सामाजिक बुद्धिमत्‍ता -सोशल इंटेलिजन्स- डॅनियल गोलमन | Social Intelligence by Daniel Goleman- Book Summary in Marathi

हजारो वर्षांच्‍या आपल्‍या सामूहिक, सामाजिक जीवनाला सखोलपणे स्‍पर्श करणारी संकल्‍पना अर्थातच सामाजिक बुद्धिमत्‍ता  

  भावनिक बुद्धिमत्‍ता या पुस्‍तकाचे लेखक
डॅनियल गोलमन

सामाजिक बुद्धिमत्‍ता
सोशिअल इंटेलिजन्स

 Social Intelligence by Daniel Goleman
Book Summary in Marathi

सामाजिक बुद्धिमत्‍ता किंवा सोशल इंटेलिजेंस या पुस्‍तकामध्ये, लेखक डॅनियल गोलमन आपल्या मेंदू व मनाशी निगडित आंतर्राज्य जगासाठी चकित करणारे एक उदयोन्मुख नवीन विज्ञान शोधतात. त्यांचा सर्वात मूलभूत शोध म्‍हणजे, आपण सामाजिकतेसाठी बनलेलो आहोत, आपण सतत “न्यूरल बॅलेट” मध्ये गुंतलेले असतो जो आपल्या सभोवतालच्‍या लोकांच्‍या मेंदूशी जोडण्‍याचे काम करत असते यासाठी कारणीभूत असतो. 

या पुस्‍तकात सर्वसामान्‍यांसाठी नेमकं काय आहे? तर उत्‍तर आहे, सामाजिक बुद्धिचे शहाणपण..!  ही संकल्‍पना समजून घेण्‍यास काहीशी विचित्र वाटू शकते.  परंतू आपण जिथे अधिकांश वेळ इतरांसोबत घालवत असतो, समाजात, समूहात, गटात, वावरताना, व्‍यवहारीकपणा जमण्‍यासाठी इतरांशी संवाद-संप्रेषण करताना त्‍यांच्‍याही काही भाव-भावना, आशा-अपेक्षा, इच्‍छा असतात व त्‍यांनाही त्‍या आपल्‍याप्रमाणे कोणीतरी समजूण घ्‍याव्‍या असे वाटत असतेच.  

सामाजिक बुद्धि विकसित करणे म्‍हणजेच ''सॉफ्ट स्किल्‍स'' मृदू कौशल्‍यं विकसित करून,  आपण समाजात, समूहात इतरांशी त्‍यांच्‍या भाव-भावनांना सहजपणे समजून, उत्‍तमपणे वागणूक, वर्तन, व्‍यवहार करू शकतो.  योग्‍य प्रतिसाद देऊ शकतो.  एक माणूस म्‍हणून ह्या गोष्‍टी स्‍वतःजवळ असणे का गरजेचे आहे हे या पुस्‍तकातून आपल्‍याला लेखक गोलमन समजावतात. 

काही व्‍यवस्‍थांमध्‍ये, उत्‍कृष्‍ट व यशस्‍वी संघटनांमध्‍ये त्‍यांच्‍या व्‍यावसायिकपणामुळे सर्वोच्‍च उपयुक्‍त ठरणारे घटक, इतर बाबतीत मात्र त्‍यांच्‍यासाठी अडचणीचे ठरू शकतात. त्‍या इतर क्षेत्रात नक्‍कीच चांगले कार्य करत असतील मात्र जेव्‍हा सामाजिक व्‍यवहाराची गोष्‍ट येते तेव्‍हा तिथे व्‍यावसायिकपणा जपणारी बुद्धी नाही तर सामाजिक बुद्धी कामाला येते.  

देहबोलीः संवादामध्‍य आपण काय बोलतो त्‍यापेक्षा कसे बोलतो हे महत्‍वाचे असते
अधिक वाचाः देहबोली-बॉडीलॅंग्‍वेज पुस्‍तक सारांश

ज्‍याचा बुद्ध्‍यांक अगदीच कमी आहे, आणि तो एखाद्या मेजवाणीमध्‍ये बोलत असताना इतरांचे लक्ष आपल्‍याकडे वेधून घेत असतो.  अशा व्‍यक्‍तीला आपण नक्‍कीच भेटलो असणार, परिचित असणार.  म्‍हणूनच सर्व प्रकारच्‍या बुद्धिमत्‍तांसाठी एकच व्‍याख्‍या तयार करण्‍यापेक्षा, न्‍युरो-शास्‍त्रज्ञ आणि मानसशास्‍त्रज्ञांना वेगवेगळ्या प्रकारच्‍या बुद्धिमत्‍तांचे विश्‍लेषण करण्‍यातच जास्‍त रस आहे असे दिसते आणि इथेच ''सोशल इंटेलिजन्‍स'' म्‍हणजेच सामाजिक बुद्धिमत्‍तेची सुरूवात होते. 

सामाजिक बुद्धिमत्‍तेमध्‍ये माणूस एखाद्याशी बोलताना तार्किक संभाषण करत ते पुढे चालू ठेवतो.  परंतू, माणसाच्‍या भावना, जाणीवा आणि त्‍याच्‍या आजूबाजूला असलेल्‍या सामाजिक परिस्थितीचे योग्‍य आकलन करण्‍यात मात्र कमी पडतो.  अशा प्रकारची बुद्ध‍िमत्‍ता सामाजिक जीवनासाठी दिशादर्शक ठरते.  

सामाजिक बुद्धिमत्‍तेमुळे आपण इतरांच्‍या वागणूकीला योग्‍य प्रतिसाद देऊ शकतो. मग, भलेही ते एखाद्या व्‍यक्‍तीचे उतावीळ हल्‍लेखोर असलेल्‍या वागणूकीचे  विश्‍लेषण असो किंवा आपल्‍या जोडीदाराला, जीवनसाथीला होणारा नेमका त्रास समजून घेणं असो.  सामाजिक बुद्धिमत्‍तेमुळेच जगातील सामाजिक परस्‍पर संबंध समजून घेण्‍यास मदत होते.

यासोबतच या पुस्‍तकातून आपल्‍याला सामाजिक बुद्धिमुळे होणारे इतर फायदे जसे, वेगवेगळ्या संस्‍कृतीमधील सामाजिक बुद्धिमध्‍ये काय फरक असतो? किंवा भीतीदायक चित्रपट, सिनेमे पाहिल्‍यानंतर मुलं नंतरच्‍या आयुष्‍यात कमी का लाजतात? आणि सामाजिक बुद्धिमत्‍तेचा सातत्‍याने वापर केल्‍यास आपल्‍याला सुस्‍ती, कंटाळा का येतो?  अशा ब-याच गोष्‍टी ''सामाजिक बुद्धी'' या पुस्‍तकातून आपल्‍याला समजून घेता येतील.

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर झळकलेली व न्‍यूयॉर्क टाइम्‍स बेस्‍ट सेलर यादीमध्‍ये असलेली पन्‍नास लक्ष पेक्षाही अधिक प्रति विक्री झालेली डॅनियल गोलमन लिखित इमोश्‍नल इंटेलिजन्‍स म्‍हणजेच भावनिक बुद्धिमत्‍ता या पुस्‍तकाची प्रचंड खपत होत आहे. पुस्‍तकाचे इतर भाषेतील अनुवादही वाचकांच्‍या पसंतीस उतरले आहेत.  

आता, परत एकदा, डॅनियल गोलमन यांनी आधुनिक जीवशास्‍त्रातील शोध आणि मेंदूच्‍या शास्‍त्रीय अभ्‍यासाधारे, एका नव्‍या संकल्‍पनेला शोधून काढले आहे, आणि ती म्‍हणजेच, ''आपण समाजात एकमेकांसोबत जुळण्‍यासाठीच बनलेलो आहोत..!'' (we are “wired to connect”) आणि साश्‍चर्य याचा सखोल परिणाम आपल्‍या नात्‍यांवर व दैनंदिन जीवनातील प्रत्‍येक पैलूवर नक्‍कीच  होईल.  

हे इतके प्रभावी व परिणामकारक आहे की, आपल्‍या जाणीव क्षेत्रातील, आपल्‍याला माहित असलेल्‍या, आपल्‍या पालकांशी, जीवनसाथीशी, मालकाशी इतकेच काय, अपरिचितांशीच नाही तर, यामुळे आपल्‍या मेंदूसोबतही ते निगडीत आहे. इतके की, त्‍यामुळे शरीरभर पसरलेल्‍या ज्‍यामुळे आपले अस्तित्‍व आहे अशा आपल्‍या पेशी, त्‍याही पलिकडे पेशींमध्‍येही आपल्‍या ब-या, वाईट यासाठी जबाबदार असलेल्‍या आपल्‍या जणूकांच्‍या स्‍तरावर याचा प्रभाव आहे. 

सामाजिक बुद्धिमत्‍ता या पुस्‍तकात, लेखक डॅनियल गोलमन, आपल्‍या परस्‍पर संबंधित जगासाठी धक्‍कादायक, आश्‍चर्यकारक असणारे असे नवे उदयास येणारे शास्‍त्र याचा प्रवास घडवतात. त्यांचा सर्वात मूलभूत शोध म्‍हणजे, आपण सामाजिकतेसाठी बनलेलो आहोत, आपण सतत “न्यूरल बॅलेट” मध्ये गुंतलेले असतो जो आपल्या सभोवतालच्‍या लोकांच्‍या मेंदूशी जोडण्‍याचे काम करत असते यासाठी कारणीभूत असतो.

आपल्या इतरांबद्दलच्या प्रतिक्रियांचा, आणि त्यांच्या आपल्यावरील प्रतिक्रियांचा, दूरगामी जैविक प्रभाव असतो, हार्मोन्स म्‍हणजेच संप्रेरके शरीरात जे स्‍त्राव स्‍त्रवतात, जो आपल्या हृदयापासून आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेपर्यंत सर्वकाही नियंत्रित करत असतात, चांगले नातेसंबंध बनवन्‍यात जीवनसत्त्वांसारखे कार्य करतात-आणि विषासमान वाईट संबंधही बनवत असतात.  

💡👉(Hormones)हार्मोन्स- संप्रेरकेः शरीराच्‍या अवयवांना चेतना देणारा काही शरीरग्रंथीपासून निघणारा विशिष्‍ट रसायणांचा स्‍त्राव

आपण सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जसे सर्दी झालेल्‍या व्‍यक्‍तीला सहजच ओळखू शकतो, पकडू शकतो, समजून घेतो अगदी तसेच आपण लोकांच्‍या भावनांना पकडू शकतो, समजू शकतो.  सामाजिक बुद्धिच्‍या वापर व सरावामुळे हे शक्‍य आहे.  एकटेपण (Isolation) आणि सामाजिक तणाव (Stress) यांचे फार कठोर (Relentless) आणि आयुष्‍य संकुचित करणारे परिणाम असू शकतात.

लेखक गोलमन आपल्‍याला आश्‍चर्यकारक अशा पहिल्‍या प्रभावाची अचूकता समजावतात, वैयक्तिक आकर्षनाचे तेजोवलय आणि भावनिक शक्‍ती, लैंगिक आकर्षणाची जटीलता, गुंतागुंत आणि आपण खोटं कसं ओळखतो, ताडतो या गोष्‍टीदेखिल सामाजिक बुद्धिशी कशाप्रकारे जुळलेल्‍या आहेत हे समजावून सांगतात.

मादकपणा, आत्‍मश्रेष्‍ठी मिरवणे (नार्सिसिझम) ते मॅकियाव्हेलियनिझम आणि सायकोपॅथी पर्यंतची अशी सामाजिक बुद्धिमत्‍तेची ''काळी बाजू'' देखिल लेखक आपल्‍याला दाखवतात.  त्‍यासोबतच ते आपल्‍याला "मनदृष्टी" (Mindsight) साठीची आपली आश्चर्यकारक क्षमता तसेच अशा लोकांची शोकांतिका देखील प्रकट करून दाखवतात ज्यांची मानसिक दृष्टी ऑटिस्टिक मुलांप्रमाणे कमजोर आहे.

आनंदित राहण्‍यासाठी आपल्‍या मुलांना वाढवता येईल असा एखादा मार्ग आहे का? यशस्‍वी, सफल लग्‍न-विवाहाचा पाया-आधार काय आहे? व्‍यावसायातील नेते ज्‍यांचे नेतृत्‍व करतात आणि शिक्षक ज्‍यांना शिकवतात त्‍यांना सर्वोत्‍तम प्रेरणा कशी देऊ शकतात? पूर्वग्रह आणि द्वेषाने विभागलेले गट शांतीने एकत्र कसे राहू शकतात?

या प्रश्‍नांची उत्‍तरं कदाचित जसा विचार केला होता तितकी सहज, सोपी, चटकन देता येतील अशी नसतील आणि गोलमन आपल्‍याला त्‍यांच्‍या मनातून व खात्रीने ही गोष्‍ट सांगतात की,

आपल्यामध्ये सहानुभूती, सहकार्य आणि परोपकार याविषयीच्‍या क्षमता अगोदरच असतात, अंगभूत पूर्वाग्रह असतात, जर का आपण स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये या क्षमतांचे पालनपोषण करण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करू शकलो. -डॅनियल गोलमन

We humans have a built-in bias toward empathy, cooperation, and altruism–provided we develop the social intelligence to nurture these capacities in ourselves and others.
-Daniel Goleman

 

इतर संबंधितः 

 

Hormones: 

💡👉(Hormones)हार्मोन्स- संप्रेरकेः शरीराच्‍या अवयवांना चेतना देणारा काही शरीरग्रंथीपासून निघणारा विशिष्‍ट रसायणांचा स्‍त्राव
Hormones Read More...  

Know More about Hormones


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive