Hyper Focus- Author- Chris Bailey - Part-1 हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले- भाग-१

Hyper Focus- Author- Chris Bailey 

 How to work less and achieve more.

 हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले

 

भाग-१  Part-1                                            भाग-२  Part-2

 

काही वर्षा अगोदर हायपर फोकस या पुस्तकाचे लेखक क्रिस बेली  यांना त्यांच्या वर्तनातील एक गोष्ट लक्षात आली की, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ करून सोडलं.  लेखक म्‍हणतात, त्‍यांचं जीवन एक सिरीज ऑफ स्‍क्रीन्‍स म्‍हणजेच (पडद्यांची श्रृंखला) बनली होती.   आता सिरीज ऑफ स्क्रीन म्हणण्‍याचा अर्थ काय होता?

 

लेखक म्‍हणतातः  सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपायला जाणेपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनला बघत होते. 

पहिली स्क्रीन अर्थातच होती ती म्‍हणजे त्यांच्‍या मोबाईल फोनची. त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत होती त्यांच्या मोबाईलने. ज्यावर त्यांचा सकाळी उठण्‍यासाठीचा गजर/अलार्म लावलेला होता. मग ते उठताच आपला मोबाईल चेक करत होते.

ते इंस्टाग्रामवर स्‍वयंपाक करण्‍याचे विविध व्हिडिओ बघत होते.

वेगवेगळी सोशल ॲप्स बघायला लागत होते.

मग तेव्हा उठून न्याहरी बनवायची वेळ येत होती तेव्हा सुद्धा ते एक स्क्रीन बघत होते जी होती त्यांच्या आयपॅडची. जो स्वयंपाक घरातील वट्टयावर ठेवलेला असायचा. पण जेव्हा कामाची वेळ येत होती तेव्हा त्यांचा सामना होता लॅपटॉपच्या स्क्रीनचा.

त्यासोबतच त्यांनी जी स्मार्ट वॉच घातलेली होती त्यावर थोड्या-थोड्या वेळात नोटिफिकेशन्स म्हणजेच सूचना येत होत्या.   थोड्या-थोड्या वेळात ती वाजत होती.

महत्त्वाचे काम करताना सतत या गोष्टी त्यांना सतत विचलित (Distract) करत होत्‍या.  या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा वेळ जो सर्वात जास्त वाया जात होता तो म्हणजे त्यांच्या मोबाईल फोनवर, ते कित्येक तास बघत बसत.

 

Addiction, Smartphone, Addict, Addicted, Arm, Blue 

तर, जेव्हा त्यांनी आपल्या (Behavior) वर्तनावर लक्ष दिलं तर त्यांनी असं ठरवलं की, तीस दिवसापर्यंत यापासून दूर जायचं असं ठरवलं परंतु पूर्णपणे नाही.  त्यांनी ठरवलं की दिवसातून जास्तीत जास्त ३०-मिनिटे त्यांचा फोन ते वापरतील.   मग ते त्यांना (Map) नकाशा बघायचा असेल किंवा आईशी बोलायचं असेल, गाणे ऐकायचे असतील किंवा पॉडकास्ट-रेडीओ ऐकायचा असेल ते हे काम या तीस मिनिटांच्या आतच करतील. याव्यतिरिक्त नाही.

 

त्यांनी हे करणं सुरू केलं तेव्‍हा त्यांनी असं निरीक्षण केलं की त्यांच्या सोबत काय झालं या तीस (३०) दिवसात त्यांना असे लक्षात आले की, ते म्हणतात या तीस दिवसात त्यांना ह्या नवीन (Low Level Stimulation) म्हणजेच किमान उत्तेजित पातळीवर यायला किंवा ऍडजस्ट करायला एक आठवड्याचा वेळ लागला.  आता हे (Low Level Stimulation)  किमान उत्तेजित पातळी काय आहे याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत.

 

एका आठवड्यानंतर त्यांच्यासोबत तीन गोष्टी झाल्या:

 

1. त्यांचा (Attention Span Increase) लक्ष केंद्रीत करण्‍याच्‍या कालावधीमध्‍ये वाढ झाली होती. कोणत्याही गोष्टीवर थोडसं प्रयत्न केलं की त्यांचं लक्ष केंद्रित होत होतं.   म्हणजे असं नाही की त्यांना काहीच Efforts-प्रयत्न करावे लागले नाही.   पण थोड्याशा प्रयत्नाअंती ते कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत होते.

 

2.   दुसरी गोष्ट ही आहे की त्यांच्या मनात नवनवीन आयडिया म्हणजे कल्पना यायला लागल्या होत्या.

 

3.   तिसरी गोष्ट अशी झाली की भविष्याविषयी नवीन योजना (Plan) किंवा विचार (Thoughts) येऊ लागले, नवीन कल्पना (Ideas) येऊ लागल्या. हे सर्व शक्य झालं ते फक्त एका (Device) साधनाला मर्यादेमध्ये वापरल्यामुळे.

 

तर असं का झालं?

 

लेखकांनी याविषयी खूप विचार केला. शेकडो (Research Papers) शोधपत्रकं वाचली. जगभर फिरले. वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील तज्ञांची भेट घेतली.

जे Focus म्हणजेच लक्ष केंद्रित करण्‍यावर अभ्यास करत होते.

त्यांनी स्वतःवर देखील खुप प्रयोग करून बघितले.

शेवटी त्यांनी २५-हजार शब्दांचा (Research Note) शोध लेख लिहिला,   की कसं तंत्रज्ञान आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या सामर्थ्यावर परिणाम करीत आहे.   ह्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की,

 

संगणकावर काम करताना आपला फोन जवळ बाळगत/ठेवत असाल तर आपण एका गोष्टीवर केवळ ४०-सेकंदच लक्ष केंद्रित करू शकतो.  आणि ह्या दरम्यान जर आपण आपल्या गटासोबत किंवा Team सोबत बोलत असू तर हीच वेळ ३५-सेकंदाची होऊन जाते. 

 

आपल्याला वाटतं की खरी समस्या ही आहे की- आपला मेंदू (Distracted) विचलित आहे.

 

लेखक म्हणतात, समस्या ही नसून खरी समस्या अधिक खोल आहे. आणि ती आपल्या विचलितपणाचा मूळ कारण (Root Cause) आहे.

 

लेखक म्हणतात, आपण विचलित (Distracted) नसून आपले मेंदू  (Over Stimulated) अति विचलित झालेली झालेले आहेत.  याला अगदी सोप्या देशी भाषेत बोलायचं तर आपल्या मेंदूमध्ये अतिशय जास्त  प्रमाणात विचलितपणा झालेला आहे.

 

 आपल्याला हे पण करायचंआम्हाला ते पण करायचे, आम्हाला एकदाच दहा लोकांसोबत चाट/गप्‍पा करायच्‍या आहेतआम्हाला आमचे लाईक सुद्धा चेक करायचे आहेतआम्हाला हे पण बघायचे आहे  की आमच्या इंस्टाग्राम स्टोरी वर कोणी-कोणी बघितले/चेक केले आणि आपल्या माजी मित्र/मैत्रिणी वर नजरसुद्धा ठेवाची आहे.

आपण स्वतःलाच विचलित होऊ द्यावेसे वाटते.

 आपल्या मेंदूला छोटी-छोटी माहिती सोशल मीडिया, ई-मेल हे खूप चांगले वाटते.   आपल्या मेंदूला विचलित होणे पसंत आहेकारण आपल्याला याबद्दल Reward म्हणजेच बक्षीस मिळत असतो आणि तो बक्षीस काय असतो:

आपल्या मेंदूमध्ये एक यंत्रणा (Mechanism) आहे ज्याला Novelty Bias असे म्हणतात.  आपण जेव्हा विचलित होतो तेव्हा त्या यंत्रणेमुळे आपल्याला (Pleasure) म्हणजेच सुख/आनंद देणारा रसायन त्याला आपण (Dopamine) डोपामाइन म्हणतो तो बनवत असतो.

 

हा तोच डोपामाइन आहे जेव्हा आपण जंकफूड खातो तेव्हा बनत असतो.   जेव्हा आपण फेसबुक वापरत असतो तेव्हा बनतो.  जेव्हा आपण प्रेम/रोमान्स करतो तेव्हा बनतो.   जेव्हा आपण नशा करतो तेव्हा बनतो.  जेव्हा आपण पॉर्न बघतो तेव्हा बनतो.

 

तर आपल्याला डोपामाइनचे बक्षिस तेव्हाच मिळतो जेव्हा आपण विचलित होतो.

यामुळेच आपला मेंदू डिस्‍ट्रॅक्शन शोधत असतो.   म्हणजेच विचलित पणाच्या शोधात असतो.   ही आज आपल्या मेंदूची अवस्था किंवा हालत झालेली आहे.

 

आपण  आज (Hyper Stimulated State) अतिउत्‍तेजित अवस्‍थेमध्ये आहोत. किंवा असे म्हणू की आपल्या मेंदूमध्ये अति-विचलित पणा माजलेला आहे अति-उत्तेजित किंवा अति-चंचलपणा माजलेला आहे.

 

(Hyper Stimulated) अतिउत्‍तेजित आपला मेंदूत आपली सतर्कता (Attention) एका गोष्‍टीवरून दुसऱ्या गोष्‍टीवर उड्या मारत आहे. आपला मेंदू खूप जास्त उत्तेजित होत आहे.

 

लेखकांनी विचार केला की फोनचा वापर कमी केल्याने मेंदूचा उत्तेजितपणा एवढा कमी झाला की ज्यामुळे त्यांचा (Focus) लक्ष केंद्रित पणा  वाढला.

तर काय होईल जर मी आपल्या मेंदूला उत्तेजित होण्यापासून अजून कमी केल्यास. (Reduce Brain Stimulation)

 

लेखक म्हणतात, जेव्हा आपण ‘’अतिउत्‍तेजित’’पणाकडून (High Stimulation) अल्‍प-उत्‍तेजणेकडे (Low Stimulation)जातो तेव्हा त्‍या भावनेला (Feeling) एक नाव आहे तो नाव आहे ‘’कंटाळा’’ किंवा Boredom..!

 

जेव्हा आपण (High Stimulation) अल्‍प-उत्‍तेजणेकडे (Low Stimulation) जात असतो तेव्हा आपण कंटाळवाणेपणाची जाणीव (Bore Feel) करू लागतो.

 

लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की, आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी आराम करत असाल तर तुम्हाला ‘’कंटाळा’’ येऊ लागतो, अस्‍वस्‍थपणा/बेचैनी होऊ लागते.

 

मग लेखकांनी स्वतःला अधिक ‘’कंटाळा’’ येण्यासाठी काही अजून कार्य केले:

 

त्यांनी ठरवलं की ते दररोज एक तास एक महिन्यापर्यंत म्हणजे ३०-दिवस स्वतःला कंटाळवाणा होऊ देतील स्वतःला बोर करतील किंवा स्वतःला बोर होऊ देतील.

म्हणून त्यांनी एक दिवस तासभर आय ट्युन्स चे  नियम व अटी वाचून काढल्या. ज्या जगामध्ये कोणीतरीच वाचल्‍या असतील.

एके दिवशी एक तासभर त्यांनी  (Pi-𝛑) “पायच्या  १०-हजार अंकांना मोजण्यात घालवलं.

तर एक दिवस तासभर फक्त घड्याळ्याची टिक्-टिक् बघत बसले.

अशीच कंटळवाणी-बोर करणारी गोष्टी  एक महिण्‍यापर्यंत ते करत राहिले  आणि त्यांनी तेच परिणाम दिसून आले जे स्मार्टफोन वाल्या प्रयोगांमध्ये दिसून आले होते.  त्यांना तेच परिणाम त्यांच्या निदर्शनास आले जे स्मार्टफोनवाल्या प्रयोगांमध्ये  आले होते.

www.evachnalay.blogspot.com

त्यांच्या मेंदूला एक आठवडा लागला ह्या  (New Low Level of Stimulation) ‘’नव-किमान-उत्‍तेजित-स्‍तर’’ यामध्ये ऍडजस्ट/समायोजित व्हायला.  यावरून आपल्याला असे लक्षात येईल की

 

 

 

 "आपला मेंदू  
(Calm down)
म्हणजेच
पूर्णपणे शांत व्हायला आठवडा लागतो."

 

 

 उदाहरणार्थ:   Vacations-सुट्ट्यावर जाऊन.  आणि सुट्ट्या आठ दिवसापेक्षा जास्त असल्या पाहिजे.

 

त्यानंतर लेखकांनी निरीक्षण केलं की त्यानंतर त्यांचं सतर्कपणा (Attention Span) अजून वाढलं.  आता ते आपल्या मेंदूवर जोर न देता लक्ष केंद्रित करू लागले होते.  असं शामुळे नाही झालं की त्यांच्याजवळ खूप काही विचलित करणारी साधने  (Distractions) नव्हते. तर असं यामुळे होत होतं कारण की आता त्यांचा मेंदू खूप कमी उत्तेजित होत होतं आणि त्यामुळे तो Distractions शोधत नव्हतं.

 

लेखक म्हणतात:  मजेची गोष्ट अशी की आता त्यांच्या मेंदूमध्ये असे  - असे  (Ideas) कल्पना, (Plans) योजना  येत होत्या ज्या अगोदर केव्हाही आल्या नव्हत्‍या.

 

आणि असं यासाठी होतं की त्यांचा मेंदू आता वेगवेगळ्या दिशेमध्ये चालू लागलेला होता.   नवनवीन गोष्टी विचार करु लागला होता.

 

लेखक म्हणतात:आठवण करा, जेव्हा तुम्हाला एखादा चांगली कल्‍पना (best idea) केंव्हा आली होती?

 

जेव्हा तुम्ही अंघोळ करत असाल तेव्हा किंवा  शतपावली करत असाल किंवा पायी चालत असाल आणि त्या दरम्यान तुमच्या मेंदूमध्ये हे (Series of Ideas)  म्हणजेच कल्पनांची शृंखला आली असेल.   त्यासोबत मिळून तो बेस्ट आयडिया बनला असेल.

 

प्रसिद्ध कादंबरी लेखक (Thomas Mann)  यांना त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबरी यांची कल्पना म्हणजेच आयडिया चालताना सूचली होती.

 

थॉमस यांचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणजेच कोटेशन आहे की:

    Thoughts 

    comes 

    clearly 

    when 

    while

    on

     walk.

लेखक याला एक मोड म्हणतात याला ते (Scattered Focus Mode) असे म्हणतात ते म्हणतात, जेव्हा आपण आपल्या मेंदुला जाणून-बुजून भरकटवतो,  त्याला वेगवेगळ्या दिशेमध्ये विचार करण्‍याचे स्‍वातंत्र्य देतो, तेव्हा तो नव-नवीन कल्‍पना (ideas) घेऊन येत असतो तो नवीन योजना (plans) बनवत असतो.

 

येथे आपण (External Distractions) म्हणजेच बाह्य विचलितपण या गोष्टीबद्दल बोलत नाहीत.  जसे- सोशल मीडिया अॅप्स (Apps) आपल्याला दर मिनिटाला सूचना म्हणजेच नोटिफिकेशन देऊन विचलित करीत असतात.

खरं तर इथे आपण बोलत आहोत (Mind Wandering) भटक्‍या मनाची..! म्हणजेच मनाला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करण्याचे स्वातंत्र्य देणे.

 

जेव्हा आपण आपल्या मनाला विचार करण्याचे स्वातंत्र्य देत असतो तेव्हा तो तीन ठिकाणी जातो:

1.   आपण आपल्या (Past) भूतकाळाबद्दल विचार करतो

 

2.   आपण आपल्या (Present) वर्तमानकाळाबद्दल  विचार करतो आणि

 

3.   आपण आपल्या (Future) भविष्याबद्दल  विचार करतो

 

आपल्याला वाटते आपण आपल्या भूतकाळाबद्दल (Past) अधिक विचार करतो.  खरंतर आपण आपल्या भूतकाळाबद्दल फक्त वेळेच्या १२% विचार करत असतो.

 

तर (Present) वर्तमानकाळाबद्दल वेळेच्या २८-% विचार करतो आणि आपण आपल्या भविष्याबद्दल भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोघांना एकत्रित करूनही त्यापेक्षा जास्त विचार करतो म्हणजेच वेळेच्या ४०-% आपण आपल्या भविष्याबद्दल विचार करत असतो.

 

आपण सकाळी उठताच येणाऱ्या दिवसाबद्दल विचार करू लागतो. आपण अंघोळ करत असतो तेव्हा आपण आपला दिवसाचे नियोजन करत असतो. त्याला (Prospective Bias) संभाव्‍य कल असे म्हटले जाते.  

तुमच्या लक्षात आलं असेल वरील आकडे १०० होत नाहीत, अजूनही झालेले नाहीत.

 

                भूतकाळाबद्दल              -        १२%

                वर्तमान काळाबद्दल        -        २८%

                पुढच्या काळाबद्दल         -        ४०%
______________________________________________

                     एकूण वेळ               -         ८०


बाकीचे २०-टक्‍के वेळेत आपला मेंदू काय करत असेल

पाहूया भाग-२ मध्‍ये  

 

 इंग्रजी आवृत्‍ती खरेदीसाठीः

 




टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive