भावनिक बुद्धिमत्‍ता- डॅनियल गोलमन-पुस्‍तक-सारांश मराठी (Emotional Intelligence: Daniel Goleman -Book Review-Summary in Marathi)

भानिकदृष्‍ट्या भक्‍कम असणा-या लोकांच्‍या ५ सवयी

5 Habits of Emotionally Strong People

 

भावनिक बुद्धिमत्‍ता

लेखक- डॅनियल गोलमन

पुस्‍तक परिचय-सारांश मराठी

 


Emotional Intelligence

Daniel Goleman

Book Review-Summary in Marathi

 


👉ह्या पुस्‍तकातून तुम्‍ही खालील गोष्‍टी शिकाल

# भावना नेमक्‍या असतात तरी काय?

# बुद्ध्‍यांक व भावनांक काय असतात?

# आयुष्‍यात भावनांचे सामर्थ्‍य ८०/२०?

# भावनांना समजणे, नियंत्रित करणे इत्‍यादी

 

बुद्ध्‍यांक विरूद्ध भावनांक

जेव्‍हाही तुम्‍ही एखाद्याशी जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्‍बर्ट आईन्‍स्‍टाइन, न्‍यूटन किंवा निकोलस टेस्‍ला यांच्‍याविषयी विचाराल की ते इतर वैज्ञानिकांपेक्षा यशस्‍वी कशामुळे हाते? तर अधिकांश लोकांचं असं उत्‍तर असेल की, कारण ते अतिषय बुद्धिमान होते.

SUCCESS= 80% (EQ) + 20% (IQ)

८०/२० चे तत्‍व-सिद्धांत-परेटो-प्रिन्सिपल-80/20 Principle-Pareto Principle

परंतू एका संशोधनानुसार आपला आयक्‍यू (IQ) म्‍हणजेच Intelligent Quotient-इंटेलीजेन्‍ट क्‍वोशन्‍ट- बुद्ध्‍यांक आपल्‍या जीवनात केवळ २० टक्‍केच कारणीभूत असतो, आपण आपल्‍या भावनांना किती चांगल्‍या प्रकारे सांभाळतो यावर उर्वरित ८० टक्‍के यश अवलंबून असते.

 

अधिक वाचाः 80% भावनांवर आणि फक्‍त 20% बुद्धिमत्‍तेवर यश अवलंबून असेल तर मग अशी म्‍हण का आहे?
When your Emotions are HIGH
your Intelligence is LOW

Why such a phrase read more: about investing and wealth creation

 

लेखक डॅनियल गोलमन यांचे असे म्‍हणणे आहे की, आपला बुद्ध्‍यांक निश्चित असतो जो आपल्‍याला आपल्‍या जन्‍मापासून आपल्‍याला मिळालेला असतो. आणि आयुष्‍यभर ते सारखेच असते.

तर आपण आपला बुद्ध्‍यांक सहजा-सहजी बदलू शकत नाही, परंतू होय, आपण भावनिक बुद्धिमत्‍तेबद्दल जाणून-शिकून आपले भावनांक वाढवू शकतो..! याबद्दल जाणून घेउन तुम्‍ही तुमच्‍या भावनांना नियंत्रित करणे शिकू शकता.  कारण तुम्‍हाला आयुष्‍यात यशस्‍वी होण्‍यासाठी भावनिक बुद्धिमत्‍तेचा ८० टक्‍के वाटा असतो.

तर अगोदर हे समजून घेऊ की भावना नेमक्‍या असतात तरी काय?


#Mind v/s Brain #What is difference between #Emotions, #Sentiments, #Feelings, #Thoughts, #Over Thinking, #Mentality, #Mindset, #Mental Toughness, #Belief System, #Mindfulness v/s Mindfullness, #Power of your Thoughts #Power of your Habits #Conscious Mind #Subconscious Mind #Super Subconscious Mind #Inner Engineering #Reprogram your Mind

इमोशन्‍स म्‍हणजेच भावना ह्या एक प्रकारची शक्‍तीशाली उर्जा-Strong Energy असते जी आपल्‍याला त्‍वरित कृती-कार्य करण्‍यासाठी मजबूर करत असते. आणि आपण आपल्‍या दैनंदिन जीवनात ८० टक्‍के निर्णय-कृती-कार्ये-कामे आपल्‍या भावनांच्‍या आधारेच घेत असतो.

यासाठीच आपल्‍या भावनांचा उपयोग करून योग्‍य निर्णय घेणे आपल्‍यासाठी खूप महत्‍वाचे आहे.  म्‍हणूनच आज आपण डॅनियल गोलमन लिखित पुस्‍तक इमोश्‍नल इंटेलिजेन्‍ट- Emotional Intelligent by Daniel Goleman ह्या पुस्‍तकाच्‍या मदतीने भावनांबद्दल शिकणार आहोत.

तर चला जाणूया आपल्‍या भावनांबद्दल...

 

१. स्‍व-जाणीवः स्‍वतःच्‍या अस्तित्‍वाची जाणीव Self Awareness  

स्‍व-जाणीव यामध्‍ये आपल्‍याला स्‍वतःला चांगल्‍या व योग्‍य रितीने जाणून घ्‍यायचे आहे.

उच्‍च भावनिक बुद्ध्‍यांक विकसित करण्‍यासाठीच्‍या वाटेवर वाटचाल करण्‍यासाठी महत्‍वाचे आणि पहिले पाऊल म्‍हणजेच आपल्‍या भावना व आपल्‍या वर्तनाला चांगल्‍या पद्धतीने निरिक्षण करायचे आहे. म्‍हणूनच हे जाणणे अत्‍यंत आवश्‍यक आहे की, आपण कसे विचार करतो, आपल्‍यातील कमकुवतपणा, आपल्‍यातील सामर्थ्‍य, इत्‍यादींना आपण कसे हाताळतो आणि यामुळे आपल्‍या आजूबाजूच्‍या लोकांवर कसा व काय प्रभाव पडतो, आपल्‍याला ह्या सर्वच गोष्‍टींबद्दल जाणीव असायला पाहिजे.

  • आपण कसे विचार करतो, How we Think
  • आपल्‍यातील कमकुवतपणा, Our Weakness
  • आपल्‍यातील सामर्थ्‍य, Our Strength
  • इत्‍यादींना आपण कसे हाताळतो आणि How we Deal with
  • लोकांवर कसा व काय प्रभाव पडतो Effect on People

लहरी मनाच्‍या भावना  
MIND your MOOD
मूड= मनाची स्थिती किंवा मनाचा कल

आपल्‍या भावना नेहमीच एकसारख्‍या नसतात. भावना ह्या जास्‍तवेळ एकसारख्‍या नसतात, ते बदलत असतात.  तुम्‍हीदेखिल कधी अनुभवलं असेल की,

तुम्‍ही एखाद्या कारणामुळे आनंदी असाल तर तुमचा तोमूड मनाची स्थिती किंवा मनाचा कल नेहमीच तसाच राहणार नाही.

अशाच प्रकारे जर तुम्‍ही दुःखी असाल तर तो मूडही काही वेळाने बदलून जाईल. यासाठीच आपल्‍याला आपल्‍या भावनांना नियंत्रित करण्‍या अगोदर त्‍यांना चांगल्‍या रितीने समजून घेण्‍यासाठी त्‍यांचे चांगल्‍या पद्धतीने निरिक्षण-Observe करायला पाहिजे की, आपल्‍याला केव्‍हा कसे वाटते?

जर आपल्‍याला राग येत असेल तर, त्‍याला नियंत्रित करण्‍याअगोदर आपल्‍याला सर्वांत आधी हे स्‍वीकार करायला पाहिजे की, मी आता रागात आहे, मला रागाला नियंत्रित करायचे आहे. याला म्‍हणतात आपल्‍या भावनांची जाणीव होणे, स्‍वतःला समजणे, स्‍व-जाणीव असणे. स्‍वतःच्‍या विषयी जागरूक असणे.

लेखक म्‍हणतात की, लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्‍या भावनांना हाताळत असतात. जसे की, भावनांना न समजणारी व्‍यक्‍ती-Engulfed, स्‍वीकार करणारे व्‍यक्‍ती-Accepting, स्‍वयं जाणीव असलेले व्‍यक्‍ती- Self Aware

 

अ. भावनांचा अजाणपणा असलेल्‍या व्‍यक्‍ती- Engulfed

या अशा व्‍यक्‍ती असतात ज्‍यांचा मूड प्रत्‍येक भावनेसोबत बदलत जातो आणि ते त्‍यांच्‍याच केलेल्‍या कृती-कार्य-कामं यांच्‍यामुळे अडचणीत येत असतात. आणि मग स्‍वतःला असहाय्य जाणून घेत असतात.

ह्या व्‍यक्‍ती आपल्‍या स्‍वतःच्‍या मानसिकतेला ओळखलेले नसतात. आपल्‍या जाणीवांबद्दल जाणून नसतात की केव्‍हा कोणत्‍या गोष्‍टीवर काय प्रतिक्रिया द्यायची. एका अर्थाने आपण त्‍यांना म्‍हणू शकतो की ते आपल्‍या जाणीवांमध्‍ये गोंधळलेले असतात. (Confused in Feelings)

 

प्रतिक्रिया की प्रतिसाद
कसे रिएक्‍ट करायचे की काय रेस्‍पॉन्‍स द्यायचे?
सकारात्‍मक की नकारात्‍मक
अधिक वाचाः
दृष्‍टीकोन हेच सर्वकाही

📗📘📙📖📕

अशा व्‍यक्‍तींना आपल्‍या मानसिकतेबद्दल समजलेले नसते. अशा व्‍यक्‍ती स्‍वतःच्‍या मनाला योग्‍यरितीने जाणून घेतलेले नसतात.

  • भावनांमध्‍ये गुरफटलेली, गोंधळलेली
  • आली लहर केला कहर, लहरी स्‍वभाव-व्‍यक्‍ती
  • खाऊ की गिळू अशी व्‍यक्‍ती असतात.

Engulfed जाणिवांची उणीव असते.

वर्तनामध्‍ये तुमच्‍या भावनांचा अभाव-प्रभाव तुमचा स्‍वभाव ठरवतात

 

ब. स्‍वीकार करणारे व्‍यक्‍ती-Accepting

काही लोकं त्‍यांच्‍या भावना व स्‍वतःच्‍या विचारांना जाणून असतात, आणि हे समजून जातात की त्‍यांना कशी जाणीव होत आहे? आणि ते त्‍या जाणीवेला स्‍वीकार करायला लागतात. मग भलेही ते त्‍यांच्‍यासाठी कितीही हानीकारक, कष्‍टदायी, नुकसानकारक असू देत ते त्‍या जाणीवेचा स्‍वीकार करतात.   

त्‍यांच्‍यासाठी कितीही हानीकारक असलं तरीही ते त्‍याला नजरअंदाज करतात आणि पुढे चालून कधीही त्‍याला बदलण्‍याचा प्रयत्‍नही करत नाहीत.  

 

क. स्‍वयं जाणीव असलेले व्‍यक्‍ती Self Aware

ह्या व्‍यक्‍ती स्‍वतःच्‍या भावनांना व जाणीवांना संपूर्णपणे समजून-उमजून असतात. त्‍यांना हे माहित असते की, यांना केंव्‍हा राग येत आहे, ते केव्‍हा उदास आहेत आणि या व्‍यक्‍ती त्‍याला बदलण्‍याचा प्रयत्‍नदेखिल करत असतात.

 

२. भावनांचे व्‍यवस्‍थापन- Managing Emotions

प्रत्‍येक भावनेचे एक मूल्‍य आणि महत्‍व असते. आपल्‍या भावनांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी हे सर्वांत महत्‍वाचे आहे की, तुम्‍हाला हे माहित असायला पाहिजे की, कोणत्‍या कारणामुळे तुमच्‍या भावना बदलत आहेत. 

अशा कोणत्‍या गोष्‍टी आहेत ज्‍यामुळे तुमचे मन अशांत होत असते अशा सर्वच कारणांना समजून घेण्‍याची गरज आहे.  ज्‍यामुळे होईल काय की त्‍या भावनांना-जाणीवांना नियंत्रित करण्‍यासाठी आपण त्‍या भावनांसाठी अगोदरच स्‍वतःला तयार करून ठेवू शकतो. 

 

BALANCE of Emotions is Very Important than Ignorance
आपल्‍या भावनांना दुर्लक्षित करण्‍याऐवजी त्‍यांना संतुलित करणे हे तुमचे ध्‍येय असायला पाहिजे.

जर तुम्‍हाला उदास-दुःखी वाटत असेल तर किंवा तुम्‍हाला कोणतेही काम करण्‍याचे मन होत नसेल तर याचा अर्थ असा नाही की, जेव्‍हा तुम्‍हाला आनंदाची जाणीव होईल तेव्‍हाच तुम्‍ही काम करायला घ्‍याल. खरेतर, तुम्‍हाला तुमच्‍या भावनांशी संतुलित होऊन अशी कामं करायला घ्‍या जी तुमच्‍यासाठी योग्‍य असतील.

जेव्‍हा आपल्‍या मेंदूमध्‍ये एखाद्या गोष्‍टीविषयी भिती उत्‍पन्‍न होते, तेव्‍हा सर्वकाही बाजूला करून, नजरअंदाज करून, कसेही करून त्‍या भितीपासून बाहेर पडण्‍याचा प्रयत्‍न करत असतो.

चिंतित होणे कोणत्‍याही परिस्थितीला हाताळण्‍याची ओळख आहे.  

परंतू, फक्‍त चिंता करून, परेशान होऊन, एखाद्या कामामध्‍ये समस्‍या-अडचण येण्‍यापुर्वीच त्‍याच्‍या समाधानाबद्दल विचार करायचा आहे. पण जेव्‍हा तुम्‍ही वारंवार एखाद्या गोष्‍टीविषयी चिंतीत राहत असता, आणि त्‍याचे कोणतेही समाधान, उत्‍तर मिळत नसेल, तेव्‍हा अशावेळी ते हाताळणे तुमच्‍यासाठी अधिकच अवघड, कठीण व त्रासदायक होऊन बसते.

जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या गोष्‍टीला घेऊन चिंतित-परेशान असता, तेव्‍हा त्‍या परिस्थितीला नियंत्रित करणे तुमच्‍या हातत नसते. त्‍यामुळे तुम्‍हाला तान-तनाव, अति-विचार, अति-काळजी, अति-चिंताग्रस्‍तपणा, अचानक तीव्र-घाबरटीचे झटके, यासारखे मानसिक आजार उद्भवू शकतात. जी तुमच्‍या मानसिक आरोग्‍याला-स्‍वास्‍थ्‍याला गंभीर परिणाम करू शकतात.   

चिंता=चिता
Severe Affects Your Mental Health
Anxiety Disorders, Stress, Over thinking, Panic Attacks

जर तुम्‍ही तुमच्‍या मानसिक आरोग्‍याचे व्‍यवस्‍थापन करू शकत नसाल, तर तुम्‍ही वारंवार एकाच गोष्‍टीसाठी चिंताग्रस्‍त-Worried राहाल.  आणि ही चिंतेचे चक्र चालूच राहिल.

चिंतेचे चक्र
Worry to worry Cycle

यासाठीच आपल्‍या भावनांना नजरअंदाज न करता, त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष न करता, आपल्‍या भावनांसोबत सहचर करा, समजून घेऊन आरामाने राहा, हा भावनांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याचा सर्वांत उत्‍तम मार्ग आहे. आणि कोणतेही निर्णय घेण्‍याअगोदर स्‍वतःशीच असे प्रश्‍न विचारा की, काय ते माझ्यासाठी खरेच महत्‍वाचे आहे? किंवा तुम्‍ही तुमच्‍या भावनांच्‍या आधारे ते निर्णय घेत आहोत?

 

३. स्‍वतःला मार्ग दाखवा Motivate Oneself

जर कोणी आपल्‍यासमोर त्‍यांचे दुःख मांडत असतो, किंवा एखादी समस्‍या, अडचण आपल्‍यासमोर मांडत असेल, तर आपल्‍याला त्‍यांचे बोलणे चांगल्‍या पद्धतीने ऐकून घेऊनच त्‍याला समजवायला पाहिजे किंवा आपले सर्वोत्‍कृष्‍ट मत किंवा सल्‍ला द्यायला पाहिजे. आणि त्‍याला प्रवृत्‍त-(Motivate) करायला पाहिजे. म्‍हणजेच आपल्‍याला त्‍या व्‍यक्‍तीची असलेली सद्य स्थिती व प्रत्‍यक्ष परिस्थितीवर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या दृष्‍टीने बघायला पाहजे. 

 

क. विलंबित लोभ- Delay Gratification

एका संशोधनात अभ्‍यासाअंती असे कळाले की, जी मुलं केवळ वयाच्‍या चवथ्‍या वर्षातच आपल्‍या मोह, प्रलोभन अशा भावनांना नियंत्रित करणे शिकलेली असतात, मग मोठी होऊन त्‍याच व्‍यक्‍ती आत्‍मनिर्भर आणि वैयक्तिकदृष्‍ट्या व सामाजिकदृष्‍ट्या कार्यरत होत असतात.

#अधिक वाचाः द ग्रेट वर्ल्‍ड फेमस मार्शमेलो एक्‍स्पेरिमेंट
#World Famous Marshmallow Experiment



अशा व्‍यक्‍ती आपल्‍या आयुष्‍यातील समस्‍यांना चांगल्‍यापद्धतीने निरिक्षण व विश्‍लेषण करून, त्‍यांना समजून घेत असतात, यांच्‍याकडे जीवनातील हताशा, निराशा, दुःख इत्‍यादींना हाताळण्‍याचे कसब चांगले असते.  भावनाचे संतुलन असल्‍यामुळे ते समस्‍यांना एकाच बाजूने न बघता, सर्वबाजूने विचार करू शकतात. अशा व्‍यक्‍तींना चौकसपणे, बारकाईने एखाद्या गोष्‍टीची मीमांसा करणे जमते.

अशी माणसं भावनिकदृष्‍ट्या मजबूत असल्‍याने आयुष्‍यात येणा-या आव्‍हानांना स्‍वीकार करतात, आणि निराशा आणि मानसिक ताण-तनाव, मानसिक दबावाला बळी पडत नाहीत.

 

ख. सकारात्‍मक आणि आशावादी राहा Maintain Hope and Optimism

आशा, होप तुमच्‍या आयुष्‍यात पुढे जाण्‍यासाठी अत्‍यंत महत्‍त्‍वाची गोष्‍ट आहे. जर तुमच्‍यामध्‍ये आशा असेल तर तुमचे (dark & dull life) अंधकारमय, वाईट आणि निष्‍फळ जीवनसुद्धा चांगले, उजळून निघू शकते. परंतू, यासाठी तुम्‍हाला स्‍वतःवर विश्‍वास असला पाहिजे, तेव्‍हा आणि फक्‍त तेव्‍हाच तुम्‍ही तुमचे ध्‍येय गाठू शकता.

A positive attitude is a person’s passport to a better tomorrow.

तुम्‍हीसुद्धा आपल्‍या आजूबाजूला पाहिलेलं असेल की, काही व्‍यक्‍ती कितीही बिकट परिस्थितीत, कोणत्‍याही स्थितीमध्‍ये नेहमीच आशावादी असतात. आणि हेच त्‍यांच्‍या यशामागचे कारणही असते. अशाच आशावादी व्‍यक्‍ती कोणत्‍याही अडचणीचा सामना करत, समस्‍येचे समाधान काढत असतात.

तर दुसरीकडे आपण पाहतो की, काही लोकांकडे त्‍यांच्‍या आयुष्‍यातील वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात येणा-या अडचणींना व आव्‍हाणांना तोंड देण्‍यासाठी,  लागणारे सामर्थ्‍य आणि कोणत्‍याही ध्‍येयाकडे वाटचाल करण्‍यासाठी लागणारी उर्जा, शक्‍ती त्‍यांच्‍याकडे नसते. #Self-belief

कारण त्‍यांना स्‍वतःवर असा विश्‍वासच नसतो की, ते खरोखरच त्‍यांच्‍या ध्‍येय-उद्दिष्‍टांना प्राप्‍त करू शकतात.

जगातील सर्वांत सुंदर वृक्ष,
आत्‍मविश्‍वास
जो जमिनीवर नाही मनात उगवतो

 

४. इतरांमधील भावनांना ओळखणे- Recognizing Emotions In Others

आपण आपल्‍या भावनांविषयी जितके अधिक जाणून घेऊ, जागरूक होऊ तेवढ्याच चांगल्‍या प्रकारे आपण इतरांच्‍या भावनांना समजू शकू.  आपण खूपवेळा पाहतो की ब-याच जणांना आपल्‍या भावनांना शब्‍दांमध्‍ये बांधणे, सांगणे, शब्‍दबद्ध करणे जमत नाही.  तर अशा व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या देहबोलीने, हावभावाने, हातवारे करून, चेह-यावर विविध भाव आणून, आपल्‍या आतील, मनातील भावनांना व्‍यक्‍त करत असतात.

NON Verbal Communication to Express their Feelings
Gesture, Body Language, Facial Expressions

कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या भावनांना ओळखण्‍यासाठी हे गरजेचे आहे की, आपण समोरच्‍या व्‍यक्‍तीच्‍या बोलण्‍यावर लक्ष द्यायला पाहिजे की, ती व्‍यक्‍ती त्‍यांचे बोलणे, तो/ती काय बोलत आहे या ऐवजी तो/ती कसे बोलत आहे, कसे समजावत आहे हे गरजेचे आहे.

कारण कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या (non verbal actions) अशाब्दिक बोलण्‍याने आपण त्‍यांच्‍या भावनांना ओळखू शकतो. दुस-यांच्‍या भावनांना समजण्‍यासाठी हे गरजेचे आहे की, आपण त्‍यांचे म्‍हणणे पूणपणे न ऐकताच, त्‍यांना त्‍यांच्‍या समस्‍येवर समाधान, सल्‍ला सांगण्‍यापेक्षा, पुढच्‍या व्‍यक्‍तीच्‍या बोलण्‍याला, त्‍यांचे म्‍हणणे चांगल्‍यारितीने ऐकून घ्‍यायला पाहिजे.

लक्षात ठेवाः आपण काय बोलतो यापेक्षा कसे बोलतो हे महत्‍वाचे असते
अधिक वाचाः देहबोली आपल्‍या शरीराची भाषा
(Body Language Book Summary)

दुस-यांच्‍या ठिकाणी स्‍वतःला ठेवून, इतरांना त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनातून, त्‍यांच्‍या समस्‍येला, त्‍या परिस्थितीला पाहा, त्‍यांच्‍या अशाब्दिक (non verbal actions) हावभावांवर लक्ष द्या जी त्‍यांना शब्‍दांमध्‍ये समजावणे जमत नाही.

आपल्‍या शरिराची भाषा संपूर्ण जगामध्‍ये कोणत्‍याही ठिकाणी जा, कोणत्‍याही संस्‍कृती, वर्ण-वर्ग-धर्मामध्‍ये जा ती आपल्‍याला समजू शकते. हे नैसर्गिक आहे.
(अधिक वाचाः देहबोली)

 

5. नातेसंबंधांना हाताळणे- Handling Relationships

कोणत्‍याही नातेसंबंधाला सांभाळण्‍यासाठी हे गरजेचे आहे की तुम्‍ही त्‍यांच्‍या भावनांना समजण्‍या सोबतच इतर दोन भावनिक कौशल्‍ये जसे, स्‍वयं-व्‍यवस्‍थापन आणि सहानुभूती या दोन भावनिक कौशल्‍यांवरही लक्ष द्या.  या सर्व सामाजिक सामर्थ्‍यामुळे तुम्‍ही इतरांनाही होणा-या भावनिक उद्वेगांचा सामना करू शकता.

सामाजिक सामर्थ्‍यासाठी दोन महत्‍वाची भावनिक कौशल्‍ये

१. स्‍वयं-व्‍यवस्‍थापन

२. सहानुभूती

Two more Emotional Skills for Social Ability
Self Management
Empathy

या सामाजिक सामर्थ्‍यामुळे तुम्‍ही इतरांना समजून घेऊ शकता आणि तुम्‍ही लोकांना प्रेरितदेखिल करू शकता. जेव्‍हा कोणी तुमच्‍याशी आपल्‍या भावनांविषयी काही बोलत असेल, चर्चा करत असेल, तेव्‍हा तुम्‍ही त्‍या परिस्थितीला त्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून पाहण्‍याचा प्रयत्‍न करा, आणि त्‍याला सहानुभूती दाखवा, ज्‍यामुळे तो पुढचा व्‍यक्‍तीदेखिल त्‍याच्‍या भावनांना सहजतेने हाताळू शकेल.

जेवढे अधिक आपण समाजात लोकांशी भेटतो, तेवढेच अधिक आपले भावनिक संकेत चांगल्‍यापद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत असतात.

भावनिक बु‍द्ध्‍यांकावर (emotional quotient) अवलंबून असते की तुम्‍ही कसे आपल्‍या भावनांना इतर लोकांसोबत व्‍यवस्‍थापन करत आहात, कोणत्‍या लोकांसोबत आपल्‍याला चांगले वाटते, आणि कोणत्‍या लोकांसोबत आपला मूड-विचलित होतो.  या सर्व गोष्‍टींच्‍या आधारेच आपण आपण आपल्‍या भावनांना नियंत्रित करू शकतो.

ज्‍या व्‍यक्‍ती आपल्‍या आजूबाजूच्‍या लोकांना समजून घेवून त्‍यांना सहजतेने किंवा शांतपणाने त्‍यांना हाताळतात, त्‍यांच्‍या भावनांना समजून घेण्‍याचे प्रयत्‍न करतात, अशा व्‍यक्‍ती सामाजिकदृष्‍ट्या खूपच सक्रिय असतात.

आपल्‍याला आपल्‍या (emotional need) ‘भावनिक गरजेच्‍या वेळी अशा व्‍यक्‍तीची गरज असते जी आपल्‍या परिस्थितीला समजून घेईल, आणि त्‍यांच्‍या सूचना आणि समजूतीप्रमाणे आपल्‍या (emotional condition & situation) ‘भावनिक परिस्थितीला बेकार पासून बरीआणि ब-यापासून उत्‍कृष्‍ट बनवू शकते. (Worst to Best)

 

तर वाचकमित्रांनो तुम्‍हाला हे पुस्‍तक सारांश कसे वाटले आम्‍हाला अवश्‍य कळवा. काही त्रुटी राहिल्‍यास, आपले प्रश्‍न, तक्रारी, समस्‍या-सूचना-सल्‍ले खालील ई-मेल किंवा टिप्‍पणीद्वारे कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेवू.

👉🙏  धैर्यपूर्वक पुस्‍तक सारांश वाचन केल्‍याबद्दल आपले मनःपुर्वक धन्‍यवाद. 

 

 सारांश समाप्‍त 

 



इतर संबंधि‍तः 

 

जाणून घ्‍या स्‍वतःच्‍या भावनांना

 

जन्‍मापासून - लहानपणापासूनच आपल्‍या बाह्य वर्तनाला आतमधून नियंत्रित करणारे (राग, भय, आनंद, घृणा, दुःख-उदासी, लोभ इत्‍यादी) भावनांंचा जन्‍म आणि त्‍यांचा आपल्‍या आयुष्‍यावर होणारा खोल परिणाम दाखविण्‍याचा एक प्रयत्‍न इनसाईड आऊट ह्या एनिमेटेड चित्रपटातून केला गेलाय.  तुम्‍ही पाहा व मुलांना, विद्यार्थ्‍यांना दाखवा.  भावनांचा जन्‍म व त्‍यांचा परिणाम आणि शेवटी भावनांचा अंत कसा होतो हे शिकायला नक्‍कीच मिळेल. 

मुलांसाठी जरी असला तरी सवांनीच पाहावा व समजून घ्‍यावा असा हा इनसाईड आऊट हा एनिमेटपट-(animated movie)- एनिमेटेड चित्रपट इंग्रजी भाषेत उपलब्‍ध आहे.  हिंदी किंवा मराठी भाषेत उपलब्‍ध नाही. पण समजून येईल. भावनाओं  को समझो..!


 प्रतिमा स्‍त्रोतः DEVIANTART

 

#इतर संबंधित वाचनासाठी:

#आपल्‍या जीवनाचे कारण-ध्‍येय ओळखण्‍याची जापानी पद्धत- ईकिगाई 

#शिका मन शांत करण्‍याची जापानी जिन-शीन-जित्‍सू-पद्धत

#आपले मन कसे कार्य करतेः दण्‍डपाणी यांच्‍या शब्‍दांत (दण्‍डपाणी यांच्‍या संबोधनाचा अंश)

(शिका मन शांत करण्‍याची जापानी जिन-शीन-जित्‍सू-पद्धत-Learn to Calm your Mind by Jin Shin Jyutsu Technique from the book The Touch of Healing by the Authors- Alice Burmeister with Tom monte 

 

#अवांतर वाचनासाठी:       

 


 

आपले अस्तित्‍वः आपण शरीरात मन आहोत  की मनात शरीर...


 

#इनसाईड आऊटः भय, घृणा, राग, आनंद, लोभ

#Sadness, Anger, Happy, Disgusts, Fear etc.

#Types of Emotions___

#Inside Out Movie Trailer

 

भावनिक साक्षरतेची गरजः भावनिक शिक्षणाची गरजः 


साभारः यूट्यूब UNESCO New Delhi Cluster


साभारः यूट्यूब  NCERT OFFICIAL

भावना चक्रः Wheel of Emotions 

भावना चक्रः Wheel of Emotions


 


 

  📗📘📙📙📖

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

अधिक वाचाः

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

इतर संबंधि‍तः 

 

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive