अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी स्टिफन कोवी - मराठी पुस्‍तक परिचय | 7 Habits of Highly Effective People (Marathi) by Stephen Covey

आयुष्‍य बदलून टाकणा-या परिणामकारक अशा ०७-सवयी.
तुम्‍हाला जर तुमचं ध्‍येय प्राप्‍त करायचं असेल आणि सर्वांत कठीण आव्‍हानावर मात करायची असेल तर तुमचे इच्छित परिणाम ज्‍यावर आधारित आहेत, असं नैसर्गिक न्‍यायाचं तत्‍व ओळखा आणि वापरा.
हे तत्‍व आपण कसे लागू करणार आहोत यात अनेक प्रकार असतील.  आपल्‍या स्‍वतःच्‍या शक्‍ती, बुद्धी, यु‍क्‍तीवर ते ठरेल. पण शेवटी कुठल्‍याही उपक्रमातील यश हे सदैव, ते यश ज्‍या तत्‍वाशी निगडीत आहे त्‍या सुरात सूर मिळवूनच प्राप्‍त होते. –स्टिफन कोवी
 

अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी

वैयक्तिक बदलातील शक्तिशाली धडे

लेखक: स्टिफन कोवी

मराठी अनुवादः विदुला टोकेकर         

पुस्‍तक परिचय

Book Review in Marathi of 7 Habits of Highly Effective People by Stephen Covey

  

समाजामध्‍ये जगताना आपली समज कशी बनते, त्‍याचा परिणाम आपल्‍या दृष्टिाकोनावर कसा होतो, आपल्‍या दृष्टिकोनाचा आपल्‍या वर्तणुकीवर कसा परिणाम होतो, आपल्‍या धारणा काय आहेत, त्‍या धारणा कोणत्‍या मूल्‍यांवर आधारित आहेत, मूल्‍ये कोणत्‍या तत्‍वांवर आधारित आहेत, आपल्‍या अपेक्षा काय आहेत,  या सर्वांची पाळंमुळं समाजात किती खोलवर गेलेली आहेत व त्‍यांचा परिणाम प्रत्‍येक व्‍यक्‍तीवर कसा होतो हे सविस्‍तर समजून घेतल्‍यास आपणही जीवनातील प्रत्‍येक क्ष‍ेत्रात यशस्‍वी होऊ शकाल.  

तत्‍वं

नीती-मूल्‍यं

समज

धारणा

दृष्टिाकोन

अपेक्षा

वर्तणुक 
 

आपण ज्‍या भिंगातून जगाकडे पाहातो, त्‍या भिंगाकडेही पाहायला हवे आणि जगाकडेही पाहायला हवे आणि आपण जगाचा जो अर्थ लावतो त्‍याला त्‍या भिंगामुळे आकार आलेला असतो.

आपल्‍या मूळ स्‍वभावातील सवयी आणि काही विशिष्‍ट तत्‍वे यांची सांगड घालूनच आपले व्‍यक्तिमत्‍व आकार घेत असते.  जे वर्तणाद्वारे-वागणूकीद्वारे-व्‍यवहाराद्वारे आपले विचार-दृष्‍टीकोन प्रकट करत असतात. या विचारांचा थेट संबंध आपल्‍या मूल्‍यांसोबत असतो.

ती मूल्‍ये मूलभूत अशा तत्‍वांवर आधारित असतात. त्‍यांचा शोध घेऊन, जीवनात आचरणात आणून आपण यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी त्‍यांचा उपयोग करून घेण्‍यासाठी ह्या सर्वकालीन ७-सवयी महत्‍वाच्‍या आहेत.    

*अति- परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी या पुस्‍तकात लेखक स्‍टीफन कोवी हे वैयक्तिक व व्‍यावसायिक प्रश्‍नांची उकल करण्‍याचा एक संपूर्ण, एकात्‍म, तत्‍व-केंद्रित मार्ग आपल्‍यासमोर मांडतात. 

आतला वेध घेणारी दृष्‍टी व चपखल किस्‍से यांनी न्‍याय-सचोटी, सेवा व मानवी प्रतिष्‍ठा – बदल सामावून घेण्‍यासाठी आवश्‍यक ती सुरक्षितता व या बदलाने निर्माण झालेल्‍या संधींचा लाभ घेण्‍याची शक्‍ती व शहाणपण आपल्‍याला देणारी तत्‍वे – यांच्‍या मदतीने जगण्‍याचा रस्‍ता पायरी-पायरीने दाखवून देतात.

आपली तत्‍व आणि मूल्‍यं यांतील फरक ओळखण्‍याचे महत्‍व.  

आपली तत्‍व आणि मूल्‍यं यांतील फरक ओळखण्‍याचे महत्‍व.  तत्‍वे ही नैसर्गिक व बाह्य असतात तर मूल्‍यं ही अंतर्गत व सापेक्ष असतात.  तत्‍व ही नैसर्गिक असल्‍याने साहजिकच जगभरातील मानवजातीला असणार आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या संस्‍कृतीनुसार आचरणही वेगळ्या पद्धतीने केलेलं आढळते. पण तत्‍व तीच असतात.

जगातील प्रमुख ६-धर्मांमध्‍ये ही तत्‍वं आढळली आहेत.  जगातील समाज जीवनातील प्रश्‍न-समस्‍या, गरजा, यांमागील तत्‍वे समानच असल्‍याचे जाणवते.  संयम, निष्‍ठा, धैर्य, विवेक, साधेपणा, नम्रता असे गुण, चारित्र्य, न्‍यायतत्‍व, नैतिकता, जाणीव, जबाबदारी, प्रामाणिकपणा, हेतू, सहकार्य, संवाद, आदर इत्‍यादी परिस्थितीविशिष्‍ट-संस्‍कृती सापेक्ष परंतू वैश्विक असतात.  ह्या वैश्विक तत्‍वांचा अर्थ प्रत्‍येक संस्‍कृती वेगवेळ्या त-हेने लावते.*

आपण जगत असलेल्‍या समाजातील समस्‍याच अशी आहे की, आपण एका परस्‍परावलंबी वास्‍तवात जगत आहोत आणि आपल्‍याला त्‍यांच्‍याशी जुळवून घेऊनच पुढे जाता येते.  आणि आजच्‍या काळात आपल्‍या सध्‍याच्‍या क्षमतेपेक्षा अधिक परस्‍परावलंबित्‍व (Inter dependable) कौशल्‍यांची गरज लागते.

जीवनावश्‍यक कौशल्‍यं आपल्‍या जीवनात उतरवून, स्‍वतःचा विकास करून घेण्‍यासाठी, यशस्‍वी होण्‍यासाठी सर्वकालीन परिणामकारक अशा ०७-सवयी यांचा अभ्‍यास ही पुस्‍तक करून घेण्‍यास सक्षम आहे.      

कौटुंबिक, वैयक्तिक व व्‍यावसायिकच नाही तर जीवनातील प्रत्‍येक क्षेत्रात आपल्‍याला कामी पडतील, महत्‍वपूर्ण आणि परिणामकारक अशा ७-सवयी आहेत.

जीवनाकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन बदलण्‍याची ह्या सात सवयींमध्‍ये शक्‍ती आहे.  आपल्‍या माहितीतील प्रत्‍येकाला हे उत्‍कृष्‍ट पुस्‍तक वाचन करायलाच पाहिजे, इतरांनाही भेट स्‍वरूपात देवून वाचण्‍यास प्रोत्‍साहन द्यावे अशी ही पुस्‍तक आहे.

सात सवयी : 7 Habits

परावलंबन

(मन विजय)

१.       अग्रक्रमी व्‍हा...- वैयक्तिक दृष्‍टीची तत्‍वे  

२.       शेवट मनात ठेवून सुरूवात करा (सकारात्‍मक वृत्‍तीने पुढे चाला)- वैयक्तिक नेतृत्‍वाची तत्‍वे

३.       प्रथम कार्य- प्रथम- वैयक्तिक व्‍यवस्‍थापनाची तत्‍वे

स्‍वावलंबन

४.       जिंकू-जिंकू विचार करा –व्‍यक्ति-व्‍यक्तींमधील नेतृत्‍वाची तत्‍वे

५.       प्रथम इतरांना समजून घ्‍या.  नंतर समजून घेण्‍याची अपेक्षा करा- सहभावनापूर्ण संवादाची तत्‍वे  

६.       सहभावना-सुसंगती-सहचर्य-सहकार्य करा –सर्जनशील सहकार्याची तत्‍वे

७.       पात्‍याला धार लावत राहा...! –समतोल स्‍व-नवीकरणाची तत्‍वे

(जन विजय)

परस्‍परावलंबन

८.       स्‍वतःचा आवाज ओळखा व आपला आवाज ओळखण्‍यासाठी इतरांना स्‍फूर्ती द्या. Coming soon

 

👉सारांश वाचन करण्यासाठी

 

#7-हॅबीट्स ऑफ हाईली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक परिचय सारांश # The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi #Book Review of Marathi Translation of international bestseller

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत. आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाचा.

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive