प्रवाह (फ्लो) मराठी- मिहाले चिक्‍झेन्‍तमिहाले-पुस्‍तक परिचय-सारांश-भाग-2 (Flow-book Summary in Marathi)

प्रवाह–फ्लो मध्‍ये काम करून 10 वर्षांचे लक्ष्‍य 6 महिण्‍यात पूर्ण करण्‍याचे गुपित 

स्थिर, अखंड प्रवाहात पुढे जाण्याची क्रिया किंवा वस्तुस्थिती. एखाद्या गोष्टीचा स्थिर, सतत प्रवाह, लीन, तल्‍लीन, मग्‍न, एकसूरीने, बेधूंदपणे, समर्पणाने, समग्रपणे, लक्ष केंद्रित करून, अविचलपणे, प्रवाहात काम करून 10 वर्षांचे लक्ष्‍य 6 महिण्‍यात पूर्ण करण्‍याचे गुपित

 प्रवाह (फ्लो)

लेखक

मिहाले चिक्‍झेन्‍तमिहाले

पुस्‍तक परिचय-सारांश मराठी

📗📘📙📙📖

 सारांश भाग-2

👉भाग 1 वाचन करण्‍यासाठी इथे क्‍लीक करा 

 📗📘📙📙📖

 


FLOW

MARATHI translation book summary
Author
Mihaly Csikszentmihalyi

📗📘📙📙📖

 सारांश भाग-2

👉भाग 1 वाचन करण्‍यासाठी इथे क्‍लीक करा 

 📗📘📙📙📖

मित्रांनो सारांश भाग-1 मध्‍ये आपण मेंदूच्‍या विविध लहरींबद्दल, अवस्‍थांबद्दल फ्लो-स्‍टेट किंवा प्रवाही अवस्‍था म्‍हणजे काय, त्‍याचे फायदे, इत्‍यादी पाहिलेलं आहे, आता पुढे या भागात म्‍हणजेच सारांश भाग-२ मध्‍ये लेखकांनी आपल्‍याला फ्लो-स्‍टेट मध्‍ये येण्‍यासाठी  थ्री-सी मेथड किंवा थ्री-सी पद्धत सांगितलेली आहे.  पाहुया थ्री सी मेथड.. 

 

 थ्री-सी मेथड

1.  थ्री-सी (3-C) पहिलं सी-C: आपले सभोवताल, वातावरण यांना विचलनमुक्‍त बनवणे

फ्लो स्‍टेट अथवा प्रवाही अवस्‍था आपण केंव्‍हा प्राप्‍त करू शकतो, जेव्‍हा आपण काम करता-करता कामात एवढे गढून जातो की आपल्‍याला काळ-वेळेचे भानच राहत नाही.  वेळ कशी निघून जाते, याचा अंदाजच येत नाही. 

जेव्‍हा तुमचं होणं आणि काम करणं एक होऊन जातं म्‍हणजेच असं वाटायला लागतं की आपण ह्याच कामासाठी बनलेलो आहोत. आपला जन्‍म हेच काम करण्‍यासाठी झालेला आहे.  तेव्‍हा आपण प्रवाही अवस्‍थेत असतो.

तुम्‍ही काम सुरू करताच प्रवाही अवस्‍था प्राप्‍त होत नाही. खरेतर वैज्ञानिक तर असं सांगतात की, तुम्‍हाला 15 ते 20 मिनिटे कोणत्‍याही विचलनाविना (without any distraction) कामाला संपूर्ण लक्ष केंद्रित करून करावे लागते.  जर तुम्‍ही 20 मिनिटांच्‍या लक्ष केंद्रित करण्‍याच्‍या अगोदरच विचलित होत असाल तर तुम्‍ही कधीच प्रवाही अवस्‍थेत पोहोचणार नाही.

असं-तसं करून समजा तुम्‍ही फ्लो-स्‍टेट म्‍हणजेच प्रवाही अवस्‍था प्राप्‍त करूनही घेतली आणि तेव्‍हाच टेबलावर ठेवलेल्‍या फोनवर एखादे संदेश झळकले आणि तुम्‍ही डोळ्यांनी त्‍यावर फक्‍त एकच (नजर) कटाक्ष टाकला, आणि परत आपले काम करू लागलात.. तेव्‍हा तुमचा मेंदू म्‍हणतो हं..तर मी कुठे होतो?

सांगायचा मुद्दा हाच की, केवळ एका सेकंदाच्‍या विचलनामुळे (distraction) तुम्‍ही धारण केलेली प्रवाही अवस्‍था, फ्लो-स्‍टेट तुटून जाते, भंग पावते आणि तुमचा येणारा अर्धा तास चक्‍क वाया जातो, पुन्‍हा ती प्रवाही अवस्‍था प्राप्‍त करण्‍यासाठी,

तसेच तुटते जसे हवेची हलकीशी झुळूक मेहनतीने तयार केलेल्‍या पत्‍त्‍याचा बंगला कोसळून पडतो त्‍याप्रमाणे.. 

 


आपल्‍यापैकी कित्‍येज जणांनी असा अनुभव घेतलेला असेलच.  जेव्‍हाही तुम्‍ही विचलित होत असता तर तेव्‍हा एक अटेंशन रेसिड्यू तयार होत असतो.  म्‍हणजेच अटेंशन रेसिड्यू म्‍हणजेच तुम्‍ही आलेल्‍या विचाराला किंवा विचलनाला (distraction) सोडून पुढे भलेही जाता परंतू तुमच्‍या मेंदूच्‍या काही भागामध्‍ये त्‍या विचाराविषयी किंवा त्‍या विचलनाबद्दल कुठेतरी प्रक्रिया चालू असतेच.

विचलनानंतर (distraction) आपल्‍या मेंदूला पुर्ववत होण्‍यासाठी, संपुर्णपणे लक्ष केंद्रित करण्‍यासाठी किंवा प्रवाही अवस्‍थेत येण्‍यासाठी जवळपास 20 ते 30 मिनिटे लागतात आणि या दरम्‍यान तुम्‍ही अत्‍यंत धिम्‍या गतीने (low productivity zone) काम करत असता.  म्‍हणजेच तुम्‍ही तीन तास काम करत आहोत आणि मध्‍येच तुम्‍ही 5 ते 6 वेळा फोनकडे बघितलं असेल तर तुम्‍ही कधीच प्रवाही अवस्‍थेत काम केलेलं नाही.  प्रवाही अवस्‍था गाठलीच नाही. दुस-या शब्‍दांमध्‍ये आपण असे म्‍हणू शकतो की

आपला मेंदू कोणत्‍याही दंडाविना, विचलनानंतर (distraction) पुन्‍हा लक्ष केंद्रित (focus) करण्‍यासाठी परत येतच नाही. यालाच स्विचिंग कॉस्‍ट’ (switching cost) असे म्‍हणतात, जो आपल्‍या उत्‍पादन क्षमतेला (productivity) 40 ते 50% पर्यंत कमी करत असतो.

थोडक्‍यात विचलन (distraction) हा लक्ष केंद्रित करण्‍याचा किंवा (flow) प्रवाही अवस्‍थेचा महाशत्रू आहे.

Distraction is enemy of FLOW

जर तुमची प्रवाही अवस्‍थेत येण्‍याची इच्‍छा आहे आणि त्‍याला तसेच राखून ठेवायचे असेल, अभंग, अविचल अवस्‍था ठेवायची असेल तर तुम्‍हाला एका विचलनमुक्‍त वातावरण (distraction free environment) तयार करावा लागेल. कोणतेही विचलन राहणार नाही अशा वातावरणात काम करावे लागेल.

चला तर मग जाणून घेऊ तुम्‍ही स्‍वतःसाठी एक विचलनमुक्‍त वातावरण निर्मिती कसे करू शकता? याविषयी काही युक्‍त्‍याः (युक्‍ती-क्‍लृप्‍ती (tips & tricks)

(how to create distraction free environment?)

 

विचलनमुक्‍त वातावरण निर्मिती करणे

  • विचलनमुक्‍त वातावरण निर्मिती करण्‍यासाठी आजच्‍या घडीला, सद्य परिस्थितीला अनुरूप पहिली पायरी अशी की सर्वांत आधी आपल्‍या मोबाईलमधील सर्वप्रकारच्‍या सेवा-सूचना बंद करा.
  • जर आपल्‍या मोबाईलमधील सूचना बंद (notification off) करणे शक्‍य होत नसेल तर निदान काम करतेवेळी मोबाईला आपल्‍या नजरेसमोरून कुठेतरी दूर सायलेंट मोडवर ठेवा.   (offline mode or airplane mode)  
  • तिसरी युक्‍ती अशी की आपल्‍या जवळील नातलग, कुटुंबातील सदस्‍य, मित्र-परिवार यांना सांगून ठेवा की तुम्‍ही कोणत्‍या वेळी कामात राहता आणि कोणत्‍या वेळी त्‍यांना भेटू शकता किंवा त्‍यांना भेटण्‍याची वेळ ठरवून द्या. 
  • जर तुम्‍ही ऑनलाईन काम करत आहोत आणि तुम्‍हाला एखादी माहिती गुगलवर शोधायची आहे त्‍यामध्‍येच तुम्‍हाला इतर काही माहिती जी तुम्‍हाला सध्‍या तरी नकोय परंतू समोर दिसत असल्‍यास आपसुकच तुम्‍ही त्‍या माहितीच्‍या स्‍त्रोताकडे उत्‍सुकतेपोटी, साहजिकच ओढल्‍या जाल, पण 
  • तुम्‍हाला सध्‍या जे हातात काम आहे त्‍या व्‍यतिरिक्‍त दुसरीकडे लक्ष द्यायला नको पाहिजे त्‍यासाठी इतर माहितीचे टॅब बंद करून नंतर पाहण्‍यासाठी चिन्‍हांकित करून ठेवा. 
  • ब्राऊजर मधील इतर अनावश्‍यक टॅब बंद करून एकाच कामावर लक्ष केंद्रित करा.

 

📖📙📘📗📕
मोबाईलचे वेड कसे सोडवावे व लक्ष केंद्रित कसे करावे

अधिक वाचाः  हायपर फोकस
📖📙📘📗📕📔

 

आता पाहुया दुसरे सी (C) जे आहे,

माकड मेंदूला.! (चंचल मनाला) नियंत्रित करणे (controlling the monkey mind)  

विचलनं (distractions) दोन प्रकारची असू शकतात, एक असतं आंतर (internal) आणि दुसरं बाह्य (external).  आता खरेतर वर पहिल्‍या सी-C मध्‍ये आपण बाह्य विचलनांना बंद केलेलं आहे आता बारी आहे इंटरनल डिस्‍ट्रॅक्‍शन म्‍हणजेच आंतरिक विचलनांना बंद करायची. (internal distractions)

आपला मेंदू दिवसभर, 24 तास चालणारे एक यंत्र आहे, जर का आपण त्‍याला नियंत्रित करू शकलो नाही तर तो एका विचारानंतर दुस-या विचारावर उड्या मारत राहिल, तसंच जसं एखादे माकड एका झाडावरून दुस-या झाडावर उड्या मारत असतो तसेच. यामुळेच बौद्ध विचारांमध्‍ये आपल्‍या अनियंत्रित मनाला माकड मेंदू (मन) (uncontrolled monkey mind) असे म्‍हणतात.

लक्षात घेण्‍यासारखी गोष्‍ट अशी आहे की, हॉवर्ड विश्‍वविद्यापीठामध्‍ये केल्‍या गेलेल्‍या एका संशोधनामध्‍ये, अभ्‍यासाअंती असे आढळून आले आहे की आपण आपल्‍या दिवसातील पन्‍नास टक्‍के (50%) भाग ह्याच माकड मेंदू (मनाने) तयार केलेल्‍या विचारांद्वारेच दिवस घालवत असतो.

Uncontrolled mind causes mental fatigue

अनियंत्रित मन मानसिक थकवा निर्माण करत असतो, आपली शारिरीक म्‍हणजेच तुमचा मेंदू विचार करून-करून थकायला लागतो आणि तुम्‍ही कोणतेही शारिरीक श्रम-मेहनत न करताही थकून जात असता.  तुम्‍हाला कोणतेही शारिरीक काम न करीतादेखिल शरिराने थकवा जाणवत असतो.  (tired, fatigue and exhausted) अशा थकलेल्‍या दमलेल्‍या अवस्‍थेमध्‍ये प्रवाही अवस्‍था प्राप्‍त करणे जवळ-जवळ अशक्‍य आहे.

म्‍हणजेच आंतरिक विचलनांना थांबविण्‍यासाठी तुम्‍हाला तुमच्‍या मनाला आणि तयार होत असलेल्‍या विचारांना नियंत्रित करायला पाहिजे.  यासाठी तुम्‍हाला काही युक्‍त्‍या व क्‍लृप्‍त्‍या पुढील प्रमाणे आहेतः

 

1. थकविणा-या अनावश्‍यक माहितीला आळा घालणे

आपल्‍या स्‍वतःच्‍या माहितीचा प्रवाह नियंत्रित करून अनावश्‍यक व अति-माहितीला आळा घाला. (avoid over information intake). दिवस-रात्र आपल्‍यावर अतिप्रचंड माहितीच्‍या साठ्याचा होणारा प्रचंड मारा आपल्‍यासाठी घातक आहे.   

जेव्‍हा केव्‍हा आपण एखाद्या गोष्‍ट-प्रसंगाविषयी ऐकत असतो तेव्‍हा आपला मेंदू-मन त्‍या आलेल्‍या माहितीवर प्रक्रिया करून त्‍यामध्‍ये तर्क (logic) शोधायला लागत असतो, त्‍यामध्‍ये स्‍वतःकडे असलेल्‍या पुर्वीच्‍या माहितीशी व त्‍या प्रसंगाशी संबंध जोडून एक नविनच परंतू अनावश्‍यक माहितीची भर टाकत असतो. 

Overloaded information Hang your mind like computer

म्‍हणजेच तुम्‍ही जितकी जास्‍त माहिती ग्रहण कराल (information consumption) तेवढी जास्‍त प्रक्रिया तुमच्‍या मनाला-मेंदूला करावी लागेल परिणामी आपल्‍याला मानसिक-शारिरीक थकवा जाणवत असतो. (feels physical & mental fatigue). 

तर यासाठीच अनावश्‍यक बातम्‍यांचा भडिमार करणं थांबवा, सामाजिक माध्‍यमं यांचा वापर कमी करा, गप्‍पा-टप्‍पा-गोष्‍टी जेवढं शक्‍य होईल तेवढं कमी करा.    

 

2. एक वही-डायरी-चोपडी सोबत ठेवून काम करणे

आधुनिक माहितीच्‍या या समस्‍येवर उपायही आपल्‍यालाच काढावा लागेल कारण इतरांना नियंत्रित करण्‍यापेक्षा स्‍वतःला नियंत्रित करणे अधिक सोपे असते. म्‍हणून जेव्‍हा-केंव्‍हा तुम्‍ही काम करत असता तेव्‍हा सोबत एक वही-पेन,चोपडी किंवा डायरी सोबत ठेवा, जेव्‍हा तुम्‍हाला एखादी कल्‍पना सुचल्‍यास किंवा एखादी आठवण लक्षात येईल तेव्‍हा त्‍या वहीत किंवा डायरीमध्‍ये लिहून घ्‍या, नोंदवून ठेवा.

कारण तुम्‍हाला तुमच्‍या मनाला-मेंदूला नव-नविन, सर्जनशील आयडिया-कल्‍पना यांचा कल्‍पनेचा-कबाडखाना- कल्‍पना नवविचार यांना साठवून ठेवण्‍याची पेटी-डबा बनवायचे नाही तर त्‍याला रचनात्‍मक व सृजनात्‍मक बनवायचे आहे.

(म्‍हणजेच तुम्‍ही जितकी जास्‍त माहिती ग्रहण कराल (information consumption) तेवढी जास्‍त प्रक्रिया तुमच्‍या मनाला पर्यायाने मेंदूला करावी लागेल अर्थातच या सर्व मानसिक प्रक्रियेला लागत असते.

ती शारिरीक शक्‍ती क्षीण होत असते, आपण अन्‍नातून घेत असतो ती शक्‍ती रक्‍ताद्वारे आपल्‍या सर्व शरिरामध्‍ये पोहोचवली जाते, कमालीची गोष्‍ट अशी की आपला मेंदू महाशय एकटा आपल्‍या शरिराच्‍या इतर अवयवयांच्‍या तुलनेत व शरिराच्‍या गरजेपैकी 20 टक्‍के रक्‍त पचवत असतो..! 

म्‍हणजेच शरिरातील सर्वांत जास्‍त शक्‍ती मेंदू शोषत असतो.  

यासाठी अधिक माहिती असेल तर साहजिकच जास्‍त विचार कराल तर त्‍यावर अधिक प्रक्रिया मेंदूला करावी लागेल त्‍यामुळे कोणतेही शारिरीक श्रम-मेहनत न करताही आपल्‍याला शरिराने थकविण्‍याचे-दमविण्‍याची ताकद एकट्या मेंदूमध्‍ये आहे. यासाठी आपली प्रचंड माहितीची भूक व तहान शमविण्‍यासाठी एकच उपाय आहे तो म्‍हणजे आपले काम नियोजित पद्धतीने करा.)  

अधिक माहिती 


अधिक मानसिक प्रक्रिया


अधिक मानसिक श्रम-मेहनत


मेंदूसाठी जास्‍तीचा रक्‍तपुरवठा


अधिक उर्जेची आवश्‍यकता


शरिरातील शक्‍ती क्षीण होते


परिणामी थकवा येतो-आपण दमतो

 

3. चहा-कॉफी-साखर यांचा अतिरेक नको

चहा-कॉफी किंवा साखरे पासून निर्मित गोड पदार्थ किंवा सॉफ्ट ड्रिंक्‍स ज्‍यांमध्‍ये साखरेचे प्रमाण अत्‍याधिक असते जे आपल्‍या शरिराला अनावश्‍यक तर असतेच घातकसुद्धा असते.  काही लोकांना दिवसभरात चार ते पाच वेळा चहा-कॉफी पिण्‍याची सवय असते, परंतू, हे शास्‍त्रीयदृष्‍ट्या सिद्ध झालेलं आहे की, साखर, चहा-कॉफी यांच्‍यातील घटकांमुळे आपल्‍या मेंदूची कार्यप्रणाली बिघडते.

आवश्‍यकतेपेक्षा जास्‍त साखर-चहा-कॉफी घेतल्‍याने किंवा टॅनिन-कॅफीन-साखरेचे प्रमाण जास्‍त असलेले खाद्यपदार्थ यांचे अतिसेवन (over consumption) केल्‍याने आपले मेंदू अत्‍याधिक विचारी (over thinker) व अनियंत्रित (uncontrolled) होऊन जाते.

 

4.  स्‍वतःची दैनंदिनी (डायरी-नोंदवही) लिहायला सुरूवात करणे (start journaling)

Once its on the PAPER it not in your MIND अशी एक म्‍हण आहे. याचे अर्थ असे की, एकदाका तुम्‍ही तुमच्‍या मनातील गोष्‍टींना-कल्‍पनांना-विचारांना कागदार लिहून काढले की मग ते तुमच्‍या मेंदूला साठवण्‍याची आवश्‍यकता नसते. मेंदूला अत्‍याधिक माहितीला साठवून ठेवायची गरज भासत नाही.  

Once its on the PAPER it not in your MIND

अधिक वाचाः लिहिणे वाचणे-मानवनिर्मित उत्‍कृष्‍ट तंत्रज्ञानापैकी एक

 

यासाठीच आपल्‍या सर्वप्रकारच्‍या प्रबळ ईच्‍छा,विचार,कल्‍पना,‍चिंता,समस्‍या इत्‍यादी यांना दैनंदिनी किंवा डायरीमध्‍ये लिहून काढा.  यामुळे तुमच्‍या मनाला शांत राहण्‍यास मदत मिळेल.

 

5. ध्‍यान-धारणा करणे (meditation)

आपले पोट आपल्‍या ताब्‍यात नावाचे एक पुस्‍तक आहे त्‍या पुस्‍तकाच्‍या नावाप्रमाणेच आपले मन आपल्‍या हातात किंवा आपले मन आपल्‍या ताब्‍यात असे राहिल्‍यास इतर दुःख, चिंता, समस्‍या ब-याचअंशी कमी होऊन जातील.   

परंतू, आपल्‍या अतिचंचल मनाला ताब्‍यात ठेवण्‍यासाठी बरीच कसरत करावी लागते.  त्‍यातीलच एक सोपा उपाय म्‍हणजे आपण स्‍वतःला नियंत्रित करून, ठाम निश्‍चय करून मनाला त्‍याच्‍या मनाप्रमाणे नाही तर आपल्‍या मनाप्रमाणे वागवू शकतो.

आपल्‍या मनाला आपल्‍या मुठीत करण्‍याचा सर्वांत किफायतीशीर आणि हजारो वर्षे जुना परंतू सर्वप्रकारच्‍या मानवनिर्मित व्‍यवस्‍थांनी मान्‍य केलेला, पारखलेला, प्रमाणित केलेला व सिद्ध केलेला असा सर्वांत सोपा उपाय तो म्‍हणजे ध्‍यान-धारणा (meditation) करणे.

पूर्वीसारखे आजही जंगलात जाऊन, तास-न्-तास धुनी लावून, एकाच जागी बसून ध्‍यान-धारना करणे गरजेचे नाही, केवळ 10 मिनिटे डोळे मिटून खोल श्‍वासोच्‍छवास करून, आपल्‍या मनात जे विचार येतात त्‍यांना येऊ द्या, त्‍यांना काहीही न करता, त्‍याविषयी कोणतेही मत, विचार न बनवता त्‍यांना तसेच येऊ-द्या व जाऊ-द्या, आपल्‍या श्‍वासाला आत-बाहेर, येताना-जाताना स्‍वतःला जाणीव होऊ द्या. बास्..! तुमचे काम होऊन जाईल.!

आता पाहुया थ्री-सी पद्धतीच्‍या तिस-या "सी" जवळ,

 

ज्ञानाने आकलन करणे किंवा संज्ञात्‍मक सुधारणा करणे

कॉग्निटिव्‍ह ऑप्‍टीमायझेशन (cognitive optimization)

सोप्‍या शब्‍दांत समजून घ्‍यायचे झाल्‍यास कॉग्निटिव्‍ह ऑप्‍टीमायझेशन याचा अर्थ होतो, तुमचे विचार करण्‍याची, समजून घेण्‍याची क्षमता, आकलन क्षमता, माहिती-ज्ञान, जाणून घेण्‍याच्‍या प्रक्रियेला जेवढं शक्‍य होईल तेवढं वाढवणं.

आंतरिक आणि बाह्य विचलनांपासून सुटका मिळविल्‍यानंतर आता वेळ येते ती आपल्‍या मानसिक शक्‍तीला वाढविण्‍याची (maximizing mental power) ज्ञानाची जाणीव करण्‍याची, आकलन अर्थातच कॉग्निटिव्‍ह ऑप्‍टीमायझेशनची.

चला तर मग पाहुया जगभरातील सर्वमान्‍य न्‍युरोसायंटिस्‍ट, अभ्‍यासकांनी-वैज्ञानिकांनी-शास्‍त्रज्ञांनी सूचविलेल्‍या "संज्ञात्‍मक प्रोत्‍साहक" म्‍हणजेच "कॉग्निटिव्‍ह बुस्टर्सची" (cognitive boosters) जी तुम्‍हाला सखोलपणे, सर्वोच्‍च क्षमतांपर्यंत पोहाचविण्‍यास मदत करतील.  

 📗📘📙📙📖

 सारांश भाग-1

👉भाग 1 वाचन करण्‍यासाठी इथे क्‍लीक करा 

 📗📘📙📙📖

१. प्रबळ, उर्जावान वेळेला ओळखणे व काळाचा सदुपयोग करणे Make use of your peak energy time

तुमच्‍यासाठी दिवसभरातील (24 तासातील) अशी कोणती वेळ आहे जेव्‍हा तुम्‍ही अतिषय उर्जावान असता, तुम्‍हाला मानसिक व शारिरीकदृष्‍ट्या उत्‍साही वाटते, तुम्‍ही लक्ष केंद्रित असता असं तुम्‍हाला वाटते अशी विशिष्‍ट वेळ शोधणे.

काही लोकांना रात्री उशीरापर्यंत कामं करायला आवडतात, तर काहींना अगदी याउलट पहाटे-पहाटे कामं करायला आवडतात. परंतू अधिकतर लोकांना सकाळची वेळ सर्वोत्‍तम असते. 

यासाठीच तुमच्‍या सकाळच्‍या सर्वोच्‍च उत्‍कृष्‍ट अशा उत्‍साही, उर्जावान वेळेला ई-मेल, पत्राचार, गप्‍पाटप्‍पा, चहा-कॉफी, बातम्‍या यांमध्‍ये वाया घालविण्‍याऐवजी तुम्‍हाला तुमचं सर्वांत कौशल्‍याचं कस लागणारी अशी कामं (most skill requiring work) या वेळेत करायला पाहिजेत.

कारण फ्लो-स्‍टेट म्‍हणजेच प्रवाही अवस्‍थेला प्राप्‍त करण्‍यासाठी खूपसारी मानसिक शक्‍ती लागत असते.  रात्रभर आराम केल्‍यामुळे आपले मन-मेंदू-शरीर (mind & body completely relaxed) सगळे संपूर्णपणे निवांत अवस्‍थेत असतात, यासाठीच तुमची महत्‍वाची, कौशल्‍यपूर्ण, सर्जनशील असलेली कामं, किचकट अभ्‍यास, लिहिणे आणि नियोजन  (important, skill full & creative work, writing, planning etc.) यांसाठी सकाळच्‍या वेळेतील दोन ते तीन तास अवश्‍य काढून ठेवा.

उर्वरित व्‍यवस्‍थापणाची व उजळणी करावयाचे अशी इतर कामे यांच्‍यासाठी तुम्‍ही दुपारी किंवा संध्‍याकाळची वेळ  काढून, निवडून, राखून ठेवू शकता जेव्‍हा तुम्‍ही अगोदरच मानसिकरित्‍या दमलेले असता.

प्रवाही अवस्‍था-फ्लो स्‍टेट प्राप्‍त करण्‍याचा हाच सुवर्ण नियम आहे.


विशिष्‍ट पद्धतीने बनविलेले संगीत ऐकाः (listen to specifically designed playlist)

संगित उपचार पद्धतीबद्दल तर आपण सर्वजण जाणूनच आहोत.  परंतू काय तुम्‍हाला हे माहित आहे की, संगीत तुम्‍हाला लक्ष केंद्रित करण्‍यासाठी आणि चित्‍त एकाग्र करण्‍यासाठी देखिल तुमची मदत करू शकतो.

हे वैज्ञानिकदृष्‍ट्या सिद्ध झालेले तथ्‍य आहे की, काही विशिष्‍ट प्रकारचे संगित, तुमच्‍या मेंदूला अत्‍यंत सखोलपणे लक्ष केंद्रित करण्‍यासाठीचे असे अल्‍फा आणि थीटा लहरींच्‍या अवस्‍थेत घेऊन येतात.  

 तुम्‍हीसुद्धा तुम्‍हाला आवडतील अशा संगीताची यादी बनवा व ऐका, हे ऐकताना तुम्‍हाला बाहेरची विचलीत करणारी आवाजंसुद्धा ऐकू येणार नाहीत यासोबतच तुम्‍हाला लक्ष केंद्रित करण्‍यास सोपे जाईल. 

 

बॅरी गोल्‍डस्‍टीन यांनी आपल्‍या द सिक्रेट लॅंग्‍वेज ऑफ हार्ट (the secrete language of heart by barry Goldstein) या पुस्‍तकात सांगितलेलं आहे की, संगित, आवाजं आणि ध्‍वनीतरंगांना (music, sounds, vibrations) यांचा उपयोग करून व्‍यक्‍तीमत्‍व परिवर्तन व उपचारासाठी (healing & personal transformation) करू शकतो.    

 

चहा-कॉफीचे चतुराईने सेवन करणे (use caffeine strategically)

आपण वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे चहा-कॉफीचे अतिसेवन केल्‍याने आपले मेंदू-मन काही वेळेसाठी तल्‍लख होतो व तो (माकड मेंदू-चंचल मन) मंकी मांईंड (monkey mind) मध्‍ये बदलून जातो.  

हे जरी खरे असले तरी, हेसुद्धा तेवढेच खरे आहे की हलकेसे कॅफीनचे सेवन तुमच्‍या संज्ञात्‍मक स्‍तराला, जाणीवेच्‍या स्‍तराला, वाढवू शकतो. यामुळेच ब-याच लोकांसाठी चहा-कॉफी पिणे त्‍यांच्‍यासाठी सहकर्मचारी’ (working partner) झालेले असते.  त्‍यांना दर दोन-चार तासांनी चहा-कॉफी पिणे सवयीचे-नित्‍याचे परंतू गरजेचे वाटते.

 

शरिरातील पाण्‍याची पातळी सांभाळाः (check your water intake)

शरिरात पाण्‍याची कमतरता असणे आपल्‍या मेंदूसाठी घातक असते.  आपण कमी पाणी पिल्‍यामुळे, शरिरात पाण्‍याची पातळी कमी-कमी होते परिणामी आपल्‍या मेंदूमध्‍ये धुकेसाचते. (less water intake causes brain fog) मेंदूमध्‍ये गोंधळ उडतो. 

ब्रेन फॉग किंवा मेंदूतील धुके ही अशी अवस्‍था आहे ज्‍यामुळे आपल्‍याला स्‍मृती-आठवणी यांच्‍या समस्‍या, मानसिक अस्‍पष्‍टता, लक्ष केंद्रित करण्‍यात अडचण, आणि चित्‍त एकाग्र, ध्‍यान-लक्ष केंद्रित करण्‍यात अडथळे अशी लक्षणं दिसायला लागतात आणि त्‍यापासून उद्भवणारे आजर व विकार या समस्‍यांना सामोरे जावे लागते.

Brain fog causes: memory problems, lack of mental clarity, poor concentration, inability to focus आणि जर का तुमचे शरीर निर्जलिकृत (dehyderated) असेल तुम्‍हाला ही समस्‍या भेडसावू शकते. म्‍हणून दिवसभरात कमीत-कमी 3 ते 4 लिटर पाणी अवश्‍य प्‍यायला पाहिजे.

आपल्‍या कॉग्‍नीटिव्‍ह लोडला विचारपूर्वक निवडा, कधी कधी आपण आपल्‍यासाठी एका वेळी न होणारे कठीण,अवघड काम-गोष्‍ट निवडत असतो की त्‍यामुळे आपल्‍याला चिडचिड व्‍हायला लागते. अशा वेळी प्रवाही अवस्‍था प्राप्‍त करणे खूप कठीण असतं. 

यासाठी नेहमीच आपल्‍या कामांना अशा प्रकारे व्‍यवस्‍थापन आणि नियोजित करा की ज्‍यामुळे तुमच्‍या कौशल्‍यांना वाव मिळेल, तुमच्‍या सामर्थ्‍यांच्‍या मर्यादेला पुढे नेईल (push your limits).  पण, एवढेही अवघड, कठीण राहायला नको की तुम्‍ही ते पूर्ण करूच शकनार नाही.

जर तुम्‍हाला एखादे अवघड-कठीण काम पुर्ण करायचेच आहे तर त्‍या कामाला अशा प्रकारे विभागून घ्‍या की, जेव्‍हाही तुम्‍ही काम करायला बसाल तेव्‍हा तुम्‍हाला ते काम पूर्ण होताना दिसला पाहिजे. 

“work should be challenging but not too difficult to handle”    

 

ह्या जगामध्‍ये अधिकांश लोकं विचलीत करणा-या वातावरणात राहत आहेत.  यासाठी तुम्‍ही फ्लो-स्‍टेट या संकल्‍पेना समजून घेऊन तुम्‍ही आपले सर्वोत्‍कृष्‍ट काम, सर्वोच्‍च गुण-दर्जा सोबत फ्लो-स्‍टेट किंवा प्रवाही अवस्‍था प्राप्‍त करून आपली कामे वेगाने, उत्‍कृष्‍टपणे करून इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता.

परंतू आजच्‍या ह्या स्‍पर्धात्‍मक युगामध्‍ये तुम्‍हाला यश प्राप्‍त करण्‍यासाठी तुम्‍हाला केवळ वर सांगितलेली थ्री-सी पद्धत समजूनच घ्‍यायची नाही तर याचा तोपर्यंत सराव-रियाज करावा लागेल जोपर्यंत ती तुमची सवय बनून जाणार नाही तोपर्यंत. 

पीटर ब्रेगमन यांची पुस्‍तक एटीन मिनिट्स ही वेळेचे नियोजनावर लिहिली गेलेली एक उत्‍कृष्‍ट पुस्‍तक आहे.  ही पुस्‍तक अवश्‍य वाचा. 

 

धैर्यपूर्वक पुस्‍तकाचे सारांश वाचन केल्‍याबद्दल आपले मनःपुर्वक धन्‍यवाद.  

अशीच स्‍वयं मदत, स्‍वयं विकास, वैयक्तिक, व्‍यावसायिक पुस्‍तकांसाठी खाली दिलेल्‍या यादीमधून पुस्‍तकांचे सारांश अवश्‍य वाचा.  वाचत राहा, शिकत राहा, आयुष्‍य समृद्ध करत राहा. 

सारांश समाप्‍त 

 

👉सारांश भाग-१ वाचन करण्‍यासाठीः सारांश भाग-१

 

 

📗📘📙📙📖 

 सारांश का? पुस्‍तकंच का वाचावी?

 👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

  • पुस्‍तकांमधून ज्ञान घेऊन आपल्‍या जीवनात पुस्‍तकातील गोष्‍टींना आत्‍मसात करून, स्‍वतःला, समाजाला व आपल्‍या देशाला एक उत्‍कृष्‍ट जग घडविण्‍यास मदत होईल.
  • कित्‍येक लोकं सर्वसाधारण जीवन जगत आहेत,  
  • त्‍यांना कोणीही हे सांगणारा नाहीए की, काय करायचे आहे,
  • जग कसं चालत आहे, पैशाने पैसा कसा कमवायचा
  • नोकरीसाठी मुलाखतीमध्‍ये कसे बोलावे लागते,  
  • नफा देणारा फायद्याचा उद्योग-व्‍यवसाय कसा उभारायचा,
  • हे सांगणारा कोणीही नाही आणि जे आहेत ते एवढे पैसे मागतात की त्‍यांच्‍याजवळ तेवढा पैसा नसतो की ते देऊन एखादा महागडा प्रशिक्षक, प्रशिक्षण, अभ्‍यासक्रम पूर्ण करू शकतील.

यासाठी पुस्‍तकांसारखा सच्‍चा-खरा, स्‍वस्‍त, नेहमीच आपल्‍यासोबत राहणारा, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी नाही. म्‍हणून पुस्‍तक वाचा.  जीवन सुधारा, जग आपोआपच सुधारेल.  विद्यार्थ्‍यांना तर पर्वणीच आहे.    

 

 📗📘📙📙📖

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो. 

"Think Before You Speak Read Before You Think
बोलण्‍या अगोदर विचार करा, विचार करण्‍या अगोदर वाचन करा"

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive