नेमके काय बोलावे?- भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्द- पुस्तक सारांश- मराठी-भाग-2 | Part-2
योग्यवेळी योग्य शब्दांना बोलण्याच्या ह्या संवाद कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळविल्यास नक्कीच तुम्ही संभाषण-संवादाला तुमच्या नियंत्रणात ठेवाल, आणि आपल्या बोलण्याने लोकांना सहमत करण्यास यशस्वी व्हाल.
नेमके काय बोलावे?
भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्द
आधुनिक संवाद-संभाषण कौशल्य
लेखक-फिल एम.जोन्स
पुस्तक सारांश भाग-2
- ह्या पुस्तकचे सारांश वाचल्यानंतर तुम्ही इतरांशी संवाद-संभाषण करण्यात अशारितीने पटाईत व्हाल की समोरील व्यक्ती तुमच्याशी तुमच्या बोलण्याशी अधिकतरवेळा सहमत होईल
- व ते तुमच्याशी बोलण्यात रूची दाखवतील.
- तर, जर तुम्हालाही लोकांशी संवाद-संभाषणात निःष्णात-निःपुण-पटाईत-सरस व्हायचे असेल आणि
- स्वतःचे संभाषण कौशल्य सुधारायचे असेल तर तुम्हाला ही पुस्तक अवश्य वाचली पाहिजे.
नेमके काय बोलावे?
भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्द
आधुनिक संवाद-संभाषण कौशल्य
लेखक-फिल एम.जोन्स
पुस्तक परिचय-सारांश- मराठी
Exactly What to Say: The Magic Words for Influence and Impact
by the Author Phill M. Jones
Advance Communication Skills
Book Summary in Marathi
एक्झॅक्टली व्हाट टू से- मराठी | Exactly What to Say in Marathi Book Summary
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement- लोकव्यवहार- Exactly What to Say in Marathi Book Summary | Marathi Translation Summary of the book The Exactly What to Say in Marathi
हेसुद्धा वाचाः देहबोली-बॉडी लॅंग्वेज | Also Read: Body Language
देहबोली- संभाषण चातुर्य- द डिफीनिटीव्ह बुक ऑफ बॉडी लॅंग्वेज- अॅलन आणि बारबरा पिज
नेमके काय बोलावे- (Exactly What To Say)
एक्झॅक्टली व्हाट
टू से
📗📙📘📕📖📑
पुस्तक सारांश-मराठी- भाग-२
Book Summary Marathi- Part-2
📗📙📘📕📖📑
मराठी पुस्तक सारांश- भाग-1 वाचन
करण्यासाठी
Book Summary in Marathi- Part-1
👇Part-2👇
6. When Would Be a Good Time? -योग्य किंवा चांगली वेळ कोणती असेल?
जेव्हा केंव्हा तुम्ही एखाद्याशी खूपच गंभीर विषयावर बोलाल किंवा एखादी महत्वाची गोष्ट सामाईक करू इच्छिता ज्यामध्ये समोरील व्यक्ती लक्षपुवर्क, खास काळजीने तुमचे बोलणे ऐकून घ्यायला तयार असेल. तर तेव्हा तुम्हाला त्यांना असं विचारायला पाहिजे की,
या संवादा-संभाषणासाठी, बोलण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी त्यांच्या हिशोबाने चांगली वेळ कोणती असेल? तर या गोष्टीमुळे त्यांच्या मनामध्ये हे बसेल की,
‘’बरं.. तर ती वेळ.....असेल.’’ तेव्हा ती व्यक्ती लक्षपुवर्क तुमचे म्हणणे ऐकायला लागेल. तुमच्या बोलण्याला ध्यानदेऊन ऐकण्यास तयार राहिल.
ह्याचा फायदा असा होतो की, ते त्या संभाषणाला टाळू शकत नाहीत. नाही म्हणू शकत नाहीत. आणि त्यांच्याच वेळेने का होईना परंतू ते तुमचे बोलणे ऐकतील हे नक्की.
उदाहरणार्थः
ह्या काम करण्यासाठी तुमच्या हिशोबाने योग्य वेळ कोणती असेल?
तुमच्यासाठी ह्या बैठकीला योग्य वेळ कोणती असेल?
जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारत असता तेव्हा हे असं दाखवतं की तुम्ही त्यांच्यासाठी किंवा समोरील व्यक्तीच्या वेळेची कदर करत असता. ज्यामुळे ते तुमच्या बोलण्याचीही कदर करतात, आणि तुमच्या बोलण्याकडे संपूर्ण लक्ष देऊन ऐकून घेतात.
७. You Have Three Options- तुमच्याकडे तीन पर्याय आहेत
(Manipulated-दुस-यांकडून जाणिवपुर्वक किंवा हेतूपुरस्सरपणे प्रभावित होऊन एखादे काम करवून घेणे किंवा इतरांच्या प्रभावाने मनाविरूद्ध निर्णय घेणे, स्वतः निर्णय न घेणे)
कोणतीही व्यक्ती Manipulated वाटून घेऊ इच्छित नाही. सगळ्यांना असे वाटत असते की त्यांनी
आपले निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यायला पाहिजेत. जर तुम्ही एखाद्याला एखाद्या
विशिष्ट निर्णयावर आणू इच्छिता तेव्हा तुम्ही संभाषणानंतर त्यांना तीन पर्याय
देऊ शकता.
ज्यामुळे त्यांच्या मनातील सर्व गोंधळ दूर होईल. आणि ते एखाद्या अंतिम किंवा
निर्णायक निर्णयावर येतील.
उदाहरणार्थः
ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुमच्याजवळ तीन पर्याय आहेत.
किंवा ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुमच्याजवळ तीन पर्याय आहेत.
तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासाठी योग्य कोणतं राहील?
8. Two Types of People- दोन प्रकारच्या व्यक्ती
तुम्ही अगदी सहजच लोकांमध्ये आपल्या बोलण्याकडे लक्ष वेधून घेऊ शकता किंवा आपल्या बोलण्यामध्ये रूची निर्माण करून घेऊ शकता. परंतू, त्यांना एखाद्या विशिष्ट निर्णयावर घेऊन येणे जे त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीदेखिल फायद्याचे ठरेल, हे अत्याधिक अवघड काम आहे.
· तर जेव्हा अशी परिस्थिती-Situation येईल, तेव्हा पुढील व्यक्तीला काही परिस्थिती-रूपरेखा-Scenario कल्पना करायला लावा ज्याद्वारे ते योग्य आणि चांगले निर्णय घेऊ शकतील.
· आणि यामध्ये त्यांच्याकडे निवडी-पर्याय जीतके जास्त आणि वेगवेगळे असतील तेवढे समोरील व्यक्तीला स्वतःसाठी योग्य निर्णय घेणे सोपे होईल.
उदाहरणार्थ-१
ह्या जगात दोन प्रकारची माणसं असतात,
- एक अशी माणसं जी कोणतेही अनुभव न घेता इतरांना नावे ठेवत असतात, बोट दाखवत असतात. तर
- दुस-या प्रकारची माणसं कोणाविषयी आपले मत बनविण्याअगोदर, त्यांना नावे ठेवण्याअगोदर, बोट दाखविण्या आगोदर प्रथम ते स्वतः त्याचा अनुभव घेतात, त्या गोष्टी वापरतात, आणि नव-नविन अनुभव घेत असतात.
आणि मग नंतरच इतरांविषयी स्वतःचे मत बनवतात.
अजून एक उदाहरण तुमच्यासाठी ज्यामुळे तुम्ही स्वतःला त्याठिकाणी ठेवून बघू शकता.
उदाहरण-२
ह्या जगात दोन प्रकारची माणसं असतात,
१. पहिली अशी माणसं जी ह्या प्रकारची स्वयंविकास आणि स्वयंमदतीवरील पुस्तकं, सारांश, लेख वाचन करतात, प्रेरणादायी चलचित्र-व्हिडिओ पाहतात, परंतू कधीही काहीच कृती करत नाहीत. तर
२. दुसरी अशी माणसं असतात जी, ह्या प्रकारची पुस्तकं वाचन करून, व्हिडीओ, ऑडियो, सारांश इत्यादी इतरांकडून किंवा स्वयंप्रेरणा घेऊन, पुस्तकांतून ज्ञान आत्मसात केल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या जीवनात त्या गोष्टींना उतरवतात, अनुभव घेतात, नव-नव्या कल्पना-संकल्पनांना शिकत राहतात, स्वतःमतध्ये बदल करत राहतात.
तर मग तुम्हीच ठरवा आणि आम्हाला खालील टिप्पणीद्वारे कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायला आवडेल पहिली का दुसरी प्रकारची?
9. Before You Make Your Mind Up- तुमचे मन बनविण्याअगोदर
कोणाचेही निर्णय बदलवणे जवळजवळ अशक्य आहे.
त्यामुळे त्यांच्या घेतले गेलेले निर्णय दबावपूर्वक बदलवण्याऐवजी त्यांना “कदाचित अवस्थेत” (May Be State) आणणे गरजेचे आहे. जिथे त्यांना त्यांच्या निर्णयावर शंका येईल, त्यांना असं वाटेल की, कदाचित तुम्ही जेकाही सांगत आहात ते त्यांच्या फायद्याचेच असेल.
तर, जेव्हा केव्हा कोणी तुमच्या बोलण्याशी असहमत असेल, तेव्हा तुम्ही पुढे दिलेल्या जादुई शब्दांचा वापर करू शकता, आणि म्हणू शकता,
तुम्ही तुमचं निर्णय घ्याल, याअगोदर सा-या तथ््यांवर आणि मुख्य मुद्द्यांवर नजर फेरून पाहुया.
तुम्हाला हा प्रस्ताव पसंत आहे की नाही किंवा आवडला का नाही याविषयी तुम्ही तुमचं मन बनविण्याअगोदर, तुम्हाला ह्या प्रस्तावामुळे मिळणा-या सर्वप्रकारच्या फायद्यांविषयी एकदा पुःनर्विचार करायला पाहिजे.
असं करणं त्यांच्या निर्णयाला प्रभावीत करेल, आणि शक्यता आहे की ते पुन्हा विचार करतील.
10. What Make You Say That?- कशामुळे तुम्ही असं म्हणालात?
असहमत असणे आपल्या सर्वांची एक सामान्य समस्या आहे.
जो व्यक्ती प्रश्न विचारतो तो जिंकतो
तुम्ही कोणाकडून काही अपेक्षा ठेवता, आणि तुम्ही असं इच्छिता की समोरील व्यक्ती तुमच्या बोलण्याशी सहमत असेल.
परंतू, अधिकतरवेळा याच्या उलटच बघायला मिळतं, आणि असहमती-Disagreement सामान्यपणे एखाद्या संभाषणाचा-संवादाचा शेवटच असतो.
लेखक असं म्हणतात की,
संभाषणावर आपलं नियंत्रण ठेवणं, आपल्या बोलण्यावर लोकांना सहमत करण्याची किल्ली आहे.
आणि जो व्यक्ती प्रश्न विचारत असतो तो नेहमीच संभाषणावर आपली नियंत्रण करत असतो.
तर पुढच्यावेळी यानंतर जर कोणी तुमच्या बोलण्याशी असहमत असेल आणि तुम्ही संभाषणावरील आपले नियंत्रण सूटत आहे असं वाटलं तर पुढील जादुई शब्द तुम्हाला खूपच मदत करतील.
समोरच्या व्यक्तीला विचारा की,
ते जे सांगत आहेत, म्हणत आहेत, त्याचे कारण काय आहे?
ते असं का विचार करत आहेत?
यामुळे तुम्ही त्यांच्याच बोललेल्या वाक्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकत असता. ज्यामुळे त्यांच्या कारणांविषयी तुम्हाला समजत राहील.
तुम्ही त्यांना अधिक चांगल्यारितीने समजून घेत राहता. आणि तुम्ही तुमच्या मुद्द्याला अधिक चांगल्या रितीने समोर ठेवू शकता ज्यामुळे शेवटी त्यांचा आणि तुमचा फायदा होऊ शकतो.
उदाहरणार्थः
जर कोणी ग्राहक तुम्हाला असं म्हणून तुम्हाला ऐकण्यास टाळत असेल की, आता मी त्या गोष्टीला खरेदी करू शकत नाही. तेव्हा त्यांच्या त्या बोलण्याला प्रतिउत्तर देण्याऐवजी त्यांना तुम्ही असं विचारा की, तुम्ही सं का बोलत आहात?
ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या कारणांचा पत्ता लागेल, ते असं का म्हणत आहेत याविषयीच्या त्यांच्या काळज्या व शंकांविषयी, कारणांविषयी अधिक समजेल.
असेही होऊ शकते की त्यांच्याजवळ पैसा नसेल, ती वस्तू अगोदरच त्यांच्याकडे असेल, किंवा तयांच्याकडे खरोखरच योग्य वेळ नसेल, किंवा ह्यापेक्षा तुम्ही त्यांना योग्य व चांगले प्रस्ताव देऊ शकता ज्यामध्ये ते समाधानी असतील.
तर वाचकमित्रांनो, जर तुम्ही योग्य वेळी ह्या नेमक्या शब्दांचा योग्य वापर करून संभाषण-संवाद साधाल तर नक्कीच तुमचे संभाषण वादावाद न होता संवाद ते सुसंवाद असे होईल.
योग्यवेळी योग्य शब्दांना बोलण्याच्या ह्या संवाद कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळविल्यास नक्कीच तुम्ही संभाषण-संवादाला तुम्ही तुमच्या नियंत्रणात ठेवाल, आणि आपल्या बोलण्याने लोकांना सहमत करण्यास यशस्वी व्हाल.
चांगले संवाद-संभाषण तेव्हाच ठरेल जेव्हा तुम्ही वर सांगितलेले सॉफ्ट स्किल आत्मसात कराल. लक्षात ठेवा परिणामकारक संभाषण तेव्हांच होईल जेव्हा तुम्ही चांगले शब्द, वाक्य अर्थात चांगले बोलणे याबरोबरच आपल्या देहबोलीवर अधिक लक्ष द्याल, आणि योग्य वेळी योग्य देहबोलीचा वापर कराल. मग नक्कीच उत्तम संवाद-संभाषण होईल, सुसंवाद ठरेल.
हेसुद्धा वाचाः देहबोली-बॉडी लॅंग्वेज
Also Read: The Definitive Book of Body Language By the Authors Allan & Barbara Pease
देहबोली- संभाषण चातुर्य- द डिफीनिटीव्ह बुक ऑफ बॉडी लॅंग्वेज -एलन आणि बारबरा पिज
पुस्तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्तरपणे पुस्तक वाचन करून आपले व्यक्तीमत्व सुधारा, आपला विकास करा, यशस्वी व्हा.
वैयक्तिक विकास, स्वयंमदतीवर ही पुस्तक तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्थळावरील अशाच संवाद कौशल्यांवर, लोकव्यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्तक सारांश अवश्य वाचा.
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या