अति-परिणामकारक लोकांच्या ७-सवयी-पुस्तक सारांश-भाग-२- Seven-7 Habits of Highly Effective People- Book Summary Part-2
आपल्या सवयीच आपला आरसा असतात जो आपले आतील खरे रूप दाखवत असतात. आपले खरे व्यक्तीमत्व कोणते आहे ते दाखवतात. सवयी आपल्या जीवनाचा महत्वाचा व शक्तिशाली भाग आहेत. सवयींद्वारेच जाणते-अजाणतेपणी आपले चरित्र प्रतिबिंबित करीत असतात. आपले चरित्र्य हे मुळात आपल्या सवयींचे मिश्रण असते. यांचेच परिणाम किंवा दुष्परिणाम आपण आपल्या जीवनात घडत असतात.
अति-परिणामकारक लोकांच्या ७-सवयी
वैयक्तिक बदलातील शक्तिशाली धडे
लेखक- स्टिफन कोवी
मराठी अनुवादः विदुला टोकेकर
पुस्तक सारांश-भाग-२
📑📘📙📔📗
(भाग-१ वाचन करण्यासाठी येथून जा )
📑📘📙📔📗
7 Habits of Highly Effective People
Book Review
& Summary of Marathi
Translation of international bestseller
The 7-Habits of Highly Effective People
by the Author Stephen Covey
Book Summary in Marathi
पुस्तक सारांश-भाग-२ Part-2
📑📘📙📔📗
(भाग-१ वाचन करण्यासाठी येथून जा )
📑📘📙📔📗
👉टीपः ७ सवयींपैकी ४ सवयी आपण या पुस्तकाच्या सारांश भाग-१ पहिल्या भागामध्ये पाहिल्या आहेत कृपया वाचकांनी या पुस्तकाचा भाग-१ वाचन केला नसेल तर येथून वाचू शकता. (भाग-१ वाचन करण्यासाठी येथून जा )
#सवय क्र.५: प्रथम समजून घ्या, नंतर समजून घेण्याची अपेक्षा करा (Seek First to Understand, Then to be Understood)
लेखकांना त्यांच्या मुलासोबत कोणत्यातरी विषयावर एकतमत होत नव्हते. समजून घेताना अडचण येत होती. ते त्याच्याशी बोलत तर होतेच पण काहीच फायदा होत नव्हता. तो लेखकाचं काहीच ऐकत नव्हता. ह्या समस्येला घेऊन लेखक त्यांच्या एका मित्राजवळ गेले. आणि म्हणाले,
मी माझ्या मुलाला समजावून सांगण्यात असमर्थ ठरत आहे, त्याला समजावून सांगणे मला शक्य होत नाहीए, तो माझे काही ऐकतच नाहीऐ.
आता असे बोलणे ऐकल्यावर लेखकांचा मित्र त्यांना म्हणतो,
थांबा थोडं.., तुमचा मुलगा तुमचं बोलणं ऐकत नाही, यामुळेच तुम्ही त्याला समजून घेण्यात असमर्थ ठरत आहात.
मला असे वाटते की, त्याला समजण्यासाठी तुम्हाला त्याचे बोलणे ऐकायला पाहिजे आणि समजून घेण्याण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
आता हे तर सर्वांनाच माहित आहे की, दुस-यांना समजून घेण्यासाठी आपलेच बोलणे पुढे-पुढे रेटण्याऐवजी, सांगण्याऐवजी, आपल्याला त्यांचे ऐकायला पाहिजे. परंतू कोणीही ह्या गोष्टीला आत्मसात करून दैनंदिन व्यवहारात-संवाद व संभाषणात वापर करत नाहीत. आणि कोणी करतही असेल तर ते खूपच कमी प्रमाणात करत असतात.
कारण प्रत्येकजण हेच विचार करत असतो की पुढचा माणूस-व्यक्ती आपल्यासारखंच विचार करायला पाहिजे. आपण जे बोलत आहोत त्यावर सहमत व्हायला पाहिजे. परंतू आपण हे विसरून हातो की, ह्या जगात प्रत्येक व्यक्तीचे त्यांचे स्वतःचे असे वैयक्तिक आणि वेग-वेगळे विचार व अनुभव आहेत.
ज्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्यांचा आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन (Perception) आहे आणि आपला दृष्टीकोन वेगळा आहे. तर आपण कितीही प्रयत्न केलं तर कोणीही आपल्यासारखंच विचार करू शकत नाही.
यासाठीच आपल्याला आपली बुद्धी-शक्ती इतरांना आपल्यासारखे बनवण्यात खर्च करण्याऐवजी, वाया घालवण्याऐवजी आपल्याला त्यांचे बोलणे ऐकून घेऊन त्यांचे दृष्टीकोन समजून घ्यायला पाहिजे, की ते काय व कसे विचार आहेत, त्यामागील त्यांच्या काय काळज्या आहेत, काय कारणं आहेत ज्यामुळे ते असं विचार करत आहेत. त्यांचा दृष्टीकोन कशामुळे असा बनला आहे इत्यादी समजायला पाहिजे.
आणि आपल्याला त्यांच्या बोलण्याला ख-याअर्थाने समजून घेण्यासाठी त्यांच्यासारखीच जाणीव होऊ द्यायला पाहिजे की, आपण त्यांच्या जागी असतो तर काय विचार केला असता? काय आपणसुद्धा असाच विचार केला असता? याला लेखक Apathetic Listening असे म्हणतात.
Apathetic Listening
ऐकण्याची अशी अवस्था जिथे लोकं
ऐकूण घेण्याचे नाटक करत नाहीत तर ख-याअर्थाने पुढील व्यक्तीच्या बोलण्याला
समजून घेत असतात.
(अधिक वाचाः बोलणे सक्रियपणे ऐकून घेणे- Active Listening)
📑📘📙📔📗
#सवय क्र.6: सहकार्य (Synergy)
Synergy-Co-operation तालबध्दता-एकतानतेने बरोबर काम करणे
वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे समजले असेल की, प्रत्येक व्यक्ती एकदुस-यांपेक्षा वेगळा आहे. प्रत्येकाचे स्वतःचे अशी समजूत-Belief आहे.
आपापली विचारधारा-Ideologies आहे. आयुष्य आणि व्यवसाय किंवा आपल्या कारकीर्द याविषयी ते हाताळायची लोकांची स्वतःची आपली अशी एक पद्धत आहे.
लोकांचं एक-दुस-यांपासून ‘वेगळं’ असणं या कारणामुळेच त्यांच्यापासून संबंध तोडून राहणे किंवा फक्त स्विकार करणेच पुरेसं नाही, तर लेखक असे म्हणतात की आपल्याला ह्या ‘वेगळेपणाचा’ फायदा घ्यायाला पाहिजे.
(👉लक्षात ठेवा: येथे फायदा म्हटलेलं आहे ‘गैर-फायदा’ नाही) आणि लोकांकडे असलेले वेगवेगळे ज्ञान घेऊन स्वतःचे अनुभव वाढवायला व सुधारायला पाहिजे.
📑📘📙📔📗
(भाग-१ वाचन करण्यासाठी येथून जा )
📑📘📙📔📗
उदाहरणार्थः
सर्वच मोठ्या व बलाढ्य कंपन्यांचे CEO-विशेष कार्यकारी अधिकारी वर्ग आपल्यासोबत वेग-वेगळ्या क्षेत्रांचे व विषयांचे तज्ञ लोकांना ठेवतात जेणेकरून हे सर्वजण मिळून त्या कंपनीला योग्यमार्गाने व पुढे चालवतील.
तसेच अति-परिणामकारक लोकं हे जाणतात की, एकट्याने आपण फारकाही साध्य करू शकत नाही. ह्यासाठीच आपल्याला लोकांशी चांगले नातेसंबंध निर्माण करून, त्यांना आपल्यासोबत घेऊन चालणे अत्यंत महत्वाचे व खूपच गरजेचे आहे.
जसे उदाहरणार्थः
आपल्या मानवी शरीराचे वेगवेगळे बाह्यअंग व अंतरअंग (Internal & External Organs) मिळून संपूर्ण शरिराचे कार्य सुरळीतपणे चालवत असतात. यासारखेच खूपसारे लोकं मिळून एक सहकार (Synergy) निर्माण करतात, आणि एकमेकांसोबत मिळून कित्येक असाधारण ध्येय-उद्दिष्टे साध्य करतात.
# तन की बात |
स्पष्ट व सखोलपणे जीवनाला समजून घेणा-या व समजावून सांगणा-या ह्या ०६-सवयी आहेत परंतू त्यांचा सुरूवातीचे काही परिणामानंतर काहीच परिणाम होत नसेल तर सातव्या सवयीचे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेतले पाहिजे....
लेखक आपल्याला पुढच्या सवयीत कु-हाडीला धार लावण्यास सांगत आहेत. असे का?
चला तर मग पाहुया.. सवय-०७ कु-हाडीला धार लावा...
समतोल स्व-नवीकरणाची तत्वे
#सवय क्र.७: कु-हाडीला किंवा आरीला धार लावा (Sharpening the Saw)
मित्रांनो तुम्हाला कु-हाडीने
झाड तोडणारा लाकूडतोड्याची गोष्ट आठवत असेल.
ह्या वरिल सर्व सहा सवयींना निर्माण करणे, बनवणे म्हणजे एका मोठ्या झाडाला कापण्यासारखे तोडण्यासारखे आहे. ह्यामध्ये खूप श्रम-मेहनत लागते. परंतू कोणत्याही झाडाला कापण्यासाठी तुमची आरीचे पाते धारदार असायला पाहिजे किंवा कु-हाडीने तोडण्यासाठी तुमची कु-हाडीचे पाते धारदार असायला पाहिजे.
त्यासारखेच वरिल सहा सवयींना हाताळण्यासाठी तुम्हालाही तुमच्या या सवयींना वेळोवेळी धार लावत राहायला पाहिजे. जे करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या आयुष्यातील चार महत्वाच्या मितींवर लक्ष द्यायला पाहिजे. सतत सुधारणा करत राहायला पाहिजे.
ढोबळमानाने जवळजवळ आपल्या स्वभावाच्या चार मिती किंवा अन्य शब्दांमध्ये आपल्या अस्तित्वाचे चार आधारस्तंभ ज्यांच्यांवर आपले जीवन, व्यक्तीमत्व उभे असते.
(शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि सामाजिक किंवा भावनिक)
नवीकरणाच्या चार मितीः
- शारीरिक- नियमित व्यायाम, पोषण, तणावाचे व्यवस्थापन
- आत्मिक- मूल्यांविषयी स्पष्टता व बांधिलकी, अभ्यास, ध्यानधारणा
- मानसिक- वाचणे, लिहिणे, कल्पना करणे, नियोजन-आरेखन-खर्डा
- सामाजिक किंवा भावनिक- सेवा, दया, सहकार, आंतरिक सुरक्षा
अधिक वाचाः मॅस्लोव्हचे गरजांचे पिरॅमिड
📑📘📙📔📗
शरीरिक मितीः Physical
आपल्या मेंदूला, मनाला आपल्या सर्वोच्च गतीने व योग्य दिशेने कार्य करत राहण्यासाठी तुमचे शरीर योग्य आणि निरोगी असायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरिराची काळजी घेत राहायला पाहिजे.
यामध्ये आपल्या शरिराची उत्तमरित्या काळजी घेणे, ज्यामुळेच आपले भौतिक अस्तित्व आहे त्या शरिराला जपणे, काळजी घेणे इत्यादी येतं.
अधिक वाचाः साऊंड मांईंड इन अ साऊंड बॉडी लॅंग्वेज-देहबोली
📑📘📙📔📗
आत्मिक मितीः Spiritual
शरीरासोबतच तुम्हाल तुमच्या आत्मिक बाजूची देखिल काळजी घेत राहायला पाहिजे. ध्यानधारना, प्रार्थना, संगीत, कला, इत्यादी कोणतेही काम ज्यामुळे तुम्हाला आत्मिक आनंद व शांती व समाधान मिळते ते करायला पाहिजे.
सवय क्र.०२ येथे महत्वाची ठरते. आत्मिक मिती हा तुमचा गाभा, तुमचे केंद्र, तुमच्या मूल्यव्यवस्थेशी असलेली तुमची बाधिलकी आहे. आपापल्या धर्मग्रंथांमधील किंवा तुम्ही ज्या कोणत्या शक्तीला सर्वोच्च मानता, ज्यांवर तुमचा विश्वास, आस्था आहे त्यानुसर प्रार्थना, ध्यानधारणा करणे.
📑📘📙📔📗
(भाग-१ वाचन करण्यासाठी येथून जा )
📑📘📙📔📗
मानसिक मितीः Mental
आपल्या मनाला विकसित करत राहा, विचारांना योग्य दिशा व खोली देत राहण्यासाठी शिकत राहा, वाचन करत राहा. स्वयंविकास-स्वयंसुधार-आत्मविकास यावर आधारित साहित्य वाचा, ऑडिओ ऐकत राहा, व्हिडियो बघा, ज्यांमुळे तुम्ही कालपेक्षा आज अधिक चांगले व्हाल.
Better than Yesterday, Better than the Best,
Better Version of You.
Day and Night, day by day I am getting better and better…!
नव-नविन अनुभव घेत राहा, इतरांना शिकवा, ज्ञान घेत राहा आणि आपल्या मनाला-मेंदूच्या आरोग्याची चांगल्यारितीने काळजी घेत राहा.
आपले औपचारिक शिक्षण आणि आपली मानसिक प्रगती यांचा संबंध असतो. शाळेतील अभ्यासाची पद्धत, शिस्त, वाचन, लेखन, काही नवीन शिकणे यांच्या अभावी आपला मेंदू नंतर ह्या गोष्टींविषयी फारसे गंभीर राहात नाही. कामाच्या व्यतिरिक्त इतर काही नवीन शिकण्याचा, वाचण्याचा बघण्याचा प्रयत्न करत नाही.
सामाजिक-Social
आपल्या नातेसंबंधांना सांभाळणे, स्वतंत्रपणे जगणे, आपल्या कुटुंब-मित्र-परिवारासोबत वेळ घालावणे इत्यादी सर्व तुम्हाला भावनिक आधार देत राहील, मानसिकदृष्ट्या महत्वाचे आहे. आणि तुम्ही सामाजामध्ये उत्तम बनाल.
ह्या चारही बाजूंना सुधारत व विकसित करत राहिल्याने तुम्ही स्वतःला नेहमी स्फुर्तीदायक ठेवाल यासोबतच, तुमच्या इतर सवयींना यशस्वीरित्या आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकाल आणि सुखी-आनंदी-यशस्वी-सफल आयुष्य जगाल.
📑📘📙📔📗
सारांश समाप्त
धैर्यपुर्वक ह्या अति-परिणामकारक लोकांच्या ७-सवयी या पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद.
तर वाचक मित्रांनो अति-परिणामकारक लोकांच्या ७-सवयी ह्या पुस्तकाचे सारांश तुम्हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्याकडे अगोदरच होती व तुम्ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्हाला खालील टिप्पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्यक कळवा.
तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्थळवर तुम्हाला काही त्रुटी दिसून आल्यास, तुमच्या सूचना, तक्रारी, प्रश्न, अडचणी-समस्या असतील काही सुधारणा हव्या असतील, तर आम्हाला खालील टिप्पणी व ई-मेल द्वारे अवश्य कळवा, आम्ही आपली दखल अवश्य घेऊ. धन्यवाद.
#द 7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्या ७-सवयी पुस्तक परिचय #पुस्तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi #Book Summary in Marathi #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
पुस्तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्तरपणे पुस्तक वाचन करून आपले व्यक्तीमत्व सुधारा, आपला विकास करा, यशस्वी व्हा.
वैयक्तिक विकास, स्वयंमदतीवर ही पुस्तक तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्थळावरील अशाच संवाद कौशल्यांवर, लोकव्यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्तक सारांश अवश्य वाचा.
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या