FLOW -Mihaly Csikszentmihalyi- Marathi Book Summary प्रवाह (फ्लो) -मिहाले चिक्झेन्तमिहाले- पुस्तक परिचय-सारांश मराठी
प्रवाह–फ्लो मध्ये काम करून 10 वर्षांचे लक्ष्य 6 महिण्यात पूर्ण करण्याचे गुपित
स्थिर, अखंड प्रवाहात पुढे जाण्याची क्रिया किंवा वस्तुस्थिती. एखाद्या गोष्टीचा स्थिर, सतत प्रवाह, लीन, तल्लीन, मग्न, एकसूरीने, बेधूंदपणे, समर्पणाने, समग्रपणे, लक्ष केंद्रित करून, अविचलपणे, प्रवाहात काम करून 10 वर्षांचे लक्ष्य 6 महिण्यात पूर्ण करण्याचे गुपित
प्रवाह (फ्लो)
लेखक
मिहाले चिक्झेन्तमिहाले
पुस्तक परिचय-सारांश मराठी
FLOW
Author Mihaly Csikszentmihalyi
लेखकांच्या नावाचा उच्चार अवघड वाटल्यास कृपया पुढील प्रमाणे उच्चार करा
मोठ्यात मोठी ध्येय-उद्दिष्ट्ये कमीत-कमी वेळेत कसे पुर्ण करता येतील यासाठी आपल्याला “थ्री-सी पद्धतीची” आवश्यकता असेल, याविषयी आपण फ्लो म्हणजेच प्रवाह या पुस्तकातून शिकणार आहोत.
पहाटेचे 5 वाजल्याचा घड्याळाचा गजर-अलार्म वाजला आणि कबीर आपल्या अंथरूणातून उठून थेट आपल्या लॅपटॉप वरील दिवसभरात करण्याची कामांची यादी-वेळापत्रक (to do list) पाहू लागला आणि ती पाहताच त्याचा गोंधळ उडाला, कितीतरी कामे करण्याची ती यादी पाहून तो घाबरून गेला.
खरंतर तो मागील काही आठवड्यांपासून त्याच्या फ्लीपकार्ट व अमेझॉनसारख्या ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर काम करत होता आणि स्वतःच्या पॉडकास्टवर इतके जास्त काम करत होता की तो खूपच थकून गेला होता, त्याला थकवा जाणवत होता.
तो विचार करूनच घाबरून जात होता की करण्यासाठी एवढेकाही आहे की ते मी करू शकेल की नाही याची चिंता त्याला सतावत होती, तो सतत विचार करत असे की, मी माझी चांगली मोठी चालू असलेली नोकरी सोडून चूक तर केलेली नाही..!
स्वयंरोजगार करण्याअगोदर कबीर कपड्यांच्या एका मोठ्या व नामवंत कंपनीमध्ये गुणवत्ता व दर्जा व्यवस्थापक (quality manager) म्हणून काम करत होता. उत्तम पगार तर होताच, सोबतच दर आठवड्याला सुट्टी, संध्याकाळी मौज-मजा करण्याची संधी त्याला त्या नोकरीमुळे उपभोगायला मिळत असे.
परंतू, जेव्हापासून त्याने त्याच्या स्वप्नांना वास्तवात आयुष्यात मिळविण्याचे ठरविले, बेचा-याला वेळच मिळत नसे, तो खूपच व्यस्त राहत असे. त्याने वेळेचे नियोजन या विषयावचर कित्येक पुस्तकं वाचून काढली, सर्वकाही वेळेप्रमाणे ठरवले, वेळापत्रक बनवले परंतू, तरीही काहीतरी कमतरता होतीच. त्याच्याकडे नेहमीच वेळेची किल्लत होत असे. कितीही नियोजन केले तरी त्याला वेळ पुरतच नसे.
एके दिवशी कबीरच्या मित्राने त्याला उत्पादकतेचे विज्ञान आणि प्रवाही अवस्था (science of productivity and flow state) याबाबत सांगितले, त्याला ते खूपच आवडले, तो त्यात स्वारस्य घेऊ लागला.
मग त्याने त्या गोष्टीला गुगल केलं, त्याविषयी अधिक माहिती जुळविली-मिळविली, कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्याविषयी जाणून घेतलं आणि त्या पद्धतींना समजून घेऊन त्यांना अंमलात आणलं आणि आपल्या कामाच्यावेळी अतिउच्च कार्यक्षमतेने कामे करू लागला. (peak productivity performance)
त्याला असं आढळून आलं की जे काम चार तासात होत होतं ते आता एक ते दीड तासात व्हायला लागलं होतं. सर्वकाही आपापल्या जागी चांगले चालू होते, आणि बघता-बघता त्याची बचतीची रक्कम संपण्याअगोदरच त्याच्या पॉडकास्ट आणि ई-कॉमर्स वेबसाईटवरून कमाई व्हायला लागली होती.
जाणून घ्याः स्वप्न, लक्ष्य, ध्येय, उद्देश, हेतू, उद्दिष्ट, दृढनिश्चय
Dream, Mission, Vision, Goal, Target, Aim, Object, Phase
प्रोडक्टव्हिटी (productivity) किंवा उत्पादकता हा एक असा शब्द आहे जो आजच्या आधुनिक आणि व्यस्त जगात अत्यंत प्रबळपणे उपयुक्त (relevance) झालेला आहे. कार्यक्षमता किंवा उत्पादकता याची उपयुक्तता वाढलेली आहे.
आजच्या घडीला वेळेचे नियोजन यावर पुस्तक वाचन करून 24 तास आपल्या मेंदुला कामामध्ये गुंतवून व्यस्त ठेवण्यासाठी दबाव आणण्यापेक्षा आपली उत्पादकता-प्रोडक्टीव्हिटी वाढविण्यावर विचार करायला पाहिजे.
उत्पादकता (productivity) याचा सोपा अर्थ असा की, तुम्ही एखाद्या विशिष्ट वेळेत किती काम करू शकता.
तुम्हाला असं जाणवलं असेल की, एखाद्या दिवशी तुम्ही इतर दिवसांच्या तुलनेत जास्त लवकर कामे करत आहोत. कामे करता-करता तुम्ही एवढे गढून गेलेले आहात की तुम्हाला वेळेचे भानच राहिले नाही.
तर सांगण्याचा मुद्दा हाच की शेवटी उत्पादकता (productivity) या कार्यप्रणाली मागचे विज्ञान काय आहे? ते आहे फ्लो-स्टेट (flow state) प्रवाही अवस्था.
फ्लो-स्टेट म्हणजे अशी शारिरीक व मानसिक अवस्था (physiological & psychological) मनोदैहिक अवस्था) म्हणजेच जिथे तुम्ही शरिराने व मनाने आपल्या कामात लक्ष केंद्रित करून, करत असलेल्या गोष्टीमध्ये अतिउच्च पातळी प्राप्त करता. (peak performance in work)
TRANS- तंद्रीमध्ये असणे
यालाच इतर शब्दांमध्ये एखाद्या गोष्टीत-कामात तीव्र-लक्ष केंद्रित असणे, पुर्णपणे बुडून जाणे, कामात गढूण जाणे, गर्क असणे, तंद्रीत असणे, एकजीव होणे, समरस होणे, कामासाठी समर्पित असणे, इत्यादी (Hyper-Focus, Laser-sharp Focus, Extreme Focus, Full Immersion, Being in the zone) अशा कित्येक नावांनी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही जाणून असाल.
जेव्हा तुम्ही प्रवाही अवस्थेत असता तेव्हा तुम्ही आणि तुमचे काम दोघेच आमने-सामने, एकास-एक असेच असता. तुमचे संपुर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या कामावरच केंद्रित असतं, तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही दुसरे विचार येत नाहीत. एवढंच नाही तर भूक, तहान, थकवा इत्यादी गोष्टीही तुमच्या लक्षात येत नाहीत.
1975 पुर्वी ह्या अवस्थेला सर्जनशील व्यक्तींची जन्मजात प्रतिभा किंवा कौशल्य असे समजले जात असे. (सर्जनशील व्यक्तींची उपजत बुद्धी किंवा विशेष कौशल्य-Inborn talent of creative people) 1975 या वर्षी हंगेरीतील-अमेरिकन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ मिहाले चिसिक्झेन्तमिहाले यांनी प्रवाही अवस्था किंवा फ्लो स्टेट ह्या संकल्पनेला पुढे आणून उत्पादकता (productivity) ह्या संकल्पनेमध्ये उत्क्रांतीच आणली.
ह्या संकल्पनेचा उपयोग आधुनिक काळात जवळपास प्रत्येक क्षेत्रात केला जाऊ शकतो, मग भलेही ते व्यवसाय-उद्योग जगत असो, शिक्षण क्षेत्र-विद्यार्थी दशा अशा हरएक क्षेत्रामध्ये कोणीही या प्रवाही असवस्थेत -फ्लो स्टेट मध्ये येऊन आपली उत्पादकता वाढवू शकतो..
मित्रांनो एक गोष्ट तर स्पष्टच आहे की, आधुनिक जगात तंत्रज्ञानाचा वाढता व्याप पाहता, माहिती व तंत्रज्ञानाबरोबच आपल्या आयुष्यातदेखिल करण्यासाठी खूपकाही आहे की, ज्यामुळे कामासाठी, परिवारासाठी, स्वतःसाठी आणि समाजात उठ-बैस करण्यासाठी वेळच पुरत नाही, अतिरिक्त वेळ काढणं खूपच कठीण होऊन बसलं आहे.
कारण एका दिवसात आजही अनंत काळापासून चोवीसच तास आहेत, कालही तेवढेच होते, उद्यादेखिल तवेढेच दिवसाचे चोवीसच तास राहतील. यासाठी मानवाने आधुनिक काळात कितीही प्रगती जरी केली असली तरी वेळ वाढवणं तर शक्य नाही, निदान आजच्या तारखेपर्यंत तर नाहीच नाही.
(कदाचित भविष्यात कोणी कल्पना शक्य करून प्रत्यक्षात आणू शकेल...!)
सरतेशेवटी आपल्यालाच आपली उत्पादकता (productivity) आहे त्या वेळेतच वाढवावी लागेल. परंतू प्रश्न असा पडतो की ते करायचं कसं?
चला तर मग, आज आपण ह्या पुस्तकाच्या मदतीने पाहुया, जाणून घेऊया प्रवाही अवस्था किंवा फ्लो स्टेट या संकल्पने मागील विज्ञानाला आणि प्रवाही अवस्था सांभाळून आपण कशा रितीने आपल्या उत्पादकतेला पाचशे पटीने वाढवू शकतो, अशी पद्धत जाणून घेऊ ज्याला लेखकाने थ्री-सी मेथड असे म्हटले आहे.
3C (थ्री सी) पद्धतीने 500 पटीने उत्पादकता वाढवा
(500% productivity)
चला तर मग पाहुया 3C (थ्री सी) पद्धतीने 500 पटीने उत्पादकता (productivity) वाढविण्याचे विज्ञान.. सर्वांत आधी येते प्रवाही अवस्थेमागील विज्ञान
प्रवाही अवस्थेमागील विज्ञान (the science of the flow state)
अमेरिकन लेखक, पत्रकार आणि उद्योजक स्टीव्हन कोटलर यांनी आपली पुस्तक द आर्ट ऑफ इम्पॉसिबल यामध्ये असं लिहिलेलं आहे की, प्रवाही अवस्थेदरम्यान तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता सर्वोच्च पातळीवर असते.
तुमचा मेंदू दर सेकंदाला सर्वसामान्यपणे करतो त्यापेक्षा कित्येकपट जास्त विचार निर्माणही करत असतो आणि त्या विचारांवर सखोलपणे प्रक्रियादेखिल करत असतो. आणि तेदेखिल एकाच वेळी..
जर तुम्ही दररोज केवळ 2 तास प्रवाही अवस्थेमध्ये (flow state) काम करू शकलात तर तुम्ही सर्वसाधारण आठवड्याला 40 तास सामान्य व्यक्ती करतो त्यापेक्षाही जास्त काम तुम्ही करू शकता.
👉अधिक वाचाः इलॉन मस्क आठवड्याला 100 तास काम कसे करतो?
खरेतर, शिकागो विश्वविद्यालयातील प्राध्यापक जेम्स ओ.मॅकेन्सी (Prof. James O Mckinsey, University of Chicago) आपल्या संशोधनामध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे की,
जर तुम्ही तुमच्या फ्लो स्टेटमध्ये घालवलेल्या वेळेला 15 ते 20 टक्क्यांनी जरी वाढवू शकलात तर तुमची उत्पादकता (productivity) जवळपास दुप्पटीने नक्कीच वाढेल.
संशोधनात असेही आढळून आले आहे की, प्रवाही अवस्थेदरम्यान आपल्या मेंदूच्या लहरींमध्ये तीव्रपणे बदल होत असतात. आपल्या सामान्य जागृत अवस्थेमध्ये (normal conscious state) आपला मेंदू उच्च वारंवारतेचे ß बीटा लहरी निर्माण करत असतो. (brain produce high frequency beta waves)
त्या उलट प्रवाही अवस्थेत (in flow state) असताना ह्याच उच्च वारंवारतेच्या लहरी बदलून लघु वारंवारतेच्या अल्फा आणि ø थीटा लहरींमध्ये बदलत असतात.
अल्फा लहरी म्हणजेच 08 ते 12 हर्ट्स तरंगलांबीच्या लहरी.
या दरम्यान आपला मेंदू शांत आणि निवांत असतो आणि आपले संपूर्ण लक्ष सध्या चालू असलेल्या कामावर केंद्रित असतं. हीच ती अवस्था आहे जिथे आपण कोणत्याही माहितीला सहजतेने जाणून-शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करू शकतो.
जेव्हा तुम्ही या अवस्थेला 5 ते 10 मिनिटे टिकवून ठेवता तेव्हा आपला मेंदू याच्याही पुढच्या पातळीवर जात असतो, ती पातळी म्हणजेच थीटा अवस्था (theta state) जिथे 3 ते 8 हर्ट्स तरंतगलांबीच्या थीटा लहरी निर्माण होत असतात.
ही अवस्था काहीशी तशीच असते जशी आपल्या झोपेच्या आणि उठण्याच्या- जागे होण्याच्या (जागृतावस्था) दरम्यानची संक्रमण (transition) अवस्थेत असता.
अवस्थांतरः एका अवस्थेतून दूस-या अवस्थेत होणारे संक्रमण
α Alfa waves | βBeta waves | θTheta waves | γGamma waves | δ Delta waves | σSigma Waves
मेंदूसाठी 12 नियमः आली लहर केला कहर
जाणून घ्याः ध्यान-योग यांचा मेंदूवर होणारा परिणाम
read more about: theta bi-neural waves
read more about: what is your Personality type?
Hierarchy of System and your personality α Alfa | β Beta | θ Theta | γ Gamma | δ Delta | σ Sigma
मानवी मेंदूतील पाच प्रमुख लहरींची वैशिष्ट्ये
Characteristics of the Five Basic Brain Waves
वारंवारता Frequency band | वारंवारता Frequency | Brain states मेंदूची अवस्था | |
---|---|---|---|
Gamma (γ) | >35 Hz | Concentration लक्ष केंद्रित करण्याची अवस्था | |
Beta (β) | 12–35 Hz | Anxiety dominant, active, external attention, relaxed | |
Alpha (α) | 8–12 Hz | Very relaxed, passive attention खूप निवांत, आरामदायक | |
Theta (θ) | 4–8 Hz | Deeply relaxed, inward focused अतिखोलवर शांत, आराम आत्म-स्वयंकेंद्रित अवस्था किंवा प्रवाही अवस्था फ्लो स्टेट | |
Delta (δ) | 0.5–4 Hz | Sleep झोपेची अवस्था |
Table & Image Source: Science Direct
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी भेट द्याः सायन्स डायरेक्ट
ह्या पातळीवर तुमची स्मृती, शिकण्याची शक्ती अथवा आकलन शक्ती-क्षमता, अंतर्ज्ञान इत्यादी आपल्या सर्वोच्च क्षमतेने कार्य करीत असतात. हीच ती अवस्था आहे जिथे अधिकतर वेळा सर्जनशील कल्पना सुचत असतात. अल्फा आणि थीटा अशा अवस्था आहेत ज्या प्राप्त करण्यासाठी सामान्यपणे सखोल ध्यान-धारणा करावी लागते.
Memory, Learning power, Intuition, Creative Ideas
Pleasurable Activity = Happy Hormones
Signal= Hormone-Gland- (it releases stimulating hormones that signals, directing them to produce their respective hormones)
संकेत = स्त्राव- शरीराच्या अवयवांना चेतना देणारा काही विशिष्ट शरीरग्रंथीपासून निघणारा स्त्राव
(brain releases 5 chemical signals combination)
मेंदूच्या लहरींबरोबरच फ्लो-स्टेट मध्ये शरीराची जैव-रासायनिक बदलदेखिल होतात ज्याला न्युरोकेमिस्ट्री असेही म्हणतात. प्रवाही अवस्थेचा शरीराच्या जैव-रासायनिक अभिक्रिया यांवर देखिल परिणाम दिसून येतो. आपला मेंदू पाच रासायनिक संकेतांना एकत्रित करून शरिरात सोडत असतो, ज्यांना नोरोपिनारिन, डोपामाईन, एन्डॉर्फिन, एनन्डामाईड आणि सेरोटोनिन आणि कधी कधी ऑक्सीटोक्सीन असे म्हणतात.
जर जिज्ञासेपोटी तुम्ही ह्यांना गुगल करून पाहिलात तर तुम्हाला कळून चुकेल की सामान्यपणे आपला मेंदू ह्या संकेतांना रिर्वार्ड अथवा बक्षिसाच्या रूपात शरीरात सोडतो जेव्हा-केव्हा आपल्यासाठी मजेदार-सुखकारक किंवा आनंददायक घटना, कृती-क्रिया, प्रसंग घडल्यास आपल्याला चांगले वाटण्यासाठी हा स्त्राव-संकेत शरीरात मेंदू सोडतो.
म्हणजेच अशी कृती-क्रिया जी आपल्याला खूपच चांगली वाटते, जेव्हा अशी कृती होते तेव्हा आपला मेंदू हे रासायनिक स्त्राव आपल्या रक्ताद्वारे शरीरात स्त्रवतो.
प्रवाही अवस्थेमध्ये म्हणजेच फ्लो-स्टेट मध्ये वरील पाचही रासायनिक संकेत-स्त्राव यांचे एकाचवेळी निघणे, ह्या अवस्थेला सुखदायी, अर्थपुर्ण आणि शब्दशः व्यसनाधीन (pleasurable, meaningful, addictive) बनवण्यास कारणीभूत असते. म्हणजेच एकदा जर तुम्हाला ही सवय झाली की, तुम्हाला कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणेची-मोटीव्हेशनची गरजच पडणार नाही. तुम्ही स्वतःच काम करण्यासाठी उत्सुक-उत्साही व आतुरलेले असाल.
परंतू, प्रवाही अवस्थेमध्ये आपला मेंदू अतुलनात्मकरित्या कार्यक्षम-शक्तीशाली होऊन काम करतं हे जितकं सत्य आहे तेवढेच सत्य-तथ्य हेसुद्धा आहे की, अधिकतर लोकं आपल्या कामाच्या वेळेतील केवळ पाच टक्केच भाग ह्या प्रवाही अवस्थेत (फ्लो-स्टेट) घालवत असतात.
म्हणजेच, “चाळीस तास आठवड्याला काम” एवढं जर विचार केला तर त्यांचा पंच्यान्नव टक्के वेळ म्हणजेच अडतीस तास ते केवळ अनुत्पादित पातळीवर (low productivity level) कामं करून स्वतःला थकवत असतात…! मग साहजिकच प्रश्न पडतो की, असं का? तर याचे सर्वात मोठे कारण आहे,
अतिरिक्त माहितीचे ओझे (information overload) आणि विचलित होणे
- काम करायला बसलं-न-बसलं बॉसचा फोन येतो बैठकीसाठी
- कधी इन्स्टाग्राम वर मित्राने टाकलेला नवीन फोटो झळकत असतो, असा संदेश येतो,
- तर कधी तात्काळ ईमेल, तर कधी कोणाचा संदेश…
- असं नको म्हणून आत्ताच तर फोन सायलेंट मोड वर करून बाजूला ठेवलाच होता की, आपल्यासोबत काम करणारा सहकर्मी ज्याला कार्यालयातील नकोत्या गप्पा-गोष्टी करण्यात खूपच मजा येते तो येताना दिसतो,
- तुम्ही घरून काम करत असताना (ज्याला आजकाल कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ हे ब्रीद मिळाले आहे) तुमच्या घरचे तुम्हाला कामं सांगताहेत, इतर गोष्टीची चर्चा करत आहेत...
सांगायचा मुद्दा हाच की, हे जग आपल्याला विचलित (distraction) करण्याच्या गोष्टींनी भरलेली आहे.
#अधिक वाचाः स्फार्ट फोनच्या व्यसनातून सूटका कशी मिळवावी- हायपर फोकस
वेळेचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेले ऍप्प- रेस्क्यू टाईम या कंपनीने 1500 कर्मचा-यांवर केलेल्या संशोधन-अभ्यास-सर्वेक्षणात त्यांना असे आढळून आलेले आहे की, प्रत्येक व्यक्ती सरासरी दर सहा ते साडे आठ मिनिटांनी आपल्या स्मार्टफोन मुळे विचलित होत असतो.
जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टनेसुद्धा एका अभ्यासाअंती असा दावा केला आहे की, इसवीसन 2000 नंतर सरासरी लक्ष-ध्यान देण्याचा वेळ 33 टक्के कमी झालेला आहे.
तर यामध्ये कासावीस होण्याची काहीच गरज नाही की, आपण सर्वजण आपली कामं पूर्ण करण्यासाठी, आपल्याला एवढा संघर्ष का करावा लागत असतो.
तर वाचकमित्रांनो चला तर मग आता पाहुया ह्या संघर्षाला कमी करून आपण आपल्या कामात आपले 100 टक्के कसे देवू शकतो, आपल्याला प्रवाही अवस्था प्राप्त करण्यासाठी थ्री-सी पद्धत कशी कामाला येवू शकते त्या थ्री-सी मेथड (पद्धत) याविषयी...
प्रवाही अवस्था प्राप्त करण्यासाठी थ्री-सी पद्धत
तसं बघायला गेलं तर आधुनिक जगामध्ये सर्वांसाठी फ्लो-स्टेट एक शक्तीचे वरदानच आहे परंतू, आधुनिक जगातील आधुनिक विचलनांना (distractions) पार करणे थोडंसं जिकरिचं आहे, अवघड, कठीण आहे, परंतू,
न्युरोसायन्स या विषयावरील जगभरातील संशोधनपर लेख, पत्रकं यांवर आधारित ही थ्री-सी पद्धत वापरून आपण ते सहजरितीने पार पाडू शकतो.
- थ्री-सी (3-C) पहिलं सी-C: आपले सभोवताल, वातावरण यांना विचलनमुक्त बनवणे. थ्री-सी (3-C) पद्धतीतील पहिलं इंग्रजी अद्याक्षर सी-C आहे ज्याचा अर्थ होतो creating distraction free environment, अर्थातच, आपले सभोवताल, वातावरण यांना विचलनमुक्त बनवणे.
- थ्री-सी (3-C) दुसरं सी-C: आदिमानवी माकड-मेंदूला नियंत्रित करणे-थ्री-सी (3-C) पद्धतीतील दुसरे इंग्रजी अद्याक्षर सी-C आहे ज्याचा अर्थ होतो controlling the monkey mind, आदिमानवी माकड-मेंदूला नियंत्रित करणे आणि
- थ्री-सी (3-C) तिसरं सी-C: ज्ञानाने आकलन करणे किंवा संज्ञात्मक सुधारणा करणे- थ्री-सी (3-C) पद्धतीतील तिसरं इंग्रजी अद्याक्षर सी-C आहे ज्याचा अर्थ होतो cognitive optimization, ज्ञानाने आकलन करणे किंवा संज्ञात्मक सुधारणा करणे
मित्रांनो आता ह्या तीनही गोष्टींना सविस्तर पाहूया याच पुस्तकाच्या पुढील भागात सारांश भाग-2 मध्ये
सारांश भाग-2 वाचन करण्यासाठीः सारांश भाग-2
📗📘📙📙📖
पुस्तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्तरपणे पुस्तक वाचन करून आपले व्यक्तीमत्व सुधारा, आपला विकास करा, यशस्वी व्हा.
वैयक्तिक विकास, स्वयंमदतीवर ही पुस्तक तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्थळावरील अशाच संवाद कौशल्यांवर, लोकव्यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्तक सारांश अवश्य वाचा.
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. "Think Before You Speak Read Before You Think |
टिप्पण्या