अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी-पुस्‍तक सारांश-भाग-१- Seven-7 Habits of Highly Effective People- Book Summary Part-1

आपल्‍या सवयीच आपला आरसा असतात जो आपले आतील खरे रूप दाखवत असतात. आपले खरे व्‍यक्‍तीमत्‍व कोणते आहे ते दाखवतात. सवयी आपल्‍या जीवनाचा महत्‍वाचा व शक्तिशाली भाग आहेत. सवयींद्वारेच जाणते-अजाणतेपणी आपले चरित्र प्रतिबिंबित करीत असतात.  आपले चरित्र्य हे मुळात आपल्‍या सवयींचे मिश्रण असते.  यांचेच परिणाम किंवा दुष्‍परिणाम आपण आपल्‍या जीवनात घडत असतात.

अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी

वैयक्तिक बदलातील शक्तिशाली धडे

लेखक- स्टिफन कोवी -

मराठी अनुवादः विदुला टोकेकर         

पुस्‍तक सारांश-भाग-१


 7 Habits of Highly Effective People

Book Review & Summary of Marathi Translation of international bestseller
The 7-Habits of Highly Effective People
by the Author Stephen Covey

Book Summary in Marathi

Part-1

 

95% of everything you do is the result of habit. -Aristotle

 

Form good habits And make them your masters
-Brian Tracy 

 

आपल्‍या सवयीच आपला आरसा असतात

 7 Habits of Highly Successful People

 

पुस्‍तक सारांश-भाग-१

मित्रांनो, आपल्‍या सवयीच आपला आरसा असतात जो आपले आतील खरे रूप दाखवत असतात. आपले खरे व्‍यक्‍तीमत्‍व कोणते आहे ते दाखवतात.

सवयी आपल्‍या जीवनाचा महत्‍वाचा व शक्तिशाली भाग आहेत. सवयींद्वारेच जाणते-अजाणतेपणी आपले चरित्र प्रतिबिंबित करीत असतात.  आपले चरित्र्य हे मुळात आपल्‍या सवयींचे मिश्रण असते.  यांचेच परिणाम किंवा दुष्‍परिणाम आपण आपल्‍या जीवनात घडत असतात.

ह्या सवयी लावताही येतात आणि मोडताही येतात,
लिहिने-वाचने इतके सोपे नाही एवढेच…
!

सवयींचा सुयोग्‍य आणि संपूर्ण क्षमतेणे, परिणामकारकपणे उपयोग करावयाचा असेल तर काही जुन्‍या परंतू खोलवर रूजलेल्‍या सवयींना मोडण्‍यासाठी फक्‍त जीवनशैलीतील किरकोळ बदल आणि इच्‍छाशक्‍तीच नाही तर यापेक्षा काहीतरी अधिक लागते.

वर्षानुवर्षे असलेल्‍या ह्या सवयीं त्‍यांचे आकर्षण, ओढ यांमुळे त्‍यांना आपण सहजासहजी, कपडे बदलल्‍यासारखे बदलू शकत नाही.  पुढील उदाहरणावरून तुम्‍हाला याची भेदकता समजून येईल. 

पण एकदाका आपण त्‍या चांगल्‍या सवयी लावून-रूजवून घेतल्‍या तर आपण एका वेगळ्याच उंचीवर पाहोचतो.

उदाहरनार्थः

पृथ्‍वीवरून अंतराळात चंद्राकडे झेपावताना अग्‍णीबाणाला (Space Rocket) गुरूत्‍वाकर्षणाची प्रचंड ओढ भेदून  केवळ पृथ्‍वीच्‍या कक्षेत पोहोचवण्‍यासाठीच सर्वांत जास्‍त शक्‍ती व इंधन खर्च करावे लागले होते.

प्रवासातील, उड्डाणानंतरच्‍या पहिल्‍या काही मिनिटामध्‍ये, पहिल्‍या काही मैलांमध्‍ये नंतरच्‍या काही दिवसांत खर्च झालेल्‍यापेक्षा जास्‍त इंधन व शक्‍ती खर्च झालेली होती.

चांगल्‍या सवयी ज्‍यांद्वारे आपले जीवन समृद्ध होईल, त्‍या रूजवायला, तेवढीच प्रबळ ईच्‍छाशक्‍ती, बदल व बांधिलकीची आवश्‍यकता असते.  म्‍हणून सवयींची व्‍याख्‍या बघितल्‍यास अधिक सोपे होईल. 

📗📘📖📘📙

  • सवयी कशा बनतात?
  • वाईट सवयींना बदलणे
  • नव्‍या चांगल्‍या सवयी रूजवणे
  • सवयी बदलणे एवढे अवघड का आहे? 
  • तसेच सवयींबद्दल विस्‍ताराने पुस्‍तक सारांश मराठीत वाचा.

अधिक वाचाः हॅबिट्स– दैनंदिन सवयींचा सापळा-चार्ल्स डुहिग पुस्‍तक सारांश मराठी)


📗📘📖📘📙

👉सवयीची व्‍याख्‍याः                      

आपल्‍या उद्देशासाठी आपण, ज्ञान, कौशल्‍य आणि तीव्र इच्‍छा यांचा साधारण विभाजक म्‍हणजे सवय अशी व्‍याख्‍या करू.

आकृतीः सवयी


ज्ञान म्‍हणजे ‘’काय आणि का करावं’’ अशी तात्विक धारणा.   

कौशल्‍य म्‍हणजे ‘’कसं’’ करावं आणि

तीव्र इच्‍छा म्हणजे प्रेरणा, ते करण्‍याची तळमळ होय.

 

यश (Success) ह्या संकल्‍पनेशी संबंधीत मागील दोन शतकांच्‍या म्‍हणजेच २०० वर्षांच्‍या साहित्‍याचा-Literature अभ्‍यास केल्‍यानंतर आणि ३००० वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटल्‍यानंतर लेखक स्‍टीफन कवी यांना एक चित्‍तवेधक गोष्‍ट कळाली.

त्‍यांनी त्‍यांच्‍या अभ्‍यासाद्वारे असे निष्‍कर्ष काढले की, मागील पन्‍नास वर्षात जेवढ्याकाही स्‍वयंविकास-स्‍वयंमदतीवर आधारित पुस्‍तकं-ग्रंथ लिहिण्‍यात आले त्‍यांच्‍यातील अधिकतर पुस्‍तकांत आपल्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाला कसे सुधारावे ह्या एकाच गोष्‍टीवर भर देण्‍यात आलेलं आहे. जसे की-

  • तुमची सार्वजनिक प्रतिमा कशी असायला पाहिजे, (Your Public Image)
  • तुम्‍ही लोकांशी कसे बोलता, कसे बोलायला पाहिजे, (Public Speaking)
  • जास्‍तीत जास्‍त पैसा-संपत्‍ती कशी कमवावी आणि (Earning More Money)
  • महत्‍वाच्‍या अशा काही क्‍लृप्‍त्‍या ज्‍यांद्वारे लोकांना प्रभावीत कसे करता येईल इत्‍यादी ह्या गोष्‍टीसुद्धा गरजेच्‍या आहेतच.

लोकव्‍यवहारः मित्र बनवा व लोकांवर प्रभाव पाडा

👉How to Impress, Influence People

 👉(Read also: How to Win Friends and Influence People by Dell Carnegie )

 📗📘📖📘📙

परंतू, स्‍टीफन कवी त्‍यांची पुस्‍तक अति-परिणामकारक लोकांच्‍या सात सवयी (7-Habits of Highly Effective People) मध्‍ये तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासावर (Personality Development) नाही तर तुमच्‍या चरित्र निर्माण (Character Development) करण्‍यावर भर देतात, ज्‍याला लेखक इन्‍साईड-आऊट  अप्रोच (Inside-Out Approach-आतुन-बाहेर) असे म्‍हणतात.

कारण, ह्या पन्‍नास वर्षांच्‍या अगोदर दीडशे वर्षांपर्यंत जेवढेकाही साहित्‍य, पुस्‍तकं लिहिण्‍यात आलेली आहेत ती माणसाच्‍या चरित्राचा विकास करण्‍यावर आधारित होती, व्‍यक्‍तीचे चरित्र सुधार करत होती, जो कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या यशाचे मूल-आधार किंवा पाया (Success Foundation) असतो.

जसे- प्रामाणिकपणा, नैतिकता, रित, शिष्‍टाचार, नैतिक मूल्‍ये इत्‍यादी
e.g.
-Honesty, Ethics, Manner, Moral Values etc.

यासाठीच तुम्‍हाला तुमच्‍या बाह्य व्‍यक्‍तीमत्‍वाला (Outer Personality) सुधारण्‍याअगोदर तुम्‍हाला तुमच्‍या चरित्राला आणि स्‍वतःला आतुन सुधारणा (Inside Development) करायला पाहिजे, असे चरित्र निर्माण  करण्‍यासाठी तुम्‍हाला ही पुस्‍तक मदत करेल.

तर सुरूवात करूया लेखक स्‍टीफन कवी यांच्‍या अति-परिणामकारक लोकांच्‍या सात सवयी पुस्‍तकाचे सारांशः

 

#सवय क्र.1: अग्रक्रमी व्‍हा (Be Proactive)

असं गृहित धरा की दोन वर्तुळ आहेत, पहिलं आहे काळजीचे वर्तुळ किंवा सर्कल ऑफ कन्‍सर्न ज्‍यामध्‍ये अशा सर्व गोष्‍टी येतात ज्‍यांवर तुमचे काहीच नियंत्रण नसते, तुम्‍ही त्‍यांना नियंत्रित करू शकत नाही.  जसे की, वातावरण कसे आहे, लोकं तुमच्‍याबद्दल काय विचार करतात, राजनिती, अर्थशास्‍त्र इत्‍यादी.

काळजीचे वर्तुळ व प्रभावाचे वर्तुळ -आकृती

तर दुसरं वर्तुळ आहे प्रभावाचे वर्तुळ किंवा सर्कल ऑफ इन्‍फ्लूएन्‍स ज्‍यामध्‍ये अशा सर्व गोष्‍टी येतात ज्‍यांना तुम्‍ही नियंत्रित करू शकता. जसे, तुमचे दृष्‍टीकोन (Attitude),  तुमच्‍या निवडी, तुमचे निर्णय, तुम्‍ही तुमच्‍या फावल्‍या वेळेत काय करता?  कोणाबरोबर आपला वेळ घालवता, तुमच्‍या सवयी, तुमचे छंद, इत्‍यादी

लेखक सांगतात की आयुष्‍य-जीवन जगण्‍याचे दोन मार्ग आहेत, एकतर तुम्‍ही प्रतिक्रिया देणारे प्रतिकर्मी -Reactive होऊ शकता किंवा दुसरं अग्रकर्मी-Proactive.

प्रतिकर्मी लोकं आपले आयुष्‍य काळजीच्‍या वर्तुळावर आधारित जीवन जगत असतात. म्‍हणजेच असे व्‍यक्‍ती त्‍या सर्वच गोष्‍टींविषयी तक्रारी करतात ज्‍या त्‍यांच्‍या नियंत्रणात नसतात.  आणि ज्‍या गोष्‍टी त्‍यांच्‍या नियंत्रणात असतात त्‍यांच्‍यावर ते काहीच काम करत नसतात. 

 

आणि स्‍वतःची जबाबदारी घेत नाहीत. आणि सर्व दोष इतरांवर किंवा आपल्‍या स्‍वतःच्‍या नशीबावर टाकत असतात, नशीबाला दोष देत असतात. कोणत्‍याही गोष्‍टीविषयी विचार करण्‍याअगोदर प्रतिक्रिया देत असतात.

👉Proactive people: Result of their Decisions Not Destiny

तर अग्रकर्मी लोकांचं याउलट असतं. त्‍यांचे आयुष्‍य प्रभावाच्‍या वर्तुळासेाबत फिरत असते.  अग्रकर्मी लोकांना हे माहित असतं की त्‍यांचे जीवन त्‍यांच्‍या न‍शीबाचे नाही, तर त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयांचे परिपाक असते. त्‍यांची सध्‍याची स्थिती-परिस्थितीसाठी ते स्‍वतः जबाबदार आहेत त्‍यांचे नशीब नाही.   

ज्‍यांच्‍यावर आपले नियंत्रण नाही अशा गोष्‍टींवर अग्रकर्मी व्‍यक्‍ती कधीही तक्रारी करत नाहीत.  खरं तर अग्रकर्मी व्‍यक्‍ती त्‍या सर्व गोष्‍टींची जबाबदारी घेत असतात ज्‍यांना ते खरोखरच बदलू शकतात आणि त्‍यांवर अग्रकर्माने कार्य-कृती करत असतात.

अग्रकर्मी-Proactive आणि प्रतिकर्मी- Reactive व्‍यक्‍तींमध्‍ये एक सामान्‍य फरक असतो की, एक प्रतिकर्मी व्‍यक्‍ती काहीही जरी झाले तर अधिक विचार न करता त्‍यावर अतिरंजीत किंवा नकारात्‍मकपणे प्रतिक्रिया देत असतो. 

तर त्‍याउलट अग्रकर्मी व्‍यक्‍ती परिस्थितीला चांगल्‍या पद्धतीने समजून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असतो, समाधान शोधत असतो आणि प्रतिक्रिया देण्‍यापेक्षा कृती करण्‍यावर अधिक लक्ष केंद्रित करत असतो.

 

#सवय क्र.२- शेवट मनात ठेवून सुरूवात करा (Begin with end in mind)

तुम्‍ही आयुष्‍यात कोठेही जाऊ इच्छिता, जे काही प्राप्‍त करण्‍याची तुमची इच्‍छा आहे, त्‍यासाठी तुमच्‍याकडे एक नकाशा असायला पाहिजे.  तुम्‍हाला आयुष्‍यात नेमकं काय करायचं आहे? कुठं जायचं आहे? तुमचे ध्‍येय काय आहेत? तुमचे गंतव्‍य-Destination काय आहे? आणि त्‍या गंतव्‍य स्‍थानापर्यंत पोहोचण्‍यासाठी तुमच्‍याकडे काय योजना आहे?

👉Remember: Purpose of life, Goals, Roadmap, Mindmap, Plan, Destination

कल्‍पना करा की, तुम्‍ही पायरीवर चढत आहात, आणि वर-वर चढतच जात आहोत, ह्या पाय-या तुमच्‍या आयुष्‍याच्‍या आहेत, तुम्‍ही खूप श्रम-मेहनत करत आहात, योग्‍य काम करत आहात, आणि दर महिण्‍याला, प्रत्‍येक वर्षी आपल्‍या जीवनात प्रगती करत आहात. 

परंतू, जसेही तुम्‍ही शेवटच्‍या पायरीवर चढायला जात असता तुम्‍हाला अशी जाणीव होते की ही पायरी तर चुकीच्‍या भींतीवर लावलेली होती, आणि आता तर तुम्‍ही खूप वर आलेले आहोत, आणि परत मागे जाणेही शक्‍य नाही.

आता, अधिकतर लोकं-व्‍यक्‍ती, त्‍यांचे जीवन वर सांगीतल्‍याप्रमाणेच जगत असतात. त्‍यांचे कोणतेही ध्‍येय-दृष्‍टी (व्हिजन) नसते, ते फक्‍त इतर लोकांच्‍या जीवनाकडे पाहतात. कोण सर्वांत जास्‍त सुखी आहे आणि बास, त्‍यांनाच ते आपल्‍या आयुष्‍यातील आदर्श-श्रेष्‍ठ माणून त्‍यांची नक्‍कल करायला लागतात. आणि तसेच जीवन जगण्‍यासाठी धडपडत राहतात.

यासाठीच, लेखक असे म्‍हणतात की,

तुमच्‍या जीवनात एक कारण-उद्देश जर तुम्‍हाला माहित नाही की, तुमच्‍या आयुष्‍याचे उद्देश काय आहे तर असं विचार करा की, तुमची काय इच्‍छा आहे की लोकांनी तुम्‍हाला काय किंवा तुमच्‍यानंतर कसे म्‍हणून लक्षात ठेवायला पाहिजे.
तुम्‍ही ह्या जगात काय आणि कोणत्‍या मौल्‍यवान गोष्‍टीची पुर्तता करत आहात, (Adding Value) इतरांना, जगात काय देत आहात?
(Purpose) असायला पाहिजे, जो तुमचे शेवटचे ध्‍येय आहे.  आयुष्‍यातील उद्देशाविना तुम्‍ही तुमच्‍या जीवनाचे नियंत्रण इतरांच्‍या हातात देत असता. (जसं एखाद्या टी.व्‍ही.च्‍या रिमोट कंट्रोल त्‍याप्रमाणे).

स्‍वतःशीच असा प्रश्‍न केल्‍याने तुम्‍हाला तुमच्‍या जीवनाचा उद्देश काय आहे ह्याविषयी स्‍पष्‍टता येईल.  तुम्‍हाला तुमच्‍या आयुष्‍यातील ध्‍येयाची जाणीव व्‍हायला लागेल.  आणि तुम्‍ही तुमच्‍या जीवन उद्देशांना-ध्‍येयांना प्राप्‍त करण्‍यासाठी कृती करायला सुरूवात कराल.

 

👉#सवय क्र.3: प्रथम कार्य प्रथम (Put First Thing First)

आपण पाहिलेल्‍या दूरदृष्‍टीला-सत्‍यात उतरविण्‍यासाठी (Vision into Reality)आपल्‍याला सतत कृती (Actions) करत राहावे लागते.  आपल्‍या ध्‍येय व उद्देशापासून विचलित करणा-या सर्वच गोष्‍टींना टाळून आपल्‍या अंतिम ध्‍येयाकडे लक्षकेंद्रित करावे लागते.  आणि इथेच आपल्‍याला आपल्‍या दैनंदिन कार्ये व सवयींचा आपल्‍याला अव्‍हान असते.

तुमच्‍यासाठी ह्यावेळी सर्वांत महत्‍त्‍वाचे काय आहे? तुमचे शिक्षण, तुमचे नातेसंबंध, किंवा तुमचे आरोग्‍य?  आणि यापैकी जर एखादी महत्‍त्‍वाची गोष्‍ट तुमच्‍या आयुष्‍यासाठी असेल तर काय तुम्‍ही त्‍यासाठी आपला जास्‍तीत जास्‍त वेळ देत आहात?

आणि त्‍यासाठी आपले १०० टक्‍के प्रयत्‍न-श्रम-मेहनत देत आहात? किंवा टी.व्‍ही. वरील हास्‍य-मनोरंजन इत्‍यादी कार्यक्रम पाहण्‍यात, किंवा इंटरनेटवर, समाजमाध्‍यमावर तास-न-तास रेंगाळत बसणे आणि इतर बाष्‍कळ, विनोदी, खिळवून ठेवणारे परंतू निकामी कार्यक्रम पाहात बसणे व बेकार बातम्‍या, अशा अनावश्‍यक गोष्‍टींमध्‍ये आपला महत्‍त्‍वपूर्ण वेळ वाया घालवत आहात?

अधिक वाचाः मोबाईचे वेड कसे सोडवावेः Hyper Focus ख्रिस बेले पुस्‍तक सारांश मराठी
मोबाईचे वेड कसे सोडवावे
Hyper Focus- Author- Chris Bailey
हायपर फोकस- लेखक- ख्रिस बेले
अधिक वाचाः मोबाईचे वेड कसे सोडवावेः Hyper Focus ख्रिस बेले पुस्‍तक सारांश मराठी

📗📘📖📘📙

जर वरीलपैकी गोष्‍टीत तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍याचा महत्‍वपूर्ण वेळ वाया घालवत असाल तर तुमच्‍यासाठीच ही प्रथम कार्य प्रथम- Put First Thing First ही तिसरी सवय महत्‍वाची व निर्णाय ठरते. यासाठी ह्या सवयीला तुम्‍हाला तुमच्‍या आयुष्‍यात समावेश करायला पाहिजे.

दैनंदिन सवयींमध्‍ये बदल करण्‍यासाठी व आयुष्‍यात परिवर्तन आणण्‍यासाठी ह्या सवयीचा महत्‍वाचा वाटा आहे. ह्या सवयीला तुमच्‍या आयुष्‍यात आत्‍मसात केल्‍यास, विकसित केल्‍यास आपण दररोज सहजच सर्वांत आधी त्‍या  गोष्‍टीवर आपले जास्‍तीत जास्‍त श्रम-मेहनत लावत असतो ज्‍या आपल्‍या आयुष्‍यात सर्वांत महत्‍वाच्‍या आहेत.

अशा गोष्‍टींना प्राथमिकता देत असतो ज्‍या आपल्‍या आयुष्‍यात मूल्‍यांची वाढ करत असतात. आपल्‍या जीवनात मौलिक घटकांचा विकास करायला महत्‍वाच्‍या असतात.

उदाहरणार्थः

समजा तुमचे आरोग्‍य खूपच खराब आहे, आणि तुम्‍ही तुमच्‍या शरिराकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे ते योग्‍य आकारात नाही. तेव्‍हा तुमची क्रमांक एक वरची प्राथमिकता तुमचे आरोग्‍य असायला पाहिजे. त्‍यासाठी तुम्‍हाला तुमच्‍या आहाराचे नियोजन करायला पाहिजे. दररोज व्‍यायाम करायला पाहिजे. 

आणि जिभेसाठी चमचमीत पदार्थ न खाता तुमच्‍या शरीरासाठी आवश्‍यक असणारे पदार्थ इत्‍यादींचा आहारात समावेश करायला पाहिजे. फास्‍टफूड-जंकफूड यांना टाळायला पाहिजे.

 आळस आणि लालसा
यांमुळे सवयींचा गुलाम

परंतू, तुम्‍ही असे करत नाही..! चालढकल (Procrastination) व आळशीपणामुळे (Laziness) व्‍यायामाकडे दुर्लक्ष आणि मनावर ताबा न ठेवता जिभेच्‍या लालसेसाठी तुम्‍ही तुमच्‍या आहेत्‍या परिस्थितीला अधिकच खराब करत राहता. आणि आपण वाईट सवयींचे गुलाम होऊन बसतो.

____📗📘📖📘📙_____

#अधिक वाचा: वाईट सवयी कशा सोडव्‍या व नव्‍या चांगल्‍या सवयी कशा बनवाव्‍या

Habits: हॅबिटस- दैनंदिन सवयींचा सापळा

  ____📗📘📖📘📙_____


Eat That Frog: ईट दॅट फ्रॉग- सर्वांत कठीण काम सर्वांत आधी


#Atomic Habits #Micro Habits #Mini Habits #Now Habit #Tiny Habits #Achievement Habit #Psychology of Laziness #आलस का मनोविज्ञान #Reading Habit #5 Five Habits of Emotionally/Mentally Strong People- Daniel Goleman #6 Six Healthy Habits that make you Mentally Strong- Psych2Go #11 Habits for Respect- Seeken #10 Habits to Maximise Brain Power- Yebook #9 Nine Habits That Damage your Brain- Psych2Go #3 Three Habits that Boost Mental Clarity- Better Ideas #Daily Habits of Successful People- Brian Tracy #7 Seven Practical and Real Life MicroHabits- Hum Jeetenge #Good Habits, Bad Habits- Windy Wood #

पण जेव्‍हा आपल्‍या मनात हे हे (Clarity) स्‍पष्‍ट होऊन जातं की, आपल्‍यासाठी काय करणं योग्‍य आणि आवश्‍यक आहे, पक्‍कं बिंबवलं जातं की आपल्‍यासाठी काय करणे गरजेचे आहे? तर तेव्‍हा आपण इतर सर्व गोष्‍टींना सोडून त्‍या गोष्‍टीला अधिक प्राथमिकता देतो.

 

#सवय क्र.४: जिंकू-जिंकू विचार करा (Think Win-Win)

आपल्‍यापैकी अधिकांश लोकांचं असं मत असतं की, दोन व्‍यक्‍तीपैकी कोण्‍या एकाला जिंकण्‍यासाठी दुस-याला हरणे गरजेचे आहे, ज्‍याला लेखक जिंकू-हारा संबंध (Win-Lose Relationship) विन-लूज रिलेशनशिप असे म्‍हणतात.  

Win-Lose Relationship

जगामध्‍ये अधिकतर लोकं ह्याच मानसिकतेने जगत असतात. आपल्‍या फायद्यासाठी दुस-यांचे नुकसान करत असतात.  स्‍वतःला मोठं दाखविण्‍यासाठी दुस-यांना छोटा लेखतात, जाणवू देतात. लेखक असे म्‍हणतात की, आपल्‍याला ह्या जिंकू-हारा Win-Lose मानसिकतेला सोडून जिंकू-जिंकू (Win-Win) मानसिकतेचा विकास करायला पाहिजे.


 WIN-WIN RELATIONSHIP

जिंकू-जिंकू मानसिकतेत तुम्‍ही असा विचार करता की, कसं तुम्‍ही पुढच्‍या व्‍यक्‍तीचा फायदा करू शकता, ज्‍यामुळे तुम्‍हालाही फायदा होऊ शकेल.

जसे उदाहरणार्थ,
तुमच्‍याशी आम्‍ही हे अति-परिणामकारक लोकांच्‍या सात सवयीः लेखक-स्‍टीफन कवी यांच्‍या पुस्‍तकाचे सारांश शेअर करत आहोत.  पुस्‍तकांतील ज्ञानाला तुमच्‍यासोबत वाटत आहोत
, ज्‍यामुळे तुमच्‍या आयुष्‍यात काहीतरी सकारात्‍मक बदल होईल, तुमचा फायदा होईल.

आणि यासोबतच तुम्‍ही आमच्‍या ह्या स्‍वयं-विकास, स्‍वयं-मदत, आत्‍म-विकास यासाठीच्‍या व्‍यासपीठावर, ई-वाचनालय या मंचावर येऊन हे सारांश वाचन करत आहोत ज्‍यामुळे आम्‍हालाही प्रोत्‍साहन भेटत आहे. ई-वाचनालय-www.evachnalay.in म्‍हणजेच आमचाही फायदा होत आहे.   

 

पुस्‍तकातील ज्ञानाद्वारे स्‍वतःचा फायदा करून घेऊन तुम्‍हीदेखील या व अशा स्‍वयंविकास साधू इच्छिणा-यांना इतरांना व आपल्‍या गरजू मित्र-नातेवाईकांना शेअर केल्‍यास ही माहिती वाटल्‍यास (शेअर केल्‍यास) तुम्‍हालाही जिंकल्‍यासारखे होईल.

येथे आपण दोघेही जिंकू-जिंकू मानसिकतेत आहोत. दोघांचाही फायदा होत आहे. ह्यामध्‍ये एकाला जिंकण्‍यासाठी दुस-याला हरण्‍याची आवश्‍यकता नसते. तर दोघेही जिंकत आहोत.

(👉लक्षात ठेवाः ज्ञान वाटल्‍याने अधिक वाढते. शिक्षणाचेही तसेच आहे एखादी गोष्‍ट तुम्‍हाला जास्‍तीत-जास्‍त काळासाठी लक्षात ठेवायची आहे आणि समजून घ्‍यायची आहे तेव्‍हा ते इतरांना सांगा, शिकवा, कळवा, समजावून सांगा तुम्‍हालाही पक्‍के होईल, समजेल.-Learning Pyramid

 

👉पुढील सारांश भाग दोन मध्‍ये पाहू .

भाग-२ वाचन करण्‍यासाठी  | For Part-2

 

📑📘📙📔📗

 

इतर संबंधित


 


 पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive