द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी- रॉबिन शर्मा (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली) The Monk Who Sold his Ferrari- Robin Sharma
तणाव व्यवस्थापनाला अध्यात्माची जोड देत जीवन जगण्याची कला आणि
सकारात्मक दृष्टिकोन देणारं ‘द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी’ हे पुस्तक जगात सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी
एक आहे.
स्वप्नपूर्तीच्या दिशेने
संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली
द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी
लेखक- रॉबिन शर्मा
पुस्तक परिचय-सारांश-समीक्षा मराठी
संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली
The Monk Who Sold his Ferrari
Author- Robin Sharma
Book Review-Summary in Marathi
लेखकांविषयी दोन शब्दः
रॉबिन शर्माचे पुस्तक वाचले नसेल असा वाचक दुर्मीळच…! ‘मेगा लिव्हिंग’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी वकिली पेशाला अलविदा करत लिखाणाकडे वळले. त्यांची अनेक पुस्तकं ९२ भाषांतून वाचली जातात.
जगातील पाच श्रेष्ठ प्रेरणादायी नेतृत्व मार्गदर्शकांपैकी रॉबिन शर्मा एक आहे. ते गेल्या २० वर्षांपासून जगभरातील १०० पेक्षा जास्त कंपन्या आणि त्यांचे सीईओ, जगप्रसिद्ध अब्जाधीश, खेळाडू, कलाकार वर्गाला नेतृत्व आणि सकारात्मकतेचे प्रशिक्षण देत आहेत.
सुप्रसिद्ध लेखक आणि प्रेरणादायी वक्ता म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. रॉबिन शर्मा यांच्या ‘द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी’ या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी ज्युलियन मॅन्टल या काल्पनिक पात्राच्या जीवनात घडलेल्या एका प्रसंगाने त्याचे आयुष्य कसे बदलले याचे चित्रण आहे.
तणाव व्यवस्थापनाला आध्यात्माची जोड देत जीवन जगण्याची कला आणि सकारात्मक दृष्टिकोन देणारं हे पुस्तक जगात सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे.
यशस्वी व्यावसायिक ते संन्यासी
ज्युलियन मॅन्टल एक गर्भश्रीमंत, प्रसिद्ध आणि कामा अत्यंत व्यस्त असलेला वकील असतो. प्रचंड मानधन घेत असूनही ज्युलियनकडे त्याच्या कौशल्यामुळे भरपूर काम असते. तो दिवसाचे १८ तास काम करतो. सर्वसामान्यांना हेवा वाटावं बसे विलासी आयुष्य जगत असूनही ज्युलियनला कौटुंबिक स्वास्थ्य नव्हते.
अयशस्वी वैवाहिक जीवन आणि
वडिलांशी दुरावलेल्या संबंधांमुळे तेा एकटा राहत असे. एकटेपण आणि कामाच्या दबावामुळे ज्युजिलयन तणावग्रस्त
असतो. एकदा खटला लढवत असतानाच ज्युलियन
भर कौर्टात हृदयविका
राच्या झटक्याने कोसळतो...!
ज्युलियन मरणाच्या दारातून परततो. तो आपली अमाप संपत्ती, विलासी जीवन आणि यशस्वी वकिली पेशाचा त्याग करायचं ठरवतो. विलासी जीवनाला उबलेला ज्युलियन सर्व संपत्ती कवडीमोल भावात विकून शांततेच्या शोधात हिमालयात निघून जातो.
अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर उंच पर्वतरांगांमध्ये त्याला अत्यंत दुर्गम ठिकाणी योगी रामन भेटतात. योगी रामन ज्युलियनला जीवनाला कलाटणी देणारे रूपकांच्या माध्यमातून सात गुण शिकवतात. काही महिन्यानंतर ज्युलियन एक योगी बनून माघारी परततो.
आपला मित्र जॉन आपल्याच वाटेवर चालू लागला आहे, हे पाहून योगी रामन यांची शिकवण ज्युलियन देऊ लागतो. अनेक रूपकांच्या माध्यमातून कथानक उलगडत जाते.
मनाला बागेचं रूपक मानलं आहे. बाग फुलवणं माळ्याच्या हातात असतं. एक उत्तम माळी ज्याप्रकारे बागेतील केर-कचरा साफ करतो, तेच काम आपण आपल्या मनातही केलं पाहिजे.
आपल्या मनात दररोज ६० हजार विचार येतात. आपल्या इच्छेविरूद्ध आपल्या मनात विचार येऊच शकत नाहीत. आपण ते मनात निर्माण करतो ज्या झाडाचं पोषण होते, तेच झाड वाढतं.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
(अधिक वाचाः मन-मेंदू –Mind-सॉफ्टवेअर ऑफ ह्युमन बॉडी)
कोणतीही गोष्ट दोनदा
निर्माण होते..!
कोणतीही गोष्ट दोनदा निर्माण होते, पहिल्यांदा मनात नंतर वास्तवात. मनात दया, प्रेम, शांती आणि सहानुभूती निर्माण केली, तर ती वास्तवातही दिसेल. मनावर ताबा सहज मिळणार नाही, त्यासाठी ध्यान करा. दीपस्तंभाप्रमाणे आपण आयुष्याला योग्य दिशा दिल्यास, उद्दिष्ट गाइणे सोपे होते. जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्टांना फक्त मनात ठेवू नका, तर कागदावर उतरवा, मूर्त रूप द्या. लिखित ध्येयाचा वारंवार विचार केल्यास आपले सुप्त मन त्यावर काम करून ध्येयपूवर्तीसाठी प्रेरणा देते.
आपण ब-याचदा आपल्या ‘कम्फर्ट झोन’ पलीकडे जाण्याचा विचारच करत नाही. परिणामतः ते मनात रुजत नाही म्हणून प्रत्यक्षात येत नाही. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केल्यास त्याची सवय होते. सकारात्मक विचारही त्याला अपवाद नाहीत.
एखादी गोष्ट सलग २१ दिवस केल्यास त्याची सवय होते. सकारात्मक विचारही त्याला अपवाद नाहीत.
(Also Read more about Positive THINKING by Peter Theale)
चांगल्या आणि सकारात्मक विचारांची सुद्धा सवय करावी लागते.
विचारांवर नियंत्रण जमले की मन नियंत्रित होते, त्यातूनच
जीवनाचा समतोल साधला जातो. नियंत्रित जीवन
जगणा-याला नशीबही घडवता येत नाही,
त्यातूनच जीवनाचा समतोल साधला
जातो. नियंत्रित जीवन जगणा-याला
नशीबही घडवता येतं.
जापानी काईझेनः
ज्युलियन आपला मित्र आणि पूर्वीचा सहकारी जॉनला यशाचे सूत्र सांगतांना काईझेनचे उदाहरण देतो. या जपानी शब्दाचा अर्थ ‘सरावातून सुधारणा करणे’. सुमो पहिलवान एका दिवसात होता येत नाही, ती अखंड प्रक्रिया आहे. बदललेल्या आहार आणि विहाराचा परिणाम विचारांवर होतो. त्यानुसार कृती घडते आणि त्याचे परिणामही तसेच मिळतात.
पुस्तकाचे सारः
ओघवती भाषाशैली, जीवनाशी निगडित उदाहरणांचे स्पष्टीकरण ही पुस्तकाची जमेची बाजू. वेळेचे नियोजन आणि स्वयंशिस्त लेखकाने मोजक्या, परंतू परिणामकारक शब्दांत मांडली आहे. निग्रहाने शिस्तीचे पालन करणा-यांची इच्छाशक्ती दांडगी असते.
त्यांच्या मनात दुबळ्या विचारांना जागा नसते. बेशिस्त व्यक्ती चालढकलकरतात. त्यामुळे आळस वाढतो. आळशी माणूस आळसातच राहणं पसंत करतो. सतत काम करत राहणं गरजेचं नाही, पण नियोजनपूर्वक केलेलं काम अधिक परिणामकारक असते. त्यासाठी प्राधान्यक्रम कसा ठरवावा, ते पुस्तकात सांगितले आहे.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. तसे, समाजातील इतर घटकांचे जीवनमान आपल्याला उंचावता आले पाहिजे. लेखकाने विचार, कृती आणि सवयी बदलल्या तर कोणत्याही मोठ्या स्वप्नांना गवसणी घालणं कसे शग्य आहे, हे नितांत सुंदर पद्धतीने सांगितले आहे.
चिनी म्हणींचे उदाहरण खूप सुंदर आहे,
- ‘फुलं, देणा-याच्या आंजळीलासुद्धा सुवासिक करतात’.
- घेण्यापेक्षा देण्याचा आनंद आणि समाधान मोठं असतं, ते अनुभवा.
- आनंदाची पेरणी केली तर आनंदच उगवेल.
- वर्तमानात जगा. आजच्या दिवसाचा, या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या आणि इतरांनाही द्या.
- आजच आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस असला तर?
- आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी, सहका-यांशी आपण कसे वागू?
- बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील.
लेख साभारः निमेष आहेर, पुण्यनगरी, रसयात्री-संपर्कः ८८३०२९७१३७
ई-वाचनालय | www.evachnalay.in |
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत. आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
टिप्पण्या