भावनिक बुद्धीमत्ता 2.0 | Emotional Intelligence 2.0 by Travis Bradberry (Marathi)

भावनिक बुद्धीमत्ता चांगली असणं ही काळाची गरज आहे, जो भावनांना नियंत्रणात ठेऊन कृती करतो तोच यशावर टिकतो

  भावनिक बुद्धीमत्ता 2.0
Emotional Intelligence 2.0
by Travis Bradberry


Emotional Intelligence 2.0 by Travis Bradberry
Travis Bradberry ( Ph. D.), Jean Greaves, ( Ph. D.),

Marathi Translation

Prasad Dhapare

इमोशनल इंटेलिजन्स' हा तुमच्या मुलाचे माणूस असण्याचे, जिवंतपणाचे लक्षण आहे.

आपण एक अति स्पर्धात्मक जगात राहत आहोत, इथे यशस्वी आणि आनंदी राहण्यासाठी भावनात्मक बुद्धिमत्तेचा खूप मोठा वाटा आहे. 

या पुस्तकाद्वारे लेखकद्ववयीनी पायरी दर पायरी पद्धतीने आपल्याला भावनात्मक बुद्धीला उपयोगात आणण्याचे मार्गदर्शन केलेले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भावनात्मक बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा करू शकता.

एक सातत्यपूर्ण कामगिरी ठेवू शकता आणि आपल्या आयुष्यातील ध्येय आणि उद्दिष्टांना पूर्ण करू शकता.  तर चला मग सुरु करूया इमोशनल इंटेलिजन्स २.० पुस्तकाचे सारांश

पाहिला धडा # प्रवास The Journey

सर्वसामान्यपणे  आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या बुद्धिमत्तेने म्हणजेच बुद्ध्यांकाने -इंटेलिजन्सने आय क्यू ने ओळखत व तपासत असतो. खरे तर हेच सर्व काही सत्य नसून त्यापलीकडेही अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता माणसाला असतात.  

जास्त आयक्यू असणारा व्यक्ती अधिक हुशार आणि यशस्वी होईल याची खात्री नसते.  वैज्ञानिक असे मानतात की कोणत्याही यशस्वी व्यक्तीला त्याच्या  आयक्यू पेक्षा ईक्यू महत्वाचा असतो. जी लोकं भावनात्मक रित्या हुशार असतात त्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची चांगली जाणीव असते.  ते इतरांना समजून घेऊ शकतात.  

जसे की आपण वर सांगितलेलं आहेच आपण आज एका अति स्पर्धात्मक युगात, जगात राहत आहोत.  या जगात उद्योग-व्यवसाय, आर्थिक, नातेसंबंध, यांच्या संबंधित संधी यांच्यासाठी स्पर्धा करत असतो.  पुढे जाण्यासाठी, जिंकण्यासाठी, प्रतियोगिता करत असतो.   

या जगात, पुढे जाण्यासाठी, सफल-यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक, यांत्रिक-तांत्रिक कौशल्य यांच्या सोबतच काही विशेष प्रकारच्या "मृदू कौशल्यांची" (Soft Skill) गरज असते आणि ते आहे भावनात्मक बुद्धिमत्ता.

Chapter 2 The Big Picture

प्रकरण दुसरे विहंगम प्रतिमा

एका संशोधनात ५ लाख लोकांना १० वर्षापर्यंत निरीक्षण करण्यात आले, यात असे कळले की फक्त ३६% टक्के लोकच आपल्या भावनांना समजू शकतात. अर्थातच आपल्यापैकी अधिकांश लोकांचा त्यांच्या भावनांवर कोणतेही नियंत्रण नसते.  

सामान्यपणे आपण या गोष्टीला नजरअंदाज करत असतो, आणि हे समजण्यास असमर्थ ठरतो कि, या जगामध्ये काही महत्वाचे निर्णय घेताना ज्ञान आणि भावनिक बुद्धिमत्ता या दोन्हींची गरज असते.  एका उच्च भावनिक बुद्धीचा अर्थ असा की, तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांना चांगल्यारितीने समजून घेऊ शकता. आणि तुम्ही या गोष्टीचा उपयोग करून स्वतःच्या वर्तनाला, वागणुकीला, आणि नाते संबंधांना नियंत्रित करू शकता, सांभाळू शकता.

ईक्यू  भावनिक बुद्ध्यांकाच्या अगदी थोड्याशा बदलाने तुम्हाला खूप मोठा फरक जाणवेल, भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी तुम्ही त्यात सुधारणा केल्यास दैनंदिन आयुष्यात नक्कीच त्याचा खूप जास्त प्रभाव पडत असतो.   जसे कि भावनिक बुद्ध्यांकामधे सुधारणा करण्यासोबतच तुमच्यातील संवाद-संप्रेषण कौशल्य, निर्णय घेण्याचे कौशल्य, वेळेचे नियोजनाचे कौशल्य, नाते-संबंध जपण्याचे कौशल्य,  अशा इतर कौशल्यामध्ये देखील सुधारणा होत असते.
 

Emotional Intelligence Skills also Improve your Time Management Skills, Decision Making Skills, Communication Skills

एका अभ्यासानुसार, कोणत्याही प्रकारच्या व्यावसायात, पेशामध्ये जवळपास ५८% टक्के कामगिरी तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असते.  यासोबतच या अभ्यासामधून हेही आपल्याला समजते की, ९०% टक्के उच्चकोटीची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा भावनांक जास्त असतो आणि त्यांचे उत्पन्न देखील इतरांपेक्षा जास्त असते. हि कमाई कमी भावनांक असलेल्या सामान्य व्यक्तीच्या कमाईच्या अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असते.

पुढील प्रकरणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपला भावनांक कसे सुधारू  शकतो, कसे वाढवू शकतो. आणि त्याचा लाभ घेऊ शकतो. 

 

Chapter 3 WHAT EMOTIONAL INTELLIGENCE LIKE
प्रकरण तिसरे भावनिक बुद्धिमत्ता नेमकी कशी दिसते  

लेखकानुसार भावनिक बुद्धी कौशल्याचे चार प्रकार असतात:

  • सेल्फ अवेरनेस -स्व-जाणीव (Self Awareness)
  • सेल्फ मॅनेजमेन्ट -स्वयं व्यवस्थापन (Self Management)
  • सोशल अवेरनेस -सामाजिक जाणीव (Social Awareness)
  • रिलेशनशिप मॅनेजमेन्ट स्किल्स  -नातेसंबंध जपण्याचे कौशल्य (Relationship Management)


यापैकी वरील दोन कौशल्यापासून तुम्ही स्वतःच्या भावनांना समजू शकता आणि बाकीच्या दोन कौशल्यांचा मदतीने तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांना, मूड्स आणि त्यांच्या वर्तमान समजून घेऊ शकता.

स्व जाणीव: १. सेल्फ अवेरनेस स्व-जाणीव

स्व जाणीव दोन गोष्टींनी मिळून बनत असतो, पहिली गोष्ट म्हणजे सद्य परिस्थितित, प्रत्यक्ष वेळेत आपल्या भावनांना समजणे आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रतिक्रियेवर लक्ष देणे.  हे एकप्रकारे पायाभूत कौशल्य आहे, ज्याच्या मदतीने इतर दुसऱ्या भावनांक कौशल्यांचा उपयोग करणे सोपे होऊन जाते. जेंव्हा तुमच्या`जवळ उच्च स्तराचे स्वयं जाणिव असते तेंव्हा तुम्ही नकारात्मक परिस्थितीतही आपल्या भावनांना नियंत्रीत करू शकता आणि कोणत्याही प्रकारच्या चुका होण्यापासून टाळू शकता. भावनेच्या भरात होणाऱ्या चुका भावनांच्या जगात डोकावून-समजून-उमजून टाळल्या जाऊ शकतात.  

उच्च स्तराची स्वयं जाणीव याचा अर्थ असा आहे कि, तुम्ही तुमच्या बलस्थानं आणि कमकुवतपणाला चांगल्या रीतीने ओळखत असता आणि हेही समजून घेता की, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या लोकांमुळे तुमच्या भावना छेडल्या जातात,

२. सेल्फ मॅनेजमेन्ट स्वयं व्यवस्थापन  -स्व-व्यवस्थापन:

स्व-व्यवस्थापन असे सामर्थ्य आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्व-जाणिवेचा उपयोग, वापर आपल्या वर्तन-वागणुकीला नियंत्रित करण्यासाठी करू शकता.  जसे कि, एखाद्या वाईट परिस्थितीत तुमच्या भीतीच्या भावनेला स्वतःवर ताबा मिळवन्यापासून थांबवू शकता आणि विचारपूर्वक, समजून-उमजून-जाणून काळजी घेऊन योग्य निर्णय घेता. यामध्ये सर्वात कठीण गोष्ट हि आहे कि, बऱ्याच वेळेपर्यंत आपल्या भावनांना सांभाळणे, व्यवस्थापन करणे.
लक्षात ठेवा, यश तेंव्हाच मिळत असते जेंव्हा तुम्ही अल्पकालीन बक्षिसांना सोडून आपल्या दीर्घ कालीन लक्ष्य, उद्दिष्टावर ध्यान-लक्ष केंद्रित करत असता.

३. सोशल अवेरनेस सामाजिक जाणीव  -सामाजिक जाणीव:

समाजीक जाणीव असे सामर्थ्य आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इतरांच्या भावनांना आणि जाणिवांना समजून घेऊ शकता.  याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीला पुढच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाने, नजरेने बघू शकता, समजू शकता आणि त्यानुसार आपली कृती-कामं करू शकता.  सामाजिक जाणिवेच्या क्षमतेला, कौशल्याला उत्तम बनविण्यासाठी, दुसऱ्यांच्या बोलण्याला काळजीपूर्वक, लक्षदेऊन ऐकणे आणि त्यांचे निरीक्षण करणे खूप गरजेचे आहे.

४. रिलेशनशिप मॅनेजमेन्ट स्किल्स  नातेसंबंध जपण्याचे कौशल्य

तुमचे नातेसंबंधांचे गुणपत्रक या गोष्टीवर निर्भर करते कि, तुम्ही इतरांसोबत कश्याप्रकारे वागता, बोलता, वावरत असता आणि दुसऱ्यांच्या भावनांना किती चांगल्या रीतीने समजून घेत असता. जेंव्हा तुमचे नातेसंबंध व्यवस्थापन चांगले असते तेंव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत मिळून-मिसळून वागू शकता.   

अधिकांश नातेसांबांधांच्या खराब होण्याच्या, बिघडण्याचे मुख्य कारण राग आणि निराशा असते. नातेसंबंध व्यवस्थापन कौशल्य तुम्हाला या प्रकारच्या परिस्थितीतही तुम्हाला वाचवते.


Chapter 4: Digging in: An Action Plan to Increase Your EQ
प्रकरण चार: सखोल खोदणे: तुमचा EQ वाढवण्यासाठी एक कृती योजना

उत्तम भावनाकासोबतच आपल्या मेंदूच्या तार्किक आणि भावनिक भागात सहजपणे माहितीची देवाण-घेवाण होत असते. हे दोन्ही भाग  आपापसात जितके जास्त संवाद -संप्रेषण करतील, त्यांच्यातील संबंध -जोडणी तितके जास्त बळकट, मजबूत होत जात असते. आणि आपले भावनांक देखील सुधारते. 

हा विकास आपल्या मेंदूच्या न्यूरो प्लास्टिसिटी मुळे (Neuro Plastisity) शक्य आहे.  न्यूरो प्लास्टिसिटी याचा अर्थ ,नव - नव्या माहितीनुसार आपल्या मेंदूचा स्वतःमध्ये परिवर्तन, बदल करून घेण्याची त्याची क्षमता.  म्हणजेच आपला मेंदू स्वतःच्या कार्यक्षमतेचा वाढविण्यासाठी, नवनवे पेशींच्या  जोडण्या,संबंध, बनवत असतो यांची संख्या जितकी अधिक असेल तितकेच तुमचे तुमच्या भावनांवर नियंत्रण असेल.

जसे की, उदाहरणार्थ, तुम्ही राग आल्यावर  किंचाळतो,ओरडतो, परंतु पुढच्यावेळी रागावण्याऐवजी तुम्ही शांत राहण्याचा निर्णय घेता. यामुळे तुमच्या  मेंदूमध्ये एक नवीन पेशींचा समूह जोडला जातो, नवा संबंध  बनतो, आणि जेंव्हा तुम्ही याच गोष्टीला पुन्हा  एकदा,परत करता तेंव्हा हि जोडणी, हा संबंध अधिकाधिक मजबूत, बळकट होत जातो.  शेवटी,रागावल्यामुळे तुम्ही ओरडण्याचा सवयीला सोडून देता.    


लेखकांनी भावनांक वाढविण्याचे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जी तुम्हाला पुढे येणाऱ्या भावनांक रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील.

Choose One EQ Skill to Work On
भावनिक बुद्धीवर काम करण्यासाठी भावनांक कौशल्य निवडणे

आपला मेंदू एकावेळी केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो. यासाठीच एका वेळी फक्त एकाच कौशल्यावर काम करा.

Aim for Success, not for Perfection 

आपल्या EQ ला विकसित करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये सतत सुधारणा करण्याची गरज आहे. कोणत्याही गोष्टीत काटेकोरपणे, अगदी १००% व्यवस्थित करण्याच्या कारणामुळे तुम्ही कशातच प्राविण्य मिळवू शकणार नाहीत.  

Practice : सराव, सराव आणि सराव

आपल्या EQ ला वेगवेळग्या परिस्थितीत आणि लोकांवर वापरून पहा.  EQ ला वाढविण्याचा हा सर्वात उत्कृष्ट मार्ग आहे.  धीर धरा, EQ ला सुधारणा करण्यासाठी वेळ लागत असतो. पुढे सांगितलेल्या व्यायाम प्रकार तीन ते सहा महिन्यांच्या नंतरच तुम्हाला याचे परिणाम पाहायला, दिसायला लागतील.  यासाठीच धैर्य ठेवा.

Practice : सराव, सराव आणि सराव
Practice Make Perfect, not True at all..!
Know More...

Chapter 5: Self Awareness Strategies
प्रकरण पाचवे:  स्व-जाणीवसाठी रणनीती - सेल्फ अवेअरनेस स्ट्रॅटेजीस

दुसऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवण्याअगोदर, रेलशनशिप मॅनेज  करण्यासाठी तुम्हाला स्वतःला मॅनेज करायला शिकले पाहिजे. आणि आपल्या सकारात्मक व नकारात्मक भावनांच्या प्रति संपूर्णतः स्वजाणिव असायला पाहिजे.

तुमच्या स्व-जाणिवेला विकसित करण्यात तुमची मदत करतील अश्या काही रणनीतीबद्दल या प्रकरणात आपण जाणून घेणार आहोत. 


"फील युअर इमोशन्स फिजीकली" म्हणजेच शारीराद्वारे आपल्या भावना समजणे, अनुभवणे.  आपला मेंदू आणि आपला शरीर अशा प्रकारे एकमेकांशी जुळलेले आहेत कि, जेंव्हाही आपल्या मध्ये कोणत्याची प्रकारची भावना उत्पन्न होते तेंव्हा लगेच याची लक्षणं आपल्या शरीरावर दिसायला लागतात, जसे कि, आपले श्वासोच्छवास, हृदयाची स्पंदनं तसेच शरीराच्या  इतर अवयवांवर-अंगावर, त्यांच्या कार्य प्रणालीवर परिणाम दिसायला लागतात व फरक पडायला लागतो.    

यासाठी आपल्या भावनांना समजून घेण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत व मार्ग म्हणजे आपल्या शरीरात होत असलेले बदल यांवर लक्ष देणे.
 
आपल्या या सामर्थ्याला वाढविण्यासाठी काहीवेळ निवांत  शांतपाने पणे बसा.  आणि आपल्या डोळयांना बंद करून आपल्या हृदयाच्या ठोक्यांनं, आपल्या श्वासावर, मानेवर, आणि आपल्या होतं-पायांच्या मांसपेशींना जाणून घेण्याचा प्रयत्न करा.  आणि या गोष्टीवर लक्ष द्या कि, सामान्य परीस्थितीत  तुमच्या शरीराची  स्थिती, लक्षण कशी असतात.  

या दरम्यान आपल्या जीवनातील एका सकारात्मक आणि एका नकारात्मक  प्रसंग,घटना, अनुभव, गोष्ट यांबद्दल विचार करा, कल्पना करा, आणि लक्ष द्या कि असे करताना तुमच्या शिरा, रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह कसा होता? हृदयाची स्पंदनं, श्वासाची गती, कशी होती? तुमच्या शरीराचे तापमान वाढत होते कि कमी होत होते, कि सामान्य होते? तुमचे स्नायू आकसत-आकुंचन पावत होते, ताणले जात होते कि सैल-ढीले प्रसरण पावत होते, कि सामान्य स्तिथीत होते? 

अशा प्रकारे तुम्ही जर हे व्यायाम वारंवार परत-परत कराल तर तुम्ही आपल्या शरीरात  होणाऱ्या बदलांवर लक्ष देऊन आपल्या भावनांना सहजपणे समजून घेऊ शकता.

Know Who and What Pushes Your Buttons
भावनिक बटन: तुमची भावनिक कळ ओळखणे

आपल्यापैकी प्रत्येकाचा काहीतरी, कोणता तरी, कुठेतरी एखादा "बटन" किंवा कळ असतोच त्यामुळे आपण खूपच चिडतो, आपल्याला ती गोष्ट आवडत नसते, याला लेखक "ट्रिगर" असे म्हणतात. हा ट्रिगर एखादी व्यक्ती, परिस्थिती, किंवा एखाद्या प्रकारचा विशिष्ट वातावरण असू शकतो,  एकदाका तुम्ही या ट्रिगरला ओळखले नंतर याचा तितका प्रभाव तुमच्यावर होणार नाही. आणि शांतीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकता.

Spot Your Emotions in Books, Movies and Music

एखाद्या पुस्तकात वाचत असताना, एखादे गाणे ऐकताना किंवा एखादा सिनेमा पाहताना आपल्या भावनांवर लक्ष द्या.  यामुळे तुम्हाला तुमच्याबद्दल खूप काही माहित होईल.  एखाद्या कादंबरीतील वाक्य, गोष्ट, प्रकरण, एखाद्या सिनेमातील कथानक, पात्र, नट, प्रसंग, रंग-ढंग-दृश्य, किंवा संगीतातील एखाद्या गाण्याच्या ओळीमुळे, बोल-ताल-सूर-लय आवाज यामुळे तुमच्या भावनांचे सखोल बंदिस्त दरवाजे उघडू शकतात.

 Seek Feedback प्रतिक्रिया जाणणे

तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने पाहता? आणि इतरजण तुम्हाला जसे पाहतात, यादरम्यान खूप अंतर असतो. आपल्या स्व-जाणिवेला विकसित करण्यासाठी तुम्हाला दोघांच्याही दृष्टीकोनाची गरज पडेल. एक- दुसऱ्यांकडून आपल्याबद्दलची मतं  जाणून घ्या.  तुमच्या एखाद्या कल्पना, विचारावर त्यांचे काय मत आहे, असे त्यांना विचारा.

 Quit Treating Your Feelings as Good or Bad

आपल्या भावनांना कोणत्याही प्रकारचे बरे-वाईट असे शिक्के मारणे सोडा.  चांगल्या भावना - वाईट भावना अशा चक्रात तुम्ही नेहमी हे समजण्यास विसरता की, तुम्हाला खरोखरच, वास्तवात कसे वाटत आहे. अशाप्रकारे आपल्या भावनांना बिल्ले चिकटवणे सोडून द्या.  अशा पद्धतीने आपल्या भावनांविषयीची गैर समजूत करणे तुमच्यासाठी धोक्याचे असू शकते. 

 

Chapter 6: Self Management Strategies

स्व-जाणिवेसाठी रणनीती बनवणे

जेंव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांना समजून घ्यायला लागता यानंतर वेळ येते ती भावनांचे व्यवस्थापन करण्याची, जेणेकरून तुम्ही कोणत्याही परिस्तिथीत  भावनांना नियंत्रित करू शकाल.  अशा पद्धतीने तुम्ही इमोशनल हायजॅक म्हणजेच "भावनिक अपहरण" होण्यापासून पासून स्वतःचा बचाव करू शकता.  तर चला मग, स्वयं व्यवस्थापन रणनीतीबद्दल जाणून घेऊ.

योग्य श्वासोच्छवास Breath Right

अधिकतर वेळा आपण योग्य पद्धतीने श्वास घेत नसतो.  नेहमीच आपण दीर्घश्वास (Deep Breathing) सखोल श्वासोच्छवास करण्याऐवजी Shallow Breathing उथळ-वरवर  श्वासोच्छवास करत असतो. याचा असा की आपल्याला जितक्या प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची आवश्यकता असते तितकं ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळत नसते. 

ऑक्सिजनच्या अभावामुळे आपले मूड प्रभावित होत असते. यामुळे जेव्हाही एखादी तणावपूर्ण स्थिती असेल तेंव्हा आपल्या नाकाने लांब लांब-दीर्घ श्वास आत घ्या आणि आपल्या तोंडाने हळू हळू,  सावकाशपणे बाहेर श्वास सोडा.  अशा पद्धतीने स्वासोच्छवास केल्याने तुमचे मन शांत होत असते आणि तुम्ही अगदी स्पष्टपणे विचार करू शकता.

Inhale: Deep & Long, Exhale: Slowly
दीर्घ श्वास + शांत मन = स्पष्ट विचार

 

लोकांसमोर आपली ध्येय - उद्दीष्टे ठेवणे Make Your Goals Public

जेंव्हा तुम्ही आपली ध्येय लोकांसमोर ठेवता तेंव्हा तुमच्या आतमध्ये एक प्रकारची उत्तरदायित्वाची जाणीव तयार होत असते, त्याला "सेन्स ऑफ अकाउंटीबिलिटी" असे म्हणतात.  म्हणजेच तुम्ही कोणासमोर तरी एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार आहात.  यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येय-उद्दिष्टांकडे जाण्यासाठी पुढे-पुढे ढकलण्याचे कार्य हि उत्तरदायीत्वाची जाणीव करत असते.

  • Sense of Accountability - उत्तरदायीत्वाची जाणीव 

  • Sense of Responsibility -जबाबदारीची जाणीव


मोटिवेशन म्हणजेच 'प्रेरणा' स्वयं व्यवस्थापन करण्यामधील महत्वाचा आणि मोठा भाग आहे. आणि जेंव्हा इतर लोकं तुमच्या प्रगतीवर लक्ष देतात तेंव्हा तुम्ही नेहमीच काहीतरी अधिक करण्यासाठी प्रेरित आणि स्फुर्तिवान राहता. 

  • Motivation - प्रेरणा

  • Inspiration - स्फूर्ती

👉Also Know more: about difference between Motivation & Inspiration

 

Smile and Laugh More अधिक स्मितहास्य करणे आणि हसणे

अभ्यास आणि संशोधनाने आज हे सिद्ध केले आहे की हसणे तुमच्या शरीरात एक प्रकारचे हॉर्मोन -स्त्राव स्त्रवते ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटते. जेंव्हा तुम्ही एखाद्या खराब-गंभीर-रंगीत, चिडखोर मूड मध्ये असता तेंव्हा चेहऱ्यावर अकारण स्मितहास्य करणे, हसन्यासाठी स्वतःला मजबूर करणे, तुमच्या मूडला बऱ्याच अंशी उत्तम बनवू शकतो.  हि बाब शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. 

SMILE is a CURVE that Keeps Everything STRAIGHT

उदाहरणार्थ जसे कि, एका शोधाभ्यासात दोन गटांना एका कॉमिक पुस्तकाचे एक पण वाचण्यास सांगितले गेले.  पहिल्या गटाला आपल्या दातांमध्ये एक पेन्सिल ठेऊन वाचन करण्यास सांगितले गेले, ज्यामुळे ते स्वतःला स्मितहास्य करण्यास दबाव आणतील, सक्ती करतील. तर दुसऱ्या गटाला होटांमधे पेन्सिल पकडून वाचन करण्यास सांगितले गेले.  याचे निष्कर्ष असे निघाले कि, जो गट आपल्या  दातांमध्ये पेन्सिल पकडून वाचन करत होते ज्यामुळे ते स्वतःला स्मितहास्य करण्यासाठी सक्ती करतील, आपोआपच स्मितहास्य होईल.  

त्यांना ती कॉमिक पुस्तक खूपच मजेशीर, गमतीशीर वाटली.  यामुळे जेव्हाही तुमचा मूड खराब असेल किंवा होईल तेंव्हा एखादे हास्यविनोद करणारे चित्रपट, सिनेमा, नाटक, विनोदी कार्यक्रम बघा, किंवा एखादे विनोदी किस्से, गोष्टी असलेली कॉमिक, मजेशीर लेख, मनोरंजक पुस्तक वाचा, तुम्हाला हलके-फुलके वाटेल, तुमचा मूड नक्कीच बदलेल. आणि तुम्हाला खूप बरे वाटेल.  SMILE is a CURVE that Keeps Everything STRAIGHT.

Visualize Yourself Succeeding यशाची कल्पना करणे

ज्याप्रकारे वास्तवात आपण उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष सर्व जग पाहू शकतो, तसेच आपण आपल्या मनाच्या डोळ्यांनी अंतर्रचक्षू -मनःचक्षु द्वारे स्वतःला स्वतःच्या कल्पनेतील आभासी जग पाहू शकतो.  मानवाला मिळालेली कल्पना करण्याची निसर्गदत्त देणगी नक्कीच वरदान आहे. 

कोणत्याही गोष्टीला वास्तवात प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर आपला मेंदू त्याची प्रक्रिया करतो त्याप्रमाणेच जेंव्हा तुम्ही "मना"मध्ये काही कल्पना करत असता  तेंव्हासुद्धा आपला मेंदू तशीच प्रक्रिया करू लागतो जसेकी प्रत्यक्षात आपण त्या गोष्टीला आपल्या समोर पाहत आहोत.  जेंव्हा तुम्ही आपल्या मनामध्ये तुम्ही सहजतेने स्वतःच्या भावनांना व्यवस्थापित करत आहात  अशाप्रकारे कल्पना-Visualize करता तेंव्हा तुमचा मेंदू त्या कल्पनेलाही तसेच स्वीकारतो व प्रक्रिया करायला लागतो.  

या गोष्टीला एक सवय बनविण्याचा प्रयत्न करा. यासाठी एखाद्या शांत जागेवर बसून आपल्या मनात अशी कल्पना करा कि, तुम्ही तुमच्या भावनांना व्यवस्थापित करत आहोत, आणि तुम्ही परिस्थितीनुरूप आपली वर्तन-वागणूक करत आहात. नक्कीच फायदा होईल. फेक इट टिल यु मेक इट.  Fake it Till you Make It.

Clean Up Your Sleep Hygiene  आपल्या झोपेच्या आरोग्यावर लक्ष द्या

एक चांगली झोप तुम्हाला लवचिकता, स्पष्ट मन आणि सतर्कता देते, जे कि स्वयं व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक आहे.  एक उत्तम झोप घेण्यासाठी, झोपण्यापूर्वी जवळपास दोन तास अगोदर हरेक प्रकारचे इलेकट्रॉनिक साधने जसे, टीव्ही-दूरदर्शन, संगणक-कॉम्प्युटर आणि स्मार्ट मोबाइल फोन  यांचा वापर करू नका. कारण झोपण्याअगोदर तुम्ही अशा गॅजेटचा वापर करत असता तेंव्हा यांच्या स्क्रीन वरून निघणाऱ्या प्रकाशामुळे तुमच्या "स्लीप सायकल" झोपेचे चक्र यावर परिणाम होत असतो.

यासोबतच झोपण्यापूर्वी
  • चहा-कॉफी पिणे बंद करा.  
  • काम करण्यासाठी आणि मनोरंजन साठी टीव्ही 
  • असे वेगवेगळे स्क्रीन डिवाइस वापरा.  
  • पलंगावर बसून कधीही काम करू नका
  • पलंगाचा उपयोग फक्त रात्री झोपण्यासाठीच करा

Put Mental Recharge into Your schedule

आपल्या मेंदूची देखभाल करण्याबरोबरच तुम्हाला तुमच्या शरीराचीदेखील चांगली देखभाल करायला पाहिजे. यासाठी तुम्हाला दररोज कोणत्या-ना-कोणत्या प्रकारची शारीरिक कसरत अवश्य करायला पाहिजे.  


जेंव्हा तुम्ही एखादी शारीरिक क्रिया-कसरत, व्यायाम  करता तेंव्हा तुमच्या शरीरात हॉर्मोन म्हणजेच संप्रेरके तयार होतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. या रसायनामुळे (हॉर्मोनमुळे) तुमच्या शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि तुमच्या मूड मध्ये सुधारणा होत  असते. यासोबतच कोणत्याही प्रकारची शारीरिक कसरत, व्यायाम, तुमच्या मेंदूची नियोजन, एकत्रीकरण आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवून-IMPROVE आणि कौशल्यं यांनाही अधिक चांगले बनवत असतात. 

Chapter 7- Social Awareness Strategies

सामाजिक सतर्कता कौशल्य विकसित करण्यासाठी रणनीती  

सामाजिक सतर्कता कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निरीक्षण.  दुसऱ्यांच्या शरीराची भाषा, देहबोली, चेहऱ्यावरील भाव भावना ओळखणं, त्यांचा आवाज आणि हावभाव-हातवारे   इत्यादींवर लक्ष देऊन तुम्ही हे जाणून घेऊ शकता कि त्यांच्या आत मनामध्ये मध्ये काय चाललं आहे? 

चला तर मग जाणून घेऊ सामाजिक सतर्कता कौशल्य वाढविण्यासाठी काय रणनीती आपण करू शकतो ते पाहूया:

लोकांना त्यांच्या नावाने बोलावणे, Greet People by their Name

लोकांना त्यांच्या नावाने बोलावणे, हाक मारणे, बोलताना त्यांच्या नावाचा उल्लेख करून बोलणे असे करणे त्यांच्याशी निकटता विढविण्याची एक चांगली पद्धत आहे. त्यांच्याशी जुळण्यासाठी संवाद करताना, बोलताना व इतर ठिकाणी नावाने हाक मारून बोलावणे, तुम्हाला त्यांच्याशी जोडण्यास या गोष्टी मदत करातात.  एका भेटीनंतर पुढच्या भेटीत  त्यांचे नांव लक्षात ठेवून त्याना नावाने बोलावे. संवादामध्ये  कमीत कमी दोनवेळा त्यांच्या नावाचा उल्लेख येईल याची काळजी व दक्षता घ्यावी. 

 जगद्विखयात लेखक डेल कार्नेगी यांनी त्यांच्या मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा (How to Win friends and influence people) या पुस्तकात या गोष्टीला तपशिलाने, सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. (इथून पुस्तक सारांश वाचू शकता).  

एखादी व्यक्ती नेमका काय विचार करत आहे? त्याला काय जाणवत आहे, या गोष्टी त्याच्या शारीरिक व चेहऱ्याच्या हावभावांनी, देहबोलीने आपल्याला माहित होऊ शकते. जसे कि, उदाहरणासाठी,  समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये पाहून बोलणे एक विश्वासूपणा, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकपणा या गोष्टींना दर्शविते तर या उलट झुकलेली नजर, खाली किंवा इतरत्र पाहून बोलने अविश्वास, धोका या गोष्टींना दर्शविते.  
या प्रमाणेच लोकांच्या हसण्यावरून, आणि त्यांच्या शरीराची ढब पाहून तुम्ही त्यांच्याबद्दल खूपकाही जाणून घेऊ शकता.

या क्षणी प्रत्यक्षात जगणे Live in the Moment

आपल्या सामाजिक सतर्कतेच्या कौशल्याला वाढविण्यासाठी जे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष वर्तमानात, त्या क्षणात तिथे असणे. आपले विचार, भूतकाळात आणि भविष्यकाळात सतत येत जात असते.  यासाठी आपले लक्ष-ध्यान पूर्णपणे वर्तमानात राहील याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.  वर्तमानात आणि भविष्याबद्दल विचार करणे खूप आवश्यक आहे, परंतु योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी.

कान देऊन ऐकण्याच्या कलेचा सराव करणे  Practice the Art of Listening: 

ध्यान देऊन ऐकण्याच्या कलेचा सराव करणे  Practice the Art of Listening: दुसऱ्यांच्या बोलण्याला लक्ष देऊन ऐकणे, फक्त एका शब्दावर लक्ष देणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे इथपर्यंत ते सीमित नाही, तर, इतरांशी बोलताना त्यांचा आवाज, त्यांचा बोलण्याचा ढंग, शब्दांवर दिलेला जोर, लकब, रीत, पद्धत, शैली आणि  बोलण्याचा वेग यावरही लक्ष द्यायला पाहिजे. अशामुळे तुही दुसऱ्यांच्या बोलण्याला अधिक चांगल्या रीतीने, समजून घ्याल.

स्वतःला त्यांच्या जागेवर ठेऊन विचार करणे, Step into Their Shoes

जसा आपला दृष्टिकोन असतो, आपले विचार असतात, तसेच दुसऱ्या व्यक्तींचे पण असते.  संवादामध्ये, स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून विचार करणे जमण्यासाठी, तुम्हाला स्वतःला स्वतःचे विचार, दृष्टिकोन, भावना, बाजूला ठेवून त्यांचे बोलणे, त्यांचे विचार, त्यांच्या भावना त्यांच्या दृष्टिकोनाने समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशी कल्पना करा कि तुम्ही जर त्यांच्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं?

सहभावना जोडणे Match the Mood of the Room

जेंव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांना समजणे शिकून जाता, तेंव्हा तुम्ही याचा उपयोग व वापर लोकांवर करू शकता. लोकांनी भरलेल्या एखाद्या खोलीत शिरताच तुम्हाला तेथील वातावरणाचा, मूडचा अंदाज लगेच येईल. याला "कलेक्टिव्ह मूड" असे म्हणतात.  जेंव्हा तुम्ही एखाद्या कार्यालयात, शिबिरात जाल तेंव्हा सर्वात आधी तेथील वातावरणावर लक्ष द्या, तिथल्या ऊर्जेला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि लोकांच्या हालचालींना बघा. असे केल्याने तुम्हाला त्या ठिकाणाबद्दल, तिथं उपस्थित लोकांबद्दल खूपकाही माहिती मिळेल.
 

Chapter 8: Relationship Management Strategies

नातेसंबंध नियोजन कौशल्य रणनीती

दुसऱ्यासोबत तुमचे संबंध कितीही चांगले का असेना, परंतु दीर्घकाळापर्यंत हे नाते-संबंध टिकवून ठेण्यासाठी एका उत्क्रुष्ट नातेसंबंध जपण्यासाठी नियोजनबद्धतेची गरज असते.  लेखकांनी आपल्याला इथे नातेसंबंध नियोजनासाठी काही रणनीतींबद्दल सांगितलेलं आहे, चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊ:

खुले आणि जिज्ञासू राहणे  Be Open and Be Curious

खुले राहणे याचा अर्थ तुमच्याबद्दल इतरांना सर्वकाही माहित असायला पाहिजे, जेणेकरून लोकं तुमच्याबद्दल गैर समजूत करून घेणार नाहीत.  याचप्रमाणे तुम्हालाही दुसऱ्याबद्दल जाणून घ्यायची जिज्ञासा असायला पाहिजे, इतरांबद्दलची माहिती विचारण्यासाठी नेहमी उत्सुक राहायला पाहिजे. यासाठी पुढच्या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. खुलेपणा आणि जिज्ञासूपणा, कुतूहल लोकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमची मदत करतात आणि ही गोष्ट नव्या आणि जुन्या अशा दोन्ही नाते संबंधावर सारखाच परिणाम करत असतात.

परिणामकारक ठरणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे Remember the Little Things that Pack a Punch:

आजकालच्या आधुनिक जगात कृतज्ञत्याचे आणि शिष्टाचाराचे (Gratitude & courtesy) courtisy-सौजन्यतेचे शब्द जसे, कृपया, धन्यवाद, माफ करा या शब्दांना नजरअंदाज केलं जातं.  लक्षात ठेवा अशा प्रकारच्या शिष्टाचाराच्या शब्दांचा उपयोग, तुमच्या नाते संबंधामध्ये गरजेचे आहे.  याच पद्धतीने दुसऱ्यांची प्रशंसा (appreciate) केल्यानेही तुमचे संबंध अधिक चांगले होत असतात.

विश्वास निर्माण करणे Build Trust

विश्वास बनण्यास खूप वेळ लागत असतो परंतु विश्वास गमावण्यास, क्षणाचाही वेळ लागत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमच्या संबंधामध्ये विश्वासाठी कमतरता आहे, तर आपल्या स्व-सतर्कतेने (Self Awareness) यामागील करणं जाणून घेण्याचा प्रयत्न करा.  सामान्यतः पुढच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलणे, चांगल्यापद्धतीने वागणे विश्वास बनविण्यास मदद करतात.  या पद्धतीने तुम्ही तुमच्या चांगल्या, उत्तम असलेल्या नाते-संबंधांना अजून जास्त उत्तम व उत्कृष्ट बनवू शकता.

पुढच्या व्यक्तींच्या भावनांना समजणे Acknowledge the Other Person's Feelings:
एका चांगल्या नाते-संबंधामध्ये पुढील व्यक्तीच्या भावनांना जाणून घेणे अत्यतं गरजेचे आहे. यासाठी तुम्हालाही त्याच्यासारखेच अनुभव घ्यायची, त्यांच्यासारखे वाटून घ्यायची आवश्यकता नाही.  खरे तर पुढच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घ्या, आणि त्यांच्या भावनांचे आदर करा, सन्मान करा. 
 
तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल सहानुभूती (Empathy & Sympathy), समन्वय साधान्यासाठी (Synergize) काहीसे गैरसोयीचे किंवा त्रासदायक वाटू शकते, परंतु एका उत्तम नाते संबंधासाठी हे खूप आवश्यक आहे.

जेंव्हा तुम्हाला काळजी वाटते, त्यांना दाखवून द्या. When You Care Show It.

कधी कधी छोट्याश्या प्रशंसेनेदेखील खूप मोठा प्रभाव, फरक आणि परिणाम होऊ शकतो. जेंव्हाही तुम्हाला दुसऱ्यांसाठी काही चांगलं करायचं असेल, किंवा काही चांगलं बोलायचं असेल, लगेच त्या गोष्टी करून टाका, जे बोलायचं ते लगेच बोलून टाका नंतर बघू म्हणून पुढे ढकलू नका, टाळू नका.  
 
अशा छोट्या छोट्या गोष्टींनी, कृतींमुळे म्हणजेच ऍक्ट ऑफ ऑफ काइंडनेस यामुळे तुमचे नाते घट्ट विणले जातील, संबंध अधिक बळकट, मजबूत, चांगले, होतील जे तुम्हालाही अचंबित करतील. 
 

फक्त निर्णय घेऊ नका, तुमचे निर्णय समजावून सांगा, Explain Your Decisions, Don't Just Make Them

जेंव्हा केंव्हा तुम्ही निर्णय घ्याल जे तुम्हाला किंवा इतरांना प्रभावित करू शकतील, तेंव्हा निर्णय घेण्याअगोदर त्यांच्याशी चर्चा करा, इतरांशी बोला, संवाद साधा.  त्यांना स्पष्टपणे सांगून टाका कि तुम्ही हे निर्णय का घेत आहात आणि असे निर्णय घेण्यामागे तुमचा हेतू काय आहे.  जितकं शक्य आहे तितकं या गोष्टींसाठी इतरांसोबत पारदर्शक राहण्याचा प्रयत्न  करा.

सारांश समाप्त

🙏धैर्यपूर्वक सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. 👍


इतर संबंधि‍तः 

Also Read:

  • Emotional Intelligence (Marathi) BY CHRISTINE WILDING,  (Author) Dr. Suchita Nandapurkar (Marathi Translator)

  • Wired to Connect: The Surprising Link Between Brain Science and Strong, Healthy Relationships
  • मनाची कल्पनाशक्ती by Manoj Ambike 

    इमोशनल हायजॅक -मनोज अंबिके

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.



टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive