नेमके काय बोलावे?- भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्‍द- पुस्‍तक सारांश- मराठी-भाग-१ | Part-1

योग्‍यवेळी योग्‍य शब्‍दांना बोलण्‍याच्‍या ह्या संवाद कौशल्‍यामध्‍ये प्रभुत्‍व मिळविल्‍यास नक्‍कीच तुम्‍ही संभाषण-संवादाला तुमच्‍या नियंत्रणात ठेवाल, आणि आपल्‍या बोलण्‍याने लोकांना सहमत करण्‍यास यशस्‍वी व्‍हाल.

नेमके काय बोलावे?

भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्‍द

आधुनिक संवाद-संभाषण कौशल्‍य

लेखक-फिल एम.जोन्‍स 


पुस्‍तक सारांश भाग-१

  • ह्या पुस्‍तकचे सारांश वाचल्‍यानंतर तुम्‍ही इतरांशी संवाद-संभाषण करण्‍यात अशारितीने पटाईत व्‍हाल की समोरील व्‍यक्‍ती तुमच्‍याशी तुमच्‍या बोलण्‍याशी अधिकतरवेळा सहमत होईल 
  • व ते तुमच्‍याशी बोलण्‍यात रूची दाखवतील.  
  • तर, जर तुम्‍हालाही लोकांशी संवाद-संभाषणात निःष्‍णात-निःपुण-पटाईत-सरस व्‍हायचे असेल आणि 
  • स्‍वतःचे संभाषण कौशल्‍य सुधारायचे असेल तर तुम्‍हाला ही पुस्‍तक अवश्‍य वाचली पाहिजे.     

नेमके काय बोलावे?

भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्‍द

आधुनिक संवाद-संभाषण कौशल्‍य

लेखक-फिल एम.जोन्‍स

पुस्‍तक परिचय-सारांश- मराठी

 

Exactly What to Say: The Magic Words for Influence and Impact

by the Author Phill M. Jones

Advance Communication Skills

Book Summary in Marathi

एक्‍झॅक्‍टली व्‍हाट टू से- मराठी  | Exactly What to Say in Marathi Book Summary

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement- लोकव्‍यवहार- Exactly What to Say in Marathi Book Summary | Marathi Translation Summary of the book The Exactly What to Say in Marathi

हेसुद्धा वाचाः देहबोली-बॉडी लॅंग्‍वेज  | Also Read: Body Language

देहबोली- संभाषण चातुर्य- द डिफीनिटीव्‍ह बुक ऑफ बॉडी लॅंग्‍वेज- अॅलन आणि बारबरा पिज

नेमके काय बोलावे- (Exactly What To Say)
एक्‍झॅक्‍टली व्‍हाट टू से

 📗📙📘📕📖📑

पुस्‍तक सारांश-मराठी- भाग-१
Book Summary Marathi- Part-1

  📗📙📘📕📖📑

जादुई शब्‍दांना वापरून संवाद-संभाषणाला आपल्‍या बाजूने करू शकता.

मित्रांनो काय तुम्‍हाला कधी असं वाटलं की, जेव्‍हा एखाद्याशी बोलताना तुम्‍ही त्‍या परिस्थितीला चांगल्‍या पद्धतीने सांभाळून घेतले असते? किंवा काय तुम्‍हाला कधी असं वाटलं की, कदाचित त्‍या वेळी मी दुसरंच काही बोललं असतं तर त्‍यावेळी संभाषणातील परिणाम माझ्या बाजूने आले असते.

  • ९८-टक्‍के संभाषण असहमतीने संपतात
  • ०२-टक्‍के संभाषणात सहमतीने संपतात

एका संशोधनानुसार, जेव्‍हा दोन व्‍यक्‍ती बोलत असतात तेव्‍हा ९८% टक्‍के संवाद-संभाषण कधीही दोन्‍ही व्‍यक्‍तींच्‍या मर्जीने किंवा सहमतीने संपत नाही.  यामुळेच एखाद्यासाठी ते संभाषण खूपच लहान असते तर समोरील व्‍यक्‍तीसाठी ते संवाद खूपच लांब असल्‍याचे वाटू शकते.

आणि फक्‍त केवळ ०२% टक्‍केच लोकांच्‍या बाबतीत त्‍यांना असे वाटते की त्‍यांचे बोलणे योग्‍य वेळी संपले आणि ज्‍यावर दोघेही सहमत होते.

संभाषण किंवा वाटाघाटी | Conversation & Negotiation

आपण आपल्‍या संभाषण-Conversation  किंवा वाटाघाटी-Negotiation कौशल्‍यांना सुधारण्‍यासाठीच लेखक फिल एम.जोन्‍स आपल्‍या एक्‍झॅक्‍टली व्‍हाट टू से या पुस्‍तकात आपल्‍याला शिकवतात की कसं आपण काही जादुई शब्‍दांना वापरून संवाद-संभाषणाला आपल्‍या बाजूने करू शकता.  समोरील व्‍यक्‍तीला आपल्‍या बोलण्‍यावर सहमत करू शकता.

तर आज आम्‍ही अशाच काही जादूई शब्‍दांना तुमच्‍यासोबत शेअर करणार आहोत ज्‍यांमुळे तुम्‍हीसुद्धा तुमच्‍या बोलण्‍याने संवादाला आपल्‍या बाजूने वळवू शकाल.  तर सुरू करूया एक्‍झॅक्‍्टली व्‍हाट टू से पुस्‍तकाचे सारांश.

मला नाही माहित हे तुमच्‍यासाठी आहे की नाही, परंतू...

I’m Not Sure if it’s for you, But..

जेव्‍हा केव्‍हा तुम्‍ही कुणाशी बोलत असताना एखाद्या नव्‍या मुद्याला, विषयाला किंवा एखाद्या नव्‍या कल्‍पनेला समोर ठेवत असता किंवा तुम्‍ही तुमच्‍या उत्‍पदादनाविषयी माहिती सांगत आहात तेव्‍हा तुमची अशी इच्‍छा आहे की समोरील व्‍यक्‍तीने तुम्‍हाला ऐकले पाहिजे.

तेव्‍हा पुढील व्‍यक्‍तीला तुमच्‍या संकल्‍पनेला किंवा तुमच्‍या उत्‍पादनाविषयी थेट माहिती देवून समजावण्‍यासाठी दबाव आणण्‍याऐवजी त्‍यांना आव्‍हान-चॅलेंज करा की तो किंवा ती व्‍यक्‍ती तुमच्‍या बोलण्‍याला स्‍वीकार-एक्‍सेप्‍ट करू शकेल की नाही..

1. Challenge them-त्‍यांना आव्‍हान द्या

उदाहरणः

‘‘मला माहित नाही हे तुमच्‍यासाठी गरजेचे आहे की नाही, परंतु, मला असे वाटते की तुम्‍हाला माझे म्‍हणणे एकदा अवश्‍य ऐकली पहिजे.’’

जेव्‍हा तुम्‍ही ऐकणा-याला आव्‍हान देत असता की तुम्‍ही एखाद्या गोष्‍टीविषयी निश्चित-(Sure) नाही किंवा ती गोष्‍ट त्‍यांच्‍यासाठी आहे की नाही तेव्‍हा पुढील व्‍यक्‍ती आपसुकच-आपोआपच तुमच्‍या बोलण्‍यात रूची घ्‍यायला हे जाणण्‍यासाठी उत्‍सुक होतात की नेमकी ती गोष्‍ट आहे तरी काय? आणि मग ते त्‍या गोष्‍टीला लक्षपुर्वक ऐकायला लागतात.

2. Open Minded- खुल्‍या मनाचे

जर तुम्‍ही एक हजार लोकांच्‍या खोलीमध्‍ये असा प्रश्‍न विचाराल की तुमच्‍यापैकी किती जण स्‍वतःला खुल्‍या मनाचे (ओपन माईंडेड) समजतात? तर तेव्‍हा कमीत-कमी ९० टक्‍के व्‍यक्‍ती म्‍हणजेच १००० पैकी ९०० व्‍यक्‍ती आपला हात वर करतील.

कारण कोणीही स्‍वतःला बंद मनाचा- किमान विचारांचा किंवा क्‍लोज़ माईंडेड स्‍वतःला मानत नाही. सर्वांना असे वाटत असते की ते वेगवेगळ्या दिशेने विचार करू शकतात. 

तर, जेव्‍हा तुम्‍ही त्‍यांचे मत जाणून घेण्‍याअगोदर त्‍यांना ‘’तुम्‍ही किती खुल्‍या-मनाचे किंवा ओपन माईंडेड (विचारांचे) आहात? तेव्‍हा तुम्‍ही अगोदरच त्‍यांच्‍या मनाला खुल्‍याने विचार करण्‍यासाठी तयार करत असता.  

(छोट्या विचारांचा-छोट्या दिलाचा, खोट्या मनाचा, बंद मनाचा, कोत्‍या मनाचा, नॅरो मांईंडेड)

उदाहरणार्थः

तुम्‍ही जर एखाद्याला असे विचाराल की, का तुम्‍ही तुमच्‍या उत्‍पन्‍नाला वाढवू शकता?

या ऐवजी तुम्‍ही त्‍यांना असं विचारू शकता,

तुम्‍ही तुमच्‍या उत्‍पन्‍नाला वाढविण्‍यासंदर्भात किती ओपन माईंडेड आहात?

तेव्‍हा असा प्रश्‍न त्‍यांना खुल्‍या मनाने (Open Mind-set) विचार करण्‍यासाठी पुढे ढकलेल, प्रवृत्‍त करेल.  आणि ते कोणते ना कोणते समाधान अवश्‍य शोधून काढण्‍याचा प्रयत्‍न जरूर करतील.

3. What do you know?तुम्‍हाला काय माहित आहे?

कित्‍येकदा असे होते की, एखाद्यासोबत आपण सामान्‍यपणे बोलत असतो तेव्‍हा ती गोष्‍ट तो संवाद लवकरच एका वादामध्‍ये (Debate) परिवर्तीत होउन जाते.  कारण ज्‍यांच्‍याशी तुम्‍ही बोलत आहात ती व्‍यक्‍ती अगोदरच असा विचार करत असते की, त्‍यांना तुमच्‍यापेक्षा जास्‍त माहित आहे.

तर तुमच्‍या बोलण्‍याला सिद्ध करण्‍या अगोदर पुढील व्‍यक्‍तीच्‍या ज्ञानाला-माहितला आव्‍हान-चॅलेंज करा.

उदाहरणार्थः

  • तुम्‍ही कसे आहोत?
  • तुम्‍ही काम कसे करता?
  • इत्‍यादी असे सहज प्रश्‍न विचारण्‍याऐवजी त्‍यांना निवांतपणे किंवा आरामाने असे विचारा की,
  • तुम्‍ही आमच्‍याविषयी काय जाणून आहात?
  • तुम्‍हाला या एखाद्या गोष्‍टी बाबत नेमके काय काय माहिती आहे?
  • काय तुम्‍हाला ह्या कामाविषयी सर्वकाही आणि खोलवर माहिती आहे?

असं केल्‍याने समोरील व्‍यक्‍तीला असे जाणवेल की, त्‍यांचे मतदेखिल चुकीचे असू शकतात. त्‍यांनादेखिल संपुर्ण ज्ञान-माहिती नाहीये.  ज्‍यामुळे ते तुमच्‍या बोलण्‍याने आपल्‍या मतांना बदलण्‍यासाठी देखिल तयार होऊ शकतात.

४. How Would You Feel?-तुम्‍हाला कसे वाटेल?

जर तुम्‍ही कोणाला तुमचे काम करण्‍यासाठी प्रेरित करू इच्छित असाल, तर त्‍यांना फक्‍त आपल्‍या बोलण्‍याने चार्ज-अप (प्रोत्‍साहित) करण्‍याऐवजी जेव्‍हा तुम्‍ही त्‍यांना याची जाणीव करून द्याल की, त्‍यांना तुमचे काम केल्‍यानंतर भविष्‍यात कितीतरी फायदा होऊ शकतो, किंवा ते भविष्‍यात होऊ शकणारे एखादे नुकसान टाळले जाऊ शकते किंवा होणा-या हाणी पासून वाचू शकतात.

तेंव्‍हा ते आपोआपच तुमच्‍या बोलण्‍याला ते लक्षपुर्वक ऐकून घेतील, तुम्‍हाला गंभीरपणे घेतील.

उदाहरणार्थः

  • तुम्‍हाल कसे वाटेल जर तुम्‍ही त्‍या ध्‍येयाला गाठू शकलात तर?
  • तुम्‍हाला कसे वाटेल जर तुम्‍ही अपयशी झालात तर?

बोलत असताना जर तुम्‍ही समोरील व्‍यक्‍तीच्‍या भविष्‍याबद्दल चर्चा करत असाल तर ती समोरील व्‍यक्‍ती आपोआपच आपल्‍या भविष्‍याबद्दल उत्‍तेजीत होऊन जातात.

👉लक्षात ठेवाः तुम्‍हाला ही ट्रिक-क्‍्लृप्‍ती कोणालाही मुर्ख बनविण्‍यासाठी वापरायची नाहिये..! फक्‍त तेव्‍हाच वापरायची आहे जेव्‍हा तुम्‍हाला खरोखरच एखाद्याचं भलं करायचं असेल. आणि तुम्‍ही एखाद्याला प्रेरित-मोटीवेट करू इच्छिता तेव्‍हांच.

५. Just Imagine..-जरा कल्‍पना करा..

लेखक असे म्‍हणतात, की आपण सर्वजण प्रत्‍येक निर्णयाला (Decision) दोन वेळा घेत असतो.

  • पहिलीवेळेस आपण आपल्‍या मनामध्‍ये ठरवत असतो आणि
  • दुसरीवेळेस आपण त्‍यांना खरोखरच-प्रत्‍यक्षात घेत असतो.

 

(अधिक वाचाः सन्‍यासी ज्‍याने आपली फेरारी विकली- रॉबीन शर्मा)
(Read More: The Monk Who Sold His Ferrari by Robin Sharma)

आणि प्रत्‍येक निर्णयाला घेण्‍याअगोदर आपण जे निर्णय घेणार आहोत त्‍याच्‍या परिणामाला आपल्‍या अंतर्मनामध्‍ये-(Subconscious Mind) कल्‍पना करून पडताळून पाहत असतो. तसंच जसं तुमच्‍यासाठी जे चांगलं राहिल त्‍याबद्दल कल्‍पना करत असतो.

तर लोकांशी बोलत असताना त्‍यांना कल्‍पना करायला लावा, की तुम्‍ही जे सांगत आहात त्‍यामुळे त्‍यांना काय काय फायदे मिळू शकतात, आणि कसं ते तुम्‍हाला ब-याचअंशी मददगार होऊ शकतो.

उदाहरणार्थः

  • जरा कल्‍पना करा (विचार करा) जर तुम्‍ही अभ्‍यास नाही केला तर तुमच्‍यासोबत काय होईल?
  • जरा कल्‍पना करा, जर तुम्‍ही ह्या गोष्‍टीला आजपासूनच आपल्‍या जीवनात अवलंबलं-आत्‍मसात केलं (Implement) तर येणा-या सहा महिण्‍यात तुम्‍हाला कितीतरी फायदे होतील.

Just Imagine: Creating Picture in Mind

जेव्‍हा तुम्‍ही लोकांच्‍या मनामध्‍ये प्रतिमा निर्माण (Picture Create) करायला लावता तेव्‍हा तुमच्‍या बोलण्‍याचा परिणाम खूपच जास्‍त वाढून जातात.  पुढच्‍या व्‍यक्‍तीला कल्‍पना करायला लावल्‍यास तुमचे बोलणे अधिक परिणामकारक ठरते.

👉पुस्‍तक सारांश भाग-२ | Book Summary Part-2

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.



टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive