थन करेल.  तेंव्‍हा तो एक डेंटल टेक्‍स्टबुक म्‍हणजेच दातांवरील पाठ्यपुस्‍तकच घेऊन बसला.  त्‍यानंतर त्‍याने असं लिहिलं होतं की, मला हे वाचने एकदम निरस वाटले, परंतूू मला कोण्‍या पुस्‍तकात दातांवर म्‍युसिअम ब्‍लॅक्‍स चे संदर्भ मिळाले ज्‍याला नंतर मी त्‍याचे द-फिल्‍म (पातळ आवरण) असे नामकरण केले.  याने मला एक आकर्षक कल्‍पना दिली.

मग मी असा निश्‍चय केला की त्‍या धुमिळ फिल्‍मशी निपटायला ह्या टुथपेस्‍टची जाहिरात सुंदर बनविणा-याच्‍या रूपात केलं जाईल.  दातांच्‍या फिल्‍मवर लक्ष केंद्रित करताना हॉपकिन्‍स ह्या तथ्‍थ्‍याला नजरअंदाज करत होता की तीच फिल्‍म लोकांच्‍या दातांना पांघरून ठेवते आणि ती लोकांना त्रास देईल असं दिसत नाही.  टुथपेस्‍ट फिल्‍मला हटविण्‍यात सहाय्यता करण्‍यात काहीच करत नव्‍हते.  वास्‍‍तविकरित्‍या त्‍या काळाच्‍या एका सुप्रसिद्ध मोठ्या दंतसंशोधकाने असे म्‍हटले होते की, सर्वच टुथपेस्‍ट विशेषतः पेप्‍सोडेंट बेकार आहेत.  

पेप्‍सोडेंटची लोकांना ''सवय'' लावणारी जाहिरात  
 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
 
परंतू ह्या गोष्‍टीने-घटनेने हॉपकिन्‍सला आपल्‍या शोधाला लाभ उचलण्‍यापासून थां‍बविले नाही.  त्‍याने निर्णय केलं की येथे एक "क्‍यू" म्‍हणजेच संकेत आहे जो एका सवयीला ट्रिगर-चेतवू करू शकतो.  लवकरच सगळीच नगरे पेप्‍सोडेंटच्‍या जाहिरातींनी भरून गेल्‍या.  ह्या जाहितीमध्‍ये दात विचकावून स्मितहास्‍य करणा-या सुंदरींना दाखवलं गेलं आणि लिहिण्‍यात आलं होतं की, "लक्ष द्या सगळीकडे किती सुंदर दात आहेत..!" करोडो व्‍यक्‍ती दातांना स्‍वच्‍छ करण्‍यासाठी एका नव्‍या पद्धतीचा उपयोग करत आहेत.
 
कोणती महिला अथवा स्‍त्री आपल्‍या दातांवर गलिच्‍छ फिल्‍म राहू देईल? पेप्‍सोडेंट ह्या अस्‍वच्‍छ-गलिच्‍छ फिल्‍मला हटवितो.  या किंवा अशा आवाहनांची झलक ही होती की, त्‍या ''क्‍यू'' म्‍हणजेच दातांवरील त्‍या फिल्‍मवर निर्भर करत होती.  अवलंबून होती.  जी सर्वांसाठी होती आणि ज्‍यांना नजरअंदार करणे असंभव होते. 

स्‍पष्‍ट आहे की, एखाद्याला आपल्‍या दातांवरून जीभ फिरविण्‍यास सांगितल्‍यास असे संभव आहे की तो आपल्‍या दातांवरून जीभ फेरेल, आणि जर का त्‍याने जीभ फिरविली तर त्‍याच्‍यासाठी त्‍या पातळ थराला म्‍हणजेच फिल्‍मची जाणिव होणे, अनुभवणे संभव आहे.  हॉपकिन्‍सला एक ''क्‍यू'' म्‍हणजेच संकेत-सचेतक मिळाला होता जो सरल होता. युगानुयुगे होता आणि ट्रिगर केल्‍यावर एवढा सोपा होता की कोणतीही जाहिरात लोकांना सहजरूपाने  स्विकार करण्‍यासाठी चेतविते.

 याव्‍यतिरिक्‍त जसेकी हॉपकिन्‍सने कल्‍पना केली होती, तो रिवॉर्ड म्‍हणजेच बक्षिस ह्यापेक्षाही मोहित करणारे होते.  शेवटी अधिक संदर दिसणं किंवा होणं कोणाला वाटत नाही?  कोणाला नाही वाटणार की त्‍याचे स्मितहास्‍य अधिक सुंदर व्‍हावी?  विशेषरूपाने लवकरात लवकर त्‍यासाठी केवळ पेप्‍सोडेंटने ब्रश करून घेणे होय.  

पेप्‍सोडेंटची दातांवरील पातळ ''फिल्‍म'' थराला काढून
टाकण्‍याची भूरळ घालणारी जाहिरात
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

तिस-याच आठवड्यात मागण्‍यांचा धमाका-विस्‍फोट झाला.  पेप्‍सोडेंटसाठी एवढ्या मागण्‍या आल्‍या की कंपनीला त्‍या सांभाळणे झाले नाही.  केवळ एका दशकाच्‍या आतच पेप्‍सोडेंट संसारामध्‍ये सर्वाधिक विक्री होणा-या मालापैकी एक होता.  आणि ३० वर्षापेक्षाही अधिक अमेरिकेचा सर्वाधिक विक्री होणारा टुथपेस्‍थ बनुन राहिला होता. 

पेप्‍सोडेंटच्‍या प्रकट होण्‍यापुर्वी केवळ ७ टक्‍केच अमेरिकेच्‍या लोकांच्‍या औषधाच्‍या पेटीत टुथपेस्‍टची एक ट्यूब राहात होती. हॉपकिन्‍सच्‍या विज्ञापनाच्‍या अथवा जाहिरातींच्‍या अभियानाचा देशव्‍यापी होण्‍याच्‍या एका दशकानंतर ही संख्‍या उसळून ६५ टक्‍के झाली.  

द्वितीय विश्‍वयुद्धाच्‍या अंतापर्यंत लष्‍कराने आपल्‍या रंग-बेरंगी दातांच्‍याविषयी केल्‍याजाणा-या चिंतेमध्‍ये कपात केली.  कारण एवढेसारे सैनिक दररोज दातांना ब्रश करत होते 

 

एखादे ''क्‍यू'' शोधा त्‍याच्‍यासाठी ''रिवॉर्ड'' म्‍हणजेच बक्षिस स्‍पष्‍ट करा.''

-हॉपकिन्‍स

  ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

 

हॉपकिन्‍सने सांगितले होते की त्‍याची गुरूकिल्‍ली हीच आहे की त्‍याने ख-या अर्थाने मानव-मनोविज्ञान शिकले होते.   ते मानव-मनोविज्ञान दोन मूलभूत नियमांवर उभे होते, पहिला नियम  ०सरल आणि प्रत्‍यक्ष ''क्‍यू'' शोधा० आणि दुसरा ''रिवॉर्डस्''-बक्षिस याची स्‍पष्‍ट व्‍याख्‍या करा.   हॉपकिन्‍सचा असा दावा होता की, जर तुम्‍ही ह्या दोन्‍ही तत्‍वांना चांगल्‍या पद्धतीने केलात तेंव्‍हा ते एका जादू सारखे होईल. 

पेप्‍सोडेंटचेच उदाहरण पाहा : त्‍याने एका ''क्‍यू'' म्‍हणजेच संकेताला ओळखले "दातांवरील फिल्‍म" आणि रिवॉर्ड-बक्षिस- "सुंदर दात..!  ज्‍याने करोडो लोकांना एक दैनंदिन दिनचर्येचा रिवाज आरंभ करण्‍यासाठी अनुसरन केलं होतं.   आजही हॉपकिन्‍सचे नियम मार्केटिंग टेक्‍स्टबुक म्‍हणजेच विक्रय पाठ्यपुस्‍तकांमधील मुख्‍य भाग आहेत तसेच करोडो जाहिराती मोहिमांचा पाया आहेत.

 

अमेरिकेत ६०-च्‍या दशकात टी.व्‍ही.वर झळकणारी पेप्‍सोडेंटची Animated जाहिरात

  ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

 

त्‍याकाळातील टुथपेस्‍टहुन वेगळं पेप्‍सोडेंटने  त्‍यात सायट्रिक आम्ल (Citric Acid) त्‍यासोबतच मिंट अथवा पुदीन्‍याचे तेल आणि इतर रसायनांचा वापर करून टुथपेस्‍ट बनविले होते.  पेप्‍सोडेंटच्‍या आविष्‍कारकाने ह्या सामग्रींचा उपयोग टुथपेस्‍टची चव ताजी बनविण्‍यासाठी केला होता.  परंतू त्‍यांचा एक अप्रत्‍यक्ष परिणाम होता, ते उत्‍तेजक आहेत जी आपल्‍या जीभ आणि हिरड्यांवर एक थंड-कापरे किंवा हुडहुडी भरवत असतात.  

जेंव्‍हा पेप्‍सोडेंटने बाजारात आपली वाढ करण्‍यास सुरूवात केली तेंव्‍हा स्‍पर्धक कंपन्‍याचे संशोधक हे समजण्‍यास आटापिटा करू लागले की असे का झाले?  त्‍यांना कळालं की, ग्राहक म्‍हणत होते की जेंव्‍हा ते पेप्‍सोडेंटचा उपयोग करणे विसरून जातात तेंव्‍हा त्‍यांना त्‍यांच्‍या विसराळूपणाची जाणीव होत होती, कारण त्‍यांना त्‍यांच्‍या तोंडात येणारी थंड-कापरे किंवा हुडहुडी आठवण येत होती.

ते त्‍या हलक्‍याश्‍या उत्‍तेजनेची अपेक्षा करत असत आणि त्‍यासाठी उत्‍कंठित होत होते.  जर ही टुथपेस्‍ट नसती तर त्‍यांना असे वाटत होते की त्‍यांचे तोंड आज साफ-स्‍वच्‍छ नाहीत.

"क्‍लाऊड हॉपकिन्‍स सुंदर दात विकत नव्‍हता,
तो एक जाणीव विकत होता. "
 

 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

एकदा का ते त्‍यांना थंड हुडहुडीसाठीची लालसा अथवा तल्‍लफ येई, एकदा का ते दातांची सफाई त्‍या टुथपेस्‍टने करत तेंव्‍हा ब्रश करणे एक सवय बनून जात होती.  ग्राहकांना एखाद्या संकेताची अथवा उत्‍तेजणेची आवश्‍यकता असते की कोणतेतरी उत्‍पादन कार्यकारी आहे, कामाचे आहे.  

ट्रेसी सिंक्‍लेअर जे ओरल-बी आणि क्रेस्‍ट टूथब्रश आणि पेस्‍ट या कंपनीचे ब्रॅंड मॅनेजर आहेत, असे म्‍हणतात की, टुथपेस्‍ट कोणत्‍याही चवीचे बनवता येते, थंड कापरे किंवा हुडहुडी भरवणारे टुथपेस्‍ट उत्‍तमरित्‍या काम करत नाही, ते केवळ लोकांना असा विश्‍वास देतो की तो आपले कार्य करत आहे.  कोणीही आपल्‍या सवयींना बनविण्‍यासाठी ह्या बेसिक फॉर्मुल्‍याचा वापर करू शकतो.  

काय तुम्‍हाला अधिक व्‍यायाम करावा असे वाटते? झोप निघून जाईल असा एखादा ''क्‍यू'' अथवा संकेत निर्माण करा आणि प्रत्‍येक व्‍यायाम प्रकारानंतर स्‍वतःची खुशामदी करणारे एखादे बक्षिस-रिवॉर्ड द्या.   खोटी प्रशंसा करा.  तेंव्‍हा खुशामदी अथवा खोट्या प्रशंसेसोबतच त्‍या एंडोर्फिनच्‍या दाबावाविषयी विचार करा ज्‍याचा तुम्‍ही अनुभव घेता.  तुम्‍ही स्‍वतःला त्‍या ''रिवॉर्डची'' अपेक्षा करण्‍याची परवानगी द्या.  

 

अंतिमतः ही तल्‍लफ तुम्‍हाला प्रतिदिन व्‍यायामशाळेत जाणे आणि यो गोष्‍टीला समजणे सहज करून टाकेल, की, कसं लालसा (Craving) एक नवीन सवय बनवण्‍याचे अधिक सोपे काम करत असते. 

☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)

 

सवय बदलण्‍याचा सोनेरी नियम : (Golden Rule for Changing Habit)

 Transformation म्‍हणजेच परिवर्तन का होत असतो?  

वाचक मित्रांनो अगोदरच गुंतागुंतीच्‍या आपल्‍या जीवनात आपल्‍या जुन्‍या सवयी कशा पद्धतीने बदलता येतात, त्‍यासाठी सवय बदलण्‍याचा सोनेरी नियम पाहूया द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्‍तक सारांशाच्‍या भाग-२-दुस-या भागात. 

सवय बदलण्‍याचा सोनेरी नियम पाहुया पुढील भागात:

द पॉवर ऑफ हॅबिट-भाग-२

 

ऑनलाईन पुस्‍तक खरेदी करा व सविस्‍तर वाचाः 

मराठी         इंग्रजी 


 

👉तोपर्यंत  ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तके वाचन करा. जसे- 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive