बहुविध बुद्धिमत्‍ता-मल्‍टीपल इंटेलिजन्‍स- मराठी-Multiple Intelligence in Marathi

प्रत्‍येकात नऊ बुद्धिमत्‍ता कमी किंवा जास्‍त प्रमाणात असतातच, असे सांगून याव्‍यतिरिक्‍त इतरही क्षमता असण्‍याची शक्‍यता संशोधक डॉ. हावर्ड गार्डनर यांनी वर्तवली आहे. 

बहुविध बुद्धिमत्‍ता…!

मल्‍टीपल इंटेलिजन्‍स

Multiple Intelligence

लेख साभारः डॉ. जगन्‍नाथ म्‍हेत्रे (एम.डी.मेडिसीन) कवठेमहांकाळ
संपर्कः ९८५०६६९४०६
(पुण्‍यनगरी, २८ डिसेंबर-२०२०)



All-rounder-अष्‍टपैलू म्‍हणजे सर्वच क्षेत्रात कुशल असणे.  क्रिकेटमध्‍ये कपिलदेव हा अष्‍टपैलू खेळाडू म्‍हणून ओळखला जातो.  कारण फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात तो तरबेज होता.

एखाद्या व्‍यक्‍तीने राजकारण, समाजसेवा, लेखन, कला, क्रीडा आदी सर्व क्षेत्रात उत्‍तम कामगिरी केली असेल तरी ते अष्‍टपैलू व्‍यक्तिमत्‍व ठरते.

असे व्‍यक्तिमत्‍व म्‍हणजे जणू आठही (सर्व) बाजूंनी झळकणारा हिराच.  जन्‍मलेल्‍या प्रत्‍येक मुलात विशिष्‍ट क्षमता असतात.  त्‍यांच्‍या नैसर्गिक बुद्धिमत्‍तांना संधी मिळाली की ते खुलतात. 

अमेरिकन संशोधक डॉ. हावर्ड गार्डनर यांनी १९८३ मध्‍ये थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्‍स हा सिद्धांत मांडला. तेव्‍हा त्‍याला बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्‍ता असं म्‍हटलं गेलं.

हा सिद्धांत मांडताना गार्डनर यांनी प्रत्‍येकात नऊ बुद्धिमत्‍ता कमी किंवा जास्‍त प्रमाणात असतातच, असे सांगून याव्‍यतिरिक्‍त इतरही क्षमता असण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. 

बाप जैसा बेटा, कुमार वैसा लोटा

बाप जैसा बेटा, कुमार जैसा लोटाअशी आपल्‍याकडे एक म्‍हण प्रचलित आहे.  तथापि, परिस्थितीमुळे लोक घडतात किंवा बिघडतात.  कष्‍टाचे फळ जरूर मिळते पण ते फळ नेहमी चांगले असेलच याची खात्री देता येत नाही. 

आपल्‍याला आपली मुले सुसंस्‍कारित, बुद्धिचातुर्यक्षम हवी असतील तर पालकांनी आपली व्‍यस्‍तता थोडी कमी करणे गरजेचे असून मुलांना नुसतेच शिकवण्‍यापेक्षा वातावरण निर्मिती जास्‍त महत्‍वाची आहे.  

 

👉अधिक वाचाः  📙📘📗📖📕


कारण ज्‍या वयात मुलांचा बौद्धिक विकास होत असतो, त्‍या वयात आजूबाजूला जसे घडत असते तेच मुलाच्‍या मनावर कोरले जाते.  संत बहिणाबाई म्‍हणतात,

फुलामधी सामावला धरित्रीचा परीमल,
माझ्या नाकाले विचारा नथनीले त्‍याचे काय
?

मातीचा सुवास फुलांमध्‍ये उतरला आहे, हे एखाद्याच्‍या नाकाला समजते.   बाह्य अलंकार असलेल्‍या नथनीला ते काय कळणार? या प्रमाचे पालकांनी व शिक्षकांनी आपला पाल्‍य व विद्यार्थी कोणत्‍या बुद्धिमत्‍ता गटात बसतो व त्‍याला कोणते कौशल्‍य आहे व त्‍याच्‍या बुद्धिचातुर्यानुसार त्‍याला भाषा, कला, क्रीडा, सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित यावर भर देता येईल. 

 

 


 

अल्‍बर्ट आइन्‍स्‍टाईन यांनी प्रत्‍येकाकडे एक अलौकिक बुद्धिमत्‍ता असते, असे म्‍हटले असून

"आपण पाण्‍यातील माशाला झाडावर चढण्‍यास, वाघाला पोहण्‍यास किंवा पक्ष्‍यांना चालण्‍यास प्रवृत्‍त केले तर ते आयुष्‍यभर मूर्खच आणि बावळट ठरतील."- अल्‍बर्ट आइन्‍स्‍टाईन

असा त्‍यांनी मार्मिक व सूचक सल्‍ला दिलेला आहे.  म्‍हणून पालकांनी व शिक्षकांनी आपल्‍या पाल्‍याचा अथवा विद्यार्थ्‍यांचा विकास कोणत्‍या बुद्धिमत्‍तेत कौशल्‍यपूर्ण होऊ शकतो हे वेळीच ओळखले पाहिजे.

शिक्षण व्‍यवस्‍था-श्री धर्माधिकारी सर

मित्रांनो आपल्‍या भारतातील आजच्‍या शिक्षण व्‍यवस्‍थेची सुरूवात इंग्रजांनी केली. त्‍या ब्रिटिश कालीन व त्‍यांना हवे तसे शिक्षण त्‍यांनी आपल्‍यावर लादले, आजही ती व्‍यवस्‍था मूळ धरून आहे खरी परंतू त्‍या शिक्षणचे दुष्‍परिणाम आज आपल्‍याला दिसून येत आहेत. 

त्‍या इंग्रज कालीन शिक्षण पद्धतीबद्दल धर्माधिकारी सर यांनी अतिशय चांगल्‍या पद्धतीने भाष्‍य केले आहे.  वर उल्‍लेख केलेल्‍या व चित्रात दिसणा-या प्राण्‍यांची शाळा त्‍यांनी कशी भरवली व कशी चालवली जाते याचा समाचार आपल्‍या शैलीत घेतला आहे.  

सर्वांनी अवश्‍य ऐकावे आणि आत्‍मनिरिक्षण करून आपल्‍या पाल्‍यांवर होतत असलेले परिणाम तपासून योग्‍य तो मार्ग काढून त्‍यांच्‍या शैक्षणिक भविष्‍याचा योग्‍यतो निर्णय घ्‍यावा. 

शिक्षण व्‍यवस्‍था-श्री धर्माधिकारी सर  (Education by Dharmadhikari Sir) 

अधिक वाचाः

www.evachnalay.in
 

 

विराट कोहली हा वयाच्‍या तिस-या वर्षापासून हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळायला लागला तर लता मंगेशकर वयाच्‍या तिस-या वर्षी गायला लागल्‍या, अशी अनेक उदाहरणे आहेत.

आपल्‍या मुलात कोणती विशेष क्षमता आहे व ती कशी वाढेल यावर आपण विचार केला पाहिजे.  नेहमीच्‍या शिक्षणपद्धतीबरोबर काही वेगळे मुलाच्‍या आवडीचे शिकायला मिळाले तर त्‍याचा कल कोणत्‍या बाजूला आहे हे समजेल.

समर्थ रामदासांनी मित्रत्‍वाच्‍या भावनेने मनावरच्‍या संस्‍काराचा उपदेश केला आहे.  षडरिपूवर ताबा मिळवून मनाला बुद्धीच्‍या स्‍वाधीन करायचा सल्‍ला दिला आहे. ते म्‍हणतात,

नको रे मना क्रोध हा खेदकारी |

नको रे मना काम नाना विकारी |

नको रे मना सर्वथा अंगीकारू |

नको रे मना मत्‍सरू दंभभारू ||

याउलट बहिणाबाईंनी आईच्‍या मायेने मनाचे वर्णन करून सावधगिरीचा सल्‍ला दिला आहे. 

मन पाखरू, पाखरू, त्‍याची काय सांगू मात,
आता व्‍हतं भुईवरं, गेलं गेलं आभायात.

मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते.  हुशार आणि सर्जनशिल मुलाला बुद्धीने हाताळले तर तो विद्वान होईल.  बुद्धिमत्‍ता या संकल्‍पनेत अनेक गोष्‍टींचा समावेश आहे. केवळ औपचारिक शिक्षण झाले असेल, म्‍हणजे फार बुद्धिमान असे अजिबात नसते.  शिक्षण झालेले नसले तरी बुद्धीचे, बुद्धि चातुर्याने अफाट आविष्‍कार घडवणा-या कितीतरी व्‍यक्‍ती शास्‍त्रज्ञ, समाजसुधारक आहेत.  

अधिक वाचाः

 📘📙📗📖🔖📑

बहुविध बुद्धिमत्‍ताः

बुद्धिमत्‍तेचे अनेक प्रकार, उपप्रकार, कोन, पैलू, आयाम, मिती आहेत.  यालाच बहुविध बुद्धिमत्‍ता असे म्‍हणतात.  अमेरिकन संशोधक डॉ.हावर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्‍ता या विषयावर मूलभूत आणि मौलिक संशोधन केले आहे.  त्‍यांच्‍या मते बुद्धिमत्‍ता ही एकच गोष्‍ट नाही तर तिचे वेगवेगळे नऊ प्रकार किंवा मिती आहेत. 

 

 गणिती (तार्किक-Logical): 

यामध्‍ये गणित सोडवणे व कुठल्‍याही विषयाचा तार्किक दृष्टिकोनातून विचार करणे व अमूर्त संकल्‍पना हाताळणे. एखाद्या घटनेचा किंवा विषयाचा अनेक अंगाने विचार करणे आदींचा समावेश होतो.  यांना नंबर स्‍मार्ट (Number Smart) म्‍हणतात.   

उदाहरणार्थ- अल्‍बर्ट आइन्‍स्‍टाईन.  हे विद्यार्थी वैज्ञनिक, अभियंता, संगणक प्रोग्रामर, गणिततज्‍ज्ञ होतात.

 

भाषिक (Linguistic): 

भाषिक बुद्धिमत्‍ता म्‍हणजे भाषा, शब्‍द वापरण्‍याची क्षमता व आवड, वाचनावर प्रेम, शब्‍दाच्‍या छटांची जाण, व्‍याकरणाची जाण असणे. यांना ‘वर्ड स्‍मार्ट’ (Word Smart) म्‍हणतात. यांच्‍यामध्‍ये ऐकणे, बोलणे, कथा-काव्‍य लिहिणे, सांगणे, शिकवणे, विनोद करणे याबाबतीत प्राविण्‍यता असते. हे विविध भाषा शिकतात. संयमी वक्‍तृत्‍व शैली आत्‍मसात करतात व हे प्रभावशाली असतात.

हे उत्‍कृष्‍ट राजदूत, सांस्‍कृतिक दूत, कवी, पत्रकार, लेखक, चांगले शिक्षक, वकील, राजकारणी बनू शकतात. 

 
उदाहरणार्थ स्‍वर्गीय गदिमा, बहिणाबाई चौधरी, वपु काळे

 

👉अधिक वाचाः  📙📘📗📖📕

 

अवकाशीय (दृश्‍यात्‍मक-Visual):  

हे विद्यार्थी चित्रांच्‍या रूपात विचार करतात.  या विद्यार्थ्‍यांना नकाशे, चार्ट, चित्रे, प्रतिमा, व्हिडिओ, चित्रपट, चलचित्रे  पाहण्‍याने आनंद मिळतो. यांना पिक्‍चर स्‍मार्ट (Picture Smart) म्‍हणतात.  असे विद्यार्थी शिकण्‍यासाठी शक्‍यतो दृश्‍य व अवकाशीय माध्‍यम स्‍वीकारतात.  त्‍यांची स्‍मरण शक्‍ती ही फोटोग्राफिक स्‍मृती’ (Photographic Memory or Photo Memory) असते. फोटो मेमरी उदा- ब्‍युटिफुल मांईंड, शेरलॉक होल्‍मस   

हे विद्यार्थी शिल्‍पकार, चित्रकार, आर्किटेक्‍ट, डिझायनर, फोटोग्राफी तज्‍ज्ञ, अभियंता होतात.  उदा‍हरणार्थ, पाब्‍लो पिकासो, व्‍हेन गॉग

 

शारीरिक किंवा कायिक बुद्धिमत्‍ता (Bodily Kinaesthetic): 

या प्रकारच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये शारीरिक हालचाल, संतुलन व शारीरिक समन्‍वय राखण्‍याचे कौशल्‍य चांगले असते.  हे चांगले नर्तक, अभिनेता, खेळाडू, अग्निशामक दल प्रमुख, एथलीट बनतात.

 

निसर्गवादी (Naturalist)  :

यांच्‍यामध्‍ये वातावरण, प्राणी किंवा वनस्‍पतीची ओळख, त्‍यांचे वर्गीकरण करण्‍याची व त्‍यांच्‍यातील बदल ओळखण्‍याची नैसर्गिक क्षमता असते. यांना नेचर स्‍मार्ट’ (Nature Smart) असे म्‍हणतात.  यांना पर्यावरणाची काळजी असते.

हे निसर्गाशी एकरूप असतात.  प्राणी व वनस्‍पती यांची त्‍यांना चांगली ओळख असते. 

हे विद्यार्थी  जीवशास्‍त्रज्ञ, वनस्‍पती शास्‍त्रज्ञ, प्राणी शास्‍त्रज्ञ व त्‍यातील अभ्‍यासक-संशोधक बनतात.

 

भावनिक (Emotional):

   बाह्य (Intra Personal-आंतर वैयक्तिक बुद्धीमत्‍ता) बहिर्मुखी- Extrovert: समाजात वावरताना इतर व्‍यक्‍तींशी जुळवून घेणे, त्‍यांच्‍याशी मैत्री करणे, त्‍यांच्‍या विषयी सहानुभूती बाळगणे, लोकसंग्रह करणे, दीर्घकालीन नाती निर्माण करणे, यामध्‍ये ह्या प्रकारातील लोक समरस असतात. 

यांच्‍यात सामाजिक बुद्धिमत्‍ता (Social Intelligent) चांगली असते. 

हे विद्यार्थी सल्‍लागार, समुपदेशक, विक्रेते, राजकारणी व उद्योगपती बनू शकतात.

 

व्‍यक्‍ती अंतर्गत (भावनिक अंतर्गत) (Inter Personal- अंतर्मुखी-Introvert:

या प्रकारातील व्‍यक्‍ती स्‍वतःला ओळखण्‍याबरोबर इतरांनाही ओळखतात.   स्‍वतंत्र विचार आणि उच्‍च आत्‍मविश्‍वास त्‍यांना इतरांपासून वेगळा बनवतो.  हे त्‍यांच्‍या भावना व विचार सर्जनशील मार्गाने व्‍यक्‍त करतात. 
ते सतत नवीन जीवन, तत्‍वज्ञान व स्‍वतःला सुधारण्‍याचा मार्ग शोधत असतात.

त्‍यांना भावनिक बुद्धिमत्‍ता (Emotional Intelligent) चांगली असते.  हे विद्यार्थी संशोधक, नेते, चांगले शिक्षक बनू शकतात.

 

अस्तित्‍वनिष्‍ठ (Existential): 

यांना मानवी अस्तित्‍वाबद्दल खोलात जाऊन विचार करण्‍याची क्षमता असते.  यांना लाईक स्‍मार्ट” (Like-Life……!? Smart) म्‍हणतात.  मनुष्‍याने जीवन विश्‍वाच्‍या मानाने किती नगण्‍य आहे याची जाणीव यांना असते.   व स्‍वतःला किती महत्‍व द्यायचे याच्‍या मर्यादा यांना माहित असतात.

या प्रकारातील विद्यार्थी स्‍वयंप्रेरित असतात. यांची अध्‍यात्मिक बुद्धीमत्‍ता चांगली असते.  हे विद्यार्थी तत्‍ववेत्‍ते, योगी, धर्मगुरू, आदर्श शिक्षक बनतात.

 

संगीतविषयक (Musical): 

हे ताल, सुरासाठी वेडे असतात.  आपण तानसेन असायलाच हवं असं नाही.  तरी कानसेन तरी होता येतं.  आपल्‍या जगण्‍यातसुद्धा एक सूर, लय, ताल असतातेच याला आपण जीवनसंगीत (Life Music) म्‍हणतो.

हे विद्यार्थी साऊंड स्‍मार्ट’ (Sound Smart Students) असतात.  यांना लहानपणापासून संगीताची आवड असते.

हे विद्यार्थी गीतकार, संगीतकार, गायक, डि.जे. होऊ शकतात. 

 

आपल्‍या मुलाचा किंवा मुलीचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर वरील नऊ प्रकारच्‍या बुद्धिमत्‍तांपैकी चार ते पाचमध्‍ये किमान प्रगती हवी.  संत तुकारामांच्‍या नजरेत नैतिक बुद्धिमत्‍ता असणा-या समाजाचे स्‍मरण होते.  ते अपल्‍याला अभंगातून कळकळीने सांगतातः

आता तरी पुढे हाचि उपदेश,

नका करू नाश आयुष्‍याचा |

सगळ्यांच्‍या पाया माझे दंडवत,

आपुलाले चित्‍त शुद्ध करा ||

लेख साभारः डॉ. जगन्‍नाथ म्‍हेत्रे (एम.डी.मेडिसीन) कवठेमहांकाळ
संपर्कः ९८५०६६९४०६ (पुण्‍यनगरी, २८ डिसेंबर-२०२०)
 
 
 
 
 
 

👉आपली शिकण्‍याची पद्धत/बुद्धी कोणती?
मराठीत लवकरच घेऊन येत आहेात..!
Learner Type -Marathi online TEST- Learner Type

सदरील चाचणी सोडवून पाहा  आपण कोणत्‍या बुद्धिमत्‍तेचे धनी आहोत ते. 



 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता.

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत. आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive