कळतं, ते वळत का नाही? #मन की बात


स्‍वयंपाक करण्‍याआधी योग्‍य ती सामग्री गोळा केली तरी अन्‍न शिजवावं लागतंच ना? तसंच आहे मनाचं! उपाय कळून काय उपयोग? कृती करावीच लागणार ना...माइंड लर्निंग आणि बॉडी लर्निंंग म्‍हणजे मन शिकून समजून घेता येतं, पण अनुभवानं, प्रयत्‍नानं शरिराच्‍या अंगळवणी पडावं लागतं.

 

कळतं, ते वळत का नाही?

#मन की बात #मनाचे टॉक

लेख साभारः डॉ.राजेंद्र बर्वे, ख्‍यातनाम मनोविकारतज्‍ज्ञ, drrajendrabarve@gmail.com
दै.लोकमत, मंथन,
मुक्‍त श्‍वासाच्‍या दिशेने

 

मला ना सगळं कळतं, सगळं म्‍हणजे सगळंच.  अगदी कळतंच! 

आपल्‍याला दोन मनं असतात.  एक कॉन्‍शस माइंड आणि दुसरं अनकॉन्‍शस.  मला तशी च दोन मनं आहेत."

माझ्यासमोर बसून बोलणारी महिला सिक्‍सरवर सिक्‍सर मारत होती. 

'कळतंय ना तुम्‍हाला?' 

मी मान डोलावली, 'म्‍हणजे साधारण कळतंय...!' 

'तर माझं अनकॉन्‍शस माइंड आहे ना, त्‍याच्‍यापर्यंत संदेश पोहोचतच नाही.  त्‍यामुळे अनकॉन्‍शस माइंडमधून योग्‍य मेसेज मला म्‍हणजे कॉन्‍शस माइंडला मिळतच नाहीत!' 

- हे असे दणादण षटकार मारणा-या फलंदाजाचं अवसान बघताबघता गळालं. 

डोळ्यात अश्रू आले! मी टिश्‍यू पेपर दिला.  काही वेळ तसाच गेला.  असं बरेचदा होततं.  आपली समस्‍या नीट कळली आहे असं समजून आपण स्‍वतःची समजूत काढतो.  वरवर समजूत पटते, पण दिल है के मानता नहीं' अशी अवस्‍था होते.  'मला ना खूप भीती वाटते.  मनाला कितीही समजावलं, तरी भीती संपत नाही. भीतीचं रूपांतर काळीज कुरतडणा-या काळजीत होतं.  धीर सुटतो.  सगळं कळतं, पण वळत नाही! 

मग वाटतं कळलं नसतं तर बरं झालं असतं.  अज्ञानातच सूख असतजं ना!'  शेवटी मी त्‍यांना शांत करीत म्‍हणालो, 'म्‍हणजे तुमची समस्‍या तुम्‍हाला कळली आहे, पण प्रत्‍यक्षात त्‍या कळण्‍यानुसार तुमच्‍यात काही फरक पडत नाहीय. कळलेलं वळत नाहीय, समजेची उमज होत नाहीये!' 

 'होय, अगदी बरोबर!' त्‍या म्‍हणाल्‍या! 

रूग्‍ण तसे साधे असतात.  त्‍यांच्‍या सभोवतालचे लोक खरं म्‍हणजे त्‍यांची टिंगलटवाळी करीत असतात, त्‍याचा त्‍यांना खूप त्रास होत असतो.

'मी मानसशास्‍त्राचा खूप अभ्‍यास करते.  वाटलं की ते वाचून सगळं आपोआप वळू लागेल...!' 

'तसं नसतं हो', मी त्‍यांना म्‍हणालो, 'हे सगळे त्रास मानव शरीरधर्माचे असतात.  मनुष्‍यजन्‍माला धरूनच येतात.  अभ्‍यास करून माहिती आणि कधी ज्ञानही मिळतं, पण त्‍यामुळे आपल्‍या वैयक्तिक त्रासाचे, विकाराचे नि यातनेचे प्रश्‍न सुटत नाहीत. 

त्‍यामुळे एक फायदा होतो.  आपण आपलं दुःख यातना आणि विकाराचं स्‍वरूप स्‍वीकारतो, पण समजा मलेरियाचा ताप आला, तर त्‍याची सर्व लक्षणं पारखून मलेरिया बरा होईल का? ताप कसला आहे ते कळलं तरी तो आपोआप उतरत नाही ना! तुमचं तसं होतंय.

समस्‍येचं स्‍वरूप आणि मनाची अशी मांडणी कळली तरी प्रश्‍न आपोआप विरून जात नाहीत.  त्‍याकरिता वेगळे उपाय करावे लागतात.  मनाला चुचकारून, गोडीगुला‍बीने पटवून नव्‍या सवयी लावून घ्‍याव्‍या लागतात.  

मनाला घरगुती उदाहरणावरूनही लक्षात येईल, तुमच्‍या बाई खूप विचारात पडल्‍या आणि डोळे पुसून म्‍हणाल्‍या, 'आलं लक्षात, अहो स्‍वयंपाक करण्‍याआली योग्‍य ती सामग्री गोळा केली तरी अन्‍न शिजवावं लागतंच ना ?' मी म्‍हणालो, 'अगदी बरोबर समजलं, मी या प्रक्रियेला माइंड लर्निंग आणि बॉडी लर्निंंग म्‍हणतो.  म्‍हणजे मन शिकून समजून घेता येतं, पण अनुभवानं, प्रयत्‍नानं शरिराच्‍या अंगळवणी पडावं लागतं.

त्‍याला काही काळ जावा लागणारच ना! काही भाज्‍या पटकन शिजतात, तर काहींना बराच वेळ लागतो, त्‍यासाठी समज आणि चिकाटी हवी.   सगळ्या भाज्‍या आणि पदार्थ एकाच विशिष्‍ट वेळात शिजलेच पाहिजेत असा हट्ट का ?" 

 

- बाई एकदम सावरल्‍या. म्‍हणाल्‍या, 

'माझं काय चुकलं हे लक्षात येतंय आता! मी भीती कशी व का निर्माण होते यावर नेटवर खूप रिसर्च केला.  खूप माहिती जमा केली, पण पाच मिनिटांचीही ध्‍यानधारणा केली नाही.  योगासनं शिकले नाही.  साधा प्राणायमही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?'' 

मी हसत म्‍हणालो, 'कोच खेळाडूला शिकवितो, शिक्षक शिक्षण देतात, पण खेळायचं, शिकायचं, त्‍यासाठी धडपडून प्रयत्‍न करायचे हे आपलं काम असतं ना!" 

 

📑🔖📕📖📗📘📙

 

#मन की बात: जाणून घ्‍या मन मेंदू 





आपले मन-मेंदू एकूण वेळेपैकी 20 टक्‍के रिकामा असतो  

अधिक जाणून घ्‍याः टाळंटाळ टाळून, लक्ष केंद्रित कसे करावे- हायपर फोकस

📑🔖📕📖📗📘📙

 

 

 इतर संबंधितः

 

📑🔖📕📗📖📘📙

 

इतर संबंधितः 

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive