संवादामध्‍ये काय व किती  बोलतो ह्यापेक्षा
कसे व केव्‍हा बोलतो हे महत्‍वाचे आहे.”

देहबोली- संभाषण चातुर्य

द डिफीनिटीव्‍ह बुक ऑफ बॉडी लॅंग्‍वेज

एलन आणि बारबरा पिज

पुस्‍तक सारांश मराठी

 


The Definitive Book of
Body Language

By the Authors Allan & Barbara Pease

Book Summary in Marathi

 Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement- लोकव्‍यवहार  

The Definitive Book of Body Language Marathi | Marathi Translation Summary of the book The Definitive Book of Body Language

 

Increase your emotional awareness and detect deception Learn to read and respond to micro expressions

आपण आपल्‍या सभोवताली सर्वांशी जसे वागतो, बोलतो, ऐकतो, संभाषण करतो त्‍यामध्‍ये आपल्‍या बोलण्‍याचा अर्थातच शब्‍दांचा संख्‍येने भलेही अधिक असेल, परंतू त्‍या संवादाचा-संप्रेषणाचा परिणाम व प्रभाव आपल्‍या शब्‍दांऐवजी आपल्‍या देहबोलीतून अधिक जाणवतो, प्रभाव पडतो.

थोडक्‍यात संवाद कौशल्‍यांची परिणामकारकता, आपण काय व किती  बोलतो ह्यापेक्षा कसे व केव्‍हा बोलतो यावर अवलंबून असते.

व्‍यक्‍तीमत्‍वाचा प्रभाव पडण्‍यासाठी संवादामध्‍ये महत्‍वाची भूमिका निभावणारे घटक

07%- बोलणे-Speaking
जसे-
भाषा, शब्‍द, व्‍याकरण इत्‍यादी  

38%- आवाज-स्‍वर-Tone
जसे-
आरोहावरोह- आवाजाचा चढउतार-उच्‍चार, ताल-सुर-लय, विशिष्‍ट शैली, पद्धत इत्‍यादी

55%- देहबोली-Body Language
जसे-
शारिरीक हावभाव, हालचाल, पुढे-मागे-हातवारे, डोळे, भुवया, बोटं यांचा वापर

 


आधुनिक मनोविज्ञान तज्ञ आणि मानसशास्‍त्रज्ञ यांच्‍या नुसार संवादामध्‍ये (Communication) आपल्‍या बोलण्‍याचा फक्‍त ०७ टक्‍के वाटा असतो तर ३८ टक्‍के वाटा आपण कोणत्‍या (टोन) स्‍वरामध्‍ये बोलत आहोत यावर अवलंबून असतो, आणि उर्ववरित तुमच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचा ५५ टक्‍के वाटा आपल्‍या देहबोलीतून अर्थातच बॉडी लॅंग्‍वेजमधून संवादामध्‍ये दिसून येत असतो.  

ह्यासाठीच आपण किती बोलत आहोत ह्यापेक्षा कित्‍येक पटीने जास्‍त महत्‍वाचं आहे आपण कसे बोलत आहोत हे शिकणे.

इथे तुमच्‍या मदतीसाठी एलन व बार्बरा पिस या लेखकद्वयींनी लिखित पुस्‍तक द डिफीनिटीव्‍ह बुक ऑफ बॉडी लॅंग्‍वेज (The Definitive Book of Body Language By Allan & Barbara Pease) घेऊन आलो आहोत.   ज्‍यामध्‍ये आपण बॉडीलॅंग्‍वेज म्‍हणजेच देहबोलीशी निगडीत असे आठ धडे बघणार आहोत.

ज्‍यांद्वारे तुम्‍ही तुमच्‍या देहबोली (Body Language) आणि संवाद कौशल्‍यांमध्‍ये सुधारणा कराल, ज्‍यामुळे तुम्‍ही कुठेही, कधीही आणि कोणाशीही आत्‍मविश्‍वासाने बोलण्‍याच्‍या कलेमध्‍ये पारंगत व्‍हाल.  तुमची बॉडी लॅग्‍वेज सुधारण्‍यासाठी हे महत्‍वाचे ठरतील अशी आशा आहे.

तर चला सुरू करूया संवाद कौशल्‍ये, संवाद शैली ह्याविषयावरील पहिला व महत्‍वाचा धडा...

१. मूलभूत गोष्‍टींना समजणे (Understanding the Basics)

हॉवर्ड विश्‍वविद्यालयाच्‍या तज्ञांनी एक शोध-अभ्‍यास केला ज्‍यामध्‍ये स्‍त्री-पुरुषांच्‍या गटाला एक चलचित्र-Video दाखविलं गेलं, त्‍यामध्‍ये दोन व्‍यक्‍ती बोलत असतात.

दोन्‍ही गटांना ते चलचित्र-व्हिडिओ आवाज बंद-Mute करुन दाखविण्‍यात आला. आता त्‍या चलचित्राला (Video) ला आवाजाविना, पडद्यावर पाहून त्‍यातील दोन व्‍यक्‍तींच्‍या चेह-यांवरील हावभाव यांना बघूनच त्‍या गटातील स्‍त्री-पुरुषांना हे ओळखायचे होते की, ते नमकं कशाविषयी बोलत आहेत?

ह्यामध्‍ये ८७ टक्‍के स्‍त्रीयांनी बरोबर ओळखलं तर ४२ टक्‍केच पुरुष ते बरोबर ओळखू शकले. स्‍त्रीयांच्‍या ह्या क्षमतेला लेखक कोल्‍ड रिडींगअसे म्‍हणतात. ह्या प्रक्रियेमध्‍ये स्‍त्रीया तीन सहज नियमांना पाळत असतात,

१. पुंजक्‍यात किंवा समूहात वाचणे Read in Clusters-

कधीही बोलत असताना समोरील व्‍यक्‍तीच्‍या कोणत्‍याही एकाच अंगाला पाहून अर्थ काढू नका, फक्‍त हातांच्‍या आणि पायांच्‍या हालचालीवरून तुम्‍ही समोरच्‍या व्‍यक्‍तीला ओळखू शकत नाही.  तर, तुम्‍हाला त्‍यांच्‍या संपूर्ण शरिराला पाहावे लागते, चेह-यावरील हावभावांवर (Facial Expression), त्‍यांच्‍या हाताच्‍या बोटांची हालचाल-Finger Movements सर्वकाही.

उदाहरणार्थ,

तुमच्‍याशी बोलत असताना जर एखादी व्‍यक्‍ती हात बांधून बोलत असेल आणि त्‍याचे पाय दरवाजाकडे असतील आणि तुम्‍हाला ऐकत असताना चेह-यावर कोणतेही हावभाव देत नसेल तर ह्याचा अर्थ असा होईल की, तो व्‍यक्‍ती तुमच्‍याशी बोलण्‍यास उत्‍सुक नाही, त्‍याला बोलण्‍यात रस-रूची नाही आणि तो लवकरात लवकर तुमच्‍यापासून दूर जाऊ इच्छितो.

२. समानता बघा-Look for Congruence

तुमच्‍याशी बोलत असताना समोरील व्‍यक्‍ती जेव्‍हा जे काही बोलत असेल तसेच त्‍याच्‍या देहबोलीतूनही ते जाणवायला पाहिजे. जेव्‍हा त्‍यांचे बोलणे आणि त्‍यांची देहबोली दोन्‍ही जुळतील त्‍याला कॉन्‍गुरन्‍स किंवा समानता असे म्‍हणतात.

ब-याच वेळा तुम्‍ही अनुभवलं असेल की, काही व्‍यक्‍ती बोलतात एक पण त्‍यांच्‍या देहबोलीने दुसराच अर्थ निघत असतो.  

समजा, जर कोणी असं म्‍हणत असेल की ‘’तो ठीक आहे.’’ परंतू त्‍यांच्‍या आवाजाच्‍या स्‍वरामध्‍ये औदास्‍य-Sadness, राग-Anger दिसून येत असेल आणि त्‍यांचे शरीर चिंतित वाटत असेल तर ह्यावरून हे सहज कळून येईल तो खोटं बोलत आहे.

३. संदर्भाने वाचणे-Read in Context

शरिराची भाषा वाचण्‍याचा एक महत्‍वाचा नियम असा आहे की, तुम्‍ही आजूबाजूच्‍या, सभोवतालच्‍या वातावरणानुसार एखाद्याचा अर्थ काढा, जेणेकरुन तुमच्‍याकडून त्‍यांच्‍या देहबोलीचा चुकीचा अर्थ काढला जाणार नाही.

उदाहरणार्थ,

जर कोणी हिवाळ्यात आपल्‍या हातापायांना जवळ करून बसलेला आहे, तर यावरून तुम्‍ही असा निष्‍कर्ष काढू शकत नाही की तो, चिंतित किंवा आत्‍मविश्‍वास नसलेला व्‍यक्‍ती आहे. ह्याचा सहज अर्थ असा की त्‍याला फक्‍त थंडी वाजत आहे.

कित्‍येकजण देहबोलीला (body language) अतिषय टोकाच्‍या नजरेने बघत असतात. ते प्रत्‍येक परिस्थितीत एकच किंवा सारखाच नियम सगळीकडे वापरू लागतात. लेखक म्‍हणतात असे करणे अत्‍यंत चुकीचे आहे.  

देहबोलीबद्दल जाणून घेण्‍याअगोदर तुम्‍हाला वर सांगितलेले तीन नियम स्‍पष्‍ट असायला पाहिजे.

 

2. खुले तळहात-Open Palms

लेखकांचं असं मत आहे की, आपले हात कोणत्‍याही भावना व्‍यक्‍त (expression) करू शकतात.  जसं एखाद्या खेळामध्‍ये तुमचे संघ जिंकल्‍यास, जल्‍लोष करण्‍यासाठी खेळाडू आपल्‍या हातांद्वारे विविध प्रकारे हातवारे, हावभाव करून विजय साजरा करण्‍यासाठी हातांचा वापर करतात. 

 

जसे- एकदुस-याला टाळी देणे, आपले हात उंचावून उडी मारणे, हवेत दोन्‍ही हात फिरवणे, इत्‍यादी

यासाठीच जेव्‍हा तुम्‍ही कुणाशी बोलत असाल तेव्‍हा त्‍यांच्‍या हातांवर लक्ष द्या, विशेष करून त्‍यांच्‍या हाताच्‍या  सुलट्या भागावर म्‍हणजेच तळहातांवर.

मणुष्‍य आणि कित्‍येक इतर प्राणी स्‍वतःबद्दलची अनावश्‍यक भिती, कोणताही धोका नसल्‍याचा पुरावा म्‍हणून आपल्‍या तळहातांचा वापर करत असतात, त्‍याला Non-Threatening Behavior म्‍हणजेच अभयाचे वर्तन असे म्‍हणतात. 


उदाहरणार्थ,

जर एखाद्याला तुमच्‍याशी भांडण करायचे आहे, किंवा तुम्‍हाला मारायचे आहे तेव्‍हा तुम्‍ही मागे सरकून आपले हात वर करून स्‍वतःचे तळहात दाखवाल, तळहात चेह-यापुढे कराल. असे वर्तन हे दाखवून देते की तुम्‍हाला भांडण करायचे नाही, तुम्‍ही आत्‍मसमर्पण करत आहात. 

 

याप्रमाणेच संभाषण-संवादामध्‍येसुद्धा जर कोणी, आपल्‍या हातांना पुढे करत असेल आणि आपले तळहात दाखवत असेल तर यावरून तुम्‍ही असे म्‍हणू शकता की ती व्‍यक्‍ती प्रामाणिक आहे आणि तो काहीही लपवत नाहीये.

याउलट जर कोणी संभाषणावेळी आपल्‍या हातांना बांधून ठेवत असेल, किंवा हातांना लपवत असेल तर अशा व्‍यक्‍तीवर तुम्‍हाला सहजा-सहजी विश्‍वास ठेवायला नाही पाहिजे.

३. डोळयांची नजरा-नजर-Extended Eye Contact

लोकांना संभाषण व संवाद कौशल्‍य शिकवताना तुम्‍हाला डोळ्यांत पाहून (Eye Contact) बोलण्‍यास सांगितले जाते. आणि डोळ्यांत डोळे रोखून (बघून-पाहून-घालून-टाकून..!), नजर सांभाळून बोलणे हे किती महत्‍वाचे आहे. परंतू, बरेचजण ह्या गोष्‍टीला महत्‍व देत नाहीत. कित्‍येकजणांना चांगल्‍याप्रकारे डोळे रोखून पाहणे जराही जमत नाही. त्‍यांना अवघडल्‍यासारखे वाटते. 

०५-सेकंदाचा नियम

लेखक असे म्‍हणतात की, डोळ्यांत डोळे रोखून पाहण्‍यासाठी तुम्‍हाला ०५-सेकंदाचा नियम पाळला पाहिजे.

पाच सेकंदाच्‍या नियमानुसार, जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या व्‍यक्‍तीशी पहिल्‍यांदा भेटता तेव्‍हा समोरील व्‍यक्‍तीच्‍या डोळ्यांमध्‍ये पाच सेकंदापर्यंत डोळे रोखून बघा मग इतर ठिकाणी बघा.  फक्‍त पाच सेकंदापर्यंत डोळ्यांत डोळे रोखून ठेवा.

ह्या प्रक्रियेला संभाषणादरम्‍यान अधून-मधून सतत चालू ठेवा.

लक्षात ठेवा, जेव्‍हा कोणी तुम्‍हाला आपली गोष्‍ट सांगत असेल तेव्‍हा डोळ्यांत डोळे रोखून ठेवा. असं करणं हे दर्शवितं की तुम्‍ही त्‍यांच्‍यामध्‍ये रूचीच दाखवत नसून त्‍यांचे बोलणे ऐकूण घेत आहात आणि समजून घेत आहात.

ह्यासोबतच बोलण्‍यादरम्‍यान जेव्‍हा थोडासा वेळ मिळेल तेव्‍हा आपण रोखलेले डोळे इतरत्र हलवणे चांगले, नाहीतर पाच सेकंदापेक्षा अधिक वेळ जर तुम्‍ही डोळे रोखून पाहात असाल तेव्‍हा समोरील व्‍यक्‍ती गोंधळून- जाईल, अस्‍वस्‍थ वाटेल.

कारण अशावेळी त्‍यांना असं वाटत असते की, तुम्‍ही त्‍यांना खूपच जास्‍त निरिक्षण करत आहात किंवा तुम्‍ही त्‍यांना दुखावणार असू शकता.

 

४. समोरील व्‍यक्‍तीच्‍या चेह-याला स्‍पर्श करणे-Touching Their Face

जेव्‍हा तुम्‍हाला ताण-तणाव (Stressed) किंवा काळजी (Worried), चिंता (Anxious) वाटत असते, तेव्‍हा तुमचे शरीर जास्‍त हालचाल करत नाही.

ह्यामुळे चिंता आणि ताणतणाव तुमच्‍या चेह-यावरच दिसू लागते. 

 

कित्‍येकवेळा जेव्‍हा तुमचा चेहरा लाल झालेला असतो तेव्‍हा तुम्‍हाला तुमच्‍या चेह-याला स्‍पर्श करण्‍याची गरज वाटू लागते. तुम्‍ही असंबंधपणे तुमच्‍या कपाळाला स्‍पर्श करू लागता, आपल्‍या नाकाला स्‍पर्श करू लागता. बोलत असताना आपल्‍या हातांनी आपल्‍या चेह-याला झाकून घेत असता. गंमत अशी की आपण हे सर्व का करत आहोत हे आपल्‍यालाही समजत नसते.

अशी अवस्‍था एकच गोष्‍ट दर्शविते की तुम्‍ही एखाद्या गोष्‍टीमुळे चिंताग्रस्‍त (Nervous) आहात, जे तुम्‍हाला एक कमजोर-कमकुवत व्‍यक्‍ती म्‍हणून इतरांना संदेश जाईल.

जेव्‍हा-केव्‍हा एखादी व्‍यक्‍ती तुमच्‍याशी बोलत असताना असंबंधपणे आपल्‍या चेह-यावर स्‍पर्श करत असेल तेव्‍हा असं समजा की त्‍याला अस्‍वस्‍थपणा जाणवतोय. तो एखाद्या गोष्‍टीने लाजतोय, किंवा तुमच्‍या एखाद्या गोष्‍टीमुळे तो दुखावला गेलाय.  त्‍याला त्रास होतोय, बोलणं त्रासदायक वाटतय.

तर, जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या संवाद-संभाषणामध्‍ये अशी गोष्‍ट-चिन्‍ह पाहाल तेव्‍हा संभाषणाला थोडसं हलकं-फुलकं करून संभाषणाची दिशा बदला. आणि समोरील व्‍यक्‍तीला सुखदायक वाटू लागेल असे बोला.

 

५. स्मितहास्‍य- Smile

SMILE IS A CURVE THAT KEEPS EVERYTHING STRAIGHT
आपले स्मितहास्‍य असे वक्र आहे जे सगळ्या गोष्‍टी सरळ ठेवतो.

जर कोणी स्मितहास्‍य करत असेल तेव्‍हा आपल्‍या मेंदूमध्‍ये एन्‍डॉर्फिन-Endorphin नावाचा रसायन-स्‍त्राव स्‍त्रवतो. जो आपल्‍याला चांगलं वाटू देतं.  चांगलं वाटत असल्‍याचं जाणवतं. आणि गंमतीचा भाग असा की, जो कोणी समोरील व्‍यक्‍ती स्मितहास्‍य पाहतो त्‍याच्‍या मेंदूमध्‍येसुद्धा हेच रसायन स्‍त्रवते. 

   

एन्‍डॉर्फिन- हास्‍याचे संसर्गजन्‍य रसायन

तर, जेव्‍हा तुम्‍ही संभाषणादरम्‍यान अस्‍सलपणे-खरेखुरे स्‍मितहास्‍य करता तेव्‍हा, एक सकारात्‍मक भाव-तरंगाद्वारे  स्‍वतः तुम्‍ही आणि तुमच्‍या सोबतचा व्‍यक्‍तीदेखिल चांगलं वाटून घेत असतो. आनंदीत होतो. जे की एक चांगलं लक्षण आहे, तुमचे संबंध दृढ करण्‍यासाठी.

तुम्‍हाला खरेखुरे स्मितहास्‍य करण्‍यावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण कित्‍येक परिस्थितींमध्‍ये लोकं खोटे स्मितहास्‍यदेखिल करत असतात, जे की एक नकारात्‍मकता दर्शविते. (Real Smile, Fake Smile) 


 खोटे स्मितहास्‍य-Fake Smile जसे-

  • एखाद्या गोंधळलेल्‍या परिस्थितीत स्मितहास्‍य करणे.
  • समोरच्‍या व्‍यक्‍तीला खुष करण्‍यासाठी स्मितहास्‍य करणे. किंवा
  • सहज आपल्‍या ख-या भावनेला (Mood) लपविण्‍यासाठी खोट्या स्मितहास्‍याचा आश्रय घेणे.

खरे स्मितहास्‍य-True Smile

लेखक म्‍हणतात, तुम्‍हाला खरे स्मितहास्‍य ओळखण्‍यासाठी समोरच्‍या व्‍यक्‍तीच्‍या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जेव्‍हा लोकं खोटे हास्‍य करतात तेव्‍हा फक्‍त त्‍यांचे ओठच गालापर्यंत ओढले जातात, तर जेव्‍हा कोणी खरोखरच खूष होतो, आनंदीत होतो तेव्‍हा खेरे-खुरे हसणा-याचे डोळे छोटे होतात आणि त्‍यांच्‍या भुवयांची हालचाल होते.

तुम्‍ही खरे स्मितहास्‍य करणा-याच्‍या संपूर्ण चेह-यावर बदल सहज पाहू शकता. डोळे, भुवया, ओठ संपूर्ण चेह-यावर हावभाव स्‍पष्‍ट दिसून येतात.

6. हाताची घडी –Folding Their Arms

हाताची घडी करून बोलणे-याचा अर्थ असा आहे की समोरील व्‍यक्‍ती बचावात्‍मक पवित्रा (Defensive) घेत आहे. अशावेळी ह्या गोष्‍टीचे तीन अर्थ निघतात, एक तर ते नैसर्गिकरित्‍या अंतर्मुखी (Introvert) व्‍यक्‍ती आहेत, अशा व्‍यक्‍तींना इतरांशी बोलणे-चालणे अजिबात पसंत नसते. आवडत नसते.  यामुळे ते फक्‍त त्‍यांचे हात बांधून तुमचे बोलणे ऐकत असतात. 

 

१. अंतर्मुखी-Introvert

तुमच्‍याशी संवाद-संभाषण करणारी व्‍यक्‍ती अंतर्मुखी-Introvert आहे की नाही हे तपासून पाहायचे असल्‍यास तुम्‍हाला हे बघायला पाहिजे की ते इतरांशी कसे वागत असतात, त्‍यांचे वर्तन सर्वांशी सारखेच असते का? जर का ते यासारख्‍याच देहबोलीचा वापर इतरांशी बोलण्‍यात करत असतील तर निश्चितच ते एक अंतर्मुखी व्‍यक्‍ती आहेत.

२. असहमती किंवा दुखावणे-Disagree

तर याउलट, जर कोणी संभाषणा मध्‍येच आपल्‍या हातांची घडी करत असेल तर, एक तर ती व्‍यक्‍ती तुमच्‍या बोलण्‍याशी असहमत असेल, किंवा तुमच्‍या एखाद्या गोष्‍टीने, कृतीने, बोलण्‍याने दुखावले गेले आहेत. आणि ते फक्‍त तुमचे बोलणे केंव्‍हा संपेल व स्‍वतःच्‍या बोलण्‍याची वेळ केव्‍हा येईल याची हाताची घडी बांधून वाट पाहत असतात.

३. स्‍वतःचा बचाव करणे-Defending

हाताची घडी करण्‍याच्‍या ह्या तिस-या बाबतीत समोरील व्‍यक्‍ती स्‍वतःचा बचाव करत (Protect) असतात. कारण जेव्‍हा केव्‍हा आपल्‍याला एखादा धोका आहे असे जाणवते तेव्‍हा आपण स्‍वतःच्‍या शरीराला लपविण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.

अजाणवेपणी संभाषणादरम्‍यान आपण आपल्‍या शरीराला स्‍वतःच्‍या हातांनी झाकून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.  याचा स्‍पष्‍ट अर्थ असा होतो की ते स्‍वतःला वाचवत आहेत.

७. प्रतिकृती करणे –Mirroring

तुम्‍ही स्‍वतःला खूपवेळा निरिक्षण केलं असेल की, तुम्‍ही एखाद्याला खूपच जास्‍त पसंत करत असता किंवा समोरील व्‍यक्‍ती तुम्‍हाला खूपच आवडत असते जसे, एखादे खेळाडू, नट, पुढारी अशावेळी तुम्‍ही त्‍यांच्‍या ब-याच गोष्‍टींची-गुणांची-शैलीची नक्‍कल करायला लागता.

ते कोणते कपडे घालतात, ते काय खातात, त्‍यांच्‍या केसांची रचना कशी आहे, त्‍यांच्‍या बोलण्‍याची शैली, लकब व बोलत असताना ते अधिकतर कोणत्‍या शब्‍दांचा वापर करत असतात, तुम्‍हाला आवडणारी व्‍यक्‍ती इतरांशी भेटताना कसे वागते, चालण्‍याची चाल, विशिष्‍ट पद्धतीने राहणे इत्‍यादी गोष्‍टी. 

त्‍यांच्‍या आवडी-निवडी, शैली, पद्धती ह्या सर्व गोष्‍टी तुमच्‍या वर्तनाला, वागणूकीलादेखिल प्रभावित करत असते.

यासारखेच, संभाषणादरम्‍यान तुमच्‍याशी निगडीत एखादी गोष्‍टी समोरील व्‍यक्‍ती करण्‍याचा प्रयत्‍न करत असेल, नक्‍कल करत असेल, जसे, तुम्‍ही बोललेल्‍या शब्‍दांची पुनारावृत्‍ती करत असतील, तुमच्‍या बसण्‍याच्‍या पद्धतीची नक्‍कल करत असेल किंवा सहजच तुमच्‍या देहबोली-बॉडीलॅंग्‍वेज ची नक्‍कल करत असेल तर असे समजा की ती समोरील व्‍यक्‍ती तुमच्‍यात रूची दाखवत आहे, तुमच्‍याशी संवाद साधण्‍यात त्‍यांना आवडत आहे.  ती व्‍यक्‍ती तुम्‍हाला खूपच पसंत करत आहे.

या संकल्‍पनेला लेखक मिररींग-प्रतिकृती असे म्‍हणतात. जेव्‍हा तुम्‍ही एखाद्याच्‍या देहबोलीची नक्‍कल करायला लागता, याचा अर्थ असा निघतो की तुम्‍ही त्‍यांच्‍याकडे आकर्षित आहात.

८. हस्‍तांदोलन-हातमिळवणे-Handshake

प्रत्‍येक संभाषणावेळी शारिरीक संपर्क होत नाही.  तुम्‍ही जेंव्‍हा केव्‍हा एखाद्या नव्‍या व्‍यक्‍तीशी भेटता तेव्‍हा सहज हस्‍तांदोलन करत असता. यावर तुम्‍हाला खूप जास्‍त लक्ष द्यायला पाहिजे. 

 


लेखकांनुसार हस्‍तांदोलन तीन प्रकारचे असतात,

१.       वर्चस्‍व-Dominance

जेव्‍हा केव्‍हा कोणी व्‍यक्‍ती तुमच्‍याशी हस्‍तांदोलन करताना स्‍वतःच्‍या तळहाताला लपवून घेतो आणि स्‍वतःच्‍या हाताला तुमच्‍या हाताच्‍या वर आणून त्‍याला खालच्‍या बाजूला पिळ (Twist) देऊन खाली आणत असेल तर समोरील व्‍यक्‍तीचा हात तुम्‍हाला घट्ट-ताठर जाणवेल.

याचा अर्थ असा निघू शकतो की समोरील व्‍यक्‍ती स्‍वतःला तुमच्‍यापेक्षा वरच्‍या दर्जाचा (Superior) समजत आहे.

 

२.       शरण जाणे किंवा आत्‍मसमर्पण-Submission

जेंव्‍हा एखादी व्‍यक्‍ती तुमच्‍याशी हस्‍तांदोलन करताना स्‍वतःच्‍या तळहाताला दाखवत असेल तेव्‍हा तुम्‍हाला त्‍यांचा हात खूपच हलके जाणवेल. तर हे, एका कमी आत्‍मविश्‍वास असणा-या व्‍यक्‍तीची निशाणी आहे. ज्‍याचा अर्थ असा होतो की, एक तर तो तुमच्‍यासमोर चिंतीत-घाबरत आहे किंवा तो तुमची अतिषय-खूपच जास्‍त आदर करत आहे.   

कित्‍येकदा जेव्‍हा एखादी व्‍यक्‍ती माफी मागत असते तेव्‍हा तशा व्‍यक्‍ती ह्या शरण जाणा-या हस्‍तांदोलनाचा वापर करत असतात.

 

३.       समानता-Equality

जेव्‍हा कोणी त्‍यांच्‍या हाताला सरळ ठेवून हस्‍तांदोलन करत असेल, त्‍यांचा हात अधिक घट्टही नसते आणि जास्‍त हलकेही नसते, तर असे हस्‍तांदोलन समानता दर्शविते. आणि तुम्‍हालाही ह्याच हस्‍तांदोलन प्रकाराला आत्‍मसात करायला पाहिजे.  समानतेचे प्रतिक असलेले हे हस्‍तांदोलन करायला पाहिजे.

चांगले संवाद-संभाषण तेव्‍हाच ठरेल जेव्‍हा तुम्‍ही वर सांगितलेले आठ सॉफ्ट स्किल आत्‍मसात कराल.  लक्षात ठेवा परिणामकारक संभाषण तेव्‍हांच होईल जेव्‍हा तुम्‍ही चांगले शब्‍द, वाक्‍य अर्थात चांगले बोलणे याबरोबरच आपल्‍या देहबोलीवर अधिक लक्ष द्याल, आणि योग्‍य वेळी योग्‍य देहबोलीचा वापर कराल. मग नक्‍कीच उत्‍तम संवाद-संभाषण होईल, सुसंवाद ठरेल.

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल तर पुस्‍तक खरेदी करून सविस्‍तर वाचन करा व आपले व्‍यक्‍तीमतत्‍व सुधारा. जीवनात यशस्‍वी व्‍हा.

 

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

 

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

 

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

 

कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

 

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता.

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत. आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. Hey TECH TALK..!

      First a fall Thank You very much for visiting us.
      You are always most welcome on ई-वाचनालय | www.evachnalay.in.

      You know the fact about Internet that the only 1% people find Knowledge to grow and develop their self, and you are one in this 1%. So you should proud yourself too.

      Please feel free to comment your suggestions to serve you better.
      I hope you get some value for your life. keep it up.

      And yes, share the amazing knowledge from awesome books with your family, friends, near and dear who you think they need.

      Once again I really Thank you for visiting ई-वाचनालय | www.evachnalay.in.
      Keep Learning,
      Keep Reading,
      Keep Growing,

      Thank you.

      हटवा
  2. Your most welcome, please do checkout other content related to the same topic from our platform. Thank You for your time. do share with your friends & family and needy persons. Keep Reading, Keep Growing. :)

    उत्तर द्याहटवा
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive