The Power of Habit by Charles Duhigg- Book Summary in Marathi- Part- 2 | हॅबिट-मराठी अनुवाद सारांश भाग-२
The Power of
HABIT
Why We Do What We Do in Life and Business
Charles Duhigg
Book Summary in Marathi- Part-2
द पावर ऑफ
हॅबिट
आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे
लेखक
चार्ल्स डुहिग
मराठी अनुवाद
पुस्तक सारांश
भाग-२
👉भाग-१ वाचन करण्यासाठी
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
🙏 ई-वाचनालयामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो...!
👉महत्वाची टिपः
👉भाग-१ वाचन करण्यासाठी
The Power of Habit by Charles Duhigg
Book Summary in Marathi- Part- 2
द पॉवर ऑफ हॅबिट- लेखक चार्ल्स डुहिग
मराठी अनुवाद पुस्तक सारांश भाग-२
👉भाग-१ वाचन करण्यासाठी
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
☯ सवय बदलण्याचा सोनेरी नियम : (Golden Rule for Changing Habit)
Transformation म्हणजेच परिवर्तन का होत असतो?
टोनी डुंगीने बकानियसच्या हेड कोच साठी ब-याच दिवसांपासून प्रतिक्षा केली होती. १७ वर्षांपर्यंत तो एक सहाय्यक कोचच्या रूपाने रेषेबाहेरूनच रपेट मारत राहिला, कार्य करित राहिला होता. सुरूवातील युनिवर्सिटी ऑफ मिनिसोटा, द पिट्सबर्ग स्टिलर्स मग कॅन्सास सिटी चिफ आणि नंतर परत मिनिसेटामध्ये वायकिंग्स्. मागच्या दशकामध्ये त्याला NFL (The National Football League) संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या साक्षात्कारासाठी चार वेळेस बोलावणे आले होते. ह्या सर्व चारहीवेळा त्याचे साक्षात्कार चांगले झाले नव्हते. डुंगीच्या समस्येचा एक हिस्सा त्याच्या कोचिंगचे तत्वज्ञान होते, आपल्या साक्षात्कारामध्ये तो धैर्याने समजावून सांगत होता की,
''जिंकण्याची किल्ली खेळाडूंच्या सवयी बदलण्यामध्ये आहे''.
-टोनी डुंगी
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
तो एखाद्या खेळादरम्यान खेळाडूंद्वारा इतके अधिक निर्णय घेतल्या जाणे बंद करू इच्छित होता. त्यांनी असे म्हटले की, त्यांची इच्छा होती की ते सवयींद्वारे आपल्या प्रतिक्रिया सहज देतील. जर तो चांगल्या सवयी टाकू शकला तेंव्हा त्याचा संघ जिंकू शकत होती. यामुळे चांगल्या सवयी बनू शकत होती, त्याचा संघ जिंकला असता बास्स...! विजेते असाधारण गोष्टी करत नाहीत. डूंगी समजावून सांगत होता, ते साधारण गोष्टी करतात परंतू ते विचार न करता तसे करत असतात. एवढ्या वेगाने दुसरा संघ प्रतिक्रिया करत नाही. ते त्या सवयींचे अनुसरण करतात ज्यांना त्यांनी शिकलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे.
संघ मालक त्याला विचारत की, तुम्ही त्यांच्यामध्ये नवीन सवयी कशा टाकणार? अरे असे नाही, तो नव्या सवयी रूजवायला जात नव्हता. डूंगी खेळाडूंच्या जुन्या सवयी बदलायला जात होता. आणि जुन्या सवयींना बदलण्याचा रहस्य त्या गोष्टींचा उपयोग करणे होय ज्या खेळाडूंच्या मेंदूमध्ये अगोदरपासूनच आहेत.
![]() |
भाग-१ मधील पेप्सोडेंटच्या उदाहरणासारखे सवयींचा सापळा |
👉भाग-१ वाचन करण्यासाठी
सवयी तीन पाय-यांचा सापळा आहेतः क्यू,रूटीन आणि रिवॉर्ड म्हणजेच संकेत-नित्यक्रम आणि बक्षिस परंतू डूंगी मधल्या पायरीवर हल्ला करू इच्छित होता. नित्यक्रम-रूटीन-दिनचर्या
👉सवयी तीन पाय-यांचा सापळा आहेतः
क्यू,रूटीन आणि रिवॉर्ड
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
तो आपल्या अनुभवाने जाणून होता की जर सुरूवातीला आणि शेवटी काही ओळखीचा असेल तर कोणालाही नवीन आचरण आत्मसात करण्यासाठी समजावून सांगणे अधिक सोपे आहे. त्यांच्या प्रशिक्षणाच्या रणनितीमध्ये एका सिद्धांतामध्ये सवयी बदलण्याचा एक सोनेरी नियम लपून होता. ज्याला असंख्य अभ्यासांनी बदलाव करणा-या सर्वांत शक्तीशाली अवजारांपैकी एकाच्या रूपाने दाखविले आहे.
डूंगी ह्या गोष्टीवर सहमत होत होता अथवा मानत होता की तो वाईट सवयींना कधीही समाप्त करू शकत नाही तर कोणत्याही सवयीला बदलण्यासाठी तुम्हाला जुनेच संकेत म्हणजेच ''क्यू'' ठेवायला पाहिजे आणि जुन्या बक्षिसाचीच म्हणजेच ''रिवॉर्डची'' डिलीव्हरी करायला पाहिजे. परंतू एक नवीन नित्यक्रम-रूटीन टाकायला पाहिजे. हाच नियम आहे.
👉जर तुम्ही एखाद्या क्यूचा उपयोग करत असाल आणि तोच रिवॉर्ड देत असाल तेंव्हा रूटीनला खिसकावून सवय सुद्धा बदलू शकता. जर ते जुनेच ''क्यू'' आणि रिवॉर्ड तसेच राहिले तेंव्हा जवळपास कोणत्याही आचरणाला ट्रान्सपोर्ट अथवा आत्मसात केले जावू शकते.
चारवेळा डूंगीने त्या संघमालकांना आपल्या सवयींचा सिद्धांत समजावला. चारहीवेळी त्यांनी नम्रपूर्वक ऐकून घेतले आणि त्यांच्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दिलं, आभार मानलं आणि इतर दुस-याला नोकरीवर ठेवून घेतले. तेंव्हा १९९६ मध्ये दुःखी झालेल्या बकानियस संघाने बोलावले, डूंगी विमानाने तेथे गेला आणि पुन्हा एकवेळेस आपल्या योजनेचा खुलासा केला की कसे ते विजयी होऊ शकतात. अंतिम साक्षात्काराच्या दुस-या दिवशी त्यांना नोकरीवर ठेवण्यात आले. डूंगीच्या प्रणालीने बक्स्- (बकानियस) संघाला अंतिमतः क्रिडामंडळाच्या सर्वाधिकवेळा जिंकणा-या संघामध्ये बदलून टाकले.
तो NFL च्या इतिहासात सतत दहावर्षात प्लेऑफ्समध्ये पोहोचणारा एकमेव प्रशिक्षक, सुपर गोल जिंकनारा पहिला आफ्रिकी-अमेरिकन आणि प्रोफेशनल एथलेटिक्स म्हणजेच व्यावसायिक खेळांमध्ये सर्वांत माननीय लोकांपैकी एक बनला. त्याची प्रशिक्षणाची रणनिती संपूर्ण क्रिडामंडळ आणि सर्व खेळांमध्ये पाहोचली. त्याचा दृष्टीकोण कोणाच्याही जीवनामध्ये सवयींच्या पुणर्निर्माणाच्या उपायांवर प्रकाश टाकण्यात सहाय्यता करत होता. दुर्भाग्यवश प्रत्येक व्यक्तीसाठी निर्धारित पाय-यांच्या कार्यकारी होण्याची गॅरंटी नाही.
आपल्याला माहितच आहे की कोणत्याही सवयीला मूळापासून काढून टाकता येत नाही. त्याऐवजी त्याला बदलून टाका. आणि आपल्याला हेदेखिल माहितच आहे की सवयी बदलण्यासाठी सुवर्ण नियमाचा वापर केला जातो तेंव्हा सवयी अत्यंत लवचिक होऊन जातात. जर आपण तोच ''क्यू'' आणि ''रिवॉर्ड'' तसाच ठेवल्यास तेंव्हा एक नवीन ''रूटीन'' टाकला जाऊ शकतो. परंतू एवढेच पुरेसे नाही. कोणत्याही सवयीला बदललेलं ठेवण्यासाठी लोकांमध्ये हे विश्वास असणे आवश्यक आहे की, बदलाव संभव आहे. आणि अधिकतर नेहमीच हा विश्वास एखाद्या गटाच्या सहाय्यतेने उपजत असतो.
जर तुम्ही सिगारेट पीणे सोडू इच्छिता, तेंव्हा तुम्ही एक नवीन ''रूटीन'' विचार करून ठेवा जो सिगारेटने भरल्या जाणा-या लालसेला अथवा तल्लफिला संतुष्ट करेल. तेंव्हा सिगारेट सोडू इच्छिना-या लोकांचा समर्थक गट-सपोर्ट ग्रुप अथवा एखादे समुदाय शोधून काढा जे हे विश्वास करण्यामध्ये तुमची सहाय्यता करतील की तुम्ही ''निकोटीन'' पासून दूर राहू शकता. आणि जेंव्हा तुम्ही डगमगत असाल तेंव्हा त्या समर्थक गटाचा उपयोग करा.
जर तुम्ही वजन कमी करू इच्छिता, तेंव्हा हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही तुमच्या सवयींचा अभ्यास करा. तुम्ही दररोज वास्तवात स्नॅक्स-फरसान घेण्यासाठी जेवणावरून का उठता आणि कोणालातरी रेपेटसाठी सोबत घेता. तेंव्हा खानावळी ऐवजी तुमच्या जेवणाच्या मेजवर गप्पाटप्पा करण्यासाठी एखादा गट जो तुमच्यासोबत मिळून वजन घटवायच्या लक्ष्यांना अथवा उपायांना सोबतीने शोधून काढेल. किंवा एखाद्या अशा व्यक्तीला भेटाल जो चिप्सच्या ऐवजी संफरचंद, फळे ठेवतो.
पुरावा स्पष्ट आहे. जर तुम्ही एखादी सवय बदलू इच्छिता तेंव्हा तुम्हाला त्याच्या मोबदल्यात एक पर्यायी ''रूटीन'' म्हणजेच दिनचर्या शोधून काढायला पाहिजे. आणि तुमच्या सफलतेचे संयोग नाटकीयरित्या वाढतील. जर तुम्ही गटाच्या अंशरूपाने बदलण्यासाठी कटिबद्ध अथवा वचनबद्ध होता तेंव्हा विश्वास अतिशय आवश्यक आहे आणि तो सामूहिक अनुभवाने जन्म घेत असतो. खरेतर हे समूदाय केवळ दोनच व्यक्तींनी मिळून बनलेला आहे..!
☯ मुख्य सवयीः
ह्या सवयींचे महत्व सर्वाधिक आहे. १९८७ च्या ऑक्टोबरमध्ये एक वादळी दिवस. वॉलस्ट्रीटचे सुप्रसिद्ध निवेशक आणि भाग अथवा स्टॉक विश्र्लेषकांचा एक जत्था मॅनहॅटनच्या एका आलिशान हॉटेलच्या बॉलरूममध्ये एकत्रित झाला. ते एल्कोवा या नावाने विख्यात एल्यूमिनियम कंपनी ऑफ अमेरिका चे मुख्य कार्यकारी अधिका-याला भेटायला तेथे आले होते. हे एक कॉर्पोरेशन म्हणजेच महामंडळ आहे ज्यामध्ये जवळजवळ अर्ध्या शतकापासून फॉइल्स, कोकाकोलाच्या कॅनच्या धातूपासून ते कृत्रिम उपग्रहांना जोडून ठेवणा-या खिळ्यांपर्यंत सर्वच वस्तू बनविल्या होत्या.
एल्कोवाच्या मॅनेजमेंटने मुर्खतापूर्वक नव्या उत्पादनांच्या लाईनमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नात कित्येक चुकीचे पाउले उचललेली होती. जेंव्हा प्रतिस्पर्ध्यांनी त्यांचे ग्राहक आणि नफा हिसकावून घेतला तेंव्हा एल्कोवा च्या बोर्डाने एक घोषणा केली की, एका नव्या नेतृत्चाची वेळ आलेली आहे. तेंव्हा सर्वांच्या चेह-यांवर समाधान स्पष्ट दिसू लागली. परंतू हे समाधान बेचैनीमध्ये बदलून गेले जेंव्हा बोर्डाने आपल्या निवडणूकीची घोषणा केली.
नवे मुख्यकार्यकारी अधिकारी पॉल ऑनेल हा पुर्वी एक शासकीय नौकरशाह होता. वॉलस्ट्रिटमध्ये कित्येकांनी त्याच्याबद्दल कधीही ऐकले नव्हते. जेंव्हा एल्कोवा च्या ह्या स्वागत समारोहामध्ये बड्या निवेशकांनी निमंत्रित केल्या जाण्याची मागणी केली. जर तुम्हाला समजून घ्यायचे आहे की एल्कोवा कसे करत आहे तेंव्हा तुम्हाला आमच्या कारखान्यात सुरक्षा आकड्यांवर बघावे लागेल.
जर आपण आपल्या जखमांच्या दराला कमी करायचे ठरवले तर ते चिअरलिडींग म्हणजेच उल्हासाने अथवा त्या बकवास कारणांनी होणार नाही जे आम्ही दुस-या मुख्यअधिका-यांजवळून कधी-कधी ऐकतो. ऑनेल ने सांगितले, हे अशासाठी होईल की, ह्या कंपनीच्या व्यक्तींनी एखाद्या महत्वपूर्ण गोष्टीचे अंश बनन्यासाठी ते राजी झालेले आहेत. त्यांनी सर्वोत्तम देण्याच्या सवयीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. सुरक्षा ह्याची सूचक होईल की, आम्ही आमच्या सर्व संस्थेमध्ये सवयींना बदलण्यामध्ये प्रगती करत आहोत. अशाच रितीने आम्हालादेखिल पारखले पाहिजे
सादरीकरणाच्या समाप्त होताच त्या खोलीमधून बाहेर पडण्यासाठी निवेशकांमध्ये पळापळच जणू झाली. एकटा पळतच दिवानखान्यात गेला आणि पेफोन शोधन सर्वांत २० बड्या ग्राहकांना फोन लावला. तो म्हणाला, "बोर्डाने एका वेड्या हिप्पीला सूत्रे सोपविली आहेत,"तो कंपनीला मारून टाकेल, बुडवून टाकेल" निवेशकाने म्हटले. ह्या अगोदर की खोलीतील प्रत्येक व्यक्ती आपल्या ग्राहकांना फोन करेल आणि त्यांना हीच गोष्ट सांगेल की, मी त्यांना आपले भाग-स्टॉक्स लगेच विकून टाकायचे आदेश दिलेले आहेत. खरेतर हा खूपच वाईट सल्ला होता ज्याला मी माझ्या कार्यकाळात घेतलेलं आहे.
ऑनेलच्या भाषणाच्या एकावर्षाच्या आत एल्कोवाचा नफा रेकॉर्ड पार करू लागले. जेंव्हा ऑनेल २००० साली निवृत्त झाला तेंव्हा कंपनीचे वार्षिक उत्पन्न त्या कंपनीच्या ५ पट झालेली होती जी त्याच्या आगमनाच्या अगोदर होती. आणि त्या कंपनीचा बाजारातील भांडवल २७ मिलियन डॉलरपेक्षाही वाढलेला होता. ज्या दिवशी ऑनेलला नोकरी देण्यात आली होती जर त्या दिवशी कोणी एलकोवामध्ये ०१ मिलियन डॉलरचा निवेश केला असता अथवा गुंतवणूक केली असती तर जोपर्यंत कंपनी त्याच्या नेतृत्वात होती त्या व्यक्तीने डिव्हिडंड्समध्ये (लाभांश) रूपात ०२ मिलियन डॉलर कमावले असते. आणि त्याच्या कंपनी सोडण्यापर्यंत स्टॉकचे मूल्य ०५ पट झालेले असेल.
👉ऑनेलने कसे सर्वांत बड्या-मोठ्या, अत्यंत कंटाळवाण्या आणि संभावित रूपाने सर्वाधिक धोकादायक-खतरनाक कंपन्यापैकी एकाच्या नफा कमावण्याचे यंत्र तथा सूरक्षेच्या गढीमध्ये बदलले होते, एका सवयीवर आक्रमण करून.. आणि संघटणेत बदलांचे बुडबुडे काढताना बघत राहिला.
☯ मुख्य सवयीः
ऑनेलचं असं मत होतं की, काही सवयींमध्ये संघटनेत पुढे जाताना अन्य सवयींना बदलत म्हणजेच ''चेन रिएक्शन'' साखळी प्रतिक्रिया सुरू करण्याची अथवा घडवून आणण्याची क्षमता असते. दूस-या शब्दांत काही सवयी व्यापार आणि जीवनाला परत बनवायला दुस-या सवयींपेक्षा अधिक महत्त्व ठेवत असतात. ह्या मुख्य सवयी आहेत. आणि त्या व्यक्ती कसे काम करतात, खेळतात, जिंकत असतात, खर्च करतात आणि संवाद करत असतात या सर्वांना प्रभावित करत असतात.
👉मुख्य सवयी एक प्रक्रिया सुरू करतात जी वेळेसोबत सर्व गोष्टींना परिवर्तीत (Transform) करतात. मुख्य सवयी असं म्हणतात की,
सफलता प्रत्येक गोष्ट बरोबर करण्यावर निर्भर करत नाही परंतू या मोबदल्यात मुख्य प्राथमिकतांची ओळख करणे आणि त्या शक्तीशाली तरफेला डिझाईन करण्यावर निर्भर करतात. अधिक महत्त्वपूर्ण सवयी त्या सवयी आहेत जेव्हा त्या दुस-या आकृतीबंधाला अथवा ''पॅटर्न्स''ना बदलत असतात. हटवितात आणि पुन्हा बनवितात. संशोधकांनी जवळजवळ प्रत्येक संघटन अथवा कंपनीमध्ये स्थानिय सवयी शोधल्या, ज्यांचा त्यांनी निरिक्षण केलेलं आहे.
व्यक्तींजवळ "सवयी"असतात, समूहांजवळ ''रूटीन'' असतात.
-जेफ्री हॉस्कीन्सने
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
"व्यक्तींजवळ सवयी असतात, समूहांजवळ ''रूटीन'' म्हणजेच दिनचर्या अथवा नित्यक्रम असतात," जेफ्री हॉस्कीन्सने लिहिलं, ज्यांनी आपले संपूर्ण कार्यकाळ संघटनात्मक पॅटर्न्स-आकृतीबंधांना निरिक्षण करण्यात घालवलं.
ऑनेलला अशा प्रकारच्या सवयी धोकादायक वाटत होती. मूळतः आपण निर्णय घेण्याला एका अशा प्रक्रियेला सोपवतो ज्या वास्तविकरित्या विचार न करताच होत असतात. त्याकाळी एलकोवा संघर्ष करत होती. आलोचक असे म्हणतात की, कंपनीचे कर्मचारी विपुल कुशल नाहीत आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता अथवा दर्जा खराब होता. परंतू ऑनेलने आपल्या सर्वांत मोठ्या प्राथमिकतेच्या रूपाने आपल्या सूचित सर्वांत वर गुणवत्ता किंवा कार्यकुशलता लिहिल्या नव्हत्या. एलकोवा एवढ्या जुन्या आणि मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही एखादा ''स्विट्च'' बदलल्यासारखे झटकन प्रत्येक कर्मचा-याकडून कठोरातून-कठोर परिश्रम आणि अधिक उत्पादन घेण्याची अपेक्षा करू शकत नाही.
भूतपूर्व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला होता, आणि १५ हजर कर्मचारी उपोषणावर निघून गेले होते...! हे एवढे वाईट झाले होते की, ते डमींना म्हणजेच पुतळ्यांना पार्कींग लॉटमध्ये घेऊन जात होते, त्यांना व्यवस्थापकांसारखे कपडे चढवत आणि त्यांचे पुतळे जाळून टाकत होते. एलकोवा काही खुशाल परिवार नव्हता.
ऑनेलने विचार केला की त्याची प्राथमिकता अशी काही असायला पाहिजे की, प्रत्येक व्यक्ती, संघ आणि अधिकारी ती प्राथमिकता महत्वपूर्ण आहे ह्या गोष्टीवर सहमत होतील. त्याला लक्ष केंद्रित (फोकस) करण्याची आवश्यकता होती जी लोकांना एकसाथ आणू शकेल. जे लोकं कसं कार्य करतात ते संवाद करतील, यांना बदलण्यासाठी त्याला निर्देश देतील.
☯ फायद्यासाठी लक्षकेंद्रित करण्याची निवडः
👉''मी मूलभूत गोष्टींच्या मूळापर्यंत गेलो.'' ऑनेल ने म्हटले.
प्रत्येक व्यक्ती त्याच्या योग्य आहे की तो (ते) कार्य तेवढेच सुरक्षितपणे सोडेल जेवढे ते आले होते. तुम्हाला भयभीत व्हायला अथवा घाबरायला नाही पाहिजे. ''आपल्या परिवाराला जेवू घालणे तुम्हाला मारून टाकेल'' हीच ती गोष्ट होती ज्यावर मी फोकस-लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. -प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेविषयीच्या सवयीला बदलून टाकणे.
आपल्या सूचीच्या शिर्षस्थानावर ऑनेलने लिहिलं, सुरक्षा तथा एक दुःसाहसी उद्दिष्ट ठेवलंः
👉शून्य जखम..!
👉शून्य कारखाना नाही, शून्य जखम. बास्स्
(जखम = दुखापात)
हीच त्याची कटिबद्धता राहिली. मग ह्यावर कितीही खर्च होऊ द्या, काही हरकत नाही. दृष्टीकोणाची दमक ही होती की वास्तवात ऑनेलसोबत कर्मचा-यांच्या सुरक्षेविषयी कोणीही वाद-विवाद करू इच्छित नव्हता. संघटन बेहतर सुरक्षानियमांसाठी कित्येक वर्षांपासून संघर्ष करत होते, व्यवस्थापक-अधिकारीदेखिल ह्याविषयी वाद करू इच्छित नाहीत.
जखमांचा अर्थ आहे की उत्पादकतेला बगल देणे सोबतच खालावलेली मनोदशा. ज्या गोष्टीला अधिकतर लोकं समजू शकले नाही तरीही ते ''शून्य जखम'' मिळवण्याची ऑनेलची योजना होती. ज्यामुळे एलकोवाच्या इतिहासात सर्वांत मौलिक पुनर्गठणाला आवश्यक बनवून टाकलं. कर्मचा-यांच्या सुरेक्षेसाठी एलकोवाला पृथ्वीवर सर्वांत सुव्यवस्थित अल्यूमिनियम कंपनी बनायचे होते. ह्याच कारणांमुळे सुरक्षा योजनेला सवयींच्या फासावर अथवा सापळ्यावर मॉडेल केलं गेलं होतं. बनविण्यात आलं होतं. त्याला एका सरल ''क्यू'' म्हणजेच संकेताची ओळख झाली होती.
एखाद्या कर्मचा-याची जखम, त्याने एक सरल ''रूटीन'' (दिनचर्या अथवा नित्यक्रम ) जारी केली. कोणत्याही वेळी जेंव्हा कोणी जखमी होईल तेंव्हा युनिट प्रेसिडेंटला २४ तासाच्या आत ऑनेल जवळ अहवाल सादर करावा लागणार होता आणि हे सुनिश्चित करण्यासाठी एक योजना प्रस्तुत करावी लागेल की, ही जखम पुन्हा कधीही होणार नाही आणि त्यामध्ये एक बक्षिस होतं. प्रमोशन-बढती केवळ त्याच व्यक्तींची केली जात होती जे ह्या सिस्टमला-पद्धतीला अंगिकारत होते.
जसेही एलकोवाचे सुरक्षा पॅटर्न्स बदलले, कंपनीचे अन्य पैलू तथा ते नियमसुद्धा ज्यांचा विरोध युनियनवाल्यांनी दशकं घालवली होती, तेसुद्धा अचानक ह्या नियमांचे अनुसरण करू लागले होते. कारण माझे माप प्रत्येक व्यक्तीला हे समजण्यास सहाय्यता करत होते की, उत्पादन प्रक्रिया प्रणालीचा (Manufacturing System) कोणता भाग कार्य करत नव्हता आणि सुरक्षा संकट निर्माण करत होता. त्या नीती-व्यवस्था ज्यांचा व्यवस्थापकांनी चिरकालापासून विरोध केला होता.
जसे- कधी गती अत्याधिक वाढल्यास तेंव्हा कर्मचा-यांना उत्पादन कमी करण्यासाठीचे स्वायत्तता म्हणजेच त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देणे आता त्याचे स्वागतच करण्यात येऊ लागले. कारण घटना घडण्याअगोदरच जखमांना थांबविण्यासाठीचे हे उत्तम उपाय होते.
ऑनेल ने कधीही हे वचन दिले नव्हते की, कर्मचा-यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर त्याचा फोकस (लक्ष केंद्रित करणे) एलकोवाचा नफा वाढवेल. तरीही जस-जसे संघटनेत नविन 'रूटीन' दिनचर्या अवलंब केल्या जाऊ लागल्या तस-तसे खर्च कमी झाले, गुणवत्ता उंचावली आणि उत्पादन आकाशाला गवसणी घालू लागले. जर वितळत्या धातूचे उतू जाणे अथवा उडणे कर्मचा-यांना जखमी करत असेल तेंव्हा त्याला वितळलेला धातू ढाळण्याच्या पद्धतीला रिडिझाईन केलं जायचं.
- ज्यामुळे जखमा कमी होऊ लागल्या.
- ह्यामुळे पैसादेखिल वाचला
- कारण वितळलेले धातू उतू जाण्यामुळे एलकोवाच्या कच्च्या मालाचा कमी नुकसान होत होतं.
- जर एखादे यंत्र नेहमीच खराब होत असेल तर त्याला बदलण्यात आले.
- ज्याचा असा अर्थ आहे की कर्मचा-यांच्या हातांवर यंत्रांचे सुटे-भाग तुटून पडणे आणि
- जखमी होण्याचा खतरा-धोका कमी झाला.
- याचा अर्थ हा झाला की उत्पादनाची गुणवत्ता वाढली जसेही एलकोवाला कळाले की उपकरणांचे योग्यरितीने कार्य न करणे वाईट प्रकारचा अल्यूमिनियमचे मुख्य कारण होते.
सुरूवातीचे बदल अथवा परिवर्तन (Chain Reaction)
साखळी-प्रतिक्रिया सुरू करतात.
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
संशोधकांना डझनभर अन्य व्यवस्थांमध्येसुद्धा ह्याच प्रकारच्या (Dynamics) गतीशिलतेचा शोध लागला आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत जीवनसुद्धा संम्मिलीत आहे. अभ्यासांनी नोंदवले आहे की,
👉ज्या परिवारांमध्ये सवयीनुसार रात्रीचे जेवण एकत्रित बसून केला जातो, त्यांमध्ये जी मुलं वाढतात असे दिसून आले की त्यांचा गृहपाठ करण्याचा कौशल्य अधिक असतो, त्यांचे शाळेतील गुणांक चांगले असतात, त्यांच्यामध्ये भावनात्मक नियंत्रण अधिक असतो आणि आत्मविश्वासदेखिल अधिक असतो.
दररोज झोपून उठल्यावर आपले बिछाना अथवा पलंग-पांघरणे सावरणे-व्यवस्थित ठेवणे उत्तम उत्पादकता-कार्यक्षमता, (well being) उत्तम हिताची भावना तसेच मासिक जमा-खर्चाच्या अंदाजपत्रकामध्ये किंवा काटकसरिमध्ये लागणा-या उत्तम कुशलतांशी संबंधित आहे. असे नाही की पारिवारिक भोजन आणि स्वच्छ बिछाणा, उत्तम गुण आणि कमी फालतू खर्च करण्याचे कारण आहेत. परंतू कोणत्या-ना-कोणत्या पद्धतीने हे प्रारंभीचे परिवर्तन-बदलाव साखळी-प्रतिक्रियेची (Chain Reaction) ची सुरवात करत असतात. ज्या दुस-या चांगल्या सवयींचा पाया रचण्यात सहाय्यता करतात.
जर तुम्ही मुख्य सवयींना बदलण्यावर अथवा नव्या सवयी निर्माण करण्यावर वा बनविण्यावर लक्ष केंद्रित कराल तर तेंव्हा तुम्ही व्यापक परिवर्तन-बदल आणू शकता. ते नवीन आराखडे बनवित असताना दुस-या सवयींना रूजविण्यास मदत करतात आणि ते त्या संस्कृतींना स्थापित करतील जेथे बदल संक्रामक होऊन जातो.
☯ स्वतंत्र ईच्छेची न्यूरॉलॉजी :
सारांश समाप्त
👉भाग-१ वाचन करण्यासाठी
👉ऑनलाईन पुस्तक खरेदी करा व सविस्तर वाचाः
|
👉तर वाचक मित्रांनो रूचीपुर्ण सोबतच जीवनात मदत करु शकेल अशी ही अप्रतिम पुस्तक तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली टिप्पणीद्वारे किंवा ई-मेल करून अवश्य कळवा.
👉 ☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) या संकेतस्थळावरील पुस्तक सारांश आवडल्यास आपल्या मित्र-नातेवाईक अथवा गरजूंना सूचवा- शेअर करा व त्यांच्या जीवनात पुस्तकांविषयी आवड निर्माण करा.
👉तसेच काही तक्रार, प्रश्न किंवा सल्ला असल्यास निःसंकोच विचारा, सांगा.
👉अशाच प्रकारच्या पुढे कोणत्या पुस्तकाचे सारांश तुम्हाला वाचण्याची ईच्छा आहे अवश्य कळवा. आम्ही तुमची दखल अवश्य घेऊ.
![]() |
|
👉तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा, जीवन समृद्ध बनवत राहा.
धैर्यपूर्वक पुस्तक सारांश वाचन केल्याबद्दल
आपले मनःपुर्वक
🙏 धन्यवाद.
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
👉☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in) संकेतस्थवरील इतर उत्कृष्ट पुस्तके वाचन कराः
जसे-
सॅपियन्स- मानव जातीचा संक्षिप्त इतिहास
१२-ब्रेन रुल्स-लेखक- जॉन मेडिना
अॅटिट्यूड-इज-एव्हरिथिंग म्हणजेच ''दृष्टीकोण-हेच-सर्वकाही''- लेखक जेफ केलर
हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले
Start wit WHY“का” ने सुरुवात- लेखकः सायमन सिनेक
सत्ता-अधिकार प्राप्तीचे ४८ सुत्रे-लेखक- रॉबर्ट ग्रीन
☯ ई-वाचनालय (www.evachnalay.in)
टिप्पण्या