सो गुड दे कान्‍ट इग्‍नोर यू: कॅल न्‍यूपोर्ट- पुस्‍तक-सारांश मराठी (So GOOD They Can’t Ignore YOU Cal Newport Book Review-Summary in Marathi)

पॅशन फॉलो करू नका.! आपल्‍या आवडीच्‍या गोष्‍टी करताना आवडींवर कौशल्‍यंच का मात करतात?

सो गुड दे कान्‍ट इग्‍नोर यू

लेखकः कॅल न्‍यूपोर्ट

आपल्‍या आवडीच्‍या गोष्‍टी करताना आवडींपेक्षा कौशल्‍यंच का वरचढ ठरतात?

पुस्‍तक परिचय-सारांश मराठी 

 

So GOOD They Can’t Ignore YOU

Why Skills Trump Passion in the Quest for Work you Love?

Author: Cal Newport

Book Review-Summary in Marathi

कॅरेबियन विद्यार्थ्‍यांवर एक अभ्‍यास केला गेला होता त्‍यात असे कळाले की, ८४% टक्‍के विद्यार्थ्‍यांचे पॅशन-आवडी तर अगोदरपासूनच असतात, परंतू त्‍यापैकी केवळ % चार टक्‍केच असे पॅशन किंवा आवडी असतात ज्‍यांचा आपल्‍या व्‍यावसाय किंवा कारकिर्दीसाठी विचार केला जाऊ शकतो.

पॅशन फॉलो करू नका..!

DON’T FOLLOW YOUR PASSION..!
- Cal Newport
(Author: So Good, They Cant Ignore You)

आपल्‍या कामध्‍ये किंवा एखाद्या गोष्‍टीमध्‍ये एवढे चांगले बना की कोणीही तुम्‍हाला नजरअंदाज करणार नाहीत, तुमच्‍या कामाची, तुमची दखल घेतीलच

फॉलो यूवर पॅशन..! आपल्‍या आवडीनुसार कामं करा, हा धोकादायक सल्‍ला आहे. असे म्‍हणत आहेत ‘’सो गुड, दे कान्‍ट इग्‍नोर यू’’ या पुस्‍तकाचे लेखक कॅल न्‍यूपोर्ट.

FOLLOW YOUR PASSION is a Dangerous Advice

आता तुम्‍हाला प्रश्‍न पडला असेल की, लेखकांनी एवढे वादग्रस्‍त (Controversial) विधान का बरे केले आहे?  खरेतर तुमच्‍यापैकी ८०% टक्‍के लोकांनाही हेच वाटू शकते की, फॉलो यूवर पॅशन म्‍हणजेच आपल्‍या आवडीनुसारच गोष्‍टी करायला पाहिजे, म्‍हणून फॉलो यूवर पॅशन हा एक चांगला सल्‍ला आहे. 

परंतू लेखकांच्‍या मते फॉलो यूवर पॅशन हा एक वाईट सल्‍ला का आहे यासाठी ते आपल्‍याला एका उदाहरणाद्वारे सांगतातः

एक व्‍यक्‍ती आहे थॉमस नावाचे. त्‍यांचा कल नेहमीच तत्‍वज्ञान या क्षेत्रात होता. त्‍यांची रूची तत्‍वज्ञानात होती.  ते लहानपणापासूनच स्‍वतःला विचारत होते की,

नेमकं ह्या आयुष्‍याचा अर्थ तरी काय आहे?

म्‍हणूनच त्‍यांनी शिक्षणासाठी तत्‍वज्ञान आणि ब्रह्मज्ञान या विषयांमध्‍ये आपली पदवी घेतली आणि पदवीत्‍तर शिक्षणासाठी त्‍यांनी तुलनात्‍मक धर्माचा अभ्‍यास केला.  त्‍यांना संपूर्णपणे विश्‍वास होता की झेन-बौद्ध-तत्‍वज्ञानच त्‍यांचा नैसर्गिक कल-आवड-पॅशन आहे आणि त्‍यासाठी त्‍यांनी स्‍वतःचे संपूर्ण आयुष्‍य वेचले, झेन-बौद्ध तत्‍वज्ञानसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.

परंतू, पैसा कमावण्‍यासाठी काहीतरी करावेच लागते. म्‍हणून त्‍यांनी लहान-सहान नोक-या करायला सुरूवात केली. कधी ते कोरिया या देशात मुलांना इंग्रजी विषय शिकवत होते, आशिया खंडात प्रवास करत करत इतर काही छोटी-छोटी कामे करत असत.

मग त्‍यांना असा साक्षात्‍कार झाला, असे समजले की, एक बौद्धभिक्षू बनने हेच त्‍यांचे स्‍वप्‍नातील आयुष्‍य असेल. त्‍यांना एका झेन-मठाबद्दल (Zen Mountain Monastery) कळाले. आणि त्‍यांनी तिथे प्रवेशासाठी नोंदणी केली.  नऊ महिण्‍यानंतर त्‍यांची निवडही झाली. आणि त्‍यांना असे वाटले की, मला आता सुख आणि आनंद, शांती मिळेलच.

झेन मठामध्‍ये त्‍यांचे आयुष्‍य खूपच सामान्‍यपणे चालले होते. त्‍यांची दैनंदिन दिनचर्या म्‍हणजे, सकाळी लवकर उठणे, साफसफाई करणे, ध्‍यान-धारणा करणे, वरिष्‍ठांची प्रवचणे, व्‍याख्‍याने ऐकणे आणि बौद्ध कोडी सोडविणे इत्‍यादी.

मठामध्‍ये राहिल्‍यानंतर ब-याच काळानंतर त्‍यांनी तेथील महत्‍वपूर्ण असे बौद्ध कोडे सोडविले. असे कोडे ज्‍याला सोडविल्‍याशिवाय तुम्‍ही स्‍वतःला झेन-भिक्षूक म्‍हणून घेऊ शकत नाही. मग त्‍यांना असे जाणवले की, खरेतर ते त्‍यांच्‍या आयुष्‍याचे पॅशन (आवड) जगत होते. ते बरोब्‍बर त्‍याच ठिकाणी होते आणि तेच आयुष्‍य जगत होते ज्‍याचे स्‍वप्‍न ते पाहत आलेले होते. आणि अंतिमतः ते प्रत्‍यक्ष आयुष्‍यात झेन तत्‍वज्ञान जगणारे एक भिक्षूक बनले होते. आणि मग त्‍यांना रडू कोसळले..!

त्‍यांना असे जाणवले की, अजूनही त्‍यांना तान-तणाव येत होता, ते नैराश्‍य (Stress & Anxiety) अनुभवत होते, त्‍यांचे जीवन सुंदर आणि शांतीपूर्ण असे झालेले नव्‍हते.  त्‍यांना मग असे समजून आले की, फक्‍त फॉलो यूवर पॅशन हा एक धोकादायक असा सल्‍ला आहे.  आणि आपल्‍या आयुष्‍यात आपल्‍याला काय कामं करायला पाहिजे, हे खरेतर अधिकच गुंतागुंतीचा प्रश्‍न आहे.

लेखक, कॅल न्‍यूपोर्ट यांनासुद्धा याच प्रश्‍नाने भांडावून सोडले होते.  त्‍यांना हे माहित करून घ्‍यायचे होते की, का काही व्‍यक्‍ती आपल्‍या कामाला, नोकरीला आवडीने करतात, त्‍यांना त्‍यांचे काम करणे आवडते त्‍यांना ती कामं करताना मजा, आनंद येतो तर काही लोकांना त्‍यांचे काम, नोकरी करणे आवडत नाही, त्‍यांना ते करण्‍यामध्‍ये मजा येत नाही.

आपण ब-याच वर्षांपासून आपण सफल व्‍यक्‍तींकडून ऐकत आलेलो आहोत आणि यशस्‍वी आयुष्‍यासाठी हे ऐकून आहोत की, आपल्‍याला स्‍वतःच्‍या आवडीचीच कामे, गोष्‍टी करायला पाहिजे. परंतू, कॅल न्‍यूपोर्ट यांच्‍या अभ्‍यास आणि संशोधनात जे निघालं ते वेगळंच होतं.   

वर सांगितलेल्‍या फॉलो यूवर पॅशन किंवा आपल्‍या आवडीच्‍या मागे जाणे, याच्‍या अगदी उलट असे त्‍यांना निष्‍कर्ष मिळाले.  जे तुम्‍ही कदाचित केव्‍हाही ऐकलेलं नसेल असे.

सर्वांत महत्‍वाची संकल्‍पना जी आपल्‍याला समजेल आणि ती म्‍हणजे, ‘’आपल्‍या क्षमतेचे, सामर्थ्‍याचे महत्‍व’’ (importance of abilities & skills) म्‍हणजेच तुम्‍हाला जे काही काम करणारायचे आहे त्‍यामध्‍ये तुमची कौशल्‍यं किती आहेत, आणि साहजिकच फक्‍त कौशल्‍यं असणंच महत्‍वाचं नाही.

यासोबतच आपल्‍याला व्‍यावसायिकपणाचे भांडवल किंवा कारकिर्दीचे भांडवलसुद्धा लागत असते त्‍याला लेखकांनी करियर कॅपिटल (career capital) असे म्‍हटले आहे. जे आपल्‍या व्‍यावसायाला बुलेटप्रुफ म्‍हणजेच अभेद्य बनवत असते. व्‍यावसायिक भांडवल याबद्दल अधिक आपण पुढे पाहणारच आहोत.

परंतू, आपली कौशल्‍यं abilities & skills) आणि व्‍यावसायिकपणाचे भांडवल (career capital) या दोन्‍ही पद्धती तथाकथित फॉलो यूवर पॅशन (आवड)आपल्‍या आवडीचा मागोवा घ्‍या या मध्‍यवर्ती आणि मुख्‍य प्रवाहातील सल्‍ल्‍याच्‍या अगदी विरूद्ध आहे.

कॅल न्‍यूपोर्ट आपल्‍याला असे सांगतात की,

आपल्‍या पॅशन (आवडी) ला विसरून जा..! तुम्‍ही तुमच्‍या करत असलेल्‍या कामामध्‍ये इतके चांगले, उत्‍तम, उत्‍कृष्‍ट, बना की कोणीही तुम्‍हाला नजरअंदाज करणार नाही. So, good they cant ignore you.

तुम्‍ही एवढे जरी केलात तरी पॅशन म्‍हणजेच तुमची आवड तुम्‍हाला तुमच्‍या आतमध्‍ये, मनामध्‍ये आपोआपच तुमच्‍या कामाबद्दल तुम्‍हाला जाणवायला लागेल.

अचूक, चांगले, उत्‍तम, उत्‍कृष्‍ट, सर्वोत्‍कृष्‍ट, निःपुण, प्रवीण, सराईत, पटाईत, वाक्‍कबर, मात्‍तब्‍बर, निष्‍णात, तज्ञ, पारंगत, कुशल, सक्षम, हुशार, समर्थ, कार्यक्षम, कर्तृत्‍ववान, काबील-लायक आणि माहीर-मास्‍टर-क्षेत्रोत्‍तम

faultless, well, good, better, best, superior, improved, master, perfect, skilled, able, adept, expert, brilliant, proficient, professional, clever, capable, talented, knowledgeable  

तर वाचकमित्रांनो, लेखक कॅल न्‍यूपोर्ट आपल्‍याला त्‍यांच्‍या या पुस्‍तकामध्‍ये एक प्रत्‍यक्ष आणि वास्‍तववादी मार्ग दाखवत आहेत ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमच्‍या स्‍वप्‍नातील आयुष्‍य प्रत्‍यक्षात खरोखर जगू शकता. आपल्‍या स्‍वप्‍नातील आयुष्‍य प्रत्‍यक्षात जगण्‍यासाठी लेखकांनी पुढील चार पद्धतीद्वारे किंवा चार नियमांद्वारे आपल्‍याला समजावून सांगितलेले आहेत ज्‍यांना तुम्‍हाला पाळायचे आहेत. त्‍यातील पहिलेच नियम असे आहे,

 

१. आपल्‍या आवडीच्‍या मागे जाऊ नका
Don’t follow your Passion

सर्वांत आधि आपल्‍याला हे समजून घ्‍यायला पाहिजे की पॅशन-आवड नेमकं आहे तरी काय?

Passion Hypothesis: Find something you’re Passionate about, then make that your career

आवडीचे गृहितकः तुमचा तीव्र नैसर्गिक कल असलेली एखादी गोष्‍ट किंवा काम शोधा, मग त्‍यामध्‍येच आपली कारकीर्द बनवा

पॅशन म्‍हणजे काय? आपल्‍या जीवनाचे ध्‍येय कसे ओळखावे?
#पॅशन एवढे महत्‍त्‍वपूर्ण का आहे? Why Passion is Important?

अधिक वाचाः ईकिगाई- नैसर्गिक कल, आवड-पॅशन शोधण्‍याची जापानी पद्धत

ईकिगाई | IKIGAI
जीवन जगण्‍याचे कारण

 पॅशन किंवा आवड ह्या गृहितकाचे-संकल्‍पनेचे अर्थ असे आहे की, प्रथम तुम्‍हाला आपल्‍या आवडीचे क्षेत्र, गोष्‍ट, काम शोधायला पाहिजे ज्‍यामध्‍ये तुमची रूची आहे, तुमचा नैसर्गीक कल आहे आणि मग त्‍यामध्‍येच तुम्‍हाला आपली कारकीर्द घडवायला पाहिजे.

compelling careers have complex origins.!

आता नेमकी समस्‍या इथे हीच आहे की, जेव्‍हाही वैज्ञानिकांनी लोकांच्‍या कारकीर्दीवर, व्‍यवसायावर, संशोधन केले तेव्‍हा त्‍यांना नेहमीच असे आढळून आले की, Compelling careers have complex origins.! म्‍हणजेच, एखाद्याला त्‍याचे पॅशन-त्‍याची आवड समजली आणि तो अचानक, एका दिवसात किंवा एका रात्रीमध्‍येच यशस्‍वी झाला, असे लिहिणे आणि वाचणे एवढी सोपी गोष्‍ट नाही.

मग वैज्ञानिकांना, संशोधन करताना पुढील गोष्‍टी आढळून आल्‍याः

१. कारकीर्दीतील पॅशन-आवड दुर्मिळ असते Career Passions are rare

कॅरेबियन विद्यार्थ्‍यांवर एक अभ्‍यास केला गेला होता त्‍यात असे कळाले की, ८४% टक्‍के विद्यार्थ्‍यांचे पॅशन-आवडी तर अगोदरपासूनच असतात, परंतू त्‍यापैकी केवळ ४% चार टक्‍केच असे पॅशन किंवा आवडी असतात ज्‍यांचा आपल्‍या व्‍यावसाय किंवा कारकिर्दीसाठी विचार केला जाऊ शकतो.

२. पॅशन-कल-आवडीला वेळ लागतो Passion Takes Time

जी लोकं आपल्‍या कारकीर्दित सर्वांत जास्‍त समाधानी होती, ती अशीच लोकं होती ज्‍यांनी आपल्‍या कारकीर्दीत सर्वांतजास्‍त काळ घालवलेला होता.  दीर्घकाळ एखाद्या व्‍यावसायिक कारकिर्दीत ज्‍यांनी आपले आयुष्‍य दिले अशाच व्‍यक्‍ती समाधानी होत्‍या.

म्‍हणजेच एखाद्या गोष्‍टीमध्‍ये-कामामध्‍ये अधिककाळ राहिल्‍याने-अधिक वेळ दिल्‍याने आणि आपल्‍या कामात अधिक चांगले-उत्‍तम-उत्‍कृष्‍ट करत गेल्‍याने त्‍यामध्‍ये आपली आवड-पॅशन आपोआपच वाढत जाते. आवडीला सवडीची जोड हवी आणि तीसरी गोष्‍ट जी संशोधनातून कळाली ती म्‍हणजे,

३. आपले काम-नोकरी आपल्‍याला आवडण्‍यासाठी तीन गोष्‍टी

Three factors that makes you like your job

  1. Automony-Control- जीवनातील तुमचे नियंत्रण कसे आहे
  2. Competence- आपल्‍या कामात कसे आहोत
  3. Relatedness-सहकर्मी कसे वाटतात

जीवनात तुमचे नियंत्रण-स्‍वायत्‍तता किती आहे? तुम्‍ही तुमच्‍या कामामध्‍ये किती चांगले-निःपुण-तज्ञ आहोत? आणि तुम्‍हाला तुमच्‍या सोबत काम करणारे व्‍यक्‍ती-लोकं कसे वाटतात?

तर फॉलो यूवर पॅशन हा एक चुकीचाच सल्‍ला नसून एक धोकादायक सल्‍ला देखिल आहे. 

पॅशन फॉलो करणे किंवा आपल्‍या आवडीच्‍या गोष्‍टी-कामं-नोकरी करणं म्‍हणजे आपल्‍यासाठी ते एक उत्‍तम-आदर्श कारकीर्द आहे आणि जर का आपण त्‍याला शोधू शकलो तर आपण नेहमीच खूश-आनंदी राहू, अशी आपली समज असते.

ह्याच कारणामुळे आपण नेहमीच विचार करत राहतो की, आपल्‍याला एखादी दुसरी नोकरी करायला पाहिजे, दुस-या ठिकाणी कामासाठी जायला पाहिजे, आणि जिथे आपण जात असतो तिथे आपण आनंदात राहत नसतो.

आणि जी महत्‍वाची गोष्‍ट आहे ज्‍यामुळे आपल्‍याला आपले पॅशन-आवड मिळेल ते म्‍हणजे आपल्‍या कामामध्‍ये चांगले-उत्‍कृष्‍ट बनने, त्‍यामध्‍ये अधिक वेळ-काळ खर्ची करणे, एकाच कामामध्‍ये अधिक वेळ घालविणे, ते आपण करतच नाही.

मग शेवटी आपला प्रश्‍न असतो की, पॅशन फॉलो करायचे नाही तर मग काय करायला पाहिजे?

 

२. आपल्‍या कामामध्‍ये इतके चांगले व्‍हा की ते तुम्‍हाला नजरअंदाज करू शकणार नाही

Be So good they cant ignore you

पॅशन-आवड असणारी मानसिकता (passion mindset) आणि कारागिराची मानसिकता (craftsman mindset) यामध्‍ये कॅल न्‍यूपोर्ट आपल्‍याला एक फरक दाखवतात.

पॅशन-आवड असणारी मानसिकता विरूद्ध कारागिराची मानसिकता

passion v/s craftsman
mindset

पॅशन-आवड असणारी मानसिकता असणारे व्‍यक्‍ती माझी नोकरी मला काय देऊ शकते यावर आपले लक्ष केंद्रित करतात. ही एक (selfish mindset) स्‍वार्थीपणा असलेली मानसिकता असते. मला हे काम केल्‍याने काय मिळेल?

याउलट, मी हे काम करून जगाला काय देत आहे (value addition) किंवा काय देवू शकतो ही एका (craftsman mindset) कारागिराची मानसिकता असते, म्‍हणूनच एक कारागिर आपले संपूर्ण लक्ष आपल्‍या कामावर केंद्रित करत असतो.

आपण करत असलेल्‍या काममुळे जगाला कोणत्‍या गोष्‍टीची पुर्तता होत आहे, किंवा मी करत असलेल्‍या कामामुळे जगाला काही मौल्‍यवान गोष्‍टीची भर पडत आहे काय, अशी मानसिकता असते.

त्‍यामुळेच एक कारागिर शेवटी येणा-या निष्‍कर्षावर (end results) आपले लक्ष केंद्रित करत असतो.

आणि तुम्‍ही जर का एखाद्या कारागिराच्‍या मानसिकतेसारखे लक्ष केंद्रित कराल तर तुम्‍ही तुमच्‍या करत असलेल्‍या कामामध्‍ये-गोष्‍टीमध्‍ये इतके चांगले-निःपुण व्‍हाल की कोणीही तुम्‍हाला नजरअंदाज करू शकणार नाही. सो गुड दे कान्‍ट इग्‍नोर यू (so good they cant ignore you).

मजूर, कारागिर आणि कलाकार यांमधला फरक जाणून घ्‍या
अधिक वाचाः तुम्‍ही जिकू शकता- शिव खेरा (You Can Win by Shiv Khera)

उदाहरणार्थः

असे समजा की तुम्‍हाला संगणकाची कुट-भाषा, कोडींग शिकयचं आहे, आणि तुम्‍हाला एक कोटी रूपये किमतीचे ऍप्‍प बनवायची तुमची इच्‍छा आहे. जर इथे तुम्‍ही पॅशन-मानसिकतेने ते कराल, तर तुमची अवस्‍था पुढील प्रमाणे होईलः

तुम्‍ही तुमचे ऍप्‍प बनवाल, आणि असेही होऊ शकते की ते चालणार नाही, कदाचित चालेलही,  किंवा त्‍याचे वापरकर्ते तुम्‍हाला कमी भेटतील, किंवा त्‍यामध्‍ये गुंतवणूकदार मिळण्‍यात समस्‍या येत असतील, तुम्‍हाला काही वैशिष्‍ट्ये त्‍या ऍप्‍पमध्‍ये जोडता येत नसतील.

आता तुम्‍ही इथे विचार कराल, मी एवढा वेळ यावर खर्ची करत आहे, आणि मला तर यामधून काही मिळतही नाही. आता तुम्‍हाला हा एप्‍प बनविण्‍यापुर्वी कितीही तीव्र आवड असेल, जर तुमची तीव्र भावनाच नसेल, कामाची गतीच संपलेली असेल तेव्‍हा तुम्‍ही काय करणार त्‍या पॅशनला-आवडीला.

परंतू, जर का तुम्‍ही ह्याच कामाला करण्‍यासाठी एखाद्या कारागिराच्‍या दृष्‍टीकोनातून पाहाल (craftsman mindset), संगणकाची कोडींग करून एप्‍प तयार करण्‍यासाठी प्रयत्‍न कराल, तर कदाचित तुमचा निष्‍कर्ष बदलेला असेल, कदाचित काहीतरी वेगळीच गोष्‍ट तुमची दिसून येईल.

तुम्‍ही सुरूवातीपासूनच विचार कराल की मी जगाला काय देवू इच्छितो?  मला जगाला नेमकं काय द्यायचं आहे, तुम्‍ही तुमचे सर्व लक्ष एप्‍प बनविण्‍यात व सुधारणा करण्‍यात केंद्रित कराल, तुम्‍ही ते एप्‍प वापरणा-या वापरकर्त्‍यांच्‍या अनुभवावर अधिक लक्ष केंद्रित कराल, आणि तुम्‍हाला त्‍या बदल्‍यात काय मिळत आहे यावर कमी लक्ष केद्रित कराल. आणि यामुळेच तुमच्‍या यशस्‍वी होण्‍याची शक्‍यता वाढेल. 

 rare and valuable traits

कॅल न्‍यूपोर्ट आपल्‍याला असे सांगतात की, आपल्‍याला कोणत्‍याही क्षेत्रात जर एखादी चांगली कारकीर्द (career) बनवायची असेल तर आपल्‍यामध्‍ये काही कौशल्‍यं किंवा गुणवैशिष्‍ट्ये असायला पाहिजेत जी खूपच दुर्मीळ आणि मौल्‍यवान अशी असतात. (rare and valuable traits)

ह्या दुर्मीळ आणि मौल्‍यवान गुणवैशिष्‍ट्यांनाच, कौशल्‍यांनाच लेखक (career capital-करियर कॅपिटल) व्‍यावसायिकपणाचे भांडवल असे म्‍हणतात.

उदाहरणार्थः

समजा तुम्‍हाला एखाद्या विपणन किंवा विक्री व्‍यवसायातील नोकरीसाठी जायची इच्‍छा आहे आणि तुम्‍हाला जाहिरातींविषयी काहीच माहिती नाही. तर दुसरीकडे एका व्‍यक्‍तीला जाहिराती चालविण्‍याचा खूप अनुभव आहे, आणि त्‍याने कोटी-कोटी रूपयांच्‍या जाहिराती मोहिमा चालविलेल्‍या आहेत. तर, साहजिकच त्‍या व्‍यक्‍तीजवळ तुमच्‍यापेक्षा जास्‍त व्‍यावसायिकपणाचे भांडवल म्‍हणजेच करियर कॅपिटल आहे.  

मग प्रश्‍न असा येतो की आपण आपले व्‍यावसायिकपणाचे भांडवल-करियर कॅपिटल कसे वाढवावे?

उत्‍तर अगदी सोप्‍पं आहे, आपल्‍याला आपल्‍या स्‍वतःच्‍या आरामाच्‍या क्षेत्राच्‍या किंवा कम्‍फर्ट झोनच्‍या काठावर सराव करायला पाहिजे. (practice at comfort zone edge) आणि सततपणे आपल्‍या कौशल्‍य सुधार व विकासावर काम करत राहायला पाहिजे, स्‍वतःला (unique) एकमेवाद्वितीय, विलक्षण बनवायला पाहिजे.

तेव्‍हा आणि फक्‍त तेव्‍हाच आपल्‍याजवळ पुरेसे करियर कॅपिटल म्‍हणजेच व्‍यावसायिकपणाचे भांडवल येईल की ज्‍याआधारे आपण त्‍या भांडवलाचे आपल्‍या कारकिरर्दीत रूपांतर करू शकू.

एवढे व्‍यावसायिक भांडवल तयार होईल ज्‍यामुळे आपण त्‍या भांडवलावर आपले करियर, व्‍यवसाय उभारू शकू जो आयुष्‍यभर आपल्‍याला त्‍याच रूची राहिल, सोबतच ते आपल्‍याला आवडेल आणि आनंद देईल.

आता बरेचजण असेही म्‍हणू शकतात की, चला एकदाचं तुमचं म्‍हणणं आम्‍ही ऐकून घेऊ आणि आपल्‍या कारकीर्दीसाठी आम्‍हाला आपली कौशल्‍यं, गुणवैशिष्‍ट्ये सुधाराव्‍या लागतील, वाढवाव्‍या लागतील, ज्‍यामुळे आम्‍ही विलक्षण, अद्वितीय बनू शकू,  परंतू ते सर्वकाही कोणत्‍या क्षेत्रात करायचे आहे हे मात्र पॅशन-आवडीमुळेच तर कळणार ना..! (we still need passion, right?)

लेखक कॅल न्‍यूपोर्ट यांच्‍या हिशोबाने हे कथा-कल्‍पना-गोष्‍टंमध्‍ये तर ऐकायला चांगले वाटते, परंतू अस्‍सल- वास्‍तविक आयुष्‍यात मात्र काहीतरी वेगळेच होत असते. ख-या आयुष्‍यामध्‍ये एका दिवसातच सकाळी उठल्‍या-उठल्‍या कोणाला आपला पॅशन-आपली आवड सापडत नाही. हळू-हळू त्‍यांच्‍या जीवनात काहीतर होत असते, ज्‍याद्वारे ते आपल्‍या कारकीर्दीकडे पोहोचतात.

जर तुम्‍ही असा विचार करत असाल की, एकदा का तुम्‍हाला तुमचा पॅशन-तमची आवड तुम्‍हाला मिळाली की मग तुम्‍ही आपोआपच श्रम-मेहणत करायला लागाल, तर हे सपशेल खोटं आहे.

आणि हो, साहजिकच असं होऊ नये की जे काम तुम्‍ही करत आहात त्‍याला तुमचा तिरस्‍कार असायला नको, तुम्‍हाला ते काम थोडं-फार तरी पसंत पडायला पाहिजे, तुम्‍हाला त्‍यामध्‍ये रूची, आवड असायला पाहिजे. (you should like what you do).  

आणि मग यानंतर तुम्‍ही जे काही काम करत असाल, त्‍यामध्‍ये तुम्‍हाला तुमचा करियर कॅपिटल म्‍हणजेच व्‍यावसायिकपणाचे भांडवल वाढवायचे आहे, श्रम-मेहणत करायची आहे, इतरांपेक्षा त्‍या क्षेत्रात किंवा निवडलेल्‍या कामामध्‍ये अतुल्‍य, अद्वितीय, एकमेव (unique) बनायचे आहे.  आणि दीर्घकालीन यशाची हीच योग्‍य पद्धत आहे.  

 

३. बढतीला वळवणे Turn down a promotion

हा नियम असं सांगतो की, नियंत्रण, (control) एका समाधानी कारकीर्दीचा (fulfilling career) महत्‍वाचा भाग असतो.  आपल्‍याला नियंत्रण दोन पद्धतीने मिळवता येते, पहिला नियंत्रण आहे, व्‍यावसायिकपणाच्‍या भांडवलाविना (without career capital). 

उदाहरणार्थः

समजा तुम्‍ही एक लेखक आहात, आणि तुम्‍ही तुमची नोकरी सोडून एक ब्‍लॉग सुरू करू इच्छित आहात.  परंतू तुम्‍हाला लिहिण्‍याचे कौशल्‍यं फार-काही नसल्‍याने तुम्‍ही एक उत्‍तम लेखक नाही. तुम्‍हाला नोकरी सोडून काहीही करण्‍याचे नियंत्रण तर येईल परंतू जर का तुमचा ब्‍लॉग पैसा कमावत नसेल तर त्‍या नियंत्रणाचा फायदा काय?

नियंत्रण मिळविण्‍याची दुसरी पद्धत अशी आहे की, तुम्‍ही तुमच्‍या कामामध्‍ये खरोखरच खूप चांगले, उत्‍कृष्‍ट आहोत, तुमच्‍याजवळ व्‍यावसायिकपणाचे भांडवल (career capital) आहे. 

अशा वेळेस तुमचा बॉस-मालक तुम्‍हाला नोकरीमध्‍ये बढती (promotion) देऊन तुम्‍हाला त्‍याच कामामध्‍ये-कारकीर्दमध्‍ये फसविण्‍याचा-अडकविण्‍याचा प्रयत्‍न करतील. आणि जर का तुम्‍ही त्‍या बढतीला स्‍वीकार कराल, तेव्‍हा इथे तुमचेही नियंत्रण निघून जाईल.

जेव्‍हा तुम्‍ही ठरविण्‍याचा प्रयत्‍न करत आहात की, तुम्‍हाला नेमकं काय करायला पाहिजे? अशा वेळेस तुम्‍हाला आर्थिक जगातील आर्थिक व्‍यवहार्यता (low of financial viability) या नियमाचा  उपयेाग करायला पाहिजे.

म्‍हणजेच तुम्‍हाला जे काम करायचे आहे त्‍याला कोणी पैसा देईल की नाही?  आता इथे याचा असा अर्थ होत नाही की तुम्‍हाला फक्‍त पैश्‍याच्‍याच मागे पळायचे आहे.  तुम्‍ही करत असलेल्‍या कामाला काही किंमत’ (value) आहे की नाही यासाठीचा पैसा फक्‍त एक तटस्‍थ सूचक’ (neutral indicator) असतो.

 

४. विचार लहान कृती महान (think small, act big  (have a mission)

ब-याच लोकांजवळ भरपूर व्‍यावसायिक भांडवल-career capital आणि नियंत्रण-control तर असतेच, परंतू तरीही ते आपल्‍या कामाला पसंत करत नसतात, त्‍यांना त्‍यांचे काम त्‍यांच्‍या नियंत्रणात असूनही ते आवडत नाही आणि त्‍याचे कारणही असे की त्‍यांच्‍याकडे आयुष्‍यात काहीतरी मोठं करण्‍याचे कोणतेही स्‍वप्‍न-ध्‍येय-उद्देश (mission) नसते.

जर तुम्‍ही एखाद्या मोठ्या ध्‍येयासाठी काम करत असाल, तर तुम्‍हाला तुमच्‍या आतमधून समाधान मिळत असते. परंतू, कॅल न्‍यूपोर्ट आपल्‍याला असेही सांगतात की, कोणत्‍याही गोष्‍टीत उत्‍कृष्‍ट झाल्‍याविना आपल्‍याला आपले ध्‍येय-उद्देश-मिशन ठरवायला नाही पाहिजे.

जर तुम्‍ही एखाद्या क्षेत्रामध्‍ये नवीन आहोत, तर तुम्‍हाला हे माहितीच नसते की त्‍या क्षेत्रामध्‍ये नेमकं काय असतं ते? मग तुम्‍ही एवढ्या लवकर तुमचे मिशन-ध्‍येय कसे ठरवू शकता?

तुम्‍हाला अगोदर कोणत्‍याही क्षेत्रातील ठराविक ठिकाणापर्यंत-क्षेत्रातील कठड्यापर्यंत (cutting edge) पोहोचायला पाहिजे, तुम्‍हाला चांगल्‍याहूनही चांगले, उत्‍तम-उत्‍कृष्‍ट बनावेच लागेल, तेव्‍हाच तुमच्‍याकडे पाहण्‍याचा योग्‍य दृष्‍टीकोन (perspective) येईल की ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे ध्‍येय-उद्देश-मिशन ठरवू शकाल.

कित्‍येक वेळेस बरेचजण असेही करतात की, ते खूपच मोठे ध्‍येय-उद्देश-मिशन ठरवून घेत असतात, जसे- मला जगातून गरिबी हटवायची आहे, आणि मग असा विचार करतात की यानंतर मला काय करायला पाहिजे?

लेखक कॅल न्‍यूपोर्ट असे म्‍हणतात की, ही एक वरून-खाली येणारी पद्धत आहे. (top down approach) याऐवजी आपल्‍याला खालून-वर जाणारी पद्धत (bottom up approach) उपयोगात आणायला पाहिजे.  लहान ध्‍येय ठरवून त्‍यांना साध्‍य करायला पाहिजे. मग आपल्‍याला आपले ध्‍येय-उद्देश-मिशन हळू-हळू समजायला लागेल.

जाता जाता शेवटी तुम्‍हाला हे सांगावे वाटते की, तुम्‍हाला ब-याचवेळेस असे विवादित सल्‍ले मिळू शकतात की, कोणी तुम्‍हाला म्‍हणेल तुमचे पॅशन फॉलो करा’, तर कोणी म्‍हणेल, तुमचे पॅशन फॉलो करू नका.  

तुम्‍हाला नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, प्रत्‍येक विषयाचा संदर्भ वेगळा असतो, आणि अपवाद प्रत्‍येक ठिकाणी मिळतील.  

कधी कधी एखादी दुर्मिळ व्‍यक्‍ती मिळू शकते की, ज्‍याने फॉलो यूवर पॅशन-तुमच्‍या आवडीची निवड करा हा सल्‍ला मानला, आयुष्‍यात प्रत्‍यक्षात आणला आणि त्‍याचे जीवन सुधारले, तो यशस्‍वी झाला. परंतू, ह्या पुस्‍तकात जी पद्धत सांगितलेली आहे ती खूपच व्‍यवहारिक (practical) आहे.

आपण बंद डोळ्यांतील स्‍वप्‍नांच्‍या जगातून बाहेर येऊन, आपले खरे जग उघड्या डोळ्यांनी निर्माण करतो आणि ते करत असताना त्‍यामध्‍ये असंख्‍य समस्‍या-अडचणी-अडथळे येतात त्‍यावर आपण समाधान शोधतो, अडथळ्यांतून मार्ग काढतो, अडचणींवर मात करतो, स्‍वतःला घडवतो, यशस्‍वी होण्‍याच्‍या मार्गावरील हा प्रवास नक्‍कीच कठीण आहे, हे सर्वकाही सहज-सोप्‍पं नाही.

पण, हीच तर आहे आयुष्‍यात स्‍वयंसुधार करण्‍याच्‍या मार्गातील खरी जिद्द आणि खरे चैतन्‍य. that’s the real spirit of self improvement..!

तर वाचक मित्रांनो, so good they cant ignore you ह्या पुस्‍तकचे सारांश आपण बघितले, ज्‍यामध्‍ये आपण पाहिलं आहे की,

  • डोन्‍ट फॉलो यूवर पॅशन, आपल्‍या आवडीच्‍या मागे जाऊ नका,
  • जे काम करत आहात त्‍यामध्‍ये आवड निर्माण कशी होईल
  • त्‍यासाठी तुम्‍ही जे काही काम करत आहात त्‍यामध्‍ये एवढे उत्‍कृष्‍ट बना की तुम्‍हाला कोणीही नजरअंदाज करणार नाही, so good they cant ignore you.
  • आपल्‍या व्‍यावसायिकपणाचे भांडवल वाढवा- Build your career capital
  • आपल्‍या कामावर आपले नियंत्रण राहण्‍यासाठी बढती टाळा-turn down a promotion
  • आर्थिक व्‍यावहार्यता नियमाचा उपयोग करा- use law of financial viability 
  • कोणत्‍याही क्षेत्रातील कठड्यावर पोहोचल्‍यानंतरच एखादे ध्‍येय-मिशन ठरवा. 
  • विचार लहान कृती महान

-सारांश समाप्‍त-

 📗📘📙📙📖

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive