गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्‍व्‍हेस्‍टर मराठी पुस्‍तक सारांश The Dhandho Investor Marathi

The Dhandho Investor Marathi गुजराती धंधो की बात.!
मित्‍तल, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी नावं ओळखीची आहेत परंतू त्‍यांच्‍यामध्‍ये अजूनही एक समानता आहे गुजराती, मारवाडी, सिंधी या समाजाची व्‍यवसाय-उद्योग-धंदा (धंधो) करण्‍याची पारंपारिक पद्धत. 

दि धंधो इन्‍व्‍हेस्‍टर
लेखक- मोहनीश पाबराय

पुस्‍तक सारांश मराठी

मुळ इंग्रजी पुस्‍तक मराठी अनुवाद-सारांश 

"एखादा मारवाडी माणूस, तो फक्त पाचवी शिकलेला असेल तरीही, तो अशी अपेक्षा ठेवत असतो की त्‍याने गुंतवलेली मुद्दल रक्कम लाभांशाच्या (Dividend-डिव्हिडंड) रूपात तीन वर्षाच्या आत त्याला परत मिळावी." 

दि धंधो इन्‍व्‍हेस्‍टर मराठी | The Dhandho Investor Marathi

The Dhandho Investor
By
Mohnish Pabrai

Book Summary in Marathi

आपल्‍या भारतामध्‍ये गुजराती, मारवाडी, सिंधी यांच्‍यासारखे काही समाज आहेत ज्‍यांनी उद्योग-धंदा-व्‍यवसायाच्‍या क्षेत्रामध्‍ये स्‍वतःला सिद्ध केलेलं आहे. तर आज आपण ज्‍या पुस्‍तकाचे सारांश पाहणार आहोत तीसुद्धा याच समाजावर आधारित उद्योगधंदा-व्‍यवसाय करण्‍याच्‍या पद्धतीवर आधारित आहे.  मोहनीश पाबराय हे या पुस्‍तकाचे लेखक आहेत.

तर चला मग जाणून घेवूया की गुजराती, मारवाडी, सिंधी या समाजाजवळ असे काय होते, असे कोणते सुत्र होते की, ज्‍यामुळे त्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये एवढी संपत्‍ती मिळविली. एवढे श्रीमंत बनले.

तुमच्‍यापैकी ब-याच जणांनी शेअर मार्केटच्‍या व्‍यवहारांमध्‍ये ऐकले असेल कीहाय रिटर्न हवे असेल तर हाय रिस्‍क घ्‍यावा लागतो.   परंतू गुजराती समाज यापेक्षा वेगळा विचार करतात.  ते अशा अप्रमाणबद्ध संधी  किंवा असिमेट्रीक अपॉर्च्‍युनिटी असणा-या व्‍यावसायाच्‍या शोधात असतात.

नाण्‍याची एक बाजू म्‍हणजे "मी जिंकलो," तर दुसरी बाजू म्‍हणजे
"माझे जास्‍त नुकसान झाले नाही"

-क्‍लासिक धंधो स्‍टाईल

ज्‍यामध्‍ये जर का ते जिंकले तर त्‍यांना भरपूर नफा/फायदा होईल. परंतू जर का ते अयशस्‍वी झाले तर त्‍यांना तेवढा काही विशेष फरक पडणार नाही.  अर्थात, नाण्‍याची एक बाजू म्‍हणजे मी जिंकलो तर दुसरी बाजू म्‍हणजे माझे जास्‍त नुकसान झाले नाही’, आणि हेच आहे क्‍लासिक धंधो स्‍टाईल. व्‍यवसाय-उद्योगधंदा करण्‍याची गुजराती समाजाची पारंपारिक शैली.

काय तुम्‍हाला हे माहित आहे की अमेरिकेत राहणारा एक गुजराती अमेरिकतील एका सर्वसाधारण व्‍यक्‍तीपेक्षाही  सरासरीमध्‍ये जास्‍त पैसा कमावतो..!

आपण जर बघितलं की अमेरिकेतील एकूण लोकसंख्‍येपैकी फक्‍त एक टक्‍काच ०१% लोकं भारतीय आहेत.  आणि ह्याच एका टक्‍यापैकी फारच थोडेसे आहेत गुजराती-पटेल समाज. परंतू आश्‍चर्यकारक गोष्‍ट म्‍हणजे, फारच थोड्या पटेल लोकचं अमेरिकेतील ५०% टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त मोटेल व्‍यवसायाचे मालक आहेत.  

अमेरिकेतील ०१% पटेल ५०% पेक्षा जास्‍त
हॉटेल व मोटेल व्‍यवसायाचे मालक

ई-वाचनालय | www.evachnalay.in

तर सर्वांत आधी आपण हे जाणून घेऊ की, ‘पटेल समाज अमेरिकेत पोहोचला कसा? आणि त्‍यांनी मोटेल व्‍यवसायालाच का निवडलं?

जसं गावातील लोकं शेतीबाडी सोडून शहरात येतात. कारण पिढ्या-न-पिढ्या होत असलेल्‍या शेत-जमिनीच्‍या तुकड्यांच्‍या वाटणी-विभागणीमुळे सरतेशेवटी खूपच कमी किंवा किंचितच जमीन शिल्‍लक राहते. ज्‍यावर गुजारण करणे अवघड होते. 

यासाठीच गुजराती-पटेल समाज व्‍यवसाय-उद्योगधंद्यासाठी युगांडा ह्या देशाला गेले आणि तेथे त्‍यांनी खूप चांगला व्‍यवसाय केला, चालविला ज्‍यामुळे त्‍यांनी भरपूर धन, पैसा देखिल कमावला, चांगली संपत्‍ती जमविली. 

परंतू तेंव्‍हा १९७२ मध्‍ये एक तानाशाह-डिक्‍टेटर सत्‍तेवर आला, ज्‍याला गुजराती-पटेल लोकांची झालेली अशी वाढ, श्रीमंती पाहावली नाही.  त्‍याने त्‍यांची संपत्‍ती हिसकावून घेतली. आणि त्‍यांना युगांडा देशातून काढून टाकले.

अशा स्थितीमध्‍ये युगांडातून निर्वासित केलेल्‍या गुजराती-पटेल लोकं कोणत्‍यातरी नवीन जागेच्‍या व नव्‍या व्‍यवसायाच्‍या शोधात होते. यासाठीच काही पटेल लोकं आपली उरली-सुरली जमापुंजी हाताशी घेऊन अमेरिका व कॅनेडा या देशांमध्‍ये स्‍थायिक झाले.   

गुजराती पटेल लोकं फार काही जास्‍त शिक्षित नव्‍हते, यासाठीच जेव्‍हा ते १९७३ साली अमेरिकेला पाहोचले तेव्‍हा त्‍यांच्‍या मोडक्‍या-तोडक्‍या इंग्रजी भाषेसोबत त्‍यांना कोणतीही पांढरपेशाची नोकरी करणे जिकरिचेच होते.

आणि त्‍याच दरम्‍यान अरब राष्‍ट्रांतील आपापसांतील भांडण-तंट्यांमुळे जागतिक व्‍यापारावर प्रभाव पडला, आणि अमेरिकेत कच्‍च्‍या जिवाश्‍मइंधन तेलाचे पेचप्रसंग उभे राहिले. त्‍यामुळेच अमेरिकेत पेट्रोलचे भाव कडाडले, पेट्रोलचे भाव खूपच वाढलेले असल्‍यामुळे लोकांनी प्रवास करणे-फिरणे कमी करून टाकले.

मोटेल: महामार्गावरील द्विपदरी व चौपदरी रस्‍त्‍यांच्‍या कड्यावर २० ते २५ खोल्‍यांचे छोटे छोटे हॉटेल

याचाच परिणाम मोटेल व्‍यवसायावर झाला. मोटेल म्‍हणजेच महामार्गावरील द्विपदरी व चौपदरी रस्‍त्‍यांच्‍या कड्यावर २० ते २५ खोल्‍यांचे छोटे छोटे हॉटेल यांची परिस्थिती बिकट बनली, व्‍यवसाय कमी झाल्‍यामुळे पुढे व्‍यवसाय करणे कठीण झाले होते.

त्‍यामुळे ब-याचशा मोटेल मालकांनी आपले मोटेल विकायला काढले होते. ज्‍यामुळे मोटेलच्‍या किमती खूपच खाली यायला लागल्‍या होत्‍या.  खूपच स्‍वस्‍तामध्‍ये कोणीही खरेदी करू शकत होते.

आणि जे खरेदीदार ते मोटेल व्‍यवसाय खरेदी करू इच्छित होते त्‍यांना बॅंका ९०%-नव्‍वद टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज द्यायला तेव्‍हा तयार झाल्‍या होत्‍या.  आणि युगांडा ह्या देशामधून बाहेर काढल्‍यानंतर/बाहेर पडताना पटेल लोकांजवळ हाताशी खूपकाही बचत तर नव्‍हतीच, सोबतच डोक्‍यावर छप्‍पर देखिल नव्‍हतं.  

तर या गुजराती पटेल लोकांनी ९० टक्‍के कर्ज बॅंकाकडून घेऊन आणि आपल्‍या जवळ उरली-सुरली बचतीच्‍या (२०%) आधारावर बॅंकांनी दिलेल्‍या कर्जासाठी हप्‍ते पाडून घेऊन ते मोटेल व्‍यवसाय खरेदी केले. 

गुजराती पटेल लोकांना माहित होते की, कोणतीही परिस्थिती कायम नसते, ही वेळही निघून जाईल, ही परिस्थिती अंशकालीन आहे, याच आशेवर त्‍यांनी मोटेल व्‍यवसाय चालू ठेवला. काही काळानंतर जेव्‍हा जागतीक बाजारातील हवा बदलेल तेव्‍हा सर्वकाही सर्वसामान्‍य होईल. 

पटेलांजवळ राहण्‍यासाठी घर नव्‍हते, त्‍यामुळे मोटेलच्‍याच एका खोलीत पटेलांचे कुटुंब राहु लागले, आणि मोटेलच्‍या कर्मचा-यांना काढून ते स्‍वतः घरच्‍याच लोकांकडून मोटेलचे काम करून घेऊ लागले.  अशारितीने पटेलांनी मोटेल व्‍यवसायाला एका Low Cost Business-अल्‍पखर्चिक व्‍यवसायामध्‍ये बदलून टाकले. जेणेकरून ते या आणिबाणीच्‍या काळात तग धरू शकतील. 

  • कालांतराने तेलाचे राजकारण संपले. आणि मोटेल व्‍यवसायामधून पटेलांना चांगलाच नफा मिळू लागला होता.  आणि बघता-बघता बॅंकांचे कर्ज फेडून ते पटेल मोटेल व्‍यवसायाचे मालक बनले. 
  • गुजराती धंधो ची रचना “धंधो फ्रेमवर्क समजून घेण्‍यासाठी ही गोष्‍ट खूपच महत्‍वाची आहे.

तर चला वाचकांनो, नवव्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी समजून घेऊ गुजराती समाजातील फायद्याचा धंदा करण्‍याचे पारंपारीक ६-नियम ज्‍यांचे अनुसरन करून मारवाडी, गुजराती आणि सिंधी समाज एवढे श्रीमंत होत असतात...

 

'गुजराती धंधो'चे पारंपारीक ६-नियमः

नियम क्रमांक १: पुर्वप्रस्‍थापित व्‍यवसाय खरेदी करणे
Buy Existing Business Model :

जसे की आपण सर्वांना माहितच आहे, कोणत्‍याही व्‍यवसायाला सुरूवात करण्‍यासाठी खूप वेळ व श्रम लागते. आणि एवढे श्रम-मेहणत व प्रयत्‍न करूनही याची काहीच शाश्‍वती-गॅरंटी नसते की त्‍या व्‍यवसायात तुम्‍हाला चांगला नफा-फायदा होईलच म्‍हणून.

यासाठीच पटेलांनी पुर्वप्रस्‍थापित (Pre-Existing) असलेल्‍या व्‍यवसायाला खरेदी केले. ते नव-व्‍यवसाय उभारण्‍यास गेले नाही.  कारण कोणत्‍याही नवव्‍यवसाय-उद्योग करण्‍यासाठी तुमच्‍याजवळ काहीतरी थोडाफार भांडवल-पैसा असायला पाहिजे.  ज्‍यामुळे काय होईल की तुम्‍ही व्‍यवसायामध्‍ये लावलेला पैसा-भांडवल बुडाले तरी तुम्‍हाला फार काही फरक पडणार नाही.

  •  भांडवली बाजार म्‍हणजेच शेअर मार्केटमध्‍ये नव-नविन कंपन्‍यांचे भाग खरेदी करण्‍यापेक्षा
  •  अशा कंपन्‍यामध्‍ये गुंतवणूक करा ज्‍या कंपन्‍या ब-याच वर्षापासून अस्तित्‍वात आहेत.
  •  अशा कंपन्‍या ज्‍यांची बाजारात चांगली पत-पोझिशन आहे. आणि
  •  अशा कंपन्‍या ज्‍यांचा बिझनेस मॉडेल योग्‍य रितीने कार्य करत आहे.

नियम क्रमांक-०२: अत्‍यंत धिम्‍या गतीने बदल होणारे व्‍यवसाय खरेदी कराः
Buy Business with Ultra Slow Rate of Change

बदल हा गुंतवणूकीचा शत्रू आहे

Change is Enemy of Investment
-Warren Buffet

वॉरेन बफेट् यांच्‍या शब्‍दात सांगायचे झाल्‍यास ते असे सूचवतात की, बदल हा गुंतवणूकीचा शत्रू आहे. यासाठी आपल्‍याला आजच्‍या काळात अशा व्‍यवसायांमध्‍ये गुंतवणूक करायला पाहिजे ज्‍यांचा रेट ऑफ चेंज म्‍हणजेच बदल होण्‍याचा कालावधी अत्‍यंत धिम्‍या गतीचा आहे. 

उदाहरणार्थः

कोकाकोला आणि मॅकडोनाल्‍डस ह्या दोन्‍ही कंपन्‍या आजपासून २० वर्षाअगोदर अस्तित्‍वात होते, आजही आहेत, आणि ब-याच प्रमाणात आपण असे म्‍हणू शकतो की अजून पुढील वीस वर्षेदेखिल ते टिकून राहतील. 

परंतू याच्‍याच दुस-या बाजूला आपण बघितल्‍यास टिक-टॉक, फेसबुक, नेटफ्लीक्‍स अशा तंत्रज्ञानावर आधारित कंपन्‍यांबद्दल आपण काही ठामपणे सांगू नाही शकत. 

👉आपल्‍याला असे आढळून येईल की, तंत्रज्ञानावर आधारित कंपन्‍यांचा रेट ऑफ चेंज खूपच हाय म्‍हणजे बदलाची तीव्रता अधिक असते.

गुंतवणूकीचा पहिलाच नियम
भांडवलाची सुरक्षा | Safety of Capital

आजपासून वीस वर्षाअगोदर आपण ऑर्कुट आणि याहू मॅसेंजर हे सोशल नेटवर्क साईट वापरत होतो, आज आपण फेसबुक वापरत आहोत. काय माहित येणा-या काही वर्षात सरकारी धोरण-कायदे व नियमं बदलतील ज्‍यामुळे एखादे नविनच प्‍लॅटफॉर्म बूम मध्‍ये येईल. एखादे नवीनच व्‍यासपीठ उदयास येईल व भरभराटीस येईल.

👉यासाठीच आपले भांडवल, पैसा अशा कंपन्‍यामध्‍येच गुंतवणूक करा ज्‍यांच्‍यामध्‍ये एका रात्रीतूनच बदल होण्‍याची शक्‍यता नगन्‍य असेल.

कारण गुंतवणूकीचा पहिलाच नियम आहेः  भांडवलाची सुरक्षा Safety of Capital

 

नियम क्रमांक-०३: मघ्‍यस्‍थांवर लक्ष्‍य केंद्रित कराः
Focus on Arbitrage

समजा एक साडी मुंबईमध्‍ये १५,०००/- रूपयांत मिळते परंतू तीच साडी सूरत मध्‍ये १०,०००/- रूपयांत मिळते. जर आपण सूरतमधून साडी खरेदी करून मुंबईमध्‍ये १५,०००/- रूपयांत विकतोय आणि ५,०००/- रूपयांचा नफा कमावत असू तर अशा गोष्‍टीला आर्बिट्राज किंवा मध्‍यस्‍त असे म्‍हणतात.  

वरील उदाहरणात आपण ज्‍या मध्‍यस्‍थ किंवा आर्बिट्राज विषयी बघितलं त्‍याला स्‍थानिक मध्‍यस्‍ती अथवा प्‍लेसेस आर्बिट्राज असे म्‍हणतात. म्‍हणजे दोन स्‍थानांमधील असलेल्‍या किंमतीतील फरकाचा फायदा उचलून आपण पैसा-नफा कमावला.

वेळेच्‍या बाबतीतदेखिल यासारखीच गोष्‍ट होऊ शकते. आपण वेळेसोबतसुद्धा असेच करू शकतो.

उदाहरणार्थः

समजा सोन्‍याची किंमत आज ५०,०००/- रूपये आहे. पुढील एका महिण्‍यात ते ५५,०००/- रूपयांना होईल.  अशावेळी आपण सोन्‍याची विक्री करून नफा कमावला तर त्‍याला आर्बिट्राज ऑफ टाईम किंवा वेळेची मध्‍यस्‍ती आपण म्‍हणू शकतो.  

यासाठीच तुम्‍हालाही गुंतवणूक करताना आर्बिट्राज वर लक्ष्‍य केंद्रित करायला पाहिजे.

 

नियम क्रमांक-०४: मोठ्या प्रमाणात सूट मिळणारे व्‍यवसाय खरेदी करा
Buy businesses at Big Discount

वॉरेन बफेट असे म्‍हणतात की,

"जेंव्‍हा लोकं लोभी होऊन गुंतवणूक करत असतात तेंव्‍हा तुम्‍ही थोडे घाबरले पाहिजे, आणि जेंव्‍हा सर्वजण घाबरून आपले स्‍टॉक सेल-भाग विक्री करत असतील तेव्‍हा तुम्‍ही थोडेसे लोभी होऊन त्‍या स्‍टॉक्‍सना स्‍वस्‍तात कमी किमतीमध्‍ये खरेदी करायला पाहिजे.

Fearful when Market is greedy, and
Greedy when Market in fearful.”
-Warren Buffet

अशाप्रकारे तुम्‍हाला एखाद्या कंपनीचे स्‍टॉक्‍स किंवा भाग तेव्‍हा खरेदी करायला पाहिजे जेव्‍हा भांडवली बाजार खाली उतरलेलं असेल. (Market in Distress Condition)

उदाहरणार्थः 

१९८७, २००८ आणि आताचे २०२० मधील कोरोना काळातील परिस्थितीमध्‍ये शेअरमार्केट खूपच खाली गेलेला होता. जर तुम्‍ही त्‍यावेळी मार्केटमध्‍ये गुंतवणूक केली असती तर आज तुम्‍ही ब-याच प्रमाणात फायदा-नफ्यामध्‍ये राहिला असता.

👉गुंतवणूक करत असताना तुम्‍हाला कंपनीच्‍या व्‍हॅल्‍यूएशन किंवा मूल्‍यांकनावर लक्ष द्यायला पाहिजे.

जेव्‍हा कंपनी किंवा अर्थव्‍यवस्‍था खराब अवस्‍थेत असतात तेव्‍हा चांगल्‍या कंपन्‍या स्‍वस्‍तातल्‍या मूल्‍यांकनावर मिळतात. जेव्‍हा कंपनी एखाद्या अल्‍पकालीन समस्‍येमध्‍ये फसलेल्‍या असतात तेव्‍हा लोकं त्‍या कंपन्‍यांचे शेअर-भाग विक्री करून टाकत असतात. ज्‍यामुळे तो व्‍यवसाय स्‍वस्‍त मूल्‍यांकनावर मिळून जातो.

येथे आपण एखाद्या छोट्या-नवशिक्‍या व्‍यवसायाबद्दल बोलत नाही तर आपण बोलत आहोत अशा व्‍यवसायाविषयी ज्‍यांचा Fundamentally Strong-मूलभूत रचना मजबूत असेल, आणि ज्‍यांना आपण समजू शकतो असे एखादे व्‍यवसाय एखाद्या अल्‍पकालीन समस्‍येमुळे सध्‍या खराब अवस्‍थेत आहे आणि तुम्‍ही त्‍या व्‍यवसायाच्‍या दीर्घकालीन कामगिरीवर विश्‍वास ठेवून आहात तेव्‍हा तुम्‍ही त्‍या व्‍यवसायामध्‍ये गुंतवणूक करू शकता.

👉एक गोष्‍ट लक्षात ठेवाः

व्‍यवसाय किंवा गुंतवणूकीमध्‍ये मिळणारा परतावा किंवा रिटर्न तुम्‍ही किती मोठ्या फायद्याने (Margin) भाग विकत आहात यावर नाही तर किती मोठ्या सूटवर-डिस्‍काऊंटवर खरेदी करत आहात यावर अवलंबून असतो.   

 

उदाहरणार्थः

एखाद्या मालमत्‍तेची किंवा जमीनीची किंमत ०१-कोटी रूपये आहे. आणि त्‍या मालमत्‍तेला तुम्‍ही ८०-लाख रूपयांत खरेदी करत आहात तर तुम्‍हाला खरेदी करतेवेळेसच २०-लाखाचा नफा-फायदा झालेला असेल.

नियम क्रमांक-०५: खंदकाची सुरक्षा असणारे व्‍यवसाय खरेदी करणे
Buy Businesses with Moat

जर तुम्‍ही कोणत्‍याही व्‍यवसायामध्‍ये आपला पैसा गुंतवत आहात तर तुम्‍हाला हे माहित असायला पाहिजे की, तुमच्‍या त्‍या व्‍यवसायामध्‍ये ती एक कोणती खास गोष्‍ट किंवा विशेष बाब आहे जी त्‍यांच्‍या स्‍पर्धकांपेक्षा त्‍यांना उत्‍तम बनवत असते. यालाच लेखक मोट-Moat असे म्‍हणतात.

मोट म्‍हणजे एखाद्या किल्‍ल्‍याच्‍या जवळ बाहेरून बनविण्‍यात आलेले खंदक ज्‍यामुळे शत्रूचे किल्‍यामध्‍ये येण्‍याची शक्‍यता जवळ-जवळ नगण्‍य असेल.

व्‍यवसायामध्‍ये मोट कित्‍येक प्रकारचे असू शकतात.  जसे की भारतामध्‍ये IRCTC रेल्‍वे विभागासारखे रेल्‍वेचे जाळे बनवू शकत नाही. मग भलेही तुमच्‍याजवळ कितीही पैसा का असेना.  कारण त्‍याला शासनाने संरक्षण दिलेले आहे.

उदाहरणार्थ, तुमची एक किराणा मालाची दुकान आहे. तेव्‍हा कोणीही येऊन तुमच्‍या दुकानाच्‍या बाजूलाच किंवा समोर दुसरी किराणा दुकान उघडून व्‍यवसाय करू शकतो.  कारण त्‍यावर शासनाचा कोणताही नियंत्रण नाही.

परंतू जर का तुमची कंपनी, सिव्हिल एक्‍सप्‍लोसिव्‍ह, किंवा दारूगोळा बनवणारी असेल, तेव्‍हा कोणीही येडा-गबाळा येऊन दारूगोळा बनविण्‍याचा कारखाना सुरू नाही करू शकणार. कारण शासनाने मोजक्‍याच कंपन्‍यांना याचा परवाना दिलेला आहे.

आणि एखाद्या नवीन कंपनीला दारूगोळा बनविण्‍याचा परवाना शासन देईल याची शक्‍यता वळ-जवळ नगण्‍य आहे.

तर शासन एकाप्रकारे काही मोजक्‍या उद्योग-व्‍यवसायांना स्‍पर्धेपासून वाचवत असते. आणि शासन वर बघितलेल्‍या मोट किंवा खंदकासारखे काम करत असते.

  • Brand Image
  • Patent
  • Distribution Network
  • हेसुद्धा एकाप्रकारचे मोट म्‍हणजेच खंदकच आहेत.

जसे की एखाद्या नवीन कंपनीचे हॅण्‍ड सॅनिटायजर चांगल्‍या प्रकारे विक्री होणार नाहीत, परंतू तेच हॅण्‍ड सॅनिटायजर रेकिट- reckitt त्‍यांच्‍या Dettol डेटॉल नावाच्‍या ब्रॅण्‍डखाली विकल्‍यास खूप विक्री होईल.  कारण त्‍यांच्‍याजवळ अगोदरपासूनच ब्रॅण्‍ड इमेज सारखे मोट म्‍हणजेच खंदक आहे.  आणि एखाद्या नविन कंपनीला त्‍याला तोडणे कठीण जाईल.

तर कोणतेही शेअर खरेदी करण्‍याअगोदर तुम्‍ही स्‍वतःशीच विचारा की, तुम्‍ही ज्‍या कंपनीचे भाग-शेअर खरेदी करणार आहोत त्‍यांच्‍याकडे कोणतेतरी स्‍पर्धकांविरूद्ध स्‍वतःचे वरचढ असे Competitive Advantage आहे की नाही.

 

नियम क्रमांक-०६: नाण्‍याची बाजू आपल्‍या बाजूने असेल तेंव्‍हा जोरदार गुंतवणूक करा
Bet Heavily when Odds are in Your Favour

चला एक पैज किंवा शर्त लावूया. हेड आला तर तुमचे पैसे डबल होतील आणि टेल आला तर तुम्‍ही लावलेले पैसे शून्‍य होतील.

अशा स्थितीमध्‍ये तुम्‍ही एका पैजेवर किती पैसा लावणार?

तर, लेखकाने येथे एक सूत्र-नियम सांगितलेलं आहे ज्‍याला कॅली फॉर्मुला (Kelly Formula) म्‍हणतात.  त्‍यानुसार वरिल पैजेच्‍या स्थितीमध्‍ये तुम्‍हाला २०-टक्‍के पैसा एका पैजेवर लावायला पाहिजे.

कॅली सूत्रानुसार, जेव्‍हाकेव्‍हा तुमचा नफा होण्‍याची शक्‍यता अधिक असेल तेंव्‍हा तुम्‍हाला मुक्‍तहस्‍ते गूंतवणूक करायला पाहिजे. 

Bet Heavily when Odds are in Your Favour
नाण्‍याची बाजू आपल्‍या बाजूने असेल तेंव्‍हा जोरदार गुंतवणूक करा

पटेलांचं बोलायचं तर, पटेलांनी जेव्‍हा मोटेल व्‍यवसाय खरेदी केले तेव्‍हा त्‍यांना केवळ १०-टक्‍केच रक्‍कम कर्जापोटी सुरूवातीला भरावी लागली होती. आणि उर्वरित ९०-टक्‍के पैसा बॅंकांचा होता.  जर का त्‍यांचा मोटेल व्‍यवसाय अयशस्‍वी झाला असता, तर जास्‍तीत जास्‍त त्‍यांचं किती तोटा झाला असता? फक्‍त त्‍यांची कर्ज उचल करतानाची २० टक्‍केच रक्‍कम गेली असती.

कारण त्‍यांच्‍याजवळ त्‍याव्‍यतिरिकत त्‍यावेळी काहीही नव्‍हतं. म्‍हणजेच ऑड्स विरूद्ध बाजू किंवा दूसरी बाजू पूर्णतः त्‍यांच्‍या बाजूने होती. (ODDS are in Favour) आणि नेमक्‍या अशाच वेळी त्‍यांनी आपला पुर्ण पैसा व्‍यवसायात लावला.

आणि पुढेही जेव्‍हा परत मंदी आली जसे की ९/११. (११/०९/२००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्‍ड ट्रेड सेंटर वर आतंकवादी संघटनेने आत्‍मघाती विमान हल्‍ले करून ट्विन टॉवरउद्ध्‍वस्‍त केले होते.)  तेव्‍हा त्‍यांनी वरील प्रमाणेच नियम वापरून जोरदार गुंतवणूक केली.(Invest Heavily) आणि कित्‍येक मोटेल व्‍यवसायांना स्‍वस्‍त किंमतीमध्‍ये खरेदी केले.

म्‍हणजेच खालची बाजू खूपच कमी होती आणि वरची बाजू खूपच जास्‍त. 

गुंतवणूक करताना तुम्‍हालाही असेच करायला पाहिेजे. आणि जोपर्यंत करार-सौदा पूर्णतः तुमच्‍या बाजूने होत नाही तोपर्यंत पैसा लावायला नाही पाहिजे.
(Invest only when Totally deal in your Favour)

याचा अर्थ तुम्‍हाला हे माहित असेल की, एखादे भाग-स्‍टॉक्‍स तुम्‍हाला त्‍याच्‍या दर्शनिक मूल्‍यापेक्षा (Intrinsic value) कमी किंमतीत मिळत आहे तेव्‍हा तुम्‍हाला जोरदार गुंतवणूक करायला पाहिजे.  (Invest More-Heavily) म्‍हणजेच Heads I Win and Tails I don’t Loose much अशी मानसिकता ठेवायला पाहिजे. आणि हेच दुसरे काही नसून पारंपारिक गुजराती धंधो आहे. (Classic DHANDHO)

तर वाचकांनो हे होते पारंपारिक गुजराती आणि मारवाडी लोकांचे सहा धंधो म्‍हणजेच व्‍यवसाय करण्‍याचे नियम. ज्‍यांद्वारे ते आपली संपत्‍ती व श्रीमंती वाढवत असतात.

The Dhandho Investor ह्या पुस्‍तकाचे लेखक श्री मोहनीश पाबराय असून पारंपारिक धंद्याचे, व्‍यवसायाचे स्‍वरूप जरी बदललेले असले तरीही प्रिन्सिपल्‍स म्‍हणजेच नियम-तत्‍वे आजही शाश्‍वत आहेत आणि परिणामकारक आहेत. 

हे आजच्‍या अत्‍यंत वेगाने-द्रुतगतीने बदल होणा-या शेअर मार्केटच्‍या व्‍यवसायापासून ते एखादे व्‍यवसाय-उद्योग-धंदा या सर्वांमध्‍ये ती तत्‍वे आजही लागू होतात व नफा-फायदा करून देऊ शकतात हे पटवून देतात.

मित्‍तल, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी नावावरूनच कळून चुकत असेल की त्‍यांचा समाज कोणता आहे. त्‍यापेक्षा त्‍यांच्‍या व्‍यवसाय करण्‍याची पद्धत, गुंतवणूक करण्‍याची शैली आणि त्‍यांनी ते करताना वापरलेली तत्‍वे व नियम यांचा आपल्‍या व्‍यवसायासाठी आपणही फायदा करून घ्‍यावा असे हे पुस्‍तक आपल्‍याला सूचवते.

निसर्गातील तत्‍वे व नियम ज्‍याप्रमाणे गर्भश्रीमंत व्‍यक्‍तीपासून ते सर्वसामान्‍य लोकांनाही सारखीच लागू होतात, त्‍याचप्रमाणे व्‍यवसाय-धंदा-उद्योगाची तत्‍वे व नियमं सारखीच लागू होतात.  एखादा समाज किंवा समूह अशी कोणाचीही मक्‍तेदारी येथे नाही. फक्‍त आपण त्‍यांचा उपयोग व वापर कसा, कुठे आणि किती? प्रमाणात करतो यावर आपली प्रगती व विकास अवलंबून असतो.

(फायदा-नफा-तोटा-यश-अपयश यांनाही...)

 

दी धंधो इन्‍व्‍हेस्‍टर

लेखक- मोहनीश पाबराय

पुस्‍तक सारांश मराठी

मुळ इंग्रजी पुस्‍तक अनुवाद

मोहनीश पाबराय पुस्‍तक सारांश दी धंधो इन्‍व्‍हेस्‍टर मराठी The Dhandho Investor Marathi

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 
 👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

१.       रिच डॅड-पुअर डॅड

२.       रिच डॅड्स- गाईड टू इन्‍वेस्‍टींग

३.       रिच डॅड्स कॅशफ्लो क्‍वाड्रंट- गाईड टू फायनान्‍शि‍यल फ्रिडम

४.       रिच किड स्‍मार्ट किड

५.       हाऊ टू अट्रक्‍ट मनी

६.       द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन

👉इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍तक सारांश आवश्‍य वाचाः

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

  1. सालापासून नाही रे, वर्षापासून. धिम्या नाही रे, हळुवार. ही कोणती भेसळ मराठी भाषा आहे. मराठी तरी नीट लिहा रे.

    उत्तर द्याहटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive